स्त्री बद्दल ची एक बाजु

गणेशा's picture
गणेशा in काथ्याकूट
11 Feb 2011 - 4:33 pm
गाभा: 

चर्चा सत्रावर माझा हा पहिलाच धागा.. शक्यतो माझी मते जास्त ठाम असतात . पण खाली काही मुद्दे आहेत (सत्य आहेत हे सगळे मुद्दे ) त्यांची उत्तरे अजुनही मला मिळत नाहित.. तुम्ही मला मदत केली तर आवडेल
स्त्री ही माता भगिनी असते म्हणुन सर्रास त्यांच्यावर प्रशन उपस्थीत केले असेल तर क्षमस्व, परंतु असे नाहि घडले पाहिएज हे मनापासुन वाटते.. अजुनही मुद्दे आहेत पण नंतर लिहितो ..वेळ कमी आहे.

---

स्त्री -पुरुष समानता विषयी खुप पोटतिडकीने बोलले जाते, वयक्तीक रीत्या माझ्या सर्व मित्र -मैत्रीणी ह्या रोखठोक आणि स्वतंत्र विचार .. घरच्यांची अवास्तव बंधने नसलेल्या आणि काही महिला मुक्ती मोर्च्यासम असलेल्या आहेत. मस्त भांडन वगैरे ही होते आमच्यात पण फक्त वैचारीक , एकमेकांच्या विचारांचा रेस्पेक्ट पण केला जातो, पण त्यांच्या बाबतीतल काही प्रश्न खुप भयानक आहेत असे मला वाटते .. त्यांना सांगुन ही ते पटत नाहि .. खाली येणार्या मुलींची नावे मी बदलतो आहे .. क्रुपया कोनी वयक्तीक घेवु नये.

१. माझी मैत्रीण शरयु आहे, खुप निरागस लाघवी गोड.. स्वतंत्र विचारसरणी असली तरी घरच्यांच्या गावाकडील वातावरणाचा आणि मॅनेजर आहे म्हनुण कंपणीतील लोकांचा व्यवस्थीत संगम तिच्या राहणीमानात आहे,
आमच्या घरचे ही मुलगी म्हणुनच तिच्याशी बोलतात.
सांगण्याचा मुद्दा हा आहे की, अशी मुलगी जेंव्हा तिचे लग्न ठरत असते तेंव्हा, एका मुलाच्या प्रेमात पडते आणि नंतर सर्व मित्रांशी भेटने तर दूर बोलणे ही खुप कमी करते.
चुकुन १०-१५ दिवसांनी मित्रांचा फोन घेतला तरी नीट बोलत नाहीच पण त्यावेळेसच त्या मुलाचा फोन आला की लगेच तो फोन उचलते,
एकदा तर एका मित्राने डायरेक्ट विचारले का ग, तु त्या मुलाशी लग्न कर पण बाई.. खाता-पिता, जागता - उठता तु त्याचाच धावा करते , कुठे ही जाताना .. येताना तो म्हणेन तसेच करते ..
मग तुझा जो अधिकार आहे तो तु लग्ना आधीच त्याला बहाल करते आहे, मग अश्याने तुमच्यावर तो हळु हळु त्याचेच म्हणन्याने झाले पाहिजे असे बिंबवेल ना पुढे जावुन ...
परत त्याचा फोन आला की इतर चालु असलेले फोन कट नाहि केला तर असे नाहि वाटणार का त्याला पुन्हा की माझा फोन आला तरी ही का मला वेटींग वर ठेवते आहे. कारण त्याला असली सवयच नसते

मला याचे उत्तर अपे़क्षित आहे, की बर्याच मुली पाहिल्या आहेत मी बर्या पैकी अशी परिस्थीती असते त्यांची , स्वता त्या इतक्या वाहुन घेतात प्रेमात की सगळे त्याच्याच साठी ..त्यावेळेस त्या स्त्री -पुरुष समानता सगळे विसरुन जातात .. सगळे तो म्हणेन तसेच आणि लग्न ही करतात
मग नंतर त्या चिडुन - तो म्हणेल तसे झाले पाहिजे त्याला प्राधान्य दिले पाहिजे हे त्या कसे म्हणुन शकतात ? आणि शिवाय स्त्री पुरुष समान आहेत असे ह्यांचे मत असते मग पहिल्यापासुन ते स्वाधिन का होतात .. आणि मग नंतर जेंव्हा वेळ जाते तेंव्हा समस्त पुरुष जातीस त्या का सगळॅ असेच असतात असे संबोधतात.

मला प्रश्न हा आहे की येव्हड्या शिकल्या सवरलेल्या मुलींना पण तो सोडुन असणारे जग आपले मित्र मैत्रीण.. घरचे इतर असली नातीच राहत नाहित .. सगळे त्यावर दिपेंड होतात , आणि नंतर मुलेच लग्न झाल्यावर बदलतात असेही बोलतात.
नक्कीच स्त्री ने भान ठेवुन व्यवव्थीत प्रेम करावे .. पहिल्यापासुन आप्ले मुद्दे व्यव्स्थीत क्लिअर ठेवावे असे मनापासुन वाटते नाहितर मग पुढे इगो प्रॉब्लेम मुळे संसार उद्ध्वस्त होतात.

