अतिशय गाजलेला भंपक लेख

सोत्रि's picture
सोत्रि in काथ्याकूट
28 Aug 2011 - 12:58 pm
गाभा: 

नुकतंच (कोणॆ एके काळी) बहुचर्चित झालेला मी मतदान का करावे? हा लेख वाचला.
चेतन सुभाष गुगळे (जगभर प्रसिद्ध असलेले चिंतनशील लेखक) यांच्या लेखाचे जगभरात(?) प्रचंड कौतुक झालेलं असून त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली व जगभरांतुन प्रतिसादांचा पाउस पडला (अशी माहिती सदर लेखाच्या शेवटी होती).

याचं अजिबात आश्चर्य नाही की असे लेख लिहीले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की असे लेख प्रसिद्धही केले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक असे लेख मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या (?) या लेखाच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या लेखाच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.

आता प्रश्न असा उरतो की ज्या कुणी या लेखाच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून प्रतिसाद पाठविले आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे)

या लेखातुन बरंच काही चिंतनशील अस वाचायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण लेख वाचल्यावर "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही ‘चिंतनशील’ मिळालं नाही.

पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा नविन धागा.

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Aug 2011 - 1:16 pm | श्रावण मोडक

मला तरी संपूर्ण लेख वाचल्यावर "असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही ‘चिंतनशील’ मिळालं नाही.

हेच त्यांना म्हणायचं असतं. पण ते वेळीच ओळखण्याएवढं चाणाक्षपण तुमच्यासारख्यांकडं नसल्यानं त्यांना आख्खा लेख लिहावा लागतो. या कष्टाबद्दल त्यांचे क्षमाप्रार्थी होण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावरच टीकेचा सूर लावता. यालाच खऱ्याची (खरे - सत्य. खरे आडनाव नव्हे. नाही तर तुम्ही इथून थेट आम्हाला अंताजी खऱ्यांकडे न्यायचे) दुनिया नाही असे म्हणतात. ;)

स्पा's picture

28 Aug 2011 - 2:01 pm | स्पा

सोकाजी
खाल्लीस माती

आता युद्धाला तयार राहा ;)
सदर टर उडवला गेलेला लेखक.. त्याची सर्व तकाद पणाला लावून पुढील एक आठवडा या धाग्यावर धुमाकूळ घालेल
अणि हा धागा कसा पहिल्या ३ धग्यांवर राहिल याची काळजी घेइल.. असो..
तुम्हाला शुभेच्छा

नावातकायआहे's picture

28 Aug 2011 - 2:19 pm | नावातकायआहे

श्रावणातल्या धुळवडीची आवसेच्या मुहुरतावरची सुरुवात

विनायक प्रभू's picture

28 Aug 2011 - 5:42 pm | विनायक प्रभू

नाकाआ शी सहमत.
तसा मी ९९.९९% सगळ्यांशी सहमत असतो.

कुणी काय लिहावं आणि कुणी काय वाचावे हे सांगणारे टिकुजीराव कोण?

मिपावर टोळ्या करुन नविन लेखकांना नाउमेद करणार्यांची तळी भरायची वेळ झाली आहे असे वाटते.

सोत्रि's picture

28 Aug 2011 - 6:23 pm | सोत्रि

भावश्या, लेका बर्‍याच दिवसांनी इथे आला असशील तर जरा अभ्यास* वाढव !

लेखाची कॅटेगरी बघितलीस का ?

पाकक्रिया - कारण 'जिलबी' टाकली आहे
विडंबन आणि समिक्षा*

* अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक

- ('उमेदीने' तळी भरणारा) सोकाजी

आशु जोग's picture

30 Aug 2011 - 11:24 pm | आशु जोग

अभ्यास वाढवा...

ही मोठे व्हा ची कोपी वाटते

आपला
(मने अभ्यासणारा) जोग

आशु,

'अभ्यास वाढवा' आणि 'मोठे व्हा' ह्यांत खुप फरक आहे.
त्यासाठी अभ्यास वाढवा मग आपोआपच मोठे व्हाल :)

- (मनाबरोबरच तनं अभ्यासणारा) सोकाजी

तुमच्या लेखाचे नाव छान आहे, जाम आवडले ! दिलखुश !

