राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयी अनेक प्रकारची भीती प्रसारमाध्यमात ऐकू येते. हे संस्था उजव्या विचारसरणीची आहे वगैरे.
आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था आहे असे म्हणतात. युवा नेते राहुल गांधी हे तर या संस्थेला देशविघातक शक्तीच म्हणतात. समाजाच्या एका भागात या संस्थी विषयी नक्कीच भीती आहे. मला माझ्या काही मित्रांनी या सम्स्थेच्या कारवायांबद्दल टोकाची मते मांडली. त्यात कदाचित अफवाही असतील. त्यामुळे मी अजूनच गोंधळून गेलो आहे.
मिपावासियांना या संस्थेविषयी काय वाटते हे समजून घेण्यासाठी हा काथ्याकूट मांडतो आहे.
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ही एक राष्ट्रविघातक संस्था आहे का?
२. ही एक अतिरेकी संस्था आहे?
३. इतक्या भयंकर संस्थेवर बंदी का घातली जात नाही?
४. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का?
५. तुम्हाला या संस्थे विषयी काय वाटते?
प्रतिक्रिया
24 Jun 2011 - 7:47 am | आनंदयात्री
ह्म्म. सुट्टीवर आहात काय ?
24 Jun 2011 - 7:51 am | आंसमा शख्स
संस्थेची काही माहिती असेल तर द्या. त्याबद्दल काही बोलत असाल तर बोला.
(माझ्या सुट्टीचे पाहायला खुदा आहे. काळजी नसावी.)
24 Jun 2011 - 6:22 pm | आनंदयात्री
>>संस्थेची काही माहिती असेल तर द्या. त्याबद्दल काही बोलत असाल तर बोला.
हो का ? आंसमा शख्स असे नाव घेतल्याने संघिष्ट लोक तुम्हाला मुस्लिम समजणार आणि तुमच्यावर तुटुन पडणार असे वाटते का तुम्हाला ? असे असेल तर ऑम्लेट घ्या साहेब, हवा तर चहा ही घ्या जाता जाता !! आमच्या कानावर बिड्या दिसतात का ? तुमचा मुद्दाम भडक चर्चा घडवुन आणायचा उद्देश्य आम्हाला कळत नाही असे वाटले का ? गेट वेल सुन.
संपादक मंडळाने अश्या उठसुठ निघणार्या वादग्रस्त विषयांवरच्या धाग्यांना आवर घालावा ही विनंती.
24 Jun 2011 - 8:12 am | पप्पुपेजर
मला वाटत आपण हा धागा जरूर वाचवा कल्याणकर सरांचे पुष्कळ लेखन वाचण्या सारखे आहे
http://www.misalpav.com/node/17187
24 Jun 2011 - 8:18 am | अभिज्ञ
मिपाकरांचे मत जाणून घेण्या आधी या संघटनेबद्दल तुमचे मत काय आहे
हे स्पष्ट सांगावे.
अभिज्ञ.
24 Jun 2011 - 9:39 am | आंसमा शख्स
माझे मत चांगले नाही असे मला पूर्णपणे म्हणता येत नाही. मी गोंधळलेलो आहे.
24 Jun 2011 - 12:09 pm | मृत्युन्जय
माझे मत चांगले नाही असे मला पूर्णपणे म्हणता येत नाही. मी गोंधळलेलो आहे.
खरे की काय? मग हे वाचा. तुम्हीच लिहिलेले आहे. हे काय चांगल्या मताने लिहलय काय?
आर एसेस म्हणजे माहिती तपासून घेतली पाहिजे हेच खरे. ते काय सांगतील याचा भरवसा नाही. कधी कधी तर ते मला ख्रिश्चनांचेच एजंट वाटतात. - माझे वैयक्तिक मत आहे.
फु़कट कशाला लोकांचा वेळ वाया घालवताय राव. संघाकडे धर्मविद्वेषी चष्म्यातुन पाहणे सोडुन द्या. सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना त्यांचा धर्म, संस्कृती, स़स्कारांची शिकवण देणारी संस्था आहे ती. अनेक घरांतुन मुलांना संघाच्या शिबिरांना पाठवणे आवश्यक समजतात. गावागावातुन संघाचे संस्कार वर्ग भरतात. आपणही आपल्या मुलांना या संस्कार शिबिरात पाठवुन बघा. वाटल्यास त्यांनी हिंदु देवतांच्या प्रार्थना नाही म्हटल्या तरी चालतील. पण बाकी ज्या गोष्टी शिकायला मिळतील त्यामुळे त्याचे भलेच होइल आणी पर्यायाने समाजाचेही. तोच तुम्हाला सांगेल मग संघ चांगला की वाईट ते.
हो आणि संघाच्या शिबिरांतुन लहान मुलांना कुठलेही धर्मद्वेषाची बाळकडु मिळत नाही.
24 Jun 2011 - 12:57 pm | प्रचेतस
पूर्णपणे सहमत.
24 Jun 2011 - 9:18 am | विवेक मोडक
आम्हाला काय वाटतं ते जाउद्या,
प.पु.राहुल बाबा याबद्दल काय म्हणतात ते जास्त महत्वाचं आहे
24 Jun 2011 - 9:42 am | विवेक मोडक
आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती
अशी महान व्यक्ती जर संघाला एक भयानक संस्था म्हणत असेल तर ते निर्विवाद सत्य असलं पाहिजे.
24 Jun 2011 - 9:59 am | ५० फक्त
आताशा मिपावर ब-याच भिती बद्दलचे धागे यायला लागलेत, एखादा मानसोपचार तज्ञ आहे काय मिपावर जो समुपदेशन करु शकेल सगळ्यांना, आंतरजालीय समुपदेशन वैग्रे. आम्हाला तर प्रसारमाध्यामातुन मुन्नी आणि शिला नंतर जलेबीबाई ऐकु येते, मध्ये मध्ये दिल्ली बेलीचे ट्यं ट्यं असे बुच मारलेले संवाद ऐकु येतात. मग कार्स २ चे मस्त मस्त आवाज, अजुन लिटिल चॅम्प्स च्या पोरांनी म्हणलेली गाणी, मी मराठी वरचा नियाज का रियाज शेख, आमचा गाववाला, लई भारी गाणी म्हणतो, एकदा त्यानं त्या फुलांच्या गंधकोषी लई भारी म्हणलं होतं, खास कव्वाली स्टाईलनं. असलं काहीतरी बघत ऐकत जा की, कशाला उगा नको त्या लोकांच्या बडबडीकडे लक्ष देता आहात ?
24 Jun 2011 - 10:00 am | गवि
माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती....
:) :) :) :) :) :)
बरं ते जाऊ दे..
कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का?
अजिबात झगमगाट न करता, आवाज न करता आरेसेसचे लोक आदिवासी शिक्षण / अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या मुलांचे शिक्षण आणि अशा अनेक कामांना झोकून देऊन करत असतात. हिंदुत्त्वाबाबत त्यांची मते अतिरेकी असली तरी या समाजकार्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
वीस वर्षापूर्वी दिलेल्या देणगीतून शिक्षण केल्या गेलेल्या मुलांचे अहवाल आणि प्रगतिपुस्तके दरवर्षी आम्हास येतात. आरेसेसच्या हिंदुत्ववादाशी माझे कितीही मतभेद असले तरी अशा कामांसाठी दिलेल्या पैशातली चवन्नीही हडप होणार नाही याची खात्री असलेल्या दुर्मिळ चोख प्रामाणिक संस्थांपैकी ती आहे.
माहिती नाही म्हणून दिली.
24 Jun 2011 - 10:27 am | प्यारे१
गवि,
आर एस एस या नावाखाली संघ कधीच सेवाकार्य करीत नाही. संघाची भुमिका 'संघ काही करणार नाही, होईल' अशी असल्याने संघाचे स्वयंसेवक विविध संस्थांतून आपापले कार्य करत असतात. वनवासी कल्याण आश्रम, मजदूर संघ, बजरंग दल, विहिंप, जन्मभूमी न्यास, विविध सहकारी बँका, महत्त्वाचे म्हणजे राजकारणात भाजप सारख्या संघाच्या बर्याच शाखा आहेत. (ध्वज प्रणाम -शाखा वेगळी आणि ह्या शाखा वेगळ्या ;) )
अधिक प्रकाश 'जाणकार' टाकतील.
संघ विकीर.... १-२-३.
अरे हो, दिग्विजय सिंग आणि राहुल गांधी कोण?
24 Jun 2011 - 11:22 am | अमोल केळकर
कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का?
- हे वाचून वाईट वाटले. का माहित नाही .
हा धागा वाचल्यापासून या प्रश्णावर काय उत्तर द्यावे याचा विचार करुत होतो. मात्र गगनविहारी साहेब, आपण खुप छान समर्पक्,योग्य, खरे
उत्तर दिलेत . धन्यवाद :)
अमोल केळकर
28 Jun 2011 - 5:08 am | आंसमा शख्स
गगनविहारी आणि रणजित चितळे धन्यवाद.
मला वाटते की आपण समर्पक उत्तर दिले आहे. आपल्या उत्तरांमुळे आणि इतरांच्याही उत्तरांमुळे महत्त्वाची वेगळी बाजूही समजली याबद्दल धन्यवाद.
आशा आहे चर्चा सकारात्मक रितीने पुढे जाईल. खुदाच्या कृपेने वाचत आहे.
