इज इट अ मल्टीलेवल मार्केटिंग वन्स अगेन?

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
9 Feb 2011 - 7:03 am
गाभा: 

काल आदर्श नावाच्या एका व्यक्तिचा फोन आला.

ह्या व्यक्तिला मी कधी ओळखत नव्हतो.

टिपिकल औपचारिकता दाखवुन ( तुम्हाला पाच मिनिटे वेळ आहे का? इज इट द राईट टाईम इ.इ.) त्याने बोलायला सुरवात केली.

त्याच्या अनुसार आय.टी मधल्या काही मंडळींचा एक ग्रुप आहे आणि ते इंडेपेंडंटली काही प्रोजेक्ट्स घेतात आणि काम करतात.

त्याने बोलता बोलता बिल गेट्स च्या काही पुस्तकांचा उल्लेख केला आणि त्यात लिहिलेले भविष्याबद्दलच्या शक्यता आता दूर नाही असे काहीतरी बोलला.

थोडाफार असाच प्रकार पूर्वीही झाला होता.आय.टी मधली मंडळी एक बिजनेस करत आहेत असे सांगुन एक मित्र मला त्यांच्या सेमिनारला घेऊन गेला होता.तिथे गेल्यावर समजले कि तो पूर्ण एकमेकांना शेंडी लावण्याचा प्रकार होता.(गोल्ड क्वेस्ट मार्केंटींग).

त्यामुळे ह्यावेळी ह्या आदर्शला मी विचारले कि हा कुठल्या मल्टीलेवल मार्केटिंग चा कुठल्या नवा प्रकार तर नाही आहे ना?

तर त्याचे उत्तर "आय डोंट अंडरस्टँड व्हाट यु आर टॉकिंग अबाऊट?". (तेव्हा ह्याचा चेहर्यावरचे भाव अगदीच मलाचा काही माहीती नाही त्यातले ह्या पध्दतीचे निरागस असावेत. ;:)

त्याला पुढे विचारले कि माझा नंबर कसा काय मिळाला?

उत्तर - आपण भेटु मग सांगतोच.

पुन्हा विचारले बिजनेस मॉडेल काय आहे.

उत्तर - भेटल्यावर समजेलच.

नक्की काय काम आहे ह्याचा अजिबात पत्ता लागु दिला नाही.

वेबसाईट आहे का? विचारल्यावर आहे पण तुला तिथे जावुन जास्त काही कळणार नाही प्रत्यक्ष भेटीतच समजेल असे म्हणाला.

आणि मग लवकरात लवकर कधी भेटता येईल असे विचारले.

त्याला इतकी घाई का होती हे समजले नाही.तो आजच अमुक अमुक ठिकाणी भेटु म्हणत होता.पण मी त्याला वीकडेजचा जमणार नाही म्हणुन सांगितले.

येत्या शनिवार भेटु असे बोललो.

पण पठ्ठ पिच्छा सोडायला तयार नव्हता.

तुला शुक्रवारी फोन करतो व अपाँइटमेंट फिक्स करतो असे म्हणाला.

एकुण सर्व प्रकारावरुन मला हा तर एखादा मल्टीलेवल मार्केटिंग वा तत्सम काही तरी असाच काही तरी प्रकार वाटतोय.

मला लोकांना त्यांच्या तोंडावर नाही म्हणता येत नाही. त्यामुळे मी जाण्याचेच टाळतोय.

पण जस्ट फॉर क्युरिऑसिटी - कुणा मिपाकरांना ह्याबाबत काही अनुभव.?

(म्हणजे अ‍ॅम-वे, गोल्ड् क्वेस्ट नंतर अशी कुठली नवी स्किम मार्केट मध्ये आली आहे काय?)

