स्वारगेटचा यमदूत

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
27 Jan 2012 - 1:54 am
गाभा: 

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेटमधल्या एका डोके फिरलेल्या माने नामक एका एस टी बस ड्रायवरने तलवार चालवतात तशी बस चालवून अनेक लोकांना ठार वा जखमी केले. आता त्यावर बरीच चर्चा होईल.
पण हा प्रकार थांबवता आला असता का? एस टी किल्लीशिवाय सुरू होणार नाही असे धोरण अमलात आणणे. मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय आला तर अशा चालकांना उपचाराकरता पाठवणे असे काही करता येईल का जेणे करुन असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत?
एखादा अतिरेकी ह्यापासून स्फूर्ति घेऊन असेच किंवा याहून विध्वंसक काही करु शकेल.
ह्या चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करता येईल का व कोर्टात असा आरोप टिकेल का?

बहुधा ह्याचे डोके ठिकाणावर नाही असा बचाव केला जाईल आणि तो चालक सुटेल.
तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

27 Jan 2012 - 2:14 am | पुष्करिणी

झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हा माणूस एस्.टी. महामंडळात नोकरीला आहे, त्यामुळे गाडी फक्त किल्लीनेच चालू होणारी असती तरी त्याच्याकडे किल्ली असलीच असती आणि ही दुर्घटना टळली नसती. ज्या शूर विद्यार्थ्यानं याला पकडलं त्याच्या म्हणण्यानुसार तो दारूही प्यायलेला नव्हता आणि पकडल्यावर 'मला मारून टाका' असं म्हणत होता म्हणे.

या माणसापासून स्फुर्ती वगैरे घेउन बसेस हायजॅक होउ नयेत म्हणून किल्ली स्टार्ट गाडी असणं त्यातल्या त्यात बरं.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2012 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार

झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हा माणूस एस्.टी. महामंडळात नोकरीला आहे, त्यामुळे गाडी फक्त किल्लीनेच चालू होणारी असती तरी त्याच्याकडे किल्ली असलीच असती आणि ही दुर्घटना टळली नसती.

महामंडळाच्या व्हॉल्वो सोडता इतर सगळ्या गाड्या ह्या फक्त किल्ली अथवा स्टार्टरनेच सुरु होतात आणि गंमत म्हणजे प्रत्येक चालकाकडे असलेली किल्ली ही मास्टर की आहे. ती कोणत्याही दुसर्‍या गाडीला वापरता येते. :)

पिवळा डांबिस's picture

27 Jan 2012 - 2:15 am | पिवळा डांबिस

हा प्रकार थांबवता आला असता का? तो चालक अतिरेकी होता की माथेफिरू होता की नशेत होता याची चर्चा नंतर होईलच...
पण त्याआधी या भयंकर प्रकारात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींना माझ्याकडून अनुक्रमे श्रद्धांजली आणि सहानुभूती!
झालं ते खूप वाईट झालं!!
:(

बातमी ऐकल्यानंतर काळजाने ठाव सोडला होता. आई किंवा बाबा पर्वतीला चालत निघाले असतील का का भाऊ रस्त्यात असेल एक ना दोन अनेक विचारांचे काहूर उठले होते. अजूनही रडू येतेसे वाटते.

मानसिक रोगांबाबत भारतात जो टॅबू दिसून येतो तो दूर व्हायला हवा असे वाटते. डिप्रेशन, अँग्झायटी, मूड स्विंग्स या आजारांची तसेच इतर आजारांची लक्षणे दिसताच त्यावर उपचार घ्यायला हवेत. तसेच समाजाने एखादी व्यक्ती मानसोपचारतज्ञाकडे जाते म्हणून वाळीत टाकायला नको.

संतोष माने या व्यक्तीने एका भावनेच्या भरात नक्कीच हे कृत्य केले नसणार. हे त्याच्या मनात बरेच दिवस चालू असणार. परीस्थीती चिघळल्याने, वैद्यकीय उपचार वेळेत नमिळाल्याने ही घटना झाली असे मला वाटते.

