मारुती अल्टो -Petrol Verson

नितिनभालेराव's picture
नितिनभालेराव in काथ्याकूट
10 Nov 2011 - 4:04 pm
गाभा: 

नमस्कार,

माझ्याकडे मारुती अल्टो -Petrol Verson आहे.
मला ती Gas वर convert करायची आहे.
CNG आणी LPG पैकी कुठला पर्याय चालेल.
दोहो पैकी फायदेशीर आणी सुरक्षीत कुठला ?
माहिती पाहिजे.

प्रतिक्रिया

daredevils99's picture

10 Nov 2011 - 4:12 pm | daredevils99

गाडी विका आणि CNG वर चालणारी रिक्षा घ्या.

धन्या's picture

10 Nov 2011 - 4:18 pm | धन्या

अहो इतरत्र झालेल्या भांडणांचा राग असा मिपावर येऊन काढायचा नाही. :)

कुंदन's picture

10 Nov 2011 - 4:36 pm | कुंदन

>>CNG वर चालणारी रिक्षा घ्या
+१
संध्याकाळी ४-५ IT कंपनी वाली भाडी मिळाली तर घरखर्च पण निघुन जात जाईल.

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Nov 2011 - 4:13 pm | चेतन सुभाष गुगळे

तुम्ही कुठे वावरता? म्हणजे तिथे सीएनजी ची पुरेशी उपलब्धता आहे का? असल्यास सीएनजी उत्तम. सुरक्षित आणि फायदेशीर देखील.

नसल्यास एलपीजी ठीक.

यापैकी कुठलाही बदल वाहनात केल्यास तो अधिकृत विक्रेत्याकडूनच करून घ्या आणि तशी नोंद वाहन नोंदणी प्रमाण पत्र तसेच विमा कागदपत्रांवर न विसरता करून घ्या.

अर्थात तुमचा वापर वार्षिक १०,००० किमी हून कमी असेल तर पेट्रोल वर राहू द्या तेच अतिउत्तम. माझा अनुभव तरी असा आहे की वाहन पेट्रोल वर उत्तम सेवा देते. त्याला तोड नाही. फारच गरज असेल तितकेच आणि तेव्हाच वापरावे. वार्षिक सात हजार किमी इतका माझा वापर आहे.

मी पुण्यात रहातो. मला गाडी घेउन १ वर्ष झाले आहे. वापर वार्षिक १०,००० किमी झाला आहे.
सीएनजी ची पुरेशी उपलब्धता आहे.

-सीएनजी संच बसवल्यावर आधीचा इन्शुरन्स व्हॉईड होतो आणि वाढीव प्रीमियम असलेला इन्शुरन्स प्रीमियम लागू होतो हे लक्षात घ्यावे.

-नॉन ब्रँडेड /सबस्टँडर्ड पण स्वस्त अशी अनेक किट्स बाजारात मिळतात पण ती अत्यंत धोकादायक ठरु शकतात.

-किट बसवल्यावर डिकीतली स्पेस नष्ट होते. (त्यातल्यात्यात कमी जागा खाणारी काही किट्स आहेत.. चवकशी करावी)

- पिकअप अत्यंत जाणवण्याइतपत कमी होतो.

-सीएनजी आणि एलपीजी दोन्ही पेट्रोलपेक्षा स्वस्त असले तरी लिटरमागे पेट्रोलला मिळालेले मायलेज किलोमागे सीएनजीला मिळणार्‍या मायलेजपेक्षा थोडेसे जास्त असते. त्यामुळे अगदी इंधनखर्च अगदी निम्म्यावर येईल असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. सर्व फॅक्टर्स धरुन खर्चात तीसेक टक्केच बचत होते..आणि सेफ्टीशी बरेच कॉम्प्रोमाईज..

-एकदा सीएनजीवर चालवायला लागलेल्या गाडीच्या इंजिनाला हळूहळू अधिकचे करोजन होते असे ऐकले आहे पण पुरावा किंवा विदा नाही.

-एकदा सीएनजीवर चालवायला लागलेल्या गाडीच्या इंजिनचा पेट्रोलवरचा परफॉर्मन्सही सीएनजी किट बसवल्यावर कायमचा खराब होतो असं वापरणार्‍यांकडून कळतं...