प्रतिक्रिया

ह्म्म...तुमच्या लेखातील त्या व्यक्तिच्या बोलण्यावरुन तरी तसाच प्रकार असावा असं दिसतंय. हिडीस फिडीस करुन किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फोनवर न दिल्यास भेटणे अजिबात शक्य नाही असं सांगा....नाहीतर सरळ "मला इंटरेस्ट नाही " असं सांगुन पिच्छा सोडवा :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Feb 2011 - 9:11 am | विश्वनाथ मेहेंदळे

फोन करणारी व्यक्ती पूर्णत: अनोळखी होती आणि वरून तुमचा नंबर कुठून मिळाला ते सांगायला तयार नव्हती असे असूनही तुम्ही रोखठोक नकार का देऊ शकला नाहीत हे कळले नाही. अहो तोंडावर नाही म्हणता येत नाही तर निदान फोन वर तरी म्हणा ना ;-)

फोन वर काहीही डीटेल्स न देणे ही MLM वाल्यांची modus operandi (कार्यपद्धती?) आहे. त्याला MLM नाही कळले तर सरळ अ‍ॅम-वे चे उदाहरण द्या. मुळात ज्याला खरच काही व्यवस्थित प्रकारची प्रोजेक्ट्स करायची असतात तो माणूस ओळखीतल्या माणसालाच काम देतो. एकूण वागण्याची पद्धत बघून MLM वाटते आहे. सरळ नकार द्या. बोलणे जमत नसेल तर नकाराचा SMS टाका आणि त्यात लिहा की परत फोन करू नका म्हणून.

कानडाऊ योगेशु's picture

9 Feb 2011 - 12:19 pm | कानडाऊ योगेशु

त्याला अ‍ॅम-वे आणि गोल्ड क्वेस्ट दोन्हींची उदाहरणे दिली.त्यावर त्याने आय डोन्ट नो व्हाट यु आर टॉकिंग अबाऊट असा बाळबोध उत्तर दिले.
नाही न म्हणता येण्याचे एक कारण म्हणजे पूर्ण संवाद इंग्रजी मध्ये झाला होता.
हो म्हटले कि संभाषण लगेच संपते.
नाही म्हटले कि त्याचे कारण सांगावे लागते. ते ही इंग्लिशमध्ये.वाक्यांची जुळवाजुळव करणे जीवावर येते.
पण ठिक आहे.त्याचा फोन आला तर त्याला इंटरेस्टेड नाही म्हणुन सांगेन.
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.

sagarparadkar's picture

9 Feb 2011 - 2:07 pm | sagarparadkar

>> नाही न म्हणता येण्याचे एक कारण म्हणजे पूर्ण संवाद इंग्रजी मध्ये झाला होता. हो म्हटले कि संभाषण लगेच संपते. <<

अहो मग सॉरी आयेम नॉट इंटरेस्टेड .... असं सरळ इंग्रजीतच सांगायचं आणि फोनुवा कट करून टाकायचा हा का ना का

खाली टारूभाउंनी एक छान आयडीयेची कल्पना दिलीच आहे ती वापरायची नाही तर ...

मी अमेरिकेत जाऊन फोन घेऊन १/२ दिवस होतात कि नाही तो क्रेडिट कार्ड एजन्सीज आणि डेब्ट मॅनेजमेंट कंपनीज चे कॉल्स यायला सुरुवात झाली. प्रत्येक जण सुरवात करायचा/ची तीच अशी: Dear sir you owe twenty thousand dollars on your credit card right? पहिल्यांदा मला कळेचना की मी क्रेडिट कार्ड कधीच वापरले नाही तरी हे असं का सांगताहेत. पण त्यांचे अ‍ॅक्सेंट्स बरेच देशी वाटत होते. नंतर परत कधीही असा फोन आला कि मीच पहिल्यांदा हिंदीत विचारू लागलो कि "बंगलोर की गुडगावहून बोलताय" मग पलीकडील व्यक्ती एकदम बचावात्मक पवित्र्यात जात असे. मग मी सांगायचो की जी काही रक्कम सांगताय त्याचे पूर्ण डीटेल्स माझ्या ई-मेलवर पाठवा, मी चेक करून कळवतो. मग ते ई-मेल आयडी विचारू लागले की सांगायचं कि ज्या कोणाकडून माझा नंबर मिळाला त्याचेकडूनच आयडी पण घ्या ... बर्‍याच विनंत्या केल्या तरी शेवट्पर्यंत आपण कोणतीच महत्वाची माहिती पुरवायची नाही ... शेवटी पलिइकडील व्यक्ती पुरेशी कंटाळली की उलट सांगायचं कि माझा सेल नंबर तुमच्या 'डु नॉट कॉल लिस्ट्'मधे नोंदवून टाका आणि परत कॉल करण्याचे कष्टं घेवू नका .... :)

