काही निसर्गचित्रे फोटोग्राफी टेकनिक्स आणि फोटोशॉप

खालिद's picture
खालिद in कलादालन
29 Apr 2011 - 7:37 am

पूर्वी शरद यांनी म्हटल्याप्रमाणे, 'मिपावर या विभागात अनेक छायाचित्रकार आपली छायाचित्रे डकवत असतात. त्यांचा दर्जाही चांगला असतो. प्रतिसादावरून हेही जाणवते की वाचकांना ही चित्रे आवडतात. याचे एक कारण असे की या चित्रातील ७०-८०% च्या आसपास निसर्गचित्रे असतात. आता घनदाट झाडी, फेसाळणार्‍या लाटा, बर्फाच्छादित पर्वत नेत्रसुखदायक असल्याने सर्वच खुश. उरलेल्या चित्रात फुले आणि पक्षी. तेही चांगले दिसतात. आनंदी आनंद गडे....

एक लक्षात घ्या. या अशा चित्रांत वेळ, अपर्चर, स्पीड, दृष्टीकोन, थोडेफार बदलले तरी फारसा फरक पडत नाही. चित्राची आकर्षकता कायम रहाते. मग काय होते की चित्रकाराने स्वत: विचार करून, जाणीवपूर्वक चित्र काढले आहे का याचा अंदाज येत नाही. बर्‍याच चित्रांत कलर बॅलंस, फ़्लो. वेटेज यांचा विचार केला आहे कीं नाही असा प्रश्न चित्र काळजीपूर्वक पहाणार्‍याला पडतो.'

मिपाकरांनी हेच आव्हान स्वीकारुन काही चांगली पोट्रेट्स पेशकश केली. मी थोडा वेगळा विचार करुन ठरवले की, आपण अशी छायचित्रे डकवू की ति निसर्गचित्रेच आहेत पण ती काढताना काही वेगळी तंत्रे वापरली आहेत तर काही चित्रे फोटोशॉप मध्ये खूप जास्त एडिट केली आहेत.

अशीच काही चित्रे

१. DSC1451
हे छायाचित्र १० सेकंद अ‍ॅपर्चर घेउन काढलेले आहे. पाण्याला आलेला स्मूथ इफेक्ट त्यामुळेच दिसतो. भरदुपारी असे अ‍ॅपर्चर ठेवल्यास फोटोमध्ये फक्त पांढरा प्रकाश येईल. म्हणून लेन्स समोर एक वेल्डिंग काच ठेवून त्याचा उपयोग १२ स्टॉप एन डी फिल्टर सारखा केला आहे. फोटोशॉप मध्ये ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट करून थोडा सेपिआ टच देण्याचा प्रयत्न केला आहे.

२. Untitled_HDR2

हा डाउनटाउन चा फोटो फोटोशॉप मध्ये HDR प्रकारचे टेक्निक वापरून बनवला आहे. मुळात दोन फोटो काढून (१ अंडरएक्सपोज आणि दुसरा ओव्हरएक्सपोज) ते मर्ज केले आहेत आणि त्यानंतर इमेज च्या टोन, कलर वगैरेच्या कर्व्हज ठीक ठाक केल्या आहेत. (इमारती आणि आकाशाचे रंग मुख्यत्वे)

३. DSC_0272

४. DSC_0274

३ आणि ४ पुन्हा एकदा वेल्डिंग काच वापरून ३० सेकंद अ‍ॅपर्चर ठेवून काढलेले आहेत. एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट तर दुसरा कलर एडिट केला आहे.

५. DSC_0317(1)

हे चित्र फोटोशॉप मध्ये कलर मधून ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट करून नंतर बाकीच्या रंगांचा परिणाम शून्य केला आहे. म्हणून काळ्या पांढर्‍या चित्राला एक स्मूथ इफेक्ट आला आहे.

६. DSC_0046

वसंतातले पहिले उमललेले फूल टिपून फक्त तेवढेच फोटोत उठावदार करुन बाकीचे रंगहीन छायाचित्र सरलेल्या उदास हिवाळ्याचे प्रतीक आहे. (फोटोशॉप सॉफ्ट फोकस)

७. DSC_0504(1)

८. DSC_0489(1)

छायाचित्रे ७ व ८ ही ३ व ४ प्रमाणेच. फक्त ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रात ४ सेकंदाचा शटर स्पीड असल्याने लाटा दिसतात तर रंगीत चित्रात ४५ सेकंद शटर स्पीड असल्याने समुद्राला स्मूथ इफेक्ट येतो.

आपणही जर निरनिराळी टेकनिक्स वापरून छायाचित्रे काढली असल्यास येथे शेअर करावीत. तेवढीच आपणा सर्वांच्या फोटोग्राफी ज्ञानात मोलाची भर पडेल.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

29 Apr 2011 - 8:03 am | आनंदयात्री

सुंदर. याच बरोबर शटर स्पीड, अ‍ॅपर्चर या कल्पना आम्हा नवख्यांना समजवुन सांगाव्यात ही विनंती.

