नुकताच अर्ध्या तासापूर्वी आमचे येथे चिंचवडला वळवाचा जोरदार पाउस झाला. हा या मौसमातला पहिलाच पाउस आणि तोही गारांसह. तेव्हा यानिमित्ये जमेल तशी काही छायाचित्रे घेण्याचा मोह आवरला नाही.
आभाळ आले भरून
कोसळणारा वळीव
एका बाजूला वळीव कोसळत असतांना आकाश काही ठिकाणी मात्र निळेच होते.
गच्चीवर पडलेल्या गारा.
पाउस आणि गारा असा दुहेरी मारा चुकवतांना दुचाकीस्वारांची उडालेली तारांबळ
पावसात न्हाल्यामुळे तरारलेली झाडे
प्रतिक्रिया
11 Apr 2011 - 4:44 pm | यशोधरा
गारा पडल्या? कसलं सह्ही! :) गोळा करुन खाल्ल्या की नाही? :)
आमच्या इथे पाऊसही नाहीये, आणि गाराही :( आणि पडल्या तरी ऑफिसमध्ये असताना मीटींगा, कामे वगैरे सोडून गारा गोळा करायला बाहेर पळता येईल का, ह्याची आता विवंचना पडली आहे.
11 Apr 2011 - 4:48 pm | प्रचेतस
न खाता कसा राहीन. काही गारा तर लिंबाएवढ्या मोठ्या होत्या. आधी खाउन घेतल्या मग फोटो काढायला घेतले पण तोपर्यंत गारांचा आकारही आणि वर्षावही कमी झालेला होता.
पण गारांचा जोरदार मारा चुकवत गारा वेचणे अंमळ कठीणच झाले होते.
11 Apr 2011 - 5:06 pm | यशोधरा
>.काही गारा तर लिंबाएवढ्या मोठ्या होत्या. आधी खाउन घेतल्या .. >>
जळवू नये.
11 Apr 2011 - 4:55 pm | टारझन
वा वल्ली .. एकदम वल्ले वल्ले फोटु काढले की हो ...
अवांतर : वल्ली आणि सुक्का हे शेजारी शेजारी उभे राहिल्यास कसे दमट वातावरण तयार होईल ह्या विचाराणे गहिवरलो :)
काल महाबळेश्वरात जोराचा पाऊस झाला .. आणि आम्ही कालंही तो आनंद लुटला ;)
- टल्ली
11 Apr 2011 - 4:59 pm | जातीवंत भटका
मस्तच रे वल्ली.... झक्कास आहेत फोटू
11 Apr 2011 - 5:11 pm | मृत्युन्जय
च्यायला आमच्या इथे गारा नाही पडल्या :(
11 Apr 2011 - 5:18 pm | सुहास..
च्यायला आमच्या इथे गारा नाही पडल्या >>>
हॅ हॅ हॅ ...मागच्या जन्मीची .....असो .. ;)
हिंजवडीत पडल्या की गारा
11 Apr 2011 - 5:32 pm | मृत्युन्जय
हॅ हॅ हॅ ...मागच्या जन्मीची .....असो
च्यायला असं असतय होय. म्हणजे पुढच्या जन्मी पण..... असो.
बाकी गारा चिंचवड हिंजवडी वरुन पुढे औंधापर्यंत नाही आल्या हे वाईट झाले.
11 Apr 2011 - 5:20 pm | जातीवंत भटका
ओलं मन ओलं तन चिंब ओली गात्रं ...
वळवाच्या या मोहक तांडवात
सुरु झालंय भिजण्याचे सत्र ...
11 Apr 2011 - 5:34 pm | स्पा
झकास फोटो..
बाकी भाग्यवान आहात..
गारा खायची संधी मिळाली
आम्ही अजून गारा पडताना सुद्धा बघितलेले नाही.
11 Apr 2011 - 6:29 pm | गणपा
एकदाच पाहिल्यात आणि त्या ही चक्क दुबईच्या वाळवंटात. :)
(आवांतर : मागे एकदा युएइ मध्ये बर्फ पण पडला होता. नाय नाय सायकलवरुन नाय. आभाळातुन खर्रा खुर्रा 'स्नो' पडला होता.)
11 Apr 2011 - 5:43 pm | पैसा
गारा पहायला आम्हाला पुण्यात/चिंचवडात यावं लागेल. इथे कोकणात गारा पडल्या तर पुण्याचं काय होईल हा विचार करतेय!
