पुण्यातील मानाच्या बाप्पांचा मान तर ठेवायलाच हवा. पुण्यातील मानाचे पहिले पाच आणि काही तितकेच प्रसिध्द बाप्पा या धाग्यात मांडत आहे.
*** मानाचा पहिला - कसबा गणपती (पुण्याचे ग्रामदैवत) ***
*** मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरी ***
*** मानाचा तिसरा गणपती - गुरूजी तालीम ***
*** मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग ***
तुळशीबाग मंडळाने साकारलेली साईबाबा मुर्ती ( मुर्तीकार - विवेक खटावकर )
*** मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा (टिळकांचा गणपती) ***
*** हिंदुस्तानातील पहिला सार्वजनीक गणपती - भाऊ रंगारी मित्र मंडळ (बुधवार पेठ)
*** श्रीमंत दगडूशेठ हलवाई ***
*** जिलब्या मारूती ***
*** मंडईचा शारदा गणपती ***
शारदा गणपतीची जुनी मुर्ती
शारदा गणपतीची नवी मुर्ती
फिश-आय लेन्सची करामत
*** बाबूगेनू मित्र मंडळ - नवसाचा गणपती ***
गणपती बाप्पा !!!! मोरया !!!!!
--
जातीवंत भटका
--
प्रतिक्रिया
5 Sep 2011 - 11:35 pm | दीपा माने
गणपतींचे दर्शन इथे घरबसल्या झाले. धन्यवाद.
5 Sep 2011 - 11:38 pm | प्रचेतस
अतिशय सुंदर फोटो.
बादवे, इतक्या गर्दीत इतके सुरेख फोटो कसे काढू शकलास बरे?
5 Sep 2011 - 11:45 pm | अन्या दातार
हाच प्रश्न पडला होता मला.
5 Sep 2011 - 11:46 pm | जातीवंत भटका
अरे टेलीफोटो (झूम) लेन्सची करामत आहे सगळी. दगडूशेठचा फोटो तर मी ३०० मीटरवरून काढला असेल. समोरून काढलेला.
5 Sep 2011 - 11:58 pm | गणपा
धन्स रें भटक्या.
गेलेहर बसल्या सगळ्या गणपतींचे दर्शन घडवलेस.
6 Sep 2011 - 12:10 am | ज्योति प्रकाश
पुण्याच्या गणपतींचे घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.
6 Sep 2011 - 12:11 am | जाई.
मुंबैत बसल्या बसल्या पुण्याच्या गणपतीची सफर घडवलीत.
सर्वच फोटो सुरेख
6 Sep 2011 - 12:14 am | रेवती
हिरव्या पुणेकारांनाही दर्शनाचा लाभ झाला.
तुमचे आभार!
मंडईच्या गणपतीची जुनी मूर्तीच जास्त आवडली.
त्यातील शारदा आर्जवी आणि मायाळू वाटते,
नवी शारदा खाले बघते आहे असा भास होतोय.
चेहरा झाकल्यासारखा मलाच वाटतोय की तो तसा सगळ्यांनाच वाटतोय?
नव्या शारदेची पैठणी मस्त आहे.
6 Sep 2011 - 5:58 am | सुहास झेले
_/\_ अप्रतिम... सुंदर !!
सगळ्या मानाच्या गणपतींचे घरबसल्या दर्शन झाले... खटावकरांनी साकारलेली बाबांची मूर्ती विशेष आवडली !!
पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत :)
6 Sep 2011 - 9:20 am | किसन शिंदे
_/\_
अवांतर: तुला धन्यवाद देऊन देऊन तोंड दुखायला लागलं आता..:)
6 Sep 2011 - 10:13 am | मैत्र
किती आहे २५० का ३०० मिमी ? धन्यवाद.
जिथे भेट देता येणार नाही कदाचित असेही बरेच गणपती इतक्या सुंदर रुपात पहायला मिळाले!
नेहमीप्रमाणे कंपोझिशन बेस्ट !
6 Sep 2011 - 12:42 pm | निवेदिता-ताई
पुण्याच्या गणपतींचे घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.
दरवर्षी पुण्याचे गणपती पाहिन म्हणते पण जमतच नाही....पुनश्च धन्यवाद...
अजुन येउदेत फोटो.
6 Sep 2011 - 1:21 pm | परिकथेतील राजकुमार
बाबा रे भटक्या, तुला आणि बाप्पाला दोघांना वंदन रे __/\__
6 Sep 2011 - 1:43 pm | स्मिता.
घरबसल्या सगळ्या गणपतींचे दर्शन घेवून मन प्रसन्न झाले. सगळे फोटो अतिशय सुरेख आहेत.
धन्यवाद!
6 Sep 2011 - 3:34 pm | jaypal
सध्याची परीस्थीती पाहुन वाटत आता तरी देवा मला पावशिल का?
6 Sep 2011 - 4:45 pm | गणेशा
अप्रतिम
6 Sep 2011 - 5:40 pm | स्पंदना
जरा वेळ लागला सारे फोटो दिसायला पण एकदा पाहिल अन अतिशय प्रसन्न वाटल भटके साहेब जी !
6 Sep 2011 - 6:16 pm | प्राजक्ता पवार
अतिशय सुरेख फोटो .
6 Sep 2011 - 7:33 pm | सानिकास्वप्निल
अप्रतिम!!!!
6 Sep 2011 - 8:10 pm | मदनबाण
सर्वच फोटो मस्त आहेत,पण शारदा गणपतीची नवी मुर्ती विशेष आवडली. :)
10 Sep 2011 - 4:42 am | पाषाणभेद
मन प्रसन्न झाले. सुंदर फोटो
10 Sep 2011 - 12:10 pm | शाहिर
सहस्त्र _/\_
13 Sep 2011 - 9:37 am | सविता००१
मस्त फोटो. सकाळी सकाळी हे फोटो पाहून मस्तच मूड बनला. धन्यवाद.
14 Sep 2011 - 12:29 pm | अमोल केळकर
खुप छान फोटो.
अमोल
14 Sep 2011 - 3:36 pm | जागु
खुप खुप धन्यवाद इतके सुंदर दर्शन घडविल्याबद्दल.
16 Sep 2011 - 1:45 pm | दीप्स
खूपच छान !!
धन्यवाद !!
तुमच्या मूळे आज घरबसल्या बाप्पाचे दर्शन झले. फोटो नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर आहेत.