गोविंदग्रजांच्या महाराष्ट्र गीतातील " कणखर देशा, राकट देशा, दगंडाच्या देशा " या ओळींची प्रचिती मला सदैव येत असते. मध्यंतरी औरंगाबादला काम निघाले होते, काम इतके अर्जेन्ट होते की मी ट्र्व्हल्स ने दीड तासाच्या पुणे-दर्शनाचा अलभ्य लाभ न घेता, डोक्यावर शिरस्त्राण धारण करुन सरळ बाईक ला किक मारली, दर दीड तासाच्या अंतरावर ब्रेक घेत-घेत औ.बाद ला पोचलो.काम संपले दुसर्या दिवशी, पण पुण्याकडे काही काम नव्हते. तिथुन कन्नड (हे माझे आजोळ) आणि तसच पुढे किल्ले अंतुर ला जायचे ही ठरले.
कन्नड ते नागापुरच्या रस्त्यावर एकदा सावरगांव सोडल की एक फाटा लागतो, त्या फाट्यावरुन आम्ही चौघै जण भिल्लांच्या वस्ती पाशी थबकलो. निर्जन रस्ता, शेजारी वन्य-प्राण्यांसाठी राखीव असलेले जंगल असल्यामुळे (येताना गौताळा अभयारण्यात, वरून दिसणार्या खोल दरीत रानडुकरांचा कळप पाहुन आलो होतो) मी उत्सुकतेपोटी विचारले. (लगे भाषा बदलत रहाती बरं का मयी , लगे औ.बाद ला पोचल्या-पोचल्या , लई ग्वाड, घ्या गुड !! )
" का रे भऊ, कही वाघ- बिघ दिसत रहात्या का इढं "
मला उत्तर आले .
" येव्ह्ढे नही रे भऊ, काल दुपारी एक बकरू मारलं तळ्यावर त्याहाने ! "
मी जिथे विचारले तिथुन तळं , पाच किमी लांब होते, आणि किल्ले अंतुर २५ किमी लांब , अर्थात त्या उत्तरात विनोदाचा भाग सोडला तर नवल नव्हतेच, नागापुरला आणि शेजारच्या ईतर गावांमध्ये ,कुटुंबातल्या प्रत्येकाने एकदा तरी वाघ पाहिला आहे, पाहिला तर मी पण आहे पण त्या वेळी एक तर तो तरी पिंजर्यात, किंवा मी पिंजर्यात किंवा कार मध्ये (याच गौताळा जंगलात आधी एक-दोनदा कार घेवुन गेलो होतो तेव्हा ही नजरेस पडला होता.)
त्याला नवल नव्हते हे मला नक्की होते, वाघ दिसो न दिसो , पण ते पुढचे २५ किमी पर्यंत बाईक मारावी की नाही या विचारात आम्ही पडलो, (येथे आम्हींची ओळख परेड देतोच आहे.) माझे ट्रेक/भटकंती चे काही नियम आहेत, पहिला म्हणजे स्वंय-सरक्षणासाठी शक्यतो नैसर्गीक संसाधने वापरायची, रॉकेल, गाडीसाठी पेट्रोल आणि पटदिशी मशाल पेटविता येईल अशी सर्व साधने बॅग मध्ये होतीच. येताना ३० किमी च्या घनदात जंगला ची वारी झालीच होती. मौसम पानझडी चा असला तरी, सागवान , चंदनाचा घमघमाट होता, जाताना काही चिंचा पाडल्या आणि खिशात आणि डिक्की त ही घातल्या.
त्या दिवशी आमचे नशीब जोरावर होते, कॅमेराचे सेल घ्यावेत म्हणुन नागापुरात शिरलो आणि नागापुर ला बाजार होता, बाजारात खादाडी केली.
तिथुन दुर्दम्य अश्या रस्त्यावर बाईक मारत-मारत गेलो !! अर्थात त्याची पण एक गंमत च आहे, रस्त्यावर , दुर-दुरपर्यंत चिटपाखरु नव्हते. जाताना एक खांब दिसला, त्यावर कोणती भाषा आहे ते कळेना च. ऊर्दु-सदृश्य आहे.
(जाणकार मिपा-कर सांगतील अशी आशा आहे.)
आणि सरतेशेवटी किल्ला दिसला आणि त्या ही पुढे असे म्हणेन की अजुन खडतर प्रवासाला सुरुवात झाली. एका बाजुला खोल दरी, जंगल आणि नुसती पानांची सळ-सळ झाली तरी भिती वाटावी इतकी भयाण शांतता !!
क्रमश ::::::Ì
प्रतिक्रिया
31 Jan 2012 - 4:15 pm | मी-सौरभ
ईथे बी क्रमशः
का?
का?
का?
का?
का?
का?
का?
31 Jan 2012 - 5:13 pm | प्यारे१
भा.. व .. ड्या..
(प्रत्येक अक्षरामागे दोन टिंबं आहेत बरं..)
लौकर लौकर लिही रे.. ;)
31 Jan 2012 - 5:43 pm | यकु
व्वा: !
एवढी वर्ष औरंगाबादमध्ये गेली पण हा किल्ला आजच पहातोय.
सुहास पुढचा भाग लवकर टाक भौ ;-)
31 Jan 2012 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किल्ले अंतुरला मी काही अजून गेलो नाही. ऐकुन होतो. पण जाणे काही जमले नव्हते. आपल्या लेखाने उत्सुकता निर्माण केली आहे. माहिती अधिक तपशिलवारपणे यावी असे वाटत आहे. बाकी, फोटो झकास आले आहेत.
