लग्नाआधी आणि लग्नानंतर!

दादा कोंडके's picture
दादा कोंडके in काथ्याकूट
3 Feb 2012 - 3:48 pm
गाभा: 

परवाच एक मित्र लग्नाच्या फायनल बोलणीसाठी गावाला जाउन आला. लग्न अगदी ठरल्यातच जमा होतं म्हणून आल्यावर मी त्याच्याकडे पार्टी मागितली पण तो म्हणाला ऐनवेळी बोलणी फिसकटली. थोडसं खोदून विचारल्यावर कळलं की त्या मुलगीला :) लग्नानंतर एक दिड वर्षेतरी तीचा पगार तीच्या घरी द्यायचा होता. हुंड्याचा वगैरे तर प्रश्नच नव्हता आणि माझा मित्रपण पगार न-देण्याबद्दल आग्रही नव्हता. पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता. जे माझ्या मित्राच्या मते योग्य जस्टीफिकेशन नव्हतं.

अजुन एक उदाहरण माझ्या ओळखीचं आहे. अश्याच कुठल्याश्या छोट्या कंपनीत नोकरी करणारी मुलीचा पगार बारा हजार होता. तीला आयटीत नोकरी लागल्यामूळे तीचा पगार एकदम पंण्णास हजार झाला. त्याच्या जोरावर त्यांनी नवीन घर (तीच्या वडिलांच्या नावावर) घेतलं, कार घेतली. एका वर्षात वडील रिटायर झाले, लहान भावंडांची शिक्षणं चालू. म्हणून ती कर्ज फेडेपर्यंत तीला पगार मग घरी देणं आलं. हिच्या लग्नाचे प्रयत्न चालूच होते पण त्या अटी मूळं खूपशा स्थळांकडून नकार आला.

हीच उदाहरणं नाही, पण ह्या दोन-चार वर्षात खूप मित्रांना अशा अटी ऐकायला मिळाल्यात आणि मैत्रिणींनी अटी घातल्या आहेत.

पुर्वी (म्हणजे अपने जमानमे) मूलीचे पैसे आईवडील घ्यायला अवघडत असत. अगदीच घेतले तर तुझ्याच लग्नाला होतील म्हणून बँकेत ठेवत असत. पण आता मूलींच्या शिक्षणाबाबतही जागरूक असणारे पालक मुलीच्या लग्नाआधी आणि लग्नानंतरही पैसे अगदी हक्काने घेतात असं दिसतं. अगदी गरज पडली तर मदत करणं वेगळं किंवा हेल्थ इंश्युअरन्सचे पैसे भरणं वगैरे समजू शकतो, पण सरसकट लग्नानंतर अर्धापगार किंवा पूर्ण पगार घरी देणार्‍या मूली पण बघितल्या आहेत.

या अनुषंगानं मला काही पडलेले काही प्रश्न,

१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत?
२. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत?

या बद्दल मिपाकरांना काय वाटतं?

प्रतिक्रिया

१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत?
२. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत?

दिलेली उदाहरणं आणि एकूण वस्तुस्थिती पाहता फक्त १-२ वर्षांचा प्रश्न आणि त्यानंतर कर्ज फिटलं, हप्ते संपले, गरज मिटली असं होणार आहे असं वाटत नाहीये.

बाकी मुलीने तिच्या घरी अर्धा पगार दिला तर काय प्रॉब्लेम आहे बुवा??

फारतर तिने सासरी घरचा किमान खर्च स्वतः उचलून बाकीचा सर्व पगार माहेरी कायमच दिला तरी तिची मर्जी.. आणि ते योग्यही आहे. मुलाचा चालतो पण मुलीचा पगार घेण्यात मात्र काही लज्जास्पद आहे का?

सस्नेह's picture

3 Feb 2012 - 4:59 pm | सस्नेह

मुली॑नी सुद्धा थोडा पगार सासरी व काही थोडा माहेरी द्यायला हरकत नाही. मुलगा जर आई वडील व बायको दोघा॑चा खर्च चालवीत असेल तर मुलीने चालवायला काय हरकत आहे ?

पियुशा's picture

3 Feb 2012 - 4:05 pm | पियुशा

हम्म .......प्रश्न फार गहन आणी" डोक्याला शॉट्ट देणारा आहे " (ह्.घ्या.)
जाणकार / माहितागार / सुज्ञ मि .पा. कराच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत :)
(नोकरी करणारी पियु )

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Feb 2012 - 4:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

जाणकार / माहितागार / सुज्ञ या पैकी तुम्ही काहिच नाही कां? ;)

@ मि.का.
आम्हाला आमचे डो़क्के खर्ची घालायचे नाही ( आधीच अक्कल कमी आहे ) ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Feb 2012 - 4:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

डो़क्के खर्ची घालायचे नाही

अजुन एक जोक सांगा ना!

वपाडाव's picture

3 Feb 2012 - 6:18 pm | वपाडाव

अजुन एक जोक सांगा ना!

दिवसाला एकच जोक ऐकण्याची सवय करुन घे... तिला जास्त जोक्स येत नाहीत... अन आजच २ सांगितले तर उद्या काय सांगेल ती...

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2012 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा


@अजुन एक जोक सांगा ना! मि....का. ?... मेलो हसून हसून सांगा ना..?

पियुशा's picture

5 Feb 2012 - 11:35 am | पियुशा

@ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त आत्मा
काय चालवलय रे ? ;) अजुन जोक येत नै ब्बास आता ;)
तुम्हाला तिघानाही तोफेच्या तोण्डी देउ का रे ? ;)

प्रचेतस's picture

5 Feb 2012 - 12:41 pm | प्रचेतस

वप्या अणि मिकाला तोफेच्या तोंडी देऊ शकाल, पण आत्म्याला देऊन काय साध्य होणार आहे?
आत्मा अमर आहे.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

किचेन's picture

5 Feb 2012 - 1:42 pm | किचेन

पण त्या आत्म्याला बोट नसतात.तुमच्या ह्या प्रतिक्रीयातरी थांबतील. ;)

पक पक पक's picture

5 Feb 2012 - 2:24 pm | पक पक पक

ओ ताई तो आत्मा आहे आणी ते सुद्धा अत्रुप्त :crazy: असे आत्मे काहीही करु शकतात .त्यांच्या बोट नसण्यावर जाउ नका. आम्हि अनुभव घेतलेला आहे त्यांच्या नसलेल्या बोटांचा. :bigsmile:

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2012 - 3:07 pm | अत्रुप्त आत्मा

असे आत्मे काहीही करु शकतात .ह्ही ह्हा ह्हा हा...

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2012 - 3:25 pm | अत्रुप्त आत्मा

@पण त्या आत्म्याला बोट नसतात. >>> अगं किच्चु तै...बोट नै गं... बोटं... आणी मला बोटे नाहीच आहेत,,, आत्म्याला देहच नसतो,मग बोटे कुठची...? मी हे लिहिताना कंप्युटरच्या हार्डडिस्क मधेच प्रवेश केलेला असतो...त्यामुळे तर मुक्त संचार करु शकतो... ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2012 - 3:36 pm | अत्रुप्त आत्मा

@-तुम्हाला तिघानाही तोफेच्या तोण्डी देउ का रे ? >>>अग्गं बाबौ... पियु चिडली,,, पळा...पळा...पळा...

मा. अहिंसावादी मिपाकरांना न मर विनंती,

सदर मिपाकर मा. पियुषाताई यांचा सामुहिक बधकांड आरंभण्याचा उघड उघड मनोदय पाहुन आपले दयार्द हृदय अजुन द्रवले कसे नाही, का या बिचा-या वधस्तंभाकडे पक्षी तोफमुखाक्डे ओढुन नेल्या जाणा-या इतर मिपाकरांबाबत आपल्या मनात काही आस्था नाही असे समजावे की काय ? हे भगवान निलकांता , हे प्रत्यक्ष जग कृर व निष्ठुर आहे याची जाणिव होतीच पण तीच कृरता आणि हिंसात्मक जाणिवा जर या आभासी जगात प्रलयंकारी स्पंदने उत्पन करु लागल्या तर आम्हा सारख्या ससका असणा-या लोकांनी कुठे जावे, गिरनार पर्वतावर की काय ?

पियुशा's picture

6 Feb 2012 - 10:12 am | पियुशा

@ ५० फक्त

हे भगवान निलकांता

__/\__
माझा पण णमस्कार सान्गा त्याना ;)

५० राव ,
मला वाट्त कि नै ,कि नै,कि नै ,
माझा ,व.प्या.चा ,अत्रुप्त आत्मा अन पक पक पक या सर्व माननिय सदस्याचा " बाजार ऊठ्वनार वाट्ट्ता आपण ;)

पण आमच्याकडे M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank आहे म्हणल ;)

५० फक्त's picture

6 Feb 2012 - 10:41 am | ५० फक्त

एक ससका मिपाकर म्हणुन प्रामाणिक शंका विचारतो -

M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank - हे हे सगळं चालवण्यासाठी लागणारे लायसन आपल्याकडे आहे काय ? असल्यास आणि नगरहुन निघताना, सगळ्या टायरमधली हवा, ऑईल, हेडलाईटचे बल्ब् वगैरे वगैरे चेक करुन निघा, पुण्यात अशा चिल्लर वाहनांची दुरुस्ती केली जात नाही, आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात.

म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ?

अवांतर - दुस्-या परिच्छेदातला कंस मागच्या किंवा पुढच्या, ज्या हव्या त्या शब्दाला लागु करुन घेउ शकता, आमची हरकत नाही.

प्रचेतस's picture

6 Feb 2012 - 10:51 am | प्रचेतस

अहो ५०, इकडं, तिकडं कशाला पळता, नगरलाच पळा की. तिथे भुईकोट किल्ला आहे, त्याच्याभोवती खंदक आहे. तिथे हे टँक वैग्रे नाही येऊ शकणार.

@ ५० फक्त
आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात.
तुम्ही त्याची काळ्जी करु नका, तसही MH-16 पाहीले ना MH-12 वाले " नगरचे सनकी लोक्स" आल्येत म्हणुन आपोआप साइड देत्तातच्च ;)

म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ?
ते तुमच तुम्ही बघुन घ्या काय तयारी करायची ते , पलायन करायचे का सामना करायचा ;)
" तह " करणार का? ;)

अन्या दातार's picture

6 Feb 2012 - 10:56 am | अन्या दातार

" तह " करणार का?

भुईकोट किल्ल्यावर पोचल्यानंतर विचार करुन कळवतील बहुदा ;)

पक पक पक's picture

6 Feb 2012 - 1:05 pm | पक पक पक

" तह " करणार का?

