गाभा:
परवाच मटा मधली ही बातमी वाचली. त्यावर गंणेश मंडळांची अपेक्षीत असलेली ही प्रतिक्रिया आज वाचनात आली.
जरी शाडूच्या मुर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुर्तीं पेक्षा वजनाला जड आणि महाग असल्या तरी मझ्या मते औरंगाबादच्या न्यायालयाने घालुन दिलेला हा धडा इतर उच्च-न्यायालयांमध्ये सुद्धा गिरवला गेला पाहिजे.
दरवर्षी अनंतचतुर्दशी नंतर दुसर्ञा दिवशी येणारे फोटो पाहुन जीव तुटतो. काही स्वयंसेवक आणि संस्था सोडल्या तर बाकी जनतेत या बद्दल निरुत्साहच दिसुन येतो.
दिवसेंदिवस सार्वजनीक गणपतीच स्वरुप बाजारु होत चाललय. गणपतीच्या उंचीवरुन विभागातल्या गणेशमंडळात चढाओढ लागलेली दिसते. शाडूच्या मुर्तीमुळे आपोआप गणेश मुर्तींच्या आकारावर बंधन येतील. वर निसर्गाची होंणारी हानी टळेल ते वेगळच.
कदाचीत मी एकांगी विचार करत आहे. मिपाकरांना काय वाटत हे जाणुन घ्यायला आवडेल?
प्रतिक्रिया
10 Feb 2011 - 7:20 pm | मनराव
एकांगी न्हवे सर्वांगी इचार आहे हा.... अगदी योग्य निर्णय दिला आहे औरंगाबादच्या न्यायालयाने........
10 Feb 2011 - 10:41 pm | टारझन
दोन पावले पुढे जाऊन मी तर म्हणेन , गणपतीविसर्जनावरंच बंदी आणावी..
दॅट इज सो क्रुएल यु नो ?
11 Feb 2011 - 8:08 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. त्यापुढे जाऊन मी म्हणतो की सार्वजनिक गणपती उत्सवावरच बंदी घालावी.
(आधुनिक) पेशवे
11 Feb 2011 - 9:55 am | आजानुकर्ण
अतिशय योग्य प्रस्ताव. सार्वजनिक गणेशोत्सव ही आता सार्वजनिक डोकेदुखी झाली आहे. गुंड-मवाली, भ्रष्टाचारी नगरसेवक, उर्मट कार्यकर्ते यांचे मोहोळ म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असे समीकरण झाले आहे. ध्वनीप्रदूषण, वाहतूकीचा उडणारा बोजवारा, वर्गणीस्वरूपातील खंडणी आदी अनेक प्रश्न या दिवसांत प्रकर्षाने भेडसावू लागतात. मागील वर्षी मोशी आणि चिंचवडमधील काळभोरनगरमध्ये वर्गणी दिली नाही म्हणून तीन तरूणांचे खून करण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली होती. सार्वजनिक गणेशोत्सवाचे काहीही प्रयोजन राहिलेले नाही. या उत्सवाच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे.
11 Feb 2011 - 10:11 am | llपुण्याचे पेशवेll
योग्य मत मांडलेत. तसेच गणेश मंडळे ही राजकीय शक्तीप्रदर्शानाची स्थाने देखील झाली आहेत.
स्पीकरच्या भिंतीमागे बसलेल्या गणपतीबाप्पांना काय काय बघावे लागत असेल. दारू पिऊन बिभत्स हावभाव करत नाचणारे कार्यकर्ते आणि आणखीही काय काय. गणेशोत्सवातली धार्मिकता आणि विधायकता, देशभक्ती वगैरे तर फारच दूर राहीली आताशा.
11 Feb 2011 - 10:43 am | आजानुकर्ण
सहमत आहे
11 Feb 2011 - 11:09 am | टारझन
पुपे + अजानुकर्ण + टारझन !!!
बंद करा हा तमाशा. जकार्ताहुन महाराष्ट्र सरकार ला एक पत्र जावे असे वाटते. !!
12 Feb 2011 - 7:02 am | शिल्पा ब
<<<जकार्ताहुन महाराष्ट्र सरकार ला एक पत्र जावे असे वाटते. !!
तुम्हाला काय धाड भरलीये...तुम्ही लिहा की..
12 Feb 2011 - 9:12 am | टारझन
म्हणजे जो पत्र लिहीणार णाही त्या प्रत्येकाला धाड भरली आहे , असे अपणास प्रतिपादायचे आहे काय ?
- पत्राणुकर्ण
12 Feb 2011 - 9:44 am | शिल्पा ब
प्रत्येकाला नाही ...तुम्हालाच!! सगळ्यांना सल्ले देताय म्हणुन म्हंटलं बाकी कै नै कै...
12 Feb 2011 - 10:02 am | टारझन
तसे तर सल्ले देण्यात तर तुम्ही माझ्या जस्ट पुढे आहात :) घ्या मग पुढाकार :)
- कसा ब
12 Feb 2011 - 10:05 am | शिल्पा ब
तो तर घेतलाच आहे...तुम्हालाच नाही का दिला सल्ला आत्ता !!
12 Feb 2011 - 10:12 am | टारझन
घ्या मग लिहायला पत्र :) ए कोण आहे रे तिकडे ? टाक आणि तमालपत्र घेउन या :) चांगलं झणझणीत ल्ह्या लास्टटायमागत :) शिव्या बिव्या टाकुन बिकुन
- मुन्ना बदनाम
12 Feb 2011 - 10:20 am | शिल्पा ब
महाराष्ट्र सर्कार्ला असं पत्र कितपत समजेल शंकाच आहे...पण सांगा आम्हाला तुमचे अनुभव...बाकी तुम्ही तमालपत्रावर नुसतेच टाकेनं लिहिता हे वाचुन कंठ दाटुन आला...
