नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप.
येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे.
सध्या विचार करत असलेली हॉटेल शिवाजीनगरच्या आसपासची आहेत, म्हणजे हॉटेल सापडणं अन येणं जाणं सग़ळंच सोपं होईल सगळ्यांना, अर्थात इतर ठिकाणं सुद्धा चालतील, प्रत्येक ठिकाणी कुणाची तरी गैरसोय होणार आहे, तरी कमीत कमी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी असा विचार आहे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
दिनांक ८/१/१२ रविवार च्या कट्यात सहभागी होणार्या सर्व मि.पा.करांना कळविण्यात येते की,बनियन ट्री हॉटेल ही जागा कट्यासाठी नक्की करण्यात आलेली आहे...इथे सर्व कट्टेकर्यांनी संध्याकाळी ६;३० पर्यंत जमायचे आहे...पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे कसे पोहोचावे यासाठी खाली दिलेल्या पत्याप्रमाणे यावे...अथवा ५०फक्त यांच्या मो.नं.वर येणार्यांनी संपर्क साधावा...
सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
ठिकाण-बनियन ट्री हॉटेल...कट्याची वेळ-सायंकाळी ६:३० वाजता
कर्वे नगर,नदी रस्त्यावर...
डेक्कन.नळ स्टॉप कडुन येणार्यांसाठी-कर्वे नगर-ताथवडे उद्यानापर्यंत पोहोचावे-तिथुन ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे...
स्वारगेट-सिंहगडरोड वरुन येणार्यांसाठी-राजाराम पुलापर्यंत पोहोचावे- तिथुनही ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे...
मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना व्यनि करावा. .
प्रतिक्रिया
4 Jan 2012 - 8:42 am | प्रचेतस
पुण्यात कुठेही ठरवा, आम्ही असूच.
4 Jan 2012 - 3:50 pm | मालोजीराव
असाच म्हनतो सायबा !
-मालोजी
5 Jan 2012 - 6:47 am | प्रसन्न शौचे
रिकामटेकड्या मिपकराना गप्पाचा भारी शोक
5 Jan 2012 - 9:06 am | प्रचेतस
शोक नाही हो, शौक म्हणा.
बादवे तुम्ही शौकीन दिसत नाही हो.
5 Jan 2012 - 9:28 am | अत्रुप्त आत्मा
@-रिकामटेकड्या मिपकराना गप्पाचा भारी शोक>>>गप्पा रिकाम्या टेकड्यांवरच होतात ;-) , नुसत्याच भरलेल्या टेकड्यांवर होतात ती-प्रेमप्रकंरंणं :-p
5 Jan 2012 - 10:21 am | मी-सौरभ
गप्पांमधे टेकड्यांबद्दल पण चर्चा होत असतेच :)
5 Jan 2012 - 10:51 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुमचे नाव प्रसन्न की प्राजक्ता ???
5 Jan 2012 - 11:39 am | मृत्युन्जय
नाव प्राजक्ताच असावे. शौचाला जाउन आल्यवर प्रसन्न वाटते म्हणुन त्यांनी प्रसन्न शौचे असा आयडी घेतला असावा. :)
5 Jan 2012 - 12:00 pm | सोत्रि
मृत्युन्जय,
मेल्या, सांडलो ना खुर्चीतून...
- (स्मायलीप्रमाणेच लोळणारा) सोकाजी
5 Jan 2012 - 12:34 pm | स्पा
नाव प्राजक्ताच असावे. शौचाला जाउन आल्यवर प्रसन्न वाटते म्हणुन त्यांनी प्रसन्न शौचे असा आयडी घेतला असावा
आईचा
भेंडी.... मेलो ...
आवरा रे मृतून्जय साहेबांना कोणीतरी =))
5 Jan 2012 - 1:27 pm | मोदक
ठ्ठो..!!!!!!
खपल्या गेलो आहे..
मोदक
5 Jan 2012 - 5:19 pm | अनुराग
मजाच आहे.
5 Jan 2012 - 11:41 am | प्रास
असं काय करताय?
त्यांचं नाव प्राजक्ता शौचे आणि त्या नेहमी प्रसन्न असतात ;-)
5 Jan 2012 - 12:02 pm | अत्रुप्त आत्मा
@-त्यांचं नाव प्राजक्ता शौचे आणि त्या नेहमी प्रसन्न असतात ;-) >>> राम राम राम राम बाजार उठला कि हो शौच्यांचा..! अक्षरशः चौघात मिळून खांदा दिल्यागत वाट्टय... ;-)
फक्त त्याचं अशौचं*** आंम्हाला नाई पाळायला लागलं मंजे झालं ;-)
अशौचं---सुतक :-D
7 Jan 2012 - 8:06 am | ५० फक्त
नविन प्रतिसाद हुडकावा लागु नये म्हणुन इथं देत आहे...