२. माझी आनखिन एक मैत्रीण आहे, मनाली.
स्त्री मुक्ती बद्दल ही खुप बोलते. घरचे लग्न कर म्हणुन मागे लागले आहेत तर मुले लग्न केल्यावर बंधने टाकतात म्हणुनच लग्न नको असा हट्ट पण करते ही बर्याचदा. २-४ मुले घरच्यांनी दाखवली तर त्यांना हीने विचारले होते की मी मंगळसूत्र घालणार नाही.. मी हे करणार नाही.. मी ते करणार नाही.. समान पाहिजे सगळे (त्या मुलांनी डोयीजड होते आहे म्हणुन नाहि म्हंटले रादर हिनेच आधी त्यांना नकार दिला)
इथपर्यंत मला मान्य आहे

पण आता कंपणीतील एक मुलगा तिच्या प्रेमात आहे, लग्नाचे विचारले आहे.. तर त्याचे म्हणने आहे हीने कुठल्याही मुलाशी बोलु नये... मैत्री ठेवु नये ..बाकी सर्व मला मान्य आहे घरकाम सोबत .. मंगळसूत्र नको घालु .. पुण्यातच राहु .. असेच आणि तसेच.
पण त्याला हीने कोणा मुलाशी बोललेले नाहि आवडत, हिलाही तो आवडतो.

माझ्या मैत्रीणीला एक बेस्ट फ्रेंड म्हणुन खुप समजावले मी नको करु तुझे अस्तित्व संपेन .. तो आताच तुझ्याशी या विषयावरुन भांडतो.. तुझे विचार कसे आहेत तु कशी आहे .. आणि तु का अधीन होते आहे ..
तरीही ति त्याच्याशी लग्न करणार आहे म्हणते आहे.

मला उत्तर कळत नाहिये की मुली स्वताचे स्वातंत्र्य येव्हड्या लवकर का गहान टाकतात , स्वताचे विचार .. अस्तित्व यांपासुन त्या विरक्त होउन काय मिळवत आहेत.
जेंव्हा परिस्थीतीची जाणीव होयील तेंव्हा वेळ निघुन गेली असेन मग पुरुषांवर खदे फोडण्यापेक्षा आताच का त्या निर्णय व्यव्स्थीत घेवु शकत
.
नोट :
आणि येथे मी जे उदाहरणे दिली आहेत ती फक्त एक प्रातिनिधिक आहेत .. असे सर्रार घडते आहे.
हे आधी नको का सुधारावयाला.
(कृपया येथे वयक्तीक मैत्रीणी असे लिहिले आहे , तरी कोणॅए वयक्तीकतेवर येवु नये. मला लेख जास्त लिहिता येत नाही पण हे प्रश्न पडलेच आहेत म्ह्यणुन विचारले .
प्रश्न उपस्थीत करण्याचे कारण कामापुरते नर हा धागा आहे. आता ३ दिवस सुट्टीवर आहे.. त्यामुळे उत्तरे द्यायला मी नसेल, मंगळवारी येइन )

प्रतिक्रिया

शरदिनी's picture

11 Feb 2011 - 4:49 pm | शरदिनी

आत्ता गडबडीत आहे... तीन दिवसांनी सुंदर कविता लिहीन या विषयावर...

गोगोल's picture

11 Feb 2011 - 4:53 pm | गोगोल

विषय तर कळला हे काय कमी आहे?

टारझन's picture

11 Feb 2011 - 4:53 pm | टारझन

तिन दिवसांनी ? का ? अडचण आहे का ? :)

सोत्रि's picture

12 Feb 2011 - 2:34 am | सोत्रि

टारू,
असे अंमळ वैयक्तिक प्रश्न विचारू नये चारचौघात ;)

दुसर्‍या केसबाबत: प्रेमात पडणे हाच एवढा गाढवपणा आहे की त्याबद्दल काय बोलावे. प्रेमात पडणे म्हणजे कमालीच्या असुरक्षिततेला बळी पडणे. (किंवा प्रेमात पडण्यापर्यंत ठीक्..पण लग्नात त्याचा शेवट झाला तरच भरुन पावलं असं प्रेम म्हणजे नक्कीच कमालीची असुरक्षितता आणि स्वहस्ते स्वबळी.) असो..

उत्तम विषयाला वाचा फोडलीत.. बघू आता काय होते.

स्वतंत्र विचारसरणी .. घरातील बंधने न घालणे हे मुद्दे आहेतच.
पण आपला जोडीदार आपण निवडु शकतो हे स्वातंत्र्य पण त्यात आहेच.