तुमी स्वतःच भम्पक म्हटल्यामुळे वाचायचे राहुन गेले

आत्मशून्य's picture

28 Aug 2011 - 3:16 pm | आत्मशून्य

हा हा....

नितिन थत्ते's picture

28 Aug 2011 - 5:55 pm | नितिन थत्ते

(कंस विसरलात का सोकाजीराव?)

सोत्रि's picture

28 Aug 2011 - 6:12 pm | सोत्रि

थत्तेचाचा,

नव्ह नव्ह, कंस अज्याबत इसरलो न्हाइ. कंसमामास्नी कसा काय इसर्णार हो. पन त्यो फकस्त पर्तीसादात असतुया!

- ( कंसाला मारलेला (ब्रिजेश) ) सोकाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 6:10 pm | बिपिन कार्यकर्ते

हा सोकाजी सोकावला आहे! चांगल्या लेखनाची अशी पिसं काढल्याबद्दल निषेध!

"आप कौनसी हैसीयत से निषेध कर रहे हो" (आठवा कणेकरांची फिल्लमबाजी)
म्हणजे हा निषेध करणारे बिका सं.मं मधले की पूनम मधले? :P

म्हणजे पुढची स्ट्राटेजी ठरवायला बरे!

- (स्ट्राटेजीक) सोकाजी

नन्दादीप's picture

28 Aug 2011 - 6:23 pm | नन्दादीप

प्रतिसादा गणिक बदलणारी स्वाक्षरी बघून आय. डी. हॅक झाल्याची शंका येतेय...
((एका महान आय डी ची आठवण झाली....))

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते

सोकाजी, तुम्ही असे प्रश्न विचारून विषय बदलायचा जो प्रयत्न केला आहे तो अश्लाघ्य आहे. मी अतिशय गंभीरपणे तुमचा निषेध केला होता.

सोत्रि's picture

28 Aug 2011 - 7:58 pm | सोत्रि

अतिशय गंभीरपणे केलेल्या निषेधाचा स्विकार करुन तितक्याच गंभीरपणे जाहीर माफी मागीतल्या गेली आहे !

- (मोठ्या मनाचा मोकळा) सोकाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 9:06 pm | बिपिन कार्यकर्ते

- (मोठ्या मनाचा मोकळा) सोकाजी

खरं तर तुम्हाला भेटल्यानंतर "(मोकळ्या मनाचा मोठ्ठा) सोकाजी" असं जास्त चपखल बसेल असे नम्रपणे नमूद करतो. ;)

स्पा's picture

28 Aug 2011 - 9:19 pm | स्पा

वा वा... गोगोड कंपूबाजी पाहून द्वोळे पाणावले ;)

-- जाहीर कम्पुकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 10:02 pm | बिपिन कार्यकर्ते

मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ तुम्हाला! तुमच्या पहिल्या धाग्याचे उत्तर मिळेल तुम्हाला! ;)

हे बघा! अवांतर करणारे संपादक आणि मिपावर सतत अवांतर प्रतिसाद येतात म्हणून लोक इतरांना दोषी ठरवतात.

(सध्या घासुगुर्जी) प्रियाली

स्पा's picture

29 Aug 2011 - 6:36 pm | स्पा

मिष्टर स्पा! गप पडा! बघून घेऊ तुम्हाला! तुमच्या पहिल्या धाग्याचे उत्तर मिळेल तुम्हाला!

"आप कौनसी हैसीयत से निषेध कर रहे हो" (आठवा कणेकरांची फिल्लमबाजी)
म्हणजे हा निषेध करणारे बिका सं.मं मधले की पूनम मधले?

म्हणजे पुढची स्ट्राटेजी ठरवायला बरे!

- (स्ट्राटेजीक) स्पाकाजी ;)

मृत्युन्जय's picture

28 Aug 2011 - 11:32 pm | मृत्युन्जय

त्यापेक्षा मोकाजी जास्त चपखल आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2011 - 8:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सोकाजी, तुमच्या खवत लवकरच एक पाशवी आयडी "अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!" असं मोठ्या फॉण्टमधे लिहीणार आहेत असं भविष्य वर्तवण्यात आल्या जात आहे.

तुमचं खरं नाव सोकाजी का? नसेल तर तुम्ही अशी टोपणनावं घेऊन खरी नावं वाटवीत अशा सदस्यनामाने लिहीणार्‍या आयडीच्या लेखावर भंपक असे शेरे कसे मारू शकता?

