सीएमईचे शेफारलेले सैनिक

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
1 Feb 2012 - 6:43 am
गाभा: 

ही बातमी पहा
http://www.esakal.com/eSakal/20120201/5672551390416047564.htm

पुण्यात लकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी आहे. ती तोडली म्हणून पोलिसांनी सैन्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना पकडले आणि दंड मागितला म्हणून त्यांनी पोलिसांना चोपून काढले. एवढेच नाही तर नंतर आपल्या सहकार्‍यांना बोलवून लकडीपुलाजवळ धुडगूस घातला. लोकांना मारले, पत्रकारांना मारले, कॅमेरे फोडले, शिवीगाळ, धमक्या वगैरे होतेच.
सर्वसाधारण माणूस सैन्याविषयी बोलताना देशभक्ती, त्याग, बलिदान वगैरे रोमँटिक गोष्टी बोलतो पण कित्येकदा सैन्यातील लोक उन्मत्तपणे वागताना दिसतात. आपण सामान्य नागरिकाच्या वरचे आहोत. आपल्याला सामान्यांसारखे नियम लागू होत नाहीत असे काही त्यांना वाटत असते.
सैन्य कितीही देशप्रेमाने ओथंबलेले असले तरी सामान्य नागरिकांच्या करातूनच सैनिकांचा सगळा खर्च होत असतो. त्यांच्या कुठल्याही सैनिकी कामाने (युद्ध, प्रशिक्षण, सराव, पहारे, टेहळणी इ.) देशाच्या गंगाजळीत भर पडत नाही. ह्या गोष्टीचा त्यांना विसर पडत असावा.
असला माज तर सोडाच उलट सैनिकांवर जास्त संयमित वागण्याची जबाबदारी असते असे मला वाटते.

ह्या उन्मत्त लोकांना काहीतरी शिक्षा होईल अशी आशा आहे.

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 10:29 am | मी-सौरभ

सैनिक आहात या गुर्मीत राहणं खरचं अयोग्य आहे.
असे प्रकार आधी पण झालेत त्यातल्या दोषींवर फार मोठी कारवाई झाल्याचे मी तरी ऐकलेले नाही.

सर्वसाधारण माणूस सैन्याविषयी बोलताना देशभक्ती, त्याग, बलिदान वगैरे रोमँटिक गोष्टी बोलतो
जरा सम्जावौन सान्गा नक्की काय म्हणायच आहे ते ? ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Feb 2012 - 10:53 am | विश्वनाथ मेहेंदळे

पियुशा बै, प्रत्येक गोष्ट कळायचे एक वय असते, त्या त्या वयात त्या त्या गोष्टी कळतात. नाहीतर समजावून सांगून पण कळत नाहीत. काही वर्षांनी हा धागा वाचा, कळेल तुम्हाला त्यांना काय म्हणायचे आहे ते ;-)

हघ्याहेवेसांनलगे

पियुशा's picture

1 Feb 2012 - 12:31 pm | पियुशा

@ विश्वनाथ मेहेंदळे बाबा ;) / काका / आजोबा ;)
धन्स हो तुम्ही सान्गितल नसत तर समजलच नसत मला ;)
पण हा धागा १८ + आहे का ?

शरभ's picture

1 Feb 2012 - 1:11 pm | शरभ

Romance म्हणजे फक्त तोच अर्थ आहे असं नाही.. आम्हाला ५ वी की ६ वी मध्ये एक धडा होता इंग्रजी विषयात - 'Romance of a mail runner', त्यात काही पोस्ट्मनची प्रेमकथा नव्हती (दुर्देवाने).. पण त्या नोकरीमधील थ्रिल वर्णन केले होते.

हुप्प्या's picture

2 Feb 2012 - 3:24 am | हुप्प्या

बाईसाहेब,
बहुधा व्हॅलेंटाईन डे जवळ आल्यामुळे रोमँटिक ह्या शब्दाचा "तो" विशिष्ट अर्थच आपल्या मनात अधोरेखित होऊ लागला असेल.
पण एखादा नामांकित इंग्रजी शब्दकोष चाळलात तर ह्या शब्दाचा चा एक अर्थ असा आढळेल.
marked by the imaginative or emotional appeal of what is heroic, adventurous, remote, mysterious, or idealized

अर्थातच माझ्या वाक्यातील ह्या शब्दाचा उपयोग हा वरील अर्थाने होता.

शिल्पा ब's picture

1 Feb 2012 - 10:34 am | शिल्पा ब

पुणे अन नगर या भागात सैनीक विद्यार्थ्यांकडुन बरेच वेळा असे प्रकार झाले आहेत पण अशा विद्यार्थ्यांना शिक्षा झाली की नाही ते समजले नाही. कारण शिक्षा झाली असती तर सैनिकांकडुन पुन्हा तसे वर्तन घडले नसते असं मला वाटतं.