ओ लेडी औरंग्झेब ,तह करायला समोर यावे लागते ,आम्ही पळुन जायच्या विचारात आहोत...... ;)

>>>ओ लेडी औरंग्झेब

लेडी औरंगझेब नाय रे.. बडी साहेबा !
चिकाच्या पडद्याआडून बोलत असते ती ;-)

पियुशा's picture

6 Feb 2012 - 3:08 pm | पियुशा

लेडी औरंग्झेब ??????
" द्येवा हे काय एकतेय मी ;) उचल ,मला नाही ह्या दोघाना ;)
य. कु अन पक पक पक
रणगाडा तुमच्याच दिशेने वळ्वते आता ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2012 - 3:50 pm | अत्रुप्त आत्मा

@लेडी औरंग्झेब ?????? वरती अनेकांनी लेडी औरंगजेब म्हटल्यामुळे आमच्या अंतःचक्षूंपुढे पियुशा बैं चे चित्र,
कुठल्याश्या हिंदी शिनुमातल्या...
सैनिकी पोशाखातल्या...
पाठिला धनुष्यबाण लावलेल्या...
घोड्यावर बसलेल्या...
नगरहुन पुण्याच्या दिशेने येणार्‍या....(हुश्श...सुटलो एकदाचा वर्णनातून ;-) )
हेमा मालिनी सारखे आले आणी बेजान हसू आलं

हेमा मालिनी सारखे

अह्हा ..

बाकी वप्या नी जीम लावली पाहिजे राव .. धर्मेंद्र च्या तोडीस उतरेल नक्की तो ...
आणि हा
रणगड्याला वळवण्यासाठी मदतनीस नाय म्हणत मी .. बरका ..

मला फुलानदेविच्या वेशात पियू दिसली.ak ४७ घेऊन ;) .( पिवशीच्या मनामध्ये ..बघतेच आता ह्या सगळ्यांना सारखे सारखे माझ्यावा शुद्धलेखनाची खिल्ली उडवतायत काय....एकेकाची अशी अवस्था करीन कि शुद्धलेखन काय लेखन करायच्या लायकीचा राहणार नाही.हि हि हा हा हा...मला डोक नाही काय...हसायला येतंय न..आता असे एक एक विनोद सांगेल न हसन विसराल रडायला लागाल.भिग मागाल माझ्याकडे , पियुताई तू लिहितेस तेच शुध्द ,पण आम्हाला विनोद सांगू नकोस.हि हि हा हा हा .)

मी-सौरभ's picture

6 Feb 2012 - 5:12 pm | मी-सौरभ

ज्या ज्या लोकांना पियु दिसत्ये त्यांनी ती कशी दिसते हे सांगावे अशी नम्र विनंती आहे.
@वप्या: तू उगाच डू. आयडी डू. आयडी असं म्हंतोस लेका; लोकांना दिसत्ये ती ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2012 - 5:20 pm | अत्रुप्त आत्मा

@माझ्यावा शुद्धलेखनाची
@आता असे एक एक विनोद सांगेल न हसन विसराल रडायला लागाल.
@भिग मागाल माझ्याकडे ,
@पियुताई तू लिहितेस तेच शुध्द ,पण आम्हाला विनोद सांगू नकोस. (?)

वपाडाव's picture

6 Feb 2012 - 5:38 pm | वपाडाव

पियुशा's picture

7 Feb 2012 - 10:11 am | पियुशा

@ किचेन
तु माझीच्च शिष्या आहेस हे पुन्हा एकदा तुझ्या लेखनाने सिद्ध केले ग बै ;) कित्ती ह्सवशील ? ;)

निजामशाही अन अदिल्शाही एकत्र झाल्या सारख वाटु लागलय ;) ...आता पळाच :bigsmile:

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2012 - 1:48 pm | अत्रुप्त आत्मा

@निजामशाही अन अदिल्शाही एकत्र झाल्या सारख वाटु लागलय >>> चुकून ऐति-हासिक सत्य बाहेर पडलय...हे देवा...!याचा वर्तमानाशी तर संमंध नाही ना..? ;-)

अवांतर-कॉलिंग वल्ली... निजामशाही व अदिलशाहीचा अंमल असलेली महाराष्ट्रातली गावे कोणती हो...? ;-)

प्रचेतस's picture

7 Feb 2012 - 1:49 pm | प्रचेतस

अहमदनगरचाच निजाम हो.

@ ५० फक्त
आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात.
तुम्ही त्याची काळ्जी करु नका, तसही MH-16 पाहीले ना MH-12 वाले " नगरचे सनकी लोक्स" आल्येत म्हणुन आपोआप साइड देत्तातच्च - माहिती साठी धन्यवाद, मुळ लेखाला अनुसरुन तुम्ही जर आमच्या कर्जाचे हफ्ते भरणार असाल तर आम्ही सुद्धा एक एमएच १६ चा एक टँक विकत घेउ असा विचार आहे . पण टँक शक्यतो सिएनजीवर चालणारा बघा , तुम्ही काय पेट्रोलचे पैसे नाय देणार ना.

म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ?
ते तुमच तुम्ही बघुन घ्या काय तयारी करायची ते , पलायन करायचे का सामना करायचा
" तह " करणार का? - अरे कधी पण, कारण काय सामना म्हणलं की पुर्वी पराशेट मदत करायचे पण हल्ली काय माहित नाही ? , बरं कधी येताय तह करायला, करार छापुन वगैरे घ्यायचा का कसे, नाही आधीच टायपिंग करुन लेखनाची ही अवस्था आहे हाताने लिहुन, काय होईल कोण जाणे. शक्यतो स्वाक्षरीचा सुद्धा शिक्का किंवा स्टिकर घेउन यावे ही विनंती.

बाकी तहाची भेट म्हणुन हुरडा घेउन आलात तर आनंदच होईल, इकडे माओ कोळ्से पेटवुन त्यावर गरम करुन खाउ, हाकानाका.

पियुशा......

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2012 - 4:12 pm | अत्रुप्त आत्मा

@M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank आहे म्हणल >>>ही घ्या आणखिन तयारी....भुई-कोट किल्ल्यातुन ;-) (हम्कू नगर का चप्पा,चप्पा मालुम है..;-) )
आर्म्ड फोर्स :-



पक पक पक's picture

7 Feb 2012 - 8:27 am | पक पक पक

त्ये दोन नं. जवान नुसत हवा भरत आहे :crazy: , त्याचा काय उपयोग...? :bigsmile:

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2012 - 11:17 am | अत्रुप्त आत्मा

@त्याचा काय उपयोग...? >>> आमच्यातही काही लोक नुसतेच हवा भरलेले आहेत,,,हे सिद्ध करणे... :-p

आमच्यातही काही लोक नुसतेच हवा भरलेले आहेत,

:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

पक पक पक's picture

4 Feb 2012 - 10:45 am | पक पक पक

हम्म .......प्रश्न फार गहन आणी" डोक्याला शॉट्ट देणारा आहे " (ह्.घ्या.)
लग्न झाल्यावर विचार करा की , काय घाई आहे.पुर्ण क्षमतेने डोक्याचा वापर साधारण्तः त्यानंतरच सुरु होतो.

जाणकार पक पक

१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत?
२. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत?

लग्न हा पैसा मिळ्वण्याचे एक साधन आहे असे समजुन ज्यांना 'कर्तव्य' असते असे लोकं या तड्जोडी का करतील...?मुळात लग्न कोणाशी त्या व्यक्ती बरोबर कि तिच्या मिळ्णार्‍या उत्पन्नाबरोबर हे ठरवावे ,आणी मग असले प्रश्न उपस्थित व्हावेत..

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2012 - 4:15 pm | पिलीयन रायडर

जर माहेरी गरज असेल तर पैसे जरुर द्यावेत...
पण कधी कधी असेही होते की माहेरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत सासरी भक्कम नसते...
जर मुला-मुलीला मुळ गावापेक्षा वेगळ्याच जागी रहायचे असेल आणि घर, मुल आणि इतर खर्च स्वतः करावा लागणार असेल तर त्यांचा पगार हा सासर्-माहेर ह्या पेक्षा त्यांना स्वतःलाच जास्त आवश्यक असतो... अशा वेळी मुली पगार माहेरी न देता स्वतःच्या संसारात देउ शकतात...
माझ्या मते सासर्-माहेर ह्या पेक्षा गरज जिथे आहे तिथे व गरज जेवढी आहे तेवढा पैसा द्यावा...

पियुशा's picture

3 Feb 2012 - 4:49 pm | पियुशा

+ १टु पिलियन राइडर :)

<<पण कधी कधी असेही होते की माहेरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत सासरी भक्कम नसते...
>>

आणि जर असे असेल की 'सासरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत माहेर भक्कम नसते' तेव्हा
१)अशा वेळी ती आपला पगार (पूर्ण सोडाच पण काही रक्कम) तिच्या माहेरच्या घरासाठी खर्च करू एच्छित असेल तर तिला तो करता येइल आणि तिच्या आई-वडिलांनाही तो ताठ मानेने स्वीकारता येइल अशी परिस्थिती आज समाजात आहे का.

२)आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.

१)अशा वेळी ती आपला पगार (पूर्ण सोडाच पण काही रक्कम) तिच्या माहेरच्या घरासाठी खर्च करू एच्छित असेल तर तिला तो करता येइल आणि तिच्या आई-वडिलांनाही तो ताठ मानेने स्वीकारता येइल अशी परिस्थिती आज समाजात आहे का.

समाजात अशी परिस्थिती इन जनरल नाही पण प्रत्येकाने आपापली लाजलज्जेची कल्पना ठरवून घेतली तर बरं. आणि ज्याचा पगार आहे त्याला त्याच्या विनिमयाचा पूर्ण हक्क असावा. पूर्ण की काही भाग द्यायचा हे सर्व कमावणार्‍याने ठरवायला हवं.

२)आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.

ती नोकरी करत नसेल...

पुन्हा एकदा.. इथे कमावणारा "तो" असेल आणि ती कमावत नसेल तर ती काही "करण्याच्या" स्थितीत नाहीच आहे. तेव्हा मदत करायची असेल तर "तिने" काय करावे हा प्रश्न उद्भवतच नाही. फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते.

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2012 - 5:08 pm | पिलीयन रायडर

फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते.

गवि... केलतं ना युद्ध सुरु...!!!
जर ती मुलगी घर , मुल सांभाळ्ण्यासाठी नोकरी करत नसेल तर तिच्या नवर्याच्या पगारावर तिचा हक्क नाही का...??

आपण मॉडेल आन्सर शोधतोय की प्रत्यक्षातलं?

कितीही घरकाम केलं तरी (तीनचार लाख पर अ‍ॅनमच्या योग्यतेचं काम घरी केलं तरी) नोकरी करुन टँजिबल कॅश आणणारी व्यक्ती ती कमावती आणि बाकी सगळे "डिपेंडंट्स" ही क्रूड फॅक्ट आहे.

त्यामुळे बायकांनी घरी बसून घरकामाची किंमत होत नाही म्हणत राहण्यापेक्षा नोकरी करावी हे जास्त बरं. आता नोकरी करुनही घरकाम करावंच लागेल असं म्हटलं जाईल आणि ते खरंही आहे. पुरुषांची मानसिकता बदलायला वेळ लागेल. पण निदान सुरु तरी करा प्रयत्न..