सहमत,
पिकअप बेक्कार कमी होतो. माझ्या मते १०,००० किमी पेक्षा जास्त रनिंग असेल तर जमत असल्यास पेट्रोल गाडी विकून डिजेल गाडी घ्यावी. बिना पिकअपची गाडी चालवण्यापेक्षा ते बरं!

- (फुल पिकअप आवडणारा) सोकाजी

कपिलमुनी's picture

10 Nov 2011 - 6:26 pm | कपिलमुनी

http://www.team-bhp.com/forum/modifying-car/22225-article-cng-vs-lpg-com...

http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/88692-my-experim...

http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/4177-cng-vs-lpg....

http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/101797-advice-cn...

http://www.team-bhp.com/forum/technical-stuff/26643-open-loop-closed-loo...

lpg सध्या ४५ रु आहे ..आणि मायलेज पेट्रोल पेक्शा कमी देते ..

उदा : अल्टो :मायलेज पेट्रोल १८ किमि असेल तर lpg ला १५ देइल..

cng सध्या ३७ रु आहे ..आणि मायलेज पेट्रोल पेक्शा जास्त देते..

उदा : अल्टो :मायलेज पेट्रोल १८ किमि असेल तर lpg ला २२देइल..

म्हणजे
प्रति किमि पेट्रोल खर्च ४.२० रु किमि ..
प्रति किमि lpg खर्च ३ रु किमि ..
प्रति किमि cng खर्च १.७५ रु किमि ..

पण इंशुरन्स चा खर्च वारवाढतो १२००-१५०० रु ने वाढतो * ( या बद्दल चौकशी करा "हव तर अजुन एक धागा काढा ;) ")

cng कीट मधे कही प्रकार आहेत ..

त्या मधे sequential चांगले असते पण त्याची किंमत ५८,००० -६०,००० असते

दुसरे Injection किट ३०,००० पर्यन्त मिळते ..पण त्याचे टायंमिंग सेट करावे लागते ..
आणि ते ट्युन कारावे लागते ( वर्षातुन एकदा)

आणि Closed Loop system बसवुन घ्या ..तीची अनुभव चांगले अहेत..

आता तुम्ही गोल भोकात चौकोनी खुंटी बसवता आहात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येतील

त्याबद्दल गुगल करा ..टंकायचा कंटाळा आला

अविनाशकुलकर्णी's picture

10 Nov 2011 - 6:45 pm | अविनाशकुलकर्णी

घरातल्या यल.पी.जी ग्यास च्या टाकिवर पण गाडी चालते..किट पण स्वस्त होति/आहे..
पण आता सरकार त्याला मान्यता देत नाहि..
त्या मुळे शक्यतो ति बसवु नका....
पण यल.पी.जी किट बसवणार असाल तर एक पंप विकत मिळतो त्याने घरातल्या टाकितला ग्यास गाडीच्या टाकित भरता येतो...तो पण एक पर्याय आहे.

कपिलमुनी's picture

10 Nov 2011 - 7:15 pm | कपिलमुनी

तुम्हांस खात्रीशीर माअहित नसेल तर इतराना सुचवु नका

सोत्रि's picture

10 Nov 2011 - 7:33 pm | सोत्रि

- (खात्रीशीर माहिती नसलेला) सोकाजी

कपिलमुनी's picture

10 Nov 2011 - 7:45 pm | कपिलमुनी

अहो सोकाजीराव,
त्यांनी सुचवलेला उपाय खुप धोकादायक होता ..
अशा यंत्रामधुन गॅस लीक होण्याची शक्यता असते ..

बाकी पिक अप च्या बाबतीत एकमत ..

पेट्रोल कार पिक-अप आणि स्मूथपणा आणि कमी मेंटेंनन्स यावर भाव खाते

( आय १० प्रेमी आयटी हमाल )

छोटा डॉन's picture

10 Nov 2011 - 7:52 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.

>>पण यल.पी.जी किट बसवणार असाल तर एक पंप विकत मिळतो त्याने घरातल्या टाकितला ग्यास गाडीच्या टाकित भरता येतो...तो पण एक पर्याय आहे.

