सर्व मायबाप मिपाकरांना माझा दंडवत...!
राम राम मंडळी,
मिपा हे एक साप्तहिक आहे किंवा पाक्षिक आहे असे मानून 'मिपा संपादकीय...' हे एक सदर दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला सुरू करावे असे मनात आहे. आपल्याकडे सामाजिक, राजकीय भान असणारे, वाचन असणारे, उत्तम विचार असणारे बरेच जण आहेत. या मंडळींचे वृतपत्रीय/आंतरजालीय वाचनही चौरस असते असे माझ्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी 'मिपा संपादकीय' या सदरात दर सप्ताहात/पाक्षिकात एक अग्रलेख लिहावा असे वाटते. हा अग्रलेख बहुतकरून भारतातील किंवा भारताबहेरील राजकीय, सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवरच असेल. त्यातली मते अर्थातच संपूर्णपणे त्या संपादकाचीच असतील. वर म्हटल्याप्रमाणे हा अग्रलेख भारतातील अथवा भारताबाहेरील सामजिक अथव राजकीय विषयावर, ताज्या घडामोडींवर भाष्य करणारा असेल. प्रसंगानुरूप किंवा क्वचित प्रसंगी अर्थ, क्रीडा किंवा अन्य एखाद्या विशेष गाजत असलेल्या विषयावरही असेल.
मला खात्री आहे, दर सप्ताहाअंती किंवा पंधरवड्याअंती (जसे ठरेल तसे),
'या वेळी पाहुणा संपादक कोण आहे बरं? बघुया तरी त्याचा अग्रलेख वाचून!' अशी उत्सुकता तुम्हाआम्हा सर्व मिपाकरांना नक्कीच असेल अशी मला खात्री आहे. खूप मज येईल. काही चांगले वाचायला मिळेल! :)
अर्थातच, दरवेळी संपादक बदलेल. म्हणजेच दरवेळी अग्रलेख लिहिणारी व्यक्ति ही त्या आठवड्यापुरती/पंधरवड्यापुरती मिपाची 'पाहुणा संपादक' असेल! :)
अनवधानाने काही नांवे राहू शकतात परंतु,
चरुरंग, प्रियाली, चित्रा, मुक्तसुनीत, विकास, धनंजय, डॉ बिरुटे, देवकाका, विजूभाऊ, कोलबेर, नीलकांत, प्रकाश घाटपांडे, पिवळा डांबिस, इत्यादी...
या माझ्या मित्रमंडळींकडून मला खूप अपेक्षा आहेत. ताज्या सामाजिक व राजकीय विषयांवर याचं खूप चांगलं वाचन-चिंतन-मनन आहे असे माझे निरिक्षण आहे आणि म्हणूनच मी मुद्दामून या मंडळींची नांवे उद्घृत केली आहेत! यापैकी कुणालाही याबाबत व्यक्तिश: न लिहिता मी हा प्रस्ताव जाहीरपणे मांडत आहे. वरील नांवे आत्ता चटकन आठवली म्हणून मी लिहिली आहेत परंतु या मंडळींव्यतिरिक्तही जर कुणी एका सप्ताहाकरता अथवा पंधरवड्याकरता मिपाचा 'पाहुणा संपादक' होऊन छानसा अग्रलेख लिहायला तयार असेल तर त्याचेही स्वागतच आहे.
असो...
तर मंडळी, या प्रस्तावामागे मिपाकरता काहीतरी चांगलं करायचं मनात आहे, मिपा अधिकाधिक सर्वांगसुंदर बनवण्याचा विचार आहे. परंतु, हे काम अर्थातच माझ्या एकट्याचे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी व्यक्तिश: व्यक्तिचित्र, खादाडी, संगीत, टवाळक्या, माफक इष्कबाजी या विषयात रंगणारा मनुष्य आहे. माझ्या सामाजिक व राजकीय जाणिवा अग्रलेख लिहिण्याइतक्या समृद्ध नाहीत. तरीदेखील दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला एखाद्या पाहुणा संपादकाने छानसा अग्रलेख लिहून मिपा या संकेतस्थळाचे सौंदर्य वाढवावे असे मनापासून वाटते म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव!
