जॉर्ज कॉल्डवेल

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
24 Jul 2008 - 8:10 am

जॉर्ज कॉल्डवेल - भाग १
जॉर्ज कॉल्डवेल - भाग २
जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

तास सुरु व्हायला दोन-तीन मिनिटं शिल्लक होती.

मी घाईगडबडीतच वर्गात शिरलो. वर्गात माझ्याखेरीज आणखी फक्त दहा-बारा मुलं-मुली जमली होती. त्यात अस्वाभाविकही काही नव्हतं! सेंद्रीय रसायनशास्त्राचा (ऑरगॅनिक केमिस्ट्री) ९०१, म्हणजे शेवटचा वर्ग होता तो! या विषयाची मास्टर्सची डिग्री तुमच्याकडे असल्याशिवाय वा तुम्ही ६००, ७०० आणि ८०० लेव्हलचे वर्ग उत्तीर्ण केल्याशिवाय या वर्गात मुळी प्रवेशच नव्हता!! या वर्गात असणारे फक्त रसायनशास्त्रज्ञ, फार्मासिस्ट, बायोटेक्नॉलॉजिस्ट!!

दोन हजार पानांचं एक जाडजूड पुस्तक या चार महिन्यांच्या क्लासला सिलॅबस म्हणून लावलं होतं!! ते बघूनच माझी छाती दडपून गेली होती. पुढले चार महिने अगदी पिट्टा पडणार होता!! पण काय करणार, जर डिग्री हवी असेल तर हा कोर्स पास होणं आबश्यकच होतं, तसा युनिव्हर्सिटीचा नियमच होता....

एक रिकामी जागा बघून मी टेकतो न टेकतो तर दाण दाण दाण असा पावलांचा आवाज करीत प्रोफेसरसाहेब वर्गात शिरले. त्यांच्याहि हातात असलेलं ते जाडजूड पुस्तक त्यांनी धाडकन त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर आदळलं. सगळ्या वर्गाकडे बॅटसमन जशी फिल्डींग बघून घेतो तशी नजर फिरवली. आणि अतिशय घनगंभीर आवाजात बोलायला सुरवात केली,

"धिस इज ऑरगॅनिक केमिस्ट्री ९०१ क्लास!! फॉर दोज ऑफ यू हू डिड नॉट नो दॅट, धिस इज द राईट टाईम टू गेट अप ऍन्ड गेट लॉस्ट!!"

कुणीच उठलं नाही. बहुदा सगळ्यांना आपण कुठे आलोय हे माहिती असावं!!

"गूड!! माय नेम इज जॉर्ज कॉल्डवेल!! आय हॅव बीन टीचिंग धिस क्लास फोर द लास्ट टेन इयर्स! यू विल कॉल मी जॉर्ज!! इफ आय हियर यू कॉलिंग मी एनिथिंग एल्स, प्रोफेसर ऑर समथिंग एल्स, आय विल बीट द क्रॅप आउट ऑफ यू!!!"

आयला, हा तर फुल धतिंग प्रोफेसर दिसतोय, माझ्या मनांत आलं!

"पण तुम्ही आम्हांला काय हाक मारणार?" एक अमेरिकन विद्यार्थिनी चिवचिवली. तिच्याकडे अत्यंत तुच्छतेने बघितल्यासारखं करीत जॉर्ज म्हणाले,

"दॅट इज टोटली अनइंपॉर्टंट फॉर मी. मी तुम्हाला कदाचित तुमच्या प्रथम नांवाने हाक मारीन, किंवा त्यावेळेस माझा मूड जसा असेल त्याप्रमाणे एखादं टोपणनांवही ठेवीन!! पण एक नीट ध्यानात ठेव, जसजसा हा कोर्स पुढे जात राहील तसतसं मी तुम्हाला काय हाक मारली यापेक्षा मी जर तुमचं नांवच घेतलं नाही तर तुम्हाला जास्त आनंद होईल."

वर्गात सन्नाटा पसरला. सगळे जॉर्जच्या नजरेला नजर न देता खाली नजर लावून बसले......

इतक्यात पुन्हा दाणकन आवाज झाला म्हणून आम्ही दचकून वर पाहिलं. जोर्जने ते दोन हजार पानी पुस्तक उचलून परत टेबलावर आदळलं होतं......