12 Feb 2011 - 10:27 am | टारझन
दॅट्स व्हाय परफेक्ट माणसाला पत्र लिहायला लावत होतो .. तर तुमची धाड पडली मधेच :)
श्याई तर तुमच्या कडे असे असं वाटलं होतं हो :)
- शिला जवान
12 Feb 2011 - 10:54 am | नरेशकुमार
अॅक्चुली, मिच घेतले होते पत्र लिव्हायला,
पण तेवढ्यात मलाच धाड भरली. (इतकि गच्च भरली म्हनुन सांगू ! )
म्हणुण मि आता लिव्हु शकत नाही.
तरीसुद्धा तश्याच भरलेल्या धाडेतुन प्रयत्ण करुण पाहतो.
धाड भरलेला णक्या.
12 Feb 2011 - 10:15 am | आजानुकर्ण
श्री. टारझन यांनी जाकार्ताहून महाराष्ट्र सरकारला पत्र जावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. श्री. टारझन हे पुणे व पक्षी महाराष्ट्रात व पर्यायाने भारतात आहेत. आजपर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार जाकार्ता हे ठिकाण इंडोनेशिया या देशात आहे. पुणे किंवा पिंपरी चिंचवड परिसरात जाकार्ता नावाचा परिसर असल्याची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे टारझन यांनी धाड भरलेली असली किंवा नसली तरी पत्र लिहिल्यास ते जाकार्ताहून महाराष्ट्र सरकारला जाईल याची कोणतीच शाश्वती नाही.
- आई गं
12 Feb 2011 - 10:27 am | टारझन
हॅ हॅ हॅ
11 Feb 2011 - 11:31 am | अवलिया
अतिशय योग्य चर्चा आणि अचुक समस्येचे आकलन.
प्लास्टर ओफ प्यारीसच्या मूर्त्या घरातील उत्सवातही वापरल्या जातात त्यामधे कशी काय सुधारणा करावी याबद्दल मार्गदर्शन मिळावे.
11 Feb 2011 - 10:56 am | गवि
एकूणच "सार्वजनिक" या शब्दाशीच "अस्वच्छता", "घाण", "विद्रूपता", "विटंबना", "प्रदूषण" या सर्व गोष्टी चिकटल्या आहेत.
सार्वजनिक काहीच नको. निदान धार्मिक तरी काही "सार्वजनिक" नको. त्यातूनच नसते प्रॉब्लेम्स उभे राहतात.
धर्माला आणि धार्मिक गोष्टींना "स्ट्रिक्टली फॉर प्रायव्हेट/पर्सनल यूज" असं लेबल लावलं पाहिजे. पिक्चरच्या सीडीला असतं तसं.
10 Feb 2011 - 7:35 pm | अविनाशकुलकर्णी
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) - हिंदूंच्या धार्मिक सणांत व गणेशोत्सवांसारख्या सोेहळ्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुणालाही नाही. ‘इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात मग गणेशमूर्तींसंदर्भात दिलेल्या निकालामुळे हिंदूंच्याही भावना दुखावल्या आहेत’ असे खणखणीत प्रतिपादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. शिवसेना हे कदापि सहन करणार नाही. गणेशभक्तांच्या लढ्यात शिवसेना आघाडीवर राहील, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
राज्यात यापुढे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी टाकून मातीच्याच गणेशमूर्तींना परवानगी देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहेत कोण, त्यांना ही अशी लुडबुड फक्त हिंदूंच्याच बाबतीत करण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘न्यायालयाच्या निर्णयाबाबत मला काहीच म्हणायचे नाही. ‘अंधश्रद्धा निर्मूलन’च्या ढोंग्यांनी गणेशमूर्तींसंदर्भात याचिका दाखल केल्यानेच हे सर्व घडले. खरे तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती हा अंधश्रद्धा किंवा पर्यावरणाचा विषय असू शकत नाही. या ढोंग्यांच्या जन्माआधीपासून अशा मूर्ती बनवून पूजाअर्चा होत आहे व त्या मूर्तींचे विसर्जन पिण्याच्या किंवा सार्वजनिक वापराच्या पाण्यात होत नाही. त्यामुळे पर्यावरणास धोका कसला निर्माण होणार?
उद्धव ठाकरे यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘श्रद्धा व अंधश्रद्धा यातला फरक या लोकांनी समजून घ्यावा. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढे दिलेत. त्यामुळे मला हे सर्व अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांकडून शिकण्याची गरज नाही. पण अंधश्रद्धा फक्त हिंदूंमध्येच आहेत व मुसलमान, ख्रिश्चनांत नाहीत असे त्यांना वाटते. या अंधश्रद्धा, इतर धर्मांतली अंधश्रद्धेची भुताटकी बाटलीत बंद करण्याची हिंमत त्यांनी दाखवावी व मगच हिंदूंच्या भावनांशी खेळावे. हिंदू सणावारातील आवाजांचे प्रदूषण, फटाक्यंाची आतषबाजी यांच्या कानांचे पडदे फाडते, मग इतरांच्या धर्मिक आरोळ्या यांना वीणावादनाप्रमाणे सुखावतात काय?
असे निर्णय एकतर्फी न घेता यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच व्हायला हवेत असे सुनावत उद्धव ठाकरे म्हणाले, गणेश उत्सवातील मूर्तींचे मोजमाप घेण्याचेही प्रकार याआधी झाले. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणून हिंदूंच्या धर्मभावनांची खिल्ली उडवली जात आहे. शिवसेना हे कदापि सहन करणार नाही.
* अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना पर्यावरण आणि प्रदूषणच्या विरोधात लढण्याची इतकी खुमखुमी आली असेल तर त्यांनी लवासा व जैतापुरात जाऊन लढे द्यावेत. पर्यावरणाची हानी आम्हालाही मान्य नाही, मात्र अशा बंदी टाकून काही साध्य होणार नाही. ..सामना
-------------------------------------------------------------------------
संभाजीनगर, दि. ९ (प्रतिनिधी) - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर बंदी घालण्याचा आणि यासंदर्भात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला नाही. असे असतानाही विपर्यस्त बातम्या प्रसिद्ध कशा झाल्या? माध्यमांना ही माहिती कुणी पुरवली, असा सवाल खंडपीठाने आज याचिका दाखल करणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला झापले. या चुकीच्या माहितीबद्दल प्रसिद्धीमाध्यमांकडे तत्काळ खुलासा करा, अशी तोंडी समजही ‘अंनिस’च्या वकिलांना न्या. डी. बी. भोसले व न्या. आर. एम. बोर्डे यांच्या खंडपीठाने दिली.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शक तत्त्वे मागवली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी करताना न्या. डी.बी. भोसले व न्या. आर.एम.बोर्डे यांच्या खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करून अंनिसची याचिका निकाली काढली. हा निकाल येताच काही वृत्तवाहिन्यांवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर न्यायालयाच्या बंदी’, ‘आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी गुन्हा’अशा बे्रकिंग न्यूज झळकल्या. त्याचबरोबर दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्येही याच आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
saamana
10 Feb 2011 - 7:36 pm | मदनबाण
ह्म्म्...
प्रदुषण होतं ? = अर्थातच !!!
पण जर पीओपीच्या मूर्ती बनवायच्या नाहीत तर कशाने बनवायच्या ?
मातीच्या मूर्ती इतक्या मोठ्या संख्येने आणि वेगाने बनवता येतील का ?
करोडो मूर्ती बनवल्या जातात... मग किती टन माती(शाडू) लागेल ? त्याने सुद्धा नैसर्गिक समतोल ढळेल का ? म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गजाननाच्या मूर्ती तयार करण्यासाठी माती खोदुन काढावीच लागेल ना ?
11 Feb 2011 - 11:04 am | नन्दादीप
>>करोडो मूर्ती बनवल्या जातात... मग किती टन माती(शाडू) लागेल ? त्याने सुद्धा नैसर्गिक समतोल ढळेल का ? म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गजाननाच्या मूर्ती तयार करण्यासाठी माती खोदुन काढावीच लागेल ना ? >>>>>
कागदी लगद्यापासून पण मूर्ती बनवता येतात.
11 Feb 2011 - 11:14 am | गवि
नाहीतरी आपण सर्व प्रतीकात्मकच करतो ना? पूजा, फूल, प्रसाद हे सर्व प्रतीकात्मक रुपातच ना?
मग धातूचीच मूर्ती ठेवून पाण्यात बुडवून प्रतीकात्मक विसर्जनही करायला काय हरकत आहे.
पुन्हा पुढील वर्षीसाठी वस्त्रात स्वच्छ पवित्र ठिकाणी ठेवून देउ शकतो. असे काहीजण करतातही.
मूर्तीची विटंबनाही नाही आणि दरवर्षी ती कशाची बनवायची याची चिंता नाही.
मूर्ती बनवण्यातला रोजगार जाईल खरंय. पण असे अनेक रोजगार कधी ना कधी ऑब्सोलीट होतच असतात आणि नवे तयारही होत असतात. वासुदेव, हलगीवादक, कल्हईवाले, पखालीतून पाणी आणणारे, गलबतवाले (हजारोंनी असलेली गलबते), कुर्हाडीनी लाकूड तोडणारे लाकूडतोडे असे अनेक व्यवसाय आणि त्यातले लाखो लोक कालानुरुप बाहेर फेकले गेले म्हणा किंवा पडले म्हणा.
कल्हईवाल्यांच्या पोटाला मिळत रहावे आणि अनेक नवीन कल्हईवाले तयार होऊन त्यांची भरभराट व्हावी म्हणून स्टील आणि अॅल्युमिनियम त्यागून पितळेचीच भांडी वापरत राहू असे कोणी आता करतात का?
11 Feb 2011 - 11:43 am | नन्दादीप
१००% सहमत...या मुळे पर्यावरणाचा समतोल, संतुलन ई.ई. राखले जाईल.
आणी रोजगाराच काय, आजकाल माणसाला ६४ कला की काय म्हणतात ते जमायलाच हव्यात(निदान २०-२५ तरी). तरच त्याच निभाव लागेल.
11 Feb 2011 - 11:04 am | नन्दादीप
>>करोडो मूर्ती बनवल्या जातात... मग किती टन माती(शाडू) लागेल ? त्याने सुद्धा नैसर्गिक समतोल ढळेल का ? म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात गजाननाच्या मूर्ती तयार करण्यासाठी माती खोदुन काढावीच लागेल ना ? >>>>>
कागदी लगद्यापासून पण मूर्ती बनवता येतात.
10 Feb 2011 - 8:35 pm | मी_ओंकार
काकुची वाट बघत होतो.
ही फिर्याद अंनिसने दाखल केली होती हे लिहायचे राहिले गणपाभाऊ. म्हणजे मग प्रतिक्रिया द्यायला आणखी जोर येईल.
काल आजचा सवाल मध्ये चर्चाही पाहिली. नरेंद्र दाभोळकर होते. त्यांनी काही मुद्द्यांचे खंडन असे केले.
- सध्या काळजी घराघरात बसवल्या जाणार्या लाखो गणपतींबद्दल आहे. त्या शाडूच्या बनवण्यास काही अडचण नाही. कागदाच्या लगद्यापासूनही सुरेख मुर्ती तयार करता येतात. कुठलीशी संस्था बर्याच शाळांमध्ये मुलांना हे प्रशिक्षण देत आहे.
