कधीकधी अचानक एखादा छंद आपला ताबा घेतो. वेळात वेळ काढुन, कधी महत्वाच्या कामांनाही टांग मारुन आपण त्या दुनीयेत हरवायला बघतो. जे आपण करायला बघतो ते कितपत जमतय, याबाबत उत्सुकता तर असतेच.
अशीच काही मी काढलेली छायाचित्र, आपल्या सुचनांसाठी आणी माझ्या सुधारणांसाठी...
सुरवात आक्षीच्या किणार्यावरचे काही वेडर्स..
सॅन्ड प्लोव्हर्स.. कळपाने फिरणारे, कळपाने उडणारे...
टेरेक सॅन्ड पायपर..
युरेशियन कर्ल्यु..
याचा पाय सडला? कि जीवावरच पायावर निभावल?
समुद्राचं वाळवंट.
बारवीच जंगल..
शिक्रा... नजरेचा धाक.. चुकलात की संपलात..
कोतवाल.. याची नजर सगळ्या जंगलावर.. रॅकेट टेल.. एक तुटलीय बहुदा लढाईत..
युरेशीयन गोल्ड्न ओरीओल..
बी इटर.. जीव ईतकासा, पण नजर बघा..
फुलपाखराच कौतुक तुम्हाला.. माझ्यासाठीतर हे म्हणजे बर्गर..
खाटीक.. जो सापडेल त्याला उलट लटकवुन फाडुन खाणारं
लीफ बर्ड..
सन बर्ड.
नवरंग.. उडताना..
बाकीचे पुढच्या भागात..
प्रतिक्रिया
20 Feb 2012 - 8:01 pm | पैसा
मस्त फोटो! खाटीक नावचा पक्षी आहे हे पाहून मजा वाटली! आणि ति शिक्रा म्हणजे घारीचा भाऊबंद आहे का? किनार्यावरच्या वाळूतल्य लाटा आणि इतर समुद्रपक्ष्यांचेही फोटो फार आवडले. अप्रतिम!
20 Feb 2012 - 8:11 pm | शैलेन्द्र
हा खाटीक खरंच मजेशीर पक्षी आहे, लहान कीडे आणी सरडे वगैरे प़कडतो, कोणत्यातरी काट्याला उलटा लटकवतो, आणी मग फाडुन खातो..
20 Feb 2012 - 8:27 pm | स्मिता.
सगळेच फोटो सुंदर आहेत. किती विविध रंगाचे आणि विविध प्रकारचे पक्षी आहेत जगात. काहि पक्षी तर चित्रात रंगवावे अश्या रंगाचे!
त्या सगळ्यांचे फोटोही तेवढ्याच कलात्मकतेने काढलेय. येवू द्या अजून...
20 Feb 2012 - 9:28 pm | प्रचेतस
सुंदर फोटो.
सॅन्ड प्लोव्हर्स, टेरेक सॅन्ड पायपर आदी पक्ष्यांना मराठीत सरसकट शेकाट्याच म्हणतात का?
20 Feb 2012 - 9:35 pm | अत्रुप्त आत्मा
फोटो झाकच हायती...पण पक्षांचे फोटो पाहुन मागे जागुतैंनी टाकलेला तो पक्षी ओळख धागा अठवला :-)
20 Feb 2012 - 9:45 pm | प्राजु
अप्रतिम .. अतिशय सुंदर फोटो.
मस्तच.
20 Feb 2012 - 9:55 pm | सर्वसाक्षी
झकास चित्रे! सुरेख चित्रण
(व्य नि पाठवित आहे)
20 Feb 2012 - 10:55 pm | शैलेन्द्र
स्वागत आहे..
20 Feb 2012 - 10:07 pm | सानिकास्वप्निल
सुरेख फोटो आहेत सगळे :)
समुद्राचं वाळवंट खुप खुप आवडले :)
21 Feb 2012 - 12:05 am | अन्या दातार
मी काही फोटोग्राफीतला एक्सपर्ट नाही, पण जे काही थोडेफार बघायला शिकलो, त्यावरुन मला काही प्रश्न पडलेत.