-
(वाढदिवसाचे फोटो काढणारा)

हौशी आंद्या

मदनबाण's picture

29 Apr 2011 - 8:40 am | मदनबाण

वा... उत्तम माहिती देत आहात...:)

हे छायाचित्र १० सेकंद अ‍ॅपर्चर घेउन काढलेले आहे. पाण्याला आलेला स्मूथ इफेक्ट त्यामुळेच दिसतो. भरदुपारी असे अ‍ॅपर्चर ठेवल्यास फोटोमध्ये फक्त पांढरा प्रकाश येईल. म्हणून लेन्स समोर एक वेल्डिंग काच ठेवून त्याचा उपयोग १२ स्टॉप एन डी फिल्टर सारखा केला आहे. फोटोशॉप मध्ये ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट करून थोडा सेपिआ टच देण्याचा प्रयत्न केला आहे.
अ‍ॅपर्चर सेटींग्स बद्धल अजुन जाणुन घ्यायला आवडेल. अ‍ॅपर्चर सेटिंग्स मधे बदल करुन काय काय परिणाम साध्य करता येतील/येतात हे जाणुन घेण्यास उत्सुक आहे.

शरद's picture

29 Apr 2011 - 10:09 am | शरद

चार लेख लिहून मिळणार नाही इतकी सुंदर माहिती वरील फोटोंमुळे मिळते. अभिनंदन. आपण असेच फोटो Raw Files मध्ये काढून कसे बदल करता येतात तेही सर्वांना दाखवा.
शरद

सुरेख फोटो. खास करुन १, ६ आणि कृष्णधवल मध्ये ३ आणि ७ आवडले. एकदम मस्त.
शरद ह्यांचे आवाहन सगळ्यांनीच मनावर घेतलेले दिसते पण, आवाहन करुन नंतर फोटो टाकल्यावर शरद ह्यांनी आपले काहीच मत दिले नाही, ह्याबद्दल जरा वाईटही वाटले. त्यांचे एक्सपर्ट मत ऐकायला आवडले असते.

हा प्रतिसाद लिहितानाच शरद ह्यांचे मत आलेले पाहून आनंद वाटला.

लईच जबरा फोटो आणि समजेल अशी माहिती, आता पुन्हा प्रयोगाला सुरुवात करावी म्हणतो मी.

नन्दादीप's picture

29 Apr 2011 - 12:08 pm | नन्दादीप

छान माहीती.. १ला फोटो अंमळ जास्तच आवडला. सुंदर.

आणि आनंदयात्री वर बोलल्याप्रमाणे "याच बरोबर शटर स्पीड, अ‍ॅपर्चर या कल्पना आम्हा नवख्यांना समजवुन सांगाव्यात ही विनंती."

प्रभो's picture

29 Apr 2011 - 10:05 pm | प्रभो

ज ब र द स्त फोटू!!! आवडले.

जयंत कुलकर्णी's picture

29 Apr 2011 - 10:12 pm | जयंत कुलकर्णी

फारच छान !

स्पंदना's picture

3 May 2011 - 8:33 am | स्पंदना

फारच छान !

पुष्करिणी's picture

3 May 2011 - 6:56 pm | पुष्करिणी

सुंदर.
आनंदयात्री वर बोलल्याप्रमाणे "याच बरोबर शटर स्पीड, अ‍ॅपर्चर या कल्पना आम्हा नवख्यांना समजवुन सांगाव्यात ही विनंती."

शरद यांनी म्हट्ल्याप्रमाणे 'असेच फोटो Raw Files मध्ये काढून कसे बदल करता येतात तेही सर्वांना दाखवा.' ही विनंती

RUPALI POYEKAR's picture

4 May 2011 - 3:30 pm | RUPALI POYEKAR

अप्रतिम फोटो

नगरीनिरंजन's picture

4 May 2011 - 9:01 pm | नगरीनिरंजन

सगळेच फोटो सुंदर आहेत पण पहिला आणि सहावा फोटो विशेषत्वाने आवडले.

दैत्य's picture

4 May 2011 - 9:51 pm | दैत्य

मस्तच खालिद्राव!

धनंजय's picture

5 May 2011 - 1:08 am | धनंजय

मस्तच!

जबरा छायाचित्रे ..

सूर्य.

भवानी तीर्थंकर's picture

7 May 2011 - 10:53 pm | भवानी तीर्थंकर

सुंदर आणि लक्षवेधी.

प्राजु's picture

8 May 2011 - 7:23 am | प्राजु

खूप सुंदर!
वरून चौथा फोटो इतका नाही आवडला. मात्र बाकीचे सुरेख आहेत.

नरेशकुमार's picture

8 May 2011 - 7:47 am | नरेशकुमार

मस्त छान छान !