घागा संपादित केल्याबद्दल मा. संपादकांचे अतिशय आभार
आत्तापर्यंत येतो आहोत, असं कळवलेल्या सदस्यांची नावं इथं देत आहे, अजुन सुद्धा येणा-यांचं स्वागतच आहे, ही यादी म्हणजे 'आता बास' यासाठी नसुन,' एवढे आहेत मग तुम्ही का मागे या की तुम्ही पण ' या साठी आहे. जमल्यास / अॅडजेस्ट करुन येणा-यांची यादी केलेली नाही.
(आचारसंहिता लागु झालेली असल्यानं, खालील सर्व नावांपुढे श्री. मा. लिहिलेले आहे असे समजावे अन वाचावे ही विनंती)
वल्ली, मालोजीराव, मन१, वपाडाव, अतृप्त आत्मा, सौरभ्, अनुराग, सोत्रि, अविनाश कुलकर्णी, विवेक मोडक, आगाउ कार्टा, मोदक, अधाशी उदय, नावात काय आहे, चिमी, पक पक पक, बिपिन कार्यकर्ते, धमाल मुलगा, श्रीरंग, प्यारे१, टिवटिव, शशिकांत ओक, किसन शिंदे, धनाजीराव, मी.
या सर्वांना तसेच जमल्यास क्लास मधले अजुन काही अशा सर्व सदस्यांना एसेमेस करेनच, पण तरीही श्री. अविनाश कुलकर्णी व श्री. बिपिन कार्यकर्ते यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही, त्यांना एसेमेस मिळण्याची पर्यायी व्यवस्था करत आहे.
7 Jan 2012 - 9:54 am | प्रचेतस
अरे वा. बरीच मंडळी जमली आहेत आता. कट्टा जोरदार होणार तर. :)
7 Jan 2012 - 10:41 am | विवेक मोडक
त्या बनियन ट्रि चा एक नकाशा टाकला तर बरं होइल
7 Jan 2012 - 11:25 am | मृत्युन्जय
हा गूगल म्याप घ्या. म्हात्रे पूलावरुन राजाराम पूलावर जाणार्या रस्त्यावर सुर्यनंदा लॉन्स च्या अलीकडे डाव्या बाजूला बनियान ट्री आहे. गूगल मॅप वर ते मार्क केलेले नाही. पण ते म्हात्रे पूलापेक्षा राजाराम पूलापासुन जवळ आहे. क्रमाने ही हॉटेल्स लागतील (म्हात्रे पूलावरुन आल्यास):
१. हार्वेस्ट क्लब - डावीकडे
२. त्याच्या समोरच मल्टी स्पाईस (उजवीकडे)
३. घरकुल लॉन्स (याचे हॉटेल पण आहे. नाव विसरलो. बहुधा रॉयल गार्डन का तत्सम काहितरी असावे) (डावीकडे)
४. हॉटेल आमची. (उजवीकडे)
५. बनियान ट्री (डावीकडे)
बादवे बनियान ट्री फायनल हाय काय?
7 Jan 2012 - 11:46 am | प्रचेतस
व्हय व्हय. बनियान ट्रीच फैनल हाय.
(ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय?)
7 Jan 2012 - 11:52 am | स्पा
ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय?
सर्व माननीय सदस्यांना या अवतारात असल्याची कल्पना केली आणि अमळ मौज वाटली :)
7 Jan 2012 - 12:12 pm | मृत्युन्जय
ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय
भोकं असणे अपेक्षित आहे काय? असेल तर किती आणि कुठे ?
7 Jan 2012 - 1:33 pm | प्रचेतस
किती भोके असावीत यासाठी 'द अंग्रेज' मधील इस्माईल भाईचा बनियन पहावा. ;)
7 Jan 2012 - 7:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आणि लेंग्याला ??? ;-)
7 Jan 2012 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा
भोकं असणे अपेक्षित आहे काय? असेल तर किती आणि कुठे ? :-D ह्हा ह्हा ह्हा ह्हा
जाळीचा बनियन घालुन आलं तरी चालेल.... ;-)
7 Jan 2012 - 8:04 pm | चिंतामणी
ठ्ठो.
=))
(खूर्चीतुन खाली पडलेला) चिंतामणी
7 Jan 2012 - 2:28 pm | गणपा
नशिब इथवरच थांबलात.
