आज देशात शिक्षण व रोजगार या क्षेत्रात मागासलेल्या समाजातील तसेच आर्थीकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिले जाते. या आरक्षण देण्याला विरोध असण्याचे कारण नाही. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा ज्याना न्याय मिळालेला नाही त्यांचेसाठी आर्थीक व सामाजीकदृष्ट्या पुढारलेल्या लोकांना थोडा त्याग करावा लागला तर अजीबात विरोध असू नये. मात्र आता ज्या पध्दतीने आरक्षणाचा लाभ घेतला जात आहे व त्यामुळे होणा-या परिणामांचा विचार करता या धोरणात काही बदल करणे आवश्यक आहे असे वाटते.
सध्या वस्तुस्थिती अशी आहे कि, समजा अ हि व्यक्ती मागासलेल्या समाजातील आहे व त्यायोगे त्याला एखादा चांगला रोजगार मिळाला. पुढे होते काय कि अ ह्याच आरक्षणाचा फायदा हा फक्त त्याच्याच कुटुंबातील व्यक्तीला कसा मिळेल हे पाहू लागतो. त्याच्या मुलांचा, मुलांच्या मुलांचा सामाजीक व आर्थीक स्तर सुधारला तरीसुध्दा त्यांची मुले निव्वळ एका विशिष्ठ समाजात जन्माला आली या पुण्याईच्या जोरावर हाच लाभ वंशपरंपरागत मिळवत रहात आहेत व त्यामुळे मागासलेल्या समाजातील अन्य लोकांना याचा खरा फायदा मिळाला पाहिजे ते मात्र या फायद्यापासून वंचीत रहात आहेत हि वस्तूस्थिती समाजात दिसून येत आहे. या मुळे मा. श्री. बाबासाहेबानी ज्या हेतूने हे आरक्षण दिले जावे हि मागणी केली त्या हेतूचा लाभ समाजातील एका विशीष्ठ व्यक्तींपुरताच मर्यादित रहात आहे त्यामुळे हा हेतू खरोखर साध्य झाला का याचा आता विचार सर्वानीच करण्याची गरज आहे. यावर काहीतरी मार्ग हा काढलाच पाहिजे अन्यथा मागासलेल्या जातीतच मोठी दरी भविष्यात पडेल.
आज असे दिसते कि ज्या व्यक्तीना हा लाभ मिळाला कि ते प्रथमत: त्यांच्या समाजाच्या वस्तीतून दुस-या वस्तीत रहावयास जातात. त्यांच्याच समाजातील अन्य मागासलेल्या लोकांपासून ते स्वत:ला वेगळे समजू लागतात व तसेच ते वर्तन करु लागतात. त्यांच्याच मुलाना वंशपरंपरागत हाच लाभ कसा मिळत राहील याची काळजी घेताना दिसतात. तसेच त्यांच्या मुला - मुलींचे विवाह करताना त्यांच्या स्तरातील त्यांच्या समाजातच विवाह करण्याची काळजी घेतात, अन्य वंचीत समाजातील स्थळे नाकारली जातात. यामुळे होत आहे काय कि याच समाजात आणखीन एक सधन आणि पुढारलेला समाज निर्माण होताना दिसत आहे जो दुस-यांवर अन्याय करताना दिसत आहे. आणि म्हणूनच आरक्षणाच्या धोरणात काही महत्वपुर्ण बदल केले गेले जावेत हि काळाची गरज आहे. ते बदल खालीलप्रमाणे असावेत असे वाटते.
१) एकदा का एखाद्या व्यक्तीला आरक्षणामुळे किमान सरकारी नोकरी मिळाली कि त्याच्या मुलाना हा लाभ मिळणे बंद झाले पाहिजे, त्याना सर्वसाधारण नागरीकांप्रमाणेच शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या मुळे ज्या अन्य व्यक्तीना या सवलतीची जास्त गरज आहे त्याना ती मिळेल. तसेच ज्याना हा लाभ मिळालेला आहे ते त्याचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत.
२) ज्या मागासलेल्या समाजातील व्यक्तींचा आर्थीक स्तर सुधारलेला असून जे उच्च मध्यमवर्गात अथवा उच्च उत्पन्न गटात मोडू लागले आहेत त्यांच्या मुलाना हा आरक्षणाचा लाभ बंद झाला पाहिजे, या साठी आवश्यक तर उत्पन्नाची मर्यादा ठरवली जावी. शक्यतो आयकर भरणारी व्यक्तीला/त्याच्या मुलाना हा लाभ मिळता कामा नये.