- मंडळाकडुन अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होऊ शकते. दोन तीन वर्षांमध्ये,
बाकी लोकांचा सुर नेहमीप्रमाणे चढा होता. प्रदुषण फक्त गणपतीनेच होते का? वगैरे. फार वेळ पाहिली नाही.
म.टा. चा आजचा अग्रलेख वाचनीय आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7464072.cms
बाकी सामना मधील प्रतिक्रिया अपेक्षित. मुंबई पालिका निवडणूका कधी आहेत.
जाता जाता: श्रद्धा ही नेमकी कशापाशी आहे गणपतीपाशी की पीओपी पाशी ?
- ओंकार.
11 Feb 2011 - 11:04 am | गवि
बंदी कोणतीही असो.... आक्षेप हे नेहमी असेच असतातः उदा क्ष वर बंदी आणली / आणू घातली..
१) फक्त "क्ष"मुळेच प्रदूषण, नुकसान, अनारोग्य होते का?
२) "क्ष"वर अमुक लाख लोक / कुटुंबे / पोटे अवलंबून आहेत.
३) तुम्हाला फक्त "क्ष" च दिसते, तिकडे ते य, झ, चालले आहे ते दिसत नाही.
हे असे चालूच राहणार. बघा.. सिगरेट, तंबाखू, गुटखा, ध्वनिप्रदूषण, प्लॅस्टिक पिशव्या, गणपतीच्या पीओपी मूर्ती, एखाद्या उद्योगातून नदीत जाणारी विषारी द्रव्ये.. विषय कोणताही असो.
आक्षेप हे असेच असणार.
हायकोर्टाने दिलेला निर्णय सर्वांच्याच हिताचा आहे आणि त्यात एका कोणत्या गटाचे हितसंबंध जपले जात नाहीयेत हे ढळढळीत सत्य आहे. तेव्हा अशा आक्षेपांना फाट्यावर मारण्यात यावे.
वरची अपिले एका दिवसात रिजेक्ट करुन कालापव्यय टाळावा. अंमलबजावणी मात्र कडक व्हावी अन्यथा कठीण आहे.
खरं तर तेच कठीण आहे.
11 Feb 2011 - 12:17 pm | गणेशा
बरोबर
10 Feb 2011 - 9:46 pm | गणेशा
माझ्या मते शाडुच्या गणपतींची सक्ती योग्य आहे. सर्व व्यापक विचार आहे हा.
परंतु या वर्षी जर प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्ती तयार झाल्या असतील तर त्या विकण्याची मुभा पण देण्यात यावी, कारण निर्णय खुप उशीरा दिला गेला तो पर्यंत कारागिरांच्या कलाकृती संपत आल्या असतील.
आणि एका कलाकारास आपल्या मुर्ती या वर्षी मंडळात दिसणार नाही म्हंट्ल्यावर नक्कीच वाईट वाटेल.
आणि तयार झालेल्या मुर्ती जर नष्ट करायला गेले तरी परत प्रदुषण हे होणारच.
सो यावर्षी ५०-५० म्हणुन दोन्हीला चालु द्यावे, परंतु नेक्स्ट टाईम पासुन ओनली शाडु
बरोबर वाटते आहे का ?
अवांतर : घाईमुळे वरील रिप्लाय वाचले नाही. आणि दुवे ही पाहिले नाही. चु.भु.दे.घे.
11 Feb 2011 - 12:48 pm | विजुभाऊ
परंतु या वर्षी जर प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्ती तयार झाल्या असतील तर त्या विकण्याची मुभा पण देण्यात यावी, कारण निर्णय खुप उशीरा दिला गेला तो पर्यंत कारागिरांच्या कलाकृती संपत आल्या असतील.
गणेशोत्सवाला अजून सात आठ महिने अवकाश आहे,मूर्ती आत्ताच कशा तयार असतील?
आणि या वर्शी परवानगी दिली तर ती पुढच्या वर्षी एक्स्टेन्ड होईल. जो काय निर्नय घ्यायचा असेल तो आत्ताच घ्यायला हवा.
उद्धव नी उगाचच अनिसं च्या विरोधात डोके घातले. प्रबोधनकार लोकजागृती करत. हे त्याच्या उलट भूमिका घेताहेत
11 Feb 2011 - 2:24 pm | llपुण्याचे पेशवेll
मुंबईजवळ पेण नावाचे गाव आहे. तिथे अनेक कारखाने आहेत गणेशमूर्तींचे तिथे जाऊन पहा. या वर्षीचे गणपती झाले की लगेच पुढच्या वर्षीच्या ऑर्डर्स फिक्स होतात आणि कामाला सुरुवात होते. मे महीन्यातच बाहेरच्या देशात पाठवायच्या मूर्ती तयार असतात.
10 Feb 2011 - 10:12 pm | ५० फक्त
पिओपि काय शाडु काय शेवटी गणपतीच बसवणार ना ? अंनिस वाल्यानी पिओपि तयार करणारे आणि विकणारे यांना धमकावले असेल एका मुर्तिमागे % द्या म्हणुन आणि ते न मिळाल्याने असा आदेश मिळवला असेल. आता पिओपि वाले % देतील आणि मग यातुन मधला मार्ग काढला जाईल. थोडा वेळ वाट पहा.
10 Feb 2011 - 11:20 pm | कुंदन
% मागायला ते कका?"साहेब" किंवा""दादा" आहेत का?
11 Feb 2011 - 8:01 pm | तिमा
१०० % प्रदुषण वाचवायचे असेल तर खाण्याचे पदार्थ व खाण्याचे रंग वापरुन गणेशमूर्ति बनवाव्यात. म्हणजे विसर्जन करायलाच नको. दहा दिवस झाले की ......! कशी वाटते आयडिया ?
