बनावट औषधांच्या सेवना मुळे पाकिस्तानात १०९ जणांना प्राण गमावावे लागले आहेत.
बनावट औषधांचा हा महाराक्षस दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करणार असे दिसते आहे.
आज ही घटना पाकिस्तान पुरती मर्यादित असली तरी , भारत ह्या प्रकारच्या > ह्या हून भयानक अपघाताच्या अगदी काठावर उभा आहे.
भारतामध्ये बनावट औषधांची बाजारपेठ ५००० कोटी रुपपायांची आहे. गेल्या काही वर्षात ही बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. ह्या बनावट औषधांचे अनेक प्रकार आहेत. १ . कमी प्रमाणात औषध असणे ( मापात पाप ) ,२. अजिबात औषध नसणे ३. दिसायला मुळ ब्रान्ड सारखेच औषध बनवून फसवणूक करणे ४. मुदत संपलेली औषधे परत ( तारीख बदलून) बाजारात विकणे इ......
अन्न व औषध प्रशासन ही सरकारी संस्था “ह्या” प्रकारच्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवत असते. पण येथे भ्रष्टाचार इतका बोकालाला आहे की “हेच” ह्या प्रकरणा मध्ये कशावरून नसतील ? असे वाटावे.
म्हनून असे वाटते भारत , आपल्या शेजारच्या हून भयानक अपघाताच्या अगदी काठावर उभा आहे.
प्रतिक्रिया
30 Jan 2012 - 6:23 pm | गवि
मुद्दा महत्वाचा आहे पण काही बाबतीत स्पष्टता असल्याशिवाय तपशिलात जाऊन चर्चा करणे कठीण होऊ शकते..
उदा:
१०९ जणांचे प्राण किती कालावधीत गेले आहेत? वर्षभरात मिळून वेगवेगळ्या ठिकाणी की एका आठवड्याभरात एकाच इस्पितळात?
बनावट औषधे होती की विषारी?
भारतही याच्या काठावर उभा आहे असं का वाटतं?
30 Jan 2012 - 8:33 pm | तर्री
हे प्राण १ आठवडयाच्या कालावधित गेले आहेत. पंजाब (पाकिस्तान मधिल ) मध्ये २/३ रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे.
रुग्णालयामध्ये होणारी औषध खरेदी ही " टेंडर" द्वारे होत असते . मोठया (५० खाटाहून अधिक) रुग्णालयामध्ये होणारी औषध / ऊपकरणांची खरेदी भारतात "हात ओले" केल्याविना होत नाही. हि दिलेली लाच वसूल करण्याचा ऊपाय म्हणून " बनावट" औषध पुरवली जातात.
ह्या प्रकारामुळे अलर्जी , विषबाधा , तात्पुरता रक्तदाब / साखर कमी / जास्त होणे , अंशतः पूर्ण बहिरेपण , डोळे कमजोर होणे , कायमचे अंधत्व असे प्रकार वाररंवार होत असतात. पण ते "चालू" औषध ऊपचारांचाच भाग समजून / खपून जातात.
पण हे प्रकरण कधितरी रुग्णां जिवावर बेतणार ही भीती वाटते > म्हणून हा धागा.
30 Jan 2012 - 6:43 pm | विजुभाऊ
दवा आणि दारू हे सारखेच.
पाकिस्तानात बनावट दवा पिउन लोक मरतात
भारतात बनावट दारू पिउन लोक मरतात
31 Jan 2012 - 12:40 am | चिंतामणी
मी अगदी हेच म्हणणार होतो.
30 Jan 2012 - 6:51 pm | यकु
इतर काही माहित नाही, पण भारतात ''एक्सपेरिमेंटल मेडिकेशन'' च्या नावाखाली अनेक कंपन्या स्वत:ची अद्याप मंजुरी न मिळालेली औषधे रुग्णांना खिलवतात ते पाहिले आहे.
यामध्ये रुग्णाला औषधांबद्दल होऊ शकणार्या दुष्परिणामाबद्दल इत्थंभूत माहिती दिली जात असली तरी रुग्णांचा वापर विनामोबदला 'गिनीपीग' म्हणूनच होतो... काही केसेसमध्ये बळीसुद्धा जातात.
ती कागदपत्रे मराठीत करत असताना त्या कंपन्या खरोखर पारदर्शक आहेत असा समज झाला होता.
कंपन्या कदाचित पारदर्शक असतीलही, पण संभाव्य दुष्परिणामांना सहमती देऊन प्रायोगिक औषध घ्यायला राजी होणार्या रुग्णांची एकूण परिस्थिती काय असेल, कल्पना करवत नाही.
ज्यांच्या देखरेखीखाली हे चालते ते डॉक्टर्स गबर होत असणार काय याबद्दल सांशक आहे.
अशात इथे वैद्यकिय प्राधिकरणाने दीडदोनशे डॉक्टर्सवर दंडात्मक कारवाई केली होती.. दंड मात्र नाममात्र आकारला होता.
30 Jan 2012 - 6:55 pm | गवि
यकु, मला वाटतं बहुतांश वेळा असे रुग्ण हे असाध्य रोगांमधे आशा हरवून मरण नक्की झालेले.. (उदा मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मल्टिपल मायेलोमा, रेझिस्टंट ल्युकेमिया, ए एल एस इ. इ. ) अन्य उपाय नसल्याचे कळल्याने येतात आणि अशा चाचणीत भाग घ्यायला मिळणे भाग्याचंही समजतात.
म्हणूनच तपशिलाशिवाय चर्चा करता येणार नाही असं म्हटलं...
कोणत्या रोगावर होती ही चाचणी औषधं? काय तत्वावर गुण येण्यासाठी बनवली होती वगैरे ते पहायला हवं.
बाकी मोठ्या मुख्य मुद्द्यांशी सहमत..
30 Jan 2012 - 7:03 pm | यकु
>>>>>>मला वाटतं बहुतांश वेळा असे रुग्ण हे असाध्य रोगांमधे आशा हरवून मरण नक्की झालेले.. (उदा मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मल्टिपल मायेलोमा, रेझिस्टंट ल्युकेमिया, ए एल एस इ. इ. ) अन्य उपाय नसल्याचे कळल्याने येतात आणि अशा चाचणीत भाग घ्यायला मिळणे भाग्याचंही समजतात.
--- हो.. तुम्ही म्हणता तसं ते हतबुद्ध असल्यानंच त्यांना ते भाग्याचं वाटत असावं.. आपण गेलो तरी, आपल्यामुळं काही लोकांना निश्चित फायदा होईल असाही समज होत असावा. कारण कंपन्या तसं रुग्णासमोर स्पष्ट करतात.
बाकी, तुमच्या प्रतिसादाला खोडण्यासाठी म्हणून लिहिलं नाही.. मी आलेले प्रतिसाद न वाचताच लिहीले.. माहित असलेली माहिती शेअर केली.. :)
30 Jan 2012 - 9:35 pm | बिपिन कार्यकर्ते
भयानक! :(
31 Jan 2012 - 12:54 am | शिल्पा ब
आपण करत असलेल्या काळ्या बाजारामुळे निष्पाप लोकांचे जीव जातात हे या राक्षसांच्या लक्षात का येत नाही?