हे प्राथमीक विचार आहेत यात समाजातील सर्वच स्तरावर विचार मंथन व्हावे व खरोखर मागासलेल्या लोकाना या सवलतींचा लाभ कसा मिळेल या साठी सर्वानीच प्रयत्न केले पाहिजेत.
यावर जास्तीत जास्त उपाय व पर्याय सुचवले जाणे अपेक्षीत आहे.
ज्याना वरील विचार पटत असतील त्यानी या ब्लॉगवर नोंदणी करावी.
प्रतिक्रिया
23 Dec 2011 - 8:10 pm | अमोल खरे
हे विचार अनेक वर्षांपासुन आहेत. नियम बदलणार कोण / बदलुन देणार कोण ते सांगा...... आजच्या तारखेला शिवसेना आणि मनसे सोडुन सर्वजण आरक्षण पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे उच्चवर्णियांनी पैसा असेल तरच मेडिकल / ईंजिनियरिंग ला जावे नाहितर मुकाट्याने कॉमर्स ला जावे आणि सीए, सीएस असे स्वस्त पण लाँगरन मध्ये फायद्याचे ठरु शकतील असे अभ्यासक्रम निवडावेत. (हल्ली आयसीडब्लु ला जास्त ओपनिंग नाहीयेत असं आत्ताच आयसीडब्लु करुन पस्तावलेला एक सांगत होता.) चांगल्या कॉलेजातुन मिळाले तर एम.बी.ए करावे. जर जास्त पैसा असेल तर अमेरिकेत शिकायला जाऊन तेथेच सेटल व्हावे. सेटल व्हायचे नसल्यास १०-१५ वर्षे काम करुन परत यावे. पण इथे आरक्षणाचे नियम वगैरे बदलतील अशा भाबड्या आशेवर राहु नये. भाषण संपले. जय हिंद. जय महाराष्ट्र.
23 Dec 2011 - 9:15 pm | जोशी 'ले'
एकदम खरे बोललात,..
23 Dec 2011 - 10:23 pm | लॉरी टांगटूंगकर
१००% मान्य ,
सेटल व्हायचे नसल्यास १०-१५ वर्षे काम करुन परत यावे. पण इथे आरक्षणाचे नियम वगैरे बदलतील अशा भाबड्या आशेवर राहु नये. जय हिंद. जय महाराष्ट्र.!!!!!!!!!!!!!
पटत असून register करत नाहीये :(
23 Dec 2011 - 8:50 pm | मराठी_माणूस
१) एकदा का एखाद्या व्यक्तीला आरक्षणामुळे किमान सरकारी नोकरी मिळाली कि त्याच्या मुलाना हा लाभ मिळणे बंद झाले पाहिजे, त्याना सर्वसाधारण नागरीकांप्रमाणेच शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या मुळे ज्या अन्य व्यक्तीना या सवलतीची जास्त गरज आहे त्याना ती मिळेल. तसेच ज्याना हा लाभ मिळालेला आहे ते त्याचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत.
जर पिढ्यान पिढ्या वंचीत ठेवले असेल तर फक्त एकच पिढी सवलत देउन काढुन घेणे योग्य आहे का ?
23 Dec 2011 - 9:00 pm | अन्या दातार
या वाक्यावर तीव्र आक्षेप. यातून ब्राह्मण समाज नेहमीच इतरांवर अन्याय करतो असे प्रतीत होत आहे; जे वस्तुस्थितीला धरुन नाही.
23 Dec 2011 - 9:08 pm | मराठी_माणूस
सहमत
23 Dec 2011 - 10:59 pm | अर्धवटराव
.
अर्धवटराव
24 Dec 2011 - 6:28 pm | श्रीरंग
सहमत. लेखकाने त्वरित वरील आक्षेपार्ह वाक्य दुरुस्त करावे.