असं वागुन काय मिळवतात देव जाणे पण सैन्यातल्या सिनियर लोकांनी आपण नियमांच्या वर नाहीत हे त्यांना सांगितले पाहीजे. खरोखर वाईट वाटते अशा बातम्या वाचुन.

अशा सांड जवानांचा त्रास सगळीकडेच आहे. हे खरोखर लढायला कधी जातात देवजाणे. ‍वरिष्‍ठांच्या बायकांना शॉपिंगला आणून गाडी मध्‍येच लाऊन रस्ता ब्लॉक करणे, कुणी मागून हॉर्नपण वाजवला तरी मारठोकीवर उतरणे, वाहानांच्या टायरमध्‍ये गोळी मारणे, पोलिसांनाच झोडपून काढणे हे असले प्रकार औरंगाबादला पण झाले आहेत.
त्यांच्या माजावर देशभक्तीचं पांघरुण असल्याने ते शेफारतात.

असे नव्हे

तर अंगावरच्या वर्दिमुळे तो माज येतो असे मला वाटते. दुसरामुद्दा असा की त्यांच्यावर कारवाई करताना त्यांना लागु असलेल्या वेगळ्या कायद्यांमुळे पोलीसांवर बंधने येतात असे वाटते.

गवि's picture

1 Feb 2012 - 10:56 am | गवि

बाकी मी पूर्वी जिथे काम करत होतो त्या ठिकाणी अनेक एक्स्-डिफेन्सचे उच्चपदस्थ होते आणि इतर सर्वांना आपले कॉर्पोरल / सार्जंट समजून खेकसत अन वाक्यावाक्यातून खाकी दर्प दरवळवत सर्वत्र वागण्याचा प्रकार कमीजास्त प्रमाणात त्या सर्वांच्यातच होता.

बाळ सप्रे's picture

1 Feb 2012 - 11:24 am | बाळ सप्रे

विंग कमांडर ओकांना काय वाटत याविषयी ?
म्हणजे खाकी दर्पाविषयी ...

प्रत्यक्ष लष्करी सेटअपमधे ती वागणूक कदाचित तत्कालयोग्य असेल. पण सामान्य सिव्हिल नोकरीत आल्यावरही तोच खाक्या चालवत राहून आपण लोकांच्या मनात तिरस्कार उत्पन्न करतोय याची जाणीव होण्यापलीकडे मानसिक आयसोलेशन होत असावं या लष्करी सेवेत..

कपिलमुनी's picture

1 Feb 2012 - 11:13 am | कपिलमुनी

सी आर पी एफ चे जवान सुरुवातीला असे प्रकार करत .. ट्रक भरून यायचे आणि भांडणे करायचे..तक्रार केली तर त्यांचे सीनियर 'ब्लडी सिव्हिलीयन' म्हणून हाकलायचे...मग गाववाल्यांनी 'सापडला जवान कि चोप' द्यायला सुरुवात केली ..
मग ते ताळ्यावर आले .
आता सर्व शांत आहे :)

शिल्पा ब's picture

1 Feb 2012 - 11:45 am | शिल्पा ब

:)

चिरोटा's picture

1 Feb 2012 - 11:52 am | चिरोटा

त्यांना लागु असलेल्या वेगळ्या कायद्यांमुळे पोलीसांवर बंधने येतात असे वाटते.

शंका आहे. पाकीटमार्,भुरट्या चोरांचे कपडे काढून, हात पाय बांधून मरेस्तोवर झोडपण्यात पोलिसांना अभिमान वाटतो. आर्मीच्या जवानांवरही असे केले तर काय बिघडणार आहे? आर्मी चिफ लगेच धावत येईल? मला नाही वाटत. वर कपिल्मुनींच्या गावात लोकांनी जसे सैनिकांना बदडले तसेच ईतर ठिकाणी झाले तर सैनिक फक्त योग्य ठिकाणी लढतील.
आर्मी असो वा वायु सेना, एक प्रकारचा माज्,गुर्मी ह्या लोकांच्या तोंडावर दिसते्.

>>. वर कपिल्मुनींच्या गावात लोकांनी जसे सैनिकांना बदडले तसेच ईतर ठिकाणी झाले तर सैनिक फक्त योग्य ठिकाणी लढतील.<<

+१११११...... बडवा साल्यांना...... लै माजलेत...... एक तर नियम मोडतात वर गाडीभरून पोरं घेऊन येतात आणि मारामारी करतात..... गुंडाराज हाय काय......??

