आता केवळ 'अंतर्वस्त्रे' (अंडरविअर) हा शब्द या धाग्यात आहे म्हणून नाक मुरडू नका. 'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे बाहेरील कपड्यांच्या आतच घालतो तशीच वस्त्र हे लक्षात घ्या अन पुढे वाचा.
आता ही अंतर्वस्त्रे' किंवा अंडरविअर (उदा. बनियन) आपण शर्ट किंवा पँटच्या आत आपण घालतो. त्या अंतर्वस्त्रांवर (बनियनवर) एक लेबल त्या त्या कंपनीने लावलेले असते. ती त्यांची जाहीरात असते अन त्यावर त्या बनियन च्या मापाचा एक नंबर लिहीलेला असतो. तो साधारणता: इंचात असतो. म्हणजे ज्याची छाती २८ इंचाची असते त्याला २८ नंबरचा बनियन फिट होतो. (फिट्ट नाही तर फिट म्हणजे योग्य मापात बसतो).
तर आपले लेबल. हे लेबल आजकाल सिन्थेटीक धाग्यातले येते किंवा बनीयनच्याच कापडाचे ते नसते. तुम्ही जर ते लेबलचे अंडरविअर (बनियन) अंगात घातले तर ते सेन्सीटीव्ह त्वचा असणार्याला रूतते. हे कधी कोणाच्या लक्षात आले नसेल पण आता त्याकडे निट लक्ष द्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. उन्हाळ्यात घामाची पहीली धार मानेच्या त्याच भागातून खाली जात असल्याचे तुमच्या लक्षात येईल.
काही शर्टच्या कॉलरच्या आतल्या बाजूलाही टेलरचे नाव असलेले लेबल असते. ते सुद्धा असेच रुतते किंवा त्या भागात खाजवावे लागते. नविन शर्ट किंवा अंडरविअर असल्यास तेथे जास्तच लागते.
हा झाला मुद्दा क्रमांक १.
आता मुद्दा क्रमांक २. बनियन जर सँन्डो असेल तर त्याचे वरचे दोन निमूळते भाग गळ्याजवळील भागाजवळ जुळलेले असतात. अन बाहीचे असेल तर त्याचा गळा शिलाईने शिवलेला असतो. तेथे शिलाई मारलेली असल्याने तेथील भाग जास्त फुगीर असतो. आता तो कुणाला रुतत वैगेरे नाही. अंतर्वस्त्रांचे (बनियनचे) काम शरीराला आलेला घाम शोषून घेणे हा असतो. अन ते शर्ट-पँटच्या आत असते. त्यामुळे ते सुलट घातले काय किंवा उलट घातले काय काही फरक पडत नाही.
पण त्यावर असलेले लेबल मानेला रूतू नये म्हणून व बाह्यांचे बनियन असेल तर गळ्याला अन काखांना त्याची शिलाई रूतू नये म्हणून ते अंतर्वस्त्र (किंवा बनियन) हे उलटे (म्हणजे शिलाई किंवा ते लेबल बाहेर असलेले ) घातले पाहीजे असे माझे मत आहे.
आता शर्टतर उलटा घालू शकत नाही, म्हणून त्याचे कॉलरचे लेबल अन बनियनचे लेबल आपण नक्कीच फाडू शकतो.
तर मित्रांनो, घ्या कात्री अन फाडून टाका अंडरविअर अन कॉलरचे लेबल, अन बघा तो किती 'आराम का मामला' होतो ते.
प्रतिक्रिया
11 Feb 2011 - 6:55 pm | अवलिया
>>>>अंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत
कपड्यांच्या आतून घातलेले बरे असे आमचे साधारण मत आहे
12 Feb 2011 - 12:24 am | टारझन
फक्त पुरुषांच्या अंतर्वस्त्रांबद्दल लिहुन पाषाणभेद यांनी समस्त्र स्त्री जातीकडे दुर्लक्ष करुन त्यांचा अपमान केला आहे. बघा बॉ ..
12 Feb 2011 - 11:32 am | पिवळा डांबिस
टारोबा, संभाळा!
उगीच ब्रा म्हणता "ब्रम्हहत्या" होईल आणि पुन्हा तुम्ही गावकुसाबाहेरचे व्हाल!!!!