11 Feb 2011 - 9:04 pm | गणपा
असे प्रयोग होत असतातच वानगी दाखक ही काही प्रकाश चित्रे.
शेंगेदाण्यां पासुन बनवलेली मुर्ती.

अधिक माहिती इथे.
अजुन एक लिंबा पासुन बनवलेला गणपती इथे पहाता येईल (कॉपीराईट असल्या कारणे इथे देत नाही.)
भाज्यांपासुन बनवलेली गणेश प्रतिमा

आणि ही चॉकलेट पासुन बनवलेली मुर्ती.

यांच विसर्जन कस होतं या बद्दल मात्र माहिती नाही.
10 Feb 2011 - 10:51 pm | विकास
ज्यांना वापरायची आहे त्यांनी, शाडूच्या मुर्तीचा वापर करणे योग्य वाटते. जर दोन मुर्ती कुठल्याही आक्षेप घेणार्या भाविकाच्यासमोर ठेवल्या तर त्याला त्यातील फरक सांगता येईल का? शिवाय एक श्रद्धावंत म्हणून असे देखील म्हणता येईल की पार्थिव गणेशपूजा जी केली जाते त्यात "मातीच्या मुर्तीचा" उल्लेख आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा नाही. आत्ता संस्कृत मधील मंत्र समोर नाहीत पण म.टा. मधली मराठी पूजा पाहीली तरी ते लक्षात येईल. (तुझ्या पराक्रमाचें स्मरण। कृतज्ञतेने करिता जन। मृत्तिकेती मूर्ति करुन। घराघरातून, पूजिती।। )
मात्र हे करत असताना नेहमीचा मुद्दा सांगावासा वाटतो की लोकांना पचेल अशा भाषेत ह्यासंदर्भात लोकशिक्षण म्हणून जर हे केले तर त्याचे अपेक्षित सुपरीणाम हे नक्की होतील. नाहीतर त्याचा एक राजकारण म्हणून वापर होत राहील.
11 Feb 2011 - 4:34 pm | नितिन थत्ते
>>मात्र हे करत असताना नेहमीचा मुद्दा सांगावासा वाटतो की लोकांना पचेल अशा भाषेत ह्यासंदर्भात लोकशिक्षण म्हणून जर हे केले तर त्याचे अपेक्षित सुपरीणाम हे नक्की होतील.
लोकांना पचेल अशा भाषेत म्हणजे कसे याचे उदाहरण देता येईल का? म्हणजे "पीओपीची मूर्ती करू नये/बसवू नये" हा संदेश लोकांना पचेल अशा भाषेत कसा लिहिता येईल ते उदाहरणाने स्पष्ट करावे.
11 Feb 2011 - 4:38 pm | आजानुकर्ण
उदाहरणार्थ भिकाजी जोश्यांनी 'हंटर हवा हंटर' अशी लोकांना समजणारी भाषा बेंबट्याला ऐकवून दाखवली होतीसे वाटते.
11 Feb 2011 - 7:11 pm | विकास
कदाचीत माझे विधान इथल्या "सन्माननीय सुधारकांना" पोथीनिष्ठ वाटू शकते म्हणून काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तर बरे होईलः
हे समजले तर बरे होईल. मग त्यावर आधारीत भाषा सांगता येईल.
11 Feb 2011 - 9:55 pm | नितिन थत्ते
१. नाही
२. होय
३. होय (सार्वजनिक तुम्ही कटाप केले असल्याने प्रश्न नाही)
४. होय
५. नाही. घरगुती पूजा करणे खाजगी असते. त्यामुळे ती कशाही प्रकारे करावी. पण त्या (खाजगी) गणपतीचे (सुद्धा) विसर्जन खाजगी नसते. ते सार्वजनिक ठिकाणी केले जाते. म्हणून ते करताना पूजाविधी आणि सार्वजनिक हित यात कन्फ्लिक्ट असेल तर सार्वजनिक हिताला जास्त महत्त्व द्यावे.
[अवांतर पण महत्त्वाचे: ज्याठिकाणी परंपरेने विसर्जन होते (उदा मुठा नदी) तेथील पाण्याचे -धरण बांधल्याने- घटलेले प्रमाण आणि त्यात विसर्जन होणार्या गणपतींची वाढलेली संख्या + मूर्तींचा आकार/मटेरिअल या मुद्द्यांमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला असावा. अन्यथा हा प्रश्न आला नसता. गिरगाव चौपाटीवरच्या विसर्जनाने होणार्या विटंबनेबाबत प्रमोद नवलकर वगैरे फार पूर्वीपासून लेखन करीत आहेत. पीओपीच्या मूर्तींची न विरघळल्यामुळे होणारी विटंबना समजून खरे तर श्रद्धाळूंनाच हे टाळण्याचे उपाय सुचायला हवे. शिवाय डाउसस्ट्रीम बाजूस असणार्या गावांत जर याच नदीतून पाणीपुरवठा होत असेल तर त्यांनाही बराच त्रास होत असावा. हा खरोखरचा गंभीर प्रश्न असेल तर त्याला खुल्या मनाने सामोरे जाऊन उपाय स्वीकारावे. किंवा स्वतः उपाय शोधून काढावे.]
अजून एक उपाय सुचतो आहे. गणपतीच्या मूर्तीत पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा की काहीतरी करतात. तेव्हाच त्या मूर्तीत देवत्व आले असे समजतात. तशीच त्या मूर्तीतून विसर्जनापूर्वी प्राण काढून घेण्याची काही पूजा किंवा विधी डेव्हलप करावा. तो विधी झाल्यावर त्या मूर्तीत देवत्व नाही असे समजता येईल. मग ती मूर्ती क्रशर किंवा तत्सम मशीनने फोडून रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरता येईल.