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2012 - 5:22 pm | पिलीयन रायडर

अहो माझंही अगदी डीट्टो हेच मत आहे... पण पुर्वी इथे मी "एका बाईने नोकरी केल्यास एक घर उद्ध्वस्त होते..कारण बायका टाईम्पास साठी नोकरी करतात आणि त्यामुळे एका गरजु पुरुषाची नोकरी जाते" इथ पर्यंत मते वाचली आहेत..

हे सगळं बदलायला वेळ लागणारे.. खुप खुप वेळ... पण कधी तरी आपल्याला उत्तर मिळेल...!!

माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि माझा नवरा दोघेही नोकरी करत होतो. त्याच्या आईवडिलांची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. माझ्यावर तेव्हा जबाबदारी नव्हती पण मला भाऊ नाही तेव्हा आई-वडिलांची जबाबदारी भविष्यात माझ्यावर असेल याची आधीच कल्पना दिली होती. लग्नानंतर काही कारणांमूळे मी पूर्णवेळ गृहिणी झाले. आमच्या कुटुंबाच्या गरजा भागवून उरलेल्या पैशात सासरी तसेच माहेरी आम्ही गरजेप्रमाणे आर्थिक मदत केली/करतो . माझ्या आई-वडीलांनी मला वाढवताना मुलगा-मुलगी भेद केला नाही. माझा जोडीदारही समंजस आणि पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे मी नोकरी करत नाही तेव्हा माहेरी मदत कशी करू असा प्रश्न मला कधीच पडला नाही.

वपाडाव's picture

3 Feb 2012 - 7:35 pm | वपाडाव

माझा जोडीदारही समंजस आणि पुरोगामी विचारांचा आहे.

म्हणुनच आपण मिपावर इतक्या शांत व व्यवस्थितपणे, नेटक्या शब्दांत आपले विचार मांडु शकताय...

रेवती's picture

3 Feb 2012 - 11:55 pm | रेवती

अगदी अगदी!

रेवती's picture

3 Feb 2012 - 11:40 pm | रेवती

@ गवि, प्रतिसाद पूर्णपणे पटला नाही.
घरकामाची किंमत घरच्यांनी केली तर होते.
आम्ही निदान या पिढीत तरी बदलणार नाही (किंवा किंचित बदलू) हे एकदा ठरवून घेतले की मग पुढे बोलायलाच नको.
तुम्ही असे वागताय असं माझं म्हणणं नाही, हेतूही सर्वसामान्यपणे काय होते ते सांगण्याचा असेल पण जग वेगात बदलत असताना त्याचे फायदे घेत रहायचं आणि मानसिकता मात्र बदलायला जरा वेळ हवा हे म्हणताना दुटप्पीपणा (अश्या नवर्‍यांचा, तुम्हाला काही म्हणत नाहिये) जाणवतो.

अप्पा जोगळेकर's picture

4 Feb 2012 - 9:51 am | अप्पा जोगळेकर

इथे कमावणारा "तो" असेल आणि ती कमावत नसेल तर ती काही "करण्याच्या" स्थितीत नाहीच आहे. तेव्हा मदत करायची असेल तर "तिने" काय करावे हा प्रश्न उद्भवतच नाही. फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते.
अगदी अगदी. शिवाय 'तो' नेहमी कमावणारा असलाच पाहिजे असे गॄहीतक समाजात आहेच. या संदर्भात 'ऐसी अक्षरे' या संस्थळावर तुम्ही उदाहरण दिले होते त्याची आठवण झाली.
शिक्षण झाल्यावर काहीच न करता उनाडक्या करणार्‍या मुलाला उडाणटप्पू म्हणतात. काहीच न करणार्‍या मुलीला 'लग्नाची' आहे असे म्हटले जाते.
शिवाय अलीकडच्या काळात मुलाचे स्वतःचे मालकीचे घर असावे अशी मागणी करुन निराळ्याच पद्धतीने वधूपक्षाकडून हुंडा मागण्याची प्रथा चालू झाली आहे ती वेगळीच.

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2012 - 5:06 pm | पिलीयन रायडर

'सासरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत माहेर भक्कम नसते'

जिथे गरज आहे तिथे पैसा जावा...

आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.

खरं तर जर तिला शक्य असेल (स्वतःचा संसार सांभाळुन...(कदाचित तिच्या नवर्याचा तेवढा पगार नसेल तर...)) तर तिने माहेरी मदत करायला हवी... पण असं होण्याची शक्यता आपल्या समाजात फार फार कमी आहे... पण नाहीच आहे असही नाही..
माझ्या माहितीतील एका आजीना त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांच्या इच्छेखातर भावा-बहीणी जवळ घर घेउन दिले आहे.. ती त्यांना घर खर्च पण देते..आणि आजीनी पण एक मुलगी सोबत रहायला ठेवुन (पेईंग गेस्ट) थोडासा खर्च उचलला आहे...
आणि मी एक असाही मुलगा पाहीला आहे ज्याला स्वतःला आई-वडील्-बहीण्-भाऊ कोणीही नसताना एका चांगल्या मुलीचे स्थळ "तिला वडिल नाहीत फक्त आई आहे..म्हण्जे आइचा खर्च मलाच करावा लागेल" ह्या कारणा साठी नाकारले...

शेवटी हे सगळं ज्याची त्याची मतं, संस्कार आणि परिस्थिती ह्यावर अवलंबुन आहे..

निवेदिता-ताई's picture

3 Feb 2012 - 10:33 pm | निवेदिता-ताई

+१११११११११११११११
अगदी बरोब्बर...सहमत

Pearl's picture

3 Feb 2012 - 4:41 pm | Pearl

या प्रश्नांवरचे माझे विचार टंकेनच.
पण तूर्तास अजून माझ्याही २ प्रश्नाबद्दल पण मत जाणून घ्यायला आवडेल की,
१)लग्नानंतर मित्र(नवरा मुलगा) त्याचे आई-वडिल (आय मीन त्यांची कार, इतर सुखसोयी वगैरे) किंवा आई-वडिलांच्या घरावर जो खर्च करेल त्याआधी प्रत्येक वेळी बायकोला विचारेल आणि तिला योग्य जस्टीफिकेशन वाटले तरच तो खर्च करेल का?

२) वरील प्रश्नाचे उत्तर जर 'नाही. तो न विचारता खर्च करेल असे असेल तर'
तसेच त्याच्या बायकोने केले तर चालेल का?

लग्नानंतर कुठलीही गोष्ट एकमेकांना विचारूनच किंवा सांगुनच केली पाहिजे असा लिखित कायदा अथवा नियम नसला तरी तसेच वागणे अपेक्षित आहे... दोघांकडून. नाहीतर लग्न, संसार, घर या स्गळ्यांना काहीच अर्थ रहात नाही.
आणि प्रत्येकवेळी तुझं - माझं करणं अजिबात योग्य नाही, त्यामुळे सुसंवाद रहात नाही.

वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे जिथे जशी गरज असेल त्या प्रमाणे वागावे.

दादा कोंडके's picture

3 Feb 2012 - 5:41 pm | दादा कोंडके

लग्नानंतर परिस्थिती वेगळी असेल. पण अगदी कशातच काही नसताना असल्या रि़जीड अटी घातल्यावर नाती कशी जुळतील? वरती मनीषाने म्हणल्या सारखं लग्नानंतर लिखीत कायदे वगैरे करता येतच नाहीत. काही प्रश्न विचार विनिमय, चर्चा, सामजस्य वगैरेंनीच सोडवायला हवेत. पण त्यासाठी आधी नाती जुळायला हवीत!

स्वातीविशु's picture

3 Feb 2012 - 4:48 pm | स्वातीविशु

आपल्या गरजा व इतरांकडून काही मिळण्याच्या अपेक्षा कमी ठेवल्यास असे अनेक प्रश्न सुट्तील असे वाटते.....

विजुभाऊ's picture

3 Feb 2012 - 5:18 pm | विजुभाऊ

मुलीने तिच्या पगाराचे काय करावे हे सर्वस्वी ठरवण्याचा हक्क तिचाच आहे. तिने वडिलांची जबाबदारी घेतली यात चूक काहीच नाही. तिने तिचा सर्वच्या सर्व पगार वडिलांना दिलातरी ते योग्यच आहे.
सासर कडच्यानी सून म्हणजे हक्काची पगार कमवून आणणारी स्वैपाकीण असे समजणे हा अप्पलपोटेप्णा आहे

वपाडाव's picture

3 Feb 2012 - 6:29 pm | वपाडाव

सासर कडच्यानी सून म्हणजे हक्काची पगार कमवून आणणारी स्वैपाकीण असे समजणे हा अप्पलपोटेप्णा आहे..

पाशवी शक्त्तंची त्रिवार माफी मागुन....
विजुभौ... ह्या वाक्यावर लैच घाण हसलो मी...काफीचा कप चक्क फुटता फुटता वाचला... अन काफीचे डाग माझ्या पांढर्‍या शर्टावर पडलेत... एवढं होउनही मला ही प्रतिक्रिया टंकावी वाटली यातच सर्व आले...

पुन्हा एकदा माफी मागतो... अन चर्चेचा आणंड लुटतो...

तिमा's picture

4 Feb 2012 - 7:36 pm | तिमा

विजुभाऊंशी सहमत.

प्रत्येकाचे विचार.. वागणे... कर्तव्य विभागणी, वेगवेगळी असतात ..
म्हणुन लग्न करताना आपल्या विचारांसारखेच मिळालेल्या व्यक्तीशी शक्यतो लग्न करावे ...
मग ते पैसे देण्याबद्दल असुद्या..
सामाजिकतेच्या भावनेने असु द्या नाहि तर आणखिन काही..

बाकी अजुन तरी आमच्या येथे, मुलीकडुन पैसे घेत नाहीत.. आणि घेतले तरी ते तसेच किंवा त्या पेक्षा जास्त परत दिले जातात ..
आता ही परंपरा चुकीची आहे की बरोबर ह्यात वाद घालण्याचे कारण नाहीच.. सुनेकडुन ही गरज नसताना पैसे घेतले जात नाहित जर मुलगा गरज भागवण्यास समर्थ असेन तर..
पण त्यांच्या संसारास गरज असेन तर त्यासाठी ते दोघे भागिदारी करतात.

वयक्तीक विचारायचे झाले तर, दोघांचे पैसे दोघांनी योग्य पद्धतीने वापरावे..
मुलीला घरी द्यावे लागत असतील पैसे तर देवु द्यावे .. त्यात विशेष काही नाही. पण गरज नसताना उगाच कर्तव्याच्या नावाखाली जर कोणी देत असेल तर ते योग्य नाही..
जेथे गरज तेथे कर्तव्य

साबु's picture

3 Feb 2012 - 5:46 pm | साबु

+१ - माझ्या मते सासर्-माहेर ह्या पेक्षा गरज जिथे आहे तिथे व गरज जेवढी आहे तेवढा पैसा द्यावा...

