दापोली पासून 5km अंतरावर गव्हे या निसर्गरम्य गावात हे ठिकाण आहे....
लाल मातीचे रस्ते , वळणदार घाट व नारळ आणि सुपारी च्या बागा यांनी नटलेले सृष्टीसौंदर्य बघत कोकणात कसे पोहोचलो हे कळलंच नाही.
या रिसोर्ट वर ३ प्रकारची राहण्याची व्यवस्था आहे.
सर्वात उत्तम आणि महत्वाचे म्हणजे तिथले सुग्रास शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ...
उकडीचे मोदक, पुरणपोळी , घावन , झुणका भाकरी , थालीपीठ वर लोण्याचा गोळा , फणसाची भाजी , काजूची उसळ व इतर लज्जतदार जेवण मिळते.
(मांसाहारी जेवण आम्ही चाखले नाही )
अमृते ह्यांची ३४ वर्षे जुनी nursery आहे त्याची काही छायाचित्रे .....
अधिक माहिती साठी www.nisargasahavas.com
प्रतिक्रिया
26 Feb 2012 - 7:28 pm | अन्नू
वा!! मस्तच, निसर्गरम्य आहे.
26 Feb 2012 - 7:43 pm | गणेशा
छान आहे .
26 Feb 2012 - 8:05 pm | अभिजीत राजवाडे
बरेच दिवस झाले कोकणात गेलो नाही. आता जायलाच हवे असे वाटते आहे.
आभार.
26 Feb 2012 - 8:09 pm | पैसा
दापोलीला पण रिसॉर्ट आले का आता? तिथली रंगीबेरंगी घरं बघून मजा वाटली. पण सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर पहिले ३ फोटो. अस्स्सल कोकणचं सौंदर्य आलंय त्यात! मस्त!
26 Feb 2012 - 8:47 pm | मोदक
फोटो १ - दापोलीला जाताना एका डांबरी रोडवरती ब्रीज चे काम सुरू आहे तिथल्या Diversion चा वाटतो आहे.
फोटो २ - अंजर्ले ला जाताना जो कडा पार करावा लागतो त्या कड्यावरून घेतलेला वाटतो आहे.
फोटो ३ - अंजर्ले गाव व अंजर्ले बीच आहे.
फटू २ व ३ ही ठिकाणे दापोली पासून २० KM अंतरावर आहेत.
बाकी रिसॉर्ट मस्त, फोटो सुंदर. :-)
26 Feb 2012 - 8:54 pm | धन्या
धन्यवाद रे मोदक. फोटो २ आणि ३ मधील ठिकाणे पाहिल्यासारखे वाटत होते. पण नेमकं कुठे ते आठवत नव्हते. :)
26 Feb 2012 - 9:49 pm | प्रचेतस
+१
सहमत.
26 Feb 2012 - 8:50 pm | धन्या
पहिले तीन फोटो सोडले तर बाकीचे फोटो जाहीरात टाईप वाटले.
पहिले तीन फोटो मात्र छान आहेत. दुसर्या आणि तिसर्या फोटोतील समुद्रकिनारा ओळखीचा वाटतोय. कुठले आहेत हे फोटो?
27 Feb 2012 - 12:14 am | पाषाणभेद
ये रही धनाजीराव की वाकडी नजर और धनाजी फिर चँपीयन!
26 Feb 2012 - 11:40 pm | पुश्कर
बरोबर आहे .२ व ३ रा फोटो आंजर्ले ला जातानाचे आहेत. मला यापेक्षा छान दुसरे फोटो वाटले नाहीत म्हणून हे टाकले......
हे फोटो जाहिराती करता नसून तुम्हाला या रेसोर्ट ची माहिती कळावी म्हणून टाकले आहेत .अजून पण फोटो टाकायचे आहेत.
27 Feb 2012 - 12:21 am | मोदक
जाहिरात अशासाठी वाटले असेल की.. बीचचे फोटो अंजर्ल्याचे, नंतर डायरेक्ट रिसॉर्टच्या आतले फोटो आणि THE END.
ते गांव, तिथला समुद्र, आणखी काही विशेष ठिकाणे, गावाची इतर काही माहिती हे पण सांग.
रिसॉर्टची माहिती द्यायचे असेल तर तुमचा अनुभव कसा होता, रिसॉर्टचे वेगळेपण काय.. हे ही लिही..
"कोकण" या विषयात PhD केलेले लोक आहेत रे मिपावर. :-)
http://www.misalpav.com/node/19703#comment-351564
27 Feb 2012 - 12:04 pm | मी-सौरभ
त्याने धाग्यात पहील्यांदाच त्याने काहीतरी लिहीले आहे. :)
अजून माहिती प्रतिसादातून मिळेल अशी अपेक्षा आहे
27 Feb 2012 - 2:51 pm | धन्या
मला तारकर्ली बीचला कसे जायचे होते याविषयी माहिती करुन घ्यायचे होते.