वडा/पिंपळाची पानं नेसुन यावं का ? असं नाही विचारलत. ;)
आवांतर : कट्ट्याला शुभेच्छा :)
7 Jan 2012 - 5:08 pm | प्रचेतस
भारतीय संस्कृतीतल्या सभ्यशुचितेच्या संकल्पनांचा पगडा अजूनही असल्यामुळे इथवरच थांबावे म्हटले. ;)
7 Jan 2012 - 5:27 pm | पैसा
तुमच्या ड्रेसकोडमुळे बहुधा पुण्यातल्या मिपा महिला आघाडीच्यी कार्यकर्त्या दिसत नाहीयेत, (एक चिंगी सोडून).
7 Jan 2012 - 5:48 pm | सूड
ड्रेसकोड जाहिर करण्याआधी तरी कुठे कोण होत्या म्हैला आघाडीवाल्या ? :D
7 Jan 2012 - 7:52 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्याच्या कारणांपैकी एक इथे लिहिले असते. पण नको, काही संवेदनशील लोकांवर मनाच्या परिणाम होईल. मग ते धावत धावत जाऊन तक्रार करतील, मग आम्हाला लाल रंगातले प्रेमपत्र येईल (काय दिवस आलेत. एकेकाळी प्रेमापत्राचा रंग गुलाबी होता) त्यामुळे सध्या गप्प बसायचे ठरवले आहे.
7 Jan 2012 - 8:34 pm | सूड
लिखांणातली संवेदनशीलता हळूहळु मनापर्यंत पोचतेच म्हणा, असो बहुत काय बोलणे. सुज्ञांसि सांगणे न लगे.
7 Jan 2012 - 8:01 pm | चिंतामणी
>>>सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
या वाक्यामुळे पाठ फिरवीली असे माझे मत आहे.
:bigsmile:
7 Jan 2012 - 8:39 pm | पैसा
भारीच ब्वॉ तुम्ही मनकवडे!
8 Jan 2012 - 11:53 am | मन१
नुसतीच वड पिंपळाची पाने नेसून यावयास हरकत नसावी. पण रस्त्यात उगीच एखदे भुकेले अस्सल " शाकाहारी" बोकड/बकरी/गाय्-बैल/मैस-रेडा/घोडा ह्यापैकी चतुष्पाद भेटले तर अनावस्था प्रसंग येउ शकेल त्याचे काय?
4 Jan 2012 - 8:49 am | अत्रुप्त आत्मा
हात वर..! हजर सर.. :-)
4 Jan 2012 - 9:12 am | लीलाधर
गुरूजी प्रॉक्झी अटेंडन्स लावाल लावाल काय त्याचं काय आहे ना नेमकी माझी ऑफीसची ट्रीप आहे हो ७ आणि ८ ला :)
4 Jan 2012 - 10:30 am | मन१
मी येतोय....
मला वाडेश्वर(FC road, गुडलक कॅफेजवळ)
चैतन्य पराठा (fc road, ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ)
समुद्र (नळ स्टॉप, पंजाबी स्टाइल)
स्वामी(उत्तम व्यवस्था, पंजाबी स्टाइल)
मथुरा ( j m road)
बालगंधर्व शेजारचे उद्यान
ही सगळी ठिकाणं आवडतील. मस्त भेटून गप्पा मारत बसण्यासारख्या जागा आहेत.
4 Jan 2012 - 6:23 pm | विजुभाऊ
मला वाडेश्वर(FC road, गुडलक कॅफेजवळ)
चैतन्य पराठा (fc road, ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ)
समुद्र (नळ स्टॉप, पंजाबी स्टाइल)
स्वामी(उत्तम व्यवस्था, पंजाबी स्टाइल)
मथुरा ( j m road)
या सर्व जागा कुपेयपानास वर्जीत आहेत.
अतीअवांतर : टिळक रोडवरचे बादशाही कसे वाटतेय?
4 Jan 2012 - 7:09 pm | मी-सौरभ
पाट्या वाचण्यात एक तास गेला बाइ!
मी नाइ कट्टा केला!
असं गाण म्हणत बाहेर याव लागेल....
4 Jan 2012 - 8:05 pm | मन१
बादशाही सुंदरच आहे. पण त्याचे रूप पडले एक तुफ्फान चालणार्या खानावळीसारखे.
लगोलग एकास खेटून एक असे बसणे, भराभर वाढले जाणे, आणि पान संपल्यावर फार वेळ थांबता न येणे हे एरव्ही शिस्त म्हणून ठिक असले तरी सदस्य संख्या अधिक असताना तिथे जाणे सोयीचे होणे नाही.
