ठिश्श...

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in कलादालन
6 Aug 2011 - 3:58 am

माझे मिसळपाव वर हे पहिलेच प्रकाशचित्र आहे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळु द्या.

खुप खुप आभार.

-अभिजीत राजवाडे
http://maalkauns.blogspot.com/
http://nabaad.blogspot.com/
http://ideafest.blogspot.com/
www.abhijeetrajwade.com

Drums

छायाचित्रण

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

6 Aug 2011 - 4:00 am | इंटरनेटस्नेही

उत्तम!

अभिजीत राजवाडे's picture

6 Aug 2011 - 4:13 am | अभिजीत राजवाडे

खुप खुप आभार!!!

मी कुठेतरी वाचलं होतं की चांगलं छायाचित्र ते जे चित्रासारखं दिसतं आणि चांगलं चित्रं ते जे छायाचित्रासारखं दिसतं. त्या न्यायाने हे छायाचित्र मस्तच आहे. आणि तसेही सुंदर आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2011 - 9:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक असताना दुसरं कशाला असा प्रश्न पडला आहे. दिसतं तसंच्या तसं हुबेहूब उतरवण्यासाठी एक कॅमेरा आणि क्लिकची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात वेळ खर्च करून हाताने तसंच चित्र का काढायचं?

फोटो आवडला. पण एक शंका आहे. ड्रमसेटमधल्या थाळीची कड कृत्रिम वाटते आहे ती कशामुळे?

अभिजीत राजवाडे's picture

7 Aug 2011 - 7:48 pm | अभिजीत राजवाडे

अदिती, त्या थाळीचा शार्पनेस खुप जास्त आला आहे. त्याला थोडे सोफ्ट करावे लागेल.
प्रतिक्रियेबद्द्ल खुप खुप आभार!!!

अभिजीत राजवाडे's picture

6 Aug 2011 - 5:06 am | अभिजीत राजवाडे

शुचि,

इतकी सुंदर प्रतिक्रिया!!! क्या बात है.
खुप खुप आभार!!!

सौन्दर्य's picture

6 Aug 2011 - 11:00 am | सौन्दर्य

चित्र नक्कीच चांगले आहे, त्यात शुचिची प्रतिक्रीया चार चांद लावून गेली.

सौन्दर्य

अभिजीत राजवाडे's picture

7 Aug 2011 - 7:49 pm | अभिजीत राजवाडे

सौंदर्य, खुप खुप आभार!!!

परिकथेतील राजकुमार's picture

6 Aug 2011 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

'ठिश्श...' ह्या शिर्षाकामुळे उत्कंठा ताणली गेली आणि धागा उघडला. खरे सांगायचे तर चित्र आणि कविता ह्यातील काडीचेही ज्ञान मला नाही. पण ह्या चित्रात काय वैशिष्ठ्ये आहेत ते तज्ञांकडून सोप्या भाषेत वाचायल आवडेल.

एक सामान्य दर्शक म्हणून चित्र पाहताच एखाद्या म्युझिक अल्बमच्या कव्हरची आठवण झाली.

शुचि मामीची प्रतिक्रिया आवडली.

अभिजीत राजवाडे's picture

7 Aug 2011 - 7:52 pm | अभिजीत राजवाडे

परा, खुप खुप आभार!!!

अभिजीत राजवाडे's picture

7 Aug 2011 - 7:52 pm | अभिजीत राजवाडे

परा, खुप खुप आभार!!!

अभिजीत राजवाडे's picture

7 Aug 2011 - 7:52 pm | अभिजीत राजवाडे

परा, खुप खुप आभार!!!

बहुगुणी's picture

6 Aug 2011 - 5:44 pm | बहुगुणी

दोन्ही ड्रम-स्टिक्स, drum आणि cymbal (थाळी?) या त्यांच्या ध्येयांच्या इतक्या जवळ पोहोचलेल्या असतांना, 'poised to strike' अशा अवस्थेत, अचूक पकडलेला क्षण खूप आवडला. Blurred पार्श्वभूमीवरून वेगाचा अंदाज येतो असं वाटतं.

(प्रकाशचित्राचं नांव अर्थातच आवडलं, अगदी 'ठिश्श!' असा आवाज पुढच्याच क्षणी येणार अशी हुरहूर लावणारं प्रकाशचित्र.)

आणखी येऊ द्यात.

अभिजीत राजवाडे's picture

7 Aug 2011 - 7:54 pm | अभिजीत राजवाडे

लवकरच आणखी प्रकाश चित्रे टाकतो. खुप खुप आभार.

मर्द मराठा's picture

6 Aug 2011 - 7:33 pm | मर्द मराठा

अचूक वेळ साधलीत...
छायाचित्राच्या संकल्पनेबद्दल बहुगुणींशी सहमत .. अपवादः --- Blurred पार्श्वभूमीवरून वेगाचा अंदाज येतो असं वाटतं---
Blurred पार्श्वभूमी हा बोकेह परिणाम आहे...

अभिजीत राजवाडे's picture

7 Aug 2011 - 7:57 pm | अभिजीत राजवाडे

प्रतिक्रियेबद्द्ल खुप खुप आभार!!!
हा बोकेह परिणाम नाही.

चित्रा's picture

7 Aug 2011 - 4:06 am | चित्रा

छायाचित्र छानच आहे. प्रकाशाचा रंग आवडला.

चित्रात डावीकडची (वरची ड्रमवरची) सावली मात्र उगाचच आली असे वाटते. तरीही सावली वगळून छायाचित्र घेता येऊ शकले असते का याबद्दल साशंक आहे.

अभिजीत राजवाडे's picture

7 Aug 2011 - 8:00 pm | अभिजीत राजवाडे

चित्रा, प्रथम खुप खुप आभार!!!
ती सावली ड्र्म वाजवणार्‍याची आहे. त्यामुळे ती वगळणे अंमळ अवघडच होते.
पण पुढ्च्या वेळेस लक्षात ठेवेन.

अप्रतिम चित्र आहे,
मनापासुन आवडले.

एकदम बारिक बारिक गोष्टींचा ही केलेला खुप मोठा अभ्यास लगेच लक्षात येतो आहे.

पुढील चित्रास शुभेच्छा..