बोला, करणार का मला या कामात मदत? स्वत:हून आळीपाळीने घेणार का अग्रलेख लिहिणार्या पाहुण्या संपादकाची जबाबदारी?
ज्या मंडळींची नांवे मी उद्घृत केली आहेत त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत हे इथे खुल्या दिलाने नमूद करतो....
आपला,
(काही एक चांगलं काम करू पाहणारा) तात्या.
--
Not failure, but low aim is a crime..! :)
प्रतिक्रिया
27 Jun 2008 - 1:31 am | बेसनलाडू
बोला, करणार का मला या कामात मदत? स्वत:हून आळीपाळीने घेणार का अग्रलेख लिहिणार्या पाहुण्या संपादकाची जबाबदारी?
वा तात्या,उपक्रम स्तुत्य आहे.या उपक्रमाला माझा सक्रीय पाठिंबा राहील.संपादकीय लिहिण्यापासून ते (झाल्यास) त्यावर साधकबाधक चर्चा करण्यापर्यंतची जबाबदारी पाहुणा लेखक म्हणून/मिपाकर म्हणून/कोणाच्या विशेष काही अपेक्षा असल्यानसल्या तरी/'पुढे पुढे' करण्यातला प्रकार वाटला तरी पेलण्याची तयारी आहे.
धन्यवाद.
(जबाबदार)बेसनलाडू
27 Jun 2008 - 1:41 am | मयुरयेलपले
उपक्रम स्तुत्य आहे... आमचाहि आपल्याला पाठिंबा आहे.
आपला मयुर
27 Jun 2008 - 2:50 am | प्रियाली
मस्त कल्पना आहे. सध्या आणि पुढचा एक आठवडा मी गैरहजर असेन. परतून आल्यावर सक्रिय सहभाग आवडेल. तोपर्यंत बाकीचे आहेतच, शुभारंभ कराच!
दिवाळी अंक बिंक इतक्यातच गरजेचा नाही. तसेही, दुसरे करतात म्हणून आपण करावे असेही नाही - हे माझे वैयक्तिक मत झाले पण ही कल्पना भारीच आहे आणि नावीन्यपूर्णही. माझ्याकडून अनेक शुभेच्छा!
27 Jun 2008 - 3:27 am | बिपिन कार्यकर्ते
चांगली कल्पना आहे. मला लिहिता येत नाही, पण 'वाचनमात्र' नक्की आहे तुमच्याबरोबर...
बिपिन.
27 Jun 2008 - 3:40 am | विकास
चांगली कल्पना (आयडीआ) आहे!
नक्की मदत करायला आवडेल...पण नुसतीच लिहीण्यापेक्षा इतरांचे वाचणे अधीक आवडेल.
27 Jun 2008 - 3:46 am | मुक्तसुनीत
चांगले लेख वाचायला नेहमीच उत्सुक आहे ! मला जमेल तसे लिहीन. थोडा वेळ हवा... प्रकल्पाबद्दल अनेक शुभेच्छा !
नंदन , अजानुकर्ण या बहुश्रुत , व्यासंगी सभासदांचा उल्लेखसुद्धा यादीत यायला हवा ! सहज हे आणखी एक नाव . सहज कमी लिहीतात; परंतु अनेक विषयांवरील त्यांची मते , त्याना असलेली माहिती या बाबी महत्त्वाच्या आहेत. ओंकार आणि सर्कीट हे लोक अलिकडे खूप कमी लिहीतात असे दिसते. परंतु त्यांच्या ज्ञानाचा आवाका लक्षात घेता त्यानी या उपक्रमात सामील होणे , शुद्ध मराठीत सांगायचे तर "मस्ट" आहे ! भडकमकर आणि भुस्कुटे यानाही मी व्यक्तिशः विनंती करणार आहे ! :-)
या उपक्रमाच्या निमित्ताने पहिल्या आणि मी दिलेल्या यादीतल्या लोकांनी (आणि इतरांनीसुद्धा !) नव्याने काहीतरी उत्तम लिहावे अशी विनंती.
