" फिलहाल ..जी लेने दे .....

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
29 Feb 2012 - 3:34 pm

" फिलहाल ..जी लेने दे .....

" अरे यार अभ्या माझा पहिल्याच राउंड मध्ये बोरया वाजला रे "
अभ्या : " वॉव, दॅटस ग्रेट न्यूज " अभिनंदन !!!
तन्वी : " वॉव, दॅटस ग्रेट ?? ? ? हे हे हे तू बहिरा झालास का ? अरे मी म्हणाले की मी पहिल्याच राउंडला स्पर्धेतून बाहेर झाले रे !ऐकतोस काय तू माकडा ?
अभ्या : आयला, म्हणून तर " अभिनंदन “ करतो आहे ना ग तनु ;)
तन्वी : " अबे तू काय भंजाळला आहेस का रे " अभिनंदन" कशाबद्दल ?
अभ्या : " अग बै तू मॅचला गेलीस तिकडे ,जिंकली असतीस तर मग काय राउंड पे राउंड ,राउंड पे राउंड तिकडेच राहावं लागल असत ना तुला ?..मग मी एकट्याने कित्ती कित्ती बोर झालो असतो , झुरत बसलो असतो , तुझ्या आठवणीत देवदास झाला असता माझा ;)
तन्वी : ओह... हो ..हो ..हो.. हो .......काय पण ती नाटक ? माझ्या मेहनतीच मातेर झाल त्याच काही नै का?
अभ्या : हो ग , फार फार वाईट्ट झाल ,बघ अश्रूच्या धारा लागल्यात माझ्या डोळ्यांना ,तू असतीस तर तुलादेखील गहिवरून आल असत माझी अवस्था पाहून ,मनातल्या मनात हुंदके देतोय मी अगदी !

तन्वी ( ओरडून) " ए अभ्या... नाटक करू नको करूस ह! ठेऊ का मी फोन ?
अभ्या : हे हे हे..... frankly स्पीकिंग ,तुझी मेहनत एक मॅच हरल्यामुळे वाया गेलीय का खरच ? इतक का मनाला लावून घेते आहेस ? खेळात हे सगळ चालूच असतं हे मी तुला वेगळ सांगायला हव का ?
ओक्के!!!! ते जाऊ दे परत कधी येते आहेस ? मी येऊ का पिक-अप करायला ?
तन्वी : नो नीड, आज रात्री निघतेय उद्या पहाटे पोहचेन ,अन दादा येणार आहे स्टेशनवर घ्यायला .
अभ्या : च्यायला माझ्याआधी घरी फोन झालेला दिसतोय तुझा ? काही गरज होती का साल्याला आय मीन तुझ्या दादाला बोलावयाची ? मी आलो असतो की घ्यायला , बावळट आहेस अगदी !
तन्वी : इतका का उतावळा झाला आहेस भेटायला ? कॉलेजवर येईल की मी उद्या संध्याकाळी तेव्हा भेटू ना निवांत !
अभ्या : : अग... तोच तर लोचा झालाय ना , उद्या दुपारच्या गाडीने मी नागपूरला चाललोय बाबांबरोबर ,जरा महत्वाच काम आहे ग ! तू येते आहेस हे माहिती असत तर कदाचित मी गेलो नसतो ,पण आता रिजर्वेशन झालीयेत अन बाबांना शब्दही दिलाय ,सो.. जावच लागेल मला ,साधारण ४-५ दिवस जातील तिकडे !