गविंचा तो प्रतिसाद जबरदस्त आहे. कोकणात जाताना त्याची कलर प्रिंट सोबत न्यावी असा. :)
27 Feb 2012 - 7:28 am | ५० फक्त
एखादा व्यनि करायचा किंवा खरड टाकायची , गेला बाजार खरडफ्ळ्यावर लिहायचं तरी, दापोलीत या पेक्षा हजारपटीनं चांगली ठिकाणं आहेत जायला. गावातलं बापटांचं घर, शिंदेचं बिच हाउस , असो.
तुम्ही गेला होता त्या रिसोर्टची तरी बाकी माहिती दया, पत्ता फोन नंबर वगैरे. आणि रेटिंग पंण द्या, ऑन अ स्केल ऑफ १० ..
बाकि काय + १०० टु मोदक.
27 Feb 2012 - 8:45 am | कपिलमुनी
बीच जवळ आहे का ?
27 Feb 2012 - 11:49 am | पुश्कर
हे ठिकाण दापोली पासून 5km वर आहे. बीच येथून जवळ नाही. त्यासाठी आपल्याला मुरुड ,हरणे ,आंजर्ले ,लाडघर....अशा ठिकाणी जावे लागेल ही सर्व ठिकाणे १०-२०km अंतरावर आहेत .
दापोली हे पुणं अथवा मुंबई येथून ५ तासावर आहे. त्यामुळे एखादा वीकेंड सुद्धा आपण इथे जाऊन येऊ शकतो. या रेसोर्ट चे वेगळेपण म्हणजे घरगुती आपलेपण....जे मला आवडले.
इथे असलेली जुनी nursery हे सुद्धा आकर्षण वाटले. वेगवेगळ्या जातींची झाडे , फुले , फळे पाहताना आपण कोन्क्रीट च्या जंगलात राहणारे ह्या निसर्गापासून किती दूर आहोत याची जाणीव होते.
इथले जेवण सुद्धा सुग्रास होते. जिभेचे चोचले पुरवताना जेवणाचे फोटो काढायचे मात्र राहून गेले.
इथे जील्पा निजसुरे हिच्याशी ओळख झाली . तिने आम्हाला त्या परिसरातल्या पक्षांची व विविध झाडांची माहिती दिली. कितीतरी पक्षांच्या आवाजाची ओळख मिळाली .
बाकी कोकणात राहिलेल्या माणसाला यात काही नवीन वाटणार नाही. पण माझासारख्याला वाटले कारण मी मुंबईतच लहानाचा मोठा झालो ....मला गाव नाही .
अधिक माहितीकरता आशिष अमृते ९४८८०५२०९५ / ९१२३५८-२८२३१५ .
27 Feb 2012 - 2:38 pm | मोदक
अरे व्वा.. Nature Trail केलात की काय..?
प्रशांत आणि जिल्पा चांगल्या ओळखीचे आहेत. दापोली / अंजर्ले येथे राहून Landscaping, Nature Trails, Art Paper Work आणि Organic Farming आणि अशी बरीच कामे उत्कृष्टरीत्या करतात. अधिक माहिती - http://krishivarada.in/
Nature Trail केला असेल तर त्या अनुभवाबद्दल लिहा.
पुलेशु.
मोदक.
27 Feb 2012 - 1:13 pm | गवि
अतिशय उत्तम परिचय एका मस्त ठिकाणाचा...
फोन नंबरबद्दल धन्यवाद..
यातले उल्लेखित पदार्थ हे त्यांच्या जाहिरातीत आहेत की प्रत्यक्ष एखादा खायलाही मिळाला?
कारण अशाच थाटाचे आर्यावर्त दापोलीजवळच आहे, त्यांच्याविषयीही अस्सल कोंकणी पदार्थ मिळतात (फणसाचे सांदण, फणसाची भाजी, आमरस, घावने, सोलकढी इ इ इ अन्य बरेच) असं ऐकून तिथल्या दोन दिवसांच्या मुक्कामात त्या लोकल पदार्थांच्या उत्सुकतेने जेवायला अन नाश्त्याला गेलो.. तर हाय रे देवा.. ती सर्व बोलाची कढी होती.. जेवणात आलू मटर, रायता , रोटी चपाती वगैरे अत्यंत बोअरिंग हॉटेलछाप पदार्थ अन नाश्त्याला इडली,मेदुवडा वगैरे... पिव्वर उडपी हॉटेलछाप..
हे सर्व मे महिन्याच्या शेवटी.. ऐन नसला तरी सीझन चालू होता..
27 Feb 2012 - 1:36 pm | ५० फक्त
+१००००००^१० आर्यावर्त बद्दल, अतिशय भंगार हॉटेल आहे, राहण्याखाण्याची व्यवस्था करुन वर त्यांनीच रुमचे भाडे दिलं तरी फॅमिलि घेउन जावु नये,
27 Feb 2012 - 1:57 pm | गवि
वा.. अजूनही कारभार सुधारला नाहीच म्हणायचा..
