मागील दोन लेखांना मिळालेले प्रतिसाद वाचल्यानंतर फक्त एक प्रतिसाद लिहिण्यापेक्षा एक नविन प्रकटन लिहावे असे मनात आले. म्हणून हा लेखन प्रपंच.
------------------------------------------------------------------प्रोफेशनल कोर्सेसच्या ऍडमिशन पिसीबी किंवा पिसीएम च्या बारावीच्या मार्कांवर होत नाहीत.सीइटी नावाच्या अत्यंत स्पर्धात्मक परिक्षेच्या मार्कांवर होतात..बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सुमारे तीस पुस्तके अक्षरशहा पिंजून काढल्यावरच १८०+(/२००)मार्क मिळतात.मागच्या वर्षी राजीव गांधी मेडीकल कॉलेज (क़ळवा )चा कट ऑफ१८५/२०० होता.दहावीत ९०% सरासरी मिळवलेल्या शंभर मुलांपैकी सरासरी दोनच मुले हे करू शकतात.
माझा रोख ६०%मिळवणार्या विद्यार्थ्यांवर नाही. आपल्या गत आयुष्यातील असंख्य कारणानी चुकलेल्या आणि हुकलेल्या संधींचा आणि त्या अपेक्षापूर्तीचा डोंगर , मनोवृत्ती,कुवत व कल न बघता आपल्या पाल्यावर टाकणार्या पालकावर होता.
प्रोफेशनल कोर्सेस म्हणजेच सब कुछ आणि बाकी सब झूठ हा गैरसमज कारणीभूत आहे.यातूनच डोनेशनचा दैत्य उभा राहतो आणि घरदार धुवून काढतो.
गेली आठ वर्षे दरवर्षी सुमारे दिडशे शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवासखर्च , बिदागी, फूल किंवा फूलाची पाकळी ,शाल , नारळ न घेता पदर मोड करून माझा एक कार्यक्रम मी करतो. त्याचा सारांश असा ९०%मिळाले तर माजू नका६०%मिळाले तर लाजू नका. हा कार्यक्रम मरेपर्यंत करणार हा निर्धार. माझ्या बायकोच्या भाषेत ही फुक्कटची फौजदारी करायला कुणिही साथीदार मला मिळाला नाही. मिपा च्या सर्व सदस्यांचे ह्या उपक्रमात स्वागत आहे.रामदास येण्याची दाट श़क्यता आहे.
माझ्याच एका विद्यार्थीनीला दहावीत फक्त ६५% आणि एमएससी पार्ट वन मध्ये८१% .
फक्त शनीवर आणि रविवार च्या कामाचे सुमारे पंधरा हजार रुपये ऑफर करताना मला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा.प्रोफेशनल कोर्सेस म्हण्जेच सगळं काही ही समजूत दूर करण्यासाठी हे उदाहरण मी इथे दिलंय.
त्रिकालाबाधीत सत्य फक्त जीवन आणि मरण , बाकी सर्व ठिकाणी काहीना काहीतरी खोट राहतेच,माझ्या मनोगतातील सर्व विधानांना कुठे ना कुठे तरी अपवाद मिळणारच यात शंका नाही. बघा ना पुरुषाला पण मूल झालेच असं नुक्तच पेपरात वाचलं.
हे सगळं सत्य एका किंवा दोन परीच्छेदात सांगणं कठीणच आहे.मराठी साहित्यातील महानायक असलेल्या पुलंना त्यांच्या एका विधानात बंदिस्त करणे धार्ष्ट्याचे ठरेल.विदारक सत्य आपणच मांडायच आणि नंतर आपणच त्याची चेष्टा करायची हे फक्त पुलंनाच जमायच.
दहावीला साधे गणित ही कल्पना पुलंनी डोक्यावर घेतली असती. त्यांच्या कवि मनाने बालपणी गणित विषयाचा किती छळ सहन केला असेल. कुणास ठाऊक? आणि ह्या अत्यंत सुंदर कल्पनेला हिरीरीने विरोध करणारी असंख्य मंडळी पण मिळतील.
