फलाफल सँडविच

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
30 Apr 2011 - 3:58 pm

साहित्य फलाफल:
१ वाटी काबुली चणे
१/४ वाटी मैदा
मुठभर कोथिंबीर
मुठभर पारस्ली
२-३ हिरव्या मिरच्या चिरून
१ टेस्पून जिरे
आल्याचा छोटा तुकडा बारीक चिरून
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

काबुली चणे रात्रभर भिजवुन सकाळी कुकरमध्ये शिजवुन घेणे. नतंर त्यातील पाणी निथळून चणे किचन टीश्युवर पसरवुन कोरडे करावेत. (जर का तुम्ही कॅनमधले चणे वापरले तरी चालेल , वर सागिंतल्याप्रमाणे निथळून, टीश्युवर पसरवुन कोरडे करावे).
मिक्सरच्या भांड्यात चणे, कोथिंबीर , पारस्ली, हिरव्या मिरच्या, जिरे, आले व मीठ घालून भरडसर वाटून घ्यावे.
वाटलेल्या मिश्रणात मैदा थोडा-थोडा घालावा. (बाईंडींगसाठी)

.

कढईत तेल तापवून त्यात वरील मिश्रणाची छोटी- छोटी भजी तळून घ्यावीत.

.

साहित्य ताहीनी सॉस :

१/२ वाटी कोरडेच भाजुन घेतलेले तीळ
मुठभर कोथिंबीर
मुठभर पारस्ली
२ टेस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून ऑल्हिव ऑईल
१-२ हिरव्या मिरच्या चिरून
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधुन बारीक वाटून घेणे.

.

सँडविच तयार करण्याची क्रूती:

होलमिल पॉकेट पिटा ब्रेड मिळाला तर उत्तमच नाहीतर वाईट पीटा ब्रेड पण चालेले.
पॉकेट पिटा ब्रेड नसेल तर साध्या पिटा ब्रेडला मधुन अर्धवट कापणे.

.

तव्यावर दोन्हीबाजुने छान भाजुन घेणे.
त्यात कोबी, गाजर, लेट्युस असे सॅलॅड भरणे, त्यात तळलेले फलाफल भरणे.
वरुन ताहीनी सॉस घालणे व सॅलॅड्सोबत खायला सुरुवात करणे.
.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2011 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार

मार डाला !!!

साला तो सॉस कसला जिवघेणा दिसतोय.

प्रास's picture

1 May 2011 - 4:14 pm | प्रास

हा प्रकार छानच दिसतोय पण तो साधा ब्रेड मधून कापून तव्यावर भाजून कसा काय फलाफल धारण करू शकेल याबद्दल शंका आहे. तो पिटा ब्रेड काय आमच्या आजूबाजूला मिळत नाही. पण एकूण चांगल्या छायाचित्रांमुळे पदार्थ आवडलाय, हे नक्की!

विंजिनेर's picture

30 Apr 2011 - 4:38 pm | विंजिनेर

ऊफ्फ!! फूड फोटोग्राफीबद्दल तुमच्या नवरोबांना पैकीच्या पैकी मार्कस बरकां - कातील फटु आहे तो सँडविचचा!
जाता जाता: पीटा ब्रेड नसेल तर बॅगेट पण खतरा लागते.

मस्तच ग... खुप दिवसापासुन फलाफल करायचा विचार करतीये. आता पाकृ पण मिळाली. नक्की करुन बघते. :)
एक शंका आहे, ते फलाफल shallo fry केले तर चालेल का???

पाकृ, फोटू आवडले.
फलाफल एकदाच ट्राय केले होते.
दुपारी खाल्ले तर रात्रीही भूक लागली नव्हती.
पिटा सँडविचची आयडीया आवडली.

प्यारे१'s picture

30 Apr 2011 - 4:55 pm | प्यारे१

'वाईट्ट' आहे.

दुबैमध्ये खाल्लेले आहे. (चाणाक्ष आणि हल.... परा ऐकलेस ना? ;))
साधारण डाळवड्याची चव असते या भज्यांना.

फलाफिल म्हणतात ना?

धनुअमिता's picture

30 Apr 2011 - 5:05 pm | धनुअमिता

खुप छान आहेत पाकू व फोटो.

सानिकास्वप्निल's picture

30 Apr 2011 - 5:09 pm | सानिकास्वप्निल

@ विंजिनेर अहो नवरोबांना पैकीच्या पैकी मार्कस कसले देता,सगळे फोटो मीच काढते बर का...त्याला फोटो काढून घेण्यात रस आहे काढण्यात नव्हे ;)
@ मृणाल हो तू पॅटीप्रमाणे फलाफल बनवून शॅलो फ्राय करू शकतेस
@ प्यारे १दुबईमध्ये वाईट्ट मिळाले असतील पण घरी बनवलेल्या फलाफिल / फलाफल ची चवच न्यारी :)

प्यारे१'s picture

2 May 2011 - 9:31 am | प्यारे१

अहो ते 'वाईट्ट' 'अतिब्येक्कार' सारखं आहे.

