पुण्याजवळ आंदोलकांवर गोळीबार: सकाळ ची बातमी कुठे ?

निमिष ध.'s picture
निमिष ध. in काथ्याकूट
9 Aug 2011 - 9:10 pm
गाभा: 

पुण्याजवळ जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार करून यात ४ लोकांचा मृत्यू झाला. ही बातमी मला आय बी एन वर पण सापडली. म टा ची तर मुख्य बातमी आहे. मग पुण्यातले वर्तमान पत्र असून सकाळ गप्पा का ?
की आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवायचा प्रयत्न आहे ? (मला हिंसक आंदोलकांचे समर्थन करायचे नाही. पण बातमी देताना दुजा भाव दिसतो)

दुवा : म टा :
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9540188.cms

सकाळ: अत्यंत छोटी बातमी शोधून शोधून सापडली http://www.esakal.com/esakal/20110809/4938358538415139255.htm

प्रतिक्रिया

अशोक पतिल's picture

9 Aug 2011 - 9:24 pm | अशोक पतिल

लन्डन मधे पण दन्गली ३ दिवसापासुन सुरु आहेत . आंदोलन करा पण हिंसक नको. बाकी आजकाल कोणता पेपर निपक्श असतो ?

नर्मदेतला गोटा's picture

9 Aug 2011 - 9:40 pm | नर्मदेतला गोटा

तुम्ही तिकडे कशाला गेलात

विकास's picture

9 Aug 2011 - 9:25 pm | विकास

अर्थातच राजकारणाचा संदर्भ असू शकतो. पण कधी कधी केवळ बातमी अजून मोठी होण्याची वाट बघत असतील (आणि होणार नाही अशी आशा करणे) असे देखील कारण असू शकते.

ऋषिकेश's picture

10 Aug 2011 - 9:20 am | ऋषिकेश

डीएनए मधेही हा मुख्य मथळा आहे. अनेक वृत्तपत्रांतही पहिल्यापानावर ही बातमी दिसली.
सकाळकडूनही अपेक्षा पूर्ण झाली इतके म्हणता येईल.

बाकी वाचलेल्या बातमीवरून हा मुद्दा शिवसेना+भाजप+रीपब्लिकन पक्ष जोरात उचलून (मूर्ख) सरकारला पळता भुई थोडी करेल अशी अपेक्षा करतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2011 - 9:48 am | बिपिन कार्यकर्ते

कालपासून टिव्हीवर जे काही बघितलंय त्यावरून तरी असं वाटतंय की पोलिसांचा गोळीबार करण्याचा निर्णय योग्यच होता. आंदोलक हिंसक झाले होते हे दिसतंच आहे. शिवाय काही पोलिस जमावात अडकले होते. अर्थात, हे सगळं टिव्हीवर बघून बनवलेलं मत आहे. खरं खोटं त्या दादांनाच माहिती. पडद्यामागे काही हालचाली झाल्या असतील तर माहित नाही.

सकाळची बातमी बघितली. एवढा भयंकर प्रकार घडूनही बातमी सोयिस्कररित्या कशी द्यावी त्याचा वस्तुपाठ वाटला.

आत्ताच एनडीटीव्हीवर बातम्या बघितल्या. ठळक बातम्यांमधे ब्रिटनमधल्या दंग्यांची बातमी पहिली आणि मावळमधे झालेल्या प्रकाराची बातमी अगदी शेवटी. विस्तारित बातम्यांमधे, ब्रिटनमधल्या दंग्यांची बातमी प्रथम, मावळमधल्या प्रकाराची बातमी दुसर्‍या क्रमांकावर!

सकृद्दर्शनी तरी शेतकर्‍यांची तक्रार योग्य वाटते आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी गेले काही महिने हे आंदोलन चालवले आहे. कोणत्याही पेपरात बातमी बघितली नाही. आंदोलनाशिवाय मार्गच ठेवत नाही सरकार!

