रानी माज्या मळ्यामंदी

जागु's picture
जागु in कलादालन
14 Sep 2011 - 8:43 pm

माझ्या आईकडच्या छोट्याश्या मळ्याला लागलेल्या भाज्या.

१) दुधी भोपळा

२)

३)

४) कारल्याचे फुल

५) कारल

६) भेंड्याची कळी

७) बाळ भेंडे

८) भेंडा

९) काकडीचे फुल (काकड्या तेंव्हा आल्या नव्हत्या)

१०) ही माझ्याकडची घेवड्याची शेंग

११) माझ्याकडच शिराळ

११) माहेरची लिली

छायाचित्रण

प्रतिक्रिया

विशाखा राऊत's picture

14 Sep 2011 - 8:59 pm | विशाखा राऊत

सुरेख आहे :)

पप्पु अंकल's picture

14 Sep 2011 - 9:01 pm | पप्पु अंकल

जागु ताय फोटु कारायची आव्री घाय कला केलिस?
झारा जरा म्होटी व्ह्ययाला पाय्जेल व्ह्यती
१ आग्या मल्याचा फोटु टाक

सगळे फोटू आवडले.
भेंडीचे फूल पहिल्यांदाच पाहिले.
मग सध्या तू माळ्याच्या मळ्यामंदी......हे गाणं गुणगुणतियेस का?;)

प्रास's picture

14 Sep 2011 - 10:14 pm | प्रास

सध्या रानी माज्या मळ्यामंदी हे गाणं 'पी' साहेब म्हणत असतील का? ;-) (जागुतै, कृपया ह. घ्या.) ;-)

जाई.'s picture

14 Sep 2011 - 9:08 pm | जाई.

छान वाटल

फोटो सुरेख आलेत

तुझ नाव वाचून वाटल की हा लेख ईकडे कसा काय आला
पण लेख उघडला
आणि हिरवाईच दर्शन घडल
मस्त

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2011 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा

एकदम भारी वाटलं फोटो बघुन...व्वा व्वा..लै लै छान... :-)

जागु's picture

14 Sep 2011 - 11:52 pm | जागु

विशाखा, जाई, पराग धन्यवाद.

पप्पु अंकल हलव्याचाच फोटो टाकायला पाहीजे होता (स्माईली)

रेवती, प्रास नाही त्याच्या उलट राजा माझ्या मळ्यामंदी.

५० फक्त's picture

15 Sep 2011 - 12:05 am | ५० फक्त

एक वेगळाच हिरवा माज पाहुन फार छान वाटलं, मस्त एकदम.

पिवळा डांबिस's picture

15 Sep 2011 - 2:07 am | पिवळा डांबिस

मळा आणि त्याचे फोटो दोन्ही मस्त आहेत!!!
सगळी रोपं कशी रसरशीत दिसताहेत!

आम्हाला च्यायला भाज्यांची लागवड चांगली करताच येत नाही. नेहमी काहितरी बिनसतं! :(
आता पुढल्या वेळेस तिथे आलो की तुमच्या मातोश्रींची भेट घेऊन त्यांची पद्धत शिकली पाहिजे.

पाषाणभेद's picture

15 Sep 2011 - 2:58 am | पाषाणभेद

>>> माझ्या आईकडच्या छोट्याश्या मळ्याला लागलेल्या भाज्या.
>>> ४) कारल्याचे फुल
>>> कारल

तुमच्या आईने 'कारल्याचं बी पेर गं सुने पेर गं सुनेss' हे गाणं म्हटलं होतं का?

फोटो एकदम रसरशीत आहे. एकदा तुमच्याकडे येतो तेव्हा वानोळा द्यायचे विसरू नका. (पिशवी माझीच आणेन.)
:-)

'कारल्याचं बी पेर गं सुने पेर गं सुनेss'

अगदी हेच म्हणायला आले होते मी. अक्षय तृतियेला मांदव घालायचा परड्यात अन मृगाच्या मुहुर्तावर बिया पेरायच्या , हळुहळु सारा मांडव पाना फुलांनी भरुन जातो. अन मग गणपती गौरीला या भाज्या नैवेद्यात दाखवायच्या.

सुरेख आठवणी जागवल्यास जागु , धन्यवाद !

चित्रा's picture

15 Sep 2011 - 6:28 am | चित्रा

मस्त भाज्या/फोटो.

