आज सकाळी घरून ऑफिसला येताना एफएम वर गाणे ऐकत होतो.
च्यानेल होते ९१.१.तसाही ह्या च्यानेल वर सकाळी सकाळी वायफळ बडबड करणारी सिमरन नावाची निवेदिका आहे. (हिला शोधण्याची मोहीम २ वर्षापूर्वी ९१.१ वाल्यांनी राबवली होती........बलबीर पाषा कोण ह्या स्टाइलने, तो भाग म्हणजे पण एक अतिरंजित मनोरंजक प्रकार होता).
सध्या एफेम वर कोणाला तरी बकरा बनवणे, टोपी घालणे हे प्रकार सुरु आहेत. म्हणजे आपल्या ओळखीच्या कोणाचा तरी नंबर आपण त्यांना द्यायचा; मग हे त्याला/तिला फोन करून पीडून जबरदस्तीने बकरा बनवणार किंवा टोपी घालणार.
तर झाले असे कि ह्या बयेने आज टोपी घालण्याच्या उद्देशाने ज्याला फोन लावला तो होता दिल्ली क्राईम सेल मधला मध्यम दर्जाचा अधिकारी.वय वर्ष ४० च्या आसपास आणि अविवाहित.
हिने थोडा आवाज बदलून संभाषण सुरु केले कि सर मी एका डेटिंग साईट कडून बोलतेय तुम्ही डेटिंग मध्ये इंटरेस्टेड असाल तर आम्ही तुमची ब्लाइंड डेटिंग करून देवू शकतो.
तुम्ही अजून अविवाहित आहात मी समजू शकते.
समोरचा पोहोचलेला होता पहिल्यांदाच तो म्हटला कि मादाम तुम्ही एकतर विवाहसंबंधी साईट वरून बोलताय किंवा एकतर एफेम कडून तरी.
हिचा आपल पाल्हाळ सुरूच तुम्ही दिल्ली पोलिसात आहात आम्ही एक सर्वे केलाय कि दिल्लीतल्या मुली म्हणतात कि दिल्ली पोलीस सौजण्यतेने वागत नाहीत इति इति, म्हणून अश्या डेटिंग ने आपणाला मुलीशी कसे प्रेमाने वागावे ह्याचे शिक्षण दिले जाईल वगैरे वगैरे.
तो परत म्हटला कि मी अश्या डेटिंग वगैरे मध्ये इंटरेस्टेड नाही मला दुसरी खूप कामं आहेत तुमच्याजवळ वेळ असेल पण माझ्याजवळ नाही.
तिने परत त्याच्या अविवाहितपणाचा मुद्दा उचलला म्हणे मी इतक्या प्रेमाने बोलतेय आणि तुम्ही मला वेळ नाहीये सांगताय म्हणूनच तुमचे अजून लग्न झाले नाही.
वर आणखी म्हणे जर मी तुमच्या समोर शार्ट स्कर्ट मध्ये आले तर तुम्ही माझी तारीफ नाही का करणार ?
त्याचे उत्तर होते मी कोण तुझी तारीफ करणार कृपया मला माझे काम करू दे आणि तू तुझे कर असाही तुला जास्तीचा वेळ आहेच फालतूपणा करायला. हिचं परत येरे माझ्या मागल्या.....दिल्ली पोलीस, सौजन्य नाही.....
शेवटचे त्याने जे सुनावले ते खरे गंभीर होवून विचार करण्याजोगे आहे. ते म्हणजे
I am busy with some serious law & order business & dont have time for these nasty things & dont forget that as I am busy with some serious law & order business So you are getting time for these things.
इतकं ऐकवून त्याने फोन आपट्लाच.
असे हि एफेम वाले स्वतःला सव्वा रुपया समजतात आणि बाकीचे पावली कम.
पण कधी कधी त्यांनाही सव्वाशेर भेटतोच.
पण स्वतःच्या विरंगुळ्यासाठी किंवा पब्लिक डिमांड च्या नावर जे काही प्रकार एफेम वर चालतात ते कितपत योग्य आहे.