श्रावण मोडक's picture

10 Aug 2011 - 9:56 am | श्रावण मोडक

काय राव?

आत्ताच एनडीटीव्हीवर बातम्या बघितल्या. ठळक बातम्यांमधे ब्रिटनमधल्या दंग्यांची बातमी पहिली आणि मावळमधे झालेल्या प्रकाराची बातमी अगदी शेवटी. विस्तारित बातम्यांमधे, ब्रिटनमधल्या दंग्यांची बातमी प्रथम, मावळमधल्या प्रकाराची बातमी दुसर्‍या क्रमांकावर!

मावळात कोण एनडीटीव्ही (किंवा इतरही) बघतं? जे बघतात त्यांना ब्रिटनच्या दंग्याचीच चिंता अधिक असणार. ब्रिटनचे दंगे, अमेरिकेची 'पत''झड' (ऐन (आपल्या) श्रावणात), तशात 'एव्हरिथिंग इज फाईन विथ इंडिया' (कारण इथं श्रावण महिनाच सुरू आहे) ही विधानं... या तीन शेतकऱ्यांच्या मृत्यूने थोडीच पत वगैरे खालावते. उलट, काहींची ती वाढतेच. तेव्हा...

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Aug 2011 - 9:59 am | बिपिन कार्यकर्ते

उपरोध आवडला.

खरं तर जमिन, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनं यांच्यावरून होणारे सततचे तंटे ही देशाकरता अतिशय गंभीर बाब आहे. नक्षलवादाइतकीच. किंबहुना या दोन्ही बाबींचे आपापसात संबंध आहेतच. आणि नेमक्या याच बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमात खूपच खाली येत आहेत असे म्हणायला वाव आहे.

सरकारने आमच्या मालकीची जमीन काही कारणाने संपादित केली. १९७६ साली हे झाले. आजतागायत पैसे (त्या वेळच्या बाजारभावाने का असेना) मिळाले नाहीत. १९९४ पर्यंत फॉलोअप करुन तो नाद आम्ही सोडला कारण वसुलीचा खर्च आणि मनस्ताप मिळणार्‍या रकमेपेक्षा जास्त व्हायला लागला.

माझ्या आधीच्या पिढ्या आणि मी नोकरदार आहे आणि शेती हा माझ्यासाठी उत्पन्नाचा सोर्स नव्हे. म्हणून मी सोडून देऊ शकलो.

आता अशा पार्श्वभूमीवर ज्याचं सर्वकाही शेतीवरच अवलंबून आहे अशा शेतकर्‍याची उरलीसुरली किंवा बरीच जमीन सरकार लचका तोडल्यासारखी काढून घेणार असं त्याला कळलं तर तो रस्त्यावर उतरणं हे अगदी समजण्यासारखं आहे.

पोलीसांच्या बाजूने पाहिलं तर त्यातही काही अजिबात चुकीचं वाटत नाही. बसेसच्या काचा फोडेपर्यंत लाठीमार.. मग पोलीसगाड्या पेटवून द्यायला लागल्यावर गोळीबार. मला वाटतं असाच प्रोटोकॉल असावा. कारण गाड्या पेटवणे म्हणजे जमावाच्या बाजूने एक प्रकारे "फायर ओपन" करणेच आहे. अशा वेळी पेट्रोल्/डिझेल टाकीचा स्फोट होऊन अजून जास्त संख्येने लोक जळून मरु शकतात. तेव्हा पोलीसांनी तरी काय करावे? नुसत्या रबरी गोळ्या मारायच्या की धूर सोडायचा..?

पोलीसही माणूस आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली की तोही हतबल होणारच.

चूक कोण हेच ठरवायचंच असेल तर जमिन संपादित करणे म्हणजे राखरांगोळी असे समीकरण जनतेच्या मनात तयार करणार्‍या सरकारचाच हा दोष म्हणावा लागेल.

