आजच्या एक दिवसीय मॅचमधे विरूने २१९ रन्स कुटल्या. भारताने ५० षटकात ४१८ धावा केल्या.
विरूचे अभीनंदन. त्याचे द्विशतक झाले तो क्षण
आजच्या एक दिवसीय मॅचमधे विरूने २१९ रन्स कुटल्या. भारताने ५० षटकात ४१८ धावा केल्या.
विरूचे अभीनंदन. त्याचे द्विशतक झाले तो क्षण
प्रतिक्रिया
8 Dec 2011 - 7:44 pm | प्रीत-मोहर
आमच्या कुंपणीतले सगळे लोक्स आज टीवीसमोर पडिक होते :)
8 Dec 2011 - 9:20 pm | गणपा
मिपाकरांचा तीव्र णिषेढ.
हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या.
आवांतर : सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही.
हॅट्स ऑफ टु यु विरु.
8 Dec 2011 - 9:46 pm | प्रभो
आगलाव्या गणपाशेठचाही णिषेढ.... ;)
8 Dec 2011 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या.
सहमत आहे. सच्याच्या नावातलं नुसतं 'स' जरी दिसलं असतं तर कौतुकात
किती लिहू आणि किती लिहू नको असं मिपाकरांना झाल असतं.
एकाच विषयावर दुसरा धागाही असून सेहवाग मिपावर काही चालेना. :)
सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही.
अगदी सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
8 Dec 2011 - 10:30 pm | प्रचेतस
विरूचे अभिनंदन.
भारताकडून कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यातही सर्वोच्च धावा करणारा एकमेव खेळाडू.
9 Dec 2011 - 12:08 am | चिंतामणी
१
9 Dec 2011 - 2:21 am | शिल्पा ब
हा जो कोणी विरु आहे त्याचे मनापासुन अभिनंदन. मला क्रीकेटातलं कै समजत नै पण चांगली कामगीरी केली आहे तर कौतुक का नको करायला?
9 Dec 2011 - 8:20 am | ५० फक्त
विरु म्हणलं की शोले आठवला असेल.
9 Dec 2011 - 9:43 am | प्यारे१
>>>मला क्रीकेटातलं कै समजत नै
कशातलं समजतं? ;)
- प्यारे ढ ;)
9 Dec 2011 - 10:26 am | शिल्पा ब
कशातलंच समजत नै कारण मी कै तुमच्यासारखी विद्वान नै!! ;)
9 Dec 2011 - 1:06 pm | प्यारे१
ओ श्या द्याचं काम नाय आदीच सांगून ठिवायलोय.
इद्वान कुनाला म्हनतासा? ;) ;)
9 Dec 2011 - 7:07 pm | मी-सौरभ
बै ना 'इद्वान' ही शिवी हाय ते बी माहीत णाय ;)
10 Dec 2011 - 7:59 am | शिल्पा ब
आन ह्ये तुम्हास्नी कुनी सांगितलं वो? आँ?
9 Dec 2011 - 9:45 am | जाई.
वीरेंद्र सेहवागचे अभिनंदन
9 Dec 2011 - 9:48 am | दिपक
Brutal Sehwag's hunger knows no bounds -- http://cricketnext.in.com
मजा आली काल सेहवागची फलंदाजी बघताना!!
9 Dec 2011 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार
शिर्षक पाहून फार अपेक्षेने धागा उघडला होता.
तद्दन फालतू, भिकार, चोर, फसव्या, दरेडेखोर लोकांच्या खेळाविषयी काही वाचायला मिळेल असे मात्र वाटले नव्हते.
असो...
आता विरुने २०० रन्सा मारल्या म्हणजे देशासमोरचे २०% प्रश्न सूटायला हरकत नाही.
9 Dec 2011 - 7:08 pm | मी-सौरभ
+१
13 Dec 2011 - 7:38 pm | आत्मशून्य
ज्याची खरीच योग्यता आहे (अॅग्रेसीव खेळ) त्याच्या नावावरच आता(तरी) हा विक्रम अस्तित्वात राहील हे बघूनच खूप बरं वाटलं...