माझीही शॅम्पेन's picture

9 Feb 2011 - 9:12 am | माझीही शॅम्पेन

एकदा मी अमेरिकेत असाच सॉलिड गांडलोय राव , मला सांगण्यात आल होत की माझ्या मित्राच मित्र एक कंपनी काढतोय त्याला आपण जस्ट भेटुआ. डिनर ऑर्गनाइज़ करतोय सध्यकाळी भेट वैइगरे..
गेल्यावर कळल तो हरा*** ब्रिट वर्ल्ड वाइडचा एजंट आहे..

तत्काळ कल्टी मारली ....तरी पठ्ठ्या नेहमी फोन करायचा.

शेवटी एकदा वैतागून म्हटल तुला एक्सट्रा पैशाची एवढी हौस आहे तर तुझ्या बायकोला रात्री साठी एक नवीन बिझनेस सांगू का ? त्या नंतर फोन कधीच परत आला नाही. ;)

संदीप चित्रे's picture

9 Feb 2011 - 9:45 pm | संदीप चित्रे

>> शेवटी एकदा वैतागून म्हटल तुला एक्सट्रा पैशाची एवढी हौस आहे तर तुझ्या बायकोला रात्री साठी एक नवीन बिझनेस सांगू का ? त्या नंतर फोन कधीच परत आला नाही. :)
ख-ल्ला-स..
आत्तापर्यंत खूप MLMवाल्यांना सरळ 'नाही' म्हणालो आहे पण असं कधीच फटकावलं नव्हतं :)

दुसर्‍याचा वॅळ या लोकांना मातीमोल वाटतो.मिळला बकरा तर मिळाला नाहीतर फु़अटात यांचं प्रशिक्षण होतं पब्लीक स्पीकींगचं. इतका राग येतो. ढुं** सडकून काढावसं वाटतं या लोकांचं. :(

नाहि म्हनायला शिका - हा का ना का

मला असं कोणी विचारल्यावर मी त्याला सांगतो , बाबारे माझ्याकडे पैका नाही .. तुर्तास तु माझा पैका भर , ह्यातुन इनकम सुरु झालं की मग तुझा पैका काढुन घे , आणि मग मी घेईन :)

;)

संदीप चित्रे's picture

9 Feb 2011 - 9:46 pm | संदीप चित्रे

तुझाही "नाही" म्हणण्याचा प्रकार आवडला रे टार्‍या :)

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 10:44 am | नरेशकुमार

क्रेडीट कार्ड वाल्या बरोबर मी एकदा असेच काहीतरी केले, म्हनजे.
मी त्याला माझी माहीति वगेरे दिली, मग त्याने काय काम करता, पगार किति, असे विचारले ?

मग मी सांगितेले की कारखान्यात वेल्डर म्हनुन कामाला आहे.
त्यानेच फोन ठेउन दिला.

चिरोटा's picture

9 Feb 2011 - 11:31 am | चिरोटा

हे असे बर्‍याच वेळा होते. मी अशांना बिझनेस मॉडेल/presentation वगैरे ईमेलने पाठवायला सांगतो. पण तरीही ते पाठवत नाहीत.सारखा फोन आला तर 'आता नको,दोन महिन्यांनी बघू' म्हणून वेळ मारुन नेतो. व्यक्तीविषयी काही माहित नसताना जेव्हा 'बिझनेस' करायला हे लोक येतात तेव्हाच ह्यात काहीतरी गडबड असते.
खरोखरच ज्यांच्याकडे 'किलर बिझनेस मॉडेल/अ‍ॅप' असते ते लोक सहसा फोन करणार नाहीत.

असहकार's picture

9 Feb 2011 - 11:40 am | असहकार

अशा लोकांचे नबंर जपुन ठेवावे.