बाँगला में बोला तो 'भीषोण सुंदर'

दुबईत आम्हा गरीबांच अन्न होत हे एके काळी (१.५ दिर्हम). महिना अखेरीस याच्यावरच भार आसायचा. :)
आठवणी ताज्या झाल्या.
फोटु क्लास आहेत.

लिखाळ's picture

30 Apr 2011 - 8:58 pm | लिखाळ

वा.. मस्त.. एकदा करून पाहीन..
सॉस मस्तच दिसत आहे :)

वाह वाह उस्ताद मान गये आपके फोटू को और फलाफल को..

- पिंगू

प्राजु's picture

30 Apr 2011 - 11:36 pm | प्राजु

मला खूप आवडते फलाफल.
इथे फलाफल मिक्स मिळते. कधी आणून पाहिले नाही.
आत्ता पर्यंत बाहेरच खाल्ले आहे फलाफल. घरी नक्की ट्राय करेन.
फोटोला १०० पैकी १०० मार्क्स!!

स्वाती२'s picture

1 May 2011 - 1:50 am | स्वाती२

मस्त फोटो!
मी काबुली चणे शिजवत नाही. तसेच भरड वाटून घेते आणि चमचाभर बेकिंग पावडर आणि बारीक चिरुन २-३ लसुण पाकळ्या टाकते. आलं, मैदा नाही वापरत.

स्मिता.'s picture

1 May 2011 - 3:34 am | स्मिता.

काय बोलावं हा धागा बघून?
सनिकाताई, तुम्ही पाकृ तर छान देताच पण सोबतचे फोतो तर कसले असतात... अगदी प्रोफेशनल आहेत.
(तुमचं किचन-कलेक्शन खूप छान वाटतं :))

फलाफल बद्दल बरंच ऐकलं होतं पण कधी खाल्लं नव्हतं. आता करून बघीन.

धन्यवाद, एका वेगळ्या सँडविचची पाक्रु दिल्याबद्दल आणि हो तो भजी तळतानाचा फोटो पण छान आला आहे. पण हे असले पाव पुण्यात कुठं मिळतील हे सांगेल का कुणी. ?

सहज's picture

1 May 2011 - 7:24 am | सहज

कोरडा / तोटरा बसणारा पिता ब्रेड बाद

फक्त सॅलेड मधे फलाफल घालून

सहीच!!

धन्यु!

निवेदिता-ताई's picture

1 May 2011 - 8:35 am | निवेदिता-ताई

वा.वा . मस्तच.. एकदा करून पाहीन..

विनायक बेलापुरे's picture

2 May 2011 - 2:21 am | विनायक बेलापुरे

मस्त !! जुन्या आठवणी ताज्या झाल्या. :)

फलाफल मूळचा लेबानीज प्रकार आहे. मध्यपूर्वेत असतान त्याच्यावर नाहीतर कब्बूसवरच गुजराण चालायची.
माझा ड्रायव्हिंग क्लासचा गुरुजी नेहमी तिकडेच गाडी वळवून ह्क्काने " गुरुदक्षिणा " घ्यायचा.
पण खायचा आणि खायला घालायचा सोस, त्यातून संध्याकाळची दिवेलागणीची वेळ असल्यामुळे त्याचे फारसे वाईट वाटत नसे.

सुनील's picture

2 May 2011 - 3:05 am | सुनील

रोटेसरी ग्रिलवर भाजलेले मांस पिटा ब्रेडात घालून केलेल्या सँडविचला तोड नाही. फलाफल हा त्याचाच शाकाहारी पर्याय!

फोटोमात्र खल्लास!

रामदास's picture

2 May 2011 - 8:33 am | रामदास

फोटोंसाठी. पाकृसाठी शब्द नाहीत.

होम्मुस सॉस पण छान लागते किंवा नुसतं गार्लीकी योघर्ट डीप पण! छान पाक्रु- ग्रीन ताहिनी आवडले!

पुण्यात पिता ब्रेड 'स्पेन्सर्स' मधे आणि कॅम्प ला कयानी/मारझ-ओ-रीन किंवा modern बेकरीत मिळतो.

सानिकास्वप्निल's picture

2 May 2011 - 2:30 pm | सानिकास्वप्निल

प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यु :)

प्राजक्ता पवार's picture

2 May 2011 - 4:03 pm | प्राजक्ता पवार

पाकृ व फोटो दोन्ही झक्कास !

स्पंदना's picture

5 May 2011 - 7:54 am | स्पंदना

तिनदा प्रय्त्न केला इथ प्रतिसाद द्यायचा . आता हा आला तर देव पावला म्हणायचा.

मला ही रेसीपी फार दिवस हवी होती. ययेथे दिल्या बद्दल धन्यु!

स्वाती दिनेश's picture

5 May 2011 - 12:13 pm | स्वाती दिनेश

तुर्की रेस्तराँमध्ये हटकून फलाफल किवा डोनेअर खायला जाणे होतेच..
तुझी पाकृ मस्तच!
स्वाती

फोटू ब्येष्ट! फलाफलसोबत आता हमुसची पण पाकृ येवू द्या! पिट्ट्यात हमुस नसलं तर खाववत नाही हो तो.. :)

Bhakti's picture

21 Aug 2024 - 11:38 am | Bhakti

वाह!