ज्योतिषशास्त्र हे चार हजार वर्षापूवीर्चे शास्त्र असून राज्यघटनेच्या धर्मरिनपेक्षतेच्या तरतुदीला त्याची बाधा होत नाही, अशी माहिती गुरुवारी हायकोर्टापुढे केंदापुढे देण्यात आल्याने त्याविरोधातील जनहित याचिका कोर्टाने निकाली काढली.
या संदर्भात जनहित मंचचे भगवानजी रैय्यानी यांनी केलेल्या याचिकेवर मुख्य न्या. मोहित शहा व न्या. वजिफदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात केंदातफेर् या शास्त्राबद्दल वरील भूमिका व्यक्त करण्यात आली. ज्योतिषशास्त्री बेजान दारूवाला आणि इतरांकडून होणाऱ्या या व्यवसायालाच याचिकेत आव्हान देण्यात आले होते. लोकल ट्रेन, वृत्तपत्रे यांच्यात पाने भरून ज्योतिषशास्त्रांच्या जाहिराती देऊन लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. मात्र याच मुद्यावर सुप्रीम कोर्टात खगोलशास्त्रज्ञ डॉ. भार्गव यांची याचिका फेटाळण्यात आल्याचे केंदातफेर् हायकोर्टाच्या निदर्शनाला आणण्यात आल्याने ते लक्षात घेत हायकोर्टाने जनहित मंचची याचिकाही अमान्य केली.
प्रतिक्रिया
4 Feb 2011 - 11:26 am | युयुत्सु
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7422350.cms
4 Feb 2011 - 11:30 am | युयुत्सु
आज आमच्या कडे या निकाला संदर्भात विशेष सत्यनारायण आयोजित केला असून सर्वानी तीर्थप्रसादास सहकुटुम्ब जरूर यावे
4 Feb 2011 - 12:01 pm | अवलिया
अभिनंदन ! :)
4 Feb 2011 - 11:33 am | प्रचेतस
कोर्टाने चुकीचा निकाल दिला म्हणायचा. पण तुमच्याकडे तीर्थप्रसादास येणे जरूर आवडेल. बदाम घालून साजूक तुपाचा प्रसाद करावा व पत्ता व्यनि करावा.
4 Feb 2011 - 1:12 pm | घाशीराम कोतवाल १.२
+१
सहमत आहे
तुमच्याकडे तीर्थप्रसादास येणे जरूर आवडेल. बदाम आणि मनुके घालून साजूक तुपाचा प्रसाद करावा व पत्ता व्यनि करावा.
6 Feb 2011 - 9:30 am | चिंतामणी
व्यनि का करावा??? निमंत्रण जाहीर आहे. तेंव्हा पत्तासुध्दा जाहीर करावा.
6 Feb 2011 - 9:38 am | वडिल
+१
4 Feb 2011 - 11:49 am | मुलूखावेगळी
मग खुश तो बहोत होन्गे तुम आज
हो तसेही आज विकान्त सुरु होत आहे जमेल यायला
4 Feb 2011 - 12:17 pm | अमोल केळकर
चला बरं झालं
अमोल
6 Feb 2011 - 8:22 am | वडिल
अमोल जी,
तुमचा ब्लॉग बघितला.
फार सुन्दर सजवला आहे. नव्या पिढितील एक नामवंत ज्योतिष तज्ञ म्हणुन आपली ख्याती ऐकुन आहे.
4 Feb 2011 - 12:36 pm | कवितानागेश
>:)
4 Feb 2011 - 5:56 pm | भारी समर्थ
जिथे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती म्हणते की त्याच्यावर 'काळी जादू' करून संपवण्याचा कट विरोधकांनी रचला आहे, तिथे 'ज्योतिष हे एक शास्त्र आहे की नाही' असले मुद्दे चर्चिले जातात हीच मुळात हास्यास्पद बाब आहे.
http://www.sify.com/news/yeddyurappa-s-black-magic-claim-may-land-him-in...