पैसा's picture

3 Feb 2012 - 5:53 pm | पैसा

मूळ लेखातल्या एक दोन मुद्द्यांकडे माझं जरा जास्त लक्ष गेलं, एक तर घराचं कर्ज कमीत कमी १५ वर्षं तर वाहनाचं ७ वर्षं असतं. त्यामुळे १/२ वर्षं थांबावं की कर्ज फिटेपर्यंत थांबावं हे क्लिअर असलं पाहिजे. नंतर कुरबुरी होता नये. दुसरं म्हणजे लेखातल्या उदाहरणात लग्न ठरण्यापूर्वी मोडलं हे चांगलं झालं कारण दोघांच्या विचारात खूप तफावत दिसते आहे. अशा परिस्थितीत हे लग्न यशस्वी झालं नसतं.

जेव्हा ज्याना गरज असेल, तेव्हा आपल्या माणसानी उपयोगी पडावं नाहीतर त्या नात्याला काय अर्थ आहे? मग ते नातेवाईक नवर्‍याचे असोत, किंवा बायकोचे. अनेकदा आईवडील मुलाला किंवा मुलीला घर विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करतातच. ते जर आपल्याला चूक वाटत नसेल तर मुलीने आईवडिलांना मदत करण्यातही चूक वाटू नये.

शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि सामंजस्याने निर्णय व्हायला हवा. कोणीच कोणाला गृहीत धरू नये. मानवी नात्यांमधे अनेकदा पैसे हे फक्त निमित्त असतं आणि दुसरे परक्या माणसाला लक्षात न येण्यासारखे बारीक कंगोरे असतात. वर्चस्व कोणाचं याच्याशी गाडी येऊन थांबते. प्रत्येकाने त्या परिस्थितीत आपण किंवा आपले आईवडील असतील तर आपल्याला कसं वाटेल याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.

अप्रतिम's picture

3 Feb 2012 - 6:35 pm | अप्रतिम

दादा कोंडकेजी तुमचा मित्र म्हणजे पुरुषी मनोवृत्तीचा उत्तम उदाहरण आहे...त्याच्या भावी पत्नीने २ वर्षासाठी माहेरी पैसे देण्यामध्ये त्याला काही आक्षेप घेण्याचे कारण नव्हते...मुलगी लग्न करून घर सोडून आली म्हणजे तिला आई-वडील नाहीत असे नाही...तिने जर २ वर्षे सोडा पण आयुष्यभर जरी स्वत:च्या पैश्याने पालकांना पोसण्याचे ठरवले तरी कुणाला काय प्रॉब्लेम असावा? तेवढ्यावरून लग्न मोडणे म्हणजे कहर आहे...पत्निने कमावलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे तिलाच ठरवू द्यावे...

खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन त्यातल्या माणसांसाठी जास्त असतो, अपवाद, माहेरच्या घराच्या कर्जाचे हफ्ते भरत असाल तर, पण मग त्या घरात राहतं कोण हा प्रश्न येतोच ?

प्रत्येकानं ' आपलं' घर कुठलं ते ठरवावं अन त्या घरासाठी खर्च करावा आणि मग संकट समयी त्याच घराकडं धावत जावं,

किंबहुना जे घर आणि त्यातली माणसं आपल्याला आपल्या चुकांसहित आत घेईल, आपण आपल्या चुकांनी ओढवुन घेतलेल्या संकटात सुद्धा आपल्या मागं ठाम उभी राहतील त्याच घरासाठी अन त्याच माणसांसाठी खर्च करावा.

नव-याला त्याचं घर असतंच आणि एकच असतं, त्याला त्याच्यासाठी खर्च करणं भागच आहे किंवा त्याचं ते कर्तव्यच आहे.
पण बायकोला मात्र पर्याय आहे, एक माहेरचं घर अन एक सासरचं घर, यातल्या एका घरामधला हक्क /हिस्सा सोडुन ती लग्नानंतर दुस-या घरी येते, जे तिचं असतं किंवा तिचं आहे असं तिला वाटतं, कारण या घरात तिला सत्ता मिळण्याचा चान्स जास्त असतो, माहेरी भाउ असल्यास तिथं सत्ता मिळण्याची शक्यता कमीच.

आता या वेळी तिच्या माहेरच्या घरावर तिच्यासाठी खर्च करण्याची / तिला संरक्षण देण्याची किंवा तिची काळजी घेण्याची जी संपुर्ण आर्थिक/ सामाजिक/ वैद्यकीय जबाबदारी लग्नापुर्वी असते ती नसते किंवा कमी झालेली असते. आता ही किती कमी होते , केली जाते किंवा झटकली जाते हे प्रत्येक केसमध्ये वेगळं असतं. म्हणजे या जबाबदारीची किंमत ती मुलगी आपल्या पगारातुन / किंवा घरकाम करुन (नोकरी करत नसेल तर) माहेरच्या घराला देत असते, मग लग्नानंतर ह्या जबाबदा-या जे घर घेतं त्या घरासाठी खर्च केला पाहिजे किंवा त्या घरासाठी घरकाम केलं पाहिजे, मग ते माहेरचं असो वा सासरचं. हा शुद्ध व्यवहाराचा ' एक हात दो एक हात लो ' असा भाग आहे.

एकुणच लग्न हा दोघांनाही एकत्र जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी कराव्या लागणा-या रुक्ष व्यवहाराचा भाग आधी आणि कोमल भावनांचा खेळ नंतर आहे हे क्रुर वास्तव समजुन घेतलं तर हे असे भावनांमधुन निर्माण होउन सरळ सोप्या व्यवहाराला गुंतागुंतीचे बनवणारे प्रश्न उभेच राहात नाहीत.

वपाडाव's picture

3 Feb 2012 - 6:48 pm | वपाडाव

Pearl's picture

3 Feb 2012 - 7:54 pm | Pearl

>>
प्रत्येकानं ' आपलं' घर कुठलं ते ठरवावं अन त्या घरासाठी खर्च करावा आणि मग संकट समयी त्याच घराकडं धावत जावं,
>>

बरर... हा नवीन फंडा आहे माझ्यासाठी..
म्हणजे लग्न झाल्यावर ज्या आई-वडिलांनी लहानपणापासून सांभाळल, वाढवलं, शिकवलं, जपलं त्यांना, ज्या घरात आपण वाढलो ते फक्त लग्न झालं म्हणून परकं मानायचं. केवळ आपल्याला त्यांची (आर्थिक/वैद्यकीय) गरज/उपयोग नाही म्हणून. आणि त्यांना आपली गरज वाटतं असेल त्याचं काय.
आणि हो आणि आपल्याला त्यांची (आणि आपली त्यांना) इमोशनल गरज नेहमीच जाणवणार त्याचं काय भाउ.

आणि जगात सर्व दाम्पत्यांना १ तरी मुलगा असतोच, हा थंब रूल मानून चालला आहात भाउ आपण.
जगात अशीही कुटूंब असंख्य आहेत ज्यांना फक्त १ मुलगी किंवा फक्त मुलीच आहेत.

१) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही.
नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना.

२) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही.

३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही.
म्हणजे जे घर आपले मानून त्याला तन मन धन दिले त्यावर शेवटी सूनेचा काहीच हक्क नाही, असे कसे बुवा.

वपाडाव's picture

3 Feb 2012 - 8:16 pm | वपाडाव

तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही.

नवर्‍याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे... कमीत कमी सासरी ही आशा तरी आहे की काहीतरी पतिच्या नावावर होइल, त्याअर्थी पत्निच्या (सुनेच्या)... पण लग्न झाल्या झाल्याच माहेरच्या सर्व बंधनातुन मुक्त झाल्या कारणाने तिकडच्या प्रॉपर्टीवर (सेवा करा न करा) हक्कदेखील दाखवता येत नाही... अनलेस ती प्रॉपर्टी तिच्या स्वत:च्या मालकीची आहे... (लग्नाआधी जर तिने घेतली असेल तर, कारण सहसा बाप आपली प्रॉपर्टी पोरीच्या नव्हे तर बायकोच्या नावे करतो.)

फारच गंभीर विषय आहे...
कॉलिंग युयुत्सु...
-वपुत्सु

नवर्‍याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे

तसं नाहीये. सासू सासर्यांनी मालमत्ता मुलाच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतिल तर नवरा गेल्यावर सुनेला अधिकार सांगता येत नाही.नातू किवा नात असेल तर त्यांना ती मालमत्ता मिळू शकते.पण सुनेला नाही.

पण माहेरी सेवा करा न करा, आई वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा ५०% अधिकार असतोच.जर आई वडिलांनी आपल्या हयातीत ती मालमत्ता मुलाच्या नावावर केली असेल तर मात्र मुलीला हक्क दाखवता येत नाही.

सासू सासर्यांनी मालमत्ता मुलाच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतिल तर नवरा गेल्यावर सुनेला अधिकार सांगता येत नाही

सासू सासर्यांनी मालमत्ता मुलीच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतील तर बायको गेल्यावर जावयाला अधिकार सांगता येत नाही, हे पण खरे आहे ना?

स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता मी मृत्यूपत्र करून कोणालाही देऊ शकतो. फक्त माझ्या मुलाला किंवा फक्त मुलीला किंवा दोघांना किंवा एखाद्या अनाथाश्रमाला. मृत्यूपत्र नसेल तर मुलगा आणी मुलगी आपला वारसाहक्क सांगू शकतील. वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर नातवंडांना मालमत्ता मिळेल, मग ती वडिलांच्या बाजुने असु दे किंवा आईच्या बाजुने.

एकंदरीत, मालमत्तेच्या वाटणीत सुनेवर/मुलीवर अन्याय होत आहे, असे म्हणता येणार नाही.

५० फक्त's picture

3 Feb 2012 - 11:04 pm | ५० फक्त

१) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही.
नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना. - लागतेच आणि जर मुलगी एकुलती एक असेल, आणि तिच्या माहेरची इस्टेट मिळणार असेल तर तिचा नवरा अशा कामात आडकाठी न आणता मदत करेल. दुरदृष्टी म्हणतात त्याला.

२) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही. - करावी, पण उद्या या बहिणी शिकुन मोठ्या झाल्या नोकरीला लागल्या, त्यांची लग्नं झाली, आणि नंतर मोठ्या बहिणीला अडचण आली तर त्यांनी पण तिच्या केलेल्या कामाची मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी.

३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही. - मी म्हणतो, ज्या मुलामध्ये लग्नाआधी काही वस्तु, फर्निचर, टिवी, फ्रिज अशा बेसिक गरजेच्या वस्तु घेण्याची लायकी नाही किंवा लायकी असुन त्यानं घेतलेल्या नाहीत, त्याच्याशी लग्न कराच कशाला ? कारण माझ्या माहितीप्रमाणे आज काल मुली लग्न ठरवताना घर कसं आहे यासोबत घरात काय काय आहे , कसं आहे हे सगळं पाहतात. उगा रिकाम्या प्लॅटमध्ये नाही जात कुणी राहायला.

आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका.