१. टेरेक सॅन्ड पायपर व सन बर्डच्या फोटोमध्ये थोडा नॉइज वाटतोय तो आयएसओ जास्त असल्यामुळे कि झूम जास्त केल्यामुळे??
२. कोतवालचा दुसरा फोटो, खाटीक पक्ष्याचा फोटो व शेवटचा फोटो ओव्हरएक्स्पोज झाल्यासारखे वाटत आहेत. त्यामुळे डिटेल्स काहीसे मार खातात.
फ्रेमिंग अप्रतिम आहे. टायमिंग पर्फेक्ट आहे.
21 Feb 2012 - 12:30 am | शैलेन्द्र
धन्यवाद,
"१. टेरेक सॅन्ड पायपर व सन बर्डच्या फोटोमध्ये थोडा नॉइज वाटतोय तो आयएसओ जास्त असल्यामुळे कि झूम जास्त केल्यामुळे??"
आय एस ओ जास्त नव्हता, पण सनबर्डसारखा पक्षी खुप छोटा असतो, क्रोप करुन फोटो मोठा करताना नॉईस येतो, त्या पक्षाच्या शक्य तितक्या जवळ जाणे हा एकच पर्याय.. तसे प्रयत्न चालु आहेत.
"२.कोतवालचा दुसरा फोटो, खाटीक पक्ष्याचा फोटो व शेवटचा फोटो ओव्हरएक्स्पोज झाल्यासारखे वाटत आहेत. त्यामुळे डिटेल्स काहीसे मार खातात."
बरोबर आहे, कोतवालाच दुसरा फोटो मुद्दाम ओव्हर एक्सपोज केलाय.. थोडासा काळा सफेद्चा खेळ.. नाहीतर वरच्या व खालच्या फोटोत फरकच नाही. खाटीक पक्षाचा प्रोब्लेम असा की हा छोटा पक्षी फार उंच तारेवर होता, आणी मला पक्षाची नजर दाखवायला आवडते.. तो डोळा दाखवण्याच्या नादात रंगछटा मार खातायेत. शेवटचा फोटो फोकस करायला फार कठीन गेला, सुर्य उलटा असताना जे सेटींग होत, ते तसच राहील, म्हणुन तो तितकासा चांगला आलेला नाही.
21 Feb 2012 - 4:39 am | सुनील
फोटो सुंदरच.
तो लंगडा पक्षी कसा जगत असेल कोण जाणे?
21 Feb 2012 - 9:07 am | शैलेन्द्र
खरच.. फार दीवस जगु शकेल अस नाही वाटत, कारण जमीनीवर अन्न शोधताना एका पायाने वाळुत चालण त्याला फार कठीन जात होतं, तसच जमीनीवर उतरतानाही फार त्रास होत होता..
21 Feb 2012 - 8:20 am | ५० फक्त
जबरदस्त फोटो, आणि टायमिंग तर एकदम सही आलेत... धन्यवाद.
21 Feb 2012 - 9:42 am | प्यारे१
सुंदर फोटो.
21 Feb 2012 - 10:07 am | झकासराव
सुंदर आहेत सर्वच फोटो :)
शेवटच्या पक्ष्याला नीलपंख / नीलकंठ असहि म्हणतात का?
21 Feb 2012 - 10:23 am | गवि
गुरु आहात हो शैलेंद्रजी..
तुमच्यासोबत फिरायला पाहिजे आता. खूप लाभ होईल..
कॉलेजात असताना सालिम अलींच्या "बुक ऑफ इंडियन बर्डस" ला गीता, बायबल मानायचो आम्ही काही मित्र. आता बहुतांश सर्व विस्मरणात गेलं. नेचर फोटोग्राफी आपल्याला जमावी ही इच्छा फक्त इच्छाच राहिली.. तुम्ही नशीबवान आहात की हा छंद फुलवत ठेवला आहेत..