27 Jun 2008 - 3:46 am | भाग्यश्री
कल्पना खूप आवडली! पाहूणा संपादक ही आयडीआ भारी!
संपादकीय वाचायला मजा येईल!!
http://bhagyashreee.blogspot.com/
27 Jun 2008 - 3:46 am | चित्रा
कल्पना छान. लिहायला नक्की आवडेल!
27 Jun 2008 - 4:26 am | धनंजय
मी रांगेत जरा पाठीमागचा नंबर लावतो. मातब्बर लोकांनी वहिवाट घालावी, आम्ही वारीत चालायला तयार.
उत्तम कल्पना. (तुमच्या यादीत आणखी कोणकोण जोडायचे हा विचार चालू आहे.)
28 Jun 2008 - 3:22 am | कोलबेर
म्हणतो... मातब्बर लोकांनी वहिवाट घालावी, आम्ही वारीत चालायला तयार.
27 Jun 2008 - 5:23 am | सुवर्णमयी
ही कल्पना फारच आवडली. माझ्या शुभेच्छा. दर वेळी काय नवीन वाचायला मिळेल याची उत्सुकता राहील यात शंका नाही.
सोनाली
27 Jun 2008 - 6:19 am | नंदन
तात्या, कल्पना खरंच खूप चांगली आहे. जी काही मदत लागेल, ती करायला मी तयार आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Jun 2008 - 6:45 am | विसोबा खेचर
बेसनलाडू, आजानुकर्ण, नंदन, सहजराव, मास्तर, भुस्कुटे यांची नावे अनवधानाने घ्यायची राहिली!
पाहुणा संपादक म्हणून ही मंडळीदेखील उत्तम अग्रलेख लिहू शकतील असा विश्वास आहे! :)
तात्या.
27 Jun 2008 - 6:46 am | सहज
खुपच चांगली कल्पना आहे [व खरे सांगायचे तर अबाउट टाईम.]
नीलकांतचे लेख वाचले होते तेव्हाच अशी अपेक्षा केली होति की त्याने दर महिन्यात एकदा तरी असे लेख लिहावेत.
बाकी वर नाव आलेल्या सर्व मंडळींचे चिंतन-मनन अत्यंत वाचनीय असणार यात शंकाच नाही.
मिपाची ही वाटचाल बघताना खरच खूप आनंद होत आहे.
27 Jun 2008 - 7:16 am | वैशाली हसमनीस
कल्पना आवडली.आवशक्यता भास ल्यास मदत करण्याची तयारी आहे.
27 Jun 2008 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय आयडिया आणली राव !!!
आम्ही तर नक्की लिहिणार ( खरं तर वाचायलाच अधिक आवडेल ) इथे अनेक मित्र मंडळी चांगले लिहितात. विचारांची आदान प्रदान करतांना पाहिलंय, त्यांचे लेखन हटके आणि विचारांना गती देतात. अनेक नावे डोळ्यासमोर आहेत त्यांचे संपादकीय वाचायला आवडेल.
मराठी संकेतस्थळावरील मिसळपाव वाचकांचे संपादकीय हे एक दमदार पाऊल आहे, मिपाच्या भरभराटीकरीता माझ्या शुभेच्छा !!!
( सध्या जरा प्रवेशाची धांदल आहे, नसता पहिला संपादकीय लेखाचा मान आम्हीच पटकावला असता. जरा निवांत झालो की आम्हाला आवडणा-या विषयावर नक्की लिहू . तो पर्यंत पहिल्या वाहिल्या लेखन करणा-या पाहुण्या संपादकास आमच्या शुभेच्छा !!! )
-प्रा.डॊ.दिलीप बिरुटे
27 Jun 2008 - 9:45 am | ध्रुव
आहे. यथयोग्य जमेल तशी मदत कराअयला आवडेल..
--
ध्रुव
27 Jun 2008 - 9:49 am | भडकमकर मास्तर
तात्या, उत्तम कल्पना आणि यूनिक ...
... एकदम आवडली...