>>. वर कपिल्मुनींच्या गावात लोकांनी जसे सैनिकांना बदडले तसेच ईतर ठिकाणी झाले तर सैनिक फक्त योग्य ठिकाणी लढतील.<<

+१११११...... बडवा साल्यांना...... लै माजलेत...... एक तर नियम मोडतात वर गाडीभरून पोरं घेऊन येतात आणि मारामारी अन शिवीगाळ करतात..... गुंडाराज हाय काय......??

त्यात असे म्हणले आहे की

त्यानंतर लष्कराच्या विद्यार्थ्यांनी दूरध्वनी करून इतर मित्रांना तातडीने बोलविले. काही मिनिटांमध्ये तेथे सुमारे चाळीस विद्यार्थी जमा झाले. या सर्वांनी संभाजी पोलिस चौकीवर थेट हल्ला चढवून तेथील पोलिसांना मारहाण करण्यास सुरवात केली. जीव वाचविण्यासाठी त्यांना पोलिस चौकीच्या मागील दाराने अक्षरशः पळ काढून केळकर रस्त्यावर यावे लागले. त्यानंतरही विद्यार्थ्यांनी त्यांना पाठलाग करून मारले. काही पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी स्थानिकांची मदत घेतली. यात महिला पोलिसांचाही समावेश होता,

त्या जवानलोकांपुढे हे आपले (ढेरपोटे) पोलीस हतबल झाले होते.

आता बोला.

सुहास..'s picture

1 Feb 2012 - 1:16 pm | सुहास..

बराच सा प्रकार पब्लिक पर्यंत पोचला च नाही (पत्रकारांना शिवीगाळ झाली म्हणुन बहुधा :) )

ही कॉलेज ऑफ मिलीटरी ईंजिनियरिंग ची स्टुडन्स्ट होती, सहसा त्यांना बाहेर (रविवार आणि ईतर सुटीच दिवस सोडुन) परवानगी नसते. मुळात च ती लकडी पुलाचा अभ्यास करण्याकरता आली होती. त्यांना कल्पना नव्हती की तो दुचाकी साठी आहे ( आणि बहुधा पोलीसांना हे माहीत नाही की हा आणि असले नियम सरंक्षण दलाच्या कुठल्याही वाहनाला लागु नसतो.) नुकत्याच माने प्रकरणावरून , पोलीसांनी अतिदक्षता दाखविण्याचा यत्न केला, स्टुडन्ट्स काही वेडे नाही, उगा वाद घालायला, सुरुवात पोलीसांनी केली असणारच , त्यात ती पोलीसी भाषा ....अर्थात चुक दोन्ही कडे आहे , त्याला उगा देशप्रेम, टॅक्सचे पैसै ईतर रंग देण्याचा प्रयत्न करताना मात्र मिपावर आजकाल काय चाललय याची शरम वाटली .

बाळ सप्रे's picture

1 Feb 2012 - 1:45 pm | बाळ सप्रे

लकडी पुलावर कशासाठी आली होती हा मुद्दा इथे गैरलागू आहे..
दुचाकीसाठी आहे / नाही यासाठी तिथे पाटी आहे.. त्यामुळे "माहित नाही " Is not an excuse

"बराच सा प्रकार पब्लिक पर्यंत पोचला च नाही (पत्रकारांना शिवीगाळ झाली म्हणुन बहुधा )"

असे असल्यास तो प्रकार (students ची बाजू) आधी सांगा आणि मग बघू कोण वेडे आणि कोण उगाच वाद घालत होत ते.

तुम्ही कुठल्याही मुद्द्याशिवाय students ना पाठीशी घालत आहात.

बाळ सप्रे's picture

1 Feb 2012 - 1:50 pm | बाळ सप्रे

आणि हो..

नियम लागू नसणे फक्त Emergency मध्ये लागू असते..
कुठलाही पोलिस / जवान घरुन कामावर जाताना Wrong side ने जाउ शकत नाही.

पाठ्लाग / मदतकार्य / अपघात ई. वेळी जाउ शकतो.

सप्रेसाहेब, मला वाटतं सुहासरावांनी तो प्रतिसाद उपरोधाने दिला आहे.

कसा पोचणार???? त्या जवानांनी कॅमेराची तोड फोड केली. मेमरी कार्ड काढून घेउन गेले.

मी रात्री ११.३० वाजता लकडीपुलावरून आलो त्यावेळीसुद्धा तक्रार नोंदायचे काम चालू होते. त्यापुढे कधीतरी वार्तांकन केले असेल. पण ना फोटो ना क्लिपींग. त्यामुळे ती बातमी मिळमीळीत झाली.