24 Jun 2011 - 10:26 am | परिकथेतील राजकुमार
श्री. आंसमा शख्स हे सध्या मिपावार रोज धाग्यांचा रतिब घालत आहेत. त्या धाग्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले अथवा लेखना संदर्भात शंका उपस्थित केली की मात्र ते सरळ पळ काढतात अथवा उडवीउडवीची उत्तरे देतात.
संपादक मंडळ अशा तकलादू , बिनबुडाच्या व केवळ केवळ आणि विद्वेष पसरवणार्या लेखनाची दखल घेऊन संबंधितांना योग्य ती समज देईल काय ?
अन्यथा दुर्लक्षित पॅंथरला या प्रकरणात जातीने लक्ष घालावे लागेल ;)
24 Jun 2011 - 10:41 am | आंसमा शख्स
फक्त ३ धागे आहेत या आठवड्यातले. तो कराराचा धागा जुना आहे.
मी सर्व शंकांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो कराराचा धागा वर आला आहे.
मी कुठेही पळ काढलेला नाही किंवा ऊडवा उडवीही केलेली नाही.
तसेच मी कोणतेही विद्वेष पसरवणारे लेखन करत नाही. उलट विद्वेष पसरवणार्या गोष्टींना आळा कसा घालता येईल हे पाहतो आहे. यात काही वावगे मला दिसत नाही. उदा. वल्ड विजन ची ख्रिस्ती धर्मप्रचार हेच प्रमुख काम आहे हे तत्त्व आहे. हे त्यांनीच दिली आहेत मी ती फक्त येथे मराठीत मांडली.
आरेसेस या संस्थेविषयीची मते मी मांडलेली नसून अनेक मान्यवर मंडळींनी मांडलेली आहेत. मी ती फक्त येथे दिली आहेत. जर तुम्हाला ते मत पटत नसेल तर खंडन करा.
तुम्ही खंडन न करता गळे काढत आहात याचा अर्थ त्या आरोपात तथ्य असले पाहिजे. आग नही तो धुंआ क्यो है साहब?
24 Jun 2011 - 11:12 am | पप्पुपेजर
तुम्ही थोडे गुगलून पाहाल तर तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघा बद्दल पुष्कळ माहिती मिळेल त्यांचे सेवादर्शन म्हणून संकेत स्थळ आहे तिथे तुम्हाला त्यांच्या कार्या बद्दल माहिती मिळेल किती विविध प्रकल्प ते राबवतात हे कळेल.
http://www.sevadarshan.org/
मी पण जमेल तेव्हा सेवा भारतीतून काम केले आहे हे इथे सांगण्याचा एकच मुद्दा "अफवाओ पे मत जाओ अपनी अकल लागाओ"
28 Jun 2011 - 5:09 am | आंसमा शख्स
धन्यवाद पप्पुपेजर,
मी वाचतो आहे. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
24 Jun 2011 - 11:12 am | शिल्पा ब
<<<आरेसेस या संस्थेविषयीची मते मी मांडलेली नसून अनेक मान्यवर मंडळींनी मांडलेली आहेत. मी ती फक्त येथे दिली आहेत
मान्यवर म्हणजे राहुलबाबा गांधी आणि दिग्विजय सिंग हे आहेत?
ख्रिश्चन झाले, हिंदू झाले भयंकर अतिरेकी लोक आहेत. मुसलमानांबद्दल तुमचे काय मत आहे? नाही म्हणजे जगात सगळीचकडे रक्तपात करणे (जिहादच्या नावाखाली - धर्माच्या नावाखाली) वगैरे वगैरे बद्दल बदनाम आहेत म्हणून विचारलं. लोकं काय हो काहीही बोलतात. इतर धर्मीय अतिरेक्यांनी असे काम करून मुसलमानांचे नाव पुढे केले असण्याची दाट शक्यता आहे. नाही का? अगदी सालस, सहिष्णू वगैरे धर्म आहे तो. आता केवळ मुसलमान धर्म स्वीकारला नाही म्हणून गावेच्या गावे कापली त्या पैगंबराने त्याला त्याचा नाईलाजच होता.
24 Jun 2011 - 11:15 am | शिल्पा ब
झाल्याने प्रकाटाआ.
24 Jun 2011 - 11:14 am | पिवळा डांबिस
तो कराराचा धागा जुना आहे.मी सर्व शंकांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो कराराचा धागा वर आला आहे.
मिपाकर त्या धाग्यावरील प्रतिसादांवरचे तारीख आणि वेळ बघून ही खात्री करून घेऊ शकतात की मी उपस्थित केलेल्या हरकतींना (शंकांना नव्हे!!) आंसमां शख्स यांनी उत्तर न दिल्यामुळे मी जेंव्हा पाठपुरावा केला तेव्हाच तो धागा वर आला, त्यांनी शंकांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्यामुळे नव्हे....
त्यांनी त्या धाग्यात केलेली बिनपुराव्याची आणि प्रक्षोभक विधाने बिनशर्त मागे घेतल्याने तो वाद माझ्यापुरता संपला आहे.
बाकी चालू द्या....
24 Jun 2011 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार
खोटे बोल पण रेकुन बोल :)
'निरागस चेहर्याआडचे धर्मांतर' ह्या तुमच्या धाग्यात मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजुन तुम्ही दिलेले नाहीत. तसेच पियुशाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर / खुलासा देखील आपण दिलेला नाहित. शोधले तर असे अनेक प्रश्न सापडतील जे आपण सरळ दुर्लक्षित केलेले आहेत.
तुमचे लिखाण हे केवळ केवळ आणि केवळ दोन समजान तेढ निर्माण व्हावी, वाद व्हावेत तसेच ह्या न त्या कारणानी मिपावर धुराळा उडावा ह्या आणि ह्याच हेतुन केलेल आहे हे स्पष्ट आहे. आपली अनेक प्रक्षोभक विधाने संपादित करण्याची वेळ तुमच्यावर आली ह्यातच सर्व काही स्पष्ट होते. तेंव्हा आता कृपया हे धंदे थांबवा.
जोडता येत नसेल तर निदान तोडण्याचे काम करु नका.
24 Jun 2011 - 12:18 pm | मृत्युन्जय
तेंव्हा आता कृपया हे पालथे धंदे थांबवा असे लिहायचे होते का तुम्हाला?
24 Jun 2011 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा
अगदी अगदी.
योग्य शब्दाबद्दल धन्यवाद.
24 Jun 2011 - 12:44 pm | माझीही शॅम्पेन
कोणीही चुX ने उठाव आणि काही आभ्यास न करता कितीही धागे काढावेत अस इथे व्हायला लागलाय ?
स. म. ने ताबडतोब लक्ष घालावे अशी जनहित याचीया मी दायर (?) करतो :)
24 Jun 2011 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार
असाच धागा विनायक पाचलग उर्फ कोदा ह्यांनी काढला होता :)
पुढे त्याचे काय झाले ते सगळे जाणतातच. तसा दंगा पुन्हा व्हायच्या आत संपादक मंडळाने कार्यवाही / कारवाई करावी अशी अपेक्षा.
24 Jun 2011 - 3:02 pm | विनायक पाचलग
फक्त तो धागा काढताना संघाबाबत अतीव आदर व प्रेम होते एवढाच काय तो फरक ...
मी आणि माझे कुटुंबीय संघाशी संबंधीत आहेत ,व सक्रीय नसले तरी संघप्रेमी आहेत . याचा मला सार्थ अभिमान आहे ...
बाकी गेल्या २.५ वर्षात कोणत्या धाग्याना फाट्यावर मारायचे हे चांगलेच शिकलो आहे, त्यातलाच हा एक धागा ....
जाता जाता - समतोल दिग्विजय सिंग "आवरा .."वर टाकायला पाहिजे हे स्टेटमेंट ...:)
24 Jun 2011 - 7:05 pm | श्रावण मोडक
असं असूनही लोक उगाच 'साधना' (साप्ताहिक) समाजवादी आहे असं का म्हणतात, हे कळतच नाही मला तरी. 'साधना' किती डायनॅमिक आहे याची ही खणखणीत नोंद आहे. ;)
27 Jun 2011 - 3:03 pm | विनायक पाचलग
अगदी अगदी ..याचे श्रेय मात्र विनोद शिरसाठ या व्यक्तीला जाते ,एवढे मात्र नक्की ..
24 Jun 2011 - 10:56 am | विवेक मोडक
मतं पट्त नाहीत पण सिद्ध करण्याची वांझोटी मेहेनत का करायची.
आणि तुम्ही उल्लेख केलेल्या "अनेक मान्यवर" मंडळींनी देखील त्यांचे विधान सिद्ध केले आहे का?????
आणि तुम्ही म्हणल्या प्रमाणे त्या आरोपात जर तथ्य असेल तर तुम्ही सिद्ध करा
24 Jun 2011 - 11:16 am | मालोजीराव
या धाग्याचा जीव वरील वाक्यातच संपला....त्यामुळे पुढील लिखाण वाचू शकलो नाही !
क्षमस्व
24 Jun 2011 - 11:25 am | शैलेन्द्र
चल्लो.. पॉप्कॉर्ण पॉपकॉर्ण.. जागा पकडा
24 Jun 2011 - 11:48 am | रणजित चितळे
मी लहान होतो तेव्हा पासून आर एस एस च्या शाखेत जायचो.