बाकी उत्तम विषयाला वाचा फोडली असे म्हणुन थोडा धीर दिला. मला तर उगाचच असा थ्रेड काधला असे झाले.. कधीच नाहि आणि डायरेक्ट असे नको लिहायला पाहिजे असे वाट्त होते.
असो तरी २ नंबरची मैत्रीण आहे ना तिला शेवट पर्यंत समजावण्याचा प्रयत्न करतो आहे, नाही तर तिचा डिवोर्स फिक्स आहे हे आताच तिला लिहुन देणार आहे.
आधीच तीचे भाउ जनरली असेच बोलत असत आता तर मी ही तसेच बोलणार आहे, कारन हिचे विचार म्हणजे पुरुष मंडळी गपगार होतात भाउ..
मुली अश्या कशय अडकतात देव जाणे ...
माझय अनुभवावरुन निगेटीव्ह गोष्टींकडे त्या लवकर आकर्षित होतात.

असो

शरदिनी ताई का गरिबाची चेष्टा करुन राहिलाय जनु.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2011 - 12:00 pm | पिवळा डांबिस

असो तरी २ नंबरची मैत्रीण आहे ना तिला शेवट पर्यंत समजावण्याचा प्रयत्न करतो आहे
ज्यांना प्रेम करायचं ते बेधडक प्रेम करतात...
उरलेले मैत्रिणींचे असे नंबर लावतात....
;)

असो, वेतोबाक काळजी!!!

वाहीदा's picture

13 Feb 2011 - 7:10 pm | वाहीदा

प्रेम हे बेधडकच करायचे असते कोणाचीही तमा न बाळगता

बेस्ट फ्रेंड.. मित्र-मैत्रीणी ..घरचे आणि प्रेमिका..
या वेगवेगळ्या नात्यांचे बंध जो नेहमी योग्य जाणतो त्याला कोणाचे नंबर लावण्याची पाळी येत नाही.

विषय काय आपण रिप्लाय काय देतो याचे भान असणे गरजेचे आहे, असे मला वाटते..

.प्रेमात पडण्यापर्यंत ठीक्..पण लग्नात त्याचा शेवट झाला तरच भरुन पावलं असं प्रेम म्हणजे नक्कीच कमालीची असुरक्षितता आणि स्वहस्ते स्वबळी

गविशेट, सुरक्षित प्रेमाच्या शोधात एखादी छानसी छोकरी असेल तर तीला माझा पत्ता द्या हो प्लीज! :-)

सुरक्षित(गाढव)

मुलूखावेगळी's picture

11 Feb 2011 - 5:10 pm | मुलूखावेगळी

छान उदाहरणे घेतलीस प्रतिनिधीत्व करणारी.
शरयु चे म्हणशील तर हे नेहमीच दिसतात. ज्या लग्नानंतर मित्रांना बोलत पन नाहीत.
ऑब्वियसली नवर्याला पटनार नाही म्हणुन तर ना.
आणि २री मैत्रीण मात्र मला स्त्रीमुक्त तर जाउ दे समानता अपेक्षिनारी पन नाही वाटली नाही.
हटवादी वाटली. प्रेमात पडल्यावर तर काय प्रेमांधळी झाली थोडक्यात.

मुली स्वताचे स्वातंत्र्य येव्हड्या लवकर का गहान टाकतात , स्वताचे विचार .. अस्तित्व यांपासुन त्या विरक्त होउन काय मिळवत आहेत.

साधारणतः लग्न ठरल्यावर आनि प्रेमात पडलेले स्त्री -पुरुष ही कशाला ही तय्यर अस्तात.
बायका नवर्यच्या रंगात मिसळुन घेण्याचा प्रयत्न करत्तात.कदाचित वाद होउ नये म्हणुन खुप जणीना हे छान जमते. आनि लोकापवाद नको म्हणुन ह्या नवर्‍याला कायम सहमती दर्शवतात.
ज्याना जमत नाही प्रश्न फक्त त्यंचाच आहे अणि त्यांना सासरचे, नवरा भरपूर नावे ठेवतात.
हा पण कोंडमारा असतोच अनेकिंच्या आयुष्यात

ज्यांना फक्त नवर्‍याला सहमती विनाकारण द्यायची म्हणुन द्यायची नसते, जे बरोबर ते बरोबर जे चुक ते चुक हे रोखठोक. त्यांनी लग्न ठरवतानाच या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत, भले ते मनाली या उदाहरनासारख्या हटवादी जरी वाटल्या, चुकीच्या जरी असल्या तरी त्या स्वत:च्या आहेत हे तरी त्यांना नंतर कळते,
आणि जर नवर्‍याकडुअन अशी अपेक्षा करणार्‍या व्यक्ती नक्कीच समाजात .. घरात तश्याच वागत आलेल्या असतील.
म्हणुन नंतर्चे पृओब्लेम कुडत जगणे तरी येणार नाही,
सेम प्रकारे पुरुषांनी ही त्यांचे सर्व क्लिअर केले पाहिजे... नाहितर काहिंचे बुरसटलेले विचार नंतर कळुन काय फायदा.