प्रतिक्रिया
28 Jul 2011 - 11:25 am | मराठी_माणूस
मि घरुन ऑफीसला येताना हे चॅनल ऐकतो, तिथे हा फालतुपणा नसतो
28 Jul 2011 - 11:38 am | गवि
१००.७ आणि १०७.काहीतरी (रेनबो) ही दोन्ही आकाशवाणीची चॅनेल्स आहेत आणि त्यावर आरजेज चा धुमाकूळ नसला तरी गाण्यांचे कलेक्शन फार सुंदर असते.
बाकी धाग्यात म्हटलेला बकरा प्रकार फार म्हणजे फार पूर्वीपासून चालू आहे. सहज झाली तर म्हणून मजा करण्याऐवजी हे लोक एखाद्याच्या हात धुवून मागे लागल्यासारखे करतात आणि काहीही करुन संभाषणात मसला आणण्यासाठी प्रसंगी समोरच्याला चिरडीस जायला भाग पाडतात ते बघून मला ते ऐकवत नाही. त्यातून मनोरंजन मिळत नाही.
मूळ काहीशी थट्टामस्करीची म्हणून आयडिया चांगली असली तरी असे चिवटपणे बडबडत राहिल्याने त्याची माती होते.
28 Jul 2011 - 11:55 am | रणजित चितळे
विविधभारती सारखे जुन्या नव्या गाण्यांची व कलाकारांच्या छान मुलाखतींसारखे चॅनल नाही. बंगळूरला तर रोज तिच तिच गाणी ऐकून वैतागायला होते. पण विविधभारतीचे जयमाला, छायागीत वेगवेगळे कार्यक्रम छान असतात. बाकी एफएम सारखा थिल्लरपण नसते.
28 Jul 2011 - 11:58 am | पंगा
'ऑल इंडिया रेडियो उर्दू सर्विस' चालते का अजून?
28 Jul 2011 - 12:46 pm | रणजित चितळे
एफ एम वर नाही मीटर वेव्ह किंवा शॉर्ट वेव्ह वर.
28 Jul 2011 - 12:57 pm | पंगा
(एफेमवर नाही याची कल्पना होती, आणि ते लॉजिकल आहे, पण) अजून चालू आहे हे वाचून आनंद झाला.
28 Jul 2011 - 10:56 pm | शाहरुख
हे नाही कळाले.
29 Jul 2011 - 1:05 am | पंगा
'ऑल इंडिया रेडियो उर्दू सर्विस' ही आकाशवाणीची 'एक्स्टर्नल सर्विस' आहे. तिचा अपेक्षित प्राथमिक श्रोतृवर्ग हा प्रामुख्याने पाकिस्तानात आहे.
उलट, एफेमची पोच ही त्या मानाने खूपच मर्यादित अंतरापर्यंत असते. (का, याची तांत्रिक कारणे मला कळलेली नाहीत, पण असते यात तथ्य आहे.) त्यामुळे अशा दूरच्या प्रक्षेपणांसाठी, 'जवळच्या' दूर अंतरांकरिता (ग्राउंडवेवमार्गे) मीडियमवेव आणि अधिक दूरच्या अंतरांकरिता (स्कायवेवमार्गे) शॉर्टवेव हे प्रभावी पर्याय आहेत. एफेमचा पर्याय तेथे मुळीच उपयोगाचा नाही. (अतिशय मर्यादित स्थानिक क्षेत्रात अप्रतिम दर्जाच्या आणि जवळजवळ 'नॉइज़'विरहित प्रक्षेपणासाठी - विशेषतः संगीत वगैरे, जेथे दर्जाने फरक पडावा - एफेम उत्तम.)
(ऑल इंडिया रेडियो उर्दू सर्विसचा ट्रान्स्मिटर पूर्वी बहुधा कच्छमध्ये कोठेतरी असावा, असे ऐकीव माहितीवरून वाटते. तूर्तास तो बहुधा जालंधरला असावा असे येथील माहितीवरून दिसते. शिवाय पूर्वीपेक्षा मीडियमवेववरची फ्रीक्वेन्सीही बदललेली दिसते. तसेच बीबीसीचे जे कार्यक्रम भारतात मीडियमवेव आणि शॉर्टवेववर ऐकू येतात, त्यांचे ट्रान्स्मिटर ओमान, सायप्रस, थायलंड आणि सिंगापूर येथे आहेत, असे येथील माहितीवरून कळते.)