सुका म्हणे देवा| जादू काळी झाली||
झाले जन सारे| शक्तीहीन||
भारी समर्थ
4 Feb 2011 - 8:01 pm | तिमा
जसे देव आहे पण तो सिध्द करता येत नाही तसेच ज्योतिषाच्या बाबतीत अहे. आणि इथे कोणाला सक्ती आहे का ? नसेल विश्वास तर नका वाचू त्याबद्दल.
युयुत्सुराव, अभिनंदन.
4 Feb 2011 - 8:15 pm | वेताळ
प्यार्टी आयोजित करा. जरुर येवु.
4 Feb 2011 - 9:01 pm | jaydip.kulkarni
थोडक्यात काय ज्योतिषशास्त्राचे भविष्य चांगल आहे ............... :-)
4 Feb 2011 - 10:45 pm | वडिल
माननिय श्री युयुत्सु राव साहेबांचे अभिनंदन
भविष्यात तुमची अशीच प्रगति होत राहो ..
भारत हे एक जागतिक भविष्य शास्त्रा चे केन्द्र होण्या साठि सर्व विद्दापिठांनी विशेष शिक्षण सुरु करणे जरुरीचे आहे. भारत हे भविष्य कथन करण्याचे "जागतिक आउटसोर्सिंग हब" झाले तर त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थे ला खुप फायदा होइल. गंडे -दोरे, खडे, अंगठ्या आदि चा व्यापार हि वाढेल. जगात त्या साठि मोठा बाजार आहे आणि स्पर्धा हि कमी आहे त्या मुळे भारत लवकर महाशक्ति बनेल हे नक्कि.
अजुन एक फायदा म्हणजे कुठले गैरव्यवहार, भ्रष्टाचार कधी आणि कुठे होतील हे सुध्दा मिडियातील लोकांना लवकर समजतील आणि त्याना हवी ती काळजी घेता येइल.
आमचे एक परम मित्र श्री बधिर गोरे, जे नेहमी आमच्या बॅरी ला पत्र लिहत असतात, त्यांच्या कानावर तुम्हि हे जरुर घाला. म्हणजे ते अमेरीकेतील विविध विद्दापिठातुन असे अभ्यास क्रम सुरु करतील. निकि हेली, बॉबी जिंदल सारखे "भारतिय वंशा" चे लोक तर उत्स्फुर्त पणे मदत करतील. ( बॉबी जिंदल काळी जादु करण्यात त्याच्या चर्च मधे आघाडिवर आहे असे एकिवात आहे)
मी भारतिय अर्थव्यवस्थे ची फार काळजी करत होतो... चला एकदा ती काळजी मिटली !
4 Feb 2011 - 10:51 pm | आत्मशून्य
बरे झाले नाहीतर ऊद्या बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल या न्यायाने भवीश्यकाळ अस्तीत्वातच नसतो असा पण नीकाल दीला जायचा.
5 Feb 2011 - 12:20 am | दैत्य
बरे झाले नाहीतर ऊद्या बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल या न्यायाने भवीश्यकाळ अस्तीत्वातच नसतो असा पण नीकाल दीला जायचा
एका अर्थी खरं आहे!......भविष्यकाळ अस्तित्वात नसतोच मुळी!! अस्तित्व म्हणजे भूतकाळ झाला.....
5 Feb 2011 - 1:26 am | कवितानागेश
ज्योतिषशास्त्राचा विषय निघाला, की लगेच आपली गाडी गंडे- दोरे, खडे, काळी जादू अश्या विषयांकडे का वळते , हे मला आजपर्यंत कळले नाहीये.
काही लोक, ज्योतिषाच्या नावाखाली त्या शास्त्राभोवतालचा अंधार अधिकच गडद करत, लोकांच्या अज्ञानाचा गैर्फायदा उठवून 'काळे धंदे' करतात,
म्हणून, सर्वानीच ते अज्ञान कायम ठेउन कुठलीही गोष्ट तपासून न पाहता,
मूळ शास्त्रालाच खोटे ठरवायचे, हा आततयीपणा झाला.
अज्ञानाचा गैरफायदा काय फक्त ज्योतिषी उठवतात, डॉक्टर्स नाहीत उठवत? नेते नाहीत उठवत?