व दुसर्या कोणी MLM करता फोन केला तर त्यास " मला वेळ नाही , पण माझा मित्र इच्छुक आहे म्हणुन हे नंबर द्यावे."

क्रेग्स लिस्ट वर मेन लुकिंग फॉर मेन मध्ये जाहीरात देऊन कॉंटॅक्ट नंबर म्हणून त्यांचा नंबर देणे.

sagarparadkar's picture

9 Feb 2011 - 2:13 pm | sagarparadkar

ह्ये लई भारी ..... आवडलं परत कधी वेळ आली की ही आयडीया करणारच :)

गोगोल's picture

10 Feb 2011 - 12:34 am | गोगोल

जाहिरातीत "आय लाइक रफ सेक्स अँड अब्यूसिव टॉक टर्न्स मी ऑन" टाकायला विसरू नका.

मला सुरुवातीला वाटले की योगेश अमेरिकेत आहेत म्हणून हा उपाय सुचवला. भारतात कसा इंप्लिमेंट करता येईल माहीत नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Feb 2011 - 8:53 am | विश्वनाथ मेहेंदळे

सोपे आहे. लोकल मध्ये एखाद्या मुलीच्या नावाने हा नंबर लिहा. रिकामटेकडे लोक करतात म्हणे फोन :-)

गोगोल's picture

9 Feb 2011 - 12:09 pm | गोगोल

पुढच्या वेळी त्याचा फोन आला की त्यानी काही बोलायाच्या आत तुम्ही सुरू व्हायच:

बर झाल फोन केलास ते. माझ्याकडे एक सोल्लिड बिज़्नेस ऑपर्चुनिटी आहे. मला एक सांग सध्या तुझा पगार किती आहे? (इथे हा तिकडे फोन वर अस्वस्थ व्हायला चालू होतो).. तो काहीतरी गुळुमुळु उत्तर देणार .. बर मग साधारण बॅंक बॅलेन्स किती आहे? ... तो तिकडे अजुन अस्वस्थ .. परत काहीतरी थातुर मातुर उत्तर देणार .. (त्याला असलीच तर बायकोचा पण पगार विचारून घ्यावा) .. जर का त्यानी प्रतिप्रश्न केले किंवा उडवा उडविची उत्तर दिली तर त्याला घोळात घेऊन सांगायचे .. तू सांग तर खर .. तुझाच फायदा आहे. नंतर मलाच धन्यवाद देशील ई ई (बोलताना असा सूर कायम ठेवायचा की हा तुमचा लंगोटी यार आहे आणि थोडासा कॉंन्डसेंडिंग टोन ठेवायचा). हे सगळे प्रश्न विचारायाच कारण म्हणजे त्याला सायकॉलॉजिकलि त्याला ऑफ बॅलेन्स करणे.

मग सुरू करायचे की हा दुर्मिळ नाण्यांचा बिज़्नेस आहे. फक्त वीस हजार डॉलर ला एक नाण विकत घ्यायाच .. तीन महिन्याच्या आत तुम्ही मिलिनेअर झालात म्हणून समजा. मी तर हे नाण घेतल आहेच पण मला खात्री आहे तुमच्यावर मी विश्वास टाकु शकतो. आणि तुम्ही एक नाण घ्यालच. त्याला विचारायाच कि उद्याचीच मीटिंग फिक्स करू का, याच नंबर वर उद्या फोन करतो ई. आणि मग म्हणायाच की परवा आपण तुमच्या कार्यक्रमाला पण जाउ :)

मस्त वाटले वाचुन.
असे कधी केले आहे का ?

गोगोल's picture

10 Feb 2011 - 12:30 am | गोगोल

:)

अरुण मनोहर's picture

9 Feb 2011 - 4:03 pm | अरुण मनोहर

झी टीव्ही वरच्या बातम्या ऐकल्यासारखे वाटले.

"अब सुनिये न्युज नेबरींग कंट्रीजसे"

"इज इट अ मल्टीलेवल मार्केटिंग वन्स अगेन"

मराठी वारली काय? असे वाटत होते की आणखी पन्नास वर्षे तरी टिकेल!