आजचा अभ्यास पूर्ण केलात का? मग आजचा तुमचा शब्द आहे megalomania. याचा थोडा अभ्यास करा आणि मोठे व्हा. ठीक?

सोडा हो, तुम्ही तुमची कॉकटेल्स काढा, मस्त एकत्र बसू, गप्पा मारू, कॉकटेल्सचा आस्वाद घेऊ, जग कसं 'रोचक' आहे यावर थोडीबहुत चर्चा करू आणि पुन्हा आपापल्या घरी जाऊन मिपावर दंगामस्ती करू! कशाला उगाच अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या प्यायच्या?

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 9:08 pm | बिपिन कार्यकर्ते

मी पूर्ण सहमत आहे. ते लॅक्सेटिव्ह वगैरे पिऊन पिऊन कट्टाळा आलाय सध्या!

पैसा's picture

28 Aug 2011 - 9:31 pm | पैसा

तुम्ही पाणी बिणी प्यायल्यासारखे लेक्सेटिव्ह पिताय की काय? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 9:58 pm | बिपिन कार्यकर्ते

पित होतो ताई, पित होतो! काय सांगू तुम्हाला!

पैसा's picture

28 Aug 2011 - 10:02 pm | पैसा

पण अजून एक शंका आहे, अदिती "अँटिलॅक्सेटिव्ह कशाला प्यायचं" असं काहीतरी म्हणत होती.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2011 - 10:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बौद्धीक बद्धकोष्ठ, बोळा तुंबणे वगैरे शब्दांचा अभ्यास कर गं. तू अजून "मोठी होशील"! ;-)

पैसा's picture

28 Aug 2011 - 11:03 pm | पैसा

पण कोणत्याही बौद्धकोष्ठाला कोणतं तरी लॅक्सेटिव्ह उपयोगी पडेल, अँटिलॅक्सेटिव्ह घेतलं तर बूच मारल्या जाईल ना!!! ;)

(की त्याचसाठी म्हणतेस तसं?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Aug 2011 - 12:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणूनतर म्हटलं ना "कशाला उगाच अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या प्यायच्या?" बौद्धीक बद्धकोष्ठ झालंय याची जाहिरात करणारे लेख वाचणे म्हणजे अ‍ॅंटीलॅक्सेटीव्हच्या बाटल्या पिण्यासारखंच नाही का!

काय करावं या नवीन सभासदांचं? सगळं कसं उचकटून सांगावं लागतं!

पैसा's picture

29 Aug 2011 - 8:17 pm | पैसा

ओ जोजोकाकू, तुमचं जालीय वय माझ्यापेक्षा २ वर्षं जास्त आहे हे सदासर्वदा सांगायलाच पाहिजे का हो? ;)

श्रावण मोडक's picture

29 Aug 2011 - 8:21 pm | श्रावण मोडक

जोजोकाकू, तुमचं जालीय वय माझ्यापेक्षा २ वर्षं जास्त आहे हे सदासर्वदा सांगायलाच पाहिजे का हो?

किती तो प्रामाणिकपणा! यमी लाजली असेल ना... ;)

पैसा's picture

29 Aug 2011 - 9:17 pm | पैसा

इश्श्य! यमी येईलच आता, जरा थांबा हो (यमीचे काका)! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2011 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

किती तो प्रामाणिकपणा! यमी लाजली असेल ना...

यमी लाजणार ?

लोकाला लाज आणेल ती. :P

श्रावण मोडक's picture

28 Aug 2011 - 10:04 pm | श्रावण मोडक

नको, नको!!! काही सांगू नका. तुम्ही भोगलं ना ते दुःख. बास्स झालं. त्याची दर्दभरी कहाणी नको... ;) अशा कहाण्या म्हणजे पुन्हा ते दिवस जगणं असं म्हणतात... ;)

प्रियाली's picture

28 Aug 2011 - 11:46 pm | प्रियाली

बक्षीसाची ऐडिया आधीच फोडून जाहीर केल्याबद्दल जाहीर निषेध!

आता सोकाजींना अभिनंदन स्वीकारण्यावाचून गत्यंतर दिसत्त नाही. त्या गत्यंतर नसण्याबद्दल आणखी एक अ‍ॅडिशनल

अभिनंदन!!