तन्वी : (नाराजीच्या सुरात ) श्शी....... हे काय रे आता ? मी येतेय अन तू नशणार ,अरे मी हरले ,त्याच इतक वाईट नाही वाटत मला, तू जातो आहेस हे एकूणच जाम बोर झालेय मला ,आधीच गेले आठ दिवस आपण भेटलेलो नाहीये अन अजून ४-५ दिवस बाप रे " I CANT IMAGINE " मला जाम बोर होईल रे आता !
हे हे आयडिया !!!
अस करते दादाला फोन करून सांगते ट्रेन लेट आहे दोन तास !
सकाळीच भेटू शक्य असेल तर OK !
अभ्या : : " आई शप्पथ , मला तुझ्या बुद्धीच खरच कौतुक वाटत ग कधी कधी ;)
डन !!!
उद्या सकाळी ६ वाजता येतो आहे स्टेशनवर OK
मिस यु बाय गुड नाईट :)
तन्वी : OK , डन डन डन !
तन्वीने फोन ठेवला ,कानात हेडफोन घातले अन तिचे आवडते गाणे मोबाईलवर प्ले केले
“दिल ही में रहता है , आँखों में बहता है !
कच्चा -सा एक ख्वाब है लगता सवाल है ,शायद जवाब है !
दिल फ़ीर भी बेताब है.... !
ये सुकून है , तो है ! ये जुनूँन है, तो है !
खूबसूरत ....है .... जी लेने दे ..!
ये लम्हा फिलहाल जीलेने दे
ये लम्हा फिलहाल जीलेने दे
पहले से लिखा, कुछ भी नहीं
रोज़ नया कुछ लिखती है तू
जो भी लिखा है दिल से जिया है
ये लम्हा फिलहाल जी लेने दे ...

मध्येच कुणीतरी तिला हलवल्याचा भास झाला तन्वीने अलगद डोळे उघडले .
" काय्ये.....? " तन्वी जवळजवळ ओरडलीच.