बाकी, ते उर्दुत काय लिहिलंय ते उद्या कोणा जाणकाराला विचारुन प्रतिसाद डकवतो.
बजारातली भजी, जिलेबी, भारीच. सुहास अशी भजी-जिलेबी हॉटेलात कितीतरी वेळा खाल्ली असतील पण, आता जिलेबीत उडणारी धुळ, बेसनपीठ, भज्यातलं तेल, आचारी यांच्याबद्दलचे सुक्ष्म विचार आणि आरोग्याचे कारणाने साला हाही आनंद जवळ-जवळ गेलाच आहे. :(
-दिलीप बिरुटे
31 Jan 2012 - 5:59 pm | सुहास झेले
पुढचा भाग कधी???
31 Jan 2012 - 6:03 pm | वपाडाव
६ व्या फटुतलं ते निष्पर्ण झाड आवडल्या गेलं आहे... बाकी वर्णन छानच आहे...
जिलेबी अन भजे विथ मिरच्या पाहुन छान वाटल्या गेले आहे...
कधी ऐकलं नाही ते किल्ल्याचं नाव...
मराठवाडा आहेच तसा... दुपारी रस्त्यावर कुणीच दिसत नाही... भाजुन मरायचंय का लोकांना...
31 Jan 2012 - 6:33 pm | धमाल मुलगा
गड-किल्ले म्हणलं की सह्याद्रीच्या पश्चिम महाराष्ट्र अन कोकण इकडच्या रांगांच डोक्यात येतात . अगदीच हौशी गडी असेल तर नाशकाकडं जरा जास्त सरकून हिंडून येतो.
मला फार पुर्वीपासून विदर्भ-मराठवाड्यातल्या गडकिल्ल्यांची असल्यास माहिती हवी होती. फारशी कुठे वाचायलाच मिळत नाही.
ह्या निमित्ताने, अशा नजरेआड गेलेल्या किल्यांची सफर होत रहावी अशी प्रार्थना.
मिष्टर सुहास,
पुढच्या भागात/भागांत किल्ल्याच्या फोटोंसोबत जर मिळाली/ठाऊक असेल तर किल्ल्याची माहितीही द्यावी अशी इनंती.
31 Jan 2012 - 7:51 pm | पैसा
फोटो आवडले हे सांगायलाच हवं का? वर्णनही सुहाश्याच्या लेखणीतून उतरल्यामुळे अप्रतिम! पुढचे भाग लौकर टाक या किल्ल्याबद्दल कधीच काही ऐकलं नाही. प्रचंड उत्सुकता आहे!
1 Feb 2012 - 1:54 am | गणेशा
निशब्द मित्रा
1 Feb 2012 - 8:52 am | सूड
सुहासभौ, एका कवीला नि: शब्द करणार्या वर्णनाबद्दल अभिनंदन !! ;)
1 Feb 2012 - 9:09 am | प्यारे१
आता तर अजूनच लौकर येऊ द्या....
31 Jan 2012 - 8:14 pm | प्रचेतस
फोटो मस्त रे सुहास.
अंतूर अजिंठा-सातमाळा रांगेतील जवळजवळ शेवटचा किल्ला. त्याच्याजवळच सुतोंडी म्हणून पण एक किल्ला आहे. बाकी तो स्तंभ उर्दूतील नसून फारसी भाषेतील वाटतोय.
अंतूर फार प्राचीन असावा हे नक्की. किंबहुना त्या रांगेतील सगळेच किल्ले प्राचीन आहेत.
31 Jan 2012 - 8:27 pm | रेवती
सगळे फोटू आवडले.
पहिला आणि निष्पर्ण झाडाचा तर भारी आलाय.
31 Jan 2012 - 8:53 pm | स्वच्छंदी_मनोज
सुहास मस्तच वर्णन आणी फोटो...
अजून वाचायला आवडेल...
गेली काही वर्षे चाळीसगाव आणी परिसरातील किल्ले भटकंतीचा प्लॅन बनवतो आहे.... देवाला ठाऊक कधी प्रत्यक्षात येणार आहे ....
तुम्ही कण्हेर किल्ला केला आहे का? असल्यास किंवा माहीती असल्यास मुंबईहून कसे जायचे ते सांगू शकाल का?
तसेच ह्या भागावरून असे वाटते आहे की तुम्ही गौताळा अभयारण्याची सफर केलीली आहे... मला गौताळा अभयारण्यात असलेल्या गौताळा लेण्यांबद्दल माहीती हवी आहे... तुम्ही देऊ शकाल का?
मी चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड परीसरातील किल्ले आणी लेण्यांच्या भटकंतीचा प्लॅन बनवतो आहे..तुमच्या माहीतीचा ऊपयोग होऊ शकेल...
लवकरच पुढचा भाग टाका....
31 Jan 2012 - 8:57 pm | मराठी_माणूस
एका वेगळ्या भागाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद
1 Feb 2012 - 12:27 am | मोदक
भारी वर्णन...
मोदक
1 Feb 2012 - 10:14 am | sneharani
फोटो मस्तच आलेत, वर्णन देखील छान!
किल्ला भयानकच दिसतोय दुरून!
येऊ दे पुढचा भाग लवकर!