भारताचे भावी पंतप्रधान...

कोदरकर's picture
कोदरकर in काथ्याकूट
18 Sep 2011 - 6:10 am
गाभा: 

मित्रांनो सध्या एक चर्चा आपल्या देशात रुजत आहे ती म्हणजे कोण असेल भारताचा भावी पंतप्रधान...
राहुल गांधी चा तो जन्मसिध्द अधिकार आहे असे देशाला समजविले जात आहे आणि बहुतांश लोक हे ग्राह्य मानतात .. निदान सत्ताधारी नेते हाच विचार करत असावेत की अजुन ५ वर्ष मंत्री पद राहुल राहुल करत उप भोगावे.. जन्मसिध्द अधिकार या व्यतिरिक्त बाकी लायकी वादग्रस्त असुनही...
त्यातुन च नरेन्द्र मोदी यांचे नाव ही काही जन वजनदार मानतात.. त्यांच्या मागे एक राज्य व्यवस्थित संभाळण्याचा अनुभव आणि प्रशासनावरील मजबुत पकड हा जमेचा भाग..

आज देशाला असलेली मजबुत नेत्याची गरज पाहता.. मोदींच्या पारड्यात मत टाकुन थोडा धोका पत्करावा वाटतो... आपले मत ???

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2011 - 6:40 am | अत्रुप्त आत्मा

ज्याच्या मागे प्रजा(असल्याचे दाखवले जाइल ;-) )तोच होणार राजा...

जो असेल लांगुल-चालक,तोच खरा प्रजा-पालक ;-)

येत्या अ‍ॅप्राइजल नंतर ठरवेन ...

अविनाशकुलकर्णी's picture

18 Sep 2011 - 1:06 pm | अविनाशकुलकर्णी

मुसलमान समाज मत निर्णायक ठरेल..तो समाज एक संध एक गठ्ठा मते डालतात ते..
आजचे वातावरण पहाता भारतिय राजकारणाचे दशा व दिशा मुसलमान समजाच्या हातात आहे असेच म्हणावे लागेल.

अभिजीत राजवाडे's picture

18 Sep 2011 - 10:02 pm | अभिजीत राजवाडे

वासरात लंगडी गाय...या न्यायाने मोदींना कौल मिळु शकतो.

अण्णांच्या आंदोलनामध्ये राहुल गांधी पूर्ण दडून बसले होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर फार मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

चार्मींग प्रिंस शुड बी फ्युचर प्राईम मिनिस्टर ऑफ ईंडीया. आफ्टरऑल ही हॅज इट इन हिज जीन्स यु नो!

ही लुक्स व्हेरी क्युट अँड हॅन्डसम. वू......म्मा.
ईट इज हिज बेस्ट क्वालिफीकेशन फॉर इट.

चित्रगुप्त's picture

19 Sep 2011 - 3:50 am | चित्रगुप्त

त्यातून त्यांनी आणखी तो सुलेमान की कोण, त्याच्याकडून शर्ट टराटरा फाडून टाकण्याची विद्या शिकून घेतली, तर सोन्याहुन पिवळे.

ऋषिकेश's picture

19 Sep 2011 - 9:29 am | ऋषिकेश

अनुक्रमे एनर्जी, रिटेल, कन्स्ट्रक्शन, खाण उद्योग,ऑटोमोबाईल या क्षेत्रातील कंपन्यांना कोण जिंकून यायला हवे आहे?

अवरंग's picture

19 Sep 2011 - 1:54 pm | अवरंग

मोदी(राष्ट्रीय लोकशाही आघाडी), नितीशकुमार (कदाचित तिसरी आघाडी), कॉंग्रेस कदाचित राहुलला पंतप्रधान पदासाठी पुढे आणणार नाही त्याऎवजी अजून एखादा मनमोहन हुडकला जाईल, आणि मायावती हे प्रमुख पर्याय दावेदार असतील.

@ ऋषिकेश
केंद्रात राज्यकर्ता कुणीही आला तरी त्याला एनर्जी, रिटेल, कन्स्ट्रक्शन, खाण, ऑटो इत्यादी उद्योगक्षेत्र आणि संस्थागत निवेशक यांच्यापुढे लोटांगण घालावेच लागते.

केंद्रात राज्यकर्ता कुणीही आला तरी त्याला एनर्जी, रिटेल, कन्स्ट्रक्शन, खाण, ऑटो इत्यादी उद्योगक्षेत्र आणि संस्थागत निवेशक यांच्यापुढे लोटांगण घालावेच लागते.

:) आता असं बघा क्रिकेटमधे म्याच फिक्सिंग होते. तसं तर प्रत्येक टिम जिंकल्याने कोणत्या ना कोणत्या बुकीचा फायदा असतोच पण टीम एकच जिंकते!
आणि जिंकून आल्या नंतर टिमला इतर धेंडांशी वैर घेण परवडत नाहीच न जाणो पुढच्या म्याचला त्याच्याकडून 'ऑफर' यायची