बाकी .. प्रेमात पडणे काय कींवा लग्न होणे काय यामध्ये स्वताहुन परावलंबन त्यांनी प्रथमताच स्विकारले नाही पाहिजे,
जुळवुन नाहि घेतले पाहिजे हे मी म्हणत नाहि पण स्वताचे अस्तित्व टिकवणे महत्वचे आहे, हा कोअणी बळजबरीने तसे करत असेन तर ते दु:ख वेगळे आहे, पण या धाग्याचे मुळ हे आहे की स्वताहुन असे बळी का जातात मुली.
आणि असे नाहिये की या बोतावर मोजण्या इतपत आहेत, खुप उदाहरणे आहेत यांची.

मला तर कधी कधी वाटते, मुलींशी कीतीही निखळ मैत्री केली तरी त्यांना नंतर (लग्नानंतर/ बॉयफ्रेंड मिळाल्या नंतर)त्याचे जास्त काही वाटत नाहि, एक सामान्य मित्र यातच गणना होती,
याउलट मुले मैत्रीमध्ये कसे ही बोलु द्या ... भांडु द्या ते एन मोक्याच्या टाइम ला घरच्यां अगोदर हजर होतात.

हा अनुभव आहे, बहुतेक मुलींना ही अनुभव असेन्च (असा अनुभव आहे पण काही २-३ मैत्रीणी ज्या लग्ना नंतर पण आपणहुन मैत्री ठेवतात , त्यांच्या नवर्‍याला घेवुन घरी येतात, मस्त जेवुन जातात, बोलतात आणि पहिल्या सारख्या राहतात, त्यांच्यामुळेच मला मुलींशी मैत्री करण्यास काही हरकत वाटत नाही, नाहि तर आता पर्यंत आम्ही फकत मित्रांसाठीच असे झाले असते, अजुनही मित्र जास्त आहेत मात्र मला.. )

आजानुकर्ण's picture

11 Feb 2011 - 5:51 pm | आजानुकर्ण

जाऊ द्या गणेशराव, जास्त लोड घेऊ नका. इतरांच्या संसारात नाक न खुपसलेले चांगले. नवरा बायको काय ते बघून घेतील. आपल्याला काय करायचंय. तुम्ही मंगळवारी एखादी झकास कविता टाका.

नाक खुपसणे नाहिये हे असे मला वाटते,

माझे फ्रेंड्स हेच माझी अ‍ॅसेट आहे, त्यामुळे जास्त वाटते.. अआणि फक्त त्यांचयबद्दल पण हे घडत नहै ना म्हणुन वाईट वाटते.
बरेच लिहायचे राहुन गेले आहे.

असो . निघतो आहे

गुडनाईट
वीकएंड चांगला जावो आपला.

- गणेशा

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2011 - 6:02 pm | परिकथेतील राजकुमार

माझे फ्रेंड्स हेच माझी अ‍ॅसेट आहे

अगदी अगदी मनातले बोललात.

ह्यामुळेच मी धम्या, डान्या, बिका वगैरे असले की पाकिटाला हात घालत नाही.

गणेशा's picture

11 Feb 2011 - 5:56 pm | गणेशा

चला निघतो ... फक्त २-३ दिवस

धागे टाकुन निघुन गेला वगैरे बोलु नये ..
सुट्टी हाय ना राव .. गेलेची पाहिजे गावाला.

मिपाचाह्ते's picture

11 Feb 2011 - 6:14 pm | मिपाचाह्ते

प्रेमाची हवा डोक्यात जाणे म्हणतात ह्याला! लोक सरळ पणे लग्न ठरला कि मी म्हणजे वेगळा!! आणि आजू बाजूचे लोक पण आपल्या जागा मध्ये आहेत हे सरसकटपणे विसरून जातात :(
अन मग चार दिवस नव्या प्रेमाचे संपले कि परत आपला मित्र परिवार किती चांगला होता, असा विचार येतो. सगळ्यांना जपून पुढे जाणे जास्त गरजेचे असते, पण हे नाही काळात कोणालाही.
हे मान्य कि मुलींची विचारसरणी, माझ्या नवर्याला एखादी गोष्ट आवडते तर आपण असा करू न तसं करू अशी असते. पण ह्यामागे केवळ dependency असा नाही म्हणता येणार, प्रेम हि ह्यामध्ये असत ना ! फक्त अस कि ह्याचा अतिरेक होऊ नये. उदा १ न २ मधल्या तुमच्या मैत्रिणीला वास्तव लवकर कळावे हीच सदिच्छा .

५० फक्त's picture

11 Feb 2011 - 6:17 pm | ५० फक्त

"माझे फ्रेंड्स हेच माझी अ‍ॅसेट आहे, " - लग्न झालं ना कि हे सगळे ऐसेटस लायबिलिटि होतात, पुरुषांना हे कळायला वेळ लागतो, तर बायका या चेंजओव्हरला आधिच तयार असताआ, किंवा त्यांनी तयार असावं हा पुरुषांचा आग्रह असतो.