डिस्क्लेमर: वरील माहिती ही मला जितपत कळली आणि मी जितपत इतरांकडून ऐकली तशी मांडलेली आहे. त्रुटी निघाल्यास चूभूद्याघ्या, तज्ज्ञांनी अधिक खुलासा करावा, इ. इ.
29 Jul 2011 - 12:58 pm | मिहिर
एफेमची वारंवारता जास्त असते. ते टॉवरपासून थेट आपल्यापर्यंत येतात. एएमची वारंवारता कमी असते. ते आयनॉस्फिअरमधून परावर्तित होतात. त्यामुळे ते जास्त अंतर जातात. एफेमची वारंवारता जास्त असल्याने ऊर्जाही जास्त असते. त्यामुळे ते आयनॉस्फिअरमधून परावर्तित न होता त्याला पार करून बाहेर जातात.
28 Jul 2011 - 4:04 pm | विवेक मोडक
आयला हे विसरलोच होतो. लहानपणी काय मजा यायची उर्दु सर्व्हीसवर गाणी ऐकायला:-)
28 Jul 2011 - 1:59 pm | चिंतामणी
विविध भारतीवरील कार्यक्रम छान असतात. पटर पटर बोलणारे आर. जे. नसतात. वेगवेगळ्या कार्यक्रमातुन सुंदर गाणी ऐकायला मिळतात.
28 Jul 2011 - 1:00 pm | शाहिर
शेता मधे जनावरे , रान डुक्करे , इतर प्राणी व पक्षी घुसू नये म्हणून एका शेतकर्याने शेतात एफ एम रेडियो मोठ्यां आवाजात लावला ....२४ तास चालु असणार्या बड्बड आणि गोंधळामुळे जनावरे आता शेतात येत नाहीत ..
28 Jul 2011 - 1:38 pm | अन्या दातार
त्याचा पिकांवर काही विपरीत परिणाम झाला/होतो का?
मागे कुठल्याशा संशोधनात शास्त्रीय संगीत ऐकवल्याने रोपे चांगल्या रितीने तरारतात व जास्त आउटपुट देतात असे काहीसे वाचल्याचे स्मरते.
जर विपरीत परिणाम होत असेल तर त्यापेक्षा गायी-गुरांना रान मोकळे सोडलेले काय वाईट?
28 Jul 2011 - 3:56 pm | शाहिर
ते धान्य खाल्ला कि माणस डिस्को करतात !
29 Jul 2011 - 1:47 pm | अन्या दातार
डीस्को करणार्या/ डीस्कोत जाणार्या लोकांसाठी खास शेते आहेत का? या प्रकारच्या शेतीत कितपत स्कोप आहे हो? ;)
अवांतरः अश्या शेतीस नक्कडवाले शेत म्हणावे का?
29 Jul 2011 - 3:48 pm | शाहिर
एक उफाड्याची अर्धवस्त्रांकीत तरुणी चिडुन बेडवर पर्स आदळते ..ति च्याच एवढी दिसणारी पण पुर्ण ड्रेस घातलेली बाइ ( पुर्ण ड्रेस घातला कि बाइ ) तिला विचारते काय झाला , ति म्हणते ..मला डिस्को मधे टीना सारखा नाचता येत नाही ... बाइ म्हनते ....
आज से ये प्रोब्लेम सोल्व !! मैने खास शाहिर कि खेतो से डिस्को वाला आटा मंगवाया है ..अब तुम बस नाच्ते रेहना
28 Jul 2011 - 11:59 pm | शिल्पा ब
वैताग येतो खरा या लोकांच्या सततच्या बडबडीचा. मनोरंजनात्मक कमी अन फालतुपणाच जास्त. त्या ऑफीसरने बरे खडसावले!!