म.टा. मधील बातमी प्रमाणे पोलीसांनी गाडीची चावी काढुन घेतली. पोलीस रस्त्यावर सर्रास असे करताना दिसतात.
खरच पोलीसांना गाडी जप्त करण्याचा अधिकार असतो का?
बातमी इथे वाचा

चिरोटा's picture

1 Feb 2012 - 3:15 pm | चिरोटा

हा प्रश्न मला नेहमी पडतो. जिलबी,गुलाबजाब बघितल्यासारखे पोलिस चावीकडे धावतात आणी मग ती खिशात टाकतात. अधिकार नसेल तर ठकास महाठक भेटला असे म्हणावे लागेल.

नगरीनिरंजन's picture

1 Feb 2012 - 4:22 pm | नगरीनिरंजन

पोलिसांसकट प्रत्येक माणसाला लष्करी प्रशिक्षण दिले पाहिजे. म्हणजे फौजी आणि सिव्हिलिअन असा फरक राहणार नाही आणि सगळ्यांचाच फुकाचा माज उतरेल.

^^^^
म्हणजे लकडीपुलावर दुचाकी घेऊन भरदिवसा जाता येईल असं म्हणायचं आहे का ??

नगरीनिरंजन's picture

1 Feb 2012 - 4:31 pm | नगरीनिरंजन

नाही. थोडा आत्मसन्मान वाढेल आणि आपली बाजू खरी असेल तर केवळ कोणी मारायला लागलं म्हणून पळ काढायची वेळ येणार नाही.
सामान्य नागरिकांचीही "फुटा नाहीतर कापून काढू" अशी भाषा ऐकून कढी पातळ होणार नाही.

अरे पण तुमच्या मते पोलिसांना लष्करी प्रशिक्षण दिल असेल तरी त्याच पोलिसांनी पळ काढला काल..... एकदम चाळीस लोकं बघुन..........

रमताराम's picture

1 Feb 2012 - 5:50 pm | रमताराम

त्या पोलिस चौकीत फौजदार धरून वट्ट चार ते सहा पोलिस असतात. शिवाय वाहतूक विभागातील पोलिस (ज्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला असेल) त्यांना नागरिकांवर प्रत्यक्ष हाणामारीची कारवाई करता येत नाही. त्याबाबत त्यांना 'ब्लडी सिविलियन'चेच नियम लागू असतात. विजिलन्सवाले चार पाच पोलिस एकादे रिवॉल्वर, एखादी अश्मयुगीन सेवन नॉट सेवन नि काठ्या एवढ्या जोरावर हल्ला करणार्‍या चाळीस जणांना - मिलिटरीचे नसते तरी- काय डोंबल आवरणार. हिंदी चित्रपट फार पाहता वाटतं तुम्ही.

मनराव's picture

1 Feb 2012 - 6:01 pm | मनराव

>>एवढ्या जोरावर हल्ला करणार्‍या चाळीस जणांना - मिलिटरीचे नसते तरी- काय डोंबल आवरणार. हिंदी चित्रपट फार पाहता वाटतं तुम्ही.<<<

मिही तेच म्हणतोय रमताराम साहेब..........चाळीस जणांना चार पाच लोकं आवरु शकत नाहीत........ मिलिटरीचं प्रशिक्षण द्या नाहीतर आणखी कोणतही......

मुळात ट्रक भरून पोरं आलीच कशी....... सीमई मधून बाहेर पडताना त्यांच्या कडे काहीच चौकशी नाही झाली क ??

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2012 - 7:23 am | नगरीनिरंजन

चाळीस जणांना चार पाच लोकं आवरु शकत नाहीत

अहो मनराव, फक्त मारामारी करायला नाही प्रशिक्षण द्यायचे. सर्वांना लष्करी प्रशिक्षण असेल तर सैनिकांमध्ये 'ब्लडी सिव्हिलिअन्स' बद्दल जी तुच्छता दिसते ती दिसणार नाही आणि त्यांना पाठीशी घालणार्‍या त्यांच्या कमांडर्सनाही भेदभाव करता येणार नाही.
असो. जे होणार नाही त्यावर वाफ का दवडा?
किमान म. गांधींनी ज्या अहिंसा आणि आत्मबलाच्या जोरावर इंग्रजी सैनिकांचा आणि पोलिसांचा नि:शस्त्रपणे सामना केला ते आत्मबल गांधीवाद्यांनी (किंवा काँग्रेस नेत्यांनी) पोलिसांना देता येईल का याचा तरी विचार केला जावा.