सोत्रि's picture

29 Aug 2011 - 6:44 pm | सोत्रि

विषय निषेध बघुन भीत भीतच प्रतिसाद बघितला, तर एकदम मोठ्या फॉन्ट मधे अभिनंदन बघुन एकदम भंजाळलोच!

पण एकंदरीत प्रतिसाद वाचता पाशवी आयडीकडुन पाठिंबा मिळालेला पाहुन थोडे मांस चढले अंगावर आणि हाय रे कर्मा.... वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचा एकदम बोर्‍या वाजला म्हणुनश्यान पाशवी आयडीचा 'निसेद'.
(ऑलरेडी ह्या आयडीने अभिनंदन केले गेल्या असल्यामुळे निषेध जरा मवाळ होउन निसेद झाला आहे)

- (मवाळ 'निसेद' व्यक्त करणारा ) सोकाजी

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2011 - 9:48 pm | प्रीत-मोहर

इतक्या चांगल्या लेखाला जिलबी व विडंबन क्याटेगिरीत टाकल्याबद्दल सोकाजीरावांचा तीव्र णिसेद !!!!!

(नव्यांना प्रोत्साहन देणारी) प्रीमो

श्रावण मोडक's picture

28 Aug 2011 - 9:58 pm | श्रावण मोडक

(नव्यांना प्रोत्साहन देणारी) प्रीमो

आज्जे, आयडीपुरता तुझ्यापेक्षा सोकाजी काही आठवडे तरी मोठा आहे गं... निघाली सह्यांची नकला करायला... ;)

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2011 - 10:07 pm | प्रीत-मोहर

मग तर त्यांनी जास्ती प्रोत्साहन द्यायला नको का? ;)

आणि काय हो काका तुम्हाला बै सगळ्या गोष्टीत निगेटिव शोधायची भारी हौस...

माझी सह्या कापी करण्याची सवय दिसली आणी प्रोत्साहन देते ते तेव्ढ नाय दिसल ;)

हे बर नाय हां

श्रावण मोडक's picture

28 Aug 2011 - 10:19 pm | श्रावण मोडक

मग तर त्यांनी जास्ती प्रोत्साहन द्यायला नको का?

ते तर देतातच गं. सातत्यानं कॉकटेलवर लिहिणारा दुसरा कोण आहे सांग पाहू?

आणि काय हो काका तुम्हाला बै सगळ्या गोष्टीत निगेटिव शोधायची भारी हौस...

सगळ्या? यादी दे.

माझी सह्या कापी करण्याची सवय दिसली आणी प्रोत्साहन देते ते तेव्ढ नाय दिसल

दिसलं की. प्रोत्साहनाला हरकत नाहीच आपली. नव्यांना या शब्दाविषयी तुला तपशील पुरवला. पण कॉप्या करण्याचा नादच असा की तिकडं लक्षच जात नाही ना...

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2011 - 10:23 pm | प्रीत-मोहर

मला आज्जी म्हणुन स्वतःचे वय लपवण्याच्या क्षीण प्रयत्नांबद्दल श्री श्रावण मोडके यांना हॅप्पी बर्थ्डेच्या शुभेच्छा
व ही मेणबत्ती :)

श्रावण मोडक's picture

28 Aug 2011 - 10:33 pm | श्रावण मोडक

लेट करंट!!! ;) मेणबत्ती संप्रदायच शेवटी. ;)

राजेश घासकडवी's picture

28 Aug 2011 - 10:34 pm | राजेश घासकडवी

तुमची मेणबत्तीसुद्धा उमेदीची वर्षं संपल्यासारखी, रया गेलेली, म्हातारी दिसते आहे. चांगली तरणीताठी तरी निवडायची. श्रामोंना बरं वाटलं असतं.

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2011 - 10:40 pm | प्रीत-मोहर

जे आहे ते असे आहे ... असच्च स्वीकाराव लागेल ;)

@ श्रामोण्णा
मेणबत्ती हुडकत होते तुम्च्यासाठी .. वाटल्यास बिकाशेखना विचारा ;)

श्रावण मोडक's picture

28 Aug 2011 - 10:41 pm | श्रावण मोडक

मेणबत्ती हुडकत होते तुम्च्यासाठी .. वाटल्यास बिकाशेखना विचारा

उंदराला मांजर साक्ष. म्हण अशीच आहे म्हणून उंदीर आणि मांजर म्हटलं. एरवी चुचुंद्री (किंवा चिचुंद्री) आणि बोका म्हटलं असतं. ;)

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2011 - 10:46 pm | प्रीत-मोहर

ऑ... मी तर ऐक्ल होत बिकाशेख तुम्च्या कंपुतले आहेत ...
हे कधे घडल ? अरेरे ..

