प्रतिबिंब

सूर्य's picture
सूर्य in कलादालन
12 Apr 2011 - 9:06 pm

खुप दिवसानी मिपावर कलादालनात फेरफटका मारतोय. इतके दिवस वाचनमात्रच रहावे लागले होते. आता देव्हार्‍यात ठेवलेला कॅमेरा बाहेर काढायचा विचार आहे व कलादालनात वरचे वर येण्याचा विचार आहे. हे चित्र जुनेच आहे. परंतु कुठे शेअर केले नव्हते. नवीन चित्रे लवकरच टाकेन. हे आवडले तर जरुर कळवा.

Seagull

सांग दर्पणा , मी कसा दिसतो..?

मुळ चित्र इथे आहे
http://farm6.static.flickr.com/5181/5612876057_a06a5bb650_b.jpg

- सूर्य

छायाचित्रण

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

12 Apr 2011 - 9:16 pm | सर्वसाक्षी

परिणाम चांगला साधला आहे, चित्र आवडले

धन्यवाद साक्षीजी. (आपल्याला आवडले म्हणजे ते चांगलेच असणार)

- सूर्य.

Dhananjay Borgaonkar's picture

12 Apr 2011 - 9:26 pm | Dhananjay Borgaonkar

मस्त आला आहे फोटो. लवकरच बाकीचे पण टाक :)

धन्यवाद धन्या. टाकतो लवकरच.

- सूर्य.

धनंजय's picture

12 Apr 2011 - 9:27 pm | धनंजय

छान.
(पण मला जरा जास्तच गजबजलेले वाटले. मी वरील चित्र कातरून बघितले, आणि पक्षी-प्रतिबिंबाच्या कथानकावर क्षेत्र केंद्रित केले. ते मला अधिक आवडले.)

धन्यवाद. ते चित्र सुद्धा टाकावे. तुलना करता येईल.

- सूर्य.

अनुमती दिल्याबद्दल धन्यवाद.
हे कसे वाटते?

मला तरी ही अधिक मिताक्षरी लघुकथा वाटते.

हे शिर्षकाशी अधिक सुसंगत आहे. धन्यवाद.
यापुढे अनुमतीची वाट बघु नये ही विनंती :)

- सूर्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Apr 2011 - 6:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कातरलेला फोटो जास्त आवडला. पुढच्या पक्ष्याची सावलीही त्यात कापलेली आहे त्यामुळेही असावं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2011 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कातरलेला फोटो आवडला.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

13 Apr 2011 - 9:25 pm | यशोधरा

अतिशय टाईट क्रॉपिंग व मूळ सब्जेक्टच अर्धवट कापला गेल्यामुळे फोटोचे हे व्हेरियेशन खास आवडले नाही.

फोटो आवडला सूर्य. मी मध्ये असलेला पक्षी जऽऽरासाच कोपर्‍यामधे प्लेस केला असता. :)

सूर्य's picture

12 Apr 2011 - 9:36 pm | सूर्य

उजवीकडे का? मुळ फोटो कसा वाटतो आहे? इथे थोडा कंप्रेस झाल्यासारखा वाटतोय.

- सूर्य.

मूळ फोटो फ्लिकरवरला ना? हां, तो पाहूनच सांगितले. :)
म्हणजे पाहणार्‍याच्या डावीकडे प्लेस केला असता. उजवीकडे केला तर फ्रेममधून सब्जेक्ट बाहेर जात आहे असे वाटते, डिस्ट्रॅक्ट होते. फ्रेममध्ये सब्जेक्ट येत आहे/ आहे असे वाटले पाहिजे. ( हे सद्ध्याच एक फोटोग्राफीविषयक वर्कशॉपमध्ये मिळालेले ज्ञान पाजळले आहे ;) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो आवडला. ( कोप-यातला पक्षी पूर्ण फ्रेम मधे यायला पाहिजे होता असे वाटले)

कॅमेरा बाहेर काढायचा विचार आहे व कलादालनात वरचे वर येण्याचा विचार आहे.
विचार चांगलाच आहे. :)

मालक तुम्ही छायाचित्रातांच्या बाबतीत जाणकार असल्यामुळे क्यामेरा, त्याचा तो फोकस, त्याची ती लेन्स, फ्लॅश, अशी जी काही तांत्रिक माहिती असते ती टाका ना राव.

मला तांत्रिक गोष्टी काही कळत नाही. पण तांत्रिक गोष्टी ज्यांना कळतात त्यांना ते उपयोगाचे ठरेल असे वाट्ले.

-दिलीप बिरुटे

सूर्य's picture

12 Apr 2011 - 10:40 pm | सूर्य

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.
पुढील चित्रात तांत्रिक माहीती नक्की टाकतो.

