साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेच्या फॉरिनला(असं म्हणण्याची पध्दत असते) जाऊन आलो. तेथील फोटो द्यावेत की न द्यावेत अशा संभ्रमावस्थेत आम्ही होतो. कारण ती एक प्रौढी मिरवणे आहे, असा आरोप इथे बर्याचदा होतो. तरी तसा माझा उद्देश नाही व केवळ मुलांच्या कर्तबगारीवर आमची ही वारी घडली हे मान्य करतो.
सर्वप्रथम आम्ही नायगाराला गेलो होतो. तिथे दोन्ही बाजूंनी नायगाराचे सौंदर्य मनसोक्त न्याहाळले.
१. अमेरिकन बाजूने
२.
३. रात्री कॅनडा बाजूने
त्यानंतर परतीच्या प्रवासात आम्ही एका वाईनरीला भेट दिली. तिथे जाताना वाटेत एका फार्मवर घोडे दिसले. ते फार्मिंगसाठी वापरतात.
४.
नंतर आम्ही वेस्ट कोस्टची टूर घेतली. त्यासगळ्याचे मी इथे वर्णन करत नाही. सगळ्या भौतिक सुबत्तेचे फोटो टाळून फक्त निसर्गाशी संबंधित फोटो द्यावे म्हणतो.
५. डॉल्फिन शो
६. सी वल्ड (सॅन डिअॅगो) फ्लेमिंगोज
७. लास वेगसला जाताना बसमधून
८. कॅक्टस गार्डन मधील एक नमुना
९. ग्रँड कॅनियन
१०. पॅसिफिक (धावत्या बसमधून)
११. सॉल्व्हँग प्ले ग्राऊंड
१२. हर्स्ट कॅसल मधील स्विमिंग पूल
१३. सॅन फ्रान्सिस्को मधील आर्ट गॅलरीजवळ
१४. लेक व्ह्यू
१५ गोल्डन गेट ब्रिजजवळ
तूर्तास एवढेच.
तिरशिंग
प्रतिक्रिया
21 Aug 2011 - 3:19 pm | इंटरनेटस्नेही
खर्याची दुनिया नाही राहिली, तिमा साहेब.. काय करु शकतो आपण तरी?
असो. चांगले फोटोज. कीप इट अप मॅन!
21 Aug 2011 - 4:30 pm | कच्ची कैरी
अरे वा मस्त आहेत फोटो !!!अजुन येउ द्या!
21 Aug 2011 - 8:20 pm | गणेशा
असेच म्हणतो
21 Aug 2011 - 11:38 pm | जाई.
+१
23 Aug 2011 - 3:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वा मस्त आहेत फोटो !!!अजुन येउ द्या!
-दिलीप बिरुटे
21 Aug 2011 - 10:43 pm | अनंत छंदी
अहो आम्ही सदानकदा भौतिक सुखाचा विचार करणारे प्राणी, नैसर्गिक वगैरे ठीक आहे हो पण आमच्यासारख्यांसाठी तसेही फोटो द्या की. :)) बाकी फोटो झकास....
21 Aug 2011 - 10:52 pm | इरसाल
छान फोटो. मागील फोटोप्रमाणे हे पण आवडले.
कारण ती एक प्रौढी मिरवणे आहे, असा आरोप इथे बर्याचदा होतो.
अहो त्यात काय वाईट मानायचे. असे फाटेल तोंडाचे कुठेही भेटू शकतात.
22 Aug 2011 - 12:05 am | शिल्पा ब
फटू मस्तच आहेत. कॅक्टस गार्डन मधला जो फटू आहे अगदी तस्सेच कॅक्टस माझ्याकडे आहे.
23 Aug 2011 - 3:50 am | आत्मशून्य
माझ्याकडेही असाच फटू आहे.
23 Aug 2011 - 10:56 am | शिल्पा ब
तुमच्याकडे नुस्ताच फटु आहे माझ्याकडे खरं खरं कॅक्टस आहे. ;)
23 Aug 2011 - 3:20 pm | आत्मशून्य
तूमचं क्याकट्स मरून जाइल फटू माझा कायम राहील ;)
23 Aug 2011 - 6:40 pm | गणपा
=)) =))
काय युक्तीवाद आहे.
=)) =))
22 Aug 2011 - 1:44 am | पिवळा डांबिस
फोटो सुरेख आले आहेत.