पहाताय ना चाचाजान!!!

श्रावण मोडक's picture

28 Aug 2011 - 10:50 pm | श्रावण मोडक

मोठ्ठी हो गं ब(ड)बडे... तुला अजून कंपू समजलेलाच नाही. :)

उंदराला मांजर साक्ष. म्हण अशीच आहे म्हणून उंदीर आणि मांजर म्हटलं. एरवी चुचुंद्री (किंवा चिचुंद्री) आणि बोका म्हटलं असतं.

ओ श्रामो'काका',
तुमी चिटींग करुन र्‍हायले... तुमीच परवा 'बिका अरबी उंट आहेत' असं म्हणाला होतात.. आता मांजर/बोका म्हणताय... पैले नक्की करा, कण्फुसन होतंय... :D
बाकी प्रीमोला कायपण म्हणा, ती शिव्याच देते, त्यामुळे फरक पडत नै... :-)

--असुर

प्रीत-मोहर's picture

29 Aug 2011 - 5:26 pm | प्रीत-मोहर

मेल्या असुर्‍या तुला बरा माझ्या शिव्यांचा अणुभव तो? :P

श्रावण मोडक's picture

29 Aug 2011 - 5:38 pm | श्रावण मोडक

अरे बाबा बिकाचे अनेक अवतार असतात. वेळकाळानुरून तो अवतार घेतो. कधी उंट, कधी बोका, कधी पोपट, कधी कोल्हा, कधी लांडगा... या क्रमाने तो बिबट्याही होतो. या सकळ प्राणीमात्रांचे एकेक गुण एकाच ठिकाणी महायचे असतील तर ते बिकामध्येच पाहता येतात.
थोडा अधिक कट्ट्यांवर येत जा. म्हणजे तुला समजेल ते. मी उगाच त्याच्या बाजूला हाताची घडी, तोंडावर बोट असा बसत नसतो. ;) पुढच्या दोन-चार कट्ट्यांना तर त्याच्या हाताच्या टप्प्यातही येणार नाही मी. ;)
प्रीमो ही फक्त ब(ड)बडी आहे रे. विश्वास नसेल तर बांबू हाऊसमध्ये जे तिला भेटले त्यांना विचार. तिनं त्या दिवशी भल्या-भल्या बोलघेवड्यांना मौनात जाण्यास भाग पाडलं होतं. :)

प्रीत-मोहर's picture

29 Aug 2011 - 5:45 pm | प्रीत-मोहर

उगीच पुड्या सोडु नका.
तुमी व्हता काय कट्ट्याला?

श्रावण मोडक's picture

29 Aug 2011 - 5:53 pm | श्रावण मोडक

उगीच पुड्या सोडु नका.

अजून नाही सोडलेल्या. सोडू का? धम्या, पराला विचार आणि मग उत्तर दे. ;)

तुमी व्हता काय कट्ट्याला?

होतो. तसंही धम्यानं पुरावा दिलाच आहे.

प्रीत-मोहर's picture

29 Aug 2011 - 6:01 pm | प्रीत-मोहर

ऐला ..

घ्या मांजराला बोक्याला उंदीर(की बोकेच?) साक्ष झाल की हो हे

धमाल मुलगा's picture

29 Aug 2011 - 5:48 pm | धमाल मुलगा

श्री.कुकडोलकर लिखीत 'बिबट्या कुठे जाणार?' ह्या पुस्तकाचा उपयोग शेख बिबट्या कार्यकर्ते ह्यांचे बिबटेगिरी आणि अडचणी समजावोन घेण्यास कितपत उपयोग होऊ शकेल?

>>तिनं त्या दिवशी भल्या-भल्या बोलघेवड्यांना मौनात जाण्यास भाग पाडलं होतं.
आणि पुढं आठवडाभर त्या मौनाची भाषांतरं ऐकता ऐकता आमचे कान किटले होते. ;)

प्रीत-मोहर's picture

29 Aug 2011 - 5:50 pm | प्रीत-मोहर

धम्या तु संभाळुन रहा हो आता....