आणि इथे माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि जाणकार मंडळी आहेत, याची जाणीव आहेच...त्यांचे वाचायला आवडेल
( पण सगळ्यांचे झाले की कधीतरी लिहायलाही आवडेल) :)
_______________________________
अग्रलेख भारतातील अथवा भारताबाहेरील सामजिक अथव राजकीय विषयावर, ताज्या घडामोडींवर भाष्य करणारा असेल. प्रसंगानुरूप किंवा क्वचित प्रसंगी अर्थ, क्रीडा किंवा अन्य एखाद्या विशेष गाजत असलेल्या विषयावरही असेल.
एक शंका... या सदराचे प्रयोजन... मि.पा.चा त्या त्या आठवड्याचा अतिथी संपादक होणे हा सन्मान आहेच, :) परंतु आत्ता लिहिता येत नाही असं कोणतं वेगळं लेखन संपादक तिथे करणार?? या प्रकारचे लेख ज्याला पाहिजे तो आत्ताही लिहू शकतोच की ...
की त्याचा पेज ले आउट नियतकालिकासारखा असणार आहे? म्हणजे संपादकाला सुद्धा जरा लै भारी फील येईल.
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
27 Jun 2008 - 9:58 am | मेघना भुस्कुटे
आणि इथे माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि जाणकार मंडळी आहेत, याची जाणीव आहेच...त्यांचे वाचायला आवडेल
( पण सगळ्यांचे झाले की कधीतरी लिहायलाही आवडेल)
:)
असेच म्हणते!
27 Jun 2008 - 10:13 am | धमाल मुलगा
वाढत्या वयाबरोबर आपलं मिपा अधिक समृध्द होतं आहे ह्याची ही केवळ नांदी आहे.
उपनिर्देशित लेखकांच्या मांदियाळीने नि:संशय हा उपक्रम दर्जेदार होईल.
ॐकार आणि सर्किट ह्यांचेही लेख वाचायला आवडतील.
भडकमकर मास्तरांनीदेखील पाहुण्या संपादकांमध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना विनंती आहे.
आम्ही ह्या पाक्षिक/साप्ताहिकाची नक्की वाट पाहू, पाहत राहू.
27 Jun 2008 - 1:10 pm | मनस्वी
हेच म्हणतो आम्ही!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
27 Jun 2008 - 10:11 pm | आनंदयात्री
म्हणतो, सुंदर उपक्रम.
टुगेदर वी क्यान मेक अ डिफ्रन्स !
(हौशी संपादक) अग्रलेखयात्री ..
27 Jun 2008 - 11:40 am | काळा_पहाड
तात्या, उत्तम कल्पना आणि यूनिक ...
... एकदम आवडली...
आणि इथे माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि जाणकार मंडळी आहेत, याची जाणीव आहेच...त्यांचे वाचायला आवडेल
( पण सगळ्यांचे झाले की कधीतरी लिहायलाही आवडेल)
असेच म्हणतो.
काळा पहाड
27 Jun 2008 - 11:46 am | धमाल नावाचा बैल
तात्या लै भारी कल्पना! आम्ही साक्शात बैल असल्यान फक्त वाचकाच्याच भुमिकेतच राहू.
वाट पहात आहे.....
आपला,
बैलोबा
27 Jun 2008 - 12:13 pm | केशवसुमार
तात्याशेठ,
एकदम स्तुत्य उपक्रम..आता आम्हाला गद्यातल लिखाण जमत नाही म्हणून सक्रिय नाही पण नुसताच पाठींबा देतो...
तुम्ही लोक लिव्हा आम्ही वाचतो..
सर्व संपादकांना शुभेच्छा!!
(शुभेच्छुक मिपाकर) केशवसुमार
27 Jun 2008 - 12:47 pm | अन्जलि
वाचाय्ला नक्किच आवडेल. लिहिता येत नाहि नाहितर बरेच काहि लिहिता आले अस्ते. जसे कालच्या अक्कलदाधे विशयि तुम्हा सर्वाच्या हे लक्शात आले आहे का कि दोन सम व्यव्सायिक एक्मेकाना मोथेपना देवुन माहिति देत होते. हे मला वाट्ते फक्त मिपाव र च होत असेल म्हनुन रोज मिपा वर चक्कर मार् ल्या शिवाय मजा येत नाहि.
