काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते).
१) संध्याकाळी कळ्या मस्त गुबगुबीत झाल्या होत्या.
३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती.
६) फुलाचे संपुर्ण रुप पाहुन उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीत
७) ह्यांनी आपला परिसर सुगंधाने धुंद केला होता.
८) आता ह्यांना काय उपमा द्यायची ?
९) आम्ही बाजुला आहोत आमच्याकडेही लक्ष द्या.
१०) रात्री ११.३० ला फुललेली फुले अंधारात दिव्यांप्रमाणे उजळून दिसत होती.
प्रतिक्रिया
1 Aug 2011 - 3:38 pm | गणपा
सुरेख आहेत ग फुले.
1 Aug 2011 - 4:05 pm | ५० फक्त
मस्त मस्त ग एकदम , खुप छान वाटलं एकदम.
1 Aug 2011 - 5:05 pm | मदनबाण
वॉव... :)
हे ब्रम्हकमळच आहे,ह्याच्या एका पानातुन दुसरे पान येते या झाडाला... आमच्या घरी सुद्धा होत हे झाड.अनेक वर्ष वाट पाहुन शेवटी एक दिवस गुबगुबीत कळीचे दर्शन झाले होते...पण फुल रात्री फुलुन कधी गेले त्याचा च्यामारी पत्ताच लागला नाय... :(
काय जागु ताय ह्या फुलांना अप्रतिम सुगंध असतो काय ?
1 Aug 2011 - 5:17 pm | पिंगू
बाणा, ह्या फुलांना अप्रतिम सुगधं असतो. माझ्या घरीपण एकदा ६ फुले उमलली होती.
माझी आजी त्या फुलांसाठी ठाण मांडून बसली होती. कारण काय तर ती फुले म्हणजे ब्रम्हकमळ.
मुळात मी तेव्हा तो निवडुंग असल्याचे सांगितले, तेव्हा कुणाला ते पटलेच नव्हते. असो..
बाकी जागुताईने बाग छानच फुलवली आहे.
- पिंगू
1 Aug 2011 - 5:32 pm | गवि
प्रसन्न करणारी सुंदर फुले. फोटो झकास..
1 Aug 2011 - 6:59 pm | गणेशा
अप्रतिम वाटले फुले पाउन
1 Aug 2011 - 7:09 pm | स्मिता.
जागुताई, खूपच सुंदर फुलं आहेत. मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही. पण ही फुलं फोटोत इतकी छान दिसतात म्हणजे प्रत्यक्ष खरंच दिवाळीच असल्यासारखे वाटत असणार.
1 Aug 2011 - 7:18 pm | प्राजु
आहाहा!!! काय सुंदर आहेत गं फुले!!! अप्रतिम!!!
1 Aug 2011 - 7:37 pm | मुलूखावेगळी
खुप सुंदर फोटु न ते ही स्टेप बाय स्टेप
1 Aug 2011 - 7:45 pm | सहज
सुरेख!
1 Aug 2011 - 8:15 pm | अन्या दातार
जागुतैंच्या पेशन्सला सलाम! किती चिकाटीने फोटो काढलेत.
मस्त, अप्रतिम, ................... जाउदेत कितीदा तेच तेच शब्द टंकायचे?? :)
1 Aug 2011 - 8:22 pm | चतुरंग
अप्रतिम! ह्या फुलांचा पांढरा रंग हा 'शुभ्र पांढरा' ह्या शब्दांनी व्यक्त होणारा रंग आहे.
पाकळ्यांचा अलवार तलमपणा केवळ नि:शब्द करणारा.
निसर्गाचा चमत्कार आवडला.
लेखाचं शीर्षकही समर्पक. धन्यवाद जागुतै! :)
-रंगा
1 Aug 2011 - 9:04 pm | यकु
व्वा!!!!
1 Aug 2011 - 9:20 pm | रेवती
फोटो आवडले.
1 Aug 2011 - 11:21 pm | जागु
सगळ्या सगळ्यांचे अगदी मनापासुन धन्यवाद.
2 Aug 2011 - 12:23 pm | नन्दादीप
मस्त.....!!!!!
2 Aug 2011 - 12:55 pm | पल्लवी
हापिस आते ही सॉल्लिड झोप आल्याने मिपाका सहारा लिया गया..
आणि ही फुलं नजरेस पडली :) प्रसन्न प्रसन्न वाटलं..फोटो अह्हाहाहा आले आहेत !!!
व्वा. मजा आली. :) :)
( पण ब्रह्मकमळ आणि निवडुंग ?? )
2 Aug 2011 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार
'शुभ्र काही जीवघेणे'
2 Aug 2011 - 6:36 pm | स्वाती दिनेश
'शुभ्र काही जीवघेणे'
अगदी हेच मनात आले फोटो पाहताना..
फार सुंदर!
स्वाती
2 Aug 2011 - 1:01 pm | कच्ची कैरी
व्वा !! जागु अप्रतिम !! आणि आता पुढे काही शब्दच सुचत नाहीये अगदी निशब्द केलस ,खरच फुलं बघुन तर खूप खूप प्रसन्न वाटतय :)
2 Aug 2011 - 1:04 pm | नगरीनिरंजन
सुंदर!
2 Aug 2011 - 1:11 pm | जागु
नंदादिप, पल्लवी, राजकुमार, कैरी, नगरिनिरंजन धन्यवाद.
2 Aug 2011 - 1:24 pm | प्यारे१
सुंदर.
रच्याकने
>>>३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती.
ही फुलं रात्रीच उमलतात
आणि
>>>मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही.
पुण्यवंतांनाच फुललेली दिसतात ;)
2 Aug 2011 - 1:57 pm | स्मिता.
>>>>मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही.
>>पुण्यवंतांनाच फुललेली दिसतात
इथे फोटु बघायला मिळाले म्हणजेही आपण सर्वच काही कमी पुण्यवंत नाही बरं का!!
2 Aug 2011 - 5:18 pm | मीनल
खूप खूप छान. हे केवळ एकच फूल असते तरी सुंदर दिसते.
इथे तर संपूर्ण झाड लगडलयं फुलांनी.
2 Aug 2011 - 6:32 pm | खादाड
मस्त आहेत फोटो :)
2 Aug 2011 - 7:42 pm | विशाखा राऊत
ब्रम्हकमळाचा सुगंध असा की बस.. फोटो बघुन मस्त वाटले ताई.
2 Aug 2011 - 7:57 pm | अनामिक
अतिशय सुंदर फोटू. टवटवीत ब्रम्हकमळांनी मन प्रसन्न केलं.
3 Aug 2011 - 10:59 am | रश्मी
खुपच सुंदर ब्रह्मकमळ आहेत.आमचा घरी पण पावसात अशीच दर वेळेस ८,९ फुल एकावेळेस येतात.ब्रम्हकमळ घरी येणे म्हणजे फारच चांगले समजले जाते.या फुलांचा सुगंध खूपच सुंदर येतो.
3 Aug 2011 - 11:35 am | जागु
अगदी मनापासुन सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांचे प्रतिसाद ब्रम्हकमळाच्या सुगंधाप्रमाणे दरवळताना मी जाणवतेय.
3 Aug 2011 - 1:51 pm | पाषाणभेद
सुंदर फुले
20 Aug 2011 - 9:55 am | चित्रगुप्त
सुंदर फुले आणि फोटो.
पावसाच्या थेंबांमुळे लज्जत आणखीनच वाढलीय.
माझ्या अज्ञानातून उपजलेला प्रश्नः
ही फुले फक्त रात्रीच उमलतात का? सकाळ झाली की कोमेजतात?