श्रावण मोडक's picture

29 Aug 2011 - 5:55 pm | श्रावण मोडक

श्री.कुकडोलकर लिखीत 'बिबट्या कुठे जाणार?' ह्या पुस्तकाचा उपयोग शेख बिबट्या कार्यकर्ते ह्यांचे बिबटेगिरी आणि अडचणी समजावोन घेण्यास कितपत उपयोग होऊ शकेल?

गरज नाही. इथं जा, परिच्छेद क्रमांक ३ वाच.
आता मी मेलोच... ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Aug 2011 - 6:09 pm | बिपिन कार्यकर्ते

मोडक द Deer!

विनायक प्रभू's picture

29 Aug 2011 - 6:18 pm | विनायक प्रभू

बिका मधे एवढे गुण आहेत हे आतापर्यंत मला कसे कळले नाही बॉ?

श्रावण मोडक's picture

29 Aug 2011 - 6:23 pm | श्रावण मोडक

स्टेल्थ! तुम्हालाही कळले नाही यातच बिकाच्या या गुणाची पावती आहे. ;)

धमाल मुलगा's picture

29 Aug 2011 - 7:48 pm | धमाल मुलगा

उंट,अरब ते संपादकत्व अशा खडतर प्रवासाचं हे इंगित मोठं रोचक (आहाहा..काय पर्फेक्ट चानस घावला ह्यो शब्द लिवायला!) आहे. ;)

अवांतरः परिच्छेद क्र.३ मधली शेवटची ओळ वाचून मात्र पक्की खात्री पटलीच. ;)

सहज's picture

29 Aug 2011 - 6:17 pm | सहज

अरे बाबा बिकाचे अनेक अवतार असतात. वेळकाळानुरून तो अवतार घेतो. कधी उंट, कधी बोका, कधी पोपट, कधी कोल्हा, कधी लांडगा... या क्रमाने तो बिबट्याही होतो. या सकळ प्राणीमात्रांचे एकेक गुण एकाच ठिकाणी महायचे असतील तर ते बिकामध्येच पाहता येतात.

बिकाजी एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व ऐकले होते, पशुतुल्य व्यक्तिमत्व म्हणुन नव्याने ओळख करुन दिलीत. धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

28 Aug 2011 - 10:38 pm | श्रावण मोडक

मेलो... मेणबत्ती अशी सार्थ ठरेल असं वाटलं नव्हतं... ;)

माझीही शॅम्पेन's picture

28 Aug 2011 - 10:36 pm | माझीही शॅम्पेन

सोक्या हा लेख अतिशय हीन , सडका आणि भम्पक आहे (म्हणजे लेख भयंकर आवडण्यात आला आहे :) )

सोक्या स्वता:ला जरा आवारा , श्रावण महिन्यात इतक मायलेज मिळेल अस वाटल नव्हत (अरे कुठे कुठे दगड मारशील;))

प्रियाली's picture

28 Aug 2011 - 10:36 pm | प्रियाली

एका सुसंस्कृत धाग्याचे विडंबन केल्याबद्दल सोकाजींचा निषेध! विडंबनासाठी जो धागा वापरलात त्याबद्दल डब्बल निषेध.

नितिन थत्ते's picture

28 Aug 2011 - 10:43 pm | नितिन थत्ते

विडंबनासाठी पॉलिष्टरचाच धागा वापरावा. गुगळ्यांचा वापरू नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2011 - 10:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"आयला, तू पण!"१

१. You too Brutus! या जगप्रसिद्ध वाक्याचे शब्दशः भाषांतर करण्यापेक्षा सुंदर भाषांतर करणे मला जास्त श्रेयस्कर वाटले.

बाकी प्रियालीने सोकाजींचा निषेध केला आहे२ म्हणून मी ही करते.

२. स्लटवॉकची कल्पना भलतीच प्रसिद्ध पावत आहे.

सोत्रि's picture

28 Aug 2011 - 11:02 pm | सोत्रि

थत्ते चाचा,

फ़ुटलो ना हसुन हसुन!

<इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली />
<इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली />
<इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली />
<इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली />
<इतस्त: गडबडुन लोळणारी स्मायली />

- (विमल पॉलिष्टरचे कपडे घालणारा ) सोकाजी

५० फक्त's picture

28 Aug 2011 - 10:52 pm | ५० फक्त

''विडंबनासाठी पॉलिष्टरचाच धागा वापरावा. गुगळ्यांचा वापरू नये.'