आवडले...
22 Aug 2011 - 7:35 am | ५० फक्त
फोटो छान आहेत,
अवांतर - अमेरिकेच्या -१ असं शीर्षक दिलं आहेत, मला वाटलं अमेरिकेच्या आयचा घो किंवा अमेरिकेच्या बैलाला हो$$$$$$$ असा धागा आणि तो पण फोटोचा.....
22 Aug 2011 - 7:24 pm | मराठे
अगदी !
काहितरी झणझणीत चमचमीत मिळणार अशा फार आशेने धागा उघडला होता हो!
बाकी तिरशिंगराव, फोटो मस्त आहेत.
22 Aug 2011 - 8:54 am | सुधीर काळे
तिमासाहेब,
मस्तच आहेत फोटो. आमच्या जुन्या पर्यटनाच्या कांहीं आठवणी जाग्या झाल्या.
लास वेगासला जाताना दोन गमतीदार किस्से आमच्या गाईडने सांगितले ते इथे देऊ इच्छितो.
१. नवलाची गोष्ट अशी कीं अमेरिकेच्या 'यूता' (Utah) या राज्यात मॉर्मन नावाच्या धर्माच्या लोकात अजूनही बहुपत्निकत्वाची चाल प्रचलित आहे. अमेरिकन कायदाही तिकडे (त्यावेळेपर्यंत तरी-१९९७) डोळेझाक करतो. तिथल्या बहुतेक सर्व घरांना एकापेक्षा जास्त धुराडी होती. तिकडे बोट करून आमच्या गाईडने सांगितले कीं त्या घरातल्या पुरुषाने जितकी धुराडी तितकी लग्ने केलेली आहेत! म्हणजे प्रत्येक पत्नीला स्वयंपाकघर आपले-आपले!
२. खेचराच्या पैदाशीबद्दलही एक मला माहीत नसलेली माहिती त्याने दिली. खेचर हे फक्त घोडा आणि गाढव यांच्या संकरातून पैदा होते. खेचरांतही नर-मादी असतात व ते लैंगिक सुखही घेऊ शकतात, पण त्यांना पिले होत नाहींत. गाईडच्या भाषेत सांगायचे तर "They can have all the fun, but they can't procreate"!
22 Aug 2011 - 2:14 pm | तिमा
सुधीरजी,
आधी कळले असते तर बायकोचा डोळा चुकवून यूता राज्यात फरार झालो असतो.
प्रतिक्रियेबद्दल व गंमतीदार किश्शांबद्दल धन्यवाद.
22 Aug 2011 - 6:22 pm | विजुभाऊ
आधी कळले असते तर बायकोचा डोळा चुकवून यूता राज्यात फरार झालो असतो.
तिकडे घरात धुणी भांडी पुरुषाने करायची प्रथा सुद्धा आहे
22 Aug 2011 - 11:15 pm | अन्या दातार
अर्धवट माहिती पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद! ;)
22 Aug 2011 - 2:07 pm | दीप्स
अहो वाईट काय वाटून घ्यायचे त्यात उलट तुमची सारख्यांनी जर फोटो आणि माहिती प्रकाशित नाही केली तर आमच्या सारख्यांना घर बसल्या विदेश दौरा कसा घडेल. छान आहेत फोटो, कीप इट अप तिमाजी !!
असेही !! एकवे जगाचे करावे मनाचे !!
22 Aug 2011 - 4:50 pm | प्रचेतस
अप्रतिम फोटोज.
22 Aug 2011 - 4:55 pm | गणपा
फोटो आवडले.
:)
22 Aug 2011 - 5:02 pm | बिपिन कार्यकर्ते
फोटो तर छानच आहेत. पण "सगळ्या भौतिक सुबत्तेचे फोटो टाळून फक्त निसर्गाशी संबंधित फोटो द्यावे म्हणतो." हे मस्तच. त्याबद्दल धन्यवादही! :)
22 Aug 2011 - 6:34 pm | रेवती
फोटो आवडले.
तरणतलाव आवडला.
क्याकटस पाहून साळींदराची आठवण झाली.;)
22 Aug 2011 - 7:30 pm | प्रदीप
आवडले.
22 Aug 2011 - 8:53 pm | पैसा
फोटो आवडले!
23 Aug 2011 - 7:08 pm | स्पंदना
छाऽऽन!
अन हे अगदी मनापासुन हं!