"हे पुस्तक सिलॅबसला लावलंय युनिव्हर्सिटीने!! हे वाचायची आणि शिकायची जबाबदारी तुमची!! लिहा-वाचायला येतंय ना? उत्तम!! कारण मी यांतलं काहीही शिकवणार नाहीय!!"

अरे म्हणजे मग हा बाबा शिकवणार तरी काय? आणि ते दोन हजारपानी पुस्तक कोणीही न शिकवता आम्ही आत्मसात करायचं तरी कसं? पण जॉर्जचं अजून समाधान झालं नव्हतं!! त्यानं भराभरा फळ्यावर लिहायला सुरुवात केली. तो फक्त आद्याक्षरं लिहीत होता, मी तुमच्या सोईसाठी कंसात फुलफॉर्म लिहिलाय......

जे. ऍम. केम. सॉक. (जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटी)
जे. ओ. सी. (जर्नल ऑफ ऑरगॅनिक केमिस्ट्री)
जे. सिन. ऑर्ग. केम. (जर्नल ऑफ सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री)
टेट. लेट. (टेट्राहेड्रॉन लेटर्स)

"या चार नियतकालिकांचे गेल्या वर्षाचे सर्व अंक परीक्षेसाठी अभ्यासाला असतील. जर्नल कसं वाचायचं ते तुम्ही आत्तापर्यंत शिकला असालच! नसलात तरी मी शिकवणार नाही!! आर्टस र्डिपार्टमेंटला कुठेतरी प्लेबॉय कसा "वाचायचा" ते शिकवणारा एखादा कोर्स असेल तर तो घ्या!"

आम्ही इतके दडपुन गेलो होतो कि त्याच्या प्लेबॉयवरच्या विनोदाला हसायचंसुद्धा कुणाला भान नव्हतं!! अहो कसं असणार? या सर्व जर्नल्सचे दर महिन्याला (काहींचे तर दर आठवड्याला) प्रत्येकी दोनशे पानांपेक्षा मोठे अंक निघतात!! अहो गेल्या अख्ख्या वर्षाचे अंक झाले किती? आणि त्यांची पाने झाली किती? आता ते दोन हजारपानी पुस्तक एकदमच क्षुल्लक वाटायला लागलं होतं!!

"तुम्हाला माहिती आहेच की हा नुसता थियरी कोर्स नाही, याच्यासोबत लॅबही (प्रॅक्टीकल) आहे. चला, आपली लॅब बघून येऊ!!" असं म्हणून जॉर्ज वर्गाबाहेर पडला....

आम्ही सगळे त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. लॅबोरेटरी इमारतीच्या दुसर्‍या टोकाला होती...

बरोबर चालता चालता मी जॉर्जचं निरीक्षण करत होतो. साडेपाच फूट उंची, किंचित स्थूल शरीरयष्टी, गोरा कॉकेशियन वर्ण, निळे डोळे, चेहर्‍यावर कार्ल मार्क्ससारखी भरघोस पण बरीचशी पांढरी झालेली ब्राऊन दाढी, अंगात प्रोफेसरांचा पेटंट ढगळ सूट आणि नाकावर ओघळलेला चष्मा!!
कोणाचाही प्रेमळ आजोबा शोभेल असं रूप होतं! पण त्याच्या अगदी विरूद्ध अतिशय घनगंभीर व खणखणीत आवाज, अगदी जेम्स अर्ल जोन्स सारखा, आणि अत्यंत तिखट जीभ!! जिचा पहिला प्रत्यय आम्ही काही मिनिटांपूर्वीच घेतला होता.....

लॅबमध्ये गेल्यावर तिथल्या असिस्टंटने आम्हाला आपापले टेबल्स, लॉकर्स वाटून दिले. आम्हाला वाटलं संपलं! पण जॉर्जच्या हातात एक कागदी पाकीट होतं. त्यातून त्याने काही चाव्या बाहेर काढून आम्हाला प्रत्येकी एक दिली.