11 Feb 2011 - 10:31 pm | विकास
१. नाही
२. होय
३. होय (सार्वजनिक तुम्ही कटाप केले असल्याने प्रश्न नाही)
४. होय
धन्यवाद आणि सहमत. सार्वजनिक गणपतीवर बंदी घालणे अवघड असले तरी काही नियम तयार करणे गरजेचे आहे असेच वाटते. त्यावर अधिक वेगळेच बोलूया.
५. नाही. घरगुती पूजा करणे खाजगी असते. त्यामुळे ती कशाही प्रकारे करावी. पण त्या (खाजगी) गणपतीचे (सुद्धा) विसर्जन खाजगी नसते. ते सार्वजनिक ठिकाणी केले जाते. म्हणून ते करताना पूजाविधी आणि सार्वजनिक हित यात कन्फ्लिक्ट असेल तर सार्वजनिक हिताला जास्त महत्त्व द्यावे.
याच्याशी अंशतः सहमत. अंशतः अशा साठी की मी जो मुद्दा मांडला आहे त्याचे कारण हे खाजगीत लोकांनी कशी पूजा करावी वगैरे सांगण्यासाठी नसून जेंव्हा त्याचे राजकीय भांडवल केल्याने लोकांची दिशाभूल होऊ शकते तेंव्हा हे लक्षात आणून देण्यासाठी म्हणले आहे. ते सांगत असताना पर्यावरणाचा प्रश्न सांगू नका असे म्हणत नाही. मी तर नक्कीच नाही. :-)
शेवटी आपला उद्देश काय आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरीस पेक्ष मातीचा वापर व्हावा जेणे करून प्रदुषणाला (विशेषतः जलप्रदुषणास) आळा बसेल हा आहे. तो सांगत असताना जेंव्हा धर्माधारीत आवाज त्याच्या विरोधात उठवून गैरफायदा घेऊ शकतात, तेंव्हा त्याला धर्माधारीत उत्तर देणेच योग्य आहे.
"आम्ही शहाणे, तुम्ही मुर्ख" अशा पद्धतीने साधे शाळेतल्या मास्तराने पण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे ठरवले तर पोरं ऐकणार नाहीत. इथं तर काय सगळी जनता आहे. त्यांना सांगायचे असले तर त्यांना समजेल अशाच भाषेत सांगावे असे म्हणायचा उद्देश होता. नाहीतर केवळ स्वांतसुखाय म्हणून "जनतेला अडाणी" म्हणल्याने अपेक्षित परीणाम होऊ शकणार नाही.
तशीच त्या मूर्तीतून विसर्जनापूर्वी प्राण काढून घेण्याची काही पूजा किंवा विधी डेव्हलप करावा.
उत्तरपूजेच्या वेळेस, "इष्टकामप्रसिध्यर्थं पुनरागमनायच" असे म्हणत मुर्ती तिनदा हलवली जाते आणि असे समजले जाते की त्यातून देवत्व नाहीसे झाले आणि केवळ मातीची मुर्ती राहीली. मग तिचे विसर्जन केले जाते.
मग ती मूर्ती क्रशर किंवा तत्सम मशीनने फोडून रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरता येईल.
यातील भाषा जरा आपल्या अनावधानाने असेल पण क्रूड झाली आहे असे वाटते. पुर्वीच्या काळात तीच माती गाळ काढून परत मुर्तींसाठी वापरली जाऊ शकते अथवा इतरत्रही वापरली जातेच. पण मुद्दामून क्रशर, फोडणे असले करण्याची म्हणण्याची गरज नाही. नाहीतर असेच माणसाचा प्राण गेल्यावर मागे उरलेल्या शरीराबाबत पण म्हणता येईल, पण तसे कुठल्याही संस्कृतीत बोलले जात नाही.
10 Feb 2011 - 11:26 pm | अर्धवटराव
श्रीगणेशोत्सवासारखे कार्यक्रम खरं तर आनंद, सद्भाव, सामाजीक जाणीव इ. (तथाकथीत ??) मुल्यांच्या जोपासनेसाठी आणि संवर्धनासाठी अत्यंत उपयोगी ठरु शकतात. आणि निसर्गाच्या आरोग्य रक्षणासंबंधी देखील मतभेद असावेत?? तिथेही राडे ?? छे छे छे. बुद्धीच्या देवतेची इतकी निर्बुद्धपद्धतीने आळवणी गणेशाने वधलेल्या दैत्यांनी देखील केली नसेल.
शिवसेनेचेपण एक दिवस विसर्जन करायचच अशी प्रतीज्ञा घेतलीय कि काय उद्धवरावांनी...
(मोदकप्रेमी) अर्धवटराव
11 Feb 2011 - 5:32 am | भडकमकर मास्तर
यानिमित्ताने या वर्षी स्वतः शाडूची गणपती मूर्ती करायचा संकल्प सोडला आहे...
11 Feb 2011 - 10:06 am | अमोल केळकर
स्तुत्य निर्णय . यानिमित्ताने मी या वर्षी स्वतः शाडूची गणपती मूर्ती विकत घ्यायचा संकल्प सोडला आहे... :)
अमोल
11 Feb 2011 - 10:37 am | महेश-मया
औरंगाबादच्या न्यायालयाने घालुन दिलेला हा धडा इतर उच्च-न्यायालयांमध्ये सुद्धा गिरवला गेला पाहिजे. एकदम सहमत
11 Feb 2011 - 11:29 am | स्पंदना
मी स्वतः पितळेची मुर्ती पुजते. अन दिड दिवसा नंतर पाणी शिंपडुन विसर्जन करते. एक चार घरात गणपती बसायचा तोवर ठीक होत हे सार, एखाद दुसर मंडळ ही हौस म्हणुन चालुन जायच, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा केम्व्हाही घातकच नाही का?