आनंदी गोपाळ's picture

5 Feb 2012 - 8:59 pm | आनंदी गोपाळ

पण फक्त प्रतिवाद म्हणून लिहिल्यासारखा वाटला.

आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका.

कोणती ओळ?

टुकुल's picture

3 Feb 2012 - 10:02 pm | टुकुल

मला पण असच वाटत होत, आणी तुम्ही ते योग्य शब्दात माडंल.

जाता जाता : सध्या माझा एक जवळचा मित्र याच परिस्थितीतुन जात आहे, दोघेहि नोकरी करतात एकडे, घराचा पुर्ण खर्च माझ्या मित्राच्या खात्यातुन (तिच्या शॉपिंगचा सुद्धा), महिना संपता संपता खात्यात खुळखुळाट आणी बायकोचा पगार ति काय करते सांगत नाही. आताच तिच्या भावाने खुपच महागडी दुचाकी घेतली आणी हा म्हणतोय कि तिनेच त्याला घेवुन दिली. आता या परिस्थितीत काय करावे हे ना त्याला ना मला कळत आहे..

अजुन थोडा विचार केल्यास अस दिसतय कि सध्या काही ठिकाणी नवर्या मुलांना जास्त तडजोड करावी लागतेय टिकवुन ठेवायला आणी त्यांच्या बायका ह्या विचारांचा गैरफायदा घेत आहेत.

--टुकुल

बायका ह्या विचारांचा गैरफायदा घेत आहेत.

काही प्रमाणात सत्य आहे हे.

पूर्वी याच्या उलट होत होत.जग बदलतंय तर.चांगल आहे.

चित्रा's picture

3 Feb 2012 - 6:58 pm | चित्रा

उत्तम चर्चाविषय :)

माझी मते:
१. मुलाने लग्न नको ठरवले ते बरेच झाले. दोघांच्याही डोक्याची कटकट (आणि त्यामुळे इतरांची कटकट) मिटली.
२. लग्नाआधी पगारावरून एवढी विस्तृत बोलणी होतात, हे मला फार बरे वाटले. त्यात दोन्ही बाजूंना बोलण्याची लाज बाळगण्याची गरज वाटत नाही हे फार छान. अपेक्षेपेक्षा घरात कमी पैसे आल्याने मनाचा कोंडमारा होऊन जगण्यापेक्षा अशी आधीच व्यवस्था लावलेली बरी.
३. पण, लग्न हे अधिक पैसे घरात येण्याची एक व्यवस्था आहे हे इतके स्पष्ट उघडेवाघडे बघून जरासे वाईटही वाटले. त्यातही मुख्य म्हणजे शारिरीक आणि मानसिक पातळीवर काहीच संबंध जुळलेला नाही असे वाटते. एवढी व्यापारी डील्स होणे बरे का वाईट यावर एक निबंध लिहीता येईल असे वाटले.
४. लवकरात लवकर "लिव-इन" रिलेशन्स मध्यमवर्गातही येणार यात शंका नाही.

रम्या's picture

7 Feb 2012 - 11:12 am | रम्या

>>लवकरात लवकर "लिव-इन" रिलेशन्स मध्यमवर्गातही येणार यात शंका ना>>
अगदी सहमत!

मला वाटतं जगातील बदलत्या मुल्यांनुसार लग्न संस्थेत बदल करायचे म्हटल्यास आपण लिव्ह इन रिलेशन्स वरच येऊन पोहोचू.

अवांतर : च्यायला अशा चर्चे मध्ये सगळे पती/पुरुषांच्या विरोधात लढायला आल्यासारखे का बोंबलतात काही कळत नाही. लग्नाआधी मुलाकडे स्वतःचं २ बीएचके फ्लॅट असावा, गाडी असावी अशा अपेक्षा कराव्यात. त्यासाठी मुलाने स्वतःच्या ढुंगणाला चिमटे काढून डाऊन पेमेंट करण्यालायक पैसे जमवावेत, घराचे हप्ते भरावेत. लग्नानंतर मात्र या सगळ्या गोष्टींवर अर्धांगिनी म्हणून पत्नीला समान हक्क द्यावा. पण त्याच वेळी पत्नीने काही संसारात काही खर्च उचलावा अशी अपेक्षा करावी तर म्हणावं तिने कमावलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा हे तिनेच ठरवावं. च्यायला अजबच आहे सगळं.

रेवती's picture

3 Feb 2012 - 8:42 pm | रेवती

आला रे आला! पाशवी धागा आला.
हा प्रश्न खरा आहे आजकाल पण आपण प्रगतीशील म्हणवत फारच मर्यादित विचार करतोय.
प्रत्येक जोडप्याचे आर्थिक गणित आणि कौटुंबिक प्रश्न वरवर दिसायला सारखे पण तितकेच वेगळे असणार.
आपापली समजूत, सामाजिक, आर्थिक परिस्थिती ई. गोष्टी आहेतच.

माझ्याकडून ठरलेल्या एका लग्नामध्ये मुलीनी मुलाना अट घातली होती, लग्नानंतर ती तिच्या पगारातले ५ हजार दर महा आईला देईल जोपर्यंत भाऊ कमवायला लागत नाही तोपर्यंत.अर्थात हि गोष्ट फक्त त्या दोघांमध्ये होती.इतर कोणालाही याची कल्पना नव्हती(मलासुद्धा).जेव्हा नंतर हि गोष्ट जाहीर झाली तेव्हा सासूने तिच्या पगारातला निम्मा पगार (१२,५००) माहेरी द्यावा असे सुचवले.ह्या मुलीला वडील नव्हते.
पण फक्त एकच...बाकी काही उपवर मुली मात्र हुंडा, अमुक तमुक तोळे सोन आणि धुमधडाक्यात लग्न वगैरे अशा कारणांमुळे नापसंत केल्या जातायत.
पूर्वी हि जाईल सासरी, हिच्या लग्नासाठी पैसा कुठून आणणार अशी कारण देऊन मुळीच शिक्षण लवकर थांबवायचे.आता परिस्थिती बदलतीये.पालक मुलींनाही हौशीनी शिकवतायत.अगदी लोन वगैरे घेऊन.उपवर वाधुलादेखील कर्तव्याची जाणीव असते.आई वडिलांची जबाबदारी जसा मुलगा सांभाळतो तसाच मुलीने देखील संभाळल पाहिजे. हि जाणीव उपवर मुलाला देखील असली पाहिजे.

दादा कोंडके's picture

4 Feb 2012 - 1:37 am | दादा कोंडके

तेच तर ना. ह्या असल्या पैशाच्या गोष्टी नातं निर्माण झाल्यावर सामजस्यानं ठरवायच्या असतात. त्यात कर्तव्य असावं उपकार नको. आपुलकी असावी फक्त व्यवहार नको.

लग्न वगैरे ठरायच्या आधीच ह्या असल्या अटी कसल्या घालता? मूलगा-मूलगी दोघंही सारखे वगैरे ठिक आहे पण सध्या समाजात काय स्तिथी आहे, त्याच्या कलेनं घ्यायला नको का? बदल हळू-हळू होतीलच.

'पहिल्यांदा सगळं क्लिअर असलेलंअ बरं' ह्याचा खूपदा अतिरेक होतो. "तूझा कोणी गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड होती/होता का?" किंवा "मी लग्नानंतर घरी पगार देणार, पटलं तर बघ" ही त्याचीच उदाहरणं. अश्या नाजूक वेळेला सुरुवातीलाच एकघाव दोन तुकडे करून चालत नसतं. उगिचच कुणीतरी कान भरवून दिलेली असतात अशा लोकांचे की , हा तसा निघाला, ती तशी निघाली. वास्तविक काही गोष्टींचे अंदाज बांधायचे असतात, काही गोष्टी अप्रत्यक्षपणे काढून घ्यायच्या असतात, काही गोष्टी थोड्या दिवसानंतर विचारायच्या असतात. हे सगळं व्हायला काही दिवस जाउ द्यावे लागतात. आणि पहिल्या भेटीत पुढे जाउ द्यायचंकी नाही एव्हडा अंदाज आला तरी पूरे आहे, आणि येतोच.

खर आहे.जस काही आपण लग्न करत नाहीयेत तर आपली जमीन विकतोय.हा भाव आहे जमल तर घे नाहीतर सोड.पण जमीन विकल्यानंतर पाणी लागणार आहे, पिक येणार आहे का, का कसलं आरक्षण येईल याबाबत विचारच करत नाही.आता वरच्या उदाहरणात समजा मुलगी भाऊ कमावता व्हायच्या आत आई झाली तर मग घरी पैसे कोण देणार?ती तिचा निम्मा पगार देईल अस ठरलं होत.पण पगारच बंद झाल्यावर काय नवरा देणार त्या वाटचे पैसे.

आनंदी गोपाळ's picture

5 Feb 2012 - 9:02 pm | आनंदी गोपाळ

वरील तिन्ही प्रतिसाद सुंदर.
किचेन ताई व कोंडके दादा यांनी लिहिलेले.
पुढे वाचतो आहे.

च्यायला, चर्चा प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

मुलीनी घरी माहेरी पगार द्यावा का ---इथे हे गृहीत तत्व दिसत आहे कि मुलगे त्यांच्या आई वडिलांना नेहमी पगार देतात---इथे किती मुलगे आई वडिलांना पैसे देतात?
मुलाचे आई वडील आजकाल मुलावर भार टाकत नाहीत ---अजीतजी

तेच म्हणायचं.लग्न झाल कि नवर्याचा पगार नवरा-बायकोचा एकत्र असतो.आई वडिलांकडे तो सहसा जात नाही.मग मुलीचा पगार का माहेरी जावा?शिक्षणच बोलायचं झाल तर, नवऱ्याच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हे कर्तव्य, आणि बायकोच्या शिक्षणावर केलेला खर्च हे उपकार.स्त्री मुक्ती, किवा स्त्री पुरुष समानता वगैरे मध्ये पुरुष भरडला जातोय.भगवान कारे तो रामलीला... सारखी अवस्था झालीये.आयला साधी बसमध्ये पण जागा नाही.लग्नाच्या वेळेसही ह्या बायका वेठीस धरतात. पुरुष म्हण्जे समजलात काय? कोणीही यावं आणि टपली मारून जावं.