एक तासाच्या ह्या शाखेत व्यायाम, सुर्यनमस्कार, सांघिक खेळ व्हायचे. नंतर एक शिवाजीची किंवा पृथ्वीराज चौहान, झाशीची राणी इत्यादींच्या कथा व्हायच्या. कधी कधी संस्कारांबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायचे. (शिव खेरा च्या यु कॅन विन हे पुस्तक आत्ता आले आहे त्यातल्या गोष्टी आम्ही खुप पुर्वी शाखेत ऎकल्या होत्या). शेवटी नसस्ते सदा वत्सले अशी प्रार्थना व्हायची. कधीही कोणा बद्दल वाईट शिकवले नाही. राष्ट्रसेवा करण्या साठी नेहमीच प्रोत्साहन दिले. माझ्या मनात राष्ट्राबद्दल जे चांगले विचार येतात ते शाखेतील शिकवणी मुळे.
काम काय करते असे विचाराल तर राष्ट्रप्रेम वाढवते मुलांमध्ये.
बाकी गगनविहारीनी लिहीले त्याला सहमती.
24 Jun 2011 - 11:55 am | अमोल केळकर
क्या बात है !! :) संपुर्ण प्रतिसाद आवडला
(शिव खेरा च्या यु कॅन विन हे पुस्तक आत्ता आले आहे त्यातल्या गोष्टी आम्ही खुप पुर्वी शाखेत ऎकल्या होत्या). हे विशेष आवडले
अमोल केळकर
24 Jun 2011 - 2:19 pm | रणजित चितळे
मी प्रताप सायम मध्ये जायचो. मला कधीही आठवत नाही कोणाबद्दल वा कोणत्याही समाजा बद्दल अपशब्द बोललेला. ऎकलेला शाखेमध्ये. रविवारी शंभर सुर्यनमस्कारांची कावड लागायची. शिबिरातून सुद्धा तसेच. गृप डिस्कशनचे पहिले धडे तेथेच शिकलो. वक्तशिरपणा तेथेच शिकलो.
एका तासात होलसम व्यायम व बौधिक कोठे मिळणार नाही शाखा सोडून (फुकटात) असे मला वाटते.
24 Jun 2011 - 12:04 pm | गवि
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे..
...
मंत्र छोटा तंत्र सोपे, परि यशस्वी ठरले ते.
...
अशी खूप गाणी..
संघाची शिस्त तोंडात बोटे घालण्यासारखी असायची. आर्मीसारखीच. लाखोंचा मेळावा असला तरी बसा म्हटले की शिस्तीत बसणार. कुठे गोंधळ नाही की तुडवातुडवी नाही.
मुख्य म्हणजे कोणालाही वैयक्तिक पदाची किंवा पैशाची/सत्तेची हाव नाही. आयुष्यभर फक्त कर्तव्यभावनेने शाखा चालवणारे/तिथे येऊन शिकवणारे अनेक आजोबा पाहिले. (कोणत्याही "पदा"वर नसतानाही)
चितळेसाहेब, लहानपणीची पहाटेची ती रम्य शाखा आठवून दिलीत.. धन्यवाद.
आम्हाला मात्र कराची किसकी है किंवा तत्सम म्हटले तर राष्ट्रप्रेमी पण म्हटले तर पाकिस्तानद्वेषाने-आणि पर्यायाने मुस्लिमद्वेषाने भरलेले असे खेळ शिकवायचे. इथे सरळसरळ हिंदुत्ववाद चालतो आणि ती धार्मिक संघटना आहे हे नाकबूल करताच येणार नाही. त्यांच्या अशा दर्शनाने उबग येऊन कळायला लागल्यावर मी तिथून बाहेर निघालो..
फक्त त्यांची एक अतिशय प्रामाणिक सचोटीची शिस्तबद्ध बाजूही आहे हे सांगायचे होते.
24 Jun 2011 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
गवि ह्यात काही गैर आहे काय ? अनेक मदरशांमध्ये जे चालते ते वेगळे काय असते ? :)
हळुहळु तुम्ही हुच्चभ्रु होणार म्हणा की ;)
विनोदाचा भाग सोडा, पण एखाद्या आपत्तीच्या वेळेला जात - पात अथवा धर्म बघुन संघाने त्या त्या आपदग्रस्त भागात काम केल्याचे मी आजवर तरी कधीच, अगदी संघद्वेष्ट्यांकडून देखील ऐकलेले नाही. गविंना नक्की कसले दर्शन झाले आणि कशाचा उबग आला हे जाणुन घ्यायला खरच आवडेल.
24 Jun 2011 - 12:27 pm | गवि
मुख्य म्हणजे ज्या वयात पोरांना मुस्लिम / हिंदू / पाकिस्तान यातले काही म्हणता काही माहीतही नसते त्या वयात त्यांच्या मनात पूर्वग्रह भरण्याचे काम मला नाही आवडले. मोठे होऊन पाहून आपापले मत बनवले तर ठीक.
हा लोकल प्रॉब्लेम असणार. देशभरातली प्रत्येक शाखा अशीच असेल असे मुळीच म्हणणे नाही.
तिथे शिकवताना खचितच मुस्लिमांचा उल्लेख जनरलाईझ्ड वाईट तर्हेने केला जायचा. मी तपशील देऊ शकत नाही. क्षमस्व.
वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी अजूनही संघाला सपोर्ट करतो, पण त्यातल्या समाजकार्यासाठी आणि प्रामाणिकपणासाठी.
द्वेष पसरवणे सर्वांनीच थांबवायला पाहिजे. उच्चभ्रू ठरण्याच्या भीतीने मी अशा गोष्टीला सबस्क्राईब करु शकत नाही.
24 Jun 2011 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार
मी तेच म्हणतोय गवि. हे फक्त संघाच्या शाखांमध्येच चालते काय ? किंवा फक्त हिंदूनाच अशी शिकवण दिली जाते काय ? आणी खरा इतिहास सांगण्यात गैर ते कय? पुढे जाउन ह्या मुलांना सरकारने ठरवलेला आणि लिहून घेतलेलाच इतिहास शिकायला मिळणार असतो ना.
पुन्हा वर आहे तेच म्हणतो.
विषयच संपला.
आम्ही तेच म्हणतोय की केवळ एका कारणासाठी सरळ सरळ जनरलायझेशन करु नका. एका छोट्याश्या कारणासाठी संपूर्ण संघाच्या कार्यावरच बोळा फिरवण्यासारखे झाले हे.
(च्यायला ह्या गविंशी चर्चा तर चालु केली आहे, पण त्यांच्यांकडे टंचनिका आहे आणि आम्ही आपले स्वतःच किबोर्ड बडवणार.)
24 Jun 2011 - 12:35 pm | गवि
आम्ही तेच म्हणतोय की केवळ एका कारणासाठी सरळ सरळ जनरलायझेशन करु नका.
मान्य..
..............
(बाकी पांढर्यातल्याचे उत्तर देता येत नाही कारण ते पांढर्यातच दिले पाहिजे..
आणि शिंचे काहीपण करा, अक्षरांना पांढरा रंग देताच येत नाहीये. काही सदस्यांनाच आहे का ही सोय? ;) )
24 Jun 2011 - 12:43 pm | परिकथेतील राजकुमार
अक्षरांना पांढरा रंग सिलेक्ट केल्यानंतर, प्रतिक्रियेच्या बॉक्स खाली असलेल्या input format वर क्लिक करुन Full HTML हा ऑप्शन सिलेक्ट करा. झाले काम ;)
आजकाल खरडी आलेल्या कळत नाहित त्यामुळे इथेच प्रतिसाद दिला आहे.
24 Jun 2011 - 1:24 pm | मृत्युन्जय
'
30 Jun 2011 - 9:27 am | आंसमा शख्स
संपादित
24 Jun 2011 - 12:00 pm | शाहिर
तुम्ही धागा सुरु करण्यापूर्वी मत बनवला आहे का?? पुर्व ग्रह दुषित नजरेने बघु नका !!
24 Jun 2011 - 12:23 pm | मृत्युन्जय
आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था आहे असे म्हणतात
हा शख्स गंभीरपणे लेख लिहितो आहे की खेचतो आहे इथल्या सगळ्यांची. साला एवढा वेळ मला हा लेख गंभीरपणे लिहिला आहे असे वाटत होते. पण हे वाक्य परत वाचल्यावर हास्याची चिळकांडी उडली ना राव. साला हे म्हणजे सीताराम केसरी आणि लालूप्रसाद यादवला प्रामाणिक आहेत किंवा ओसामा बिन लादेन आणि दाउद पापभीरु आहेत किंवा अझहर आणि जडेजा सच्चे क्रिकेटखेळाडु आहेत किंवा माधुरी गुप्ता आणि हुरियतचा गिलानी देशप्रेमी आहेत असे म्हटल्यासारखे वाटते आहे. चंमतग आहे सगळी.
24 Jun 2011 - 1:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
खरेच चंमतग आहे.
मायला दिग्विजय सिंग राष्ट्रीय नेता कधीपासून झाला?
राहुल बाबा नी हाकलला तर काँग्रेसमधलेच काय पण एकूणच राजकीय जिवन संपून जायील त्याचे. असो.
विषयांतर नको.
संघ आणि संघाचे कार्य या दोन्ही गोष्टी समजायला प्रत्यक्ष अनुभव आणि जाणून घेण्याची वृत्ती असावी लागते.
बाकी चालू द्या!!
24 Jun 2011 - 2:22 pm | गणपा
तरीच काल दुरदर्शनवर म्हणताना पाहिलं की "मनमोहन अतिशय चांगले पंतप्रधान आहेत. पण मला माझ्या हयातीत (गचकायच्या आधी) राहुल(जीं(?))ना पंतप्रधान झालेलं पहायला आवडेल."