"ही या लॅबच्या मुख्य दरवाजाच्याची चावी!! माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा हा कोर्स सुरू झाला की तुम्हाला इथे फक्त ८ ते ५ अशा कामाच्या वेळेत येऊन प्रयोग करायला वेळ मिळणार नाही. रात्री-बेरात्रीच काम करावं लागेल. त्यासाठी ही चावी!! माझा सल्ला असा आहे की दिवसा जर वेळ मिळाला तर तो लायब्ररीत घालवा आणि रात्री इथे काम करा. तरच तुमच्याने निभेल."

आम्ही विद्यार्थ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. एकमेकांची ओळख नसूनही परस्परांच्या भावना समजल्या! आता समदु:ख्खी होतो ना आम्ही!!

"सगळेजण इकडे या", जॉर्ज एका खिडकीशी उभा राहून आम्हाला तिथे बोलावीत होता. आता काय आणखी? आम्ही तिथे गेलो. पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून बाहेर खाली काही उंचवटे आणि काही खड्डे दिसत होते. काही उंचवटयांवर हिरवळ होती, काहींवर नव्हती. सगळीकडे उत्तम लॅन्डस्केपिंग असलेल्या त्या युनिर्सिटीमध्ये हा भाग अगदी विद्रूप दिसत होता. कदाचित काम अर्धवट झालं असावं.......

"तुम्हाला माहितीय हे काय आहे?", जॉर्ज भविष्यवाणी केल्याप्रमाणे म्हणाला, "माझ्या या कोर्सचा मानसिक ताण सहन न होऊन मध्येच आत्महत्या केलेल्या माजी विद्यार्थ्यांची ही थडगी आहेत! आणि ते खोदलेले खड्डे आहेत तुमच्यासाठी!! तुमच्यापैकी किती जण ते वापरतात ते आता बघायचं!!! हा, हा, हा, हा!!!!!!"

साला, याला आता माणूस म्हणायचं की हैवान!!!!

त्यानंतर उरलेला दिवसभर मी बेचैन होतो. मनात जॉर्ज आणि त्याचा कोर्स सोडून दुसरे विचारच येत नव्हते. सायंकाळी कट्ट्यावर मला गप्प गप्प पाहू मित्रांनी छेडलं.....

'काय बाबा, तू आज गप्प कसा?"

"अरे तो प्रेमात पडला असेल! कुठल्यातरी निळे डोळेवालीच्या!" दुसर्‍याने माझी फिरकी ताणायचा प्रयत्न केला....

" तिच्यायला, प्रेमात कसला पडतोय, इथे गळ्याला फास लागायची पाळी आलीय", मग मी त्यांना सगळा किस्सा सांगितला....

'जॉर्जच्या ९०१ कोर्समध्ये आहेस तू?" मला सिनीयर असणारा विनोद खिदळला, " मग फूल मेलास तू!! थडगी दाखवली की नाही त्याने? आत्ताच कोणतं ते निवडून ठेव!!"

याला म्हणतात शुभ बोल रे नार्‍या!!!

"तू पास केलायस हा कोर्स?" मी आशेनं विचारलं. चला, जॉर्ज कसा शिकवतो ते तर कळेल, कदाचित जुन्या नोट्सही मिळतील!!

"मी? हॅ!!!! पहिल्या चाचणी परीक्षेतच माझी दांडी उडाली. तिथेच सोडला तो कोर्स!!! आता तर त्याच्या समोरही उभा रहात नाही मी! दुरून तो येतांना दिसला तर मी फुटपाथ बदलतो. तिच्यायला, त्याच्याकडून कातडी सोलून घेण्यापेक्षा थोडं जास्त चालावं लागलं तरी हरकत नाही!!"

"तुझं ठीक आहे, तू जेनेटिक्सचा विद्यार्थी! तुला हा कोर्स नाही घेतला तरी चालण्यासारखं आहे. पण मला तो घेतलाच पाहिजे डिग्री मिळवण्यासाठी!" मी.

"म्हणुनच तर म्हटलं की तू मेलास आता! काय इंडियात आई-वडिलांना काही अखेरचा निरोप वगैरे द्यायचा असेल तर देऊन ठेव!!" विनोद आणखीनच चेकाळला.....

"ए तुमको एक बॉत पूछूं क्या? गोस्सा मोत कोरना", शोन्मित्र म्हणाला, "तुमारा ओर होमारा साइझ तो एक हॉय. अगर तुम मर गोया तो तुमारा सब कपडा मै लिया तो चोलेगा क्या?"

