शरद यांच्या धाग्यामुळे मी हि खूप प्रभावित झालो, आणि जुने काही काढलेले फोटो उकरून बघितले... :)
त्यात मला पण अस वाटल कि होय, मी सुद्धा काही हटके फोटो घेतलेले आहेत..
डकवतोय बघा आवड्तायेत का?
मागे पंढरपूरला गेलेलं असताना या एक मंदिरात माझ्या भाच्याचा हा फोटो, दिवसभर फिरून जाम वैतागलेला , याची हि पोझ जाम आवडली
हा आमचा रिक्षावाला , एकदम सोलिड होता स्वभावाने, शिकायला घरातून पैसे नाही, म्हणून दिवसा रिक्षा चालवून रात्री कॉलेजला जायचा , आत्तापर्यंत पदवी मिळवली सुद्धा असेल :)
या बंजारी बायका...
इतक्या भयानक होत्या कि बास्स रे बास्स..
फोटो काढताना जे रोखून बघितलाय त्या बाईने ..
काय माझ्यात दम मी दुसरा फोटो काढेन :)
प्रतिक्रिया
26 Apr 2011 - 7:34 pm | अन्या दातार
तुझ्या भाच्याचा दुसरा वाला फोटो मस्त आहे. आणि शेवटचा फोटो बघुन मलाही फार भिती वाटली राव. तुझीच काय, कुणाचीच टाप नाही अजुन एक फोटो घ्यायची. काय खत्तरनाक डोळे आहेत तिचे!!!
निसर्गचित्रे झाली, आता नंबर पोर्ट्रेट्सचा.
26 Apr 2011 - 7:48 pm | सूड
+१
26 Apr 2011 - 7:57 pm | धमाल मुलगा
मला पहिला फोटो जास्त आवडला.
ते पोरगं पाठमोरं बसलंय, आजूबाजूचा दगडी बांधकामाचा भाग निळसर रंगात दिसतोय, पोट्टंही काय भारी पोझ देऊन बसलंय.
ह्या फोटोच्या कोपर्यांमध्ये तू काळी शेड मिसळलीएस का?
26 Apr 2011 - 8:02 pm | स्पा
ह्या फोटोच्या कोपर्यांमध्ये तू काळी शेड मिसळलीएस का?
होय
थोडासा टच दिलाय, फोटोशॉप मध्ये :)
26 Apr 2011 - 8:10 pm | प्रभो
मस्त बे स्पावड्या...पहिला फटू आवडला.
27 Apr 2011 - 8:15 am | शरद
आज खरे समाधान वाटले. श्री. स्पा यांचे पहिला, दुसरा व तिसरा फोटो छानच आहेत. आता छान फोटो जास्त छान करण्यासाठी थोडी क्रॉपिंगची मदत घ्या. पहिल्या फोटोत उजवीकडचा भाग डिस्ट्रॅक्टिंग वाटतो. काढून टाका. श्री धमु यांनी ते निराळ्या शब्दात सांगितले आहे.
भाचरू डावीकडे पहात आहे, त्याची ती बाजू जास्त येऊ दे. ती तर आपणास वाढवता येत नाही. उपाय उजवीकडची कमी करणे.
दुसर्या फोटोतही डावीकडील खांब जरासा छाटून टाका. येथे मुलगा portrait पद्धतीत आहे. पण फोटो landscape ( portrait ..उंची जास्त..रुंदी कमी, landscape.. उंची कमी.रुंदी जास्त) . तर इथे खांब कातरल्याने फोटो portrait पद्धतेचा होतो व मुलगाही योग्य ठिकाणी येतो.
असे करावयास पाहिजेच कां ? मुळीच नाही. हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे. पण आपल्याला आवडलेल्या चित्रांबाबत असे खेळ करणे नक्कीच फायदेशीर ठरते. मी वेळ असेल तेव्हा (जो माझ्याकडे भरपूर असतो!) मिपावरील फोटो निवडून क्रॉपिंग, एक्स्पोजर कमीजास्त करणे,ब्लॅक-व्हाईट करणे असा खेळ करत बसतो. स्वत:चे फोटो निवडून प्रत्येकाने असा प्रयत्न केला तर दर्जा निश्चित सुधारेल.
शरद
27 Apr 2011 - 10:06 am | स्पा
शरद आभार.
आधी या दृष्टीने विचार न करता फोटू काढायचो , यापुढे कधीही फोटो काढायची वेळ आली तर, वर दिलेल्या गोष्टी लक्षात घेऊन फोटो काढत जैन :)
27 Apr 2011 - 8:48 am | यशोधरा
स्पा, तू काढलेला मूळ पहिला फोटो खूपच आवडला.
27 Apr 2011 - 9:08 am | प्रचेतस
फोटू सुरेख रे स्पावड्या. म्याट फिनिशिंगवाला तू इतका उत्तम फोटूग्राफर असशील हे माहित नव्हते. :)
27 Apr 2011 - 9:39 am | प्रचेतस
प्रकाटाआ
27 Apr 2011 - 9:14 am | किसन शिंदे
स्पा,
तुझ्या भाच्याचा दुसरावाला फोटोच मस्त आहे.
बाकीचे पण छान आहेत.