मी स्वतः तिथे सतत मागचे वर्षभर तरी जातोय, मला ते प्रचंड आवडतेही; पण ८-१० तिथे बसून गप्पा मारणे शक्य नाही.
त्या तुलनेत वरची ठिकाणे उचित वाटतात. किम्वा पब्लिक म्हटली तसं ओला कट्टा केल्यास जागचे उठायची घाई कुणीच करणार नाही.
मोठ्या संख्येचा कोरडा कट्टा आयोजित करायचा झाल्यास चोखीदाणी* हे ही ठिकाण उत्तम ठरावे, पण भांबुर्डा अन् F C पासून दूर पडते, म्हणून त्याचे नाव घेतले नाही.
ओला कट्टा करायचा झाल्यास ऐन जंगली महाराज मंदिराच्या समोरच्या गल्लित आतल्या बाजूला असणारे bamboo house हे गार्डन रेस्टॉरंट हा एक चांगला पर्याय वाटू लागला आहे.
पिणारे बर्याचदा F C रोड वरील apache चेही नाव घेतात, मात्र ते कधीही पाहिले नसल्याने सुचवले नाही.
* फार पूर्वी अभिरूची ला झालेला सात्विक कट्टा अगदि हिट्ट झाला होता.
4 Jan 2012 - 8:38 pm | सोत्रि
असे असल्यास पूनम (डेक्कन बस डेपोजवळ ) एकदम उत्तम ठिकाण होऊ शकेल.
बांबू हाऊस भलतेच महागडे आहे आणि कॉकटेल्स एकदम हुकलेली बनवतात :(
- (कट्टेकरी) सोकाजी
4 Jan 2012 - 8:56 pm | मन१
गुरुवर्य, साक्षात आपण मिपासोमरसबृहस्पती, ओलशिक्षक उपलब्ध आहात हे क्षणभर विसरून आम्ही थेट आमच्या ऐकण्यातले नाव टंकले. पिणे पाजणे ह्यातील आमचा अनुभव हा शून्य असल्याने ऐकीव माहिती टंकली व आपल्या स्पेशालिटित नाक खुपसण्याचा उद्योग केला.
कोरडा
5 Jan 2012 - 12:06 pm | गवि
+१००
लाँग आयलंड आईस्ड टी ऐवजी कोकाकोला तोही गोल बुडाच्या चषकात घालून दिला. पण बाकी सुरमई /पापलेट तुकडे वगैरे चांगले घसघशीत आणि चविष्ट होते..
4 Jan 2012 - 10:07 am | अविनाशकुलकर्णी
म्हात्रे पुला जवळ..मल्टी स्पाईस हॉटेल छान आहे..
जागा भरपुर..पदार्थ ठिक..कितिहि वेळ बसा..
हर्वेस्ट क्ल्ब च्या समोर..
दिनानाथ ची मागची बाजु..
4 Jan 2012 - 10:48 am | मी-सौरभ
हात वर केला आहे!!
फायनल ठिकाण शुक्रवार संध्याकाळ पर्यंत ठरवून टाकुया...
4 Jan 2012 - 10:56 am | सोत्रि
आम्ही आहोतच!
- (कट्टेकरी) सोकाजी
4 Jan 2012 - 11:17 am | अनुराग
हात वर केला आहे!!
4 Jan 2012 - 11:28 am | विवेक मोडक
जागा आणि वेळ नक्कि करा. मी आहेच
4 Jan 2012 - 11:32 am | सुहास..
जागा आणि वेळ नक्कि करा. मी आहेच >>>>
वयोवृध्द, जेष्ठ नागरिकांनी , थंडी-गारठ्याच घरातच बसावे हा फुकटचा सल्ला ;)
4 Jan 2012 - 11:48 am | मराठी_माणूस
तुमच्यासाठी ही एक फुकटचा सल्ला , आयडी "चिरंजीव" करुन घ्या.
4 Jan 2012 - 11:33 am | आगाऊ कार्टा
मी पण येत आहे.
4 Jan 2012 - 11:42 am | वपाडाव
बस जगह और वक्त बताइये बंदा हाजिर है....
4 Jan 2012 - 5:54 pm | सूड
बंदा रुपाया का ?? न्हाई, करन्सी कंची म्हनं ??
4 Jan 2012 - 6:01 pm | मी-सौरभ
तेवढ येताना
सुरवार कुडता, लोकरी टोपी, डोळ्यात काजळ, कानात अत्तराचा फाया आणि तोंडात पान
असा वेष करुन आलास तर ओळखायला बरं पडेल ;)
4 Jan 2012 - 11:49 am | मृत्युन्जय
म्हात्रे पूल ते राजाराम पूल याच्यामध्ये बनियान ट्री आहे. उत्तम हॉटेल. मल्टि स्पाइसला गेलात तर क्रिस्पी पॉटेटॉ नक्की ट्राय करा आणि बनियान ट्री मध्ये शाही टुकडा. :)
कट्ट्याला शुभेच्छा.