हे असले हलकट मित्र असल्यावर आणखी काय पाहिजे!! साल्याला माझ्या मरणापेक्षा माझे कपडे जास्त महत्त्वाचे वाटत होते......

शेवटी ही लढाई मला एकट्यालाच लढावी लागणार हे निश्चित झालं....

देवनारच्या खाटिकखान्यात पाऊल टाकणार्‍या बोकडाइतक्याच उत्साहाने मी दुसर्‍या दिवशी वर्गात प्रवेश केला....

(क्रमशः)

देशांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

24 Jul 2008 - 8:20 am | यशोधरा

मस्तच सुरुवात!! पटपट लिहा पुढे पिडांकाका!!

टारझन's picture

24 Jul 2008 - 4:41 pm | टारझन

जबरा पिडांकाका , लवकर जॉर्ज -२ येवुन द्यात .. मस्त आहे ...
बॅट्समन सारखी नजर फारच खतरनाक ....ऊत्तम मांडणी ..... चित्र ऊभे केले काका , जियो !!!

स्वगत : कारे खवीसा, तु कधी कोण्या मास्तरला घाबरलास का? मार खाऊन हात न पाठ निबर झाली ना तुझी ? मग हा जॉर्ज काय जॉर्ज ऑफ द जंगल आहे काय .. घाबरायला ?

कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

शितल's picture

24 Jul 2008 - 8:31 am | शितल

तुम्ही क्रमश अशा ठिकाणी करता ना आता पुढे काय असेल याचा विचार डोक्यातुन जात नाही.
:)

विजुभाऊ's picture

24 Jul 2008 - 9:36 am | विजुभाऊ

तुम्ही क्रमश अशा ठिकाणी करता ना आता पुढे काय असेल याचा विचार डोक्यातुन जात नाही.

सहमत . यालाच म्हणतात डॅम्बीसपणा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

इनोबा म्हणे's picture

24 Jul 2008 - 11:27 am | इनोबा म्हणे

तुम्ही क्रमश अशा ठिकाणी करता ना आता पुढे काय असेल याचा विचार डोक्यातुन जात नाही.

काका, सुरुवात छान झाली आहे. आता बाकीचे भाग द्या पटकन!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

भाग्यश्री's picture

24 Jul 2008 - 8:38 am | भाग्यश्री

वा अप्रतिम सुरवात... पण फार अपुरं वाटलं.. २-२ भागांचा एक भाग करा ना! पटकन संपवून टाका! फार इंटरेस्टींग वाटतय!

http://bhagyashreee.blogspot.com/

सहज's picture

24 Jul 2008 - 8:40 am | सहज

सुंदर वातावरण निर्मीती, प्रभावी लेखन व प्रसंगवर्णन.

पुढच्या भागाची वाट पहात आहे.

कडक जमलीय सुरवात!!!

प्राजु's picture

25 Jul 2008 - 12:21 am | प्राजु

सुंदर वातावरण निर्मीती, प्रभावी लेखन व प्रसंगवर्णन.

एकदम सुपर्ब.... येऊ दे लवकर अजून पुढचा भाग.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2008 - 7:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर वातावरण निर्मीती, प्रभावी लेखन व प्रसंगवर्णन.
जॉर्ज कॉल्डवेल, पुढे काय काय वाढून ठेवतो कोणास ठाऊक ?
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

अवांतर : आम्ही हा लेख अगोदर आपल्या ब्लॉगवर वाचला,आपले मुळ नाव कळाले त्यामुळे आपल्याला 'डांबिस'म्हणन्याची हिम्मत उरली नाही. (प्रसंगी म्हणत राहीन)

गुंडोपंत's picture

25 Jul 2008 - 1:27 pm | गुंडोपंत

सुंदर वातावरण निर्मीती, प्रभावी लेखन व प्रसंगवर्णन.

पुढच्या भागाची वाट पहात आहे.

कडक जमलीय सुरवात!!!

अगदी हेच!
डोळ्यासमोर उभे राहिले आहे सगळे.
पुढचे लवकर येवू द्या!