"माझ्या मैत्रीणीला एक बेस्ट फ्रेंड म्हणुन खुप समजावले" हे समजावणे आयुष्यात लई बेक्क्कक्क्कार महाग पडु शकते. (स्वानुभव आहे, आणि लिहिण्यासारखा नाही, नाही तर एक ८-१० लेखांची मालिका झाली असती) मैत्रीची लिमिट घराच्या बाहेर असलेली चांगली," तु तुझ्या घरात परी तर मी पण माझ्या घरात परी " हेच खरं.

गणेशा,

पहिलं लिहिणं सुधारा राव, चांगलं लिहिताय, भावनात्मक होवुन लिहित असाल कदाचित पण प्रकाशित करण्यापुर्वि एकदा पुन्हा वाचुन पहा राव. काय ते व्याकरंण विराम चिन्हं जरा वापरा की मोकळ्या हातानं. अर्थाचा अनर्थ होतो ब-याचदा. वरच्या लिखांणात करायचा ठरवलं तर गेला बाजार ५-६ ठिकाणी हे करता येईल.

समजावणे बेक्कार महाग पडुअ शकते हे मान्य ..
पण समजावने यामध्ये गोड समजुत काढणे असे नाहिये .. [:)]
अवांतर :
आपण भेटलेलो आहेच म्हणुन मी गोड बोलुन समजावु शकत नाहि हे कळाले असेनच.. त्यामुळे माझी मैत्री ही कडु बोलाची असते .. ज्याला शब्दामागच्या भावना कळतील त्यांचे ठिक नाहितर.. तुमच्या आयुष्यात तसेच कुढत बसा .. असे रोखठोक बोलणारा मी .. मार्ग दाखवणे मित्रांचे काम , मग फ्रेंड पुरुष असो वा स्त्री मला तरी मैत्री मध्ये असे वेगळॅ बांध आवडत नाहि, विषय स्त्री संबंधी होता म्हणुन स्त्री मैत्रीचे मुद्दे आले.

बाकी शुद्धलेखनाबद्दल माफी.. प्रयत्न करतो आहे

सूर्यपुत्र's picture

11 Feb 2011 - 6:56 pm | सूर्यपुत्र

की आपल्या प्रत्येकाला (त्यात स्त्री किंवा पुरुष असा फरक नाही) कोणतातरी पिंजरा हवाच असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगळे पिंजरे निवडतो. म्हणजे बालपण, नंतर तरुणपण मग त्याच दरम्यान करिअर, लग्न, मग पोरंबाळं संसार आणि इतर सर्व गोष्टी..... या पिंजर्‍यांशिवाय आपण स्वःताला अपूर्ण समजतो, किंवा आपल्याला आपल्यात काहीतरी कमतरता जाणवते.
(माझे कदाचित चुकतही असेल, पण मला असे जाणवले. यातील चूक निदर्शनास आणून द्यावी, ही विनंती.)

-सूर्यपुत्र.

बरोबर ..
पण ह्या पिंजर्‍याचा परिघ वाढला पाहिजे असे मला वाटते..
आणि आयुष्याच्या टप्प्यात या पिंजर्‍याचा परिघ वाढत राहिलाच पाहिजे तरच तो माणुस .. नाहि तर आयुष्य म्हणजे एक खुराडा होउन जाईल

शिल्पा ब's picture

11 Feb 2011 - 11:50 pm | शिल्पा ब

पुरुष प्रचंड इनसिक्युअर असतात...आपली बायको किंवा प्रिय मैत्रीण दुसऱ्या पुरुषाशी मैत्री ठेऊन आहे म्हणजे कदाचित तिच्या आपल्याडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाहीत किंवा आपण त्या पूर्ण करू शकत नाहीत असा काहीसा विचार असतोच...पण पुरुषच असल्याने दुसऱ्या पुरुषाच्या मनात आपल्या बायको/ मैत्रिणीविषयी काय विचार येत असतील/ येऊ शकतात हे तो स्वताच्या मनाला विचारून बघतो आणि ते विचार काही फार सुद्धा नसल्याने मग त्याला तो दुसरा आपल्या बायकोला/ मैत्रिणीला वश करेल असे वाटून मग भांडतात.....पण विश्वास काही ठेवत नाही...ना बायकोवर - ना मैत्रिणीवर.

आत्मशून्य's picture

12 Feb 2011 - 11:15 am | आत्मशून्य

पूरुष हा नैसर्गीकरीत्या त्याच्या स्त्री बाबत वैचारीक वागणूकीने एकदम "ओपन बूक" असतो. तसा सहजपणा हा त्याला स्त्रीच्या वागणूकीत कधीच दीसत नाही, त्यामूळे त्या सततच आतल्या गाठीच्या असल्या प्रमाने मनात एक व वागण्यात दूसरं असे काहीतरी लपवून वागत असल्यासारख्या भासतात, व वरती पुरुशांना तूम्हाला आमचे मन कधीच कळत नाही असे टोमणे मारण्यात धन्यता मानतात.

