कोलावेरी डि

मिश्रेया's picture
मिश्रेया in जनातलं, मनातलं
30 Nov 2011 - 1:01 pm

रजनिकान्त च्या जावया ने'धनुष' ने गायलेले 'कोलावेरी डी' अर्थहिन असुन ही ऐकायला छान वाटते.

त्याचे गाणे बघायला हि छान वाटते, गाणे शुट करताना पहायला मजा वाटली.

ते इतके हिट झाले आहे की लगेच त्याचे मराठी व गुजराती वर्जन हि निघाले.

छान च आहे. एकदा तरी ऐकावे. हल्ली काय हिट होइल आणी काय फ्लॉप होइल काही सान्ग्ता येत नाही.

आधि 'सेनोरिटा' (ZNMD) हि असेच हिट झाले व त्याचे मराठि वर्जन हि लगेच आले.

संगीत

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

30 Nov 2011 - 1:08 pm | किसन शिंदे

हे वरती जे काही लिहलं आहे ना ते चेपुवर स्टेटस म्हणून लिहलं असतं ना तर जास्त शोभुन दिसलं असतं.

मालोजीराव's picture

1 Dec 2011 - 3:18 pm | मालोजीराव

च्यायला कुणीतरी प्रतिक्रियांना 'लाईक' करायचं बटन बनवा राव !

- मालोजीराव

मेघवेडा's picture

1 Dec 2011 - 6:11 pm | मेघवेडा

येस! + १ आता कालबाह्य झालंय! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

गाणे शुट करताना पहायला मजा वाटली.

शूट करताना का रेकॉर्ड करताना ?

'थ्री' चे प्रोमोज आल्याचे माझ्यातरी माहितीत नाही ;)

अर्थहीन नाहीय्ये ते..

पोरीने (डी) डिच मारल्यावर स्कॉचचे घोट घेत आपली करुण कथा ऐकवली आहे..

बरेच घोट ऑलरेडी झालेलेही आहेत..

"सुपर माम्मा.."

यातील माम्मा हा मामा किंवा मम्मा नसून आपल्या मित्राला "दोस्त" "यार" "भिडू" अशा अर्थाने असलेली हाक आहे..

स्वतःच्या दु:खात मित्रांचा विसर त्याने पडू दिलेला नाही... मधेमधे "रिदम करेक्ट", "मेंटेन प्लीज" , "व्हाट अ चेंजओव्हर.." वगैरे अशी दादही वाद्यवृंदातील आपल्या दोस्तांना तो देतो आहे.

आपल्या प्रेयसीला काय ही तुझी कातिल (रक्त)पिपासा गं पोरी (डी) असं तो म्हणतो आहे..

किसन शिंदे's picture

30 Nov 2011 - 1:20 pm | किसन शिंदे

कातिल (रक्त)पिपासा गं पोरी (डी)

:D :D :D

मिश्रेया's picture

30 Nov 2011 - 2:01 pm | मिश्रेया

आभारी आहे, आपण अर्थ बोध केल्याबद्दल...

मनोरन्जक आहे हे.
छान.

बादवे.. डी म्हणजे डिच नव्हे.. वर तसं वाटतंय..

डी हे "पोरी" किंवा "गं" या अर्थाने.. कोलावेरी म्हणजे बहुधा खुनी आकांक्षा किंवा घातक विचार..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Nov 2011 - 2:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्या शब्दाच्या मी वाचलेल्या इंग्लिश अर्थावरून त्याचे मराठी भाषांतर "खुन्नस" असे करता येईल असे वाटले होते.

खुन्नस..

अ‍ॅबसोल्यूटली विमें.. बुल्स आय.. खुन्नस हाच सर्वात जवळचा शब्द म्हणता येईल..

माताय गवि संपुर्ण गाण्याच 'रस' ग्रहण येऊद्या बर. ;)

गवि's picture

30 Nov 2011 - 1:37 pm | गवि

अहो तामिळनाडूतल्या वर्षभराच्या वास्तव्यावर जो गाण्याविषयी अंदाज करता आला तो केला झालं.. खरा अर्थ कोणाला ठावे?

;)

-गविसेकरन्

खुन्खार अकिब's picture

30 Nov 2011 - 1:47 pm | खुन्खार अकिब

कोलावेरि कोलावेरि डी ............

गान्यात इन्ट्रेस्टिन्ग काहिच वाटले नाहि....

मेघवेडा's picture

30 Nov 2011 - 2:50 pm | मेघवेडा

चेपुवर एक फोटो बघितला. इंडीया कोलावेरी'ड का काही तत्सम नाव दिलेला.