शेवटच्या फोटोबाबत, नवरंग हे नाव तुम्ही दिलं आहेत. अर्थातच पक्ष्यांची मराठी नावं जागोजागी बदलतात. फार पूर्वी कै. डॉ. विवेक परांजपे ("आपली सृष्टी-आपले धन"कर्ते) यांनी मराठी नावं स्टँडर्डाइइझ करण्याचा फार उत्तम प्रयत्न केला होता. ते जागतिक दर्जाचे मराठीतले पहिले आणि शेवटचे निसर्गपुस्तकखंड आता मिळत नाहीत.
तर... नवरंग हे नाव जनरली "इंडियन पिट्टा" (खाली चित्र जालावरुन साभार) याला उद्देशून म्हटलं जातं. हा चिमुकला शाखारोही पक्षी आहे..
तुम्ही फोटोत दर्शवलेला पक्षी नीलकंठ म्हणून अधिक सामान्यपणे ओळखला जातो. नीळकंठ, चास ही त्याची आणखी काही नावं मी ऐकली आहेत. "इंडियन रोलर" आणि "ब्लू जय" अशा नावांनी हा पूर्वी पाहिला आहे.
पंख मिटून बसलेला असताना निळ्या रंगाचा डल पार्ट दिसतो. पण उडाला की झळझळता निळा रंग उघड होतो. तुमच्या फोटोत दिसतं आहेच..
अर्थात ब्लू जय किंवा ब्लू जे या नावाचा अजून एक पक्षीही जगात आहे.. तो निळ्या बुलबुल किंवा टिट पक्ष्यासारखा दिसतो. म्हणून नीलकंठाला इंडियन रोलर म्हटलेलं बरं.
असो.. फोटो बेहद्द आवडले आहेत असं सांगून नीलकंठपुराण थांबवतो.
21 Feb 2012 - 5:32 pm | शैलेन्द्र
अगदी बरोबर, निलकंठ म्हणजे इंडीयन रोलरच.. घाईघाईत मी चुक्या..
अजुन एक पाहीलय, हे पक्षी माळव्यात फार दिसतात, आणी त्यांचे रंग, आपल्याकडच्या निलकंठापेक्षा किंचीत गडद व चमकदार असतात.. कदाचीत तापमानाचा फरक असावा.. बाकी हा पीट्टापण दिसलाय मला बारवीच्या जंगलात, पण फोटो नाही काढता आला..
21 Feb 2012 - 7:32 pm | शैलेन्द्र
बाकी सांगा कधी जायच जंगलात? कुठे राहता तुम्ही?
आणी प्लीज, मी तुमच्यापेक्षा लहानच असेल वयाने व अनुभवाने.. मग अहोजाहो नको..
21 Feb 2012 - 11:01 am | जागु
अप्रतिम फोटो.
21 Feb 2012 - 11:16 am | जाई.
सुंदर फोटो आहेत सगळे
deezer, btjunkie, games
[URL=http://gamesy8.name/ ]y8[/URL], [URL=http://www.btjunkie.name/ ]btjunkie[/URL], [URL=http://www.freedownloadgames.name/ ]games[/URL]
21 Feb 2012 - 11:21 am | जयवी
अहाहा.......
अप्रतिम फोटो !!
एकसे बढकर एक !!
खरंच कधी कधी एखादा छंद मधेच उसळी मारुन वर येतो :)
21 Feb 2012 - 11:31 am | नगरीनिरंजन
गोंडस पक्ष्यांचे सुंदर फोटो!
इथे डकवल्याबद्दल आभार!
21 Feb 2012 - 11:38 am | कॉमन मॅन
अप्रतिम..!
