नमस्कार
मागे दोन लेखात मी म्याट पेंटिंग नावाचा प्रकार फोटोशॉप मध्ये करून दाखवला होता
पण खरतर मला माझं 3D च काम इथे दाखवायचं होत, पण कामामुळे वेळ मिळत नव्हता. परवा शेवटी थोडा वेळ मिळाला
म्हणून एक सेट डीझाईन केलाय. छोटासाच आहे.
आम्ही जे काम करतो याची छोटीशी झलक .
बेसिकली आम्ही interior किंवा exterior बांधून होण्याच्या आधीच ते 3d मध्ये बांधतो :)
खरोखर बांधकाम पूर्ण झाल्यावर ते कसं दिसेल याची ती झलकच असते म्हणा ना, यामुळे क्लाएंटला समजतं कि तो एवढा पैसा ज्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणार आहे , ते शेवटी दिसेल कस?
यामुळे बर्याच गोष्टी साध्य होतात किंवा सोप्या होतात
१. आराखड्यातल्या चुका आधीच कळतात
२. डिझाईन हवे तितके वेळा बदलता येते
३. एका पेक्षा अनेक ऑप्शन करता येतात
४. पैसा आणि वेळ कायच्या काय वाचतो
५. लोकांना आधीच जाहिरात करून आपल्या प्रोडक्ट बद्दल कल्पना देता येते
तर असो , जास्त खोलात जात नाही
मी 3d max या सोफ्टवेर वर काम करतो
सुरुवात मोडेलिंग पासून होते
आपल्याला ड्राफ्टमन कॅड मध्ये प्लान आणि एलीवेशन देतो
त्याच्यावर आपल्याला 3d मॉडेल उभे करावे लागते
मी जो सेट बांधलाय :)
त्याचा नमुना
त्यानंतर texturing .
जे मॉडेल केलंय त्याला म्यापिंग कराव लागतं
नंतर सर्वात महत्वाचा पार्ट, लायटिंग
जसा दिवसाचा मूड असेल त्याप्रमाणे लायटिंग कराव लागत
उदा. सकाळ दुपार संध्याकाळ , त्यात सुद्धा निरभ्र आकाश, किंवा ढगाळलेला दिवस किंवा अंधारी रात्र.. त्यात पण बरेच फाटे फुटतात
(ते पिवळे दिवे जे दिसतायेत, तेच लायटिंग )
नंतर येत रेंडरींग , आपण जे काही काम केलंय, त्याला शेवटच्या टप्प्यात नेण्याचं काम , आपल्याला याच्या सेटिंग कराव्या लागतात, बाकीच काम मशीन करत.
नंतरचा भाग म्हणजे पोस्ट प्रोडक्शन.
यात रेंडर केलेल्या इमेज किंवा अनिमेशन ला टचप कराव लागत, त्याच सौंदर्य वाढवाव लागत
यासाठी फोटोशॉप, आफ्टर इफेक्ट्स सारखी सोफ्टवेर वापरली जातात
बर्याच studio त वर दिलेल्या प्रत्येक भागासाठी वेगवेगळी माणसे नेमली जातात , म्हणजे मोडेलिंग एक जण करणार, लायटिंग दुसरा करणार वगेरे वगेरे
पण या सगळ्यात कुशल होण महत्वाच, प्रत्येक काम यायला हव , तरच निभाव लागेल, (सुदैवाने माझ्या ऑफिसात मी एकटाच 3d वाला असल्याने सगळं मीच करतो)
हे फायनल ओउटपुट
असो अजून माहिती देईनच, जर लेख आवडला तर :)
प्रतिक्रिया
16 Apr 2011 - 10:53 am | प्रचेतस
लै भारी रे स्पावड्या.
कुशल स्पावड्याचे कौशल्यपूर्ण काम बघून आणंद जाहला.
स्वगतः चटकदार भेळेचे थ्रीडी मॉडेल कसे दिसेल याचा मनाशी विचार करतोय.
16 Apr 2011 - 11:07 am | टारझन
गुड .. मस्त रे
16 Apr 2011 - 11:23 am | नगरीनिरंजन
वा! मस्त!
16 Apr 2011 - 11:36 am | रामदास
ते हेच काय रे ?
16 Apr 2011 - 11:39 am | प्रास
'स्पा'भाई,
आपली कलाबाजी बघून फार्फार आनंद झाला. अगदी योग्य कामात पडलायत असंच म्हणायला हवंय....
शुभेच्छा!
काही सविस्तर (मग भले टेक्निकल का असेना) वाचण्यास उत्सुक.....
:-)
18 Apr 2011 - 10:10 pm | गणेशा
असेच म्हणतो ..