मनराव's picture

2 Feb 2012 - 10:23 am | मनराव

>>आत्मबल गांधीवाद्यांनी (किंवा काँग्रेस नेत्यांनी) पोलिसांना देता येईल का याचा तरी विचार केला जावा.<<<

बोंबला.......म्हणजे सीमईच्या पोरांनी एका गालावर वाजवली कि दुसरा गाल पोलिसांनी पुढे करायचा.......

कसंय....पुलाच्या सुरूवातीला पोलिस नसतात...दुचाकी नो एन्ट्री चा बोर्ड दिसतो तेव्हा तुम्ही ऑलरेडी पुलावर आलेले असता आणि जिथे पुल संपतो तिथे मात्र पोलिस दबा धरून उभे असतात, पावती फाडण्यासाठी.

हेच पोलिस पुलाच्या सुरूवातीला उभे राहिले आणि दुचाकीवाल्यांना पुढे जाऊच दिले नाही तर? पण असे केले तर मग दंड कसा वसूल करणार? ( तोही बर्‍याच वेळेला खोट्या पावतीपुस्तकातील पावती फाडून!)

अशा वेळी किल्ली किंवा लायसेन्स डायरेक्ट काढून घेतले की सामान्य माणीस चरफडतो... या लोकांनी हात उगारला( जे चरफडणार्‍या प्रत्येकाला मनातून करावेसे वाटते!)

नियम पाळणे सक्तीचे करण्याएवजी असे नियम तोडण्यावर टपून बसलेले ट्रॅफिक पोलिस बघितले की मला नेहमी संत्तप येतो.. मिळू दे त्यांना पण थोडा मार....नेहमी नोटाच कशाला?

कपिलमुनी's picture

1 Feb 2012 - 5:46 pm | कपिलमुनी

पोलीस सुद्धा कमी माजोरडे नसतात ..
ठकास महाठक भेटला ..एवढेच !!

रमताराम's picture

1 Feb 2012 - 5:56 pm | रमताराम

हे म्हणजे मला खून करण्याआधी का अडवलं नाही असे एखाद्या खुन्याने विचारण्यासारखे आहे. लेका तुला दिसतोय ना नो-एन्ट्रीचा बोर्ड तो तोडून तू निलाजरेपणे येणार नि वर पुन्हा पोलिस इकडे का तिकडे का नाही असा त्रागाही करणार. म्हणजे पकडला तर चोर नाहीतर गुन्हा करूनही साव या मतावर विश्वास दिसतो तुमचा.

मग असल्याच बेगुमान लोकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी अल्याडल्या अंगाला पकडून दंड केला (जो त्यांचा वैधानिक हक्क नि कर्तव्य दोन्ही आहे) तर ते योग्यच आहे. ते पैशासाठी तसे करतात का हा मुद्दा आहेच, पण त्यामुळे जाणीवपूर्वक नो-एन्ट्रीत घुसणारा पावन होत नाही. अजाणता घडलेल्या गुन्ह्यापेक्षा जाणीवपूर्वक केलेला गुन्हा अधिक मोठा असतो, तो करणारा अधिक मोठा गुन्हेगार.

जयंत कुलकर्णी's picture

1 Feb 2012 - 6:17 pm | जयंत कुलकर्णी

एखाद्या कारखान्यात पुर्वी जॉब इन्स्पेक्टर असायचा. त्याचे काम एकच. जॉब बाद आहे, फेकून दे. हळुहळु कारखान्यातून Quality Assurance ची कल्पना आली मग जॉबला इन्स्पेक्शन लागणारच नाही अशा प्रकारे तो करायचा अशा पद्धती आल्या. जॉब कोणी मुद्दामहून बाद करत नाही. या प्रकरणात बाहेर गावचा एखादा माणूस त्या ठिकाणी आला तर त्याला ठळकपणे दुचाकी घेऊन यावरून जायचे की नाही हे कळते का हा प्रश्न आहे. मला वाटते कळत नाही. त्यासाठी जर रहदारीचा प्रश्न उद्भवत असेल तर पुलाच्या अगोदरच पोलिस उभा केला तर काही मोठे आकाश कोसळत नाही. ते तसे का करत नाहीत हे उघड गुपीत आहे. त्याखेरीज आपण जर दुचाकीवर जात असाल तर कितीतरी सायकलवाले त्याच पूलावरून जात असताना दिसतात त्यामुळेही फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत सावज पकडायचे अशीच पोलिसांची वागणुक सर्वत्र दिसते. पोलिसांना Quality Assurance चे काम आहे. Go-NoGo गेज वापरून बाद जॉब बाहेर फेकायचा हे काम नाही. रस्त्यावरची वाहतूक सुरळीत कशी राहील हे बघायचे त्यांचे काम आहे. कुठलाही पोलिस ते काम करताना दिसत नाही. भर पावसात रहदारीची वाट लागलेली असते पण तेव्हा हे गायब असतात. दर गुरवारी पुण्यात लाईट नसतात तेव्हा हे चौक रहदारीवर सोडून गायब असतात. दुर्दैवाने त्याना या उद्दिष्टांचा विसर पडला आहे.

