उद्या पहीला सामना भारत विरुध्द बांगलादेश. यावेळी सट्टा बाजारात भारतात तरी फेव्हरीट मध्ये सगळेजण इंडीया -इंडीया म्हणत आहेत. भारतला विश्वविजेपद मिळण्याचा भाव आज सकाळी तीन रुपये वीस पैसे होता. श्रीलंकेचा पाच रुपये तर इंग्लंडचा साडेसात रुपये. जर इंग्लंड चषक घेऊन जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर लावा हजार रुपये. जर तसे झाले तर तुम्हाला साडेसात हजार मिळतील. भाव कमी म्हण्जे शक्यता जास्त. हे सगळे भाव काल रात्रीचे आहेत. सामना सुरु झाल्यावर प्रत्येक षटकानंतर भाव बदलत राहतील. नो बॉल -लेग बाय- एलबीडब्लु चे भाव तत्काल मध्ये बदलत राहतात. एकूण साठसत्तर हजार कोटी रुपयाचा सट्टा यावेळी होईल असा अंदाज आहे. असो.
आपणही थोडा करू या सट्टा. असा सट्टा की ज्यात प्रत्येकाला भाग घेता येईल .अगदी खेळाडू आणि हंपायर मधला फरकही कळत नसला तरी चालेल असा सट्टा. एका पैशाचेही नुकसान होणार नाही आणि एका पैशाचा फायदा पण होणार नाही.अर्थात या विश्वकपाच्या संपूर्ण सट्ट्यात जिंकून जास्तीत जास्त गुण मिळवणार्यांचा गुणगौरव आपण करूच.
चला तर खेळू या अंदाज पंचे दाहोदरसे .
उद्याच्या सामन्यात बांगलादेशी फलदांजापैकी एकतरी खेळाडू धावांचे शतक पूर्ण करील.
जर तुम्हाला असेच वाटत असेल आणि तसे झाले तर ....दहा गुण.
उद्याच्या सामन्यात भारतीय फलंदाजापैकी एक तरी खेळाडू शून्यावर बाद होईल.
अंदाज करा . हो किंवा नाही .विजेत्याचे गुण ...पाच .
उद्याचा जॅकपॉट प्रश्न
उद्याच्या सामन्यात पाऊस पडल्यामुळे खेळाडू एकदा तरी तंबूत परत जातील. बघा हवामान सांगणारी संस्थळे आणि वर्तवा आपला अंदाज. पावसाच्या बाजूने अंदाज जिंकणार्याला शंभर गुण आणि सामन्याचा उत्कृष्ट अंदाज-वर्तक ही पदवी.
ही मी एक सुरुवात केली आहे .आपले अंदाज प्रतिक्रीयेतून द्यावेत. सामना सुरु होण्यापूर्वी द्यावेत. परवा गुणांकन करू या .
चला खेळू या अंदाज पंचे दाहोदरसे.
प्रतिक्रिया
18 Feb 2011 - 10:17 pm | विजुभाऊ
नेहरा खेळायला आला तर तो शून्य धावा करेल.
18 Feb 2011 - 10:22 pm | असुर
रामदासकाका,
आपले अंदाज खालीलप्रमाणे:
उद्याच्या सामन्यात बांगलादेशी फलदांजापैकी एकतरी खेळाडू धावांचे शतक पूर्ण करील.
'नाही, एकही बांगलादेशी खेळाडु उद्या शतक करु शकणार नाही'
उद्याच्या सामन्यात भारतीय फलंदाजापैकी एक तरी खेळाडू शून्यावर बाद होईल.
'हो, किमान एक भारतीय खेळाडू शुन्यावर बाद होईल.'
जॅकपॉट प्रश्न
अंदाज: उद्या अजिबात पाऊस पडणार नाही.
18 Feb 2011 - 11:06 pm | गणपा
आपले घोडे सेम लेन मध्ये. ;)
18 Feb 2011 - 11:18 pm | पैसा
१. नाही
२. हो.
३. नाही
आमी विनमदी येनार पघा!
18 Feb 2011 - 10:24 pm | मेघवेडा
पहिल्याचं उत्तर - हो. (आपला अंदाज तमिम इक्बाल.)
दुसर्याचं उत्तर - नाही.
पाऊस - नाही.
18 Feb 2011 - 10:57 pm | छोटा डॉन
पहिल्याचं उत्तर - हो. (आपला अंदाज तमिम इक्बाल.)
दुसर्याचं उत्तर - नाही.
पाऊस - नाही.
हेच आमचे उत्तर ...
उत्तम उपक्रम आहे, मजा येईल.
- छोटा डॉन
18 Feb 2011 - 11:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>उत्तम उपक्रम आहे, मजा येईल.
उपक्रम मस्तच आहे पण चर्चा प्रस्तावात सुरुवातीला पाच ओळीत काही बाजारभाव दर्शविले आहेत
चर्चा गमतीजमतीची असली तरी आपल्या मागे काही भानगड नै लागणार ना भो...!