24 Jun 2011 - 1:31 pm | नितिन थत्ते
गंमतीदार लेख.
रास्वसं वर टीका किंवा आक्षेप घेतल्याचा भास होईल अशा रीतीने लेख लिहिला आहे. परंतु तो एका संघीयानेच विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रिया याव्यात अशा उद्देशानेच लिहिला आहे. लेखात वापरलेली दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी यांची वर्णने पाहता लोकांनी संघाच्या बाजूने तुटून पडावे असा उद्देश स्पष्ट दिसतो.
लेखात विचारलेले प्रश्न अगदी नेव्ह (Naive) सारखे विचारले आहेत. परंतु त्यांची काय उत्तरे अपेक्षित आहेत हे प्रश्नातूनच स्पष्ट होते.
प्रस्तुत लेखकाने नुकतेच काढलेले ख्रिश्चन धर्मांतराविषयी काढलेले धागे पाहता ते संघीय असल्याबाबत कसलाच संशय उरत नाही.
24 Jun 2011 - 1:38 pm | मृत्युन्जय
लेखात वापरलेली दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी यांची वर्णने पाहता
म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला नक्की थत्ते चाचा? दिग्विजय सिंग समतोल विचाराचे नाहीत असे तर नाही ना म्हणायचे तुम्हाला? आणि राहुल गांधी युवा नेते नाहीत असे का म्हणायचे आहे तुम्हाला? ;)
24 Jun 2011 - 2:18 pm | नितिन थत्ते
दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी यांना सतत चर्चेत ठेवण्याचे काम हे छुपे संघीयच करतात असे वाटते. अशा गोष्टीचा इंदिरा गांधींना पुनरागमनात खूप फायदा झाला अशी चर्चा आठवते.
24 Jun 2011 - 3:43 pm | आनंद
>>प्रस्तुत लेखकाने नुकतेच काढलेले ख्रिश्चन धर्मांतराविषयी काढलेले धागे पाहता ते संघीय असल्याबाबत कसलाच संशय उरत नाही.>>
सहमत ,
बरोब्बर ओळ्खलत तुम्ही!
अगदि हेच लिहणार होतो.
संघाची हिच खासियत आहे , आपल्याला जे म्हणायच असत ते लोकांकडुन म्हणुन घ्यायच
(ही चाल फक्त नितीन थत्ते जींनाच आधी कळल्या मुळे ते ही छुपे संघीय असावेत असा संशय येतो आहे)
--उघड संघीय
आनंद
24 Jun 2011 - 3:47 pm | परिकथेतील राजकुमार
नितीन थत्ते = जींना ??
अरे रे ;)
परा नेहरू
24 Jun 2011 - 8:51 pm | अप्पा जोगळेकर
रास्वसं वर टीका किंवा आक्षेप घेतल्याचा भास होईल अशा रीतीने लेख लिहिला आहे. परंतु तो एका संघीयानेच विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रिया याव्यात अशा उद्देशानेच लिहिला आहे. लेखात वापरलेली दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी यांची वर्णने पाहता लोकांनी संघाच्या बाजूने तुटून पडावे असा उद्देश स्पष्ट दिसतो.
तुमचेच हे वाक्य वाचून तुम्हीदेखील संघाचेच कार्यकर्ते आहात असे वाटू लागले आहे. :)
बाकी हे आसमां शख्स नावाने लिहिलेले लिखाण अदखलपात्र आहे याची खात्री पटत चालली आहे.
24 Jun 2011 - 1:38 pm | तिमा
कोणी चांगले काम या देशासाठी करु लागले की जे भ्रष्टाचारी, दुराचारी आहेत त्यांना त्याची भीति वाटू लागते आणि मग ते त्यांना संपवण्यासाठी त्यांच्याविषयी अफवा पसरवतात, लोकांना त्यांची भीति घालतात. काँग्रेसने अनेक वर्षांत हेच चालवले आहे.
आरएसएसची सगळी मते पटण्यासारखी नसल्याने मीही लहानपणीच शाखेतून बाहेर पडलो. पण त्यांच्या सच्चा देशप्रेमाबद्दल मला कधीही शंका येणार नाही. आणि अशा संघटनेला देशद्रोही ठरवून त्यांना संपवायला निघालेलेच एक दिवस या देशातून संपलेले असतील.
24 Jun 2011 - 1:51 pm | योगप्रभू
या धाग्यावर मधून मधून कमर्शियल ब्रेक आहे.
मी सध्या येथे मक्याची भाजलेली कणसे विकण्याचे काम करत आहे. तस्मात् प्रतिसाद द्यायला वेळ नाही.
आता आमची जाहिरात ऐका.
उखाळ्या पाखाळ्या काढणारी माणसं
भिडणारी, चिडणारी, रडणारी माणसं
जेव्हा श्रमतात आणि दमतात
तेव्हा आवडीने खातात 'पांडू'ची कणसं
कणीस म्हणा वा भुट्टा! करा क्षणात चट्टामट्टा...
सुप्रसिद्ध 'पांडू' कणीस. खाल तर आवडाल शंभरजणींस..
:)
...........................................................
(अवांतर : लहान मुलांचे एक गाणे आठवले.)
दिग्गू जोकर, राणीचा नोकर
राणी मारते छमछम छड्या
दिग्गू मारतो टुणटुण उड्या
24 Jun 2011 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार
कमर्शिअल अंमळ अश्लिल वाटली.
तसेच कणीस भाजलेले आहे, उकडलेले आहे की तसेच आहे ह्याचा फटू नसल्याने फसवणुकीची शक्यता डोकावते आहे.
मुख्य मुद्दा म्हणजे पांडू हा हिंदू / मुस्लिम / ख्रिश्चन नक्की कोण आहे ? इथलाच आहे का परप्रांतीय आहे ? संघवाला आहे का द्वेष्टा आहे ? ह्याची माहिती मिळत नाही.
स्वयंघोषित सेंसॉर
परा
24 Jun 2011 - 2:03 pm | माझीही शॅम्पेन
+ १
कमीत कमी त्याने अर्धि खाकी चड्डी घाली आहे की नाही हा क्लु तरी द्या :)
24 Jun 2011 - 2:10 pm | प्यारे१
>>>अर्धि खाकी चड्डी
संघात हा बदल कधीपासून झाला?
खाकी चड्डी घालत होते हे ठाऊक होते. 'अर्धि खाकी चड्डी' म्हणजे अम्मळ अश्लिल झालं की वो....
(विन्ग्रजीचे मराठीकरण असे चुकीचे नका करु हो)
24 Jun 2011 - 2:35 pm | योगप्रभू
लहान मुलांच्या गाण्यात 'चड्डी' चालते, मग त्याला अश्लील म्हणावे का?
जंगल जंगल पता चला है
चड्डी पहन के फूल खिला है
फूल खिला है.
पूर्वी चरणसिंग आणि रेड्डी यांनी स्थापन केलेल्या काँग्रेसला लोक 'चड्डी काँग्रेस' म्हणत असत. :)
24 Jun 2011 - 2:40 pm | प्यारे१
चड्डी हा शब्दच 'हाफपॅण्ट' दर्शवतो असा माझा समज होता. जो बरोबरही असावा. त्यामुळे चड्डी अर्धि करणे अश्लिल सदरात मोडते.
बाकी आपण आपली शिकवणी कामवाल्या बाईकडे लावली असल्याने आपले शिक्षण अशा प्रकारे झाले असल्यास आमचा प्रत्यवाय नाही.
24 Jun 2011 - 2:59 pm | माझीही शॅम्पेन
वैय्यतीक वाइड बॉल ! सोडला ! तुमचा चालू द्या !
24 Jun 2011 - 2:23 pm | योगप्रभू
मी येथे मक्याची भाजलेली कणसे विकत आहे, इतके स्पष्ट सांगुनही लोक पुन्हा कणीस उकडलेले आहे, की कसे, हा प्रश्न का विचारताहेत? बहुधा आमच्या गिर्हाईकांचा बुद्धिभ्रम करायचा डाव दिसतोय. हम्म.. सावध राहायला हवं
या जाहिरातीत अंमळ अश्लील काही नाही. उलट ती निर्मळ ससलील आहे. (ससलील म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशी)
खुलासा : सुप्रसिद्ध 'पांडू' कणीसचे चालक पांडू हे कॉमन मॅन आहेत. त्यांचा कोणत्याही विचारसरणीशी/प्रांतीयवादाशी संबंध नाही, याची सेन्सॉर बोर्डाने नोंद घ्यावी. 'पांडू' यांचे बंधू 'बंडू' यांच्याबाबत जनमानसात काही समज असल्यास त्याचे निराकरण करण्यास हा उद्योगसमूह बांधील नाही.
सार्वजनिक माहितीस्तव प्रसृत
झबूराव हंचाटे,
मुख्य जाहिरात व जनसंपर्क अधिकारी,
'पांडू' उद्योगसमूह
24 Jun 2011 - 2:39 pm | परिकथेतील राजकुमार
काही लोक ताजमहाल म्हणजे पूर्वी तेजोमहल का काय ते मंदिर होते असे सांगत असतात. ते सांगतात म्हणुन विश्वास का ठेवावा ? पुरावा ? काही फटू वैग्रे ?
ज्या ज्या जाहिरातीत बाई नसते त्या सगळ्या जाहिराती अश्लील असतात ह्याची नोंद घेतल्या जावी.
ओह्ह्ह ! निधर्मीवादी काय तुम्ही ? बर्र बर्र!