'इंडिया लास्ट मंथ' असा एक नकाशा काढून त्यात मागच्या महिन्यात प्रत्येक राज्यात/शहरात काय चाललं होतं ते लिहिलं होतं.. उदा. मुंबईत बेबी बच्चन आणि झारखंड मध्ये "वेल ऑफ कोर्स.."** !!!
आणि दुसरा नकाशा 'इंडिया धिस मंथ' असा काढून त्यात प्रत्येक राज्यात "व्हाय धिस कोलावेरी डी!" असं! मस्त डोकं लढवलंय ज्यानं कुणी केलंय ते. घरी जाऊन लिंक देतो.

** हा सिक्सर होता. लैच आवडला आपल्याला!

गणपा's picture

30 Nov 2011 - 3:13 pm | गणपा

मेघवेडा's picture

30 Nov 2011 - 3:19 pm | मेघवेडा

एईच! हाच तो हाच तो!

"वेल ऑफ कोर्स" काय अरे! LOL!

पैसा's picture

30 Nov 2011 - 3:58 pm | पैसा

आमचा एक तमिळ स्टाफ सांगतोय, ते "कोळाई वेरी" आहे. मतलब, सुनियोजित पद्धतीने सूडाने, रागाने गळा घोटणे, ठार करणे.

चिरोटा's picture

30 Nov 2011 - 4:00 pm | चिरोटा

गाणे ३/४ वेळा कान देवून ऐकले. संगिताचा कान वगैरे मला नाही पण ह्या गाण्यात सुश्राव्य असे काय आहे हे कोणी सांगू शकेल का? मला तरी गाणे ठीक वाटले.

गवि's picture

30 Nov 2011 - 4:02 pm | गवि

रिदम.

गाणे ३/४ वेळा कान देवून ऐकले. संगिताचा कान वगैरे मला नाही पण ह्या गाण्यात सुश्राव्य असे काय आहे हे कोणी सांगू शकेल का? मला तरी गाणे ठीक वाटले
कान देवून ऐवजी कान दाबून असे वाचले.
हे गाणे भंगार आहे. ना ठीक चाल ना ठेका. ना गायकाचा अवाज ( अर्थात इतक्या टुकार रडक्या चालीतल्या गाण्यात गायक तरी काय करणार)

ह्या ह्रिदम वर हरविंदर च्या थपडे चे गाणे एकले का ?---अन्जलि गद्रे ---

रघुनाथ.केरकर's picture

30 Nov 2011 - 6:58 pm | रघुनाथ.केरकर

उगाचच डोक्यवर घेतलय, अस वाटतं

काय फालतू प्रकार आहे म्हणत एकदा ऐकले.
मग दोनदा, तीनदा असे झाले आहे.;)

गाण्यासारखं गाणं असलं तरी एखादं का हिट्ट होऊन जातं याला काही नियम नाही. ताल, लय, बोल, शैली आणि नशीब यापैकी जे चांगलं असतं त्यानुसार ते गाणं हिट्ट होऊन जातं. खूपदा गाण्याशी एखादी जीवनावस्था निगडीत झाल्यासारखं वाटतं आणि समाजातील एखादा वर्ग ते गाणं अगदी डोक्यावर घेतो. काही गाणी खरंच छान असतात तर काही का प्रसिद्ध व्हावीत त्याचं आकलंनच होत नाहीत.

कोलवरी कोलवरी कोलवरी डी सारखी वानगी दाखल काही गाणी.....

मुझे मिल जो जाये थोडा पैसा
थंडा थंडा पानी
ओ पिया ओ पिया
देखा है तेरी आँखोंको
आँखोमें तेरा ही चेहरा
हवाहवा ए हवा
डिस्को दिवाने
पुरानी जीन्स

बाकी, मिश्रेया, मिपावर लिहित्या झाल्यात त्याबद्दल अभिनंदन!

:-)

प्रशु's picture

30 Nov 2011 - 9:55 pm | प्रशु

फालतु आहे.. आज काल काहिहि हिट होतं...

आत्मशून्य's picture

30 Nov 2011 - 10:39 pm | आत्मशून्य

Why this कोलावरी, कोलावरी कोलावरी डि चा
मराठी भावार्थ " हे नेहमी असंच (का ?) होतं / घडत ही तक्रार" हा आहे. ६०% जास्त शब्द इंग्लीश भाषेतील आहेत त्यामूळे अर्थातच त्याला जेनेरीक अपील आहे. यूट्यूब टॉप २० मधे या व्हीडीओचा त्वरीत सामावेश झाला ज्याचा हॉस्ट पाश्चिमात्य आहे.