प्रचेतस's picture

27 Jan 2012 - 8:34 am | प्रचेतस

मानसिक रोगांबाबत भारतात जो टॅबू दिसून येतो तो दूर व्हायला हवा असे वाटते.

भारतात?
तो सगळीकडेच आहे. किंबहुना तो अमेरिकेत अंमळ जास्तच आहे. इथे निदान शाळकरी मुले तरी बंदुका हातात घेऊन अंदाधुंद गोळीबार करत बसत नाहीत.
अर्थात घडलेल्या घटनेचे हे समर्थन मुळीच नाही.

शिल्पा ब's picture

27 Jan 2012 - 10:59 am | शिल्पा ब

तुमचं म्हणणं चुकीचं आहे. भारतात अजुनही लोकं कौन्सेलींग, थेरेपी वगैरे करणे म्हणजे लाजिरवाणे समजतात. मुले बंदुका घेउन जात नाहीत कारण त्या सहजासहजी मिळत नाहीत. त्यापेक्षा मुलींना त्रास देणे सोपे पडते..तो वेगळा विषय इथे नको.

झालं ते दुर्दैवीच आहे पण आतापर्यंतच्या अनुभवावरुन पुढे काही घडु नये म्हणुन काळजी घेतली जाईल असे वाटत नाही.

सुनील's picture

27 Jan 2012 - 6:54 am | सुनील

घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली तसेच जखमी लवकर बरे होवोत ही सदीच्छा.

बहुधा ह्याचे डोके ठिकाणावर नाही असा बचाव केला जाईल आणि तो चालक सुटेल.

तो मानसिक रुग्ण आहे हे सिद्ध झाले तर त्याला फाशी होणार नाही परंतु आजन्म कारावास होऊ शकेल (आठवा - रामन राघव केस) असे वाटते.

एस्टी महांडळानेदेखिल ह्या घटनेपासून बोध घेऊन काही उपाययोजना करायला हव्यात. जसे की, बस सुरू करण्याची सध्याची सोपी पद्धत बदलणे, चालकाला स्वतंत्र कुलुपबंद कॅबिनेट ठेवणे, कर्मचार्‍यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे इ.

शिल्पा ब's picture

27 Jan 2012 - 10:55 am | शिल्पा ब

<<एस्टी महांडळानेदेखिल ह्या घटनेपासून बोध घेऊन काही उपाययोजना करायला हव्यात. जसे की, बस सुरू करण्याची सध्याची सोपी पद्धत बदलणे, चालकाला स्वतंत्र कुलुपबंद कॅबिनेट ठेवणे, कर्मचार्‍यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे इ.

म्हणणं बरोबर आहे पण या कारणाने लगेच भाडेवाढ झाली तर काय घ्या?

५० फक्त's picture

27 Jan 2012 - 11:11 am | ५० फक्त

या कारणानं झाली नाही तर दुस-या कारणानं होईल, किंवा होणा-या भाडेवाढीला हे एक कारण मिळेल अजुन काय , शेवटी मेलं कोण आणि भरडलं जाणार कोण , सामान्यच नागरिकच ना ? कुणी प्रत्यक्ष शारिरिक भरडले गेले, कुणी आर्थिक भरडले जातील अजुन काय ?

या निमित्तानं पुन्हा एकदा इथं आपल्या आयुष्याची किंमत सरकारी दरबारी १ लाख भर रुपयांपेक्षा जास्त नसल्याचं सिद्ध झालं.

कॉमन मॅन's picture

27 Jan 2012 - 11:23 am | कॉमन मॅन

झाला प्रकार फारच दुर्दैवी झाला. सामान्य निरपराध माणसांचे फुकाचे बळी गेले ही फरच क्लेशकारक घटना आहे.

सर्व मृतात्म्यांस विनम्र आदरांजली..

एखादा अतिरेकी ह्यापासून स्फूर्ति घेऊन असेच किंवा याहून विध्वंसक काही करु शकेल.