साला ह्या दंगलीत पहिला रॉकेलचा बोळा तुमच्याच स्टॉलवर बघा.
24 Jun 2011 - 10:57 pm | एक
कणसं सोललेली आहेत का? ;)
-एक
24 Jun 2011 - 2:21 pm | सुधीर१३७
पॉपकॉर्न सोडून , कणसाचा धंदा सुरु केला????? ........................ :wink:
24 Jun 2011 - 2:51 pm | सूड
कणसं पांडूचीच का ?? अकबर किंवा अॅन्थोनीची का नाहीत ?? आणि शंभरजणींस आवडण्यासाठी कुणा एकाने का खायचं शंभरजणांस आवडण्यासाठी कुणा एकीने का खाऊ नये ?? ;) ह. घ्या हो.
टीपः प्रश्नचिन्हानंतर 'आणि' लिहीलंय म्हणून कुणी हरकत घेऊ नका ब्वॉ.
24 Jun 2011 - 2:07 pm | विजुभाऊ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ही एक राष्ट्रविघातक संस्था आहे का?
तसे अजिबात वाटत नाही. उलट ही संस्था बरीच सार्वजनीक कामे करते. उदा: पुरग्रस्ताना मदत वगैरे.
या संस्थेचे लागेबांधे विशेशी भाडोत्री अतीरेकी संस्थांशी आहेत असे देखील नाही. आर एस एस जे अराजकीय्काम करते ते खरेच मोलाचे आहे.
२. ही एक अतिरेकी संस्था आहे?
त्या संस्थेतील काही लोकांचे विचार प्रखर आहेत. पण प्रखर विचार म्हणजे अतिरेकी नव्हेत.
सिमी वगैरे सारखे या संस्थेतील लोकांचे पाकिस्तानशी लागेबांधे नाहीत. तसेच ही संस्था आय एस आय च्या पैशांवर पोसली जात नाही. शिवाय ही संस्था शिक्षण संस्था या नावाखाली मदरशात जहाल वादाचे शिक्षण देत नाही
३. इतक्या भयंकर संस्थेवर बंदी का घातली जात नाही?
ही संस्था भयंकर आहे असे काही तुम्हाला सापडले आहे का?
ही संस्था कार्यकर्त्याना धर्मांध माथेफिरु बनवण्याचे शिक्षण देत नाही.
काही तत्वे धोरणे चुकीची असतील पण त्यामुळे आर एस एस भयंकर आहे हे पटत नाही
४. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का?
पूरग्रस्ताना मदत वैगेरे बाबत अनुभव आहे. या सम्स्थेला दिलेली मदत ही लाभार्त्यांपर्यन्त पोहोचते हे खात्रीलायक सत्य आहे
५. तुम्हाला या संस्थे विषयी काय वाटते?
फार प्रेम नाही कारण संस्था चांगली आहे. विचारधारा देखील चांगली आहे. पण काही तत्वे पटत नाहीत,
अर्थात त्यावरून या संस्थेला अतिरेकी म्हणणे चूक आहे.
धर्माचा आग्रह धरणे हे चूक नाही पण धर्माचा आग्रह धरत कोणतीच बांधीलकी न मानणे हे चूक आहे.
जी संस्था कट्टर देशप्रेमी माणसे घडवते त्यांच्या देशनिष्ठेबद्दल कोणीही आक्षेप घेवू शकणार नाही.
मात्र जे लोक मातृभूमीचे वम्दन गान गाऊ शकत नाहीत त्याबात काय बोलावे.?
24 Jun 2011 - 2:12 pm | प्यारे१
>>>धर्माचा आग्रह धरणे हे चूक नाही पण धर्माचा आग्रह धरत कोणतीच बांधीलकी न मानणे हे चूक आहे.
ठळक केलेले (विशेषतः अधोरेखित) समजले नाही. कृपया इस्कटून सांगावे.
28 Jun 2011 - 5:13 am | आंसमा शख्स
विजुभाऊ, चांगले आणि उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद!
धर्माचा आग्रह धरणे हे चूक नाही पण धर्माचा आग्रह धरत कोणतीच बांधीलकी न मानणे हे चूक आहे. हे वाक्य फार महत्त्वाचे आहे.
24 Jun 2011 - 2:20 pm | सुधीर१३७
प्र.का.टा.आ.
24 Jun 2011 - 2:20 pm | शाहिर
सदर धागा कर्ता खोड्साळ आहे ...असे दिसुन येते ...धागा लिहिताना दुसर्यान्ची मते लिहिलि आहेत ..म्हणजे नन्तर "तो मि नव्हेच" असे सान्गायचे..
आणि "राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती" य वरुन त्यन्ची बौद्धिक कुवत ध्यानी येते ....
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ही एक राष्ट्रविघातक संस्था आहे नाही
उत्तर नाही
२. ही एक अतिरेकी संस्था आहे?
उत्तर नाही
३. इतक्या भयंकर संस्थेवर बंदी का घातली जात नाही?
उत्तर ती भयन्कर नाही .. म्हणुन बन्दी नाही..आणि तुम्ही चर्चा होण्या अगोदर भयंकर का ठरवली??
दिग्विजय सिंग च्या सान्गण्यावरुन ??
४. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का?
उत्तर हो ..त्या विषयी वरती लिहिले आहेच
५. तुम्हाला या संस्थे विषयी काय वाटते?
उत्तर आदर .
तरी त्यानी काही उत्तर द्यावी अशी अपेक्ष करतो..
१. हा धागा लिहिण्या पूर्वी आपण काय ग्रुह्पाठ केलात??
२. गुगल वर सन्घा विशयी शोधलेत का?
३. सन्घाच्या एखाद्या स्वन्य सेवकाला भेटुन काय चलते ते विचारलेत का?
४. टोकाची मते मान्डणार्या तुमच्या मित्रा ल तुम्ही स्पष्टीकरण विचारलेत का ?? बाबा ..तुझी अशी मते का आहेत ?? करण काय ?
५. तुमचे स्वताचे मत काय आहे ??
धागा कर्ता असल्याने य प्रश्नान्ची उत्तरे द्यवी ..ही विनन्ती ..
( मि.पा. वर नवीन आहे अशुद्ध लेखना बद्दल माफी असावी)
24 Jun 2011 - 2:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अवांतरः
हे म्हणजे फारच झाले!!
अहो, मि पा वर सूद लिवायचे असतया, तसच तर लिवले हाय तुम्ही माफी बिफी काय? कै च्या कै बगा तुमचपन!!
24 Jun 2011 - 2:49 pm | परिकथेतील राजकुमार
शुद्धलेखनाची काळजी करु नका :) लिहित रहा. भावना शब्दात उतरणे महत्वाचे.
बाकी शुद्धलेखनाची काळजी झेपेल तेवढी नक्कीच घ्यावी. शुद्धलेखनाच्या नावानी अती गळे काढणार्यांची रवानगी मात्र आम्ही पल्ल्याडच्या बुद्धीला गंज चढलेल्या हुच्चभ्रुंच्या अभयारण्यात करतो.
28 Jun 2011 - 5:20 am | आंसमा शख्स
१. हा धागा लिहिण्या पूर्वी आपण काय ग्रुह्पाठ केलात??
हा धागाच माहिती मिळवण्यासाठी काढला आहे.
२. गुगल वर सन्घा विशयी शोधलेत का?
नाही जमले नाही वेळ मिळेल तसे शोधेन. येथे काही दुवे मिळाले आहेत. त्यातून चांगली माहिती कळली.
३. सन्घाच्या एखाद्या स्वन्य सेवकाला भेटुन काय चलते ते विचारलेत का?
ते वर गगनविहारी यांनी सांगितलेच आहे! आता अजून कशाला विचारायचे?
४. टोकाची मते मान्डणार्या तुमच्या मित्रा ल तुम्ही स्पष्टीकरण विचारलेत का ?? बाबा ..तुझी अशी मते का आहेत ?? करण काय ?
ते वर गगनविहारी यांनी सांगितलेच आहे!
५. तुमचे स्वताचे मत काय आहे ??
मी माझे मत अजून बनवतो आहे. वाचन करत आहे. बनल्यावर ते येथे नक्की देईन.
29 Jun 2011 - 10:58 am | पिलीयन रायडर
का हो सारख आपलं गविंचा प्रतिसाद (सोयिस्कर पणे) दाखवताय??? शाखे बद्दल चांगलं लिहिलेले पण प्रतिसाद आहेत ना...
तुम्हाला अजिबात समजुन घ्यायच नाहिये की ही संस्था नक्कि काय करते.. तुमचा काही गोन्धळ पण उडाला नाहिये..
...आणि जगाचा इतका कळवळा असेल तर, मुस्लिम दहशतवादी संघट्ना आणि अतिरेकी ह्या बद्दल पण जाग्रुती करा.. इतर धर्मच्या वाइट संघटना दिसतात, स्वतःच्या मात्र दिसत नाहीत...
लव्ह जिहाद आणि अजुन कसले कसले प्रकार वाचयला मिळाले... ह तुमचा जिहाद तर नव्हे... हिन्दु संस्थाना टारगेट करायचा?
29 Jun 2011 - 11:44 am | शिल्पा ब
हम्म...आता यांचा आय डी मुस्लीम नावाचा आहे पण त्यामागचा माणूस कोण आणि असे लेख लिहिण्यामागचा उद्देश काय हे कसे समजणार? कदाचित संघाविषयी गैरसमज पसरवणे किंवा मुस्लीम समाजाविषयी आडवाटेने वैरभाग जागृत ठेवणे किंवा फक्त हमरीतुमरीची गंमत पाहणे किंवा अजून काहीहि असू शकतो.