विजुभाऊ's picture

9 Feb 2011 - 5:02 pm | विजुभाऊ

अ‍ॅम वे च असेल. त्याने तुम्हाला रेसीड्यूअल इनकम वगैरे फन्डे साम्गितले का?
जपान लाइफ सध्या पश्चीम महाराष्ट्रात कुठे दिसत नाही.
त्याने " एक जबरदस्त प्लॅन आहे" असे काही सांगितले का?
बर्‍याच वेळेस ते काय बोलतात त्यावरून कोणती कंपनी आहे ते लग्गेच कळते

टारझन's picture

9 Feb 2011 - 5:06 pm | टारझन

विजुभाऊंचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक !!

कानडाऊ योगेशु's picture

9 Feb 2011 - 5:16 pm | कानडाऊ योगेशु

मी बेंगलोर मध्ये असतो हे आधी सांगायला हवे होते.
एम.एल्.एम बद्दल त्याने कानावर हात ठेवले.
पण जास्त खोदुन विचारल्यावर त्याने सांगितले कि वेबसाईट वापरण्यासाठी तुम्हाला खाते ओपन करावे लागेल आणि त्याची फी म्हणुन साधारण रु.९५० भरावे लागतील.
फोनवर मात्र त्याने एकुण प्रकार काय आहे ह्याबद्दल ताकास तुर लागु दिला नाही.
प्रत्यक्ष सेमिनारलाच ये हेच तो सारखे सारखे सांगत होता.
माझ्या माहितीनुसार गोल्ड-क्वेस्टची स्किम काही दिवसांपर्यंत बेंगलोरमध्ये फार चालत होती पण सध्या काही ऐकायला मिळाले नाही.अ‍ॅम-वे बद्दल पण बर्याच दिवसांत काही ऐकले नाही.
त्यामुळे शंका आली कि अजुन कुठली नवी स्किम तर मार्केटमध्ये आली नाही ना?
इथे कंपनी कलिग्स बरोबर ह्या प्रकाराची चर्चा केली असता समजले कि त्यांच्या बाबतीत सुध्दा हा प्रकार झाला आहे.
कंपनी स्टार्ट अप वेन्चुअर आहे असे सांगुन सेमिनारला बोलावले जाते आणि पैसे भरुन पार्टनर व्हा असा आग्रह केला जातो.

क्लिंटन's picture

9 Feb 2011 - 9:22 pm | क्लिंटन

हो बरोबर ते रेसिड्युअल इनकमविषयी बोलतील, मॅक्डॉनल्डच्या बिझनेस मॉडेलविषयी बोलतील आणि कदाचित रॉबर्ट कियोसाकीच्या Rich Dad Poor Dad सारख्या पुस्तकाविषयीपण बोलतील.अमेरिकेत वॉलमार्ट, मॉल अशा ठिकाणी एकट्यादुकट्या बेसावध भारतीयाला खिंडीत गाठण्यात यांचा हात कधीही कोणीही धरू शकणार नाही.आणि रविवारी रात्री ८ वाजायच्या सुमारास "मला तुम्हाला भेटून बिझनेसविषयी बोलायचे आहे" असे म्हणून एखादी वेळ ठरवतील.आणि फोनवर इतक्या अदबीने बोलतील की आपल्याला वाटेल की आपल्यालाही वाटू लागेल की याला भेटायला हवे! अगदी कितीही उच्चशिक्षित असले, कितीही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या यांना असल्या तरी भिकाऱ्यासारखी लोकांची वाट बघत वॉलमार्ट आणि मॉलमध्ये लाचारासारखे टपून बसायला यांना काहीच कसे वाटत नाही काय माहित.मी तिकडे असताना यांची दुनिया अगदी जवळून बघितली आहे आणि असे लोक किती लुच्चे, लबाड आणि लफंगे होऊ शकतात हे पण अगदी जवळून बघितले आहे.पिरॅमिडच्या टोकावर बसलेल्या कोणा ढुढ्ढाचार्याला मिलियन डॉलरच्या बंगल्यात राहायला मिळावे म्हणून मी ४ डॉलरला मिळणारी टूथपेस्ट सोडून १५ डॉलरला मिळणारी पेस्ट घेऊन स्वत: मूर्ख बनायचे आणि मला पण कधीतरी त्या मिलियन डॉलरच्या बंगल्यात राहायला मिळेल या आशेवर इतर मूर्ख लोक गोळा करत हिंडायचे असे हे गणित आहे.महिन्याच्या शेवटी १०० पॉईंटचे सामान खरेदी न केल्यास पूर्वी गोडगोड बोलणारेच लोक कसे जाब विचारायला फोन करतात याचा पण मी अगदी जवळून अनुभव घेतला आहे.अशा लोचटांना मराठीच काय तर जगातल्या यच्चयावत सगळ्या भाषांमधील सगळे अपशब्द एकाच वेळी दिले तरी ते अपुरेच ठरेल. हे अनुभव न आलेला अमेरिकेतील भारतीय मनुष्य विरळाच असेल.

