खिद्रापूर : कृष्णा नदी तीरावर वसलेले सुंदर पण भग्न मंदीर ..
या मे महिन्या मध्ये भेटीचा योग आला ..११ व्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदीर शिलाहार राजा ( गन्दारादित्या , विजयादित्य आणि भोज २ रा ) कडून बांधण्यात आले ..
पौराणिक कथा :
देवी सती हि भगवान शिवाची पत्नी होती ..तिचे वडील राजा दक्ष यास भगवान शिव जावई म्हणून पसंत नव्हते ..
दक्ष राजाने एकदा मोठा यज्ञ केला आणि शिव -सती ला बोलावले नाही ..सती ने याबद्दल राजा ला जाब विचारला असता त्याने शिवा चा अपमान केला ..ते सहन ना होऊन सती ने यज्ञा मध्ये उडी घेतली ..
हे कळताच भगवान शिव क्रोधीत झाले ..आणि दक्ष राजा चा वध केला ..
आणि कृष्णा तीरावर येऊन बसले ..तिथे भगवान विष्णू नी येऊन त्यांचा राग शांत केला ..
म्हणून या मंदिरा ला "कोप + ईश्वर " कोपेश्वर म्हणतात ..
विशेष म्हणजे या मंदिरा मध्ये नंदी नाही ..
स्थापत्य : पूर्ण मंदिर ९६ हत्ती च्या पाठीवर कोरले आहे ..१०८ खांब आहेत तसेच कळसावर शिवलीलामृत कोरले आहे ..
संपूर्ण मंदिर भर महाभारत आणि रामायणा मधले प्रसंग कोरले आहेत ..तसेच स्वर्ग मंडप ,यज्ञ मंडप (होमा चा धूर जाण्या साठी छत मध्ये उघडा गोल ठेवला आहे ) ..आणि गर्भ गृह आहे ..
औरंगजेबा चा सरदार खैदर खान याने या मंदिरा ची तोड फोड केल्याचा ऐकण्यात आले ..
आज हि हे मंदिर आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जपत उभे आहे
प्रतिक्रिया
27 Jun 2011 - 5:22 pm | गणेशा
अप्रतिम शिल्पकला आहे हि ..
मस्तच
27 Jun 2011 - 5:43 pm | प्रचेतस
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर अतिशय सुंदर आहे. आता जरा मूर्ती भग्नावस्थेत असल्या तरी पुर्वीच्या वैभवाची स्पष्ट कल्पना येते.
पुण्याजवळील भुलेश्वरच्या शिल्पकलेशी येथील काम बरेच साध्यर्म्य साधते.
27 Jun 2011 - 6:39 pm | धमाल मुलगा
नीट पाहिलं तर खिद्रापूरच्या शिल्पकलेवर बौध्द-जैन शैलीची ठळक छाप जाणवते आहे.
27 Jun 2011 - 9:51 pm | प्रचेतस
हे माझे भुलेश्वरचे फोटो.
शिल्पकला तर बर्यापैकी सारखीच वाटतीय.
जैन, बौद्ध कलेची छाप तर असणारच रे, शेवटी हिंदू मंदिरांची शैली बौद्ध/जैन कलेतूनच उत्क्रांत झाली असावी आणि शेवटी त्यापेक्षाही जास्त उत्कर्षास पोहोचली.
28 Jun 2011 - 2:45 pm | हरिप्रिया_
शैलीचे माहित नाही पण खिद्रापुराला कोपेश्वर मंदिरा सोबतच एक महावीरांच पण मंदिर आहे..
त्याच शैलीतले,त्याच काळातले..
एक मात्र नक्की दोन्ही मंदिर अप्रतिम आहेत...एकदा नक्की पाहून येण्यासारखी..
मस्त आहेत फोटो...
27 Jun 2011 - 5:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
खुपच सुंदर शिल्पकला!!
एकदा जायलाच हवे....
बाकी बर्याच मुर्ती जाणून बुजून विद्रुप केल्यासारख्या वाटतात.
त्या मागे काही इतिहास आहे कां?
1 Jul 2011 - 6:04 pm | कवटी
बाकी बर्याच मुर्ती जाणून बुजून विद्रुप केल्यासारख्या वाटतात.
त्या मागे काही इतिहास आहे कां?
तो औरंग्याचा खैदर्या का हैदर्या आलावता म्हणून लोवलय की वरती...
तेज्यायला त्या खैदर्याच्या......
27 Jun 2011 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा
वाह व्वा शाहीर...लय भारी हो,काय अप्रतिम आहे मंदिर...नक्की जाऊन बघणार.फोटो भेट घडवल्याबद्दल धन्यवाद...
27 Jun 2011 - 6:38 pm | धमाल मुलगा
छान आहे मंदीर.
भग्न शिल्पे पाहून वाईट वाटलं. आपल्या लोकांना आपल्या सुंदर वास्तू सांभाळायची अक्कल नाही हेच खरे.
27 Jun 2011 - 7:09 pm | प्रियाली
शिल्पांसोबत थोडी माहितीही हवी होती. निदान चित्रांना कॅप्शन्स तरी हवी होती.