पावसाळ्यात तर अगागागा... मी गेलो तेव्हा मे एंड जून १ला आठवडा होता.. थोडासाच पाऊस सुरु झाला होता तरी...
दमट कुबट झालेल्या खोल्या ..
वासाड गाद्या अन न धुतलेल्या चादरी.. .. मोठाल्या झुरळांचा मुक्त विहार.. डस्ट माईट्सनी भरलेले पलंग.. बंगल्यापासून त्या जेवणघरापर्यंत चिखलातून रप रप करत जाताना वाटेत साधी दिवाबत्ती नाही.. सोबतच्या वृद्ध लोकांनातरी रात्रीचं जेवण खोलीत द्या म्हटलं तर तेही सौजन्य नाही.. रात्री डासांचा त्रास असह्य झाल्यावर कासवछाप मागवली तीही पाठवली नाही.. स्वतः बेरात्री भिजत राडीतून चालत जाऊन भांडावं लागलं..
खाजर्या वातावरणाने आणि कुबटपणाने रात्री अजिबात झोप लागली नाही.. कुठून आलो आणि कधी सुटतो या सापळ्यातून असं झालं त्या रात्री.. दुसर्या दिवशी अधिकचा मुक्काम रद्द करुन तिथून निघालो.
अरे वापरात नसलेले बंगले उत्पन्नासाठी वापरायचे याचा अर्थ असा नाही होत की ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत फक्त पैसे घेऊन पर्यटकाहाती किल्ली द्यायची.. ते मेंटेनही करायला नकोत?
27 Feb 2012 - 2:27 pm | मोदक
गवि / ५० महितीबद्दल धन्यवाद... येत्या सुट्टीमध्ये तिथे फॅमिली ला घेवून राहण्याचा विचार होता. आता रद्द.
http://www.anjarlebeachketkibeach.com/
मागच्या वीकांताला गेलो होतो तेव्हा हे चांगले वाटले. अंजर्ले चा समुद्र पण खूप मोकळा आणि स्वच्छ होता. जेवणही झकास मिळाले. :-)
27 Feb 2012 - 11:23 pm | पुश्कर
आह्मी जे खाल्ले त्याचे वर्णन केले आहे...
उदा...गोड म्हणून उकडी चे मोदक , रव्याची खीर , दुधी हलवा, पुरणपोळी हे सगळे पदार्थ होते.
सोलकढी ,कोकम सरबत हे तर सकाळ संध्याकाळ होते.
नाश्त्या ला पोहे, घावन, थालीपीठ , साबुदाणा खिचीडी आणि ताज्या फळांचा रस सुद्धा होते.
अमृते स्वतः तिकडे राहत असल्यामुळे त्यांच्या घरातील सर्व जण जातीने लक्ष घालतात आणि पर्यटकांची आवड सांभाळतात.
आणि रूम्स बद्दल म्हणाल तर स्वच्छ रूम्स, छान बाथरूम्स आहेत. Housekeeping सुद्धा दररोज करत होते.
28 Feb 2012 - 5:22 am | गवि
ग्रेट..
हेच तर हवं असतं ..
आता जायलाच पाहिजे.. धन्यवाद..
28 Feb 2012 - 7:05 am | ५० फक्त
धन्यवाद पुष्कर, मग गवि म्हणतात तसं एकदा जायलाच हवं.
28 Feb 2012 - 5:16 pm | वपाडाव
चला, ठिकाण तर निश्चित झाले आता आपण फॅमिली तयार करण्याच्या मागे लागु...
28 Feb 2012 - 10:29 pm | मोदक
फॅमिली 'तयार' होवून'तिथे पोचायला वेळ लागेल... ;-)
27 Feb 2012 - 8:31 pm | रेवती
पहिले ३ फोटू आवडले.
29 Feb 2012 - 7:22 pm | नगरीनिरंजन
पहिले तीन फोटो आवडले.
रिसॉर्ट मात्र कसेतरी उभे केलेय असे वाटले. अजून नक्कीच सुंदर करता आले असते.
असो. समथिंग इज बेटर द्यान अजिबात नथिंग.
27 Feb 2012 - 8:49 pm | मन१
चांगले दिसते आहे ठिकाण
29 Feb 2012 - 12:58 am | Pearl
माहिती आणि फोन नं. दिल्याबद्दल धन्यवाद.
आता जेव्हा दापोलीला जायचे ठरेल तेव्हा ट्राय करायला हवं.
29 Feb 2012 - 1:24 pm | पुश्कर
फोन न चुकला होता.....
बरोबर नम्बर
आशिष अमृते ९४२२०५२०९५ / ९१२३५८-२८२३१५ .
29 Feb 2012 - 3:11 pm | कॉमन मॅन
एका माणसाकरता प्रतिदिन साधारणत: किती खर्च येतो?