मागे आमच्या हिलरीने "कोणी ऍमवेवाला प्लॅन दाखवायला घरी येणार आहे" असे सांगितले.त्यावर तो माणूस घरी येताच त्याच्या डोक्यात घालायला वरवंटाही तयार ठेवायलाही मी हिलरीला सांगितले.अर्थातच तो माणूस माझ्याकडे आला नाही हे सांगायलाच नको.

तेव्हा कानडाऊ साहेब, तुम्हाला पिडणाऱ्या माणसाला माझा नंबर जरूर द्या.मी व्य.नि तून माझा नंबर कळवू शकेन.तो लोचट आपला बिझनेस भारतात वाढेल म्हणून मोठ्या आशेने फोन करायची शक्यता बरीच जास्त आहे.त्याची बिनपाण्याने कशी उलटीसुलटी करायची हे माझ्यावर सोडा.

माझे तरी स्पष्ट मत आहे की अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा प्रमाणेच ऍमवेही भयंकर धोकादायक संघटना आहे आणि सामान्यांना खोट्या आशा दाखवून दिशाभूल करणाऱ्या या संघटनेचा वेळ पडली तर लष्कर बोलावून बिमोड करावा असे माझे स्पष्ट मत आहे.तेव्हा कानडाऊ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है!

शिल्पा ब's picture

9 Feb 2011 - 10:43 pm | शिल्पा ब

अगदी...मलासुद्धा वॉलमार्टात असे अनुभव आले...लोक येऊन अगदी भारतीय म्हणून गोड गोड बोलतात आणि आपला नंबर मागतात, एक फ्रेंड म्हणुन...काय ते लगेच लक्षात येते...मी लक्षच देत नाही...बायकासुद्धा यात काही कमी नाहीत.

क्लिंटन's picture

9 Feb 2011 - 11:11 pm | क्लिंटन

बायकासुद्धा यात काही कमी नाहीत

अगदी.जोडप्यामधील बायको एखाद्या बेसावध स्त्रिला असे खिंडीत पकडते तर नवरा पुरूषांना! दोघे मिळूनच "कॉन्टॅक्टिंग" साठी बाहेर जातात.या सगळ्या प्रकारामुळे अमेरिकेत मॉल-वॉलमार्टमध्ये कोणी भारतीय आपल्याशी बोलायला आला तर तो चांगल्या उद्देशाने तसे करत असला तरी एक किडा मात्र डोक्यात वळवळतोच की कशावरून हा बकरा शोधायला आपल्याशी बोलत नसेल?या ऍमवेवाल्यांपैकी सुरवातीला जॉईन झालेल्यांपैकी बहुतेकांनी लक्षावधी डॉलर मिळवले असतील पण त्यांच्यामुळे अमेरिकेत भारतीयांमधील सोशल नेटवर्कींगवर परिणाम झाला आहे हे नक्कीच.

बायकांच्या गळेपडूपणाचा अनुभव नाही पण एकदा एक भारतीय बुवा नवर्‍याला आणि मला मॉलमध्ये गाठून काहीबाही सांगत होता. नवर्‍याने त्याला फोन नं न देता टोलवला. मला या सगळ्याची कल्पना नसल्याने वाटले कि हा सज्जन मनुष्य असेल आणि आपला नवरा किती तुसडेपणानं वागला. बरं, नवर्‍यानं तरी लगेच मला कल्पना द्यायची तर तेही नाही. बरेच दिवसांनी हा प्रकार नवर्‍यानंच सांगितला.

