माझा भाचा नील (वय ३) मुंबईने शिकागो येथे त्याच्या आईबरोबर जात होता. आज त्याचे विमान शिकागो येथे पोचणार होते. त्याचे वडील (म्हणजे माझा मेव्हणा) त्यांना शिकागोला भेटणार होते.
पण नीलला विमानातच अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याच्या विमानाने जवळच्या विमानतळावर emergency landing केले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. तो आत्ता कॅनडातील Goose Bay येथे आहे. त्याची तब्येत आता स्थीर आहे आणि तो उपचार घेत आहे.
त्याच्या बरोबर फक्त त्याची आई आहे. त्याचे वडील शिकागोला अडकले आहेत आणि त्यांच्याजवळ कॅनडाचा valid visa नसल्याने त्यांना सोमवारपर्यंत Goose bay येथे जाता येणार नाही आहे. त्याची आई तिकडे एकटीच आहे.
तेव्हा कोणी मि.पा. कर Goose bay च्या जवळपास आहे का? किंवा कोणाच्या ओळखीचे कॅनडात जवळपास आहे काय? म्हणजे तिला (म्हणजे नीलच्या आईला) कोणी धीर देऊ शकेल. (पैशाची मदत लागणार नाही. कोणी जवळपास भेटू शकले तर थोडा तणाव कमी होईल आणि धीर मिळेल हीच एक अपेक्षा).
ज्यांना शक्य असेल त्यांनी मला व्यनि करावा म्हणजे मी पुढील details देईन.
प्रतिक्रिया
5 Mar 2011 - 6:49 am | आनंदयात्री
योगी, माझी पत्नी बहुदा तुमच्या बहिणीबरोबरच होती आत्तापर्यंत, त्यांनी प्रवास बरोबरच सुरु केला असे मला माहित होते. यांचे फ्लाईट कॅनडात का उतरले याचे उत्तर न मिळाल्याने आम्ही प्रचंड चिंताग्रस्त होतो. इतिहाद कडुन फक्त मेडिकल इमर्जन्सी एवढेच कारण मिळाले, कोणाला काय झाले ते कळायला अजिबात मार्ग नव्हता.
माझ्या माहितीत कोणी कॅनडात नाही, नाही तर नक्कीच मदत केली असती.
5 Mar 2011 - 11:45 am | योगी९००
आनंदयात्री,
आभारी आहे. आम्ही Hospital ला फोन करून त्यांच्या संपर्कात आहोतच. नील आता उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे.
हे सगळे अचानक झाल्याने आम्ही सगळे गोंधळून गेलो होतो. नीलची आई आता ठीक आहे. नीलचे वडील (म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ "पराग चंद्रात्रे") शिकागोला आहे. त्याने बराच प्रयत्न केला कॅनडात जायचा पण त्याला त्यात यश नाही आले. एक प्रयत्न म्हणून मी येथे मदत मागितली.
अजून हॉस्पिटलने पुढे काय ते सांगितलले नाही.
बहूगुणी यांचे सुद्धा आभार. त्यांनी सुद्धा लगेच मदत केली आहे.
5 Mar 2011 - 8:52 pm | यशोधरा
नीलला बरे वाटले हे वाचून आनंद झाला. बेस्ट लक :)
5 Mar 2011 - 9:28 pm | सखी
व्यनि केला आहे. दुर्देवाने माझ्याही ओळखीचे तिकडे कोणी नाही, तरी मी काही लोकांना संपर्क करुन माहीती काढते आहे की त्या भागात कोणी आहे का.
Goose Bay च्या जवळचे एखादे मोठे शहर माहीती आहे का? त्यांची महाराष्ट्र मंडळाची साईट असल्यास कोणालातरी संपर्क करता येईल. अशावेळेस लोक मदत करतात असा अनुभव आहे, त्यातुन तुम्ही पैशाची मदत नको हे सांगितलेच आहे. मी गगलुन पाहीले पण जास्त माहीती मिळाली नाही.
5 Mar 2011 - 10:00 pm | योगी९००
सहज, सखी..आभारी आहे.
नीलच्याच हळूहळू सुधारणा होत आहे. सोमवारशिवाय तिकडून सुटका नाही. आम्ही आता goose bay कडून शिकागोला कसे येता येईल याचाच विचार करत आहे.
नीलचे वडील सोमवार संध्याकाळशिवाय तिकडे जाऊ शकत नाहीत. (कारण त्यांना विसाच सोमवारी मिळेल..आणि goose bay छोटे खेडेगाव असल्याने transportation एकदम कमी आहे.) आता लवकर व्हिसा मिळण्यावरच प्रयत्न करत आहोत.
goose bay पासून जवळचे शहर म्हणजे monterial ...आणि ते पण १७०० किमी वर आहे...:(
कॅनडात जरी कोणी ओळखीचे भेटले तरी goose bay सारख्या ठिकाणी त्यांना जावा असे म्हणणे जरा अशक्यच आहे कारण हे goose bay is not well connected to other canadian cities.
बाकी हॉस्पिटलला आम्ही फोन करतच आहोत. त्यांना आमच्याकडून जास्त फोन झाल्याने ते थोडे वैतागल्यासारखे वाटले आहेत. म्हणून आमचे फोन आम्ही कमी केलेत.
