मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
26 May 2011 - 3:36 pm

हा भाग खरे म्हणजे कलादालनातच टाकायचा कारण फारसे काही लिहिणार नाही आहे. परंतु केवळ एका लेखमालिकेचा भाग म्हणुन इथेच देत आहे.

काश्मीरचे आणि ट्युलिपचे जवळचे नाते आहे. भारतात एरवी ट्युलिप बघायला मिळत नाहीत आणि ट्युलिप बघण्यासाठी हॉलंडला जायची ऐपत प्रत्येकाकडे असतेच असे नाही त्यामुळे काश्मीरच्या ट्युलिप गार्डनचे फार आकर्षण होते. दुर्दैवाने आम्ही श्रीनगरला पोचण्याच्या केवळ १ दिवस आधी श्रीनगरचे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.

ज्या ट्युलिपवर एकेकाळी हॉलंडची आख्खी अर्थव्यवस्था उभी होती आणि ज्याच्यामुळे एकवेळ अर्थव्यवस्थेला अभूतपुर्व चालना मिळाली आणि नंतर त्याच ट्युलिपमुळे अर्थव्यवस्था मंदीला सामोरी गेली त्या ट्युलिप बद्दल आकर्षण तर होतेच. केवळ हॉलंड मध्येच नाहीतर संपुर्ण युरोपात एकेकाळी या ट्युलिपने धमाल उडवुन दिली होती. आजकाल जशी रोख्यांची खरेदी विक्री होते तशी एकेकाळी युरोपात ट्युलिपच्या फ्युचर्सची खरेदी विक्री व्हायची. ट्युलिप्स हिरे माणकांपेक्षा महाग झाले होते. ट्युलिपचा कंद चोरुन खाल्ला म्हणुन एका खलाश्याला चक्क कारावासही पत्करावा लागला होता. एक कंद त्याच्या आख्ख्या जहाजावरच्या सर्व खलाशीवर्गाच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा महागडा होता म्हणे. एवढे अमाप ऐश्वर्य नूरजहाच्या गुलाबाच्या बागेतल्या गुलाबाने देखील कधी बघितले नसेल. हा एवढी वैभवशाली इतिहास असणारा ट्युलिप बघायला मिळणार नाही म्हणुन आम्ही खट्टु झालो होतो. पण सुदैवाने पहलगामच्या पोशवान पार्क मध्ये थोडेफार ट्युलिप बघायला मिळाले आणि दुधाची तहान आम्ही ताकावर भागवली. :)

हे पोशवान पार्कचे असेच काही फोटो:

छायाचित्रणविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद्_पुणे's picture

26 May 2011 - 5:14 pm | प्रमोद्_पुणे

..

अमोल खरे's picture

26 May 2011 - 5:20 pm | अमोल खरे

सुरेख फोटो. काश्मिरला जायची हिंमत नाही पण तिकडच्या सौंदर्याबद्दल ऐकुन होतो. ... ते सौंदर्य आपल्या ह्या सिरिज मधुन वाचायला आणि पाहायला मिळाले.

गवि's picture

26 May 2011 - 5:26 pm | गवि

फार अफलातून अनुभव घेतलास.

मस्त..

प्रचेतस's picture

26 May 2011 - 5:35 pm | प्रचेतस

अप्रतिम फोटो रे मित्रा.

विलासराव's picture

26 May 2011 - 10:22 pm | विलासराव

फोटोज.

पैसा's picture

26 May 2011 - 11:39 pm | पैसा

फोटो बघून "दिल खुश हो गया!"

नगरीनिरंजन's picture

27 May 2011 - 8:58 am | नगरीनिरंजन

मस्तच!

प्यारे१'s picture

27 May 2011 - 9:19 am | प्यारे१

सुप्पर लाईक केलं गेलं आहे. :)

गोगोल's picture

28 May 2011 - 6:15 am | गोगोल

ट्युलिपमय झाले आहे.
फोटो आवडेश

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 11:52 am | मृत्युन्जय

मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्‍याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः

मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957

मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973

मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019

मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061

मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085

मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104

मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162

मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309

येवुद्या हो सगळे भाग वरती.... पुन्हा वाचेन सगळे भाग निवांत ( तेंव्हा ही वाचलेच होते)

इशा१२३'s picture

14 May 2015 - 3:05 pm | इशा१२३

पोशवान पार्कआणि ट्युलिप अप्रतिम.पावसाळी कुंद,गारठा जाणवणारे वातावरण जास्त छान.

इशा१२३'s picture

14 May 2015 - 3:05 pm | इशा१२३

पोशवान पार्कआणि ट्युलिप अप्रतिम.पावसाळी कुंद,गारठा जाणवणारे वातावरण जास्त छान.

रच्याकने, हे ट्युलिप घरी कुंड्यांमध्ये वाढवता येतील का? (घरी म्हणजे पुण्यात.) जाम आवडली आहेत ट्युलिप्स. एकच नंबर!

यशोधरा's picture

14 May 2015 - 5:15 pm | यशोधरा

होय.