30 Jun 2011 - 9:56 am | पिलीयन रायडर
शक्यता तर खुप काही असु शकतात.. चांगल्या आणि वाईट....
मी त्यातली एक पकडली... जी मला सर्वात जास्त "शक्य" वाट्ली...
आपल्याला काय माहीती की काय खरं काय खोटं असं म्हणुन आपण प्रतिसाद देणं तर नाही न थांबवु शकत...
आणि बुरख्या आडुन केलेल्या गोष्टी कितीही चांगल्या हेतुने केल्या तरी त्या मान्य होण्या सारख्या नसतात..
जर ह्या माणसाचा उद्देश चांगला असेल तर तसं कुणाला तरी वाटलं असतं..
धार्मिक बाबतित बोलताना संतुलीत बोलल पाहिजे.. पण तसं काही ह्या माणसाच्या लिखाणात दिसत नाही...
आणि तसही उत्तर कुठे देणारेत हे महाशय...
29 Jun 2011 - 11:54 am | गवि
हाच प्रतिसाद दुसर्या धाग्यावरही दिला आहे. इथेही देणे आवश्यक वाटते.
......
तुम्ही वारंवार आरेसेस विषयी काही निगेटिव्ह बाजू दाखवणार्या प्रतिसादांचा उल्लेख तुमच्या लिखाणाच्या समर्थनार्थ सर्टिफिकेटसारखा करताय. (उदा, मी, विजुभाऊ वगैरे यांचे प्रतिसाद..) असे अनेक प्रतिसादांत दिसले म्हणून एक मुद्दा नम्रपणे स्पष्ट करु इच्छितो.
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक संस्थेविषयीसुद्धा आपली मते परखडपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि मोकळीक आहे. देवालाही हिंदू मनुष्य विठू, विठ्या असे एकेरीत संबोधू शकतो.
अशा बॅकग्राउंडमुळे मी मोकळेपणाने आरेसेसच्या चांगल्या कामासोबतच एका विशिष्ट शाखेत दिसलेले निरिक्षण सांगितले. ते चूकच आहे. आणि ते सर्वत्र तसेच असेल असेही माझे म्हणणे नाही हे मी स्पष्ट केले. त्यासोबत त्या संस्थेची उजळ बाजूही दाखवली.
पण हे सर्व लिहिण्याचा उद्देश तुम्ही सांगितलेल्या संघटनेला पाठिंबा किंवा मुस्लिमांनी एकत्र येण्याचे समर्थन वगैरे मुळीच नाही हे स्पष्ट करतो.
मी आरेसेसची मला वाटलेली उणी बाजू दाखवली (तीही चांगल्यासोबत..आणि आधी चांगली बाजू दाखवून मगच.. ) याचा अर्थ आपल्या लिखाणातील विचारांचे समर्थन त्यामुळे होऊ शकत नाही. पुन्हा विनंतीपूर्वक लिहितो, भडकावण्याचे काम कोणीच करु नये.. कोणीच म्हणजे कोणीच.
29 Jun 2011 - 12:08 pm | शिल्पा ब
<<<पुन्हा विनंतीपूर्वक लिहितो, भडकावण्याचे काम कोणीच करु नये.. कोणीच म्हणजे कोणीच.
आँ...ऑशॉ कॉय कॉरॉयचॉ गडे!!! आम्ही नाही ज्जा!!!
29 Jun 2011 - 12:19 pm | गवि
हे काय आता आणि नवीन ?
अहो शिल्पाताई, प्रतिसाद तुमच्या प्रतिसादावर नाहीये हो..
29 Jun 2011 - 12:46 pm | शिल्पा ब
आँ...तुम्हॉलॉ गड्डे शॉगलॉच शॉमजॉवॉयचॉ कॉ!!
30 Jun 2011 - 9:46 am | पिलीयन रायडर
तुम्ह।ला नाहि..मला लेखकाला प्रश्न विचारायचा आहे... तुमचे अनुभव एका शाखे पुरते आहेत.. आणि तसं तुम्ही आधिच स्पष्ट केलेलं असताना, हा माणुस तुमचे नाव घेउन तुम्हाला स्वतःच्या बाजुला ओढत आहे असं वाट्लं... आणि तुमचं तेवढ्च लिहिलेल तुमचं मत म्हणुन वापरतोय...
24 Jun 2011 - 2:28 pm | गणपा
लोकांच्या मेंदुला बोटांना चालना देणारा अजुन एक धागा. :)
बाकी थत्तेचाचांशी बाडीस.
24 Jun 2011 - 2:48 pm | योगप्रभू
आमच्या कंपनीने लोकांच्या 'पोटाला चालना देणारी कमर्शियल टाकली आहे.
त्याचंबी कौतुक करा ना.. :)
24 Jun 2011 - 3:10 pm | पप्पुपेजर
धागा काढणारे गायब झालेले दिसत आहेत
28 Jun 2011 - 7:58 am | आंसमा शख्स
गायब नाही. खुदाच्या कृपेने येथेच आहे.
24 Jun 2011 - 4:18 pm | JAGOMOHANPYARE
दोन दिवसापूर्वी ख्रिश्चन संथेच्या नावाने हे महोदय ओरडत होते.. आता आर एस एस वर आले... :)
24 Jun 2011 - 5:06 pm | नितिन थत्ते
अहो ते आर एस एस वालेच आहेत.
मुद्दाम हा धागा काढला आहे. :)
24 Jun 2011 - 6:12 pm | वपाडाव
उद्या बी.जे.एस वर येतील, या महोदयांचा काहीएक भरवसा नाहिये...
यांना आजच घडी डिटर्जंट केक भेट द्यावा ही सं.मं. विनंती....
24 Jun 2011 - 6:40 pm | विकास
मला वाटतयं ते काँग्रेस (थ) चे सभासद* असावेत! ;)
*सध्या कुठल्याही काँग्रेसमध्ये कार्यकर्ते असतात का ते माहीत नाही. ;)
27 Jun 2011 - 12:17 pm | वपाडाव
आपणांस असे म्हणावयाचे आहे का?
*सध्या कुठल्याही काँग्रेसमध्ये कार्यकर्ते का असतात, ते माहीत नाही. ;)
27 Jun 2011 - 12:37 pm | नितिन थत्ते
फक्त काँग्रेसमध्येच कार्यकर्ते* असतात.
समाजवाद्यांमध्ये फक्त नेतेच असतात.
शिवसेनेत सैनिक असतात.
संघात स्वयंसेवक असतात.
कम्युनिस्टांत कॉम्रेड असतात.
सिव्हिल सोसायटीत शहाणे असतात.
तेव्हा विकास यांना प्रश्न का पडला हे कळले नाही.
*हा बिका शेख यांच्यावर आरोप नाही.
27 Jun 2011 - 2:11 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!!! गुड वन! :ड
बाकी, मी खरोखरीचाच समतोल असल्यामुळे घाबरू नका! ;)
27 Jun 2011 - 2:46 pm | विकास
मस्त!
यावरून एक जुने (आणि येथे कदाचीत आधी सांगितलेले) आठवले. ते पण एका कॉग्रेसच्याच व्यक्तीने केले होते (मला वाटते बाळासाहेब भारदे):
भारतीय राजकारण म्हणजे, काँग्रेसवाल्यांच्या खुर्चा, जनसंघाच्या पुजा अर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा आणि कम्युनिस्टांचा मोर्चा!
27 Jun 2011 - 3:57 pm | अजातशत्रु
ब्रिगेड मध्ये ब्रिगेडी असतात. ;)
24 Jun 2011 - 7:15 pm | अजातशत्रु
तेव्हा नुकतेच वर्ग ३ री पास होऊन ४ थ्या वर्गात गेलो होतो उन्हाळ्याचे सुट्टिचे दिवस हक्काचे खेळण्या- बागडण्याचे अशातच आमच्या ग्रुप मधिल एकाला त्याच्या वर्ग मित्रा करवी शाखेत येण्याचे निमंत्रण आले सर्वांनी (ग्रुप) प्रवेश घेण्याचे ठरवीले,
सुरुवातीला त्या मित्रा कडून शाखेत 'खेळ' शिकवतात एवढीच माहिती मिळाली होती
अन ती पुरेशी होती आम्हिहि उत्साहाने आप आपल्या घरी परवानगी मागायला गेलो,
अन तिथेच हिरमोड झाला
आमचे परम पुज्य पिताश्री जाम कावले, कारण तेव्हा संघानेच कट रचून गांधी हत्या केली असा आरोप होता अन त्यामुळे त्यावर बंदि सुध्दा आली होती
तिथे जाउन तू सुध्दा तेच करणार आहेस काय?