:)
12 Feb 2011 - 11:43 am | टारझन
हे पहा , कोणी काय लिहावे काय णाही हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही. मी फक्त एक निरिक्षण नोंदवले.
आता णिरिक्षण नोंदवल्याने जर गावकुसाबाहेर जात असु तर ... हॅहॅहॅ .. मला नाही वाटत मग १६च्या वर कोणी टिकेल म्हणुन :)
12 Feb 2011 - 2:29 pm | अवलिया
१६?
गोंधळ होत आहे. लिंगोर / लिंगोरचा वरचा छोटासा सतरावा खडा म्हणजेच नीलमणी विसरु नका !
12 Feb 2011 - 5:55 pm | टारझन
शक्यता नाकारता येत नाहि . तकदीर बदलते देत णही लगती
11 Feb 2011 - 7:00 pm | परिकथेतील राजकुमार
इथेच तुम्ही भारतीय चूकता.
चित्र आंतरजालावरुन साभार.
11 Feb 2011 - 11:02 pm | चिंतामणी
=))
11 Feb 2011 - 7:11 pm | प्रकाश घाटपांडे
अंतर्वस्त्रांचा इतिहास, विविध प्रकारची अंतर्वस्त्रे, अंतर्वस्त्रे व मानवी भावभावना अस काही लिवाल अस वाटल व्हत. यखांदा अंतर्वस्त्र कोष तयार करा,
लोकांना अंतर्वस्त्र फार अश्लिल वाटतात.
11 Feb 2011 - 7:14 pm | श्री गावसेना प्रमुख
मि इथे नविन आहे पन तुम्च्या म्हनन्या प्रमाने आम्हि भारतिय आतुन नेसतो शक्तिमान सारखे आन तुम्हि हो
11 Feb 2011 - 7:25 pm | आशिष सुर्वे
जॉकी ची वापरा की ओ.. त्यात असली लेबल्स नसतात..
11 Feb 2011 - 8:53 pm | धमाल मुलगा
आन मंग जॉकी काय वापरणार?
11 Feb 2011 - 9:07 pm | सूर्यपुत्र
जॉकी म्हंजे घोड्यावरचा की रेड्यावरचा?? (सॉरी, सॉरी, टंकनचूक... रेडिओवरचा) ;)
-सूर्यपुत्र.
11 Feb 2011 - 9:07 pm | आशिष सुर्वे
धम्या लेका.. जॉकी माझी वापरतो रे.. किती वेळा गयावया केली, ऐकतच नाही लेकाचा!!!!
11 Feb 2011 - 9:24 pm | धमाल मुलगा
12 Feb 2011 - 11:25 am | आत्मशून्य
फारच बोल्ड स्टेट्मेट देता बूवा तूम्ही.
16 Feb 2011 - 9:39 am | llपुण्याचे पेशवेll
आपला प्रांजळपणा आवडला. जॉकी तुमची वापरतो ते दुसरा पर्याय नाही म्हणून का आवडते म्हणून. :)
11 Feb 2011 - 10:13 pm | पक्या
अंडरवेअर नव्हे हो..इनरवेअर .
जर सरसकट आतील कपड्यास एकच (इंग्लीश) शब्द वापरायचा असेल तर इनरवेअर हा शव्द आहे. अंडरवेअर म्हणजे काय ते सर्वांना माहितच आहे. बनियन ला अंडरवेअर म्हणता येणार नाही...अपरवेअर म्हटला असता तर ठिक वाटले असते.
11 Feb 2011 - 10:21 pm | निशदे
इतका सुंदर विषय आणि ज्ञानप्रसाराचा आपला प्रयत्न पाहून अतिशय आनंद झाला. हा लेख क्रमशः करावा. याविषयी आणखी 'खोलात' जाऊन लिहिलेत तर समस्त मिपापरिवार ऋणी राहील....
:)
12 Feb 2011 - 12:18 am | गोगोल
हे काय बरोबर नाय...फक्त पुरुषांना झुकते माप दिल्हे म्हणून सर्व महिला मुक्ती वाल्या आघाडी उघड्तील ना!
एकदा ब्रा पॅण्टी कशी परीधान करायची ते पण होऊन जौ द्यात .. ती पण अंतर्वस्त्रच ना?