-दिलीप बिरुटे
18 Feb 2011 - 11:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्राव, चटकन मिपावर असं काही मॉड्यूल बनवता येईल का? ज्यांना खेळायचं आहे त्यांनी रजिस्टर करायचं आणि तिथे सट्टा खेळायचा? मजा येईल.
माझी उत्तरं:
बांग्लादेशी शतक - हो.
भारतीय भोपळा - हो.
पाऊस - नाही.
19 Feb 2011 - 6:07 am | प्राजु
अगदी असंच डोक्यात आलं.
जसं कौलं फोडतो.. तसंच नाही, हो, नाही.. असे रेकॉर्ड्स ठेवता येईल का रे डॉन्या?
माझं उत्तर
१. नाही
२. हो
३. नाही
19 Feb 2011 - 1:15 pm | छोटा डॉन
रामदासकाकांचा सहभाग, ह्या प्रकारातली गंमत आणि मिपाकरांचा सहभागात असणारा उत्साह पाहुन तसे काहीतरी जुगाट करण्याचा प्रयत्न चालु आहे.
लवकरच काहीतरी मोड्युल वगैरे देऊ. :)
- छोटा डॉन
19 Feb 2011 - 6:31 am | विजुभाऊ
डानराव अजून शाळेतली सवय जात नाहिय्ये. काप्या करणं सोडून द्या
18 Feb 2011 - 10:39 pm | निशदे
पहिल्याचे.......नाही
दुसर्याचे.....नाही,
पाऊस.......नाही
:)
18 Feb 2011 - 10:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>उद्याच्या सामन्यात बांगलादेशी फलदांजापैकी एकतरी खेळाडू धावांचे शतक पूर्ण करील.
नाही.
>>>उद्याच्या सामन्यात भारतीय फलंदाजापैकी एक तरी खेळाडू शून्यावर बाद होईल.
नाही.
>>>पाऊस
नाही.
-दिलीप बिरुटे
18 Feb 2011 - 11:10 pm | टारझन
बिरुट्यांशी ह्या प्रकारे सहमत व्हावे लागेल असं वाटलं नव्हतं .. आमची पण उत्तरे अशीच :)
-(बिरुटे प्रेमी) टारझन
18 Feb 2011 - 11:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ आणि तेही टारझणकडून मलाही आश्चर्यच वाटले...!
-दिलीप बिरुटे
[टारझणच्या ’ ण’ चा फॅन ]
18 Feb 2011 - 11:35 pm | रेवती
उद्या एकही बांग्लादेशी खेळाडू शतक करू शकणार नाही.
शून्यावर आपला एक तरी नक्की बाद.
उद्या पाऊस पडणार नै.
18 Feb 2011 - 11:36 pm | अन्या दातार
१. नाही
२. हो
३. नाही
(जॅकपॉट लागला नाही तर पैसे परत का?? ;) )
19 Feb 2011 - 12:16 am | चतुरंग
१ - बांगला खेळाडू शतक - नाही
२ - भारत खेळाडू शून्यावर बाद - नाही
३ - पाऊस पडणार - नाही
(मटकाकिंग)रंगा खत्री
19 Feb 2011 - 12:25 am | माझीही शॅम्पेन
१ - बांगला खेळाडू शतक - हो १
२ - भारत खेळाडू शून्यावर बाद - हो २
३ - पाऊस पडणार - नाही
19 Feb 2011 - 12:48 pm | निखिल देशपांडे
छे छे कोणीच रिस्क घ्यायला तयार दिसत नाही....
उद्याच्या सामन्यात बांगलादेशी फलदांजापैकी एकतरी खेळाडू धावांचे शतक पूर्ण करील.
'नाही, एकही बांगलादेशी खेळाडु उद्या शतक करु शकणार नाही'
उद्याच्या सामन्यात भारतीय फलंदाजापैकी एक तरी खेळाडू शून्यावर बाद होईल.
'हो, किमान एक भारतीय खेळाडू शुन्यावर बाद होईल.'
जॅकपॉट प्रश्न
अंदाज: उद्या पाऊस पडणार आहे... उद्या साधारण ढगाळ हवामान असणार आहे.
19 Feb 2011 - 1:31 pm | मस्त कलंदर
१ - बांगला खेळाडू शतक - नाही
२ - भारत खेळाडू शून्यावर बाद - शक्यता नाकारता येत नाही
३ - पाऊस पडणार - नाही
19 Feb 2011 - 1:59 pm | गणपा
धोनीच नशीब त्याच्या गत लौकीकाला जागलं. टॉस हरला. ;) (एक अंदाज खरा ठरला)
पण मेन इन ब्लु जिंणारच जिंकणार.