नुतनवर्षाच्या हार्दीक शुभेछा

मयुरपिंपळे's picture
मयुरपिंपळे in काथ्याकूट
30 Dec 2011 - 11:34 pm
गाभा: 

नुतनवर्षाचे स्वागत कसे करायचे कळत नाहीये.
चला पटा पट सांगा, उद्या काय काय करणार आहात.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

31 Dec 2011 - 2:43 am | प्रभाकर पेठकर

अजून २०११ हे वर्ष संपलेले नाही. अशा परिस्थितीत नविन वर्षाचे स्वागत करणे म्हणजे मृत्यूशय्येवर पडलेल्या माणसासमोरच मर्तिकाच्या सामानाची मागणी नोंदविणे आणि सरपण आणून चिता उभारणे असे आहे. एवढी घाई कसली आहे?
२०११ संपू द्या. नंतर स्वागत आणि अभिनंदन करूया नववर्षाचे.

Free software (मुक्त प्रणाली ?) चे पुरस्कर्ते रिचर्ड स्टालमन आणि ड्रीस बायटर्ट यांच्या सोबत, एकाच पंक्तीत proprietary software चा स्टीव्ह जॉब्स याला बघून वाईट वाटले.

(FLOSS चा समर्थक ) उदय

मयुरपिंपळे's picture

31 Dec 2011 - 9:16 am | मयुरपिंपळे

रिचर्ड स्टालमन याची ग्नु
स्टीव्ह जॉब्स याची apple आणी
ड्रीस बायटर्ट याचे द्रुपल

ह्या सर्वाचा नाडी एकच आहे ती म्हणजे युनीक्स.
युनीक्स सर्वाची आई असल्यामुळे सर्व मुले एका छायाचित्रात आली आहेत.

प्रचेतस's picture

31 Dec 2011 - 9:44 am | प्रचेतस

आणि वडील कोण आहेत?

अत्रुप्त आत्मा's picture

31 Dec 2011 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा

आणि वडील कोण आहेत? :bigsmile: साफ खपलेलो आहे....

मयुरपिंपळे's picture

31 Dec 2011 - 7:53 pm | मयुरपिंपळे
सुहास झेले's picture

31 Dec 2011 - 3:39 pm | सुहास झेले

ख्या ख्या ख्या.... ;)

मित्र हो,

ह्या सर्वाचा नाडी एकच आहे ती म्हणजे युनीक्स.

आपणा सर्व मिपाकरांना 2012 नव वर्षासाठी अभिष्ट चिंतन.
From
मराठी पुस्तक नाडी ग्रंथ भविष्य आवृती
" alt=
"मिपाकरांची नाडी " />

सर्वसाक्षी's picture

31 Dec 2011 - 10:10 am | सर्वसाक्षी

नव्या वर्षाचे स्वागत जरा जपून. मुपो नी जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. रात्रौ सरकारी हुंगेगिरी जोरात असणार. यावेळी सापडलेल्या मद्यप्यांकडुन त्यांनी जिथे मद्यप्राशन केले त्या बारवरही पोचायचा प्लॅन आहे. म्हणजे आधी बेवड्याकडुन दंड मग बारवाल्याने विनापरवाना पाजली म्हणुन त्याच्या कडुनही.

इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!

स्वातीविशु's picture

31 Dec 2011 - 1:04 pm | स्वातीविशु

इंग्रजी नववर्षाच्या सर्व मिपाकरान्ना हार्दिक शुभेच्छा!

दादा कोंडके's picture

31 Dec 2011 - 3:15 pm | दादा कोंडके

खालच्या प्रतिक्रिया वाचेपर्यंत जॉब सोडला तर इतर दोन कोण आहेत हे मला कळलच नाही.
ही लोकं मोठ्ठी असतेलही पण एव्हडं उदो-उदो करण्याचं कारण कळलं नाही. २०११ मध्ये यांच्यापेक्षा जवळची, मायेची लोकं देवानं हिरावून नेलियेत. घारेकाकांचा हा लेख वाचा.

अविनाशकुलकर्णी's picture

31 Dec 2011 - 4:47 pm | अविनाशकुलकर्णी

काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या ।
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या
मद्य सत्य - जगत मिथ्या...मद्याचार्य
मित्रांनो वर्ष संपत आले..आज नव वर्षाची धुंद संध्या...
नव्या वर्षाचे स्वागत करु यात..नवि उमेद ..नवे संकल्प..नव्या आशा..नवे मित्र..
सर्व..मित्रांना नव वर्षाच्या शुभेछ्या..
आपल्या सा~या आशा आकांक्षा..इरादे..संकल्प.. मनासारखे पुर्ण होवोत हिच त्या प्रभुचरणी प्रार्थना

पक पक पक's picture

31 Dec 2011 - 5:52 pm | पक पक पक

लय भारी !

काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या ।
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या
मद्य सत्य - जगत मिथ्या...मद्याचार्य
मित्रांनो वर्ष संपत आले..आज नव वर्षाची धुंद संध्या...
नव्या वर्षाचे स्वागत करु यात..नवि उमेद ..नवे संकल्प..नव्या आशा..नवे मित्र..
सर्व..मित्रांना नव वर्षाच्या शुभेछ्या..
आपल्या सा~या आशा आकांक्षा..इरादे..संकल्प.. मनासारखे पुर्ण होवोत हिच त्या प्रभुचरणी प्रार्थना

नववर्षाच्या हार्दीक आणी (अल्कोहोलिक्)शुभेच्छा!!!!!

मूकवाचक's picture

31 Dec 2011 - 11:35 pm | मूकवाचक

इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!

अन्या दातार's picture

31 Dec 2011 - 11:52 pm | अन्या दातार

रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये.

असो, तरीपण आता धागा काढलाच आहात तर, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

चिंतामणी's picture

1 Jan 2012 - 12:01 am | चिंतामणी

नुतनवर्षाच्या हार्दीक शुभेच्छा

चिरोटा's picture

1 Jan 2012 - 12:05 am | चिरोटा

आले बर का २०१२. उड्या मारा आता.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2012 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा

उड्या ;-)
उड्या ;-)
उड्या ;-)
उड्या ;-)
उड्या ;-)
उड्या ;-)
उड्या ;-)

आलं रे आलं...१२चं वर्ष आलं :-D

समस्त मिपापरिवाराला आणि आप्तेष्टांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2012 - 12:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समस्त मिपाकर मित्र मैत्रींनींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

कौशी's picture

1 Jan 2012 - 8:35 am | कौशी

समस्त मिपापरिवाराला नविन वर्षाच्या शुभेच्छा!!!

आनंद घारे's picture

1 Jan 2012 - 8:57 am | आनंद घारे

'इंग्रजी इंग्रजी' करणार्‍यातल्या एकाला तरी आजची तिथी, पक्ष, मास, संवत्सर, शक वगैरे सांगता येईल का?
कृपया पंचांग न बघता सांगून पहा.

कॅलेंडर ही काही इंग्रजांची मालमत्ता नाही. फक्त इंग्रजांच्याच नव्हे तर आता आमच्यासुध्दा झालेल्या नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर's picture

1 Jan 2012 - 2:47 pm | प्रभाकर पेठकर

'इंग्रजी इंग्रजी' करणार्‍यातल्या एकाला तरी आजची तिथी, पक्ष, मास, संवत्सर, शक वगैरे सांगता येईल का?

आम्हाला तर आजची इंग्रजी तारीख, महिनाही सांगता येत नाही. मनगटी घड्याळात किंवा भिंतीवरील दिनदर्शिकेत पाहावे लागते.

कालगणना ही कोणाचीच मक्तेदारी नाही. पण जे 'कॅलेंडर' आपण वापरतो ती आपण स्विकारलेली एक वेगळी कालगणना आहे.

संकष्टीचतुर्थी, अंगारकी, मराठी सण, अमावस्या-पौर्णिमा आणि चंद्रकला ह्या इंग्रजी कॅलेंडरात दाखवत नाहीत त्यासाठी मराठी पंचांग, दिनदर्शिकाच पाहावी लागते. ती आपली कालगणनेची पद्धत आहे आणि ती अजून तरी वापरात आहे. आपले मराठी वर्ष चैत्र प्रतिपदेस सुरू होते. तेव्हाही आपण अनेकांना शुभसंदेश पाठवत असतो. तेंव्हा दोन कालगणनेत संदर्भासाठी फरक करणे ह्यात गैर ते काय? इंग्रजी कॅलेंडर स्विकारले आहे म्हणूनच इंग्रजी नववर्षाचा जल्लोष करतो.

श्री. आनंद घारे खुप लेखन करतात, कोणे एके काळी लिहीते असण्यार्‍या प्रभाकर पेठकरांचे लेखन आता कोणाला आठवतही नसेल, पण म्हणून प्रभाकर पेठकरांना विसरून कसे चालेल? एक मिपासदस्य म्हणून तरी त्यांचे वेगळेपण मान्य असावे. त्या प्रमाणेच, दोन वेगवेगळ्या कालगणनांना त्यांच्या त्यांचा नांवानेच ओळखले जाते.

तसेही, आजही, मराठी तिथी, मास, पक्ष, संवत्सर वगैरे वगैरे माहित असणारी मराठी जनता महाराष्ट्रात आहे.

आग्रह नाही परंतू मिसळपावसारख्या, मराठी भाषेस वाहिलेल्या, संस्थळाने मराठी तिथी, मास, संवत्सर आदी माहिती मुखपृष्ठावर देण्यास आरंभ केल्यास त्याचे स्वागतच करू.

धन्यवाद.