(नथुराम गोडसे हा सुध्दा स्वयंसेवक होता,तिथल्या सभासदांना स्वयंसेवक म्हटले जाते,)
त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर तेव्हा माझ्याकडे न्हवते आणी असते तरी मला ते देता आले नसते,
बाबांचा धाकच तसा होता, मि हिरमुसलो त्यांच्या समोर रडूहि शकत न्हवतो,
मि आई जवळ जाऊन रडू लागलो, आमचे मित्र दुसर्याच दिवसा पासून नियमीत जाऊ लागले,
मलाहि जायची खुप ईच्छा होती
मित्रांनी माझी अडचण शाखेतील शिक्षकांना सांगितली श्री.महेंद्र फाळके हे त्यावेळी त्या शाखेवर प्रमुख म्हणून होते,ते आमच्या घरी आले अन माझ्या बाबांबरोबर बोलले,
त्यानी त्यांची संघाची भुमिका वडीलांसमोर मांडली,पण वडिल कन्विन्स झाले नाहित,
शेवटी आईने मध्यस्थी केली अन माझा मुलगा फक्त खेळ , व्यायाम या गोष्टि करेल या उपर संघाचे कोणतेहि संघकार्य करणार नाहि या अटिवर मला परवानगी देण्यात आली,
झाले मग दुसर्या दिवसा पासून आम्हि दररोज शाखेत जाऊ लागलो,
आमची दुपारची शाळा सायं.५:०० ला सुटायची मग सायं.०६:०० वाजता शाखेत जायचो,
सायं.०६:०० ते ० ७:०० हि अधिकृत वेळ असली तरी वर प्रतिसादात सांगीतल्या प्रमाणे या एक तासाच्या शाखेत व्यायाम, सुर्यनमस्कार, सांघिक खेळ व्हायचे. नंतर एक शिवाजीची किंवा पृथ्वीराज चौहान, झाशीची राणी इत्यादींच्या कथा व्हायच्या कधी कधी कविता,गाणी,भेंड्या हे सगळे ०९:०० ते १०:०० वाजे पर्यन्त चालू असायचे,शाखा बंद होउच नये असे वाटायचे.
हळू हळू शाखेत रुळत गेलो.
शाखा ज्या मैदानावर भरायची ते रस्त्या लगत असल्यामुळे येणारे जाणारे कौतुक अन कुतुहलाने आमच्याकडे पाहत असत हे संघात असलेल्या शिस्तीमुळे,
जसे लोक कौतुक करायचे तसे काहि चिडवायचे देखील संघ दक्ष अन पोरिंवर लक्ष
यामुळे खुप राग यायचा यामुळे आम्हि काहि लोकांशी मारा मार्याहि केल्या आहेत,
सुरुवातीला आम्हि घरच्या कपड्यांवरच जायचो मग आम्हाला गणवेश खाकी चड्डि = रु .२५/-,
शाळेचा पाढरा शर्ट होताच, चामड्याचा कमर पट्टा रु=१५/- आणी काळी टोपी रु.०५/- ,
दंड रु.०८/- ( दंड = जी बांबूची भरीव काठि असते तीला म्हणतात)
हे सर्व आम्हि आमच्या खाउसाठीच्या पैशातून घेतले होते पैकी हा दंड आजही माझ्या कडे आहे,
इकडे अधुन मधुन बाबांचा विरोध चालूच असायचा,
त्यामुळे साहित्य मित्राच्या घरि ठेवून,घरी खेळायला जातो असे सांगून मी पसार व्हायचा,
यात आईची साथ होतीच.
ते दिवसच वेगळे होते,जात म्हणजे काय हे ही कळत न्हवते तेव्हा,
संघात जात-पात पाळली जात नाहि हे इथे प्रामाणीकपणे कबूल करावे लागेल,
आमच्यात जसे ब्राह्मण होते तसे दलित बांधवहि होते एकुणच अठरापगड जाती
आणी त्यातहि आमच्याच ग्रुप मधले गुजराथी अन भय्येहि होते
म्हणजे मराठी-अमराठी असा प्रांतवाद/भाषावाद न्हवता.
शाखेतली येऊरच्या जंगलातली बरीचशी शिबिरे आजहि आठवतात,
तिथे आम्हि टेन्ट बांधून राहत असू,
शिबिरातहि जे शाखेत होते तेच शिकवले जात असे, सकाळी ०५ वाजता उठावे लागत असे
त्यात मानवीमनोरे , दंड चालवणे, संचालन अशा गोष्टी होत्या,
शिबिरात एक दिवस अचानक २०-२५ च्या जमावाने हल्ला केला, कुठे कुठे आग लावली
आम्हि सगळेच अचानक झालेल्या या हल्ल्याने बिथरलो होतो,काहि जण घाबरुन रडू लागले
तेव्हा आम्हि ७ वित होतो,
४-५ हजार लोक असतील त्या शिबिरात आमचे शिक्षक लोक दंड घेऊन त्यांचाशी दोन हात करत होते,
मी आणी माझा एक मित्र कुठून पळता येतेय का, हे पाहू लागलो
पण थोड्याच वेळात अनाउन्स करण्यात आले की हे सर्व प्रिप्लान आहे,
हा सरावासाठीचा एक भाग आहे,म्हणजे हे प्रात्यक्षिक होते,
अचानक जर हल्ला झाला तर त्यास कसे सामोरे जायचे यासाठि होते ते...
(हि ०६ डिसेंबर अगोदरची ट्रायल होती का ? असेहि वाटते)
असे कळल्यावर जे जे घाबरले होते रडले होते त्यांना मग जाम पिडले आम्ही
हहपुवा झाली त्यादिवशी..
महेंद्रशिक्षक आणी त्यांचे मोठे भाऊ रविंद्रशिक्षक याना आम्हि अनुक्रमे छोटेशिक्षक,मोठेशिक्षक असे म्हणत असू, महेंद्रशिक्षक सर्वांचा लाड करायचे आस्थेने अभ्यासा विषयी चौकशी करायचे,तर रविंद्रशिक्षक हे फार कडक होते ते फारसे बोलत नसत,
काहि दिवसांनी महेंद्र शिक्षकांनी मला आमच्या गटाचे गट प्रमुखहि केले होते
असे आम्हि शाखेत घडत होतो..
असेच एक दिवस महेंद्र शिक्षकांनी आपल्या स्वयंसेवकांना अयोध्येला मंदिर बांधायचे आहे
असे सांगीतले पण हे मंदिर मस्जिद पाडून बांधण्यात येणार आहे हे सांगायचे टाळले,
आम्हि सुध्दा जाण्याचा मानस व्यक्त केला पण तिथे फक्त निवडक स्वयंसेवकांना जायची अनुमती मिळालीए असे सांगीतले.नक्कि काय चाललेय इतका विचार करण्याचे ते वय न्हवते,
फक्त आपल्या रामाचे मंदिर बांधायचे एवढेच काय ते समजत होते,
आम्हाला फक्त त्यांची मदत म्हणून त्यांच्यासाठी शिधा उपलब्ध करुन द्यावा त्यात कोरडा शिधा तांदुळ वगैरे आणी भाकरी-चटणी जमल्यास पैसेहि द्यावे असे आदेश देण्यात आले होते,
पैकी मि स्वतः १ कि.तांदूळ आणी रु.२० त्यावेळी दिले आहेत, अर्थात हे घरी माहित न्हवते,
आणी तो दिवस म्हणजे ०६ डिसेंबर १९९२ उजाडला तो मस्जिदचा ढाचा पाडूनच,
त्यानंतर उसळलेल्या दंगलीत किती निरपराध जीव गेले किती नुकसान झाले हे आता पुन्हा उजळणी करायला नको,
ग्रुप मधला कुणिच यावर बोलायला तयार न्हवता आम्हाला अप्रत्यक्षरित्या नजर कैदेत घरिच बसावे लागत होते,
मला तर बाबांसमोर जायची त्यांच्याशी नजर मिळवायलाहि लाज वाटू लागली होती
पण ते यावर जास्त काहि बोलले नाहि फक्त मोठ्यांचं ऐकावं इतकच म्हणाले,
त्यानंतर मैदानावर मुलांची संख्याहि रोडावली तसे महेंद्रशिक्षकहि यायचे बंद झाले,
त्या दिवसा पासून आमची शाखा जी बंद झाली ती आजतागायत बंदच,
या प्रकरणाची चौकशी केलेल्या लिबरहान आयोगाने स्पष्ट म्हणले आहे की यात आरएसएसचा 'हात' होता,
म्हणायचे काय आम्हि स्वतः त्या पापात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभागी झालो होतो.
हा मनातला 'सल' अन संघाविषयी निर्माण झालेली मनातली कटूता कधिच पुसली जाणार नाहि कधिच नाहि,
आजहि महेंद्रशिक्षक रस्त्यात भेटले तर त्यांना मी शिक्षक म्हणूनच हाक मारतो,
आता ते हि शाखा सोडून संसाराला लागले आहेत,
शाखेत एक धिरज नावाचे शिक्षक हि कविता फार छान म्हणायचे, जी मलाही फार आवडते
मातृभुमी गान से गूंजता रहे गगन,
स्नेहनील से सदा फुलते रहे चमन !!
अवांतरः
या ओळींशी सहमत आहे
अती अवांतरः वरिल प्रतिसादात व्यक्त केलेले मुद्दे / काहि माहिती कुणाला ओळखीची असल्यास कृपया व्यनी द्वारे संपर्क साधावा एखादा जुना मित्र भेटू शकतो,
असो
प्रतिसाद बराच मोठा झाला आहे नेहमी प्रमाणेच पण हे सगळे बारिक तपशील आणी मुद्दे द्यावे लागले यासाठी की नाहितर इथे आमचे चाहते हित-चिंतक आहेतच आम्हाला द्वेष्टे समजून थयथयाट करायला.
जाता जाता : मिपा वरिल नेहमी तेलात डोळे घालून असणार्या सन्माननीय 'पहारेकर्यांना' नम्र विनंती माझा हा प्रतिसाद स्कॅनर खाली घालून एकदा पहावा म्हणजे मी कुठून काय उचलले आहे ते शोधून निदान काहि वेळ तरी हसता येईल.