27 Jun 2008 - 3:02 pm | अरुण मनोहर
तात्यांना संपादकीय हा उपक्रम चालू केल्यासाठी अभिनंदन. माझाही खारीचा वाटा उचलायला आवडेल. पण त्या आधी खूप प्रतिभावान मिपाकर तयार आहेत, तेव्हा सध्या वाचनाचा आनंद घेणार.
27 Jun 2008 - 4:59 pm | साती
तात्या , कल्पना आवडली.
साती
27 Jun 2008 - 6:15 pm | शितल
तात्या
मस्त कल्पना आहे
अजुन छान वाचायला मेजवाणी मिळनार.
27 Jun 2008 - 6:41 pm | वरदा
खूप सुंदर उपक्रम्....अभ्यासपूर्ण लेख वाचायला खरच खूप मजा येते....माझ्या खूप खूप शुभेच्छा!
27 Jun 2008 - 7:26 pm | चतुरंग
पण उत्तर देऊ शकलो नव्हतो.
छान प्रस्ताव आहे. मिपा प्रगल्भ होत असल्याची ही खूण आहे.
आमचे नाव प्रस्तावित पाहुण्या संपादकांमधे टाकून आपण जबाबदारी वाढविली आहे (आमची आणि आपलीसुद्धा! ;) )
काही सूचना -
आता चांगल्या विषयाचा शोध घेणे आणि लिहिणे क्रमप्राप्तच.
(स्वगत - पाहुण्या संपादकाने त्या पदावर असताना विडंबन केले तर चालते का? :? )
चतुरंग
29 Jun 2008 - 4:42 am | पिवळा डांबिस
छान प्रस्ताव आहे. मिपा प्रगल्भ होत असल्याची ही खूण आहे.
आमी शेहमत हावोत!!
आमचे नाव प्रस्तावित पाहुण्या संपादकांमधे टाकून आपण जबाबदारी वाढविली आहे (आमची आणि आपलीसुद्धा! )
नायतर काय! आरं बाबा चतुरंगा, आता तुझी बुदबळं आणि आमचे टुकार इनोद हिथं न्हाई चालायचे रे बाबा! हिथं म्हंजी कसं ताज्या फडफडीत इशयावर विदवत्त्तापरचूर लिवायला लागंल आशी दटावनी मिळालीय!! तुजं ठीक हाय, काढशिला पोतडीतून काहीतरी पटदिशी!! पन आमी आडान्यांनी काय करांवं रं बाबा!!! बधू, आई आंबाबाईच्या मनात काय आसंल तसं हुयील!!!
कडाडले स्वामी विसोबा खेचर,
आलिया भोगासी असावे सादर||:))
तरी येक बरं हाय, मालकांच्या यादीत बग आमचा लंबर शेवटचा हाय.:)
तवा तुमी मंडळी कसंकसं काय लिवता ते बघून आपन आपलं....खी, खी, खी!!!!!:))
(स्वगत - पाहुण्या संपादकाने त्या पदावर असताना विडंबन केले तर चालते का? )
कारं बाबा, इक्तीपन कळ काडवना होय रं तुला!!
जरा जपून, मालक तडाकलं तर गाडीवर टिंब देउन फटका हाणतील हां!!:))
तुजा,
पिवळा डांबिस
(वि.सू. = आम्ही तुर्तास आमच्या डांबिस व खट्याळ मोड मध्ये पूर्णपणे गेलेलो आहोत. त्यातून बाहेर कधी पडू ते सांगता येत नाही. तरी पुढील सूचना मिळेपर्यंत सर्वांनी आमचे सर्व लिखाण हलकेच घ्यावे ही नम्र विनंती!)
27 Jun 2008 - 7:34 pm | सुचेल तसं
तात्या,
आपल्या या नविन उपक्रमाला माझ्याकडुन शुभेच्छा!!!