आनंद घारे's picture

2 Jan 2012 - 9:50 pm | आनंद घारे

आपल्या सणवारांसाठी मराठी कालगणना हवीच. कारण आकाशामधील चंद्राच्या स्थानावरून तिथी ठरतात. कोजागिरीसाठी पौर्णिमाच हवी आणि दिवाळीसाठी अमावास्या हवी. मकर संक्रांत हा बहुधा एकमेव सण सौर कालगणनेनुसार असल्यामुळे ठराविक तारखेला येतो
पण ज्या कालगणनेचा आपण रोजच्या जीवनात उपयोग करतो तिला इंग्रजी म्हणून हिणवण्याने काय साध्य होणार आहे? ज्या कामासाठी आपण ही कालगणना वापरतो त्यासाठी तीसुद्धा आता आपलीच आहे. सणवारासाठी महाराष्ट्रात शालिवाहन शक आहे, उत्तर भारतात विक्रम संवत आहे. ते देखील आपलेच आहेत.

जर आपण शर्ट, पँट, ब्रेड, बिस्किटे, केक यांना आपले करू शकतो आणि कुर्ता, पायजामा, साडी, सलवार कमीज, पोळी, भाजी वगैरेंनासुद्धा आपलेच म्हणतो, तर १ जानेवारीला परक्यांचे असे का समजायचे? १ जानेवारीला नववर्षदिन म्हंटल्याने गुढी पाडवा आणखी एक नववर्षदिन म्हणून साजरा करण्याला अडथळा येण्याचे कारण नाही.

इंग्रजी नववर्षसण साजरा करत असाल तर भारतीय पंचांग सोडून द्या असे मी कधीच म्हंटलेले नाही.

प्रभाकर पेठकर's picture

3 Jan 2012 - 1:16 am | प्रभाकर पेठकर

ज्या कालगणनेचा आपण रोजच्या जीवनात उपयोग करतो तिला इंग्रजी म्हणून हिणवण्याने काय साध्य होणार आहे?

इंग्रजी कालगणनेला इंग्रजी म्हंटल्याने हिणवले जाते हा आपला घोर गैरसमज आहे. तो सोडून द्या. मराठी नववर्षाच्या शुभेच्छा पाठवताना मी 'मराठी नववर्ष' असे आवर्जून लिहीतो. त्याने मराठी नववर्षास हिणवले जाते असे मला वाटत नाही. तसेच 'इंग्रजी नववर्षास' इंग्रजी नववर्ष म्हंटल्याने हिणविले जाते असेही मला वाटत नाही. माणसांना जशी वेगवेगळी नांवे आहेत तशीच वेगवेगळ्या कालगणनांना त्यांचे त्यांचे नामाभिमान आहे. हाच मुद्दा मी ह्या आधीही प्रतिपादिला आहे.
आपल्याला हे पटत नसेल तर जे आपल्याला पटते त्यानुसार शुभेच्छा पाठवा. पण ज्यांना त्यांच्या इच्छेनुसार शुभेच्छा पाठवायच्या असतील त्यांना कमी लेखू नका, ही विनंती.

आनंद घारे's picture

3 Jan 2012 - 6:16 pm | आनंद घारे

माझ्या ओळखीतल्या एका 'राष्ट्रभक्त' सद्गृहस्थाने मी दिलेल्या नववर्षाच्या सदीच्छा चक्क नाकारल्या होत्या आणि मला राष्ट्रीयतेवर 'बौद्धिक' दिले होते. शिवाय ईमेल आणि एसएमएसवरून मला जे ढीगभर संदेश आले होते त्यात कोणीही इंग्रजी, इंग्लिश वगैरे विशेषणांचा उपयोग केला नव्हता. त्यामुळे माझा थोडा गैरसमज झाला होता. तो दूर केल्याबद्दल आभार.
हा काथ्या इथे कुटायला बरा वाटला म्हणून मी आणला होता. त्यात कोणालाही कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणाचा तसा गैरसमज झाला असल्यास क्षमा करावी.

अन्या दातार's picture

1 Jan 2012 - 4:25 pm | अन्या दातार

प्रत्येक कालगणनेचे जे वैशिष्ट्य आहे ते स्पेसिफाय केल्याने काय बिघडते? पारशी नववर्ष सुद्धा वेगळे दाखवले जातेच की. इंग्रजी या शब्दात हीनता अपेक्षित नसावी कुणाला. तुम्हालाच झोंबलेले दिसतेय.

मदनबाण's picture

1 Jan 2012 - 9:24 am | मदनबाण

समस्त मिपाकरांना नविन वर्षाच्या शुभेच्छा ! :)
हे वर्ष सर्वांना सुखाचे,आनंदाचे आणि चांगल्या आरोग्य लाभण्याचे ठरो...

चला झाल्या का शुभेच्छा देउन, मा. संपादक मंडळ उडवा बरं हा धाग आता..

चिरोटा's picture

1 Jan 2012 - 12:13 pm | चिरोटा

जरा दमाने. अमेरिकेत कोंबडा आरवायचाय.

'' मिपा," " समस्त मिपाकर ", " मिपा चाहते" यांस ,

नुतन वर्ष २०१२ साठी हार्दीक शुभेच्छा....!!!!!

हे नुतन वर्ष २०१२ सर्व " मिपापरिवारांस" आनंदाचे, सुख्-समृध्दीचे, व भरभराटीचे जावो........!!!!!!!!!!!!!