अर्थात CME च्या अधिकार्‍यांचीही चूक आहे. त्यांना कायदा हातात घ्यायचा अधिकारही कोणी दिलेला नाही. त्यांना शिक्षा होईल हे निश्चित आणि अशी होईल की कुठलाही दबंग ती घेऊ शकणार नाही याची मला खात्री आहे.
पण मुख्य प्रश्न हा आहे की पोलिसांचा बॉबी केव्हा होणार ......

मोदक's picture

1 Feb 2012 - 6:56 pm | मोदक

>>>एकंदरीत सावज पकडायचे अशीच पोलिसांची वागणुक सर्वत्र दिसते.

सहमत.

नो पार्कींगमधली गाडी उचलणार्‍या पोलीसाचा व त्याने पाळलेल्या लोकांचा माज बरेचदा डोक्यात जातो.

ट्रॅफिक पोलीसाला (युनिफॉर्मसकट) दुचाकीवर भरदिवसा लकडी पूल क्रॉस करताना बघितले आहे त्यावेळी कुठे जातात यांचे कायदे..?

मोदक's picture

1 Feb 2012 - 7:09 pm | मोदक

तो नो-एन्ट्रीचा बोर्ड आजुबाजूच्या भाऊ / दादा / भाई / आण्णा / तात्या / आप्पा वगैरे वगैरे च्या बोर्डाच्या तुलनेत इतका छोटा आहे की एक तर तो दिसत नाही आणि दिसला तरी गाडी थांबवून तो बघणे शक्य नाही - अर्थात हे नियम तोडण्याचे स्पष्टीकरण नाही. :-)

ट्रॅफिक पोलिसांची भूमिका ही Reactive आहे जी Proactive असायला हवी.

शुचि's picture

2 Feb 2012 - 12:15 am | शुचि

प्रोअ‍ॅक्टीव्ह का? त्यांनी काय शाळा थोडीच उघडली आहे वाहतूक नियम शिकवण्याची? हे नियम तुम्हाला माहीत आहेत म्हणून तुम्हाला लायसन्स मिळाले ना? आता तुम्ही तो नियम तोडाल तर सिक्षा करणे हे त्यांचे कर्तव्य.

मोदक's picture

2 Feb 2012 - 10:39 am | मोदक

>>>हे नियम तुम्हाला माहीत आहेत म्हणून तुम्हाला लायसन्स मिळाले ना?

संपूर्ण भारतात कुठे नो एंट्री आहे / कोणता पूल दुचाकीसाठी आहे याचा अभ्यास करून घेत नाहीत लायसन्स च्या परिक्षेत.

>>>आता तुम्ही तो नियम तोडाल तर सिक्षा करणे हे त्यांचे कर्तव्य.

नियम तुटावा अशी परीस्थिती निर्माण करण्यावर रोख आहे. नियम कोणी तोडला तर दंड होणे मान्य आहे. पण अरेरावी / फालतू माज आणि उद्धटपणा यामुळे या जमातीविषयी कधी आपुलकी / कणव वाटत नाही*. (जरी ते १२ / १५ तास काम करत असले, धूर व प्रदुषण अव्याहतपणे सहन करत असले, आणि नोकरीतल्या सोयी आपल्यापेक्षा कमी असल्यातरी)

अवांतर - "जनरल पब्लीक" ला कसेही वागविणारे हेच "कर्तव्यनिष्ठ" एखाद्या नगरसेवकाचा फोन आला की पार भिजलेले मांजर होतात. ;-)

* आपुलकी / कणव नाही याचा असा अर्थ नाही की CME वाल्यांनी जो चोप दिला / धोपटले त्याला पाठिंबा आहे. :-)

दादा कोंडके's picture

1 Feb 2012 - 7:16 pm | दादा कोंडके

मी एकदा स्वतः नो एंट्रीत (सोलापूरात, भागवत थेटर समोर) घुसल्यावर रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला उभा असलेल्या उभे असलेल्या पोलिसाकडून पकडला गेलो होतो. त्याला मी हाच प्रश्न विचारला होता. त्यानं अगदी पटण्यासारखं उत्तर दिलं होतं. तो म्हणाला, मी तुम्हाला तीथंच उभं राहून सांगितलं असतं तर तुम्हाला त्याची किंमत राहिली नसती. पण आता पैसे गेल्यामूळे तुमच्या चांगलं लक्षात राहील की हा वन-वे आहे म्हणून! :)

बहुगुणी's picture

2 Feb 2012 - 4:25 am | बहुगुणी

लई भारी :-)

तुषार काळभोर's picture

2 Feb 2012 - 8:41 am | तुषार काळभोर

एकदा संभाजी पुलावर १०० रु घालावल्यावर पुन्हा कधी ती चूक घडली नाही... किंमत असायला पाहिजे/कळायला पाहिजे. अगदी पुलाच्या सुरवातीला पोलिस नसले नसले तरी चालेल, फक्त कमीत कमी ठळक फलक तरी लावावा.