खिडकीतून गार वारा झपाझप आता येत होता , समोरच बसलेली रेवा तन्वीला वेडेवाकडे कसलेतरी हातवारे करीत होती .
तन्वी : अम्म... काय ग माकडे ? असे चाळे का करते आहेस ते ?
रेवाने तन्वीच्या कानातला हेडफोन काढला " अग कसला गार वारा येतोय ग आत , फडफड नुसती ! "
खिडकी बंद कर न जरा ,मला पुस्तक वाचता येत नाहीये, बघ पान कशी फडफडताहेत
तन्वी : च्च.... काय ग रेवा तू पण, किती मस्त गार हवा येत आहे अन खिडकी बंद केली तर तो डबडा फॅन लावावा लागेल अन त्याचा तो घरघरणारा आवाज अन त्याच ते अस तिरक खाट-खुट करून फिरणं,अस वाटत आत्ता पडतोय डोक्यावर आपल्या !
रेवा : ही ही ही ही तू पण ना नमुना आहेस अगदी फॅन कधी डोक्यात पडलेला ऐकलेला का ?
तन्वी : हॅ हॅ हॅ हॅ झाले का दात विचकून ? त्यापेक्षा मीच सीट चेंज करते " पवन्या" तू येतोस का इथे मी तुझ्या बर्थवर जाते .चलेगा ?
पवन : चलेगा नही दौडेगा !
खिडकीजवळच्या सिंगल बर्थवर पाठीला बॅगचा टेकू देत तन्वी पाय पसरून रीलॅकस पहुडली , मस्त गार वारा येत होता बाहेर अंधार असल्यामुळे फारस काही दिसत नव्हत. एखाद गाव / वस्ती वैगेरे लागली तर लुकलुकणारे दिवे दिसत होते रात्र फार झालेली होती. एव्हाना जवळपास डब्यातले सर्व झोपी गेले होते. तन्वी जागीच होती ,कितीही झोपायचा प्रयत्न केला तरीपण तिला आज झोप येत नव्हती का कोण जाणे अस्वस्थ वाटत होत. ती आतुरतेने सकाळ होण्याची वाट पाहत होती .
तन्वीने परत हेडफोन कानात घातला अन आवडते गाणे लावले , डोळे मिटून शांत पडून राहिली
सकाळचे पावणेसहा वाजले असतील गाडी स्टेशनवर लागली. रेवाची सामानाच्या बँगा काढायची घाई चाललेली त्यात ती सारखा तन्वीला " अग तनु उठ स्टेशन आलय बघ तरी जरा ,पवन भराभर सामानाच्या बॅगा खाली उतरवत होता
रेवाने तन्वीला गदागदा हलवले तसं तन्वीने अर्धेमुर्धे डोळे उघडून चहुबाजूला पाहून घेतले आळस देत विचारले " अय्या पोहचलोपण का आपण " ?तनुने पाठीशी टोकन घेतलेली बॅग लगबगीने खांद्यावर अडकवली .
रेवा : " तनु पव्या रिक्षा आणायला गेलाय ,चल तोपर्यंत एक मस्त चहा घेऊया, फ्रेश वाटेल .
तन्वी : हम्म रिक्षा आणायला ? ए मी दादाला बोलावले आहे तो येणार आहे तुम्ही जा ,मी वेट करेन इथेच .
रेवा : एकटी ???? अग पण एकच रूट आहे , जाऊया कि बरोबर कशाला दादाला त्रास देतेस ?
अगदी लहान मुलासारखा ओठांचा चंबू करत निरागसपने तन्वी म्हणाली ...........प्लीज रेवा तू जा बिनधास्त ! dont worry यार !
रेवा : sure ???
हो ग बै,किती प्रश्न ? वाटलं तर फोनवते तुला घरी पोहचल्यावर मग तर ओक्के ना ?
रेवा हसली अन सामानाची बॅग कशीबशी सावरत बाय म्हणत चालू लागली
हुश्श ......चला रेवाला तर कटवले पण सव्वा सहा वाजताहेत हा अभय कुठे राहिला ?
त्याच्या लक्षात तर आहे ना ? की अजून झोपेतच असेल तो ? ,लवकर उठायची सवय नाहीये अजिबात त्याला ,एक फोन तरी करून बघते म्हणून तन्वीने अभयला फोन लावला
तन्वी : HELLO " अरे आहेस कुठे तू ? केव्हाची वाट पाहतेय मी इथे , ऑन द वे आहेस का ? कि झोपेतच आहेस अजून ?
कधी पोहाचतोस बोल ?
अभय काही बोलेना पटकन,समोरुन काही रिप्लाय नाही .
"अरे चुकून दुसर्या कुणाला तर नाही ना लागला फोन अस म्हणत तन्वीने कानाला लावलेला मोबाईल डोळ्यासमोर धरला
" अरेच्या नंबर तर बरोबरे ,हा का बोलत नाही मग ?अभय तूच आहेस ना ? बोलत का नाहीस ?
अभय , अभय ..अभ्या बोल कि माकडा ?
तसा अभयचा बारीक आवाज आला पलीकडून
" अग तन्वी काये की ना ? अम्म्म..... मी काय म्हणत होतो .... बाईक..
तन्वी " काये ..काये काय चालवलं आहेस ? पटकन सांग ना काय त्ये ?
अभय : माझी बाईक पंक्चर झाली आहे इथे XXXX चौकात
तन्वीने डोळे गच्च मिटून घेतले हाताच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या
" वाटलंच मला ,तुला कधी एक काम धड जमत का रे ?वेंधळा कुठला ?
रात्री का नाही चेक केल सगळ ? तरी ठरलेले आधीच माहिती होत ना रे तुला ?
अभय : अग गाडी आता पंक्चर झालीये ना पण ,अन चेक काय करायचे त्यात, झाली ती झाली आता ? काय करू ?
तन्वी : काय करू ? डोंबल तुझे ! अरे आता बोलत काय बसलास पंक्चर काढून घे ना पटकन !
अभय : अग आता वाजताहेत किती तू बोलतेस किती ,इतक्या सकाळी माझा बापूस बसलाय का दुकान उघडून ? काहीतरी आपल ?
तन्वी : नालायका तू बोलूच नकोस माझ्याशी , भयंकर शॉट लागलाय माझ्या डोक्याला म्हणत तन्वीने फोन बंद केला
अभयचे कॉलवर कॉल येत होते तन्वीने मोबाईल सायलेंट केला
तन्वी पाचेक मिनिटात बर्यापैकी शांत झाली .
" काय्ये ? का फोन करतोय सारखा सारखा ?
अभय : अग सॉरी ना ! पण यात माझी काही चूक आहे का ? तू चिडू नकोस प्लीझ्झ्झ !!!!!
मी काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न करतो , वैभ्याला फोनवलेय तो येईल पाचेक मिनिटात ओके !
तन्वी : ओके पण लवकर ! सात वाजताहेत !
" आलोच " म्हणत अभयने फोन ठेवला .
सामसूम पहाट आता जागी होत होती , हळूहळू उजाडत होत , सकाळचा बोचरा थंड वारा ,मस्त फ्रेश वाटत होत सगळ !
पण थोडाच वेळ, तन्वीचा रागावलेला चेहरा समोर आला अन अभयने पुन्हा वैभवला फोन लावला
" भाड्या..... कुठे खपलास रे ? मघापासून येतो.. येतो.. आलो.. आलोच.. चालुये तुझ ? ती तन्वी नुसता जीव खातेय माझा फोन करून करून , जसा असशील तसा ये ना पटकन , ठेवतोय फोन !
पाचेक मिनटात वैभव पोहचला ..
वैभव : " सॉरी रे ...ही घे चावी पळ पटकन ,मी घेतो पंक्चर काढून ,संध्याकाळी भेटतो तुला ओके ?
अभय : थँकस रे !
भेटू संध्याकाळी .
अभयने गाडी स्टार्ट केली अन सुसाट वेगाने रेल्वे स्टेशनच्या दिशेने प्रयाण केले
********