12 Feb 2011 - 12:04 pm | युयुत्सु
हे संशोधन इग्नोबेल पुरस्कारासाठी पाठवायलाच हवे. बाकी अर्थशास्त्राचे अभ्यासक अंतर्वस्त्रांचा खप हा एक आर्थिक प्रगती / अधोगतीचा इंडिकेटर म्हणुन वापरतात असे ऐकले होते.
13 Feb 2011 - 7:19 pm | अक्स
अन्तर्वस्त्रे परिधान करने एवढे कठिन असेल तर न घातलेलिच बरी बुवा...
14 Feb 2011 - 9:36 am | गुंडोपंत
पण त्यावर असलेले लेबल मानेला रूतू नये म्हणून व बाह्यांचे बनियन असेल तर गळ्याला अन काखांना त्याची शिलाई रूतू नये म्हणून ते अंतर्वस्त्र (किंवा बनियन) हे उलटे (म्हणजे शिलाई किंवा ते लेबल बाहेर असलेले ) घातले पाहीजे असे माझे मत आहे. तर मित्रांनो, घ्या कात्री अन फाडून टाका अंडरविअर अन कॉलरचे लेबल, अन बघा तो किती 'आराम का मामला' होतो ते.
अहो हे तर आम्ही गेली अनेक वर्षे करत आहोत. बनियन नेहमी उलटाच घातला पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे लेबल्स कापून टाकले पाहिजेत. ते कापतांना जपून कापावेत अन्यथा कापड कापण्याचा धोका असते. आणि नवीन घेई पर्यंत उगा भोकाचे वापरत बसावे लागतात.
नाडीच्या चड्डीला माझा शिंपी लेबल लावत नाही. लावले तर त्याची धडगत नाही!
14 Feb 2011 - 9:48 am | आजानुकर्ण
शिंप्याची की लेबलची?
14 Feb 2011 - 8:05 pm | प्रकाश घाटपांडे
म्हंजी लेबल बाहेरच्या अंगाला येतय. पन आमी बनेल घालतच नाय कोपरी घाल्तु! कोपरीला ग्लॅमर मिळाव अशी लई दिसापासुन विच्छा हाय! मदी यकदा आम्ही फ्याब इंडिया नावाच्या यका हायफाय दुकानात गेलो आन तिथ कोपरी मागितली. यडाच झाला त्यो. स्वारी वुई डोंट ह्याव सच क्वाश्चुम अस काय तरी म्हन्ला.
16 Feb 2011 - 7:07 am | गुंडोपंत
कोपरी सगळ्यात बेष्ट बघा!
शिवाय खिसा असतो ती सोय वेगळीच! :)
15 Feb 2011 - 9:37 am | मदनबाण
ह्म्म...
उगाच व्हिक्टोरीयाज सिक्रेट्च्या मदनिका डोळ्या समोर तरळुन गेल्या... असो. ;)
16 Feb 2011 - 9:41 am | llपुण्याचे पेशवेll
अंडरवेयर उलटी (म्हणजे आतली बाजू बाहेर करून) घातली म्हणजे काचण्याच्या त्रास कमी होतो असे ऐकून आहे.
17 Feb 2011 - 12:20 pm | वपाडाव
पुपे...
हे पावसाळा / ईतर वेळी म्हणजेच जेव्हा अंतर्वस्त्र दुसर्या दिवशीही भिजलेले असेल/वाळलेले नसेल तेव्हा.
16 Feb 2011 - 10:53 am | पाषाणभेद
- चला, म्हणजे माझे बोलणे काहीच चुकत नव्हते. घरी मी माझ्या बनीयन शर्टचे लेबल काढून टाकतो तर बायको हसत होती. तुम्ही फारच नाजूक अशी ती म्हणत असे. आता मला त्याचे समर्थन करता येईल.
- 'अंतर्वस्त्रे' म्हणून मी फक्त बनियन चे उदाहरण दिले. त्याच्या पुढचे इमॅजीनेशन करणे ज्याच्या त्याच्या हातात (डोक्यात) आहे. ज्यानेत्याने स्वता:च्या जबाबदारीवर तसे करावे.
- धागा वाचणार्यांचे, प्रतिसादकांचे, इमॅजीनेशन करणार्यांचे आभार अन 'आराम के मामले के लिए' शुभेच्छा.
- तुम्हाला 'आराम' केल्यावर कसे वाटले/ वाटते ते ऐकण्यास उत्सूक असलेला,
पाभे / दफो