अर्थासाठी पूढील ओळी वाचाव्यात

white skin-u girl-u girl-u
girl-u heart-u black-u
eyes-u eyes-u meet-u meet-u
my future dark..... why this kolaveri kolaveri kolaveri di

अवांतर :- सकाळ वाचणं बंद करा. तेथील सगळीच माहीती खरी नसते.

पाषाणभेद's picture

30 Nov 2011 - 11:14 pm | पाषाणभेद

>>> अवांतर :- सकाळ वाचणं बंद करा. तेथील सगळीच माहीती खरी नसते.

लालूप्रसादने कायतरी खाल्ले, नितीशबाबूने चिकनमटन हाणले असल्या बातम्या सकाळमध्ये वाचल्या होत्या त्यावेळीच डोक्यात सकाळबद्दल तिडीक गेली होती.

नंतर एकदा प्रिंस राहूल गांधीने संसदेच्या कॅन्टीनमध्ये उतप्पा खाल्ला असली बातमी आली व तातडीने दुसर्‍या दिवसापासून पेपरवाल्याला सकाळ बंद करायला सांगितले तो आजपावेतो बंद आहे.

अहो मग कुठला पेपर वाचावा ते ही सांगा!

मटा जवळ जवळ फुकट मिळतो पण दर्जा संध्यानंद चा आणि शुद्धलेखन धन्य .... निम्मे शब्द तर सरळ सरळ इंग्रजी असतात. "एक्स्प्रेस वे'वर अ‍ॅक्सिडेंट झाला" - हे मी मराठी पेपर मध्ये कशाला वाचू? फक्त क्रियापद मराठी म्हणून?

असाच एक विनोद सध्या येता जाता होर्डींग्ज वर वाचतेय..

"महाराष्ट्राचे पहिले मराठी म्युझिक चॅनेल" - ओळखच इतकी इंग्रजाळलेली ते डोंबल मराठीपणा जपणार?

माझीही शॅम्पेन's picture

1 Dec 2011 - 6:10 pm | माझीही शॅम्पेन

यु ट्यूब वर हे गाण बरेच वेळा ऐकल आहे ,

http://www.youtube.com/watch?v=YR12Z8f1Dh8

गाण्यात रिदम-बिदम लय भारी आहे :) उगाच का या गाण्याने देश-विदेशात क्रांती केलीय ,
इथे (डॉलरच्या देशात) माझा श्याम कस्टमर हे गान ऐकून पार वेडा झालाय :)

ते राहुद्या , गाण नुसात् श्रवणिय नाहीए तर श्रुति हासन मुळे प्रचंड प्रेक्षणीय झाल आहे ;)

अच्छा.. श्रुति हासन का ती? अहा... काय आहे ना???

प्रास's picture

1 Dec 2011 - 6:20 pm | प्रास

धाकली ती श्रुती पण थोरली (नि त्या धनुषची बायडी) ऐश्वर्या आहे इडिओत.

लंगूराची म्हण तर ब्वॉ त्याला मिळालेल्या अंगूरासकट पुरेप्पूर पटलीये आम्हाला..... ;-)

अहो.. ती ऐश्वर्या धनुश म्हणजे अंगूर? आक्रोड म्हणा हवं तर.

काय आहे हो तिच्यात..

माझीही शॅम्पेन's picture

1 Dec 2011 - 7:14 pm | माझीही शॅम्पेन

छे ! भडक मेकअप आणि तद्दन फालतू कपड्या-मुळे फारच वाईट दिसतेय बया !

पण शेन्देफळावर सध्या पार फिदा असल्याने (दिल तो बच्चा है कोणी पहिला आहे काय ? ) वरचा फोटो आउट-ऑफ-सिलबस आहे :)

अरे.. धाकटी थोरली काय करतोयस? धाकटी म्हणजे श्रुती? ती कमल हासनची ना?

आणि थोरली म्हणतोयस ती ऐश्वर्या?

ऑ? ती तर रजनीकांतची मुलगी ना?

प्रास's picture

1 Dec 2011 - 7:29 pm | प्रास

फक्त (त्या दोघींच्या, एकमेकांच्या वयाच्या) कंप्यारिजनने धाकली-थोरली हो! ;-)

बाकी त्या विडिओत श्रुती इतकीच ऐश्वर्याही भारी दिसतेय, म्हणून तर (धनुषशी कंपेअर करता) ती अंगूर भासतेय ना...

:-)