बायकांच्या गळेपडूपणाचा अनुभव मला एकदा नाही अनेकदा आला. मुख्य म्हणजे दोन वेळेस (दोन वेगळ्या बायका) माझ्याऐवजी माझ्या मुलीला मॉलमध्ये आणि स्टोअरमध्ये अप्रोच झाल्या. तीला अनोळखी लोकांशी बोलायचं नाही हे माहीतीय पण त्या भारतीय असल्याने तिला त्या अनोळखी (stranger) वाटल्या नाहीत, मग मला एकीकडे त्या बाईला व नव-याला तिच्या नव-याला कटवावे लागले.

भडकमकर मास्तर's picture

9 Feb 2011 - 11:11 pm | भडकमकर मास्तर

माझे तरी स्पष्ट मत आहे की अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा प्रमाणेच ऍमवेही भयंकर धोकादायक संघटना आहे आणि सामान्यांना खोट्या आशा दाखवून दिशाभूल करणाऱ्या या संघटनेचा वेळ पडली तर लष्कर बोलावून बिमोड करावा असे माझे स्पष्ट
मत आहे.

क्लिन्टन यांचा हा आक्रमक प्रतिसाद ऐकून भारावून गेलो....

क्लिनिकमध्ये एखादा पेशंट आम्ही अ‍ॅमवेची पेस्ट वापरणार आहोत त्यामुळे आमचे दात खूप छान होणार आहेत असे सांगतो तेव्हा उत्सुकतेने मी झोपतो...समजा थोडा वेळ असलाच तर त्यांना याच विशयावर बोलते करतो... त्यांची हीच पेस्ट वापरण्यामागची कारणमीमांसा ऐकायलाही मजा येते... थोड्या वेळाने पेशंटला वाटायला लागते की या डॉक्टराला आपण टोटल पटवला आहे, ( हा आनंद त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसू लागतो) तो मग याच टूथपेस्टचे गुणवर्णन करत काहीही फेकायला लागतो.... माझी भरपूर करमणूक होते...... पुढे वेळ असेल तर ( आणि पेशंट बरा असेल तर ) मीही त्याचे प्रबोधन करतो...
आणि एखादा भंपक माणूस असेल तर मी इतकेच म्हणतो की "इतकी महागडी पेस्ट? मग रिझल्ट यायलाच पाहिजे.. न येऊन सांगतोय कोणाला?"

क्लिंटन's picture

9 Feb 2011 - 11:15 pm | क्लिंटन

हा हा हा

चारपाच पट महाग पेस्ट घेतली असेल तर आपण फसलो गेलो आहोत हे इतरांना कळू नये म्हणून त्याचे काहीतरी जस्टिफिकेशन करणे गरजेचे असेल ना! म्हणूनच ही पेस्ट किती चांगली आणि तत्सम काहीतरी असे लोक बोलत असणार!!

कानडाऊ योगेशु's picture

10 Feb 2011 - 9:11 am | कानडाऊ योगेशु

सोलापुरात ह्यापेक्षा अगदी उलटा प्रकार नातेवाईकांकडुन ऐकला आहे.तिथे एक डॉक्टरच अ‍ॅम-वे चा एजंट आहे.पेशंटचे ओपरेशन वगैरे ट्रिटमेंट झाली कि हा अ‍ॅम-वे बद्द्ल बोलायला चालु करतो.

पेशंटची जाम गोची होते.

पेशंट मध्ये नुकतीच बाळंत झालेली बाई/वा तिचे नातेवाईक असु शकतात.आणि तो बिनदिक्कत अ‍ॅम-वे चे सोपस्कार ही डिस्चार्जच्या वेळेला उरकुन टाकतो.

धमाल मुलगा's picture

10 Feb 2011 - 3:13 pm | धमाल मुलगा

भले भले...