भगवान कारे तो रामलीला...
हो ना! आणि आम्ही करू तर कॅरॅक्टर ढीला?;)

१) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही.
नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना.
- लागतेच आणि जर मुलगी एकुलती एक असेल, आणि तिच्या माहेरची इस्टेट मिळणार असेल तर तिचा नवरा अशा कामात आडकाठी न आणता मदत करेल. दुरदृष्टी म्हणतात त्याला.
>> प्रत्येक जण प्रत्येक गोश्ट करताना हा फायद्या तोट्याचा तराजू घेउन बसला तर खरचं जगणचं अवघड होइल. [मला वाटतं प्रत्येक गोश्टीतली व्यापारी/हिशेबी व्रुत्तीमुळेच आज मुलगी-अपत्य कोणालाही नको असते. तुमचंच गणित मांडून बघा ना तोटाच तोटा आहे. सुशिक्षित लोकही जर असा विचार करत असतील तर अशिक्षित किंवा आर्थिक दुर्बल लोकांची काय कथा. असो तो एक वेगळाच विशय आहे. आणि जाउ दे इथे विषयांतर नको. ]

तुम्ही नवर्‍याच्या बाबतीत बोलताना म्हणता की 'नव-याला त्याचं घर असतंच आणि एकच असतं, त्याला त्याच्यासाठी खर्च करणं भागच आहे किंवा त्याचं ते कर्तव्यच आहे.' तेव्हा मात्र तुम्ही त्याला कर्तव्य वगैरे म्हणता. तेव्हा तुम्ही नवर्‍याच्या आई-वडिलांची काही इस्टेट आहे का, ती मिळणार आहे का याचा विचार न करता कर्तव्य म्हणून त्यांच्यासाठी करणार आणि बायकोच्या आई-वडिलांसाठी (
खर्च तर सोडाच. या उदाहरणात खर्च धरलेलाच नाहिये) मदतीला जाताना मात्र आपल्याला किती फायदा
होणार याचा विचार करून आणि फायदा होणार असेल तरच नवरे जातील असं म्हणणं मला तरी दुटप्पीपणाचं वाटतं. बायको एकुलती एक अपत्य असेल तिच्या आई-वडिलांची तर तिच्या आई-वडिलांना मदत करण हे पण तिच कर्तव्यच नाही का.

२) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही.
- करावी, पण उद्या या बहिणी शिकुन मोठ्या झाल्या नोकरीला लागल्या, त्यांची लग्नं झाली, आणि नंतर मोठ्या बहिणीला अडचण आली तर त्यांनी पण तिच्या केलेल्या कामाची मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी.
>> आपल्याला मदत करणार्‍याबद्दल प्रत्येकाने मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी, हे बरोबरच आहे. पण समजा तुम्ही तुमच्या बहीण/भावाला मदत करताना तसे सांगता किंवा तसा करार करता का. नाही ना. तुम्हाला मदत करणे कर्तव्य वाटते म्हणून करता आणि तुम्हाला निश्चितच वाटते की तुमच्या बहिणीने/भावाने त्याची आठवण ठेवावी. पण पुढे जाउन तुमचा भाउ/बहिण त्याची जाण ठेवेल की नाही हे त्या व्यक्तिवर ठरते.
त्याचप्रमाणे बायकोने तिच्या बहिणीला मदत करणे कर्तव्य वाटते म्हणून केले तर काय बिघडले. आता बहीणीने त्याची जाणीव ठेवावी. पण ती तसे करेल की नाही हे त्या व्यक्तिवर ठरते.

३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही.
- मी म्हणतो, ज्या मुलामध्ये लग्नाआधी काही वस्तु, फर्निचर, टिवी, फ्रिज अशा बेसिक गरजेच्या वस्तु घेण्याची लायकी नाही किंवा लायकी असुन त्यानं घेतलेल्या नाहीत, त्याच्याशी लग्न कराच कशाला ? कारण माझ्या माहितीप्रमाणे आज काल मुली लग्न ठरवताना घर कसं आहे यासोबत घरात काय काय आहे , कसं आहे हे सगळं पाहतात. उगा रिकाम्या प्लॅटमध्ये नाही जात कुणी राहायला.
>>आता तुम्ही माझं म्हणणं शब्दशः घेत आहात. फर्निचर नवे घेतले जाउ शकते. टिवी, फ्रिज पण जुने असतील तर नवे खरेदी केले जाउ शकतात. तरीही त्याऐवजी आपण मायक्रोवेव, डिशवॉशर, ए.सी. अशा वस्तु घेतल्या म्हणू.

आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका.
>> मान्य आहे की मी तुमच्या प्रतिसादातली एक ओळ बाहेर काढली पण
१) एक तर ती विनासंदर्भ मुळीच नाहिये. तुमचा पूर्ण प्रतिसाद त्या ओळीवर बेतला आहे म्हणू किंवा त्या ओळीशी संबधित आहे म्हणू. त्यामूळे मी काही विपर्यास केला आहे असे मला मुळीच वाटत नाही.
२)दुसरं असं की मी ती ओळ घेण्यामागे माझा एकच उद्देश होता की माझा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादावर दिलेला आहे हे कळाव यासाठी फक्त रेफरन्स म्हणून मी ती ओळ वापरली. कारण माझा प्रतिसाद मोठा होता आणि तो टंकेपर्यंत दुसर्‍या कोणी प्रतिसाद टाकला तर क्न्फ्युजन होउ नये एवढाच साधा उद्देश होता. बाकी काही नाही.

मुद्दा क्र. १ - तुमचा मुद्दा मान्य, पण हे आजचंच नाही तर कालचं पण कटु सत्य आहे, वास्तव आहे. ही परिस्थिती जर बदललेली असती तर हे असे पैशावरुन सुरु होणारे प्रश्न उपस्थितच झाले नसते.

मुद्दा क्र.२ - माझा पहिला प्रतिसाद पुन्हा वाचा, नव-याला पक्षी पुरुषाला हा चॉईस ह्या समाज पद्धतीनंच ठेवलेला नाही, जसे या समाज पद्धतीनं त्याला तथाकथित अनिर्बंध अधिकार दिले त्याबरोबरच जवळपास तेवढीच कर्तव्यं पण त्याच्या गळ्यात मारलेली आहेत, तिथं त्यानं त्याच्या भावा बहीणिंना मदत करताना करार - मदाराचा प्रश्नच येत नाही, तिथं पर्याय नाहीत. पण बायकोच्या पक्षी स्त्रीच्या बाबतीत आहेत किंवा लग्नानंतर तयार होतात किंवा काही चाणाक्ष बायका आपलं आर्थिक स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या मार्गाचा अवलंब करतात.

मुद्दा क्र. ३ - तुमचं म्हणणं शब्दश्: घेण्यामागचा हेतु थोडासा विनोदनिर्मिती होता, तो असफल झाला असे म्हणावे लागेल. कायद्याबद्दल बोलायचं झालं तर माझी तेवढी समज नाही.

मुद्दा क्र. ४ - आपण ती एकच ओळ कॉपी पेस्ट केल्यानं विपर्यास झाला असं माझं मत आहे.

मुली कमवायला लागल्या त्याला पुष्क़ळ वर्ष झाली. त्या पैशावर कुणाचा हक्क यावरून गदारोळ माजले. पुरुषाची कमाई जशी प्रथम स्वत:साठी आणि नंतर त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठी तसेच स्त्रियांचेही! माहेर वा सासर सगळे नंतर..! तिला कशाला प्राथम्य क्रम दयावासा वाटतो ते महत्त्वाचे. कारण चैन आणि गरज या दोन वेगळ्या आणि व्यक्तिसापेक्ष बदलणार्‍या संकल्पना आहेत. माहेरच्या वा सासरच्यांना तिने गाडीचे हप्ते भरावे असे वाटत असेल, गाडी जर तिची आणि केवळ तिचीच असेल तर ते ठीक आहे. अन्यथा कुणाच्या हौशी-मौजी भागवण्यापेक्षा ती स्वतःसाठी पैसे साठवेल.

शेखर काळे's picture

4 Feb 2012 - 7:08 am | शेखर काळे

लग्न झाल्याबरोबर, किंवा ठरवतांनाच जॉईंट अकाऊंट काढायचे, मुलगा व मुलगी, दोघांनीही ठरवायला पाहिजे. त्यातून किती खर्च होतो हे दोघांनाही कळते, त्यामुळे लपवाछपवीचा प्रश्नच यायला नको.
आतातर ऑनलाईन बँक अकाऊंट कधीही पाहता येतो.

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 Feb 2012 - 8:13 am | पुण्याचे वटवाघूळ

मुलगा असेल की मुलगी जर पालकांच्या मालमत्तेत वाटा हवा असेल तर खर्चातही वाटा उचललाच पाहिजे असा कायदाच हवा. कायद्याप्रमाणे मुलींना पालकांच्या मालमत्तेत बरोबरीचा वाटा असतो. अर्थात त्यात तक्रार करण्यासारखे काहीच नाही. पण त्याच न्यायाने खर्चात आपलाही वाटा देणे ही पण त्यांची नैतिक जबाबदारी असते. कर्जाने घेतलेल्या घराचे हप्ते फेडताना सर्वच भावंडांना (भाऊ/बहिण) तो देणे बंधनकारक हवे. डोक्यावर कर्ज असताना छदाम द्यायचा नाही आणि पालक गेल्यानंतर नुसता आपला वाटा मागायला येणे हे कितपत समर्थनीय आहे? अर्थात हे मुलगा आणि मुलगी दोघांनाही तितकेच लागू होते.

(अवांतरः पालकांच्या मालमत्तेत वाटा मुलींना देण्यात काहीच चूक नाही. पण मग वृध्द आई-वडिलांना सांभाळायची जबाबदारी पण घ्यायला हवी. हे सरसकट विधान नाही पण माझ्या पाहण्यात किमान ३-४ केसेस (आमच्या कुटुंबात किंवा ओळखीच्यांमध्ये) आल्या आहेत. मुलीचे लग्न झाल्यानंतर आई मुलीला धाऊन धाऊन मदत करणार पण त्या आईचे हातपाय चालेनासे झाले की मात्र आई नकोशी होणार आणि मग तिला सांभाळणे ही भावाची जबाबदारी! परत मालमत्तेत वाटा मागायला मात्र सगळ्यांच्या पुढे. आणि परत यांना कोणी काही बोलायचे नाही!!)

नितिन थत्ते's picture

4 Feb 2012 - 10:08 am | नितिन थत्ते

शीर्षक वाचून कसल्या औषधाच्या जाहिरातीचा धागा असावा असे वाटले होते. :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 Feb 2012 - 10:18 am | पुण्याचे वटवाघूळ

मलाही अगदी थत्तेचाचांसारखेच वाटले.

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2012 - 8:52 pm | टवाळ कार्टा

"कामाच्या" औषधाच्या ;)

अशी ओळ त्या जाहिरातींत असते. ;)

वैशाली माने's picture

4 Feb 2012 - 1:12 pm | वैशाली माने

<<त्यामुळे बायकांनी घरी बसून घरकामाची किंमत होत नाही म्हणत राहण्यापेक्षा नोकरी करावी हे जास्त बरं. आता नोकरी करुनही घरकाम करावंच लागेल असं म्हटलं जाईल आणि ते खरंही आहे. पुरुषांची मानसिकता बदलायला वेळ लागेल. पण निदान सुरु तरी करा प्रयत्न..

गवि..काकांशी सहमत याच विचारांतुनच मी नोकरी करु लागले.

पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

त्या भावाची बायको नक्कीच नोकरी करणारी नसणार... आई वडिलांच्यापेक्षाही असे स्वतःच्या घरातल्या लोकाना नोकरी करु न देणारेच अशा पगाराचे हिस्से मागत रहातात.. अजिबात देऊ नये... लग्न मोडले हे बरे झाले...