अजुन वाचण्यास उत्सुक
16 Apr 2011 - 11:40 am | प्रास
म्हण्टलं, एकच प्रतिसाद दोनदा नको.
:-)
16 Apr 2011 - 11:46 am | sneharani
मस्त!!
16 Apr 2011 - 11:48 am | योगेश२४
असो अजून माहिती देईनच, जर लेख आवडला तर>>>>>अजुन येऊ देत :-)
16 Apr 2011 - 12:03 pm | मी ऋचा
खतरा यार! खुपच स्सह्ही. मस्त मस्त मस्त!!
16 Apr 2011 - 12:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बाला, जाम भारी बोल!!
16 Apr 2011 - 12:18 pm | ५० फक्त
लई भारी रे, जाम मजा येत असेल ना असलं काम करायला. टाक टाक अजुन टाक आमच्या पण डोक्यात जाउदे थोडं काहितरी नविन.
एक आव्हान / आवाहन - मिपावरचे लेख / प्रतिसाद / सह्या वाचुन आयडिचं ३ डि चित्र काढ्की जरा, ते काय कॅरिकेचर का काय म्हणतात तसलं. भले न का जुळेना कशाला पण उगा गंमत म्हणुन काढ. माझ्यापासुन सुरुवात कर बरं. गुरुवारच्या आधी काढलंस ना तर तुला एक कॉफि माझ्याकडुन पुण्यात एक्दम भारी हॉटेल मध्ये. ( असं ही तुला पुण्याची काही कल्पना नाहीये)
16 Apr 2011 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार
अरे टवळ्या जरा सोप्या शब्दात दे की :(
असो..
जे लिहिले आहेस आणि सप्रयोग दाखवले आहेस ते पण भारीच.
17 Apr 2011 - 8:09 pm | प्रदीप
येथे बर्याच जणांना ह्या विषयलेखातील सखोल माहिती असेल. ज्यांना ती नाही, त्यांच्या सोयीसाठी थोडक्यात इथे, शक्य तेव्हढ्या सोप्या भाषेत ती देण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्रथम टप्प्यात मॉडेल नुसत्या रेषांनी बांधून काढलेल्या त्रिमीती आकृतिने होते (wireframe). ह्यात प्रत्येक वस्तूचा सांगाडा दिसतो. प्रत्येक वस्तूच्या आकाराची रूपरेषा व ज्या अनेक वस्तू मॉडेलात आहेत, त्यांचे एकमेकांशे असलेले स्थल-विशेष संबंध (their respective shapes and their positions relaive to one anotherr)असतात. मात्र ह्याव्यतिरीक्त त्यांचे इतर कुठलेच गुणाधर्म त्यांना ह्यावेळी नसतात.
टेक्स्चरींग (texturing) मधे प्रत्येक वस्तूच्या प्रत्येक पृष्ठभागाला त्याचा अभिप्रेत असलेला विशीष्ट गुणधर्म प्रदान केला जातो. म्हणजे वरील चित्रात लॅपटॉपचा गुळगुळीतपणा, लेदर सोफाचा स्वतःचा गुळगुळीतपणा, लाकडी जमिनीचा विशीष्ट खडबडीतपणा इ.
'लायटिंग' मधे आता हे सर्व मॉडेल वेगवेगळ्या प्रकाशरचनेत कसे दिसेल ह्याची माहिती अंतर्भूत केली जाते. ह्यात प्रकाशाची स्त्रोते (sources of lights), त्या स्त्रोतांचा विस्तार (points sources or extended sources), स्त्रोतांच्या प्रकाशाचे रंग इत्यादी बाबींचा विचार करून संरचना केली जाते. त्याच्या त्रोटक लिखाणावरून लेखक बहुतेक घरांच्या (houses or apartments) मॉडेल्सची कामे करीत असावा असे वाटते. त्या संदर्भात त्याने सदर लेखात सूर्यप्रकाशाची योजना-- दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी किरणे कशी खोलीत येतील, त्यामुळे प्रकाशरचनेत कसकसा फरक पडत जाईल, तसेच खोलीतील दिवे कुठे व कसे असतील (म्हणजे खोलीतील अतर्गत प्रकाशयोजना) ह्याविषयी थोडा निर्देश केलेला आहे.