-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com
27 Jun 2008 - 7:43 pm | प्रगती
आम्हाला पण नवीन नवीन माहीती कळेल धन्यवाद!
आमच्याकडून या उपक्रमाला शुभेच्छा !
"मिसळ पाव" हे संकेतस्थळ उत्तरोत्तर अशीच प्रगती करीत राहो !
27 Jun 2008 - 8:05 pm | अविनाश ओगले
मनापासून शुभेच्छा...
28 Jun 2008 - 8:38 am | संजीव नाईक
श्रुतीश्री तात्या यास....
आपण सुर तज्ञ ! पण सुरा बद्दल का लिहत नाही? सुरुवात श्रुती पासुन झाली पाहिजे. अशी मना पासुन इच्छा.
( मिपा संपादकीय...व....मिपाप्रेमी ) तील श्रुती
संजीव
28 Jun 2008 - 2:25 pm | भोचक
कल्पना आवडली. शुभेच्छा
28 Jun 2008 - 2:32 pm | देवदत्त
छान प्रस्ताव.
आमच्या शुभेच्छा. :)
28 Jun 2008 - 4:53 pm | झकासराव
खुपच छान कल्पना आहे ही.
आम्ही काय वाचक असल्याने मिळेल ती मेजवानी झोडायला तयारच :)
(रथी महारथी लोकांचे संपादकीय वाचण्यास उत्सुक) झकास
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
29 Jun 2008 - 2:26 am | फटू
आजवर मस्त टीपी करुन हसत खेळत ठेवणारे मिपाकर चक्क संपादकीय लिहिणार... एकदम थरारक अनुभव असेल तो... उपक्रम सुरु होण्याची वाट पाहतोय...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
29 Jun 2008 - 8:13 am | धोंडोपंत
उत्तम कल्पना. हार्दिक शुभेच्छा.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
29 Jun 2008 - 8:37 am | विसोबा खेचर
आमची कल्पना उचलून धरल्याबद्दल सर्व मंडळींना धन्यवाद...आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच मिपा इथपर्यंत आले आणि आपल्याच सहकार्याने ते पुढचीही वाटचाल करेल असा विश्वास आहे... :)
आज रविवार आहे. आजपासून बरोब्बर आठवड्यापर्यंतचा, म्हणजे पुढल्या रविवारपर्यंतचा कालावधी गृहीत धरून, त्या कालावधीतील भारतातील, भारताबाहेरील, सामाजिक, राजकीय घडामोडींवर मननचिंतनात्मक भाष्य करणारा मिपाचा पहिलावहिला संपादकीय अग्रलेख कोण लिहीणार आहे? बोला...!
पहिलाच अग्रलेख असल्यामुळे सामाजिक,राजकीय, सांस्कृतीक, क्रीडा आदी घडामोडींवर भाष्य न करता शुभारंभाचा अग्रलेख लिहिला तरी चालेल. अर्थात, हा केवळ पहिलाच अग्रलेख असणार आहे म्हणून! पण काय लिहायचं, कोणत्या विषयावर लिहायचं, कोणत्या विषयाचा परामर्श घ्यायचा, इत्यादी सर्व आम्ही पाहुण्या संपादकावरच सोपवतो..
बोला, कोण घेतंय पुढाकार? कुणीतरी पुढाकार घ्या आणि शुभारंभाचा अग्रलेख लिहा अशी विनंती!
काही मंडळींनी (उदा मास्तरांनी) वेगळ्या 'संपादकीय'चे प्रयोजन काय असे विचारले आहे. विशेष प्रयोजन एवढेच की एखाद्याचा नुसता एखादा लेख छापून येणे आणि पाहुणा संपादक म्हणून अग्रलेख छापून येणे यात जरा फरक आहे. अग्रलेखाला एक वेगळं महत्व आहे, एक वेगळं परिमाण आहे. नुसत्या एखाद्या लेखापेक्षा 'अग्रलेख' या सदराखाली तो लेख आल्यास त्याला नक्कीच एक वेगळं वजन असेल आणि तो अधिक उत्सुकतेने, अधिक चोखंदळपणे वाचला जाईल असे वाटते.
