मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्या, नव्या बियांची नवीन भाषा
नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्या, नव्या मुळांची नवीन भाषा
गंगाधर मुटे
-----------------------------------------------------
(नव्या यमांची नवीन भाषा या गझलेतील शेर)
प्रतिक्रिया
18 Jul 2011 - 11:42 am | विसुनाना
फोटो आणि संपूर्ण गझल - दोन्हीही आवडले.
18 Jul 2011 - 6:11 pm | बहुगुणी
तुमच्या निरीक्षणशक्तीला सलाम! उत्तम फोटो, आणि समर्पक संदर्भ.
(अशाच दुर्दम्य चिकाटीची भारताच्या समाजमनाला गरज आहे असं वाटून गेलं.)
18 Jul 2011 - 6:42 pm | श्रावण मोडक
विसुनाना आणि बहुगुणी या दोघांशीही सहमत.
18 Jul 2011 - 7:08 pm | गणेशा
फोटो मला दिसला पाहिजे होता असे वरील रिप्लाय पाहुन वाटले ...
19 Jul 2011 - 4:56 am | राजेश घासकडवी
दगडाच्या सांदीकपाऱ्यांतून खोलवर गेलेली मुळं झाडाच्या जीजिवीषेविषयी खूप काही सांगून जातात. दाद मागतात.
हे चित्र काहींना शेतकऱ्याच्या तगून राहाण्याचं प्रतीक वाटेल. काहींना ते भारतीय लोकशाहीसाठीचं रूपक वाटेल. काहींना त्यात एकंदरीतच जीवनाच्या चिकाटीचं चित्र दिसेल.
19 Jul 2011 - 9:22 am | नरेशकुमार
खुपच छान !
19 Jul 2011 - 11:41 am | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
19 Jul 2011 - 5:56 pm | मीनल
असे झाड, मुळं पाहिली नाहित कधी.