सल्ला हवा: मराठी दिवाळी अन्क खरेदी

पान्डू हवालदार's picture
पान्डू हवालदार in काथ्याकूट
14 Oct 2011 - 10:19 pm
गाभा: 

मराठी दिवाळी अन्क ओनलायीन कुथे विकत मिळ्तील? मि रसिक, बूक गन्गा, मायबोली चेक केले, महाग वाट्ले..
यीतर सायीट माहीत अस्ल्यास क्रुपया कळव्यावात.
पुस्तके येअर मेल ने कानडा ला हवी आहेत

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

14 Oct 2011 - 11:14 pm | आशु जोग

कुणी कॅनडाला येणार असेल तर सांगा !

मी इतक्यात काही पुस्तके आमच्या बंधूंना पाठविली कॅलिफोर्नियाला मित्राबरोबर

प्रभाकर पेठकर's picture

15 Oct 2011 - 1:56 am | प्रभाकर पेठकर

खरच तुम्हाला मराठी वाचण्याची आत्यंतिक गरज आहे.

प्रदीप's picture

15 Oct 2011 - 12:38 pm | प्रदीप

तसे नसावेही. प्रथमच मराठी टंकित करत असल्याने असे वाईट लिहीले जात असावे, अशी एक पॉसिबिलीटी आहे. तेव्हा आपण ह्यांना 'बेनिफिट ऑफ डाऊट' देऊयात.

पण शुद्धलेखनाचा प्रश्नच आला आहे तर मला एक प्रश्न पडला आहे, त्याचे कुणीतरी निराकरण करावे. मिपावर अलिकडे सर्रास 'असे केल्या जाणार नाही', 'मत दिल्या जाणार नाही' असे लिहीलेले आढळते. हे नक्की काय आहे? ह्या, माझ्या माहितीप्रमाणे, अत्यंत अशुद्ध लिखाणाचा उगम कोठे आहे?

प्रदीप's picture

16 Oct 2011 - 10:35 am | प्रदीप

ह्या धाग्यावर मला आलेल्या ख.व. इत्यादीतून असे समजते की पूर्व विदर्भ व आसपासच्या बोलीभाषेत असे बोलले/लिहीले जाते. तसे असल्यास हे अशुद्ध समजले जाऊ नये, ह्या मताशी मी सहमत आहे.

तेव्हा त्या भागांतून आलेल्या व्यक्तिंच्या लिखाणात असे लिहीले जाणे साहजिक आहे. त्यात काही गैर नाही. पण त्याची टवाळी करण्यासाठी पुण्या-मुंबईकडील लोकांनी तसेच लिहीले की ते, मराठी चित्रपट/ टी. व्ही. मालिकांतून कामे करणार्‍या गोर्‍या-घार्‍या मुलीं ग्रामीण बोलीतून बोलतात, तसे हास्यास्पद वाटते.

दिपोटी's picture

15 Oct 2011 - 2:46 am | दिपोटी

पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य (www.erasik.com) आहे, ते ऑनलाईन मराठी पुस्तके मूळ किंमतीला (अधिक पोस्टेज) विकतात व पुस्तके सर्वसाधारणपणे १०-१२ दिवसांत जगाच्या कोपर्‍यात पोहोचतात. माझा अनुभव आतापर्यंत चांगला आहे. वेबसाईटवर दिवाळी अंक नसल्यास ई-मेलने संपर्क साधल्यावर (व नंतर वेबसाईटवर तेवढ्याच किंमतीच्या पुस्तकांची dummy ऑर्डर नोंदवल्यावर) माझ्या मते ते दिवाळी अंक पाठवतील.

अर्थात 'रसिक साहित्य'शी माझा (गेल्या कित्येक वर्षांचा एक ग्राहक हे एक नाते वगळता) काहीही संबंध नाही हे येथे नोंदवलेले बरे.

'रसिक साहित्य'चा www.erasik.com हा वेबसाईट पुस्तक-विक्री करणार्‍या दुसर्‍या एका व्यवसायाच्या www.rasik.com या वेबसाईट पासून स्वतंत्र आहे असे मला वाटते.

- दिपोटी

अविनाशकुलकर्णी's picture

15 Oct 2011 - 12:20 pm | अविनाशकुलकर्णी

महाग वाट्ले..
जुने वाचा..स्वस्तात मिळतात..
आम्हि असेच करतो..
सद्ध्या २००० सालातल्या दिवाली अंकाचे पारायण चालु आहे

अंक महाग वाटले..?

:)

अहो अंकाची / पुस्तकाची किंमत स्टँडर्डच असते. परदेशात पाठवण्याचे चार्ज फार असतात. म्हणून किंमत अनेकपट वाढते.

माफ करा.. पण मला वाटतं परदेशात जोपर्यंत जनरल मराठी पुस्तके किंवा अंक प्रिंट (मॅन्युफॅक्चर) होत नाहीत तोपर्यंत तिथे बसून ऑर्डर करण्याचे दर चढेच राहणार. मलाही इथे भारतात बसून थेट स्वित्झर्लंड्मधले आणि तिथेच बनलेले चीझ मागवायचे असेल तर अमूल चीझपेक्षा किंवा त्याच चीझच्या स्वित्झर्लंडच्या दरापेक्षा बराच जास्त दर+पोस्टेज पडणारच.. :)

नपेक्षा आशु जोग यांनी सुचवल्याप्रमाणे कोणी येत असेल तिकडे तर घेऊन यायला सांगा.

हे बघा..
पोस्टेजशिवाय कुठेही मागवा म्हणतायत.

पान्डू हवालदार's picture

15 Oct 2011 - 7:58 pm | पान्डू हवालदार

धन्यवाद..
सर्वान्ना दिवाळीच्या शुभेच्छा

अभिजीत राजवाडे's picture

16 Oct 2011 - 3:58 pm | अभिजीत राजवाडे

मी स्वतः बुकगंगा.कॉम हि साइट वापरतो. हि पुस्तके विकत घेतल्यावर तुम्ही संगणकावर किंवा आय पॅड किंवा आय फोन वर वापरु शकता. Android चा सपोर्ट अजुन नाही आहे, पण लवकरच आहे. ऑनलाइन खरेदी साठी विश्वसनिय आहे.

मेघवेडा's picture

17 Oct 2011 - 3:52 pm | मेघवेडा

माय ई-मॅगझिन्स नावाची एक वेबसाईट अलिकडेच सापडली. रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि दिवाळी अंक विकत घ्यावे लागतात. स्वस्त/महाग सापेक्ष असल्याने नो कमेंट्स पण काही जुने बरेसे वाचनीय दिवाळी अंक मोफतसुद्धा उपलब्ध आहेत.

या धाग्यावर अवांतर लिहू नये अशी विनंती करण्यात येत आहे.
प्रतिसाद अप्रकाशित झाल्यास नंतर तक्रार चालणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2011 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार, मा. श्री पान्डु हवालदार. ऑनलाईन दिवाळी अंक खरेदी करणे झाले काय ?
आपल्याला आवडलेला दिवाळी अंक कोणता ? कोणता लेख आवडला वगैरे लिहा बरं का ?

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2011 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'आवाज' दिवाळी अंक वाचायला सुरुवात केली. बटाट्याची चाळ (रिडेव्हलपमेंटमधे) हा अशोक पाटोळ्यांचा विनोदी लेख वाचून संपवला. चांगला लिहिला आहे, शेवटही छान केला आहे, तुम्ही वाचला का हा लेख ? कसा वाटला ?

-दिलीप बिरुटे