ही भितीदायक शक्यता नाकारता येत नाही..

ह्या चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करता येईल का व कोर्टात असा आरोप टिकेल का?

असं वाटत नाही..

बहुधा ह्याचे डोके ठिकाणावर नाही असा बचाव केला जाईल आणि तो चालक सुटेल.

हीच शक्यता अधिक वाटते..

पुण्याचे वटवाघूळ's picture

27 Jan 2012 - 12:32 pm | पुण्याचे वटवाघूळ

बहुधा ह्याचे डोके ठिकाणावर नाही असा बचाव केला जाईल आणि तो चालक सुटेल.

हीच शक्यता अधिक वाटते..

हो तीच शक्यता जास्त. आणि कोणीतरी मानवाधिकार वाले येतीलच पुढे. त्याला जगायचा अधिकार आहे असे म्हणत. म्हणजे जे मेले त्यांना जगायचा अधिकार नव्हता का? या अतिशहाण्या अति शिकलेल्या लोकांनीच सगळे वाटोले केले आहे.वाईट याचे वाटते की मरतात ते सामान्य लोक. असे फालतूचे मानवतावादी लोक बसतात ए.सी केबिनमध्ये आणि इतरांना प्रवचन झोडायला हे मोकले.

स्वातीविशु's picture

27 Jan 2012 - 1:14 pm | स्वातीविशु

या म्रुत्यूनाट्यात मरण पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.
यामधे चालक दोषी आहे असे मलाही वाटले, पण तो ज्या आजाराच्या अंमलाखाली होता (यावर एक धागा लवकरच प्रकाशित होईल), हे पाहता त्याची बाजू न्यायालय विचारात घेईल असे वाटते.

एस्टी महामंड्ळदेखील याला जबाबदार आहे. चालक २ दिवस झोपला नव्हता, असेही वाचनात आले.

चिगो's picture

27 Jan 2012 - 2:06 pm | चिगो

भयानक होती ही घटना.. माझा भाऊ आणि वहिनी पुण्यात असतात, त्यामुळे त्यांच्या काळजीने हालत वाईट झाली होती. सुदैवाने ते सुखरुप आहेत. पण जे मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले त्यांच्याबद्दल प्रचंड वाईट वाटतंय. देव मृतात्म्यांना शांती देवो. पण ह्या सर्व मृतांच्या आणि जखमींच्या निकटवर्तियांवर जो आघात झालाय, तो भरुन निघणं फार फार कठीण आहे, अशक्यच..

>>ह्या चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करता येईल का व कोर्टात असा आरोप टिकेल का?

ह्याबद्दल काहीही सांगणे जरी कठीण असले, तरी माझ्यामते ह्याचे उत्तर "हो" असे आहे.. कारण की तो फक्त "रॅश अ‍ॅन्ड नेग्लिजंट" ड्राईव्हिंग करत नव्हता तर त्याने रस्त्याच्या उलट्या दिशेने बस भरधाव नेऊन वाहने आणि माणसांना चिरडलेय. त्याचा उद्देश ह्या कृतीतूनच स्पष्ट होतो..तसेच, तो बसचा ड्राईव्हर असल्याने अनुनभवी होता, असे म्हणता येणार नाही..

>>बहुधा ह्याचे डोके ठिकाणावर नाही असा बचाव केला जाईल आणि तो चालक सुटेल.

हे ही होऊ शकते.. आतापासूनच त्याच्या नातेवाईकांची अंतर्गत उलटसुलट आणि एस्टीची विरोधी वक्तव्ये सुरु झाली आहेत..

यकु's picture

27 Jan 2012 - 2:13 pm | यकु

मृतांना श्रद्धांजली.
पागलपणाच्या अमलाखाली गाडी चालवून सर्वात जास्त बळी घेणारे भारतातील पहिले प्रकरण म्हणून याची नोंद व्हायला हरकत नाही.
या निमित्ताने 'एलिस्‍टर परेराकडून घडलेल्या कृत्याबद्दलची शिक्षा चुकीची आहे का' या अर्थाचा नुकताच मिपावर आलेला धागा आठवला.