पुर्वी विडंबनासाठी नाडी वापरायचे, आता धाग्यापर्यंत आले, भलतेच चिकित्सक झालेत बोवा मिपाकर,

मृत्युन्जय's picture

28 Aug 2011 - 11:28 pm | मृत्युन्जय

मला तर पुस्तक प्रचंड आवडले ब्वॉ. लेखकाने चित्र अगदी डोळ्यासमोर उभे केले आहे. शैली एकदम ओघवती आहे आणि पुस्तक वाचायला सुरु केल्यावर वाचुनच संपवले होते. पेंढारकर जेव्हा ढांगेचे वर्णन करतात तेव्हा तो पर्वत अगदी जिवंत भासतो. ते वातावरण मोजक्या शब्दात अगदी प्रभावीपणे समोर ठेवले आहे. मी तर असे म्हणेन की जर कोणी अजुन हे पुस्तक वाचले नसेल तर त्वरित वाचुन काढावे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Aug 2011 - 11:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गल्ली चुकलात काय हो ??

मृत्युन्जय's picture

28 Aug 2011 - 11:31 pm | मृत्युन्जय

हो रे. आता शोधतो रस्ता परत. झोल झाला

५० फक्त's picture

28 Aug 2011 - 11:41 pm | ५० फक्त

+१ अतिशय सहमत तुमच्याशि मृत्युन्जय, बहुधा तुम्हाला असं लिहायचं असावं.

'मला तर मतदान प्रचंड आवडले ब्वॉ. लेखकाने मतदान केद्र अगदी डोळ्यासमोर उभे केले आहे. मतदारांची रांग एकदम ओघवती आहे आणि मतदान करायला सुरु केल्यावर करुनच संपवले होते. लेखक जेव्हा रांगेचे वर्णन करतात तेव्हा ती रांग अगदी जिवंत भासते. ते वातावरण मोजक्या नोटात अगदी प्रभावीपणे टेबलाच्या ड्रावर मध्ये ठेवले आहे. मी तर असे म्हणेन की जर कोणी अजुन मतदान केले नसेल तर त्वरित करावे.

सुहास झेले's picture

28 Aug 2011 - 11:29 pm | सुहास झेले

सोकाजीराव, अनेक अनेक शुभेच्छा... ;-)

आता ह्या धाग्याला मरण नाही.... जिओ :) :)

साती's picture

28 Aug 2011 - 11:48 pm | साती

@ सो़काजीराव त्रिलोकेकर

या लेखाच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हा लेख वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे

हा तुमचा एकच मुद्दा मान्य.
मलाही हा लेख वाचल्यावर हाच प्रश्न पडला होता. पण आपले मि पा साहित्य किती प्रगल्भ आहे ह्याची ती एक पोच होती

"असला लेख वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये"

पण हे जरा भडक विधान आहे. या लेखातला विषय चांगला आहे. लेख वाचुन वेळ वाया अजिबात जाणार नाही.
फक्त ह्या लेखाबद्दल एवढा जो फुगा/बुडबुडा केला गेला आहे, त्याअपेक्षेने लेख जर वाचला तर अपेक्षाभंग पदरी पडु शकतो.

कसलीही समीक्षा न करता नुसतंच हा लेख वाचु नका म्हणणे योग्य नव्हे

100% सहमत. लेखाबद्दल जरा अजुन थोडे लिहीले असते तर लेख आणखी वजनदार झाला असता.

- (अतिशय गाजलेली) सातीजी

सोत्रि's picture

29 Aug 2011 - 9:08 am | सोत्रि

तुम्हाला मुद्दा मान्य आहे हे वाचून बरे वाटले.

<< या लेखातला विषय चांगला आहे. >>

तो लेख दोन परिच्छेदातही आटोपता येईल. त्याकरिता इतका फापटपसारा कशाला? यापेक्षा उत्तम लेख मिपावर आहेत. इतक्या वेळेत तिथले शंभर कसदार लेख वाचून होतील.

<< कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे लेख वाचु नका म्हणणे योग्य नव्हे >>

भंपक या एका शब्दातच सर्व लेखाची समीक्षा केली आहे. अजून वेगळे काय लिहायचे?