आमच्या घरी अळू वगैरे छान व्हायचे. केळी, शेवगा, इ. झाडे पण होती. पण ह्या भाज्या लावल्याचे आठवत नाही. माझा लहानपणी बेत होता आमच्या जुन्या घराच्या पडवीच्या पायर्‍यांपर्यंत वेगवेगळ्या भाज्या लावून बघण्याचा. माझा अंगणात कोणत्या भाज्या कुठे, कशा येतील याचा मॅपही तयार होता. :-) मात्र तो बेत घरच्यांनी वेळीच हाणून पाडला.

सहज's picture

15 Sep 2011 - 6:29 am | सहज

सुरेख.

'जीवन त्यांना कळले हो' असे म्हणता येतील अश्या ज्या काय थोड्याफार व्यक्ती आजुबाजूला दिसतात त्यात जागूताईंचा समावेश आहे. (आता मिपाकरांच्या थट्टेच्या भाषेत 'जेवण त्यांना कळले हो' पुरस्कार विजेत्यादेखील!!)

पल्लवी's picture

15 Sep 2011 - 5:17 pm | पल्लवी

.

शहराजाद's picture

17 Sep 2011 - 4:56 am | शहराजाद

+१

हुप्प्या's picture

15 Sep 2011 - 6:38 am | हुप्प्या

अगदी तुमच्या बागेत फेरफटका मारल्यासारखे वाटले. अगदी सुरेख फोटो.
रसरशीत हिरवे रंग. लाजवाब!

मस्त ग .....

सविता००१'s picture

15 Sep 2011 - 9:36 am | सविता००१

आज सकाळी सकाळीच तुमच्या फेरफटका मारला. झक्कास आहे बाग!!

सुहास झेले's picture

15 Sep 2011 - 10:37 am | सुहास झेले

मस्त गारगार वाटलं हिरवाईने नटलेली बाग बघून... :)

प्यारे१'s picture

15 Sep 2011 - 10:57 am | प्यारे१

मस्त मस्त....

(नाव वाचून आधी वाटले पाभेंची (मा. ;) चेसुगुं ;) ची शमा ;) मागून ;) ) नवी कविता की काय, पण मग नाव आणि विभाग बघितला आणि धागा उघडला.)

मनराव's picture

15 Sep 2011 - 11:04 am | मनराव

झक्कास........ !!!

वपाडाव's picture

15 Sep 2011 - 1:00 pm | वपाडाव

जागुतै,
एक विनंती ह्या फटुंसोबत एखादा संपूर्ण मळ्याचा (म्हणजे सध्या शक्य असल्यास) फटुही टाकावा....
म्हणजे हिरवळ किती दाट आहे हेही दिसेल.....
बाकी फटु येक नंबरी हैती...

वरील सर्वांशी सहमत.
मळा एकदम मस्त गो जागु ताय. :)

उदय के'सागर's picture

15 Sep 2011 - 3:48 pm | उदय के'सागर

जागु ताई खरंच खुपच छान वाटलं फोटोज बघुन. स्वतः च्या दारातुन वा मळ्यातुन अश्या ताज्या ताज्या भाज्या आणुन त्या बनवण्यासारखं ऐश्वर्य नाही. खुपच छान !!! :)

(लहानपणी मी स्वतः लावलेल्या काहि भाज्यांच्या (टोमॅटो, मिरची इ.) झाडांना थोडे जरी फळ येउ लागले की जो आनंद व्हायचा ना, अगदी तोच आनंद झाला हे फोटो पाहुन!!!) :)

प्राजक्ता पवार's picture

15 Sep 2011 - 4:29 pm | प्राजक्ता पवार

हिरवीगार बाग बघुन छान वाटलं :)

दुधी भोपळ्याच्या हलव्याची रेसिपी कधी ?

प्रभो's picture

15 Sep 2011 - 10:03 pm | प्रभो

ही आणी ही घ्या रेशीपी.

धन्यवाद प्रभो.कोकणातले दिवस आठवले.
आणि हो जागुताई वाट पाहतोय रेसेपिची.

पल्लवी's picture

15 Sep 2011 - 5:18 pm | पल्लवी

भारीच दिसतोय तुझा मळा !

सगळ्यांचे धन्यवाद.
इरसाल टाकते हो दुधी हलव्याची रेसिपी.

मळयाचे फोटोही टाकेन पुढच्या आठवड्यात.