२१ वर्षांचा विद्यार्थी इब्राहिम शरीफ कुट्टी याने ५० सी सी मोपेड वरून या भरधाव जाणार्‍या बसचा पाठलाग करून, स्वतःच्या जीवावर उदार होऊन खिडकीतून शिरून चालक माने याला नीलायम चित्रपटगृहापाशी गाडी थांबवणं भाग पाडलं. त्याला बापू लोणकर या तरूण पोलीस कॉन्स्टेबलने चालत्या गाडीत प्रवेश करून मदत केली. हे न घडतं तर आणखी किती निष्पाप जीव गेले असते याची कल्पनाही करवत नाही.

या दोघांचं योग्य कौतुक होईल का?

(या दोघांशी संपर्क कसा करता येईल याची माहिती पुण्यातील कुणी दिली तर बरं होईल.)

गणपा's picture

27 Jan 2012 - 4:35 pm | गणपा

लोकं कौतुक करोत वा ना करोत.
आपला या दोघांना सलाम.
काका या दोन रियल लाईफ हिरोंची माहिती/फोटो इथे दिल्या बद्दल धन्यवाद.

लोकांच काय? चार दिवसांनी हे प्रकरण विसरतील. जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा परत १/२ दिवस आठवण काढतील.
पण ज्यांच्यावर वा कुटुंबियांवर हा भयानक प्रसंग गुदरला त्यांच्या मनावरचे ओरखडे कधीही पुसले जाणारे नाहीत.

पुष्करिणी's picture

27 Jan 2012 - 4:51 pm | पुष्करिणी

+१
हॅट्स ऑफ टू देम .

शिल्पा ब's picture

27 Jan 2012 - 11:06 pm | शिल्पा ब

+२ १००%

हेच म्हणेन. रीअल लाईफ हीरोज.

श्यामल's picture

28 Jan 2012 - 3:18 pm | श्यामल

+३
हॅट्स ऑफ टू रिअल लाईफ हिरोज !

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jan 2012 - 5:21 pm | बिपिन कार्यकर्ते

सलाम!

ही बातमी वाचल्यापासून काय बोलावे तेच सुचत नाही.
बहुगुणी म्हणतात तसे फोटोतील दोन दादालोकांचे कौतुक करते.
मृतांबद्दल आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल सहानुभुती वाटते.
चालकाला योग्य शिक्षा व उपचार मिळोत.

कौशी's picture

27 Jan 2012 - 10:58 pm | कौशी

फोटोतील दोन्ही धाडसी वीरांचे कौतुक आणि आभार..

श्रीरंग's picture

28 Jan 2012 - 12:17 am | श्रीरंग

आज "आजचा सवाल" मधे अभ्यंकर यांनी राज्य परिवहन कर्मचारी कोणत्या परिस्थीतीत काम करतात याचे केलेले वर्णन अत्यंत विदारक होते (दैनिक भत्ता ३ रु.!!!, १२-१४ तास गाडी चालवून आल्यानंतर साधी झोपण्याची व्यवस्थित सोय नाही, इत्या.). प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणी उदासीनता यामुळेच असले मानसिक आजार कर्मचार्यांमधे बळावत असणार हे निश्चित. (हे मानेच्या क्रुतीचे समर्थन नाहिये. त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी.)
एवढी दुर्घटना झाल्यानंतरही स्वत्।च्या खात्यातील नाकर्तेपणाची जबाबदारी सहज झटकून टाकणारे मंत्री आपल्या निगरगट्ट निलाजरेपणामुळे असल्या अजून किती मानेंना जन्म देणार आहेत देव जाणे. ("तोंड सांभाळून बोला, तुम्ही मंत्र्यांशी बोलताय." वगैरे माजोरडेपणा म्हणजे तर कहरच झाला.)