27 Apr 2011 - 10:07 am | स्पा
यशो, वल्ली, सूड, अन्या, धम्या, प्रभो,किसन
ठांकू बर का :)
27 Apr 2011 - 10:49 am | ५० फक्त
स्पा, भारी फोटो रे, मजा आली फोटो बघुन. आता मी पण उभारतो बाजारात जाउन आणि काढतो जिवंत माणसांचे फोटो.
आणि योग्य त्या बदलाबद्दल धन्यवाद. ( हल्ली कसली वैचारिक पुस्तकं वाचता म्हणे तुम्ही, त्याचा परिणाम दिसतोय , छान छान)
27 Apr 2011 - 10:51 am | स्पा
हल्ली कसली वैचारिक पुस्तकं वाचता म्हणे तुम्ही, त्याचा परिणाम दिसतोय , छान छान
ह भ प धम्या महाराज बारामतीकरांची किरपा हाय सारी =))
27 Apr 2011 - 10:52 am | गवि
वा स्पावड्या. कलाकार आहेस.
तुला ब्लू कोरलमधे एक एग फ्रँकी मजकडून.
27 Apr 2011 - 11:29 am | ५० फक्त
ओ, गवि हे बरंय, तुम्हाला माहितिये स्पावड्या शुद्ध शाकाहारी आहे म्हणुन ही ऑफर का ?
स्पावड्या, उगाच अंडे वैग्रे खाउ नकोस रे, शाकाहारीच रहा बरं का .
27 Apr 2011 - 11:46 am | गवि
आठवडाही नाही झाला त्याला एग फ्रँकी खाताना पाहून.
तिथे फ्राईड चिकनही मिळते. ते नसते क केले ऑफर मग ? :)
स्पावड्या, तू सर्वभक्षी बनून वेंजॉय कर रे.. काही ऐकू नको कोणाचे..
27 Apr 2011 - 12:37 pm | सूड
काय सांगता ?? ह्या संध्या करणार्या (असं सांगतो तरी तो, खरं खोटं देव जाणे) आपट्यान् एग फ्रँकी खाल्ली हे ऐकलं तर सबंध ठाकुर्ली हादरेल हों !! ;)
अवांतरः तरीच त्यादिवशी म्हणत होता रुखरुख लागलीये, म्हणलं रात्रीचं वषाट खात जाऊ नको. तर म्हणतो मी त्या जोशीणबै सारखा धर्म सोडला नाही हो अजून !! :D
27 Apr 2011 - 10:55 am | स्पा
तुला ब्लू कोरलमधे एक एग फ्रँकी मजकडून.
ये धतड त्तताड धतड त्तताड.. धतड त्तताड.. धतड त्तताड..... कधी भेटताय बोला :D
27 Apr 2011 - 11:06 am | स्पंदना
छानुडा बाळ! कित्ती दमलाय रे बिचारा!
अन ती चेच्मे वाली बंजारीन तर ' दिल खल्लास करुन गेली' .
छान आहेत रे स्पाउ फोटोज. चला शरद काकांचा लेख फळाला आला!
27 Apr 2011 - 11:18 am | नरेशकुमार
सहि आहेत फोटो. मस्त.
27 Apr 2011 - 12:18 pm | सूर्य
छान.. रिक्षावाल्याचा फोटो चांगला आला आहे.
- सूर्य
27 Apr 2011 - 12:48 pm | ५० फक्त
त्याला सेल्फ पोट्रेट काय ते म्हणत्यात ना ओ शरद काका,
पळा, आता स्पाव्ड्या येतोय दुपारच्या रिक्षानं , नाय नाय नितानं पुण्याला मला मारायला.
27 Apr 2011 - 12:54 pm | प्रचेतस
बघतोय रिक्षावाला रं वाट माझी बघतोय रि़क्षावाला.
27 Apr 2011 - 1:01 pm | सूड
:D
27 Apr 2011 - 2:42 pm | प्राजक्ता पवार
पहिला फोटो जास्त आवडला .
27 Apr 2011 - 3:00 pm | मीनाक्षी देवरुखकर
nice photos
27 Apr 2011 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार
वाहत्या गंगेत हात धुवायचा क्षीण प्रयत्न.
27 Apr 2011 - 3:57 pm | स्पा
का हो परा भाव , लई क्षीण प्रतिसाद दिलात तुम्ही :)
27 Apr 2011 - 3:38 pm | विजुभाऊ
नॅशनल जीऑग्राफी साठी काढलेला अफगाणी ललनेचा हा फोटो
१९७२ मध्ये हा फोटो काढलेला होता त्या फोटोग्राफरला हीच स्त्री १९९२ मध्येदेखील भेटली होती. तिचे त्यानन्तरचे छायाचित्र सुद्धा नॅशनल जीऑग्राफिक्स वर झळकले होते
( छायाचित्र विकीवरून......)
28 Apr 2011 - 3:33 pm | गणेशा
फोटो छानच .. पहिला फोटो जबरदस्त ...
मस्त अजुन असे फोटो येवुद्या स्पाऊ [:)]
शरद यांनी दिलेले फोटो दिसले नाहीत
अवांतर : ह्.भ्.प. म्हणजे हळुच भजी पळवणारा .. असा आहे ना रे
28 Apr 2011 - 4:59 pm | चिगो
मस्त फटूज स्पाऊ.. आवडेश..