तन्वी बसून बसून बोर झालेली जाम ,सारख लक्ष हातातल्या घड्याळाकडे अन गेटकडे !
कधी येतोय हा ?लोकांची बर्यापैकी वर्दळ चालू झाली होती , साफसफाई करणारी लोक , चहा- कॉफीच्या किटल्या हातात घेऊन " चलो चाय चाय चाय गरमा - गरम चाय घेऊन आरोळ्या ठोकणारी मुल ,हळूहळू प्रवासी जमा होत होते ,गर्दी वाढत होती . एक विरुंगळा म्हणून तन्वी सगळ्यांचे निरीक्षण करीत होती तसेही तिला लोकांचे निरीक्षण करायला फार आवडायचे मस्त टाईमपास व्ह्यायचा तिचा ,आताही तेच चालू होत .
इतक्यात खांद्यावर कुणीतरी हात ठेवला पाठीमागून तन्वीने दचकून मागे पाहिले चेहऱ्यावर आपोआप
विस्मयकारक भाव दाटून आले ,कपाळावर नकळत आठ्या जमा झालेल्या " दादा तू ? इतक्या लवकर कसा काय ?
दादा : ऑ ! लवकर ? आठ वाजलेत आठ, अन अशी का पाहते आहेत भूत बघितल्यासारखी आण ती बॅग इकडे ,चला ....
तन्वीचा भयंकर मूड ऑफ झालेला, बळेबळे हसत तन्वी दादाबरोबर निघाली ,तरी सारख - सारख मागे वळून तिची नजर अभयला आतुरतेने शोधत होती .मनातल्या मनात अभयला असंख्य शिव्यांची लाखोली वहात होती .

" श्शी.....ट्ट . काय झाल शेवटी ? आता येऊ दे फोन, कधी बोलणार नाही मी याच्याशी , नालायक ,डफ्फर,तोंडही पाहणार नाही पुन्हा कधी अभ्याच,मूर्ख कुठचा , किती पोपट केलाय सकाळपासून माझा ,नुसती चिडचिड , नुसता वैताग !
समजतो काय हा स्वत:ला?
गेला उडत .. हु.........डड्ड!!!!!!
असे मनातल्या मनात बोलून तन्वी कारमध्ये बसली .

क्रमश :

हे ठिकाणआस्वाद

प्रतिक्रिया

मोदक's picture

29 Feb 2012 - 3:50 pm | मोदक

वाचतोय..

प्रतिक्रिया शेवटच्या लेखावर.. :-)

वपाडाव's picture

29 Feb 2012 - 3:57 pm | वपाडाव

तुमच्या वरील संभाषणात 'दिवसांची क्रमवारी' उलट-सुलट झालेली आहे...

तन्वी : नो नीड, आज रात्री निघतेय उद्या पहाटे पोहचेन ,अन दादा येणार आहे स्टेशनवर घ्यायला .
तन्वी : इतका का उतावळा झाला आहेस भेटायला ? कॉलेजवर येईल की मी आज संध्याकाळी तेव्हा भेटू ना निवांत !

दुसर्या 'आज'ऐवजी 'उद्या' हवा होता... संपादकांना सांगुन बदलुन घे...

आता लेखाविषयी...
मागेही तुझ्या संभाषणविषयक लेखांबद्दल लिहिलेले आहेच...
तुम्ही इतके सुंदर संवाद लिहिता की ते प्रत्यक्ष आपण स्वत:च बोलत आहोत की काय असे वाटते...
असो, छान सुरुवात... ह्यात काही भुताटकी वेग्रे तर नाही ना...