4 Jan 2012 - 12:45 pm | ५० फक्त
अरे हो एक लिहायचं राहिलं वर धाग्यात, किती जण होतील त्यानुसार संत्रा बर्फी किंवा रम बॉल वगैरेची सोय करायची आहे, त्यामुळं लवकर कळालं तर बरं होईल.
4 Jan 2012 - 5:52 pm | मी-सौरभ
जास्तीस्त लोकांनी नावं नोंदवावीत.
संत्रा बर्फी कमी पडलेले चालणार नाही.
ती उरणार नाही याची काळजी घेतली जैल चिंता नसावी.
4 Jan 2012 - 1:04 pm | गणेशा
कुठे आहे ते कळवा, येण्याचा प्रयत्न करेन..
(रविवारी, बाहेर जाण्याचा प्लॅन होता, त्यामुळे १०० % नाहि सांगु शकत )
4 Jan 2012 - 2:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे
सूचनेचा विचार करून त्यावर अंमल केल्याबद्दल धन्यवाद, ५० भाऊ :-)
येण्याचा प्रयत्न केला जाईल. सप्ताहांत सुरु होईतोवर कळवेन.
4 Jan 2012 - 2:20 pm | मोदक
फक्त किती वाजता यायचे / कुठे यायचे ते डीट्टेल मध्ये सांगा.
मोदक.
4 Jan 2012 - 3:02 pm | उदय के'सागर
पुण्यातच राहत असल्यामुळे हि एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि. येण्याचा व संधिचा फायदा घेण्याचा नक्कि प्रयत्न केला जाईल.
"बाय द वे" = एफ.सी. रोडवर (ज्ञानेश्वर पादुका चौका जवळ) छान 'मल्टिकुसिन' हॉटेल पण तिथे बसायला फार जागा आहे कि नाहि ह्या बद्दल जरा साशंक आहे.
**आजुन थोडे सिटी मधे चालत असेल तर ...
कलिंगा - कर्वे रोड, शारदा सेंटर समोर
गिरीजा - कर्वे रोड (आणि बाकि ईतर शाखा देखिल)
करी ऑन द रुफ - प्रभात रोड
ऑलिविया - दशभुजा समोर
११ ई-स्ट्रीट - ई-स्ट्रीट,कॅम्प
१०००(thousand) ओक - ई-स्ट्रीट,कॅम्प
(बाकि कल्याणि नगर, कोरेगांव-पार्क आणि नगर रोड वर तर खच पडलाय हॉटेल्सचा (फाईन डायनिंग)... अति महागडे)...
**बाकि मग आपले एफ.सी. रोडवरील खालिल पर्याय निवांत बसण्यासाठी केंव्हाहि भारीच आहेत :)
वाडेश्वर
पेपिनोस
हॉर्न-ओके-प्लिझ
गुड-लक
(रुपालि, वैशालि "माज" आणि "गर्दि"वाले पर्याय आहेत)....
**जे.एम. रोड :
पांचालि
गंधर्व
शिव-सागर
सुभद्रा
मथुरा
सोहम उपहार गृह
सध्या तरी जवळपासच्या एरीयामधले एवढेच आठवताय....hope it helps :)
4 Jan 2012 - 5:09 pm | रेवती
शिवसागरचं रिनोवेशन चाल्लय. नका जाऊ.
5 Jan 2012 - 5:35 pm | एक तारा
R Deccan ला उघडतंय. पण नक्कि केव्हा ते माहित नाही. Coming soon आहे आणि पाटी पण लागली आहे.
4 Jan 2012 - 3:08 pm | नावातकायआहे
हजर!
4 Jan 2012 - 3:20 pm | वपाडाव
आपण आणखी काय काय वर करता !!!
4 Jan 2012 - 3:33 pm | अत्रुप्त आत्मा
@आपण आणखी काय काय वर करता !!!>>> :-D राम कृष्ण हरी...!मेलो साफ..!
4 Jan 2012 - 3:54 pm | नावातकायआहे
भेटी अंती कळेलच! :-)
4 Jan 2012 - 3:19 pm | चिमी
मलापन यायचय ....
पन्........
4 Jan 2012 - 3:22 pm | पक पक पक
मला सुद्धा यायला आवडेल.....