हि प्रार्थना शेवटि व्हायची,
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम्
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते....
।। भारत माता की जय ।।
24 Jun 2011 - 10:58 pm | नर्मदेतला गोटा
टाईमपासकरता आर एस एस कशाला पाजे
राखी मल्लिका असे अनेक टोपिक हायती की
27 Jun 2011 - 11:49 am | आंसमा शख्स
सर्व माहितीबद्दल धन्यवाद. उत्तम माहिती दिलीत. भारतावर प्रेम करणारी कोणतीही संस्था माझ्या आदरास पात्र असेल यात संशय नाही. संस्थांमध्ये खूप प्रकारचे लोक असतात. प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो. म्हणून ती संस्थाच तशी असते असे नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे.
दिग्गीराजा हे समतोल व्यक्ती आहेत हे मुस्लीम समाजात मान्य आहे. त्यावर इतका गदारोळ का हे समजले नाही.
वर माझ्यावरही अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांचे खंडन कसे करावे हे मला समजत नाही. सर्व प्रश्नांना उत्तरे देणेही मला शक्य झाले नाही, या बद्दल क्षमस्व. मात्र मी प्रयत्न करेन.
लव्ह जिहाद विषयी लिहिण्याचे मनात आहे. खुदाच्या कृपेने ते लवकरच होईल अशी आशा आहे.
27 Jun 2011 - 1:58 pm | शाहिर
आपण माझ्या प्रश्नाची उत्तरे देने टाळले आहे ...
तुम्हाला एका जाला वरील किन्वा कोनत्याही चर्चे मधे पाळायचे साधे नियम माहीत नाहि असे दिसते ..
आपण चर्चा सुरु केलि तर त्या मधे लोकानी सह्भागी होउन दिलेल्या प्रतिसदाना उत्तर द्यावे .. एवढी सधी अक्कल तुम्हला नाही ..
आणि
दिग्गीराजा हे समतोल व्यक्ती आहेत हे मुस्लीम समाजात मान्य आहे
एखादी व्यक्ती सम्तोल आहे कि नाहि हे विचारा वरुन ठरते ..एका विशिष्ठ समाजा च्या मान्यतेने नाही ..(हिन्दु असो वा मुस्लिम)
27 Jun 2011 - 3:52 pm | अजातशत्रु
लव्ह जिहाद विषयी लिहिण्याआधी त्याबद्दल तुमचे मत काय आहे ते कृपया त्या लेखात स्पष्ट करावे,
पु.ले.शु.
27 Jun 2011 - 12:03 pm | नितिन थत्ते
अजातशत्रू यांचे वय ठाऊक नाही परंतु त्यांचा मोठ्ठा प्रतिसाद टाईम-वार्प (Time Warp) मध्ये घडला असल्याने तो मनावर घेऊ नये.
27 Jun 2011 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार
थत्ते चाचा कुठल्या वया विषयी बोलत आहेत ते कळाले नाही.
पुतण्या
परा
27 Jun 2011 - 4:06 pm | अजातशत्रु
गयी म्हैस पानी मै ! :)
बाकि तुम्हि मनावर घेउन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..!!
27 Jun 2011 - 6:35 pm | महेश_कुलकर्णी
+१
27 Jun 2011 - 8:56 pm | इरसाल
+ १ कशासाठी ?
कदाचित धागा कर्त्याला ए टी के टी बसू नये ह्या साठी ग्रेस देवून पुढे ढकलायचा प्रयत्न म्हणावा ?
27 Jun 2011 - 10:19 pm | नर्मदेतला गोटा
अजातशत्रु
४८ साली गांधीहत्या झाली तेव्हापासून
अयोध्या ९२ पर्यंत तूमी बाल होता
आणि बापाची परवानगी घेत व्हता का ओ
--
थत्तेकाका,
हे आहेत आपटे काका
27 Jun 2011 - 10:59 pm | चिरोटा
हेच म्हणतो. अजातशत्रू चिरबाल असावेत!
27 Jun 2011 - 11:21 pm | शिल्पा ब
ते त्यांचे धागे अन प्रतिसाद बघुन दिसतंच आहे.
28 Jun 2011 - 3:20 pm | अजातशत्रु
अयोध्या ९२ ला आम्ही वडिलांची परवानगी घेण्या इतपत तरी बाल होतोच.
त्या प्रतिसादात मी वाक्यरचना निट न केल्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला आहे ती माझी चुक मी मान्य करतो क्षमा असावी ते सुधारुन पुन्हा लिहीत आहे.
पुर्व प्रकाशीत -
आमचे परम पुज्य पिताश्री जाम कावले, कारण तेव्हा संघानेच कट रचून गांधी हत्या केली असा आरोप होता अन त्यामुळे त्यावर बंदि सुध्दा आली होती
तिथे जाउन तू सुध्दा तेच करणार आहेस काय?
(नथुराम गोडसे हा सुध्दा स्वयंसेवक होता,तिथल्या सभासदांना स्वयंसेवक म्हटले जाते,)
त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर तेव्हा माझ्याकडे न्हवते आणी असते तरी मला ते देता आले नसते,
सुधारीत -
आमचे परम पुज्य पिताश्री जाम कावले, कारण पुर्वी संघानेच कट रचून गांधी हत्या केली असा आरोप होता अन त्यामुळे त्यावर त्यावेळी बंदि सुध्दा आली होती
अशा संघटनेत जाऊन पुढे तू सुध्दा तेच करणार आहेस काय?
म्हणजे पुढील काळात संघ देशातील इतर नेत्यांचे विचार पटले नाहीत तर असेच कट रचून खून पाडेल,
असे बाबांना वाटत होते यामुळेच त्यांनी परवानगी नाकारली होती,
(नथुराम गोडसे हा सुध्दा स्वयंसेवक होता,तिथल्या सभासदांना स्वयंसेवक म्हटले जाते,)
त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर तेव्हा माझ्याकडे न्हवते आणी असते तरी मला ते देता आले नसते,
नर्मदेतला गोटा/ आणि इतर आता बघा बरे, आता बरोबर आहे न.?
यामुळे गांधी हत्येचा अन् माझा काही संबंध नाही,
अवांतरः
नर्मदेतला गोटा
तुम्हाला तुमच्या 'बापाची' अशी कधी परवानगी घ्यावी लागली
व्हती का, ओ ?
28 Jun 2011 - 12:07 am | सुधीर काळे
माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक प्रखर देशभक्त व भ्रष्टाकारमुक्त संघटना आहे. कांहींशी जुनाट (आणि खूपशी बोजड) भाषा वापरल्यामुळे संघाला सवंग लोकप्रियता कधीच लाभली नाहीं. जिथे-जिथे नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तिथे-तिथे धोतराचा दुहेरी काच्या (ज्याला कानडीत 'गंडगच्ची=पुरुषी काच्या' म्हणतात) मारून ही मंडळी समाजसेवेला लागतात. मोरवी धरण फुटल्यावर, आंध्रप्रदेशात वादळी पुराने हाहाकार माजविल्यावर सरकारी यंत्रणा तिथे पोचायच्या आधी या संघटनेचे कार्यकर्ते तिथे पोचले होते. १९६५च्या युद्धात सैन्यामागे रसद पुरवायला व इतर non-combat operations मध्ये मदत करायलाही स्वयंसेवकांचे पथक दिवस-रात्र कार्यरत होते हे मी वाचलेले आहे. श्री रणजित चितळे याबद्दल जास्त तपशीलवार व नेमकी माहिती देऊ शकतील.
कुठल्याही सत्तास्थानाबद्दल लोभ न धरता ही संघटना कार्य करते.
माझ्या मते अशा खोडसाळ (वैयक्तिक मत) धाग्यांना "अनुल्लेखाने मारणे" हेच उत्तम! (हा माझा प्रतिसाद पहिला व शेवटचा)
28 Jun 2011 - 12:17 am | चिंतामणी
माझ्या मते अशा खोडसाळ (वैयक्तिक मत) धाग्यांना "अनुल्लेखाने मारणे" हेच उत्तम! (हा माझा प्रतिसाद पहिला व शेवटचा)
बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण एव्हढे वाईट दर्जाचे लिखाण वाचून एखादी प्रतिक्रीया येणे अपरीहार्य आहे.
28 Jun 2011 - 3:47 pm | सुनील
ह्या चर्चेवर लक्ष ठेवा. रोचक होणार आहे!
28 Jun 2011 - 12:14 am | चिंतामणी
उदा.
आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती
राष्ट्रीय नेते???????? स्वतःच्या राज्यात कॉंग्रेसचे सरकार आणु शकत नाहीत आणि हे म्हणे राष्ट्रीय नेते. ह्यांची वक्तव्ये वाचून असे दिसते की ह्यांच्या मेंदुचा तोल ढळलेला आहे तरही ह्याना समतोल व्यक्ती म्हणणे म्हणजे मोठा विनोद आहे.
युवा नेते राहुल गांधी
ह्यांनी बिहारमधे (म्हणे) मोठी आघाडी घेतली होती प्रचारात. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर तोफ डागली होती त्या प्रचारा दरम्यान. सेकंडक्लासने मुंबई पर्यन्त प्रवास करायची नाटके केली. पण बिहारी जनतेने फक्त चार आमदार निवडुन देउन त्यांना जागा दाखविली.
30 Jun 2011 - 9:32 am | आंसमा शख्स
संपादनाची सुवीधा येथे दिसत नाही.
कृपया संपादक हा धागा काढून टाकतील काय?
धन्यवाद!