अवांतर: अभ्याने मस्त कटवला हां तनुला... दुसरीने बोलावले असेल कदाचित

तुम्ही कोणत्या कंपनीचा चष्मा वापरता?

वपाडाव's picture

29 Feb 2012 - 10:49 pm | वपाडाव

तो प्रतिसाद दुपारी ४ च्या सुमारास टंकलेला आहे... तेव्हा आला असता तर ते दिसले असते... तिने तो संपादित करुन घेतलाय...

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 3:56 pm | अन्या दातार

छान रंगलाय पहिला भाग. :)

पुणे स्टेशन होतं का ग? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 4:09 pm | अत्रुप्त आत्मा


छान छान लिवलय... वाचु हळुहळू

इतकं भरपूर लिहायचा स्टॅमिना मला कधी बरं येईल ? पियुताई, टिप्स द्या ना जरा...

चिमी's picture

29 Feb 2012 - 5:39 pm | चिमी

अग पन तिला स्टेशनवर कशाला थांबवलस? रिक्शा करुन त्या चोकात (जिथ अभ्याची गाडी पंक्चर झाली तिथ)
द्यायचा ना पाठ्वून, सिंपल

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 6:13 pm | अन्या दातार

मग कथेत ट्विस्ट कसा येणार चिमे? काही ठिकाणी डोकं वापरायचं नसतं एवढं ;)

रणगाडे यायच्या आत पळा आता Skype Emoticons

चिमी's picture

29 Feb 2012 - 6:36 pm | चिमी

हम्मम्म
कथेत अन प्रत्यक्षात फरक असतो तो असा बहुतेक.

अरे चंपक, दादा येणार आहे न तिथे ८ वाजता.मग तिला स्टेशनवर राहण मस्ट आहे.त्यापेक्षा अभय का नाही येत रिक्षा पकडून? मित्राला फोने बिन करण्यापेक्षा ते सोपं नाही का? जाऊ देत एखाद्या सुनसान जागी त्याची गाडी पंक्चर झाली असेल.धापा टाकत बाईक धक्ल्यापेक्षा होणार्या बायकोला फाट्यावर मारणं जास्त चांगल.

मी-सौरभ's picture

29 Feb 2012 - 5:56 pm | मी-सौरभ

पु.भा.वा.प्र्.दि.जा.

प्रचेतस's picture

29 Feb 2012 - 10:14 pm | प्रचेतस

खुसखुशित लिखाण, चटपटीत संवाद.
पिवशीचे लेखन अधिकाधिक वाचनीय होत चालले आहे.

धन्या's picture

1 Mar 2012 - 5:56 am | धन्या

कथा मी पूर्ण करू का?
मला काह्लील शक्यता वाटत आहेत..

१. तन्वी दादासोबत घरी जाते.. अभ्या बाबांबरोबर नागपूरला जातो. तन्वीची आणि अभ्याची भेट होती नाही.. मग अभ्याची तगमग दाखवण्य साठी आणखी २-३ भाग...
२.शेवटी त्या तन्वीचा आपल्या होतकुरू अभ्याला फोन येतो..अभ्याला स्वर्ग प्राप्ती झाल्या सारखे वाटते..मग ह्या आनंदात दोघांचे फोन वरील हितगुज,समस,गप्पा, रुसवे फुगवे ह्यात आणखीन २ भाग..
३. नंतर अचानक त्या तन्वीच्या घरी हा"इतिहास" कळतो.. मघ तन्वी आणि घरच्यांमध्ये गैरसमज..वाद विवाद...भांडणे..रुसावी फुगवी..हीचे अभ्यासातले लक्ष्य उडते..मग बाबांचे तीला झापणे.. पॉकेटमनी न देने इत्यादी इत्यादी..शेवटी ती अभ्याला नाही म्हनांच्या कठोर निरयन घेते..हमारे रस्ते अब अलग अलग है..ह्यात २ भाग..
४.मग तीला आलेल्या समस वरून परत तीला त्याची ओढ वाटायला लागते ...आणि मग शेवटी समेत होऊन शेवट "जिलेबी" सारखा गोड होतो..आणि ह्या कथानकात अनेक जन आपल्याला पाहून मोरपीस अंग्वरून फिरवल्याचा आनंद लुटतात... समाप्त..
आता ह्यात तुम्ही आणखी काय वेगळा मसाला घालणार आहे ते तुम्हीच ठरवा...
"Grow-up"

पटले तर घ्या नाहीतर द्या सोडून.....