25 Dec 2011 - 2:07 pm | श्रावण मोडक
हे आक्षेपार्ह वाक्य मला तरी दिसले नाही. पण बरं झालं, तुमच्या प्रतिसादामुळं ते कुठं तरी असावं हे कळलं. ;)
25 Dec 2011 - 5:25 pm | अन्या दातार
संपादित झाल्यानंतर कुणालाच दिसले नाही :P
28 Dec 2011 - 11:50 am | सदानंद ठाकूर
ब्राह्मण शब्द जातीवाचक अभिप्रेत नाही,
म्हणून बदल करणे आवश्यक वाट्त नाही.
28 Dec 2011 - 3:11 pm | मोदक
तरीही आक्षेप...
दुसरे शब्द वापरा की राव.. स्वतःच्या चांगल्या धाग्याचा खरडफळा झाला आणि चर्चा (झालीच तर..!) पॉझिटिव्ह स्पिरिट मध्ये होईल असे (दुर्दैवाने)वाटत नाही.. :-(
संतुलीत चर्चा होण्यासाठी लेख (आणि लेखक) संतुलीत विचाराचे असणे गरजेचे असते.
पुलेशु.
मोदक.
23 Dec 2011 - 9:39 pm | पान्डू हवालदार
मा. सपादक,
".... .... आणखीन एक ब्राह्मण समाज निर्माण होताना दिसत आहे जो दुस-यांवर अन्याय करताना दिसत आह"
हे वाक्य मी. पा. च्या धोरणात बसते काय? बाकी लेखा बद्द्ल काही आक्शेप नाही.
23 Dec 2011 - 10:26 pm | जानम
सहमत
24 Dec 2011 - 12:01 am | मोदक
सहमत
(आता तर अशा विचारसरणीकडे फक्त अतीव करूण नजरेने पहावेसे वाटते.. बुद्धिभेद करणारे करतात.. करवून घेणारे करवून घेतात आणि नंतर करतात फुकाचा दंगा... )
कोठेतरी वाचले होते.. पू. बाबासाहेबांनी घटनेमध्ये असे लिहिले आहे की "हे आरक्षण २ पिढ्यांनंकरा(५० वर्षे ) नाहीसे करा.. याची काहीही गरज राहणार नाही.. " हे खरे आहे काय..?
मोदक
24 Dec 2011 - 11:53 am | विनायक प्रभू
सर्व आरक्षण वाल्यांना २% अधीक व्याज मिळावे अशी मागणी पार्लमेअँट मधे करणार आहेत असे कानावर आले.
23 Dec 2011 - 11:59 pm | मोदक
-
24 Dec 2011 - 1:34 am | प्रभाकर पेठकर
यामुळे होत आहे काय कि याच समाजात आणखीन एक ब्राह्मण समाज निर्माण होताना दिसत आहे जो दुस-यांवर अन्याय करताना दिसत आहे.
@संपादक मंडळ,
जातीवाचक ताशेरे वगळल्यास लेखावर विचार करता येईल.
24 Dec 2011 - 11:28 am | चावटमेला
संपादक मंडळी,
अशा जातीवाचक विधानावर आक्षेप
स्वगत :- चांगल्या विचारांच्या नावाखाली हळूच जातीभेदक गरळ का ओकण्यात येते?
24 Dec 2011 - 1:52 pm | Pain
इतका वेळ होउनही एकही संपादक फिरकला नाही. आत्ता ऑनलाईन असलेल्यांनाही अजिबात फिकिर नाही.
जे भारत सरकारचे (कॉग्रेसचे) धोरण तेच मिपा प्रशासनाचे.
ब्राह्मणांवर गरळ ओकली तर चालते, इतरांविषयी बोलले की ती जातीवाचक शिवीगाळ.
हिंदूधर्मियांच्या देवतांची आक्षेपार्ह चित्रे चालतात, त्यांच्या चित्रकाराची भलावण करणारे लेख येतात आणि विरोधकांच्या बुद्धीची कीव करण्यात येते पण प्रेषिताच्या धर्माची किंवा त्याच्या पाईकांच्या कृत्यांची चर्चा जरी केली तरी लगेच प्रतिसाद उडवणे, धागा वाचनमात्र करणे इत्यादी इत्यादी
24 Dec 2011 - 7:15 pm | पार्टनर
वरील सर्व मतांशी सहमत, हा अकारण ब्राह्मणविरोध कशाकरता? सदर वाक्यावर तीव्र आक्षेप.
यावर त्वरीत योग्य ती कृती घडावी अशी संपादकांना विनंती.