;)
11 Apr 2011 - 6:22 pm | प्रचेतस
टीव्हीवर कोकणात मुसळधार पाउस झाल्याचे पाहतोय. यंदा आंबे खूपच महागात खावे लागणारे असे दिसतेय.
11 Apr 2011 - 5:43 pm | ५० फक्त
चला वळवाच्या पावसात भिजुन वल्ली उन्हं शेकायला मोकळा झाला.
मग वल्ली शेट काय म्हणताय अजुन, ते पापडांच काय म्हंणत होता ती काढली का वाळलेली ?
11 Apr 2011 - 6:21 pm | प्रचेतस
पापडं नव्ह्ती रे घातली.;) नुसताच खायला केला होता.
11 Apr 2011 - 5:50 pm | मुलूखावेगळी
मस्त हो वल्ली
आता हापिसात आहे तरी १ चक्कर मारुन आले बाहेर मस्त वाटतेय.
लान्ग ड्राइव्ह ला जावे असे वातावरण आहे :)
11 Apr 2011 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार
तेज्यायला हिकड फक्त चार थेंब पौस पडला राव :(
असो...
गारा पडल्यावर व्हिस्कीचा पेग घेउन गच्चीत न धावल्याबद्दल निषेध !
11 Apr 2011 - 7:19 pm | प्रास
मौसमातल्या पहिल्या पावसाचे आणि ते ही गारांसकट फोटू बघायला फार छान वाटले. वल्लि यांनी आधी गारा खाऊन नंतर जमेल तसे आकाराने कमी झालेल्या का होईना गारांचे फोटो काढले त्यावर त्यांचे (अम्मळ इनो पिऊन) धन्यवाद!
एक वेळ गणपाभौ म्हणतात तश्या दुबईत गारा पडतील पण ऐन एप्रिलात सुरू झालेली मुंबईची काहिली काही कमी होणार नाही असं दिसतंय.....
वल्लिभौ, फोटो बघून मजा आली. तुमच्या आनंदात मनापासून सहभागी!
कधीतरी पावसात भिजत गारा खाण्याची इच्छा धरून असलेला
:-)
11 Apr 2011 - 7:36 pm | स्मिता.
सहीच! मी आजवर गारांचा पाऊस एकदाच पाहिलाय. तेव्हाही १०वी ची परिक्षा चालू होती त्यामुळे त्या गारा वेचून खाणे हे अजूनही फक्त ऐकूनच माहिती आहे.
बाकी फोटु मस्त, कोसळणारा पाऊस बघायची मजाच वेगळी आहे.
11 Apr 2011 - 8:14 pm | ajay wankhede
यार वल्लि आम्हि विदर्भात धुवाधार पाउस बघतो..
आता तर तिन्हि ऋतुत पडतो ..(ग्लोबल वार्मिन्ग)
फोटो फारच छ्यान....
11 Apr 2011 - 8:14 pm | ajay wankhede
यार वल्लि आम्हि विदर्भात धुवाधार पाउस बघतो..
आता तर तिन्हि ऋतुत पडतो ..(ग्लोबल वार्मिन्ग)
फोटो फारच छ्यान....
12 Apr 2011 - 9:03 am | योगेश२४
आवडले फोटो :-)
12 Apr 2011 - 10:16 am | स्वानन्द
मस्तच रे.... खरंच लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या... सुरुवातीला छोट्या गारा अंगावर झेलत फिरायला मजा येत होती.... पण नंतर जसा गारांचा आकार वाढला, तसा मग त्या चुकवण्यासाठी पळापळ सुरू झाली :)
12 Apr 2011 - 10:22 am | मराठमोळा
वल्ला रे वल्ला वल्ला..वल्ला रे वल्ला वल्ला..
वळवाके पाउस का दीदार हुआ वल्ला रे वल्ला वल्ला..
आय मीन वल्ली.. लै भारी.. :)
25 May 2012 - 10:03 am | स्पा
ये रे ये रे पावसा..................
25 May 2012 - 11:38 am | अत्रुप्त आत्मा
@ये रे ये रे पावसा.................. >>> तुला देतो स्पा-सा...आपलं स्वारी पैसा... ;-)
पण कधी येणार तो या वर्षी....???