जसा राजा तशि त्यांचि सेना
सध्या राज्यकर्त जसे वागतात तशिच हि सैनिक मुल वाईट वागली आहेत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Feb 2012 - 7:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लोकशाहीत उलटे असते भाऊ. यथा प्रजा तथा राजा. प्रजा भिकार** म्हणून राजा भिकार**. प्रजेतच सगळे माजोरडे, राजा सज्जन कुठून मिळेल.

कुठल्याही बाबतीत सगळे सरकारवर ढकलले की आपण मस्त नामानिराळे राहतो नाही. चांगले तत्वज्ञान आहे.

या प्रतिसादांतुन एवढंच समजतंय की कुठेतरी "तो" बोर्ड आहे अन तो दिसत नाही त्याऐवजी पोलिस उभा करा.
त्यापेक्षा बोर्डच मोठा दिसेल असा करुन लावायचा. अर्थात जनता फार सज्जन अन कायदेपालन करणारी आहे असंही नाही पण पुण्यात इतके बोर्ड असतात तर एक अजुन मोठा. कमीत कमी लोकांना माहीती तर होइल की हा वन वे आहे.

मुंबई उपनगरात तर सगळ्याच गाड्या - दुचाक्या, सायकली, चारचाकी राँग वे मधुन जाताना मी खुप वेळा पाहीलय त्यामुळे बेस्ट सोडली तर इतर कशात बसायची हिंमत व्हायची नाही...ती सुद्धा ड्रायव्हर सिग्नल वगैरे पाळायच्या भानगडीत न पडता चालवतात.

सगळाच आनंद आहे. परत "अशाने भारत महासत्ता कसा होणार?" असं म्हंटल की वेगळीच दंगल सुरु. :(

चिंतामणी's picture

2 Feb 2012 - 9:31 am | चिंतामणी

>>>मुंबई उपनगरात तर सगळ्याच गाड्या - दुचाक्या, सायकली, चारचाकी राँग वे मधुन जाताना मी खुप वेळा पाहीलय

मुंबैकरसुद्धा मागे राहीले नाहीत ये पाहुन छान वाटले. ;) ;-) :wink:

पुणे विरोधक याची नोंद नक्की घेतीलच. :p :-p :tongue:

>>>>>अर्थात जनता फार सज्जन अन कायदेपालन करणारी आहे असंही नाही

हे मान्य. (सज्जन शब्द सोडून :-))

"मी खिशात ५० / १०० रुपये ठेवून कोणताही गुन्हा सेटल करू शकतो" हा Confidence येणे या सगळ्यातला कळीचा मुद्दा आहे आणि ट्रॅफिक पोलिसांचे अपयश आहे असे वाटते.

पोलीसांनी कायदेपालन व्यवस्थितपणे केले तर जनाताही ते स्वीकारते हे बर्‍याचदा सिद्ध झाले आहे. (त्रिची पोलीस, किरण बेदींचे गोव्यातले काम, नाशिकचे पाटील साहेब वगैरे वगैरे.)

पोलीसांच्या चांगल्या कामाला जनता कायम appreciate करते असे वाटते.

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2012 - 5:20 am | पिवळा डांबिस

आम्हाला या इथवरच्या चर्चेतून इतकंच समजलं की,
"लकडीके पुलविच, नो एन्ट्री!!!!!!"
:)

नितिन थत्ते's picture

2 Feb 2012 - 9:35 am | नितिन थत्ते

राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे सैनिकांना असे वागावे लागत असेल.

शिल्पा ब's picture

2 Feb 2012 - 9:56 am | शिल्पा ब

तुमच्याकडुन हा प्रतिसाद आल्याचे पाहुन डोळे भरुन आले आहेत.

चिंतामणी's picture

2 Feb 2012 - 2:14 pm | चिंतामणी

:bigsmile:

चिरोटा's picture

2 Feb 2012 - 12:27 pm | चिरोटा

आज लेटेश्ट काय आहे? आर्.आर. आबा मैदानात उतरले का? पोलिस आयुक्ताने 'घटनास्थळाची(म्हणजेच पोलिस स्टेशनची!!) पाहणी केली का? सी,एम. ई. वाल्यांना शि़क्षा काय होणार? १००० दंड आणि २००० बैठका?