आता हे मॉडेल त्यातील सर्व खुब्यांसकट संपूर्ण झाले, पण अद्यापि ते नुसते 'गणिती परिभाषेत'च आहे. ही परिभाषा मॉडेल ज्या अॅप्लिकेशनमध्ये तयार केले त्याला समजते. परंतु हे मॉडेल त्यातील सर्व खुब्यांसकट टी. व्ही. पडद्यावर पहायचे झाले तर ही फाईल अशीच्या अशी त्या स्क्रीनकडे पाठवून उपयोग नाही. कारण स्क्रीनला समजते ती प्रत्येक 'पिक्सेल'ला लाल, हिरवा, व निळा रंग किती असावेत ह्याविषयीची 'ठोस' माहिती. ती ह्या मॉडेलच्या फाईलीत अद्याप उघडपणे नाही. कारण फाईल अद्याप गणिती परिभाषेत आहे. तेव्हा आता ह्या गणिती परिभाषेतील मॉडेलपासून टी.व्ही. स्क्रीनला समजेल अशा 'लाल-हिरवा-निळा' माहितीत, स्क्रीनकडे पाठवण्यासाठी तिचे रूपांतर झाले पाहिजे. ह्या प्रक्रियेस रेंडरींग (rendering) म्हणतात. ज्या अॅप्लिकेशनचा वापर करून मॉडेल बनवले गेले त्याच्यातच रेंडरींगची सोय असते. तेव्हा शेवटी ही 'रेंडर झालेली फाईल' टी. व्ही. स्क्रीनकडे पाठवली जाते. आता ती फाईल संपूर्ण चित्र बनून आपल्याला दिसते, त्यात प्रत्येक वस्तूचे स्वतःचे गुणधर्म आहेत, वस्तूंच्या एकमेकांच्या संदर्भातील रचना आहेत, प्रकाशयोजना आहेत.
हे नुसते एक स्थिरचित्र असू शकते, अथवा जरूरीप्रमाणे त्याचे अॅनिमेशनही असू शकते. लेखकाने दिलेले उदाहरण घेऊन सांगायचे तर जसजसा सूर्य कलेल, तसतसे प्रकाशयोजनेत झालेले बदल अॅनिमेशनमधे दिसू शकतील. खोलीतील वस्तूंच्या हालचाली (माणसे सोफ्यावर बसताहेत, इथून तिथे फिरताहेत इ.) वगैरे अॅनिमेशनमधे दर्शवता येईल.
18 Apr 2011 - 6:18 am | स्पा
प्रदीप अचूक प्रतिसाद
जेब्बात
16 Apr 2011 - 1:02 pm | स्पा
अजून एक उदाहरण
मी एक फर्निचर 3d मध्ये डीझाईन केल होत, ते तसंच नंतर चेन्नई बिग बझार मध्ये बनवण्यात आलं
3d
actual
18 Apr 2011 - 5:11 pm | llपुण्याचे पेशवेll
3d दिसत नाहीये नीट.
16 Apr 2011 - 12:51 pm | प्रीत-मोहर
मस्तच स्पा..और भी आने दो!!!
16 Apr 2011 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार
अबे स्पावड्या तो 3D फटू दिसत नाहीये कारण तू विड्थ आणि हाईट मराठी अंकात टाकली आहेस =)) संपादन करा.
16 Apr 2011 - 1:02 pm | स्पा
अरे हो.....
संपादित केल्या गेल्या आहे :)
16 Apr 2011 - 1:17 pm | प्यारे१
च्यायला, गंडवू नको बे भा*खाऊ. (भात खातो ना?)
फटु टाकतो आणि आमाला काय पण सांगतो का रे?
- हे कौतुक आहे हे लक्षात घ्या. ;)
16 Apr 2011 - 1:19 pm | गणपा
छान. पुढला भाग अजुन सोप्पा करुन सांग रे (त्या पर्याला). :)
16 Apr 2011 - 1:44 pm | नंदन
छान लेख हो थ्रीडीमास्टर मोगो :). येऊ द्या अजूनही.
16 Apr 2011 - 1:54 pm | मेघवेडा
छान रे मोगो! आणखी नमुने दाखव.
16 Apr 2011 - 2:34 pm | टारझन
असेच म्हणतो .. चांगल्या नमुन्या असतील तर खाजगीत दाखवा :)
18 Apr 2011 - 9:32 pm | मराठे
:)
हेराफेरी मधला डायलॉग आठवला: '..... जरा अल्बम दिखा ना .....' !
16 Apr 2011 - 7:11 pm | सूड
+१
17 Apr 2011 - 8:07 am | प्रभो
+२
18 Apr 2011 - 4:30 pm | sagarparadkar
सहमत
पण सुधांशुजी महाराज, आपली स्वाक्षरी पाहून आमचे गणपा शेठ भडकले तर?
.
.
.
.