मयुरपिंपळे's picture

4 Feb 2012 - 6:04 pm | मयुरपिंपळे

लाईफ टाईम जरी तीने घरी मदत केली तरी काय हरकत आहे. Emoticon

नगरीनिरंजन's picture

4 Feb 2012 - 7:04 pm | नगरीनिरंजन

आहाहा! मजा आली.
जिला घरी मदत करायचीय ती मुलगी बिनधास्त स्वतःच्या हिंमतीवर स्थळांना स्पष्ट सांगतिये आणि त्यांनी नकार दिला तरी तिला काही फरक पडत नाहीये हीच गोष्ट किती आनंदाची आहे.
राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्न झालेच पाहिजे असा जो अट्टाहास आहे तोच मुळात फोल आहे. लग्नाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे का? आणि व्यर्थ आहे असे ज्याला वाटत असेल तो/ती त्याच्या/तिच्या प्राधान्याप्रमाणे तडजोड करेल.
मुळात गृहीतक ( सर्व अटी मान्य होऊन लग्न झालेच पाहिजे) चुकीचे असल्याने चर्चेचा पायाच ठिसूळ आहे.

अगदी बरोबर.. मुलीला लग्नाची गरजच वाटत नाही आहे... लग्नानंतरही अशी मुलगी टिकणार नाही.. एखादे मूल झाले की मुलासकट माहेरीच निघून जाईल.

दादा कोंडके's picture

5 Feb 2012 - 2:36 pm | दादा कोंडके

जिला घरी मदत करायचीय ती मुलगी बिनधास्त स्वतःच्या हिंमतीवर स्थळांना स्पष्ट सांगतिये आणि त्यांनी नकार दिला तरी तिला काही फरक पडत नाहीये हीच गोष्ट किती आनंदाची आहे.

खूपदा मुली लोभी आईवडील आणि (योग्य वेळेत व्हावेसे वाटणारे)लग्न ह्याच्या कात्रीत सापडतात.

राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्न झालेच पाहिजे असा जो अट्टाहास आहे तोच मुळात फोल आहे. लग्नाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे का? आणि व्यर्थ आहे असे ज्याला वाटत असेल तो/ती त्याच्या/तिच्या प्राधान्याप्रमाणे तडजोड करेल.
मुळात गृहीतक ( सर्व अटी मान्य होऊन लग्न झालेच पाहिजे) चुकीचे असल्याने चर्चेचा पायाच ठिसूळ आहे.

लग्न झालेच पाहिजे का नाही वगैरे विषय वेगळा आहे. आणि अजुनही लग्न न करता राहिलेल्या लोकांना समाज वेगळ्या नजरेनं बघतो. कशासाठी तरी आयुष्य झोकून दिलेल्या लोकांचं (लता मंगेशकर, वाजपेयी) ठिक आहे पण बहुतेक सामान्य लोकांचं "सोशल वेलबिईंग" लग्नावर अवलंबून असतं . उमेदीच्या काळात लग्न करणार नाही म्हणून अडून बसलेल्यांचे चाळीशी नंतर डोळे उघडलेले पण बघितले आहेत.

आनंदी गोपाळ's picture

5 Feb 2012 - 9:08 pm | आनंदी गोपाळ

हे दोन शब्द 'म्युचुअली एक्स्क्लुसिव्ह' आहेत असे वाटत नाही तुम्हाला? कमीतकमी ज्या शैक्षणिक दर्जाच्या मुला/मुलीच्या विवाहा संबंधी चर्चा इथे सुरू आहे त्याबद्दल तरी?

नगरीनिरंजन's picture

6 Feb 2012 - 12:35 pm | नगरीनिरंजन

खूपदा मुली लोभी आईवडील आणि (योग्य वेळेत व्हावेसे वाटणारे)लग्न ह्याच्या कात्रीत सापडतात.

तो सर्वस्वी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि प्रत्येक व्यक्ती तिच्या गरजेप्रमाणे आणि भिडस्तपणाच्या प्रमाणानुसार त्याचे उत्तर शोधेल.

लग्न झालेच पाहिजे का नाही वगैरे विषय वेगळा आहे. आणि अजुनही लग्न न करता राहिलेल्या लोकांना समाज वेगळ्या नजरेनं बघतो. कशासाठी तरी आयुष्य झोकून दिलेल्या लोकांचं (लता मंगेशकर, वाजपेयी) ठिक आहे पण बहुतेक सामान्य लोकांचं "सोशल वेलबिईंग" लग्नावर अवलंबून असतं . उमेदीच्या काळात लग्न करणार नाही म्हणून अडून बसलेल्यांचे चाळीशी नंतर डोळे उघडलेले पण बघितले आहेत.

लग्न झालेच पाहिजे का एवढाच प्रश्न नसून सगळ्या अटी पूर्ण होऊन लग्न झालेच पाहिजे का असा प्रश्न आहे. जसजशी इतर अटींची तीव्रता कमी होत जाते आणि लग्नाची गरज वाढू लागते तसतशी लग्न होण्याची शक्यता वाढत जाते.
त्यात सरसकट धोरण ठरवण्याचे कारण नाही असे मला वाटते.

टवाळ कार्टा's picture

4 Feb 2012 - 8:50 pm | टवाळ कार्टा

"कामाच्या" औषधाच्या ;)

कवितानागेश's picture

5 Feb 2012 - 4:59 pm | कवितानागेश

माझे तर परखड मत आहे की, मुलींनी, सुनांनी कुणालाही पैसे देउ नयेत. आपले पैसे आपणच कधीमधी उडवावेत/ एरवी स्वतःसाठीच नीट वापरावेत/ नियमित साठवावेत! :)
शिवाय भावाला, नवर्‍याला, वडलांना आणि सासर्‍यांना व दीराला गाड्याबिड्यांवर उडवण्यासाठी बिल्कुल देउ नयेत, एकवेळ आईला, बहिणीला, सासूला आणि नणदेला त्यांच्या खर्चासाठी थोडेफार दिले तरी चालतील.
शेवटी एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीच्या मदतीला येणार असते हे नेहमी लक्षात ठेवावे! ;)

प्रतिसाद मस्तच!;)
मी तर आणखीही एक गोष्ट करते.
आई, सा. बा. , नणंद यांच्यामध्ये मीच वयानं लहान असल्याने त्यांच्याबरोबरच खरेदीला जाते.
मला कुठ्ठे म्हणून पैसे खर्च करू देत नाहीत.
बाजारात काय हवं ते घे म्हणतात. कधीकधी तर मला दोन किंवा तीन प्रकारचे कपडे फार्फार आवडतात.
मोह सोडवत नाही, किंमत बघवत नाही; मग त्या "अगं घे ना!" असं म्हणतात.
खरच या बायकाच माझ्यासारख्या मुलीच्या मदतीला येतात.;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Feb 2012 - 6:02 pm | निनाद मुक्काम प...

हा लेख वाचून ''बटाट्याच्या चाळीने पूर्वी मुलींची लग्ने कशी होणार ह्या विवंचनेत असणारया बापांची पिढी पहिली होती. व आता त्यांची लग्ने झाली तर आपले काय अश्या चिंतेत असणारे बाप पहिले''. ह्या विधानाची आठवण झाली.

माझ्या पाहण्यात अनेक मुली माहेरी सढळ हाताने अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करतात. ह्यात नोकरी करणाऱ्या व न करणाऱ्या दोन्ही आल्या.
पण मुलगा व मुलगी असलेल्या घरात मुलाने उच्च शिक्षण घेणे बहुदा अभियांत्रिकी आणी परदेशी शिकायला जाणे हे प्रमाण मुलींपेक्षा पेक्षा जास्त असते.

मुली परदेशी बहुदा लग्ने होऊन जातात.( ह्यात कितीतरी वेळा भाऊ आणी बहिणी मध्ये सर्वच बाबतीत बहिण ही भावापेक्षा हुशार असली तरी )
मालमत्तेत समान वाटणी कायद्याने मान्य असली तरी प्रत्यक्षात ते घडतांना दिसत नाही. मुलींनी उदार मनाने तडजोड करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
म्हणूनच मुलीने लग्नानंतर आपला पैसा आपली मुले व स्वतःसाठी व जोडीदारासाठी राखून ठेवावा.
बहुतेक पालकांनी अपत्ये जन्माला घालण्या अगोदर त्यांचे पालन पोषण, शिक्षण आपल्या पगारात होणार आहे का ? ह्याचा सारासार विचार करून ती जन्माला घातली तर ही समस्या निर्माण होणार नाही.
तेव्हा
'' अंथरूण पसरून पाय पसरावे''
''जराशी सावधानी ,जिंदगी भर आसानी''

आनंदी गोपाळ's picture

5 Feb 2012 - 9:35 pm | आनंदी गोपाळ

मधे मधे फुटकळ प्रतिसादही लिहिले.
कोंडके दादांनी चांगला विषय चर्चेसाठी घेतलेला आहे.
वरिल प्रस्तावातून वेगवेगळे सूर उमटत आहेत.

१. मी कमविलेल्या पैशाचे मी काय करेन हे कोण ठरविणार.
२. जोडीदार शोधून 'संसार' थाटणे हे उद्दिष्ट आहे, की हा खरेदी विक्री व्यवहार आहे?
३. उपवर्/उपवधूंनी एकमेकांस काय प्रश्न विचारले पाहिजेत?
4. How to decide priorities.

मला वाटते, ४था प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. अन या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरात एक 'इगो' गुंफिला गेलेला आहे.
पहिला प्रश्णः मी कमावते. मी 'माझ्या घरी' देणार. 'तू' विचारायचं नाहीस.
हा म्हणतो, तू 'माझी' बायको. (होणार) मग हे चालणार नाही..

मग 'सौदा' फिसकटतो..!?

प्रायॉरिटी कशाला?
तिने पैसे कमवून आणण्याला? तुझ्यावर प्रेम करण्याला? तुझ्या मातापित्यांची काळजी घेण्याला? तुझी पिल्लं जन्माला घालून मोठी करण्याला? की तिच्या आईबापांना पैसे देण्याला?
इथे येतो मुद्दा २.
संसार सुरू करता आहात की सौदा? Starting a family. असा एक सुंदर शब्दसमूह इंग्रजीत आहे. तुम्ही एका कुटुंबाची सुरुवात करीत आहात. सुरुवातीला, आधी तुमच्या अन तिच्या कुटुंबाची 'काँटेक्स्ट' असणारच आहे. (हे पाश्चात्य जग नाही. तिकडे मुले/मुली १६-१८ ची झाली की घरटे सोडून उडून जातात म्हणे?)