4 Jan 2012 - 3:35 pm | ५० फक्त
एक विनंती, जे सदस्य पहिल्यांदाच येत आहेत त्या सर्वांना विनंती की मला / वल्लीला व्यनि करुन फोन नंबर द्यावेत.
बहुदा मार्चच्या कट्ट्याला सगळे हाय फाय झालेले असतील, टॅब बिब असतील सगळ्यांकडे, मग शेवटपर्यंट ऑन लाईन राहता येईल पण तो पर्यंत तरी फोन वरच भागवावे लागेल.
4 Jan 2012 - 3:39 pm | स्पा
कट्ट्याला शुभेच्छा :)
4 Jan 2012 - 4:41 pm | वपाडाव
मागील वर्षभरात आपण या व्यतिरिक्त केलंय तरी काय?
(तु म्हणुन सांगतोय.... हलकेच घे)
4 Jan 2012 - 4:43 pm | स्पा
ह्या ह्या :)
दुसर्या किंवा चवथ्या शनवारी करा कि कट्टा :)
4 Jan 2012 - 5:44 pm | मी-सौरभ
पुणे गेट च्या वेळी काय झालं होत रे??
4 Jan 2012 - 6:02 pm | सोत्रि
जाऊ दे रे!
का बिचार्याला पिळतो आहेस?
त्याने डॉन्याचे शिष्यत्व घेतलेले दिसतेय कारणे सांगण्याचे ;)
पण ते अस्सल 'वायदेआजम' आहेत, त्याची सर स्पावड्याला नाही.
- (रोखठोक) सोकाजी
4 Jan 2012 - 7:13 pm | मी-सौरभ
स्पाडु : सोत्रि नी तुला वाचवलं नाहि तर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दुसर्या कुणीतरी वाचवल असतं :)
4 Jan 2012 - 6:02 pm | ५० फक्त
२०११ मध्ये पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार रविवार होता, आता २०१२ मध्ये दुसरा आणि चवथा आहे.
4 Jan 2012 - 9:24 pm | सूड
खिक्क!!
5 Jan 2012 - 12:23 am | अत्रुप्त आत्मा
@-प्रेषक स्पा Wed, 04/01/2012 - 15:39. कट्ट्याला शुभेच्छा
निषेध :evil:
निषेध :evil:
निषेध :evil:
निषेध :evil:
निषेध :evil:
@-मागील वर्षभरात आपण या व्यतिरिक्त केलंय तरी काय?>>> वपाडाव यांचेशी पूर्ण सहमती...
(मि.स्पा यांचेवर नाराज होऊन चिडलेला) :evil: अत्रुप्त आत्मा
4 Jan 2012 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्टे-बिट्टे जोरात होऊद्या. :)
-दिलीप बिरुटे
(शुभेच्छुक)
4 Jan 2012 - 4:44 pm | मराठमोळा
याला हजेरी लावणं जमणार नाही ब्वॉ. एखादा फेब्रुवारी मधे करणार असाल तर नक्कीच जमेल.
कट्टा करुनही बरेच दिवस झालेत. :)
4 Jan 2012 - 5:07 pm | यकु
अरारा!
मी 13-14 जाने. रोजी पुण्यात असेल.
त्यापूर्वी यायला जमणार नाहीय.
त्यामुळे शुभेच्छा व एंजॉय. :)
4 Jan 2012 - 5:21 pm | सोत्रि
असू दे रे!
आपण बसू ना १३-१४ ला ;)
- (ओल्या बैठकीचा चाहता) सोकाजी
4 Jan 2012 - 5:55 pm | यकु
असू दे रे!आपण बसू ना १३-१४ ला
हे म्हणजे प्रत्यक्ष द्रव्य महागुरुंसोबतच साधनेला बसण्याचा चान्स आहे. ;-)
नक्कीच बसू. :)
5 Jan 2012 - 1:32 pm | मोदक
थम्स अप - ऑन द रॉक्स घेणारे आणि चकणा संपवणारे चालत असतील तर व्यनि करा.... ;-)
7 Jan 2012 - 11:43 am | चिंतामणी
द्रव्य महागुरुंसोबतच साधनेला बसण्याचा चान्स बिल्कुल नाही. :p :-p :tongue:
त्यासाठी वेगळा कट्टा आयोजीत करावा लागेल.
4 Jan 2012 - 5:10 pm | रेवती
आता काय उपयोग.:(
4 Jan 2012 - 5:13 pm | सूड
हात वर केला आहे....!!
4 Jan 2012 - 5:16 pm | बिपिन कार्यकर्ते
जमल्यास.... नक्की!