11 Feb 2011 - 11:55 am | गवि
सर्वोत्कृष्ट प्रथा.. अभिनंदन..
मनापासून केलेली भक्ती असली की झालं. बाकी मातीचीच मूर्ती / पीओपीचीच मूर्ती हवी, नदीतच/ विहीरीतच/ समुद्रातच विसर्जन हवं या सर्व बाहेर चालत आलेल्या गोष्टी झाल्या.
पीओपी पूर्वी होतं तरी का? पूर्वी मातीचीच असायची ना ? तरीही त्याकडे परत वळण्याची तयारी नाही कारण पीओपीत गुंतवणूक झालेली आहे आणि मातीच्या मूर्ती आता वेळखाऊ/ लेबर सेन्ट्रिक आणि म्हणून महाग पडतील असं दिसतंय.
तुम्ही करताय तोच खरा चांगला उपाय आहे.
11 Feb 2011 - 4:46 pm | गोगोल
वॉलपेपर सेट करतो. चार दिवस कुठल्याही भलत्या सलत्या साईट्सना भेट देत नाही (याचा अजून एक फायदा असा की पाचव्या दिवशी भरपूर माल मसाला मिळतो). अन पाचव्या दिवशी तो वॉलपेपर रिसायकल बिन मध्ये विसर्जन करतो.
11 Feb 2011 - 11:31 am | रणजित चितळे
पुर्ण पणे. मातीचे गणपती आणि त्याला कोठचाही अनैसर्गिक रंग नाही.
11 Feb 2011 - 11:59 am | अविनाशकुलकर्णी
गणेशमूर्तिकारांची उद्या शिवसेना भवनात बैठक
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) - प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदीबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबईतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि मूर्तिकारांची बैठक शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवसेना भवन येथे होणार आहे. यावेळी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. हिंदूंच्या सणांत कोणताही हस्तक्षेप शिवसेना सहन करणार नाही, या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
11 Feb 2011 - 12:20 pm | गवि
काहीतरी निसर्गाचं पर्यावरणाचं चांगलं होत असेल आणि शिवाय मूर्तीचीही विटंबना (तत्काळ न दिसणारी) टळत असेल तरी त्याला हस्तक्षेप म्हणून विरोध करायचा ? छान.
तुलनेत नव्याने आलेल्या कृत्रिम पीओपीच्या मटेरियलऐवजी शाडूच्या (पूर्वीपासून जशा असायच्या तशा) मूर्ती हा हस्तक्षेप म्हणायचा हा विनोद झाला. असो.
म्हणजे फलाहाराने करण्यात येणार्या उपासात नंतर शोध लागलेले कृत्रिमरित्या बनवलेले साबुदाणे मान्य (सोयीस्कर) झाले, आणि कधीतरी ते आरोग्याला वाईट असे सिद्ध झाले म्हणून कोणी म्हटलं की उपासाला (पुन्हा पूर्वीसारखी) फळं खावीत तर तो उपासात हस्तक्षेप का?
निदान पीओपीत असलेल्या कामगारांना आम्ही उघडे पडू देणार नाही..त्यांचे आर्थिक प्रश्न.. असा काही अजेंडा तरी मांडायचा.
धन्य आहे.
11 Feb 2011 - 12:23 pm | आजानुकर्ण
मी हिंदू आहे आणि माझा सण मी कसा साजरा करावा यासंदर्भात शिवसेनेने हस्तक्षेप करू नये असे मला वाटते.
11 Feb 2011 - 12:53 pm | विजुभाऊ
अजानुकर्णा साहेबांशी सहमत.
उद्धवनी या प्रश्नाचे राजकारण करू नये.
महागाई /भ्रष्टाचार / घराणेशाही असे अनेक मुद्दे समोर असताना हा मुद्दा कशासाठी?
प्लास्टरच्या अमूर्ती बहुतेकवेळा महाराष्ट्राबाहेरून येतात. त्यामुळे बर्याच स्थानीक लोकांचा रोजगार बुडालेला आहे.
11 Feb 2011 - 1:17 pm | योगप्रभू
गेल्या वर्षी पुण्यात मुलतानी मातीच्या छोट्या गणेशमूर्ती उपलब्ध होत्या. कमला नेहरु पार्कसमोरच्या शिरीष ट्रेडर्सकडे विक्रीसाठी आल्या होत्या. मी आज जाऊ-उद्या जाऊ असा आळस केला आणि गणेशचतुर्थीआधी दोन दिवस त्या मूर्ती संपल्या. मुलतानी मातीच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे विसर्जन घरी लहान बादलीत करता येते. वनस्पतीजन्य रंग वापरले असल्याने माती विरघळल्यानंतर हे बादलीतले रंगीत पाणी झाडांना घातले तरी चालते. तळाशी उरलेली माती चेहर्याला सौन्दर्यप्रसाधन लेप म्हणून लावता येते.
पण मला बेसिक प्रश्न पडतो, की आता सार्वजनिक गणेशोत्सवाची गरजच काय? सर्वजण आपापल्या घरी भरपूर खर्च करुन सण साजरे करतात. सजावट करतात, गोडाधोडाचे खातात. मग पुन्हा गल्लीत मंडळ कशासाठी? ती वर्गणी (की खंडणी) नको आणि मवालेगिरीही नको. पण जर उत्सव सार्वजनिक ठेवायचा ठरवले तर मग घरगुती गणपती बंद करा. रिपीटेशन कशाला हवे?