-पार्टनर
24 Dec 2011 - 10:40 pm | आशु जोग
मिसळीवरही आरक्षण आहे काय !
(शंकिष्ट) जोग
25 Dec 2011 - 12:37 am | मोदक
धन्य आहात हो...
चला आता ब्राह्मण समाज सधन आणि पुढारलेला (का) आहे यावर पण एक मताची पिंक येऊ दे... "अमेरीकेची आर्थिक दुरवस्था" वगैरे एखादा लेख लिहून त्यात द्या घुसडून मनातली मळमळ...
लेख वास्तववादी आहे, विचार करण्यास भाग पाडतो.. पण "महाबळ भट्टी प्रयोग" शिवाय वेगळे काय साध्य करणार हे ही कालांतराने स्पष्ट होईलच.
>>>>>>कोठेतरी वाचले होते.. पू. बाबासाहेबांनी घटनेमध्ये असे लिहिले आहे की "हे आरक्षण २ पिढ्यांनंतर (५० वर्षे ) नाहीसे करा.. याची काहीही गरज राहणार नाही.. " हे खरे आहे काय..?
तुम्हीही शंकानिरसन केले तरी चालेल.
मोदक.
25 Dec 2011 - 12:57 am | प्रभाकर पेठकर
अभिनंदन, संपादक मंडळ.
आरक्षण ह्या मुद्यावर ह्या आधीही भरपूर चर्चा झाली आहे. आरक्षण जातीनिहाय न करता आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटासाठी फक्त शिक्षणापुरते मर्यादीत असावे. त्यातही, अभियांत्रिकी, वैद्यकिय तत्सम क्षेत्रात नसावे असे वाटते.
25 Dec 2011 - 1:27 pm | शाहिर
६० वर्षे काय आरक्षण मिळाले तर लगेच गळा काढतात ..
अजुनही भटक्या जमाती , कित्येक दलीत बांधवना माहीत नाहिये कि त्यांना आरक्षण आहे ..
नोकरीपर्यंत पोचायला शिक्षण लागते ..त्या साठी फी ...नंतर मागच्या पिढ्याचा खड्डा भरून काढायचा...
>>शक्यतो आयकर भरणारी व्यक्तीला/त्याच्या मुलाना हा लाभ मिळता कामा नये.
आयकर मर्यादा २ लाख आहे ..अणि जगण्याचा खर्च किती ?
तरीसुद्धा त्यांच्या मुलाला आरक्षण द्यायचे नाही म्हनजे अति आहे ..
>> आज असे दिसते कि ज्या व्यक्तीना हा लाभ मिळाला कि ते प्रथमत: त्यांच्या समाजाच्या वस्तीतून दुस-या वस्तीत रहावयास जातात. त्यांच्याच समाजातील अन्य मागासलेल्या लोकांपासून ते स्वत:ला वेगळे समजू लागतात व तसेच ते वर्तन करु लागता
हे संपूर्ण वैयक्तीक मत आहे ..सदर लेखकाला फक्त वर्तुळा बाहेरून टीका करायची आहे ..
अहो अॅड्मिशन आरक्षणामुळे मिळाली तरी तोच अभ्यासक्रम आणि त्याच परीक्षा देवुन मुले पास होतात ..याचा अर्थ ती बुद्धिमत्तेत कुठेही मागे नसतात..हे हुच्च वर्णीय सोयीस्कर रीत्या विसरतात..
25 Dec 2011 - 2:42 pm | संपादक मंडळ
सदरहू धाग्यातील आक्षेपार्ह वाक्य आणि प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत याची संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारचे जातीय उल्लेख टाळावेत ही विनंती. धन्यवाद!
25 Dec 2011 - 9:39 pm | मनीम्याऊ
अजुनही भटक्या जमाती , कित्येक दलीत बांधवना माहीत नाहिये कि त्यांना आरक्षण आहे ..
नोकरीपर्यंत पोचायला शिक्षण लागते ..त्या साठी फी ...नंतर मागच्या पिढ्याचा खड्डा भरून काढायचा...
----आहो, खेडेगावतील कित्येक लोकाना प्राथमिक शि़क्षण मोफत आहे हे सुदधा माहीत नाहीये. हा लोकाना Govt. कडून माहीती योग्य प्रकारे न मिळ्ण्याचा issue आहे. विषयाना जातींच लेबल का लावायच? माहीती फक्त उच्च वर्णीय लोकांच्या कानात सन्गितली जाते का? ज्या भागातील भटक्या जमाती , कित्येक दलीत बांधवाना माहित नसेल तिथे कोणालच नसेल ना?