आपला
गुंडोपंत

मुक्तसुनीत's picture

24 Jul 2008 - 8:45 am | मुक्तसुनीत

डांबिसखानानी आपल्या खजिन्यातून आणखी एक अस्सल नगीना काढला आहे. छोट्या छोट्या डीटेल्समधून माणसाचे काने-कंगोरे , जगावेगळे काहीतरी दाखवण्याची ताकद पुन्हा दिसते आहे .
पुढील भागाची आतुरतेने प्रतीक्षा !

छोटा डॉन's picture

24 Jul 2008 - 11:16 am | छोटा डॉन

यापेक्षा वेगळी अजुन काय देणार ?
जे आहे ते उत्तम आहे ...

येऊ द्यात अजुन, आम्ही वाट पाहतो आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सखाराम_गटणे™'s picture

24 Jul 2008 - 8:46 am | सखाराम_गटणे™

मस्त आवड्ले,
असाच मला पण १२ वीला ऐक लेक्चरर होता.
त्याला नोटस वैगरे वापरलेल्या बिल्कुल आवडत नव्हत्या. फक्त रेफरन्स बुक्स. नाहीतर आम्ची प्रेक्टीकल मध्द्ये वाट लावायचा. सगळासमोर भाषण.
पण त्याचा आम्हाला शेवटी फायदा झाला, विषय मुळापासुन समजला.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

मेघना भुस्कुटे's picture

24 Jul 2008 - 8:52 am | मेघना भुस्कुटे

मस्तच! लिहा पटापट पुढे!

सूर्य's picture

24 Jul 2008 - 11:04 am | सूर्य

अब्दुलखाना सारखेच जॉर्ज सुद्धा इंटरेस्टिंग वाटत आहे. पुढचा भाग लवकर येउद्यात.

- सूर्य.

सर्किट's picture

24 Jul 2008 - 11:13 am | सर्किट (not verified)

वा डांबीसकाका,

सुरुवात तर मस्त झालीये. उत्कंठा देखील वाढवून ठेवली आहे. आता लवकर येवू द्या पुढचे सर्व भाग ! वाचण्यासाठी उत्सुक आहे तुमचा हा "तरुणपणीचा काळ सुखाचा".

- (आता नवीन काकाच्या शोधात) सर्किट

केशवसुमार's picture

25 Jul 2008 - 1:13 pm | केशवसुमार

वा डांबीसकाकाशेठ,
सुरुवात तर मस्त झालीये. उत्कंठा देखील वाढवून ठेवली आहे. आता लवकर येवू द्या पुढचे सर्व भाग ! वाचण्यासाठी उत्सुक !!
(निवृत्त धतिंग)केशवसुमार
स्वगतः कार्यकारणीवर आहे तोवर ह्या क्रमशःवर बंदी आणावी का? :?

शेखर's picture

24 Jul 2008 - 11:20 am | शेखर

भन्नाट .. काका मस्तच लिहलय....
पुढचे भाग पटकन टाका..

- शेखर

मनस्वी's picture

24 Jul 2008 - 11:30 am | मनस्वी

प्रोफेसरसाहेबांचा दाण दाण दाण असा पावलांचा आवाज ऐकून वाटलं, मी पण त्याच वर्गात बसलीये की काय!
पुढचा भाग लवकर येउदेत!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

स्वाती दिनेश's picture

24 Jul 2008 - 11:50 am | स्वाती दिनेश

तुमच्या जॉर्जने उत्सुकता वाढवली आहे.लवकरच पुढचा भाग लिहा..
स्वाती

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 1:32 pm | विसोबा खेचर

पण एक नीट ध्यानात ठेव, जसजसा हा कोर्स पुढे जात राहील तसतसं मी तुम्हाला काय हाक मारली यापेक्षा मी जर तुमचं नांवच घेतलं नाही तर तुम्हाला जास्त आनंद होईल."

हा हा हा! हे मस्त! :)

डांबिसा, सुंदर लिहिलं आहेस रे. पुढचा भाग येऊ द्यात लवकर...

तुझा जॉर्ज मला आवडला बुवा आपल्याला.. :)

आपला,
(व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.

अनिल हटेला's picture

24 Jul 2008 - 1:40 pm | अनिल हटेला

सुरूवात एकदम बढीय !!

पू भा प्र........

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

बाजीरावाची मस्तानी's picture

24 Jul 2008 - 2:02 pm | बाजीरावाची मस्तानी

मुन्ना-भाई..(म्ब्ब्स) तल्या..डीन च्या नेक्स्ट व्हर्जन चा अजेन्डा वाटला...