अभ्यासात केवळ गणितामुळे मागे पडणार्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे एक नविन चांगले पाऊल.
दहावीचे मार्क आणि करीयरचे पुढील पर्याय ह्या बाबतीत पालकांचे गैरसमज रोज पाहतो मग ९०% असोत वा ६०%.
हे गैरसमज दूर करण्याच्या मोहिमेत सामील होण्यासाठी मिपाच्या सर्व सदस्यांना हार्दीक आमंत्रण.
जाताजाता दहावीनंतरच्या करीयरच्या काउंसीलींगला ताशी बावीस हजार पाचशे मोजणार्या पालकांना लवून कुर्नीसात.
तिसरीतल्या गोजीरवाण्याची ऍप्टीट्युड टेस्ट घेणार्या पालकांना साष्टांग दंडवत घालून आज इथेच थांबतो.
http://www.misalpav.com/node/2475
http://www.misalpav.com/node/2536
http://www.misalpav.com/node/2536#comment-34743
या लेखासोबत आधीचे लिखाण आणि प्रतिसाद पण वाचा. धन्यवाद.
फुकटची फौजदारी
गाभा:
प्रतिक्रिया
15 Jul 2008 - 6:54 pm | विद्याधर३१
खरच या उंदीर शर्यातीत (Rat Race) आपण मुलांचे किती नुकसान करअतो याची गणतीच नाही. सध्या आय. टी.ची चलती म्हणून जो तो उठतो तो कॉम्पुटर इंजीनीअर होणार असे म्हणतो.
सध्या मात्र वैद्यकीय अभ्यसक्रमापेक्षा अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा (पालकांचा?) ओढा वाढता दिसत आहे.
इतर काही पर्यायांवर चर्चा झाल्यास मार्गदर्शक ठरेल.
आपला
(उत्सुक) विद्याधर
15 Jul 2008 - 7:06 pm | प्राजु
माझ्याकडून जमेल तेव्हढे मी करेन. माझ्या मुलाला अभ्यासाच्या ओझ्याने वाकलेला मला पहायचा नाहिये. त्याला जे हवे तेच तो करेल... १००%.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2008 - 9:49 pm | चतुरंग
आपणच अपेक्षा आणि गैरसमजुती वाढवून ठेवतो
डोळे झापडबंड करुन पळत राहतो, उरस्फोड होईपर्यंत
आणि तोंडाला फेस आला तरी पाण्याचा थेंबही मिळत नाही
कारण अनैसर्गिक स्पर्धेने सगळा तळ ढवळून टाकल्यामुळे चवदार तळे खारट झालेले असते, कायमचं!
उपाय?
स्वतःचं तळं स्वतः शोधा नाहीतर स्वतः खोदा!
(तळं खोदण्यात मग्न असलेला)
चतुरंग
15 Jul 2008 - 11:28 pm | राधा
शब्द न शब्द पट्लाय तुमचा.............. यासाठी सरकारी यंत्रणेतुनही पाउले उचलली गेली पाहिजेत............
15 Jul 2008 - 11:44 pm | संजय अभ्यंकर
बोरिवली परिसरात, हा कार्यक्रम नजीकच्या काळात करित असाल तर, आमच्या पाल्याला तेथे आम्ही नक्की घेउन येऊ.
कृपया आम्हांस कळवा.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
16 Jul 2008 - 8:55 am | शितल
खरच जे विद्यार्थी १० वी १२ च्या परिक्षेत ९०% मार्क मिळवतात तेच आयुष्यात यशस्वी होता आणी माझा मुलगा/मुलगी इतके मार्क मिळवेल च ह्या त्याच्या अपेक्षाच्या ओझ्याने किती विद्यार्थी आपले मन नसताना फक्त इजि. /मेडिकल ला जायचे आहे म्हणुन फाट्या टाकतात.
16 Jul 2008 - 11:05 am | विसोबा खेचर
चर्चाप्रस्ताव व प्रतिसाद वाचून चांगली माहिती मिळत आहे!