मनातली घालमेल

सचिन भालेकर's picture
सचिन भालेकर in काथ्याकूट
1 Dec 2011 - 1:39 am
गाभा: 

विषय थोडा वेगळा असेल कदाचित...............

माझी चुक नसताना पण माझ्याकडुन खुप मन दुखवली जाणार असेल तर................ माफी कशी मागावी हेच समजत नाहिये...............

मदत हवी आहे तुमच्या सल्ल्याची..............

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

1 Dec 2011 - 8:38 am | अन्या दातार

पत्र लिहा.

मिश्रेया's picture

1 Dec 2011 - 12:24 pm | मिश्रेया

काहि प्रोबलेम आहे का??

(ता.क) लिहा ईथे.
आणी फळाची अपेक्षा न करता, कर्म करा व निश्चिन्त व्हा.

'कर्माचा सिद्धान्त' वाचलय का?

नक्की वाचा, मुळ लेखक हीराभाई ठक्कर.
मराठी अनुवाद बळवन्त शन्कर काशीकर.
खुप उपयोगी आहे, मनाला उमेद देणारे.

सुहास झेले's picture

1 Dec 2011 - 1:06 pm | सुहास झेले

वाह.. एकदम हटके विषय. अश्या विषयांवर मुद्देसूदपणे चर्चा होणे अपेक्षित आहे. जागा राखून ठेवतो.... ;)

पुलेशु !!! :)

प्यारे१'s picture

1 Dec 2011 - 1:14 pm | प्यारे१

काय लव्ह मॅरेज करताय का काय??? ;)

मन१'s picture

1 Dec 2011 - 1:21 pm | मन१

बाप रे....कसे होणार....
धडधडित चूक केलेली असतानाही ती मान्य न करणार्‍यांच्या ठार संवेदनाहीन जगात, चूक न करताही माफी मागणार्‍यांचे कसे होणार?

तुम्हाला जीझस प्रमाणे "देवाचे कोकरू" व्हायची हौस आहे काय?
जगाचे मरण स्वतःच भोगायची इच्छा/तयारी आहे काय?

विजुभाऊ's picture

1 Dec 2011 - 3:14 pm | विजुभाऊ

चूक नसतानाही माफी कशाला मागताय.
तुमच्या मनात न्यून गंड आहे. याला काही लोक गिल्ट कोंन्शननेस म्हणतात.
जर तुम्ही काहिही चुकीचे केलेले नसेल तर माफी मागायच्या भानगडीत पडू नका.

आदिजोशी's picture

1 Dec 2011 - 4:35 pm | आदिजोशी

लग्न करण्याआधी आम्हाला विचारलं होतं? मग आता का सल्ला मागताय?

गणपा's picture

1 Dec 2011 - 4:49 pm | गणपा

हा हा हा.

कर नाही त्याला डर कशाला राव!! नका टेन्शन घेउ होइल सगळा बराबर!!
नाहीतर भगवतगीता वाचा!!

गवि's picture

1 Dec 2011 - 5:01 pm | गवि

माझी चुक नसताना ........................... माफी कशी मागावी

एक लांब पल्ल्याचा सल्ला देतो. माफी मागणं कितीही चांगलं असलं तरी ती चुकीची कबुलीही असते.

चूक नसताना चुकूनही "माफी" शब्द वापरु नका..

नेहमी "दिलगिरी" किंवा "खेद" व्यक्त करा.

कलमाडींची मार्ग पत्करा..

कलमाडींची मार्ग पत्करा..

पैसा's picture

1 Dec 2011 - 7:36 pm | पैसा

असं अर्धवट काय सांगताय? एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे ते सांगा ना, मग इथे सर्व प्रकारचे सल्ले मिळतील.

रेवती's picture

1 Dec 2011 - 10:48 pm | रेवती

इथे सर्व प्रकारचे सल्ले मिळतील
ही ही ही.
खरच आहे. सध्या सगळ्या प्रकारचे सल्लावाटप चालू आहे असे दिसते.

सचिन भालेकर's picture

2 Dec 2011 - 2:03 am | सचिन भालेकर

धन्यवाद.........

तुम्हा सर्वाचे धन्यवाद.........

मनीषा's picture

2 Dec 2011 - 9:24 am | मनीषा

अरे !!!! इतक्यात धन्यवाद ?
अजून कितीतरी सल्ले यायचे आहेत ....

माझा सल्ला : - माफी मागवीशी वाटत असेल तर मागून टाका ... म्हणजे "सॉरी ... " म्हणून टाका ना ... त्यात काय अवघड आहे? (म्हणजे मग तुम्हाला परत असे 'माफी मागवी असे वाटते आहे.." असे वाटेपर्यंत तुम्ही मोकळे )