हळू हळू, तुमचे घर, अन तिचे घर पक्षी सासर्/माहेर मोडून एक नवे 'तुमचे' घरटे तयार होते. त्याचे घर होते. कुटुंब होते. मग तुमच्यावर तुमच्या पिलांची जबाबदारी येते. तुम्हाला समजते मुलगा/मुलगी असल्यावर तुमच्या जिवाचे काय होते ते. तोवर तुमचे आई/बाबा तुम्हाला 'समजायला' लागलेले असतात.या स्टेजला पोहोचल्यावर मग 'तुझ्या' बाबांना हार्ट अ‍ॅटॅक आला अन 'मी' बिल भरलं हे उरतच नाही. ते तोपर्यंत आपल्या पोरांचे आजोबा झालेले असतात. अन आपलेही मित्र, गाईड. बायकोचे वडील असोत की नवर्‍याचे.

हा ३डी अन दूरचा विचार केला, तर तिसर्‍या प्रश्नाचं उत्तर समजू लागतं, की एकमेकांना काय विचारलं पाहिजे.

एकमेकांना प्रचंड सेल्फिश होऊन विचारा. फक्त तू अन मी बद्दल. तुम्ही दोघे काँपॅटिबल आहात की नाही त्याबद्दल. बाकी आइ/बाप, भाऊ/बहीण, पैसा क्षुल्लक आहेत. तुम्ही दोघे एकमेकांशी जुळलात तर सोनं. नाही तर सोन्याचा मुलामा दिलेलं मातीचं खेळणं. असा तो संसार आहे.

शेवटी प्रश्ण प्रायॉरिटीजचा आहे?

म्हातारपणी कंबर दुखत असली, की तीच 'तुमची बायको' गरम पाण्याची पिशवी आणून देते, अन कपाळावर हात ठेऊन चौकशी करते, की तिकडे तोंड करून झोपी जाते? हे महत्वाचे. तिने आयुष्यभर पगाराचे महिना १ लाख रुपडके तुम्हाला दिले असलेत तरी ते काय कामाचे?

-कंबरेखाली एक गरम पाण्याची पिशवी घेऊन आनंदी झालेला- गोपाळ

कवितानागेश's picture

5 Feb 2012 - 11:13 pm | कवितानागेश

अहो, पण म्हातारपणी दोघांनाही गरम पाण्याची पिशवी मिळेल की नाही हे त्यांच्या लग्नाआधीच कसे काय कळायचे?
एकमेकांच्या घरी राहून, ४ दिवस 'म्हातारा-म्हातारी' खेळून बघायची पद्धत सुरु करावी लागणार लवकरच! :P

आनंदी गोपाळ's picture

5 Feb 2012 - 11:34 pm | आनंदी गोपाळ

म्हातारपण खेळून पहाता येत नाही.

शिल्पा ब's picture

6 Feb 2012 - 10:49 am | शिल्पा ब

लग्नाचा बाजार मांडला की हे व्हायचंच!!! कशाच्या बदल्यात काय मिळतंय हे लोकं पाहणारचं नै का?
बाकी आनंदी गोपाळ यांच्याशी सहमती आहे.

अहो, पण म्हातारपणी दोघांनाही गरम पाण्याची पिशवी मिळेल की नाही हे त्यांच्या लग्नाआधीच कसे काय कळायचे?

या साठी म्हातारं व्हायची गरज नाही, ज्यांना हे चेक करायचं आहे, त्यांनी हात पाय तोडुन घेउन पहावे (आपापले), लक्षात येईल लगेच.

कवितानागेश's picture

6 Feb 2012 - 11:30 am | कवितानागेश

खरं तर त्याची पण गरज नाही, नुस्तीच परिक्षा घ्यावी एकमेकांची.....
पाणी पुरेसे तापवता येते का? आणि तापलेले पाणी शेकण्याच्या पिशवीत ओतता येते का?
....या अशा परिक्षा उत्तीर्ण झाल्यास 'इन्वेस्टमेंट' करायला हरकत नाही! ;)

नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत?

अशी तडजोड होऊ शकत नाही. न करणे चांगले.. दीड वर्षनेही माहेरच्या लोकांचा पगाराच्गा हट्ट चालूच रहाणाण्याची शक्यता असते आणि दीड वर्षाने संसार मोडण्याचीच शक्यता जास्त असते...

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Feb 2012 - 12:57 pm | पुण्याचे वटवाघूळ

मी आणखी एक रन काढतो. अजून कोणीतरी दोन रन्स काढा म्हणजे सेंच्युरी होईल.

पियुशा's picture

6 Feb 2012 - 1:05 pm | पियुशा

हम्म..........
सर्व प्रतिसाद,मते वाचली छान आहेत
माझ एक प्रामाणीक मत नम्रपणे सान्गु इच्छीते
सुनेने पगार / अर्धा पगार गरज असेल तर " माहेरी द्यावा "
हे बोलायला जितक सोप्प आहे तितक आचारणात आणायला कठीण आहे , या अनुषगाने नेहमीच प्रश्न उपस्थित राहणार
सुन पगार /अर्धा पगार माहेरी देतेय हे सासरच्या लोकाना ( अपवाद वगळ्ता) कितीही नाही म्हण्ले तरी कठीण जाणार हे निश्चित !
अन १००% सत्य आहे :)

हे असेच असते हो...

(वरील बरेच रिप्लाय वाचलेत आणि काही नाही वाचले)

पण सुनेने अर्धा पगार माहेरी द्यावा हे मान्य (पण काही रिप्लाय मधुन पुरुष आणि पुरुषी अहंकार असे शब्दशः नसले तरी उच्चार/अर्थ जाणवले त्याबद्दल २ ओळी लिहितो )

सुनेने अर्धा पगार घरी द्यावा .. मान्य.. पण याला विरोध कसा होतो ते पहा ..

१. सुनेने अर्धा पगार घरी दिला, तरी तीची सासु जी की आई असते, आपल्या मुलीला (लग्न झालेल्या) सआंगते.. काही इकडे पैसे देण्याची गरज नाही .. ही भवानी मग सगळाच पगार तिकडे देईन ..

२. जी मुलगी सासरी जावुन पैसे देत असेन अशी आई पण आपली सुन जर असेच घरी पैसे देत असली तरी तिला नको देवु त्यांचे काय अडले असे बोलेन ..

अशी बरीच वेगवेगळी चित्रे समाजात दिसतात ..
त्यामुळे फक्त आणि फक्त पुरुषप्रधान संस्कृती ही एकच गोष्ट याला कारणीभुत नाही असे ध्यानात ठेवावे ..

तसेच अनेक गोष्टी ..
स्त्री ला मुल होत नसेन तर तिला पुरुषां पेक्षा जास्त टोचने/विटंबन केले जाते ते इतर स्त्री कडुनच..
स्त्री चे लग्न होत नसेन तर तिच्या बद्दल भलते सलते बोलले जाते ते इतर स्त्री वर्गाकडुनच ,..

तेंव्हा स्त्रीस जर खरेच उत्कर्ष हवा आहे तर त्यांनीच स्त्री बद्दल आदर बाळगावा ...

आई रुपी जी पहिली स्त्री मुलांच्या(मुलगी आणि मुलगा)आयुष्यात असते त्यामुळे स्त्री बद्दल आदर कसा निभवावा हे पुरुषाला ही ठावुक असते आणि स्त्री ला पण..
पण हेवे दावे आणि अहम या कारणा मुळे उलट बिचार्‍या पुरषांना हकनाक बळी जातो

वपाडाव's picture

6 Feb 2012 - 5:01 pm | वपाडाव

१. सुनेने अर्धा पगार घरी दिला, तरी तीची सासु जी की आई असते, आपल्या मुलीला (लग्न झालेल्या) सआंगते.. काही इकडे पैसे देण्याची गरज नाही .. ही भवानी मग सगळाच पगार तिकडे देईन ..
२. जी मुलगी सासरी जावुन पैसे देत असेन अशी आई पण आपली सुन जर असेच घरी पैसे देत असली तरी तिला नको देवु त्यांचे काय अडले असे बोलेन ..

बालबुद्धीला हे झेपलं नाही... इस्कटुन सांगितलंस तर कदाचित पुन्हा एखादा प्रयत्न करतो..

गणेशा's picture

6 Feb 2012 - 7:13 pm | गणेशा

घर A :
'अ' ही सुन असते आणि , 'ब' ही लग्न करुन गेलेली मुलगी असते. "सा" ही सासु असते.

१. अ जेंव्हा तिच्या माहेरी ' घर B' पैसे देते. त्याच वेळी 'ब' ही सुद्दा तिच्या माहेरी ' घर A' पैसे द्यायला लागली.
की 'सा' जी की 'ब' ची आई असते, ती म्हणते पोरी तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव, नाहितर ही 'अ' आहे ना, ती भवानी तिचय घरी सगळे पैसे देत जाईन.

घर C
'अ' ही सुन असते आणि , 'ब' ही लग्न करुन गेलेली मुलगी असते. "सा" ही सासु असते.

२. 'ब' ही मुलगी लग्न करुन गेली तरी कर्तव्य म्हणुन घरी (घर C) पैसे देत असेन तर सासु ती घेत असते, आणि सेम थिंग जेंव्हा तीची सुन ' अ' तिच्या माहेरी ( घर D) पैसे देत असेन तर . तु तिकडे पैसे देवु नकोस असे सांगत असते..

वपाडाव's picture

6 Feb 2012 - 8:32 pm | वपाडाव

मालक, एकदा सुनेच्या रुपात घुसल्यास फक्त नणंद जरी लिहिले असते तरीही ते कळालेच असते...
A-B-C वापर्ण्याची गरज पडली नसती. असो, A-B-C वापरुन इस्कटुन सांगितल्याने कळाल्या गेले आहे.

स्वगत : चला आता केबीसी (KBC-KBC) खेळु...

इरसाल's picture

7 Feb 2012 - 11:47 am | इरसाल

नवरा गरीब, बायको माहेरकडून श्रीमंत, दोघे नोकरीला आता नवऱ्याचे माहेर गरीब म्हणून नवऱ्याचा अर्धा किंवा पूर्ण पगार त्याच्या आईवडलांना द्यावा काय ?
कि हे गृहीत धरून चालले आहेत लग्न म्हणजे एनीहाऊ नवऱ्याची जिम्मेदारी.

नगरीनिरंजन's picture

7 Feb 2012 - 11:54 am | नगरीनिरंजन

मुलाचे आईवडील मुलाकडे राहतात किंवा हवे तेव्हा येऊ जाऊ शकतात आणि मुलगाही त्यांना हवी तेवढी, हवी तशी मदत करू शकतो हे गृहीत धरलेले आहे नेहमीप्रमाणे, प्रत्यक्षात स्थिती काहीही असली तरी. :)
(युयुत्सुंची तीव्र आठवण होते आहे. ;-))

वपाडाव's picture

7 Feb 2012 - 2:42 pm | वपाडाव

युयुत्सुंची तीव्र आठवण होते आहे

कॉलिंग युयुत्सु....

मयुरपिंपळे's picture

8 Feb 2012 - 2:03 pm | मयुरपिंपळे

- फिर ना कहना मेरे दोस्त माइकल दारू पीके दंगा करता है Smiley

dadadarekar's picture

10 Oct 2015 - 8:49 pm | dadadarekar

. लिहिण्यासारखे भरपूर अहे