- सूर्य.

प्रास's picture

12 Apr 2011 - 11:29 pm | प्रास

.

प्राजु's picture

12 Apr 2011 - 11:51 pm | प्राजु

सांग दर्पणा , मी कसा दिसतो..?
असे कॅप्शन टाका त्याला. मस्त फोटो.

अर्रे वा मस्त आहे कॅप्शन.

- सूर्य.

चित्रा's picture

13 Apr 2011 - 4:50 am | चित्रा

चित्र आवडले.

प्रचेतस's picture

13 Apr 2011 - 7:46 am | प्रचेतस

प्रतिबिंब आवडेश.

मराठमोळा's picture

13 Apr 2011 - 1:17 pm | मराठमोळा

मस्तच रे...
बर्‍याच दिवसांनी मोकळा वेळ मिळालेला दिसतोय. :)
येऊ दे आणखी..

धन्यवाद चित्रा, वल्ली, ममो. :)

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2011 - 1:22 pm | नगरीनिरंजन

फोटो आवडला.
तसे दोन्ही (मूळ आणि धनंजयांनी बदललेला) आवडले पण बदललेला फोटो शीर्षक डोळ्यासमोर ठेवून केल्या सारखा वाटला तर मूळ फोटोत फक्त एकाच पक्ष्याच्या प्रतिबिंबावर केंद्रित न होता दोन्ही पक्षी, आकाश वगैरेंचं प्रतिबिंब तर दिसतंच शिवाय फोटोत त्या दोन पक्ष्यांच्या एका छोट्याशा जगाचं प्रतिबिंब प्रकट झाल्यासारखं वाटतं.

सूर्य's picture

13 Apr 2011 - 1:35 pm | सूर्य

शिवाय फोटोत त्या दोन पक्ष्यांच्या एका छोट्याशा जगाचं प्रतिबिंब प्रकट झाल्यासारखं वाटतं.
मस्त दृष्टीकोन.

- सूर्य.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 6:42 pm | परिकथेतील राजकुमार

काय रे सूर्याजी आलास का ?

नविन फटू घेउन लवकर हजेरी लावावी. अन्यथा....

हा फटू आवडला आपल्याला. दूसरा पक्षी पहिल्याच्या प्रतिबिंबाकडे असूयेने बघतो आहे असे वाटले.

लंबूटांग's picture

13 Apr 2011 - 7:02 pm | लंबूटांग

यशोधरा आणि इतर काहीजणांनी सांगितलेच आहे. त्यालाच फोटोग्राफी मध्ये rule of thirds म्हणतात.

सोप्या शब्दात सांगायचे तर कॅमेरा चा LCD screen अथवा viewfinder 3x3 च्या grid मध्ये विभागाला आहे असे समजावे व जेथे तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचे आहे तो भाग मधोमध न ठेवता त्या ९ आयतांच्या ४ intersection points पैकी एका वर ठेवावा (मराठी शब्द सुचले नाहीत ऐन वेळी).

उदा. खालील चित्रामधील लाल + चिन्हांच्या जागी

वर यशोधरा यांनी सांगितल्याप्रमाणे तो फोटोमध्ये डाव्या बाजूला असता तर अजून जास्ती छान दिसले असते.

यशोधरा's picture

13 Apr 2011 - 9:22 pm | यशोधरा

intersection points - छेदबिंदू?
rule of thirds - तृतियांशाचा नियम?
LCD screen - याला सुचले नाही :(
viewfinder - यालाही :(
grid - जाल म्हणावे का?

मस्त समजावला आहे तृतियांशाचा नियम.

लंबुटांग रुल ऑफ थर्ड बद्दल धन्यवाद.
सर्वांना प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

- सूर्य.

प्राजक्ता पवार's picture

14 Apr 2011 - 4:22 pm | प्राजक्ता पवार

प्रतिबिंब आवडले.

फोटॉ दिसला नाही..
रिप्लाय वरुनच फोटो कसा आहे हे जाणुन घेतले..

सूर्य's picture

15 Apr 2011 - 10:51 am | सूर्य

धन्यवाद प्राजक्ता
गणेश, तुम्हाला मुळ लिंकवर सुद्धा फोटो दिसला नाही का? खव मधे बोलु.

- सूर्य.

धमाल मुलगा's picture

15 Apr 2011 - 7:19 pm | धमाल मुलगा

है शाब्बास!

क्यामेर्‍यावरची धूळ झटकली ते उत्तम केले हो महाराज!

आता तो पार्कातलाही फोटो येऊ द्या लवकर. :)