प्रत्येक पुरुशाला स्त्रीचे मन हे मानवीच असल्याने ते कसे वीचार करत असते चांगलेच समजत असते पण तसे वीचार स्त्रीच्या बोलण्यात व वागण्यात कधीही खूल्याप्रमाणत व सहजपणे व्यक्त होताना अनुभवाला येत नसल्याने स्त्रीयांच्या एकंदर वर्तणूकीबाबत मनातून असंतूश्ट होतात (मग ती स्त्री एकनीश्ट असो वा नसो). परंतू अशा अवीश्वाच्या वागणुकीची परीणीती ही नातेसंबंध संपूश्टात येण्यात होत नसल्याने व सर्वच स्त्रीयांचा स्वभाव (९०%) असाच अनुभवाला येत असल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप असा सूखी संसार(?) मस्त चालु असतो.

खरे तर स्त्री पुरुशातील या गंभीर असंतूश्टीला स्त्रीया वाटाण्याच्या अक्षता लावत असताना जेव्हां तीसरा प्राणी मधे येतो तेव्हां कोणतेही गंभीर कारण/प्रकरण घडलेले नसताना ऊघड वा छूपी वाचा फुटते... ज्याची स्त्रीया पूरूंशांचा मेला आमच्यावर वीश्वासच नाही, तूमच्याच मनात पापं असे संबोधून ऊर्मट बोळवण करतात ज्यालाअ चोराच्या ऊलट्या बोंबा असे एक सूचक नाव पण देता येइल.

केवळ शारीरीक द्रूष्ट्या बलवान आहेत म्हणून सर्व पुरूशांना बदनाम कराय्ची एक लाटच आले आहे जणू.

शिल्पा ब's picture

12 Feb 2011 - 11:45 am | शिल्पा ब

यालाच चोराच्या ऊलट्या बोंबा असे म्हणता येईलसे वाटुन गेले....बाकी पुरुष ओपन बुक असतात आणि अगदी खर्रे खर्रे असतात हे वाचुन मन भरुन आले, डोळे पाणावले अन परीणामी नाकसुद्धा पाणावले....अजुन आमचे ज्ञानवर्धन करुन पुण्य आपल्या प्यांटीच्या / शर्टाच्या खिशात पडावे हीच प्रार्थना..

बाकी आपले नाव अगदी शोभते हो!!!

आत्मशून्य's picture

12 Feb 2011 - 12:04 pm | आत्मशून्य

बाकी पुरुष ओपन बुक असतात आणि अगदी खर्रे खर्रे असतात हे वाचुन मन भरुन आले.

होय पूरुश हे वैचारीक द्रूश्ट्या ओपन बुकच असतात. आजतागायत कॉणीही पूरूशांच्या मनातले वीचार कधीच वाचता येत नाहीत असे वीधान केलेले नाही मगी लेखक स्त्री असली तरी बेहत्तर.

डोळे पाणावले अन परीणामी नाकसुद्धा पाणावले

आजारी पडणार असाल तर त्वरीत डॉक्टरकडे जावे व ऊपचार घ्यावेत, दूखणे अंगावर काडू नये. बरे झाल्यावर माझे आभार मानयच्या ऊद्योगात न लागता गैरसमज करून घेण्याच्या असलेल्या ऊपजत (प्र)व्रूतीचा त्याग करावा.

पू.ले.शू.

शिल्पा ब's picture

12 Feb 2011 - 12:43 pm | शिल्पा ब

आपले ज्ञान बघुन वारंवार मन भरुनच येते बघा...इतके अमुल्य ज्ञान आम्हाला दिल्याबद्द्ल आपले आभार तर मानायलाच हवेत...बाकी माझी काळजी घेण्यास मी समर्थ असल्याने आपण विश्वाचीच चिंता वहा कसे!!

आत्मशून्य's picture

12 Feb 2011 - 1:13 pm | आत्मशून्य

बाकी माझी काळजी घेण्यास मी समर्थ असल्याने

ठीक आहे मग क्रूपया तूमच्या आजारपणाची लक्षणे माझ्या लेखनात प्रतीसादू नका.

आपण विश्वाचीच चिंता वहा कसे!!

हा तूमच्या कडून मीळत असलेला मोठेपणा समजायचा की हेटाळनी ? स्पष्ट करा.

शिल्पा ब's picture

14 Feb 2011 - 11:53 am | शिल्पा ब

<<<ठीक आहे मग क्रूपया तूमच्या आजारपणाची लक्षणे माझ्या लेखनात प्रतीसादू नका.

अहो म्हणुनच तर म्हंटले ना की आपले ज्ञान बघुन मन भरु भरु येतंय....बाकी इतक्या छोट्या गोष्टीचे स्पष्टीकरण आपल्यालासारख्या विद्वानाला मागावे लागते यासारखे दुर्दैव ते काय!! तुमचे चालू द्या ...आम्हाला इतर कामं आहेत.