सोकाजीराव त्रिलोकेकर
भ्रमणध्वनी - सध्या तुटला आहे
Electronic Mail Address :- सोत्रि@बटाट्याचीचाळ.कॉम

- (सोकावलेला) सोकाजी

आशु जोग's picture

29 Aug 2011 - 1:43 am | आशु जोग

+१ अतिशय सहमत तुमच्याशि मृत्युन्जय, बहुधा तुम्हाला असं लिहायचं असावं.

'मला तर मतदान प्रचंड आवडले ब्वॉ. लेखकाने मतदान केद्र अगदी डोळ्यासमोर उभे केले आहे. मतदारांची रांग एकदम ओघवती आहे आणि मतदान करायला सुरु केल्यावर करुनच संपवले होते. लेखक जेव्हा रांगेचे वर्णन करतात तेव्हा ती रांग अगदी जिवंत भासते. ते वातावरण मोजक्या नोटात अगदी प्रभावीपणे टेबलाच्या ड्रावर मध्ये ठेवले आहे. मी तर असे म्हणेन की जर कोणी अजुन मतदान केले नसेल तर त्वरित करावे.

हे आहे ५० फक्त यांचे लिखाण

प्रश्न पडलाय या रुपांतराला काय म्हणावे ?
भाषांतर नको

जाउदे वेशांतर म्हणूया

जोग साहेब,

५० फक्तनी निदान त्यांचं मत तर मांडलं.

या धाग्याला हातभार लावण्यापलीकडे तुम्ही काय केलं?

आशु जोग's picture

30 Aug 2011 - 11:20 pm | आशु जोग

हे रुपांतर जाम आवडले !

आशु जोग's picture

30 Aug 2011 - 11:21 pm | आशु जोग

हे रुपांतर जाम आवडले !

छे, आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Aug 2011 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार

मिपाच्या बाब्याशी सहमत आहे.

सतत दारु सारख्या समाजाची नासाडी करणार्‍या विषयावर लिहिणार्‍या सोत्रि ह्यांनी गुगळेंसारख्या वैश्विक सत्य उमगलेल्या माणसाची उडवलेली टर बघून आज मिपाकर असल्याची शरम वाटली.

गेले काही दिवस अनेक जण गुगळेंच्या खिलाडू वृत्तीचा आणि भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यावर जे तोंडसुख घेत आहेत त्यात अजुन एक भर पडलेली बघून दु:ख झाले. आज आपण नव्याने मिपावार येणार्‍यांसमोर काय चित्र उभे करतो आहे हे ह्या लोकांच्या लक्षात कसे येत नाही ?

श्री. सोत्रि ह्यांनी असे लिखाण करुन एक मोठा अपराध केला आहे, हे वैश्विक सत्य त्यांना आणि त्यांची तळी उचलणार्‍या इतरांना समजेल तोच सुदिन.

नितिन थत्ते's picture

29 Aug 2011 - 4:39 pm | नितिन थत्ते

>>दारु सारख्या समाजाची

हा कुठल्या प्रकारचा समाज?

सोकाजीराव यांच्या नावामागे श्री लावता आणि गुगळ्यांचा नुसता उल्लेख?
कुठे फेडाल ही पापं.

छे, आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली
गणपाशेठशी सहमत. आता चोर पोलिस वकील न्यायाधीश सगळेच एक झाल्यावर 'सामान्य जन्ता' काय करनार?

(शरमिन्दा)भावश्या

मराठी_माणूस's picture

29 Aug 2011 - 9:38 am | मराठी_माणूस

काही उठवळ धाग्याबद्दल हेच म्हणता आले असते.

विजुभाऊ's picture

29 Aug 2011 - 1:49 pm | विजुभाऊ

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 29/08/2011 - 13:37.
श्री. सोत्रि ह्यांनी असे लिखाण करुन एक मोठा अपराध केला आहे, हे वैश्विक सत्य त्यांना आणि त्यांची तळी उचलणार्‍या इतरांना समजेल तोच सुदिन.

एवढेच बोलून मी माझे ९१ शब्द संपवतो असे लिहायचे राहिलयक बहुतेक पराजी

आता बास्स हं ! (इथे दोन्ही ओठ दुमडून दातांमध्ये दाबलेले आणि डोळे विस्फारलेले अशी स्मायली)

मस्करीची कुस्करी नको व्हायला. नाहीतर धागा..........................(सं-फाडक सूचना)