आयकर मर्यादा २ लाख आहे ..अणि जगण्याचा खर्च किती ?
तरीसुद्धा त्यांच्या मुलाला आरक्षण द्यायचे नाही म्हनजे अति आहे ..
---- जगण्याचा खर्च जाती आणि धर्म बघून apply होत नाही. दाळ तांदळाचा खर्च सर्वानाच इथे सारखा!
आरक्षण आर्थिक स्थिति वर आधरित हवे.
अहो अॅड्मिशन आरक्षणामुळे मिळाली तरी तोच अभ्यासक्रम आणि त्याच परीक्षा देवुन मुले पास होतात ..याचा अर्थ ती बुद्धिमत्तेत कुठेही मागे नसतात..हे हुच्च वर्णीय सोयीस्कर रीत्या विसरतात..
---- हा केवळ पोकळ युक्तिवाद आहे. बुद्धिमत्तेत कमी नसतात तर मग अॅडमिशन घेण्यासाठी आरक्षण का लागतं असं म्हणलं तर?
27 Dec 2011 - 11:49 am | शाहिर
पाझरणे हा नियम पाणी, पैसा आणि ज्ञान यांना लागु आहे ..म्हणून आरक्षण हवा
27 Dec 2011 - 12:36 pm | Dipankar
अहो पण आता जे लोक आरक्षणामुळे सुस्थितीत आहेत त्यांचाच पुढील पिढ्या त्याचे फायदे उचलत आहेत, ज्यांना गरज आहे ते ( आरक्षित वा खुल्या वर्गातील ) मात्र वंचित होत आहेत
25 Dec 2011 - 10:44 pm | ajay wankhede
आज हि अनु.जमातिच्या सवलती कोण लाटतोय ?
जरा खोलात जाऊन शोधा ....
27 Dec 2011 - 5:37 pm | ऋषिकेश
जातीव्यवस्था ही समाजाला लागलेली कीड आहे व समाजासाठी घातक आहे हे जितके सत्य आहे तितकेच त्यांचे अस्तित्त्व व त्यामुळे काहि ठराविक समाजाचे मागासले राहणे हे देखील सत्यच आहे
आरक्षण असावे की नसावे या प्रश्नावर मीही कित्येक वर्ष "आरक्षण कशाला हवे?" वगैरे म्हणत असे. नंतर आरक्षण हवे असे मत झाल्यानंतर "जातीच्या आधारावर का?" या प्रश्नाने छळले.
केवळ बाबासाहेब आंबेडकर घटनासमितीचे अध्यक्ष होते म्हणून आरक्षण आले असे जर कोणाला वाटत असेल तर त्यात फारसे तथ्य नाही. या विषयावर घटना बनते वेळी अतिशय चांगली चर्चा झालेली आहे. ती वाचावी. (घटनासमितीतील चर्चेवर लिहिणे इथे अवांतर नसले तर पसार्याचे ठरेल.)
याशिवाय दरवेळी आरक्षणाचा कालावधी वाढवायची वेळ येते तेव्हाही भारतात सर्व जातींमधे-सर्व स्तरावर फायदा पोचलाय का हेही पद्धशीरपणे बघितले जाते व त्याचा रिपोर्ट संसदेपुढे मांडला जातो.
तुर्तास फक्त इतके लिहितो की केवळ घटनासमितीचीच चर्चा वाचुन असे नव्हे मात्र 'जात' ही एकमेव नसला तरी आरक्षण देण्यासाठी एक महत्त्वाचा घटक- क्रायटेरीया (मराठी?) आहे या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. एका पिढीनंतर त्या कुटुंबासाठी आरक्षण रद्द करणे घाईचेच नव्हे तर मुलांसाठी (व पालकांसाठीही) अन्यायकारक वाटते. जात + आर्थिक स्थिती या जोडगोळीवरून आरक्षण देणे ठरवावे (त्यातही एखाद्याची प्रत्यक्ष मिळकत समजण्याची खात्रीशीर पद्धत तयार होईपर्यंत जातीलाच प्राध्यान्य द्यावे) असे माझे मत आहे.