ह्या लोकांच्या टॅक्टिक्स मध्ये आणखी एक भर म्हणजे, वॉलमार्ट किंवा तत्सम ठिकाणी गाठून प्रथम आपण जिथे आहोत तिथे काहितरी घ्यायच्या निमित्ताने जवळ येतात. त्यातही त्यांची बायको एका आईल मधे व नवरा वेगळ्या आईल मधे फिरत असतात जेणेंकरून तुमचे बकरा पकडण्याचे चान्सेस वाढतील. मग आपण जी वस्तू उचलतो ती चांगली आहे का? वगैरे फालतू प्रश्न विचारतात.. मग इथे जवळ कुठलं भारतीय हॉटेल किंवा दुकान आहे का .. आपण इथे नविन आहोत.. वगैरे बडबडून 'कम्युनिकेशन च्यानल'ओपन करतात.. मग हळूच आपला नंबर विचारतात...

अमेरिकेत आम्ही नविन होतो तेव्हा 'कुळकर्णी' आडनावाच्या माणसाने त्याचं 'मराठी-मराठी भाई भाई' कार्ड वापरून मला पटवायचा प्रयत्न केला होता. तेव्हा ह्या लोकांची माहिती नसल्यामुळे आम्ही त्याला नंबर दिला.. नंतर घरी येऊन त्याने दोन तास कुरतडले.. अर्थात आम्ही 'आत्ता ह्यात ईंट्रेस्ट नाही' म्हणून वाटेला लावलं..

मला या लोकांचा राग यासाठी येतो की, एखाद्याला मदत करण्याचा किंवा मैत्री करण्याच्या आपल्या स्वभावाचा ही लोकं गैरफायदा घेतात.

ऊसगावात असाल आणि मल्टी लेवल मार्केटिंगवाला पाठीशी लागला तर सरळ आपल्या स्टेटच्या अ‍ॅटॉर्नी जनरलच्या ऑफिसमधे तक्रार करावी. देशात असाल तर माणूस भलेही इंग्रजीत, हिंदीत बोलत असला तरी आपण व्यवस्थित मराठीत सांगायचे की मी जुगार खेळणे बंद केलेय ;) आणि फोन ठेवून द्यायचा.

आपण टेन्शन द्यायचं!

त्याला विचारायचं, "येतो की! तुझ्यातलं किती कमिशन देणार?" :D
तो काय बोलला तर म्हणायचं, "मी विमा एजंटांनापण सोडत नाय. आत्तापर्यंत ५ MLM कुंपण्यांचा मेंबर आहे मी...सगळे त्यांच्या कमिशनचं परसेंट मला देतात..तू किती देतोस बोल." =)) =))

नितिन थत्ते's picture

9 Feb 2011 - 10:17 pm | नितिन थत्ते

आपण काही व्यवसाय करीत असलो आणि ग्राहक कंपनीतल्या ज्या कर्मचार्‍याशी आपण नेहमी डील करत असतो त्यानेच अशी गळ घातली तर जाम गोची होते. :)

पंगा's picture

10 Feb 2011 - 9:46 am | पंगा

"कंपनीच्या वेळात अ‍ॅम्वेचे धंदे करतोस काय रे, xxव्या? कळवू का वरती?" म्हणून त्याचा बंदोबस्त करता येत नाही काय?

कानडाऊ योगेशु's picture

12 Feb 2011 - 2:07 am | कानडाऊ योगेशु

प्रतिसादांबद्दल मिपाकरांचे धन्यवाद.

हा "आदर्श" मला आज (शुक्रवारी) फोन करणार होता.उद्याच्या सेमिनारसाठी.

मी रात्रीपर्यंत वाट पाहतच होतो.

हा कधी एकदा फोन करतोय आणि इथे मिपाकरांनी जे काही अनुभव शेअर केलेत त्याचा वापर करुन त्याला कसा कटवतोय त्याची.!(तेवढेच मला माझे इंग्लिश सुधारण्याचा चान्स मिळेल ;) )

पण त्याने फोन केलाच नाही.

कदाचित परवा जेव्हा त्याने कॉल केला होता तेव्हा मी विचारलेल्या प्रश्नांवरुनच त्याला अंदाज आला असावा.

चला म्हणजे मी इतकाही काही तो हे नाहीये... :)