अन्नू's picture

2 Feb 2012 - 1:44 pm | अन्नू

है तुझ में पुरी बोतल का नशाsss....बोsतल का नशा,
कर दे बुढापें को कर दें जवाsssन, रे कर दें जवान,
होठों पे गाली तेरी आखें दुलालीsss.... ईईईई
होठों पे गाली तेरी आखें दुलाली रे दे है जियाsss...
तु ऐंटम बॉsम हुई डार्लींग मेरे लिए,
मुन्नी बदनाम हुई डार्लींग मेरे लिए....
बात ये आम हुई,...डार्लींग तेरे लिए
बे-हिंदुस्तान हुई,... डार्लींग तेरे लिए
अमियाँ से आम हुई,... डार्लींग तेरे लिए
ले झंडु बाम हुई,.... डार्लींग तेरे लिए
सीने में होल हुई,... तेरे-तेरे-तेरे लिए
आले बsदनाम हुई,... हाँजी हाँ तेरे लिए
ले सरेआम हुई,...डार्लीं तेरे लिए.. डार्लींग तेरे लिए...डार्लींग तेरे लिए...

प्यारे१'s picture

2 Feb 2012 - 3:10 pm | प्यारे१

१०० पैकी ६६ गुण...

बाकीचे ३४ काय आरक्षणात अडकले आहेत का काय ?

या अपवादात्मक प्रसंगात पोलीस बरोबर होते आणि जवान चूक होते तरीपण दोघांची आजवरची कामगिरी पाहता जे झाले ते चांगलेच वाटले.

किशोरअहिरे's picture

3 Feb 2012 - 5:39 pm | किशोरअहिरे

जे झाले ते चांगलेच झाले असेच म्हणेल

ह्या पोलीस लोकांना गाडी अडवली म्हणजे १००-५०० रु. पर्यंत मस्त पैकी बकरा मिळाला असेच वाटते..
त्यात त्यांची अरेरावीची भाषा म्हणजे कहरच आहे.. (ह्या पे़क्षा गुंड बरे आहेत)
सगळ्यात जास्त गोष्ट जी खटकते ती म्हणजे गाडी अडवली की चावी काढुन निघुन जाणार .. म्हणजे आपण बावळटा सारखे ह्यांच्या मागे विनवन्या करत फिरा...
माझे म्हणने एकच आहे चुक कोणाची पण असो.. पण माणुसकी सोडुन वागु नका..
पुण्यातील पोलीस म्हणजे माजोरडे पणा मधे कहरच आहेत..
ह्या सीएमई वाल्यांनी त्यांचे हातपाय तोडुन ५-६ महिन्यासाठी सरकारी (गलिछ्) दवाखान्यात भरती करायला पाहिजे होते.

daredevils99's picture

4 Feb 2012 - 12:22 am | daredevils99

तळहातावर शीर घेऊन लढणार्‍या आणि देशासाठी तन-मन अर्पिणार्‍या सैनिकांविषयी मिपाकरांनी लिहिलेल्या पोस्ट वाचून, एक मिपाकर म्हणून शरम वाटते!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Feb 2012 - 12:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

एकेकाळी तळहातावर शीर घेऊन लढणार्‍या आणि देशासाठी तन-मन अर्पिणार्‍या सैनिकांपैकी एक असलेल्या अण्णा हजारेंबद्दल उठसूट गरळ ओकणारे तुम्हीच ना हो ??? (उदा हे) आता उगीच सैनिक प्रेमाचे खोटे उमाळे काढू नका.

बाकी तुम्हाला स्वतःची शरम वाटली पाहिजे हे १००% खरे.

daredevils99's picture

4 Feb 2012 - 7:07 pm | daredevils99

आवो विस्वनाथभौ, हास वायला नि उपहास वायला हे तुमच्यासारख्या झंटलमन लोकास्नी ठावं नाय? सैनिक म्हनलं की इथल्या म्हॉप लोकांचे ड्वाले पानावतात म्हून म्या म्हनलं.

म्हण्याल्या होत्या कि आर्मीवाले ट्रेन मध्ये असले तर त्या ट्रेन मधु
न आम्ही जात नाही.

म्हण्याल्या होत्या कि आर्मीवाले ट्रेन मध्ये असले तर त्या ट्रेन मधु
न आम्ही जात नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Feb 2012 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार

काही वेडझव्यांनी, दुसर्‍या काही वेडझव्याना मारले तर त्यात येवढी चर्चा करण्यासारखे काय आहे ते कळाले नाही.