6 Mar 2011 - 12:53 am | रेवती
आमच्या येथून हे गाव बरेच लांब आहे. मॉन्ट्रीअल आमच्यापासून ४ तासावर आहे.
तेथे काही मदत लागल्यास आम्ही जाऊ शकू.
तेथे कोणी नातेवाईक अथवा ओळखीचे नाहीत.
तुमच्या भाच्याला बरे वाटल्याने सगळ्यांच्या जिवात जीव आला असेल.
सगळे व्यवस्थित पार पडू दे हीच सदिच्छा!
6 Mar 2011 - 4:54 pm | योगी९००
तुमचे आभार. पण मॉन्ट्रीअल खुप दुर असल्याने तिकडे येण्याची शक्यता कमी आहे...!!!!
नीलला आता बरे वाटत आहे आणि त्यामुळे आमचेही टेन्शन कमी झाले आहे.
7 Mar 2011 - 6:30 pm | गणेशा
टेंन्शन कमी झाले हे मस्त झाले भाउ.
सगळॅ व्यव्स्थीत होईल ..
कोणीच मित्र सध्या कॅनडात नसल्याने काहीच मदत करु न शकल्याने वाईट वाटते आहे.
6 Mar 2011 - 7:34 am | आनंदयात्री
नीलला बरे वाटतेय हे ऐकुन चांगले वाटले, माझी बायको आज सकाळी पोचली, ही बातमी ऐकुन तिच्याही जीवात जीव आला. ती तुमच्या बहिणीबरोबर गुज बेला उतरणार होती पण एअरपोर्ट ऑथरिटीने परमिशन न दिल्याने तिला एकटीलाच नीलला घेउन उतरावे लागले, याची प्रचंड टोचणी घेउन ती आलीये.
6 Mar 2011 - 4:37 pm | योगी९००
आनंदयात्री ,
तुमचे आणि तुमच्या मिसेसचे आभार...तुमच्या मिसेसचे विशेष आभार कारण तिच्यामुळे नीलच्या आईला विमानात धीर मिळाला.
मदत करायला लोकं तयार आहेत ही जाणिव सुद्धा आम्हाला बळ देत आहे....
7 Mar 2011 - 11:01 am | निनाद मुक्काम प...
आभासी जगतात मराठी ह्या विषयावरील मिपा येथील हे संवाद पहिले .
खूप बरे वाटले .( ह्या मदतीचे हात पुढे आलेले पहिले .)
मिपाचा असा जगातील सर्व मराठी भाषिकांना जोडणारा दुवा पहिला नी ह्या मिपाचा मी एक सदस्य आहे ह्यांचा अभिमान वाटला .
7 Mar 2011 - 7:34 pm | धमाल मुलगा
लेकरु बरं आहे ना आता?
भेट झाली का?
7 Mar 2011 - 9:42 pm | प्राजु
नीलची तब्बेत आता कशी आहे?
बाबा भेटले का त्याला?
7 Mar 2011 - 9:58 pm | आनंदयात्री
काल आम्ही त्याच्या बाबांशी बोललो, ते अजुनही अमेरिकेत आहेत कारण त्यांना विसा मिळत नाही. सोमवारी ती नीलसमवेत शिकागोला येउ शकेल असे वाटते.
7 Mar 2011 - 10:34 pm | योगी९००
आज नीलची आई आणि नील गूस बे वरून शिकागोला जाणार आहेत.
त्यांच्याशी skype बातचित झाली की कळवतो..
सर्वांचे आभार..
7 Mar 2011 - 11:23 pm | ज्योति प्रकाश
माझी भाची टोरंटोला राहते व तिची आई हेलीफेक्स येथे राहते कदाचित त्यांची काही मदत झाली असती पण मी रात्री
उशिरा मिपा चालू केला एव्हाना तुमची बहिण व भाचा शिकागोला पोचले असतील्.त्याच्या प्रकॄतीला आराम लवकर
मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
8 Mar 2011 - 8:04 pm | रेवती
सगळे ठीक आहेत ना हे बघायला धाग्यावर आले होते.
8 Mar 2011 - 9:09 pm | योगी९००
@रेवती
नीलची आई आणि नील आत्ताच एक तासापुर्वी शिकागोला पोहोचले.
दुर्दैव म्हणजे त्यांचे येतानाचे एक फ्लाईट रद्द झाल्याने त्यांना १२ तास टोरोन्टोला थांबावे लागले. संकटे येतात ती एकावेळी सगळी येतात याचे प्रत्यंतर आले. नीलची आई( म्हणजे माझ्या बायकोची वहिनी) फार बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने मी जास्त बोललो नाही. त्यांचे या प्रकारात खुपच हाल झाले.
पण सुखरूप त्यांच्या घरी पोहोचले. All is well that ends well.
परत एकदा सर्वाचे आभार..
8 Mar 2011 - 9:14 pm | आनंदयात्री
हुश्श !! फायनली .. पोचले.
नीलही आता लवकरच ठणठणीत बरा होईल, काळजी करु नका.