अभिज्ञ's picture

24 Jul 2008 - 2:09 pm | अभिज्ञ

व्यक्तीचित्र भन्नाट लिहिलेय.
खुप छान सुरुवात.
पुढील भाग लवकर टाकावा.

अभिज्ञ.

ईश्वरी's picture

24 Jul 2008 - 2:27 pm | ईश्वरी

छान लिहीलंत, डांबिसकाका. लेखन आवडलं . पुढचा भाग लवकर टाका.
ईश्वरी

ध्रुव's picture

24 Jul 2008 - 2:38 pm | ध्रुव

पुढील भागांची वाट बघतोय...

--
ध्रुव

आनंदयात्री's picture

24 Jul 2008 - 2:42 pm | आनंदयात्री

ये हुवी ना बात !! .. क्रमशः टाकुन डांबिसपणा केलाच !! आम्ही सकाळपासुन उत्सुकता ताणुन मुद्दाम न वाचता ठेवला होता तो लेख मोकळ्या शांत वेळात वाचावा म्हणुन तं शेवटी ते क्रमशः कडमडलच मधुन, असं भरल्या ताटावरुन उठवत नका जाउ बॉ !

तुमचे लेखन वाचणे म्हनजे निखळ आनंद असतो :)

तुमचाच

(अधाशी) आंद्या हावरट

झकासराव's picture

24 Jul 2008 - 3:07 pm | झकासराव

क्रमश : असल की मी तो लेख वाचुन उगाच जीवाला त्रास करुन घेत नाही. आज सकाळी येवुन तेच केलं.
पण म्हणतात ना मन वढाय वढाय.. :)
वाचलाच. छानच झालाय. आता पुढच्या भागासाठी वाट बघण आलच.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा's picture

24 Jul 2008 - 5:57 pm | वरदा

या चार नियतकालिकांचे गेल्या वर्षाचे सर्व अंक परीक्षेसाठी अभ्यासाला असतील. जर्नल कसं वाचायचं ते तुम्ही आत्तापर्यंत शिकला असालच! नसलात तरी मी शिकवणार नाही!! आर्टस र्डिपार्टमेंटला कुठेतरी प्लेबॉय कसा "वाचायचा" ते शिकवणारा एखादा कोर्स असेल तर तो घ्या!"

भन्नाट्...अरे ह्यातल्या एका जर्नल चं एक आर्टीकल वाचताना एक दिवस जायचा समजायला....काय केलं काय तुम्ही ..एवढी सगळी वाचलीत??????

त्यासाठी ही चावी!! माझा सल्ला असा आहे की दिवसा जर वेळ मिळाला तर तो लायब्ररीत घालवा आणि रात्री इथे काम करा. तरच तुमच्याने निभेल."
हे मात्र माझ्याही प्रोफेसरनं केलं होतं..पण जास्त दिवस नाही चालले हे प्रकार १ महिना गेल्यावर आम्ही नॉर्मल वेळात आटपायचो...एकमेका सहाय्य करुन....

झक्कास चाल्लंय्....लवकर टाका पुढचा भाग....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

सुनील's picture

24 Jul 2008 - 7:19 pm | सुनील

डांबिसकाका,

मस्त जमलीय भट्टी. मजा आली. आता पुढचा भाग लवकर येउद्यात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संजय अभ्यंकर's picture

24 Jul 2008 - 7:42 pm | संजय अभ्यंकर

डांबीसराव,

तुम्ही केलेले वर्णन वाचून असे वाटते की, ज्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना महापुरूष म्हणावे लागेल.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

24 Jul 2008 - 7:46 pm | चतुरंग

ह्म्म्म ..डांबिसकाका तुमचा हा नवीन प्राणी भलताच इंटरेस्टिंग आहे!
सुरुवात नेहेमीप्रमाणेच जोरदार झालिये. प्रसंग आणि व्यक्ती हाताळण्याचे तुमचे कौशल्य हे जणू लॅबमधे अतिजहाल ऍसिड्स हाताळण्याच्या कौशल्याइतकेच लाजवाब आहे! जराही चूक झाली की हात भाजलाच तसे जराही तोल ढळला की चित्र विस्कटलंच! तुमचं तसं होत नाही.
तुम्ही तुमच्या डांबीस ह्या नावाला मात्र जागता, अचूक जागी क्रमशः!

