मागील भागात काही फुले बघीतली.बागेत काही न फुलणारी पण बागेची शोभा वाढवणारीही झाडे असतात.
आज त्या झाडाबद्द्ल थोडे.
१)विविध प्रकारचे क्रोटन.
2)हे शोभेचे अळू.
3) हा लाल मुसंडा
याशिवाय पांढरा व गुलाबी मुसंडा पण आहे पण अजुन फुलायचा आहे.
४)हे विद्येचे झाड्(शाळेत असतांना टाळक्यात अभ्यास टिकून रहावा म्हणून ठेवत होतो ते)
प्रतिक्रिया
24 Jul 2011 - 10:35 am | निवेदिता-ताई
छान आहेत सर्व फोटो,
विद्येचे झाड बघुन हसु आले..."लहानपण देगा देवा"
24 Jul 2011 - 6:14 pm | अत्रुप्त आत्मा
विद्येचं झाड गेल,तरी चालेल पण ही झाडाची विद्या अशीच फुलत राहो
25 Jul 2011 - 8:19 pm | कच्ची कैरी
वा मस्त फुलली आहे बाग !!
29 Jul 2011 - 4:56 pm | ज्योत्स्ना
छान आहे बाग :)
29 Jul 2011 - 5:08 pm | किसन शिंदे
झाडांचे फोटो छान आहेत हो फक्त ते रोटेट करुन पुन्हा टाका कारण प्रत्येक वेळेला मान वाकडी करुन फोटो बघावे लागतात. :(
30 Jul 2011 - 1:05 am | पंगा
घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ९० अंशांतून फिरवलेले चालतील काय?
(बाकी, तुम्हाला बघायला जर इतका त्रास होतो, तर फोटो काढणारणीला ते काढताना किती त्रास झाला असेल, विचार करा ना! अप्रीशिएट, म्यान, अप्रीशिएट! ;))
30 Jul 2011 - 1:39 pm | किसन शिंदे
हॅ हॅ हॅ..
मग तर बघणारयाला एकतर स्वतःचा पीसी/लॅपटॉप पुर्णतः उलटा करुन बघावा लागेल नाहीतर मग शीर्षासन घालावे लागेल :D
5 Aug 2011 - 5:35 pm | पंगा
(आधी म्हटल्याप्रमाणे, बघताना तुम्हाला जर एवढा त्रास होऊ शकतो, तर काढताना फोटो काढणारणीला किती त्रास झाला असेल, विचार करा ना! शीर्षासन करून / मान वाकडी करून फोटो काढणे म्हणजे काय खाऊ आहे का राव? आं?)
5 Aug 2011 - 5:38 pm | किसन शिंदे
तर मग..हॅट्स ऑफ टू ज्योती तै. :)
4 Aug 2011 - 10:20 am | श्री गावसेना प्रमुख
फोटो ची साईज मोठी हवी होती
4 Aug 2011 - 10:36 am | मनराव
छान...........
बायद्वे >>>(शाळेत असतांना टाळक्यात अभ्यास टिकून रहावा म्हणून ठेवत होतो ते)<<<<
रहिला का मग तो टि़कून.......???
5 Aug 2011 - 1:01 pm | ५० फक्त
मग काय राहिलाच आहे तो टिकुन तिथंच शाळेतच आहे तो अजुन, आम्ही आलो शाळा सोडुन पुढं
तुला गाणं नाही का माहित ' शाळा सुटली पाटी फुटली'' असो...
अवांतर - फोटोंची क्वालिटी मेंटेनड आहे, स्वयंपाकघर ते बाग, आणि पंगा व किसन शी बाडीस. आणि ते विद्येचं झाड चा संदर्भ लागला नाही काही, कोणीतरी फटाफट अंमळ नॉस्टेजेलिक का काय करणारी गोष्ट सांगेल काय?
5 Aug 2011 - 12:30 pm | जागु
छान.
माझ्या माहेरी ही सगळी झाडे होती. आता ह्यातील अर्धी माझ्याकडे आहेत.