आत्मशुन्य ,
(आधी आपले टोपण नाव बदला हो - एक नम्र विनंती)
केवळ शारीरीक द्रूष्ट्या बलवान आहेत म्हणून बरेचसे पुरुष आपले म्हणणे आपली स्त्री ऐकून घेत नाही किंबहूना ऐकून घेतले तरी तशी वागत नाही म्हणून शारिरिक मारहाण ही करतात ..
काही शारिरिक मारहाण न करता मानसिक मारहाण करतात ज्याला मानसिक कुचंबणा असे म्हणतात
स्त्री ही क्षणाची पत्नी अन अनंत काळाची माता असते हे तुम्ही विसरलात मग मानसिक कुचंबणा / शारिरिक मारहाण सहन करित करित आज हजारो स्त्रीया संसाराचा गाढा यशस्वीपणे रेटत आहेत अन स्वतःच्या स्वत्वाचा बळी देऊन..कारण मुले बाळे यांची संगोपने स्त्री आपल्या अस्तीत्वापेक्षा महत्वाचीच मानते अन म्हणूनच घटस्फोटाची टक्केवारी भारतात कमी आहे.

असो, गणेशाने स्त्रीविश्वाच्या अतिशय महत्वाच्या निर्णय टप्प्याला वाचा फोडली. Everything is Fair in Love and War असे म्हणतात पण कधी कधी लग्नानंतर काही स्त्रीयांच्या बाबती Everything is UNFAIR IN LOVE हेच खरे आहे कारण आपल्या पतिप्रेमा पेक्षा ही कुटुंबप्रेम महत्वाचे असतेच असते
मग कुटुंबप्रेमासाठी / मुलाबाळांसाठी / आईवडिलांच्या ईभ्रतीसाठी समोर येईल त्या प्रसंगाला तोंड देतात

काही स्त्रीया अतिशय हुशार असतात ते पुरुषाला प्रेमात पाडतात पण स्वतः कधीच प्रेमात पडत नाहीत
पण अश्या स्त्रीया फार फार फारच कमी आहेत. त्यांच्या बध्द्ल न बोललेलेच बरे..

माझ्या ताईला एका अतिशय उच्चभ्रू शिक्षणसंस्थेत माध्यमिक शाळेत 'शिक्षिका' म्हणून Interview च्या वेळी हा प्रश्न विचारण्यात आला होता तो असा -
साप धाकला अन नवरा आपला असे कधी म्हणू नये या म्हणीचे स्पष्टीकरण द्या .
ताईने उदाहरण दाखल स्पष्टीकरण दिले अन तिला ती नोकरी ही मिळाली. पण सांगण्याचा मुद्दा असा साप कितीही धाकला म्हणजे छोटा असला तरीही तो साप आहे हे विसरु नये. पण जेव्हा अतिशय उच्चभ्रू शिक्षणसंस्थेत निवडसमिती हे प्रश्न विचारते याचा अर्थ आपल्या भारतिय समाजात हा प्रश्न अजूनही महत्वाचाच आहे अन नवरा निवडताना स्त्रीअस्तित्व धोक्यात येऊ शकते कदाचित शिल्लक रा्हू शकते ती फक्त एक घुसमट मग त्या घुसमटाला सामोरे जावेच लागते. अस्तीत्व नाममात्र, ज्याला उर्दूमध्ये 'वजूद' असे म्हणतात. शादीके बाद शायद औरत का अपना एक वजूद धिरे धिरे खत्म होने लगता है बाकी रहती है तो सिर्फ एक 'घुटन'. !!

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2011 - 12:36 pm | पिवळा डांबिस

साप धाकला अन नवरा आपला असे कधी म्हणू नये
ताईने (नोकरी मिळवण्यासाठी) काय स्पष्टीकरण दिले हे जाणण्यास उत्सुक......

शाहरुख's picture

12 Feb 2011 - 12:44 pm | शाहरुख

मी २

वाहीदा's picture

12 Feb 2011 - 2:03 pm | वाहीदा

त्यासाठी ताईलाच लोगीन करावे लागेल =)) =))
तिने उत्तराची सुरवात मजेशिर केली पण शेवटी सरते अतिशय गंभिर मुद्द्याकडे वळली की ,
या मुद्यामुळे ताईचा Interview संपता संपत नव्हता शेवटी एकदाचा संपला अन नोकरी मिळाली :-) अन तीही तिची पहिलीची अन आजतागायत कायम नोकरी आहे (पण त्यावर माझ्या मात्र बर्‍याच नोकर्‍या झाल्या :-( )

वाहीदा's picture

12 Feb 2011 - 2:29 pm | वाहीदा

कदाचित सर्व्हर स्लो असल्याने चुकून दोनदा प्रतिसाद आला अन तो काढून टाकला आहे

आत्मशून्य's picture

12 Feb 2011 - 1:08 pm | आत्मशून्य

आपली मते प्रामाणीक, व अभ्यासपूर्ण असतात व म्हणून मी नेहमी त्यांचा आदर करतो. आणी आपण जो प्रतीसाद लीहला आहे तो मला पूर्णपणे मान्य आहे. केवळ भारतच न्हवे तर जगाच्या पाठीवर सर्वत्रच पूरूषांनी स्त्रीयाना त्यांच्या शारीरीक बळाच्या जोरावर शोषण केलेले पहायला मीळते.

