बाप्पा मोरया - १

जातीवंत भटका's picture
जातीवंत भटका in कलादालन
3 Sep 2011 - 7:52 pm

नमस्कार मंडळी !

आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. त्यांच्याच वेगवेगळ्या भावमुद्रांची छायाचित्रांचे धागे घेऊन येणार आहे. पुण्यातील जमतील तेवढ्या मंडळांचे बाप्पा या धाग्यांवर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. सुरूवात माझ्या घरच्या मंडळापासून करतो ;)

बाप्पांसाठी घरी बनवलेलं सुवर्णमंदीर (अक्षरधामच्या मंदीराशी काही संबंध नाही :) )

--
जातीवंत भटका ...

छायाचित्रण

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2011 - 7:57 pm | बिपिन कार्यकर्ते

सुवर्ण मंदीर आवडलेच! पुढच्या भागांची वाट बघतोय

जाई.'s picture

3 Sep 2011 - 8:00 pm | जाई.

फोटो छान आलेत
क्रमांक १,४ चे फोटो विशेष आवडले

मदनबाण's picture

3 Sep 2011 - 8:05 pm | मदनबाण

सुंदर ! :)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2011 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा

वन्स मो..... अर,वन्स मोर....

वाहव्वा....नांदी दमदार झालीये,आता पुढचा अंकही जोमदार होउद्यात...आणी इंटरव्हल फार काळ नको...अर्थात आमचा नांदीलाच वन्स मोअर आहे, तो आगे हमारा होगा क्या?प्रचंड उत्सुकता आहे पुढची...

कलात्मक मूर्ती... कलात्मक मूर्ती. हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, आणी कधी कधी तो अशा मूर्तींच्या रुपानी आपण अक्षरमात्र नाही हे सांगून जातो. काय अप्रतिम मूर्ती आहे हो...व्वा व्वा...सारखं कौतुकच करत रहावस वाट्टय... अश्या मूर्तींना प्राण-प्रतिष्ठेचे संस्कारही लागत नाहीत. किंबहुना असुही नयेत.ह्या मूर्ती स्वतःच एक संस्कार बनून येतात...तोच त्यांचा प्राण,आणी तीच त्यांची प्रतिष्ठा! पहाता क्षणीच असं वाट्टं की हा देव आपली विघ्न घालवेल, ...खरच ही मंगलमूर्ती आहे..

मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्ती साधकं।
कलाधरा वतंसकं विलासी लोक रक्षकं॥
अनायकैक नायकं विनाशी तेभ दैत्यकं।
नता शुभाशुनाशकं नमामी तं विनायकं॥

सुहास झेले's picture

3 Sep 2011 - 10:23 pm | सुहास झेले

वाह वाह... सुंदर गणेश _/\_

मंदिर खूप खूप आवडले, पुढल्या भागाची वाट बघतोय... बाप्पा मोरया !!

नगरीनिरंजन's picture

3 Sep 2011 - 10:28 pm | नगरीनिरंजन

सुंदर आहेत फोटो. ४ नंबर एक नंबर आहे!

गणपा's picture

3 Sep 2011 - 10:34 pm | गणपा

आशिर्वाद द्या देवा.
_/\_

अन्या दातार's picture

4 Sep 2011 - 1:02 am | अन्या दातार

जब्बरदस्त हो जा.भ. कंपोझिशन भारी आहे. आवडले

चतुरंग's picture

4 Sep 2011 - 3:25 am | चतुरंग

सुवर्णमंदिर अत्यंत सुंदर झाले आहे. इतक्या कौतुकाने आणि आत्मियतेने हे सगळे करणे हा आनंदोत्सवच असतो.
तुमच्या हातात कला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
डौलदार म्हणावी अशी मूर्ती बघून मन प्रसन्न झाले. ह्या मूर्तीच्या कारागिरांना माझा नमस्कार सांगावा.
बाप्पासमोर तर आपण नतमस्तक आहोतच! <=०()8=<

(साष्टांगनमित) रंगा

बापा आणि सजावट अत्यंत आकर्षक झाली आहे.
पुढचे बाप्पा कोणते असतील ही उत्सुकता आहे.

नंदू's picture

4 Sep 2011 - 6:32 am | नंदू

छान!
क्रमांक ९ चा जास्त आवडला.

प्रचेतस's picture

4 Sep 2011 - 10:07 am | प्रचेतस

सुंदर मंदिर आणि सुरेख फोटो.

कौशी's picture

5 Sep 2011 - 12:07 am | कौशी

बाप्पाचे सर्व फोटो आवडले.
आणि मन्दिर तर अप्रतिम..

किसन शिंदे's picture

5 Sep 2011 - 9:33 am | किसन शिंदे

आधी वंदू तुज मोरया... _/\_

वर रंगा यांनी सांगितल्याप्रमाणे जबरदस्त कला आहे तुमच्या हातात..
आधी बाप्पाची एवढी सुंदर मुर्ती निवडणं..
मग हाताने एवढ छान सुवर्ण मंदिर तयार करणं..
आणी त्या सगळ्यांचे छान छान फोटो काढून इथे आमच्यासाठी आणणं...
जातीवंत भटक्यासोबतच तुम्हाला जातिवंत कलाकारही म्हणता येईल..नाही का.!

शाहिर's picture

5 Sep 2011 - 7:07 pm | शाहिर

_/\_