वेष्टन गुळकर्णी....बोळापूर....

प्रचेतस's picture

1 Mar 2012 - 8:58 am | प्रचेतस

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2012 - 9:39 am | अत्रुप्त आत्मा

@आता ह्यात तुम्ही आणखी काय वेगळा मसाला घालणार आहे ते तुम्हीच ठरवा > आगागागा धनाजीराव मुडदा-बाद...पार ताटीच उचलली कि वो हसुन हसुन पाणी आलं राव डोळ्याला,राम राम राम राम... धन्या व्यस्त होता ते किती बरं होतं.

पियुशा's picture

1 Mar 2012 - 10:43 am | पियुशा

आता ह्यात तुम्ही आणखी काय वेगळा मसाला घालणार आहे ते तुम्हीच ठरवा...

"Grow-up"

"Grow-up"

ग्रो होणे ही माणसाच्या आयुष्यात चालू असणारी अखंड क्रिया आहे. ती आमच्याबाबतीत तरी चालू आहे. तुम्हीही मोठे व्हा.

पटले तर घ्या नाहीतर द्या सोडून.....

तुम्ही म्हणताय तसा मसाला घालायचा असता तर नक्कीच तुम्हाला पुर्ण करु दिली असती. पण तसं नाही. तेव्हा क्षमस्व. ;)

_______________________________
(जळ्त तर बोरोलिन का लावत नाही ;) )

_______________________________

धन्या's picture

1 Mar 2012 - 11:09 am | धन्या

जळ्त तर बोरोलिन का लावत नाही

उत्तम जमलंय. :)

किचेन's picture

1 Mar 2012 - 2:42 pm | किचेन

1. तन्वी घरी जाते अभय नागपूरला.दोघ एकमेकांना खूप मिस करत असतात.कधी एकदा भेटतो अस होत.तन्वीचा पडलेला चेहरा बघून घरच्यांना वाटत कि हरलीये म्हणून उदास आहे.अभ्याच्या बाबांना वाटत कि शहरापेक्षा सगळ शांत आणि रटाळ आहे म्हणून हा उदास अह्हे.
२. अभयचा फोने कवरेज क्षेत्राच्या बाहेर.म्हण्जे तो येईपर्यंत फोनाफोनी होताच नाही.आणि न समास मिळत.
३. तन्वीच्या दादाच्या लग्नाची तयारी सुरु होणे.त्याला मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलीच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलासाठी तन्वी पसंत पडते.
तन्वी शिक्षणाच्या नावाखाली साफ नकार देते.
४.अभय परत आल्यावर ती अभयची आणि घरच्यांची भेट घडवून आणते.पण घरचे अभयशी लग्न लावून द्यायला विरोध दर्शवतात.शेवटी दोघ पळून जाऊन लग्न करतात.अभयचे आई वडील त्यालाही घरातून बाहेर काढतात.
५.कुठेतरी एका रूम मध्ये दोघ राहून संसार चालवतात.एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे शिक्षण आणि पैसे कमावणे अशा पेचामध्ये अडकलेले असतानाही ते जिद्दीने अर्धवेळ नोकरी karun शिक्षण पूर्ण करतात.त्यांच्या जिद्दीचा,समजूतदारपानाचा,प्रेमाचा आणि बर्याच सार्या गोष्टींचा घरच्यांना अचानक सक्षात्कार होतो आणि ते तन्वीला घरात घेतात.
६. पण नंतर कळत कि अभ्याच्या आईचा अजूनही तंविवर राग आहे आणि तिने बदला घेण्यासाठीच तन्वीला घरात घेतलीये.....मग एखादी सेरीअलमधले आठ दहा प्रसंग नाव बदलून चिकटवा.झाली एक युनिक कथा तय्यार.

प्रचेतस's picture

1 Mar 2012 - 3:02 pm | प्रचेतस

तुमचे शुद्धलेखन भलतेच सुधारलेय हो? हा गुरुमैयाच्या कृपेचा प्रसाद तर नाही ना?