परंतू माझे मत व चर्चा ही केवळ शील्पा तै नी लीहलेल्या प्रतीसादाबद्दल आहे हे इथे नम्रपणे नमूद करतो. आणी एक मूक्त स्त्री म्हणून त्यानी त्यांच्या (गोड) गैरसमजातून पुरूशांवर जे आरोप केले/ मत लादले आहे ते कसे चूकतय हे दाखवून पुरूशांबाबत स्त्रीया कोठे चूकतात हे त्यांना सामजावून त्यांच्या मनोव्यापारात सकारात्मक बदल घडवणे इतकाच आहे. हे करताना जर काही भावना दूखवण्याचा प्रकार घडला अथवा चर्चेला भलतेच फाटे फोडणारे प्रसंग आले तर कृपया दूर्लक्ष करावे ही याचना. धन्यवाद.

वाहीदा's picture

12 Feb 2011 - 1:25 pm | वाहीदा

That's fine with me :-)

शिल्पा जी,

पुरुष इन्सेक्युर असतात आणि कसे असा मुद्दा नाहिये..

स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टीमध्ये बर्याच मुली स्वता होउन परावलंबत्व आधी पत्करु पाहतात, आणि परिस्थीती हाताबाहेर गेली की मग स्त्रीचे आयुष्यच असे असते असे बोलतात.. वेळीच ही परिस्थीती लक्षात आली पाहिजे असे वाटते म्हणुन हा थ्रेड आहे.

होप रीप्लाय बद्दल तुम्हाला परस्नली वाईट वाटणार नाही ...

आणि अश्या स्त्रीया/मुली खुप पाहिल्या आहेत आणि त्यांची कीव वाटते.. सगळे रीलेशन्स फिके पाडुन नवर्‍यासाठी/बॉयफ्रेंड साठी आम्ही हे करतो आहे असे लेबल लावतात पण तसे नसते.. होणार्या नवर्‍याला आधीच माझे मित्र-मैत्रीणी , नाती मी संभाळणारच असे सांगितले पाहिजे , तो तयार नसेल तर तो योग्य पती नक्कीच होउ शकत नाही म्हणुन त्याला जोडीदार निवडुच नये असे वाटते.

होणार्या नवर्‍याला आधीच माझे मित्र-मैत्रीणी , नाती मी संभाळणारच असे सांगितले पाहिजे , तो तयार नसेल तर तो योग्य पती नक्कीच होउ शकत नाही म्हणुन त्याला जोडीदार निवडुच नये असे वाटते.

लाख पतेकी बात ! पूर्णत: सहमत .

स्वाती२'s picture

12 Feb 2011 - 5:26 pm | स्वाती२

हम्म! ज्या मुलींना 'सशक्त नाते' म्हणजे काय हे कळत नाही त्या करतात असा मूर्खपणा. ज्या मुलींना घरी आईवडिलानी भलती बंधने न घालता वाढवलेले असते त्यातल्या काहींना तर सुरुवातीला प्रियकराच्या तालावर नाचणे रोमँटिकही वाटते. त्याचे ओव्हरपझेसिव असणे म्हणजे तो आपल्या प्रेमात अगदी पागल झालाय असा गोड गैरसमज असतो. हेकट स्वभावाला 'लहान मुलासारखा हट्टी आहे' असे लेबल लागते. शिवाय आपल्या प्रेमाच्या जोरावर आपण त्याला बदलू असा आत्मविश्वास असतो तो वेगळाच. असेच काहीसे मुलंही करतात. तिला आवडत नाही म्हणून कट्टा आणि बरेच काही तात्पुरते सोडतात. मग हनिमुन संपला की...
इथे उसगावातही चालतो हा प्रकार. त्यावर उपाय म्हणून आजकाल १२-१३ वर्षांच्या मुलामुलींसाठी बर्‍याच संस्था हेल्दी रिलेशनशिपवर वर्कशॉप घेतात, जेणेकरुन डेटिंगला सुरुवात करण्याआधी थोडेफार शहाणपण आले असेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Feb 2011 - 9:21 am | विश्वनाथ मेहेंदळे

एक मजेदार वाक्य ढकलपत्रातून आले होते.
A woman marries a man expecting that he will change, but he does not
A man marries a woman expecting that she will not change, but she does.

गणेशा's picture

15 Feb 2011 - 1:27 pm | गणेशा

मस्त रिप्लाय दिला आहे , आवडला

नगरीनिरंजन's picture

13 Feb 2011 - 12:05 am | नगरीनिरंजन

सगळ्याच मुली अशा नसतात रे गणेशा. काही काही मुली तर इतक्या सावध असतात स्वतःच्या भविष्याबद्दल की लग्नास होकार देण्यापुर्वीच जुने फर्निचर वगैरे नाही ना घरात ते पाहून घेतात.