स्वर भायदे's picture

10 Aug 2011 - 10:33 am | स्वर भायदे

चूक कोण हेच ठरवायचंच असेल तर जमिन संपादित करणे म्हणजे राखरांगोळी असे समीकरण जनतेच्या मनात तयार करणार्‍या सरकारचाच हा दोष म्हणावा लागेल.
सहमत!

श्रावण मोडक's picture

10 Aug 2011 - 10:34 am | श्रावण मोडक

चूक कोण हेच ठरवायचंच असेल तर जमिन संपादित करणे म्हणजे राखरांगोळी असे समीकरण जनतेच्या मनात तयार करणार्‍या सरकारचाच हा दोष म्हणावा लागेल.

पूर्ण सहमत. फक्त सरकारच्या पलीकडे थोडं जाऊया. एकूणच समाजाचाही हा दोष आहेच. साराच हितसंबंधांचा संघर्ष.

श्रावण मोडक's picture

10 Aug 2011 - 10:31 am | श्रावण मोडक

१. पवनेच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे काही मुद्दे १९७० च्या दशकात धरण बांधलेले असूनही, आजही तसेच पडलेले आहेत. त्यासाठी त्यांचे आंदोलन (आंदोलन म्हणजे दरवेळी निदर्शने, उपोषणे असे नाही. गाऱ्हाण्यांची मांडणी हाही आंदोलनाचाच भाग म्हणूया) सुरूच आहे. लाभक्षेत्रात पुनर्वसन हे धोरण असते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात (कारण या धरणातील पाणीसाठी या शहरांसाठी मिळतो) पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे आणि ती जवळपास धुडकावली गेली आहे. त्या बदल्यात काय, हा प्रश्न कायम आहे.
२. पिंपरीला येणारे पाणी सध्या खुल्या कालव्यातून येते. त्यातून शेतकरी पाणी उचलून शेती करतात. बंद पाईपलाईनमुळे तसे करणे अशक्य आणि म्हणजेच शेती कोलमडते. आंदोलकांचा हा एक मुद्दा (यात कालव्यातले पाणी त्यांनी उचलणे हेही मुळात बेकायदा असू शकते. स्वतंत्रपणे त्याबद्दल कारवाई करता येते, आणि त्याचवेळी ही चोरीची वेळ त्यांच्यावर येणार नाही अशी व्यवस्थाही करता येते. कारण पाण्याचा दुसरा स्रोत नसेल तर कालव्यातून पाणी उचलण्यापलीकडे वेगळे काही होणार नाही). त्याविषयी काही फैसला होत नाही.
३. बंद पाईपलाईन जाते त्या भागात शेतजमिनी आहेत. अशी पाईप जेव्हा शेतीखालून जाते तेव्हा त्या शेतीची वाट लागते (किंवा खरे तर लावली जाते) हा इतिहास मोठा आहे (याविपरितही चांगला इतिहास असू शकतोच, पण तो दिसूही नये इतका हा उलटा इतिहास मोठा आहे). तोही आंदोलनाचा एक मुद्दा.
४. वर बिपिनने म्हटले तसे एप्रिलपासून तरी हा मुद्दा सरकार - शेतकरी असा सुरू आहे. हा मुद्दा फक्त पवनेपुरता मर्यादित नाही. मावळाचाच आहे. टाटांची धरणं आहेत, लवासा आहे, इतर किमान दोन नियोजित हिल सिटीज आहेत. प्रत्येक ठिकाणी धरण, पाणी, शेती हे आहेच.
सकाळ किंवा तत्सम वृत्तपत्र माध्यमांचे वर्तन, त्यांचे हितसंबंध, त्याच्याशी जोडलेला राजकारण्यांचा हितसंबंध वगैरे लक्षणं आहेत. रोग वेगळाच.

सुनील's picture

10 Aug 2011 - 10:45 am | सुनील

भू-संपादनाविषयीची नवी नियमावली नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, सरकार शेतीखालील जमीन कुठल्याही परिस्थितीत ताब्यात घेणार नाही, असे म्हटले आहे. ते खरे नाही काय?