हस्तमुद्रा (तळहाताच्या रंगवलेल्या मुद्रा)

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
8 Feb 2011 - 9:54 am

From Mario

कलादालनामध्ये फक्त आपण निर्माण केलेल्या कलाकृती टाकण्याची परवनगी आहे म्हणून येथे या कलेचा उल्लेख करत आहे. जालावर फिरता फिरता काही हस्तमुद्रा (तळहाताच्या रंगवलेल्या मुद्रा) नजरेस पडल्या. या मारीओ मारिओटी या कल्पक कलाकाराने रंगविलेल्या असून , अक्षरक्षः खिळवून ठेवणार्‍या आहेत.

सर्वात प्रथम श्रेयनोंद -
दुवा १
दुवा २

मानवी आकृतीं तसेच पशू पक्ष्यांचा अंतर्भाव या मुद्रांमध्ये केलेला आढळतो. फारच मोहक आणि एकमेवाद्वितीय अशी ही कला सादर करणार्‍या या कलाकाराचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही.

खाली ४ चित्रे दिली आहेत. बाकीची दुव्यावर पहावीत.

चित्र १

चित्र २

चित्र ३

चित्र ४

मौजमजास्थिरचित्रआस्वाद

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Feb 2011 - 10:01 am | llपुण्याचे पेशवेll

वाह.छान.
मुठीचा असाही एक उपयोग असू शकतो असे वाटले नव्हते. शेवटचे माऊ तर खूप छान.

पंगा's picture

9 Feb 2011 - 10:27 am | पंगा

नाही, काही नाही...

sneharani's picture

8 Feb 2011 - 10:13 am | sneharani

मस्त आहेत हस्तमुद्रा!
शेवटची माऊ मस्तच!
:)

महेश-मया's picture

8 Feb 2011 - 10:22 am | महेश-मया

फारच सुंदर आहेत, चित्र ३ आणि चित्र ४ फार आवडले.

डावखुरा's picture

8 Feb 2011 - 10:23 am | डावखुरा

छान...
आधी बरेचसे पाहिले होते..
पण माहीती मिळाल्याने अजुन आवडले....

मुलूखावेगळी's picture

8 Feb 2011 - 11:51 am | मुलूखावेगळी

+१
मला प्राणी आवडत नसल्याने १ अनि ३ नं. च्या आवडल्या

कच्ची कैरी's picture

8 Feb 2011 - 10:44 am | कच्ची कैरी

याआधी हातांची करामत शॅडो च्या स्वरुपात पाहिली होती ही पण मस्तच आहे .

चेतन's picture

8 Feb 2011 - 10:48 am | चेतन

मस्त - unbelievable
फूटबॉल पेन्टींग सुंदर आहे.

शेवटची मांजर अप्रतिम

चेतन

अरे वा! मस्त आहेत हस्तमुद्रा!

स्वैर परी's picture

8 Feb 2011 - 11:07 am | स्वैर परी

चित्र ३ आणि ४ अप्रतिम! याआधी देखील ढकलपत्रांतुन अशी चित्रे पहिली होती. ती देखील अशीच सुंदर आणि कलात्मक होती!

वारकरि रशियात's picture

8 Feb 2011 - 12:36 pm | वारकरि रशियात

रंगकामातून साकारलेल्या करमुद्रा छानच ! (वर म्हंटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रतिमा आधी पाहिल्या होत्या)

अवांतरः १) थोडा(सा) भ्रमनिरास झाला. भरतनाट्यम् कत्थक वगैरे भारतीय शास्त्रीय नृत्याशैलीत वापरल्या जाणा-या पताक, त्रिपताक, हंसास्य वगैरे करमुद्रांची अधिक व सविस्तर ओळख वाचायला / पहायला मिळेल असे धागा उघडताना आधी वाटले होते !
२) शुचीतै (किंवा आणखी कोणी जाणकार) या विषयावर लिहु शकाल काय? केवळ अलता लावलेल्या हातांनी कितीतरी भाव व्यक्त होतात ! येथे या विषयावर (कोणी लिहिलेले) वाचल्याचे आठवत नाही.

वारकरि रशियात's picture

8 Feb 2011 - 12:37 pm | वारकरि रशियात

प्रकाटाआ.

वारकरि रशियात's picture

8 Feb 2011 - 12:38 pm | वारकरि रशियात

पुन्हापुन्हा प्रकाशित झालेला प्रकाटाआ.

शुचितै, लई भारी माहिती दिलीत, घरी गेल्यावर पोराला दाखवतो खुप खुश होईल तो.

हर्षद.

गणेशा's picture

8 Feb 2011 - 2:11 pm | गणेशा

मस्त

परिकथेतील राजकुमार's picture

8 Feb 2011 - 3:48 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त मुद्रा.

हे वाचल्या वाचल्या आधी सहजमामांप्रमाणेच मध्यप्रदेश पर्यटनच्या जाहिरातीचीच आठवण झाली.

अमोल केळकर's picture

8 Feb 2011 - 4:13 pm | अमोल केळकर

सुंदर

अमोल

प्राजक्ता पवार's picture

8 Feb 2011 - 4:17 pm | प्राजक्ता पवार

छान आहेत हस्तमुद्रा .

स्वाती२'s picture

8 Feb 2011 - 6:21 pm | स्वाती२

मस्त! मनिमाऊ आणि फुटबॉल प्लेयर्स खासच! धन्यवाद.

स्पा's picture

8 Feb 2011 - 6:24 pm | स्पा

प्रास's picture

8 Feb 2011 - 7:59 pm | प्रास

हे लईच भारीये......

मुलूखावेगळी's picture

9 Feb 2011 - 2:02 pm | मुलूखावेगळी

हे कुठुन घेतलाय त्यचा उल्लेख्,श्रेय दिलेले नाहीये आपन स्पायोजी.

नरेशकुमार's picture

8 Feb 2011 - 7:42 pm | नरेशकुमार

माहीति छान आहे.

रेवती's picture

8 Feb 2011 - 8:07 pm | रेवती

धागा छानच.

Pearl's picture

9 Feb 2011 - 10:23 am | Pearl

मनिमाउ खूपच छान :-) त्या फोटोत हाताची बोटं शोधावी लागली.

स्पंदना's picture

9 Feb 2011 - 11:19 am | स्पंदना

हे ही छानच! आधी पाहिली होती ती वेगळी होती. धन्स शुची.
सहज तुमचे अन स्पावड्याचे ही कौतुक करावे तेव्हढे थोडेच.