4 Jan 2012 - 5:59 pm | विनोद१८
..सर्वान्ना कट्टा २०१२ च्या शुभेच्छा...!!
विनोद१८
4 Jan 2012 - 6:06 pm | धमाल मुलगा
बाटलीची सोय असलेलं ठिकाण बघा रे.. आपसुक भरपूर वेळ गप्पा मारायला बसू दिलं जाईल. :)
बारामतीला जाणं रद्द झालं तर मी आहेच. :)
4 Jan 2012 - 7:03 pm | विवेक मोडक
कसली बाटली हवी आहे आपल्याला??
बाकी बारामतीकरांनी मूळ मुद्द्याला हात घातल्याबद्दल त्यांचे आभार
4 Jan 2012 - 7:11 pm | मी-सौरभ
धमु तूच खरा कट्टेकरी...
5 Jan 2012 - 8:55 am | घाशीराम कोतवाल १.२
धम्या माझ्यातर्फे तुला एक बाटली तर नक्कि आहे रे !!!!!!!!!!!!
6 Jan 2012 - 7:43 pm | श्रावण मोडक
नऊवारी नेसून ये. बाटली मिळेल. का हो सोत्रि?
6 Jan 2012 - 11:14 pm | सूड
म्हणजे?? नऊवारी नेसून येणार्याला सोत्रि बाटली देतात ? तसं असेल तर नकोच येवू बाबा, असा बालगंधर्व बघवणार नाही. :D
7 Jan 2012 - 12:54 am | सोत्रि
मोडक,
ते इथे नाही, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला मिळण्याची शक्यता आहे ;)
असो, तुम्ही माझा पार 'विजय माल्ल्या' करून टाकायचा विचार केलेला दिसतोय ;)
- (लिकर किंग) सोकाजी
4 Jan 2012 - 7:06 pm | श्रीरंग
मी पण नक्की येईन या वेळी.
4 Jan 2012 - 7:21 pm | स्मिता.
कट्ट्याला आमच्या शुभेच्छा!
4 Jan 2012 - 7:34 pm | प्रभो
करा रे मस्त कट्टा!!! फेबुरवारीत भारतात परतलो की अजून करू कट्टे :)
4 Jan 2012 - 11:37 pm | पिंगू
मीपण आहे. यावेळी पुण्यातच पडीक असल्याने कट्ट्याला असेन.
- पिंगू
5 Jan 2012 - 10:16 am | खुन्खार अकिब
हजेरी लावन्यात येईल.......
फक्त फायनल पत्ता कळ्वावा...
5 Jan 2012 - 10:39 am | प्यारे१
अरे चिच्या,
लेकिन आप आओगे तो बाकी सब भाग नही जाएंगे?
जरा अपना नाम तो देख लो|
८ तारखेच्या कट्ट्याला आमची उपस्थिती शाकाहारी नी कोरडी असेल असे विणम्रपणे जाहिर करतो.
5 Jan 2012 - 12:08 pm | सोत्रि
- (आळीमिळी गुपचीळी केलेला) सोकाजी
5 Jan 2012 - 12:27 pm | प्यारे१
आयला, कुण्णी कुण्णी विश्वास ठेवत नाहीये. :(
बघ प्यार्या लेका काय हे तुझे रेपुततिओन. :|
5 Jan 2012 - 12:29 pm | प्रचेतस
अणुभव हीच खात्री.
5 Jan 2012 - 12:31 pm | प्यारे१
मी येऊ का नको? :|
- प्यावड्या ;)
5 Jan 2012 - 12:33 pm | प्रचेतस
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहेच की. :)
5 Jan 2012 - 1:41 pm | सूड
सहीसारखंच बेरींग पकडलंत ब्वॉ !! :D
मी येऊ का नको? :D
5 Jan 2012 - 1:47 pm | मी-सौरभ
@प्यारे१: भावड्या असं चिडायचं असतं हे कुणी शिकवलं तुला???
5 Jan 2012 - 11:34 am | टिवटिव
हात वर केला आहे....!!
5 Jan 2012 - 11:38 am | पियुशा
कट्ट्याला शुभेच्छा! :)
5 Jan 2012 - 1:43 pm | मी-सौरभ
आपल्याला यायला नाही का जमणार :(
.
.
.
.
.
.
.
.
अवांतरः कोण रे तो हा (पियुशा) डु. आय डी आहे अशी शंका घेतोय??
5 Jan 2012 - 3:41 pm | पियुशा
अवांतरः कोण रे तो हा (पियुशा) डु. आय डी आहे अशी शंका घेतोय??