(स्वगत - अशी व्यक्तिचित्रे सुचायला ओल्ड माँक घ्यावीच लागते की काय? :W :? )

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jul 2008 - 8:16 pm | बिपिन कार्यकर्ते

पिडां, मस्तच जमलाय हा लेख. पण ते क्रमशः अश्या ठिकाणी टाकलंय ना तुम्ही.... तिथे ही कल्पकता दाखवली तुम्ही.

(स्वगतः बरं झालं जास्त शिकायच्या भानगडीत पडलो नाही ते... :) )

बिपिन.

संदीप चित्रे's picture

24 Jul 2008 - 8:53 pm | संदीप चित्रे

खूपच भन्नाट सुरूवात ! अजून काय ?

--------------------------
www.atakmatak.blogspot.com

धनंजय's picture

25 Jul 2008 - 1:01 am | धनंजय

सुरुवात भारी - या माणसाचे पात्र कसे खुलते त्याची उत्सूकता लागून आहे.

भडकमकर मास्तर's picture

25 Jul 2008 - 1:09 am | भडकमकर मास्तर

अप्रतिम..
लै आवडले ...
लवकर पूर्ण करा ...
:)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वप्निल..'s picture

25 Jul 2008 - 1:28 am | स्वप्निल..

पिवळा डांबिस,

अतिशय मस्त .. पण पुढचे भाग पन लवकरच टाका.. वाट बघतोय..

स्वप्निल..

अवांतर : हा तुमचा अनुभव आहे काय? असल्यास कुठल्या युनिव्हर्सिटीचा??

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Jul 2008 - 7:37 am | डॉ.प्रसाद दाढे

मस्तच डा॑बिसराव! पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहे. तुमच्या जॉर्जने आमच्या फर्स्ट इयर फिजियोलॉजीच्या परा॑जपे मास्तरची (अ॑गावर काटा आणणारी) आठवण करून दिली

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jul 2008 - 11:09 pm | llपुण्याचे पेशवेll

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
पुण्याचे पेशवे

मस्तच.

गावितमास्तरांनंतर हा विलायती मास्तर :)

"माझ्या या कोर्सचा मानसिक ताण सहन न होऊन मध्येच आत्महत्या केलेल्या माजी विद्यार्थ्यांची ही थडगी आहेत!

आयला, पण काय मास्तर आहे का डोंब?
काय केमिस्ट्री शिकवायचा का जारण मारण चेटूक?

दोन हजार पानांचं रेफरन्स बूक....
या सर्व जर्नल्सचे दर महिन्याला (काहींचे तर दर आठवड्याला) प्रत्येकी दोनशे पानांपेक्षा मोठे अंक निघतात!! अहो गेल्या अख्ख्या वर्षाचे अंक झाले किती? आणि त्यांची पाने झाली किती?

अग्गायायायायायाऽऽऽ....
आयला, इतका अभ्यास करायला सांगतात होय कुठं?
ह्यॅ: तुमच्या जागी मी असतो न काका, तर तिच्यामारी, कोणी काही न सांगता, त्या मास्तरानं दाखवलेल्या खड्ड्यात आपणहोऊन जाऊन झोपलो असतो, अन् म्हणालो असतो, "हं..ओता आता माती !!!!"....तेही च्यायला, पहिल्याच दिवशी!!!
इतका अभ्यास...इतका अभ्यास??????

"ए तुमको एक बॉत पूछूं क्या? गोस्सा मोत कोरना", शोन्मित्र म्हणाला, "तुमारा ओर होमारा साइझ तो एक हॉय. अगर तुम मर गोया तो तुमारा सब कपडा मै लिया तो चोलेगा क्या?"

हा हा हा....केवळ अतिशय घट्ट मैत्री असलेलाच मित्र असं म्हणू शकतो बॉ :)

झकास चाललाय जॉर्ज कोल्डवेलगुर्जींचा तास.....

पु.ले.शु.

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2021 - 1:03 pm | चौथा कोनाडा

+१

अ ति श य रो च क !
पुढचा भाग तर वाचणारच आहे !