वपाडाव's picture

1 Mar 2012 - 3:40 pm | वपाडाव

ते सगळं ठीक आहे, पण म्हणे किचेनतैंनी त्यांच्या कळफलकावरील 'स्पेसबार' तोडुन/कापुन पिवशीला दिलाय, गुर्दक्षिणा म्हणुन... खरं काय ते?

तीनेच पूर्ण केलि तर बर होइल :(

धन्या's picture

1 Mar 2012 - 11:11 am | धन्या

"Grow-up"

पटले तर घ्या नाहीतर द्या सोडून.....

प्रास's picture

1 Mar 2012 - 10:00 am | प्रास

तुमच्या संवादात्मक लिखाणाचा आम्ही चांगला लुफ्त उठवलाय. लेखन आवडलंय आणि सुधारत्या शुद्धलेखनामुळे बर्‍यापैकी वाचनीय झाल्याचं इथे नमूद करून ठेवतो.

बाकी धनाजीरावांनी तुमच्या लिखाणाचा पुढचा ट्रॅक दाखवण्याचा आणि त्यातून तुमच्या लिखाणाचा आनंद (अधिक आमच्या वाचनातले सुख) हिरावण्याचा ही आणि हि प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा तीव्र शब्दात 'निषेध' करण्यात येत आहे याचीही नोंद घेण्यात यावी.

पुढील लेखनाला शुभेच्छा!

पियुबैंच्या अशाच दर्जेदार लेखनाची वाट बघत आहे.

प्रचेतस's picture

1 Mar 2012 - 10:05 am | प्रचेतस

अहो प्रासभौ, अहो पिवशीतै
हे धनाजीरावांना आलेल्या ह्या प्रतिसादाचं विडंबन आहे. :)

प्रास's picture

1 Mar 2012 - 10:46 pm | प्रास

धनाजीराव, 'त्या' प्रतिसादाचे भलतेच झकास विडंबन केलेय की!

आता आमचा मूळ प्रतिसाद 'त्या' प्रतिसादकर्त्याकडे वळवून टाकूयात, काय? ;-)

आता आमचा मूळ प्रतिसाद 'त्या' प्रतिसादकर्त्याकडे वळवून टाकूयात, काय?

हरकत नाही. पण 'तो' प्रतिसाद देऊन 'ते' प्रतिसादकर्ते गायब झालेत. ;)

लेखनशैली ओघवती आहे.
पुढील भाग लवकर येऊ द्या.. यात काहीच लिंक लागली नाही.. वाचकांना बांधून ठेवण्यासाठी क्रमशः च्या आधी एखादा तरी ट्विस्ट यायला हवा होता. :)

मृत्युन्जय's picture

1 Mar 2012 - 10:53 am | मृत्युन्जय

चांगले लिहिले आहेस प्पियुषा. पुलेशु

ये लम्हा फिलहाल जी लेने दे ...!!

चिगो's picture

1 Mar 2012 - 12:01 pm | चिगो

मस्तच लिहील्यंस, पियुतै.. वाचतोय.. पुभाप्र..
धनाजीरावांनी वेष्टनरावांची भारी घेतलीय..

अवांतर : "पुण्यातील नराधम"ची एंट्री होईल, अशी धाकधुक का होतेय ब्वॉ मला?

स्वातीविशु's picture

1 Mar 2012 - 12:46 pm | स्वातीविशु

काय झकास लिहिता हो तुम्ही पियुतै. :)

सुरुवातीच्या काही ओळी वाचून मला वाटले की २ लहान मुलांचा संवाद आहे, पण पुढे वाचता वाचता कळले की जरा मोठ्या मुलांची लवश्टोरी आहे. (क्रु.ह.घ्या.);)

पु.ले.शु. :)

छान ग पियुशा!!पुढचा भाग लौकर टाक!!

छान लिहिते आहेस...... :)
लवकर पूर्ण कर बाई !!

पैसा's picture

1 Mar 2012 - 10:05 pm | पैसा

लवकर पुरी कर! आणि इतरांसारखा तू काही ढिस्क्लेमर देत नाहीस वाट्टं? "ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे" असा?