कोण आहे कोण तो ?;)
5 Jan 2012 - 4:24 pm | मी-सौरभ
सूड: तू सांग कोण त्यो ते ;)
5 Jan 2012 - 9:57 pm | सूड
सूड: तू सांग कोण त्यो ते
अळीमिळी गूप चिळी, :)
6 Jan 2012 - 1:03 pm | मी-सौरभ
आता अन्याला विचारावं का धन्याला??
5 Jan 2012 - 11:57 am | निश
कट्ट्याला शुभेच्छा
एक विनंति
कटटा सा़जरा जरुर करा.
मस्त पैकि गप्पा करा.
मस्तपैकि खा .
पण फक्त दारु पियु नका
दारु चे पैसे वाचतिल ते एखाद्या अनाथ आश्रमाला दान द्या.
कदाचित तुमच्या दारुच्या बिलात त्या अनाथ आश्रमातिल मुलांच एका महिन्याच जेवण नीघेल.
मि व माझे मित्र बर्याच वेळा असच करतो .
कृपा करुन राग मानु नये.
परत एकदा कट्ट्याला शुभेच्छा
5 Jan 2012 - 11:59 am | मृत्युन्जय
मी काय म्हणतो, मग ते हाटेलात जाउन जेवण तरी कशाला करायचे? त्याचे वाचलेले पैसे पण अनाथ आश्रमात नाही का देता येणार?
7 Jan 2012 - 10:42 am | स्पा
<गवि मोड ऑन> व्याडेश्वरा रे .... हे बोलायलाच हव होत का <गवि मोड ऑफ >
5 Jan 2012 - 12:25 pm | सुहास..
मी काय म्हणतो, मग ते हाटेलात जाउन जेवण तरी कशाला करायचे? त्याचे वाचलेले पैसे पण अनाथ आश्रमात नाही का देता येणार? >>>>.
हा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा
हा हा हा हा
हा हा हा
हा हा
हा
5 Jan 2012 - 1:10 pm | सर्वसाक्षी
एकत्र या, खा, प्या, गप्पा मारा, खूप मजा करा!
कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा
5 Jan 2012 - 2:17 pm | स्वाती दिनेश
कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
नंतर फोटोंसहित वृत्तांत टंकायला विसरु नका.
स्वाती
5 Jan 2012 - 6:10 pm | तिमा
कट्ट्याला शुभेच्छा! कधी नव्हे ते हजेरी लावणार असे ठरवले होते. पण ८ तारखेला जमणे अशक्यच. तेंव्हा पुढच्या वेळेस. तोवर वृत्तांतावरच समाधान!
6 Jan 2012 - 4:52 pm | गवि
९९ वर का अडून बसलंय घोडं??
ये शंभर..
6 Jan 2012 - 5:06 pm | प्यारे१
कशाला सिझेरीयन केलंत गवि? ;)
नैसर्गिक झाली असती ना?
6 Jan 2012 - 5:19 pm | गवि
हॅ हॅ हॅ..
मला वाटले ब्रीच प्रेझेंटेशन आहे की काय? म्हणून म्हटले अडवणूक सोडवावी.
6 Jan 2012 - 5:19 pm | अत्रुप्त आत्मा
@कशाला सिझेरीयन केलंत गवि? ;-)
नैसर्गिक झाली असती ना?>>> त्यांना मुहुर्त चांगला वाटला असेल... ;-)
6 Jan 2012 - 6:08 pm | वपाडाव
अरे... काही लाजा आहेत का नाही रे तुम्हाला....
6 Jan 2012 - 5:37 pm | मृत्युन्जय
च्यायला पुणेरी कट्ट्याचे धागे कधीपासुन शंभरी गाठायला लागले?
7 Jan 2012 - 10:28 am | प्यारे१
ते देखील होणार्या कटट्याचे.
झालेल्या नाही. ;)
7 Jan 2012 - 11:47 am | चिंतामणी
पाण्यात राहून माशांशी वैर >) >-) :evil:
6 Jan 2012 - 8:26 pm | शशिकांत ओक
विचार चालू आहे.
नाडी हा विषय सोडून बोलणार असाल तरच जावे असे मित्रांनी सांगितले आहे.
7 Jan 2012 - 5:02 pm | किचेन
मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना करावा. .
व्यनि ....म्हण्जे काय?
7 Jan 2012 - 5:05 pm | किचेन
धन्यु लिहयचि विसरलेच!
7 Jan 2012 - 7:42 pm | भीमाईचा पिपळ्या.
कट्ट्यास शुभेच्छा
9 Jan 2012 - 12:40 am | मोदक
झकास झाला कट्टा..
आता कोकण ट्रिप चे तेवढे लवकर ठरवा.
मोदक.