21 Feb 2012 - 2:50 pm | सुहास झेले
मस्त आहेत फटू :) :)
21 Feb 2012 - 4:18 pm | पियुशा
मस्त्,मस्त्,मस्त !!!! :)
21 Feb 2012 - 4:56 pm | आचारी
एकदम झक्कास !!
21 Feb 2012 - 5:11 pm | नि३सोलपुरकर
आभार....
सुंदर फोटो आहेत सगळे .
21 Feb 2012 - 5:23 pm | स्वातीविशु
मस्त, मस्त.....सर्व पक्ष्यांच्या पोझेस छान टिपल्या आहेत.
21 Feb 2012 - 5:30 pm | मोहनराव
फोटो छान आले आहेत. मस्त!! मध्ये लिहीलेल्या कॉमेंट्सही मजेशीर!
21 Feb 2012 - 6:48 pm | गणेशा
काय सुंदर वाटले आहे धागा पाहुन ..
खरेच खुप समाधान.
प्रत्यक्षात तुम्ही ज्या सुंदर क्षणांचे साक्षीदार आहात त्याबद्दल सलाम..
युरेशीयन गोल्ड्न ओरीओल.. खरेच खुप गोंडस दिसत आहे .. एकदम झकास ...
21 Feb 2012 - 7:08 pm | वपाडाव
तंतोतंत सहमत !!!
22 Feb 2012 - 10:36 am | शैलेन्द्र
"प्रत्यक्षात तुम्ही ज्या सुंदर क्षणांचे साक्षीदार आहात त्याबद्दल सलाम.."
कीडा हो कीडा, पहाटे पहाटे उठुन तेल जाळत अशा ठीकाणी जायचं, मग एखाद्या अडचणीच्या जागी पुतळा होवुन बसायच.. वाट पहायची.. हे सगळ करुनही फोटो मीळेलच याची शाश्वती नाही, पण काय करणार, कीडा..
पण एखादा सुन्दर फोटो या सगळ्या श्रमांवर मोहोर लावतो, खरतर माझ्या नशीबात अजुन तसा फोटो आलेला नाही..
22 Feb 2012 - 10:43 am | गवि
याच जाणिवेने तुम्ही अधिक अधिक उत्कृष्ट छायाचित्रकार व्हाल यात शंका नाही..
21 Feb 2012 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लंबर एक फोटो.
-दिलीप बिरुटे
21 Feb 2012 - 10:54 pm | सुनिल पाटकर
सर्व फोटो दाद देण्यासारखे आहेत , पिवळा निळा पक्षी आवडला ,निसर्गाने काय रंगसंगती दिलेय
21 Feb 2012 - 11:42 pm | कवितानागेश
मस्त फोटो आहेत.
चष्मेवाला म्हणजेच खाटिक का?
22 Feb 2012 - 12:49 am | शैलेन्द्र
नक्कि नाही सांगता येत, पण असु शकेल...
बाकी आपली मराठी नाव इरसाल असतात.. रेड वेन्टेड बुलबुलच एक शब्दी मराठी नाव एकदम चपखल आहे..
22 Feb 2012 - 6:27 pm | फास्टरफेणे
नाही...
हा बघा चष्मेवाला
24 Feb 2012 - 10:14 pm | Manish Mohile
खाटीक म्हणजे Long Tailed Shrike.
22 Feb 2012 - 12:25 am | रामपुरी
सगळीच छायाचित्रे उत्तम...
22 Feb 2012 - 12:40 am | यकु
अप्रतिम फोटोकाम.
पुढचे कधी?
पुभालटा
22 Feb 2012 - 11:42 am | मी कस्तुरी
अप्रतिम फोटो काढले आहेत सगळे आणि परफेक्ट टाईमिंग :-)
22 Feb 2012 - 4:03 pm | मनराव
सुंदर फोटो आणि माहिती.......!!!