27 Jun 2011 - 8:29 pm | मराठे
फार फार वर्षांपूर्वी इथे गेलो होतो. आठवणी जागवल्याबद्धल धन्यवाद.
जाणूनबूजून सुंदर मुर्ती विद्रूप करण्याची मानसिकता अजूनही गेलेली नाही (संदर्भः तालिबान्यांनी केलेले अफगाणीस्तानातील भव्य बुद्ध मूर्तींचे भंजन)
27 Jun 2011 - 8:54 pm | विकास
खूप छान आहे...
देवळाला कळस देखील दिसला नाही. ते तसेच आहे का कळ्स देखील भग्न केला गेला होता?
27 Jun 2011 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखन. पण अजूनही भरपूर माहिती हवी होती असे वाटले.
-दिलीप बिरुटे
27 Jun 2011 - 11:06 pm | पैसा
फोटो खूपच छान. पण जरा जास्त माहिती हवी होती.
28 Jun 2011 - 6:17 am | ५० फक्त
मस्त फोटो आणि माहिती, जायचं कसं ते सांगाल का जरा, या महिन्यात जाउन येईन. आणि हो वल्ली म्हणतो तसं, भुलेश्वरच्या शिल्पकामाबरोबर तुलना करता येउ शकते अशीच शिल्पकला आहे. विशेषतः मंदिराला वेगळी भिंत न बांधता मुर्तींच्याच वापराने भिंत करणे.
28 Jun 2011 - 11:13 am | शाहिर
कोल्हापूरहुन कोल्हापूर - मिरज महामार्ग हुन जावे ...नरसोबा ची वाडि हे प्रसिद्ध ठिकाण आहे..तिथे जावे ..
तिथून कुरुंदवाड ला जाणारा रस्ता विचारावा ..तिथून सैनिक टाकळी मार्गे खिद्रापूर ला पोचता येते ..नरसोबाची वाडी हे सुद्धा सुंदर ठिकाण आहे ..कोल्हापूर हून अंतर ६०-६५ किमी असेल ..
स्थानिका ना विचारातच गेलो होतो ..त्यामुळे अचूक माहिती नाही ...क्षमस्व
29 Jun 2011 - 2:36 am | आनंदयात्री
हे घ्या म्याप !!
View Larger Map
28 Jun 2011 - 12:19 pm | किसन शिंदे
मस्त आहे हे शिवमंदिर.
28 Jun 2011 - 1:31 pm | सविता००१
सुंदर मंदिर आणि तितकेच छान फोटो. आता लगेच जायलाच हवे.
28 Jun 2011 - 4:00 pm | राही
कोरलेले असेल तर ते शिवलीलामृताचा काळ ठरवण्यास उपयुक्त ठरू शकेल.
28 Jun 2011 - 9:37 pm | इंटरनेटस्नेही
ऑसम!
29 Jun 2011 - 11:01 am | JAGOMOHANPYARE
खिद्रापूर आमची सासुरवाडी.... दक्षयज्ञ खिद्रापुरपासून काही अंतरावर झाला. पार्वतीने नंदी तिथे पार्क केला होता. आणि त्यानंतर ती यज्ञात गेली. तो नंदी तिची वाट पहात तिथेच आहे. जवळ शिरगुप्पी की कुठले तरी गाव आहे. तिथे तो आहे.
2 Jul 2011 - 10:15 am | चिंतामणी
पार्वतीने नंदी तिथे पार्क केला होता.
लै भारी बरका मोहन प्यारे.
29 Jun 2011 - 11:24 am | वेताळ
मंदिरात गाभार्यात दोन शिवलिंग आहेत.
29 Jun 2011 - 11:58 am | शाहिर
त्या मधील एक लिंग धोपेश्वर म्हनुन ओलखले जाते ..ते विष्णु चे आहे असे सांगतात ,,,
29 Jun 2011 - 2:06 pm | अनुरोध
आता मागच्याच आटवड्यात जौन आलो. फारच झकास (सुन्दर) अहे हे मन्दिर....(अनुस्वार देत येत नहिये क्रूपया कोणि सान्गावे...)
अनुरोध
1 Jul 2011 - 9:21 am | मदनबाण
अतिशय सुंदर मंदीर आहे हे... अनेकवेळा इथे जाणे झाले आहे माझे. :) एका खांबावर पार्वतीची एक मूर्ती असुन ती अंबाडा घालनताची मुद्रा आहे.
1 Jul 2011 - 1:28 pm | मालोजीराव
कुठेच बांधकाम न करता एकावर एक कोरीव दगड रचून हे अद्भुत शिल्प उभारलंय,एकदा गेलेलो बघायला,छतावरील नक्षीकाम तर अप्रतिमच !
या भागात ठिकठिकाणी प्राचीन मूर्तींचे अवशेष सुद्धा विखरून पडलेले बघितले होते.या मंदिराला हेरीटेज दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
छायाचित्रे - भवानीसिंह घोरपडे
- मालोजीराव
1 Jul 2011 - 8:48 pm | धमाल मुलगा
तसे झाले तर फारच बरे होईल.
2 Jul 2011 - 5:21 pm | रुमानी
मंदिर व महिति खूप छान.