काही काळापूर्वी सुविचारांची कल्पना राबवून पाहिली पण ती विशेष चालली नाही. लोक सुविचार पाठवायला कंटाळा करू लागले किंवा अगदीच घिसेपिटे सुविचार पाठवू लागले. पण त्यामुळेच पुढे चांगल्या लेखकांची, कवींची, मिपातील संग्रहातील काही वाक्ये मुखपृष्ठावर टाकायची कल्पना मला सुचली आणि ती आज अनेकांना आवडते आहे! आजची खादाडी या सदरात मिपाकरांनी पाठवलेले मेनू, किंवा आंतरजालावर मिळणार्या मेनूंची प्रकाशचित्रे टाकण्याची कल्पनादेखील बर्याच जणांना आवडली.आवडते आहे. तसेच हीदेखील एक पाहुण्या संपादकाच्या अग्रलेखाची कल्पना आहे आणि ती राबवून पाहीन म्हणतो! चालली तर ठीक, नायतर बंद करून टाकू! काय सांगावं, त्यातूनच दुसरी एखादी चांगली कल्पना जन्म घेईल!
मास्तर, शेवटी हे सगळे प्रयोग आहेत. ते ट्राय ऍन्ड एरर बेसिसवर सतत करून पाहिले पाहिजेत. अपयशाला तिच्यायला आपण कधीच घाबरलो नाय! :)
काय? पटतंय का माझं म्हणणं? :)
कुणीतरी अग्रलेखाच्या पानाला काही विशेष ले-आऊट असणार का असे विचारले आहे. निश्चितच चांगली कल्पना आहे. पण त्याचे उत्तर मी आत्ताच देऊ शकत नाही. नीलकांतशी बोललं पाहिजे!
असो, पुन्हा तोच प्रश्न! बोला, कोण घेतंय पुढाकार? :)
तात्या.
--
Not failure, but the low aim is a crime!
29 Jun 2008 - 11:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अग्रलेख लिहायचं काम अवघडच आहे, पण काहीतरी लिहिण्याचे प्रयत्न चालु आहेत. सायंकाळपर्यंत आपल्याला टपालाने पाठवतो. च्यायला एक वेळेस प्रतिसादात बाता मारणं सोप्पं काम आहे, पण कोणताच पुर्वाअनुभव नसतांना डायरेक्ट लिहायचे म्हणजे हातापायाला गोळेच येत आहेत. आम्हाला वाटले आणि पटले तर पाठवू .नाय तर 'न' पाठवण्याचा हक्क अबाधित आहे. :)
पण तात्या, खरं सांगू....! काम जरा अवघड वाटत असले तरीही, प्रयत्न केले तर आत्मविश्वास वाढेल आणि दर्जेदार लेखन होऊ शकेल असेही वाटते. :)
तसेच हीदेखील एक पाहुण्या संपादकाच्या अग्रलेखाची कल्पना आहे आणि ती राबवून पाहीन म्हणतो! चालली तर ठीक, नायतर बंद करून टाकू! काय सांगावं, त्यातूनच दुसरी एखादी चांगली कल्पना जन्म घेईल!
हे बाकी खरं आहे. म्हणुनच प्रयत्न करुन पाहतोय !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
29 Jun 2008 - 4:54 pm | हर्षद बर्वे
तात्या आतिशय छान कल्पना आहे.....माझा तुम्हाला पाठींबा आहे.
वाचन तर करीनच...अग्रलेख वगैरे लिहिन की नाही ते सांगू नाही शकत पण त्यावरील मते मांडण्याचा प्रयत्न अवश्य करेन....
हर्षद बर्वे(एच.बी.)
29 Jun 2008 - 6:44 pm | ऋषिकेश
वा!! अतिशय स्तुत्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना.. या निमित्ताने होणारे लेखन वाचायला अतिशय उत्सुक आहे.
तात्या, अश्या नाविन्यपूर्ण कल्पनेबद्दल अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
2 Jul 2008 - 6:08 am | केशवराव
तात्या,
उपक्रम स्तुत्य आहेच. अभिनंदन!