मित्रहो, मिपाच्या समृध्दतेत भर टाकावी असे माझ्या नेहेमी मनात असते .
या विचारातून अनेक नविन लेखकांना मी येथे येण्याचे निमंत्रण देत असतो.
( कविवर्य अरूण म्हात्रे यांचे मिपावरचे आगमन हा त्या प्रयत्नाचा भाग होता.)
सुप्रसिध्द चित्रकार श्री. प्रकाश बाळ जोशी (ईगतपुरीचा पाऊस हे चित्र त्यांचेच) यांची लेखक प्रकाश बाळ जोशी अशी ओळख मिपावर व्हावी असे मनात आल्यावर बरेच दिवस श्री.जोशी यांच्यासोबत मी चर्चा करीत होतो.
प्रकाश बाळ जोशी टाईम्स ऑफ इंडीया या वृत्तपत्रात काम करतात.
त्यापूर्वी अनेक वृत्तपत्रात ते सातत्याने लिखण करीत असत.
आज दिनांक या वृत्तपत्रात त्यांनी जे स्तंभ लेखन केले होते ते गेटवे या नावाने पुस्तकरुपात यापूर्वी प्रसिध्द झाले आहे.
गेटवे ची आवृत्ती आता उपलब्ध नाही. गेटवे मिपाच्या वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी गेटवेचे प्रकाशन (पुनःप्रकाशन) लेखमालीकेच्या स्वरुपात करण्याचा मानस आहे.
या पुस्तकाची प्रस्तावना आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ येत्या एकदोन दिवसात मिपावर वाचता येईल.
त्यानंतर एकेक लेख दर आठवड्यात टाकण्याचा मनसुबा आहे.
अशा प्रयोगांना सुफल करण्यासाठी या प्रयोगाची माहीती सर्व सदस्यांना द्यावी या उद्देशाने हे टिपण लिहीले आहे
श्री. प्रकाश बाळ जोशी यांची अधिक माहीती खाली दिलेल्या दुव्यावर मिळेल.
प्रतिक्रिया
10 Aug 2011 - 12:51 am | विकास
चांगला प्रकल्प आहे. रामदास यांना धन्यवाद आणि श्री. प्रकाश बाळ जोशी यांचे स्वागत!
10 Aug 2011 - 4:25 am | गणपा
लेखमालेची वाट पहात आहे.
10 Aug 2011 - 1:45 am | इंटरनेटस्नेही
चांगली कल्पना आहे. प्रकल्पास शुभेच्छा आणि श्री. जोशी यांचे स्वागत.
10 Aug 2011 - 5:17 am | सुनील
स्वागत आणि शुभेच्छा!
11 Aug 2011 - 8:18 am | Nile
हेच म्हणतो.
10 Aug 2011 - 10:41 am | इरसाल
माझ्याही ...
स्वागत आणि शुभेच्छा!
10 Aug 2011 - 11:09 am | वपाडाव
दाबुन समर्थन आहे आपलं.....
10 Aug 2011 - 12:16 pm | स्वाती दिनेश
श्री. प्रकाश बाळ जोशींचे स्वागत, रामदासांना धन्यवाद आणि लेखमालेची अर्थातच वाट पाहत आहे.
स्वाती
10 Aug 2011 - 2:47 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
10 Aug 2011 - 6:32 pm | मस्त कलंदर
असेच म्हणते
10 Aug 2011 - 12:56 pm | आत्मशून्य
लेखमाला सूरू व्हायची वाट पाहत आहे.
10 Aug 2011 - 1:41 pm | धमाल मुलगा
श्री.जोशींच्या 'गेटवे' चे मनापासून स्वागत!
बाकी, आमच्या रामदासकाकांची मिपाच्या भल्यासाठीची चालू असलेली अविरत तळमळ पाहून नेहमीच कौतुक वाटते.
10 Aug 2011 - 6:31 pm | आनंदयात्री
असेच म्हणतो. श्री जोशींचे स्वागत आणि श्रीयुत रामदासांना धन्यवाद :)
10 Aug 2011 - 1:44 pm | स्मिता.
अरे वा, चांगला प्रकल्प आहे. श्री. जोशींच्या लेखांचे स्वागत आहे. आणि ते येथे रामदास काका देणार असल्याने त्यांचे आभार.
10 Aug 2011 - 1:46 pm | सूड
लेखमालेच्या प्रतिक्षेत !!
10 Aug 2011 - 2:45 pm | श्रावण मोडक
जोशी यांच्या दुतर्फा लेखनाच्या प्रतीक्षेत. एकतर्फीचेही स्वागतच.
11 Aug 2011 - 7:19 am | मदनबाण
सुस्वागतम !!! :)
लेखमालेची वाट पाहतो आहे... :)
11 Aug 2011 - 9:29 am | ऋषिकेश
अरे वा.. स्वागत+ आभार + वाट पाहतोय :)
11 Aug 2011 - 9:54 am | दिपक
वेलकम जोशीसर. येऊद्यात लेख लवकर.
23 Jan 2021 - 9:10 am | NAKSHATRA
सुस्वागतम !!! :)
लेखमालेची वाट पाहतो आहे... :)