पूर्वी गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय/सामाजिक ऐक्य होता. मेळे होत. स्थानिक कलाकारांना उत्तेजन मिळे. लोकसेवक कार्यकर्त्यांना समाजकार्याचे वस्तुपाठ मिळत. आता यापैकी कशाची गरज राहिली आहे? गेल्याच गणपतीत मी आमच्या भागात एक प्रकार पाहिला. मी एका दुकानात गेलो असताना तेथे वर्गणी मागणार्या तरुण टपोरींचे एक टोळके आले. त्यातील जो लीडर होता त्याने फर्मावले, 'पक्या. याची हजाराची पावती फाड रे.' त्यावर त्या दुकानदाराने विरोध केला. आतापर्यंत २५१ रुपये याप्रमाणे चार मंडळांना १००० रुपये देतो. तुम्ही एकटे एवढे पैसे कसे मागता, असे दुकानदाराने विचारले. त्यावर तो लीडर म्हणाला, 'ठीक आहे. द्यायचे नसतील तर नको देऊ. पुढे केव्हातरी काचा फुटतील तेव्हा समजेल तुला.'
हा प्रकार सर्वसामान्यांच्या घरापर्यंत येण्याची वेळ फार लांब नाही, असे वाटायला लागले आहे.
11 Feb 2011 - 1:37 pm | कुंदन
दुकानदाराने उद्धव ठाकरेंना सांगावे , तो हिंदु असल्यास शिवसेना त्याचे रक्षण करेल बहुधा.
11 Feb 2011 - 1:37 pm | वेताळ
योगप्रभुंशी सहमत...
मला तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा वीट आला आहे. गणपतीउत्सवाच्या काळात दारु आणि कंडोमचा खप किती तरी वाढतो. आणि त्यात उध्दव ठाकरेना काही तरी काम द्यावे असे मी सरकारला विनंती करतो.
11 Feb 2011 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार
कुठलाही सार्वजनीक उत्सव हा आता उत्सव उरला आहे का असा प्रश्न पडतो. कार्यकर्ते वर्गणी गोळा करतात का खंडणी हे देखील समजत नाही.
ह्या ऐन गणेशोत्सवात तिसर्याच दिवशी अचानक आईला प्रयाग हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज पडली. त्यावेळी अनेक मंडळांनी रस्ते बंद केल्याने प्रचंड अडचण झाली. आणि सर्वात वाईट म्हणजे गर्दी नसताना व शक्य असुनही अनेक मंडळांनी सहज बाजुला करता येण्यासारखे अडथळे देखील न हलवता मदत करण्याचे नाकारले. बरोबर पेशंट आहे सांगुनही त्यांच्याकडून कसलेही सहकार्य मिळाले नाही.
11 Feb 2011 - 2:32 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, ३१ डिसेंबर, रमजानचे आणि दर शुक्रवारचे रस्ते बंद पाडून केले जाणारे नमाज यासारखे उत्सव रस्त्यावर उतरून साजरे करण्यास बंदी करावी.
11 Feb 2011 - 2:52 pm | गणपा
पुपेंशी सहमत.
एक गाव एक सार्वजनीक गणपती (शहरात असेल तर एक वॉर्ड/विभाग एक सार्वजनीक गणपती) हा उपक्रम राबवल्यास लो. टिळकांचा या उत्सवा मागचा उद्देश सफल होईल.
11 Feb 2011 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार
पुप्याशी सहमत.
अनेक मंडळे अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी दिवाळी साजरी करतात. त्याच धर्तीवर काही करता येईल काय ?
11 Feb 2011 - 5:15 pm | सहज
गणपाशी सहमत
12 Feb 2011 - 12:59 am | पैसा
अपर्णाने म्हटल्याप्रमाणे हल्ली खूप लोक घरातल्या गणपतीचीच पूजा करतात. माझे सासरे ८७ वर्षांचे आहेत, पण विहिरीत गणपतीचं विसर्जन करू नये हे त्याना सुचवल्यावर त्यानी डोणीत पाणी भरून त्यात घरच्या गणपतीचे विसर्जन करायला सुरूवात केलीय. नवीन विचार नीट सांगितला तर कोणीही त्याचा मनापासून स्वीकार करतो.
मला वाटतं, पीओपीचा प्रश्न जास्त करून शहरात भेडसावतो. लहान खेड्यांमधे अजून शाडूच्याच मूर्ती बनवल्या जातात.
इथे गोव्यातल्या काही घरातल्या प्रथेचा उल्लेख करते. पोर्तुगीजानी कोणत्याही देवाची नवी मूर्ती बनवायला बंदी घातली होती त्या काळात जीव मुठीत धरून जे हिंदू गोव्यात राहिले, त्यातील काहीनी आपद्धर्म म्हणून घरातल्या गणपतीच्या तसबिरीची पूजा करायला सुरुवात केली. आज, म्हणजे ४५० वर्षांनंतरही या घरांतून घराण्याची प्रथा म्हणून गणेशोत्सवात घरातल्या गणपतीच्या तसबिरीचीच पूजा केली जाते. तसंच काही घरातून तेवढीच जुनी मखरेही वापरली जातात. त्यांच्याकडे पीओपी वगैरेचा प्रश्नच येत नाही!
12 Feb 2011 - 7:15 am | शिल्पा ब
वर बऱ्याच जणांनी उपाय सांगितलेत जे प्रदूषण करणारे नाहीत अन मंडळांची अरेरावीपण नाहीशी होईल...अन हाच मुद्दा आहे कि ज्यामुळे हे उपाय अमलात आणले जाणे खूप अवघड आहे.
तसबिरीची पूजा सुद्धा एक चांगला उपाय आहे....ती तर विसर्जित कराय्चासुद्धा प्रश्न नाही...पण...