खरं आहे, पण हे धोकादायक आहे.
शिवाय हे आहे असे दिसल्यास पोलीस छानपैकी बिनभाड्याच्या खोलीत राहण्याची सोय करतात, तिकडे अस्सल कोल्हापुरीपद्धतीचे जेवण वगैरेही देतात, बघा आता.

- छोटा डॉन

शिवाय हे आहे असे दिसल्यास पोलीस छानपैकी बिनभाड्याच्या खोलीत राहण्याची सोय करतात, तिकडे अस्सल कोल्हापुरीपद्धतीचे जेवण वगैरेही देतात, बघा आता.

वरील विधानावरुन, डॉण्राव याबाबतीत खात्रीशीर माहिती बाळगुन आहेत असा निष्कर्ष काढतो. ;)

सोत्रि's picture

10 Nov 2011 - 8:33 pm | सोत्रि

आज डॉन्रावांचे काही खरे नाही असे दिसते.
डॉन्राव, आजच्या दैनंदिन भविष्यात 'मित्रांकडून कमी जास्त ऐकावे लागेल' असे काही होते का ?

- (दैनंदिन भविष्यानुसार दिवसाची कामे ठरवणारा) सोकाजी

शाहिर's picture

10 Nov 2011 - 7:53 pm | शाहिर

एकोळी धागा ..त्यात सुद्धा व्याकरणाच्या चुका

मराठी_माणूस's picture

10 Nov 2011 - 8:49 pm | मराठी_माणूस

मिपा हे गुगलला पर्याय ?

असा एक धागा काढावा काय ?

५० फक्त's picture

10 Nov 2011 - 9:51 pm | ५० फक्त

'माझ्याकडे मारुती अल्टो -Petrol Verson आहे. - आजतागायत डिझेल अल्टो ऐकलेले नाही.

मला ती Gas वर convert करायची आहे. - पेट्रोल महाग झाले म्हणुन,अजिबात करु नका. वर्षाला धा हजार म्हंजे पेट्रोलच बेस्ट.

CNG आणी LPG पैकी कुठला पर्याय चालेल. - गाडी नवीन असेल १००० सिसि अल्टो तर कशाला पिकपची काशी करताय.

दोहो पैकी फायदेशीर आणी सुरक्षीत कुठला ? - दोन्हीही नाही, हे खरंच फायदेशीर आणि सुरक्षित असतं तर मारुतीनंच असं व्हर्जन बाज्रारात आणलं असतं, वॅगर आर का घेत नाही पेट्रोल + एल्पिजी.

विजुभाऊ's picture

11 Nov 2011 - 3:21 pm | विजुभाऊ

व्यागनार ग्यासवरची हे एक भंगार काँबिनेशन आहे.
गाडीत जागा नाही आणि पिकप बोंबललेला असतो.
तसेच करायचे असेल तर नॅनो डिझेल किंवा नॅनो एल पी जी हा सर्वोत्तम पर्याय आहे

नितिन थत्ते's picture

11 Nov 2011 - 4:39 pm | नितिन थत्ते

१. एलपीजी धोकादायक कारण एलपीजी लीक झाल्यास हवेपेक्षा जड असल्याने तेथेच राहतो. सीएनजी हलका असतो त्यामुळे साठून रहात नाही. (घरगुती गॅस वाहनात वापरणे हे बेकायदेशीर आहे त्याचे "फायदे" डॉन्रावांनी सांगितलेच आहेत). ऑटो एलपीजीची आउटलेट फार कमी असतात.

२. देशभक्तांसाठी- सीएनजी देशातच उपलब्ध आहे. एलपीजी आयात करावा लागतो किंवा आयात केलेल्या क्रूडमधून बनवला जातो.

३. सीएनजीची टाकी बसवली की मागची जागा भरून जाते. मग सामानासाठी टपावर कॅरिअर बसवावी लागते. कॅरिअर असलेल्या गाड्यांवर पोलीसांचे विशेष लक्ष राहते. ;) कारण ती गाडी भाड्यावर लावली आहे असा संशय त्यांना असतो.

४. पेट्रोलची गाडी चालवण्याचे सुख इतर कशात नाही. रनिंग फार नसेल तर पेट्रोलचीच ठेवणे उत्तम. खर्चच कमी करायचा असेल तर ऑफीसमधल्या इतरांशी शेअर करायचे बघा (कार पूलिंग).