23 Feb 2012 - 1:40 pm | चिगो
खुप म्हणजे खुपच सुंदर फोटो.. पक्ष्यांचे, मग ते बसलेले असोत किंवा उडत असोत, फोटो काढणं हे लै जिकरीचं काम आहे. कॅमेरा-तंत्राची चांगली ओळख आणि सौंदर्यदृष्टी लागते ह्यासाठी..
असे सुंदर फोटो इथे डकवल्याबद्दल धन्यवाद.. झकास. लगे रहो..
23 Feb 2012 - 3:02 pm | सुहास..
लई भारी !!
पूढचा भाग ??
बाकी ईथ कस जायचे ई. जरा डायरेक्क्षण मिळतील का ?
23 Feb 2012 - 6:08 pm | वपाडाव
तुला त्याची काय रे गरज... अंतुरला जाताना जी.पी.एस. घेउन गेला होतास की काय... उगं गाडी काढ अन हाण्ण !! गेलं खोपोलीच्या पार की लागते आक्षी बीच...
23 Feb 2012 - 8:48 pm | शैलेन्द्र
कुठे ?
आक्षी की बारवी? मुंबई की पुण्याहुण?
आक्षी बीच अलीबागच्या शेजारी आहे.. एकदम सोपी जागा जायला..
बारवी- बदलापुरच्या शेजारी, पुण्याहुन आलात तर पनवेल तळोजा बदलापुर.. पण इतक्या लांब येवुन बघण्यासारख इथे काही नाही..
24 Feb 2012 - 4:33 pm | प्रभाकर पेठकर
निव्वळ अप्रतिम. अभिनंदन.
कावळा, चिमणी, पोपट, घार, गिधाड इ. इ. सर्वसामान्यांपलीकडे आमचे पक्षी ज्ञान नाही. त्यामुळे वरील सर्व अप्रतिम छायाचित्रे आणि त्या खालील प्रतिसाद्/चर्चा इत्यादींनी मोहून गेलो आहे.
24 Feb 2012 - 10:22 pm | Manish Mohile
झकास पक्षी दर्शन घडवलं तुमच्या या धाग्यानी.
युरेशिअन गोल्डन ओरिऑल चे फोटो एकदम झकास. मला वाटते यालाच मराठीत हळद्या म्हणतात.
अजून कुठे कुठे पक्षी दर्शनासाठी गेलेला आहात?
अजून येऊ द्यात.
24 Feb 2012 - 11:03 pm | शैलेन्द्र
"मला वाटते यालाच मराठीत हळद्या म्हणतात."
बहुदा
मी जास्त लांब जावु नाही शकत, बर्याचदा ट्रेकींगबरोबरच हे अॅडजस्ट करतो. मुंबईच्या आसपास आणी सह्याद्रीत जास्त फिरण होतं..
25 Feb 2012 - 8:09 am | श्रीयुत संतोष जोशी
बात है !!!!!! झक्कास :)
25 Feb 2012 - 5:01 pm | शैलेन्द्र
सगळ्यांचे आभार.. लवकरच पुढचे टाकतो..
15 Mar 2012 - 9:51 am | नरेंद्र गोळे
शैलेंद्र,
काय दृष्टी आहे हो तुमची!
आणि सुरेख प्रकाशचित्रणही.
उत्तम चौकटी निवडून, व्यवस्थित प्रकाश केंद्रित करून,
काय पाहायचय त्याची जाण ठेवून काढलेली ही सर्व सुंदर प्रकाशचित्रे आवडली!
15 Mar 2012 - 12:20 pm | शैलेन्द्र
मिपाकरांच्या प्रतिसादाने नेहमीच छान वाटत.. पण अजुनही खुपच चांगली छायाचित्र काढता येतील, मी स्वाताच यातल्या बर्याच चीत्रांवर खुश नाही..
19 Mar 2012 - 7:31 pm | कॉमन मॅन
फारच सुंदर..!