१००१ नवीन 'एक-से-बढकर-एक' पाककृती मिपावर टाकल्याशिवाय राहणार नाहीत .... :)
16 Apr 2011 - 4:06 pm | दीविरा
छान मस्त :)
अजून असतील पहायला आवडेल :)
16 Apr 2011 - 4:13 pm | सहज
कलाकुसर आवडली!!!
16 Apr 2011 - 4:24 pm | यशोधरा
लेख आवडला.
17 Apr 2011 - 1:41 pm | नरेशकुमार
मस्त.
आमीबी थोडं ह्ये वापरल्येलं आहे. 3D max चि भरपुर plugins पालथे घालने हा एके काळचा माझा timepass व्हता.
स्पा तु लिहि रे, जुन्या आठवनी जाग्या होतात.
जमले तर थोडे नविन plugins बद्दल काही सांग ना.
17 Apr 2011 - 6:57 pm | सूर्य
लै भारी !!!
- सूर्य.
18 Apr 2011 - 10:39 am | गवि
असो अजून माहिती देईनच, जर लेख आवडला तर
आवडले. अर्थात पुढचा भाग लवकर येण्यास अडथळा नसावा..
18 Apr 2011 - 11:13 am | मराठमोळा
स्तुत्य!!!! :)
18 Apr 2011 - 12:19 pm | सूर्यपुत्र
छान लिवलंय.
अवांतर : शेवटच्या फोटोत आपण आपली केलेली जाहिरात थोडीशी अस्पष्ट आहे. व्हिजिटिंग कार्ड जरा नीटपणे दिसू द्या की....... ;)
-सूर्यपुत्र.
18 Apr 2011 - 1:28 pm | मृत्युन्जय
मस्त रे स्पावड्या. कलाकार आहेस.
18 Apr 2011 - 2:00 pm | गणपा
मी कामचलाउ त्रिमितिय वास्तु बनवण्यासाठी गुगलच्या स्केचपचा वापर करतो.
काही नमुने इथे पहाता येतील.
या (त्रिमितिय) विषयातल कुठलच शास्त्रीय शिक्षण घेतल नाही. त्यामुळे ही मॉडेल्स अगदीच बालीश वाटु शकतात. :)
ज्याने त्याने आपापल्या जवाबदारीवर दुवा उघडावा. :)
18 Apr 2011 - 2:10 pm | स्पा
गणपा झकास रे.....
मस्त मॉडेल केल आहेस :D
प्लान एलीवेषण कुठून मिळालं :)
18 Apr 2011 - 2:58 pm | गणपा
पहिल्या बंगल्याचे फोटो भावाने पाठवले होते ते पहुन बनवलय.
बाकीचे म्हणशील तर सगळी डिटेल्स डोळ्या पुढेच होती. ज्या घरात लहाना पासुन मोठाझालो त्यांचे प्लॅन कशाला लागतायत. :)
18 Apr 2011 - 9:39 pm | राजेश घासकडवी
शेवटची दोन चित्रं फोटो म्हणून खपून जातील इतकी जिवंत दिसतात. लाकडाचा पोत, चकाकी, परावर्तित होणारा प्रकाश छान दिसतात. विशेषतः शेवटच्या चित्रात फोकसचा इतका छान वापर केलेला आहे त्यामुळे ते खूपच खरं वाटतं.
अजूनही सिनेमांमधली माणसांच्या चेहेऱ्यांची अॅनिमेशन्स बघितली तर एक प्लॅस्टिकी पणा दिसतो. तसं का होतं यावर काही लिहू शकाल का?
18 Apr 2011 - 10:46 pm | स्पा
धन्यवाद
माणसांचे अॅनिमेशन करण, खूप कठीण असत
त्याचं मोडेल, त्याच्या चेहऱ्याच्या रेषा .. हावभाव सर्वच कायच्या काय कठीण....
हीच छोटीशी इमेज(फ्रेम)
Render करायला ३ तास लागले
टोटल वेळ ८ तास (मोडेलिंग , texturing , आणि lighting )
अनिमेशन बघताना आपल्या डोळ्यासमोरून एका सेकंदाला २४ फ्रेम जातात .
तर एका मिनिटासाठी १४४० फ्रेम , आणि साधारण २ तासांच्या सिनेमासाठी १ ७२ ८०० फ्रेम लागतील
जर माझा पीसी पकडला तर फक्त RENDER साठीच साधारण १७२८०० * ३ तास = ५१८४०० तास लागतील
पण तिथले ( हॉलीवूड ) पीसी कायच्या काय तुफान असतात, त्यामुळे तिथे तसा कमी वेळ लागत असेल
पण एकूण काम खूप कठीण असत ....
बाकी मी काय लिहिलंय ते , "प्रदीप" नीट समजावून देऊ शकतील कदाचित ;)