कुठलेही ज्ञान-टूल , हे नक्की कसे वापरायचे हे त्या-त्या व्यक्तीच्या वृत्तीवर, परिस्थितीवर अवलंबून असते, त्या टूल वर नाही.
5 Feb 2011 - 1:32 am | Nile
आधी तुम्ही ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध करुन दाखवा आणि मग असले प्रतिसाद द्यायचा आततायीपणा करा. (हे कसे करावे? यावर पुष्कळ चर्चा झाली आहे, मिपा आणि उपक्रम चाळुन पहा)
कायच्या काय! ठराविक टुल ठराविक कामांसाठीच बनवले जाते. ज्योतिष फितिष वाले सगळे थोतांड लोक असलीच काहीतरी वरुन स्मार्ट दिसणारी पण पोकळ वाक्यं फेकवुन भोळ्या सावजांना हेरतात. करवतीने ड्रील करुन दाखवा पाहु.
5 Feb 2011 - 3:08 am | मूकवाचक
शास्त्र म्हणजे काय याची सर्वमान्य आणि परिपूर्ण अशी व्याख्या असल्यास अवश्य सान्गा. एकदा हे जमले की आरामात ज्योतिष्याकडे बघता येईल.
5 Feb 2011 - 4:00 am | Nile
सर्वमान्यतेत तुमचीही मान्यता लागणार का? आणि परिपुर्णता तुम्ही ठरवणार का? (कुठल्याश्या चांगल्या डिक्शनरीतील व्याख्या मला रोजवापराकरता मान्य होण्यास काहीच अडचण नाही)
अशी कुठलीच व्याख्या मला शास्त्र कळण्याकरता लागत नाही, माझ्या सामान्य ज्ञानाने मला ते कळते.ज्योतिष शास्त्र का नाही यावर पुष्कळ उहापोह झाला आहे, त्यामुळे पुन्हा ते लिहायचे कारण नाही. तो उहापोह वाचुनसुद्धा तुमचे मत ते शास्त्र आहे असे असेल तर ते(वेगळ्या धाग्यात)मांडावे.
फक्त व्याखेवर चर्चा करायची असेल तर त्यात मला फारसा रस नाही(हे असे देखील वाचता येईलः ज्योतिषहे शास्त्र आहे हे दाखवण्याकरता शास्त्राची व्याख्याच खोटी ठरवण्याच्या प्रयत्नामध्ये फारसे रोचक काही नाही), पण इतरांना असु शकतो. ती चर्चा कदाचीत वाचनीय ही व्हावी, तरी तुम्हाला इच्छा असल्यास चर्चा सुरु करावी.
5 Feb 2011 - 1:47 pm | मूकवाचक
(कुठल्याश्या चांगल्या डिक्शनरीतील व्याख्या मला रोजवापराकरता मान्य होण्यास काहीच अडचण नाही)
मग ती इथे देण्यात काय अडचण आहे?
तुम्ही शास्त्र म्हणजे काय ही व्याख्या न करताच 'सामान्य ज्ञानाने' ज्योतिष्याबद्दल निष्कर्ष काढलेलाच असल्याने मलाही अधिक काही बोलण्यात स्वारस्य नाही. असो.
5 Feb 2011 - 2:43 am | वडिल
मी ह्या विषया चा जाणकार नाहि पण २००३ मधिल ऐकिव माहिती च्या आधारे असे लिहतो.
१) भविष्य कथन हा इलेक्ट्रिकल मॅगनेटिझम, क्वान्टम मेकॅनिक्स आणि स्ट्रींग थिअरी वर आधारीत आहे.
२) भारतात हे सर्व प्राचीन काळा पासुन अभ्यासात होते.
३) भारतातील लोकं त्यामुळे नेहमी निवांत रहातात.
४) भविष्य सांगण्या साठि देवाची उपासना केली तर उपयोगी असते.
जाणकारांनी प्रकाश टाकावा हि विनंती.
5 Feb 2011 - 3:52 am | Nile
श्री वडिल यांनी ओंकार थेअरीचाही सामावेश करावा अशी विनंती करतो.
5 Feb 2011 - 4:14 am | वडिल
जरुर..
५) ओंकार थेअरी
पण हा काय प्रकार आहे हे माननीय नाइलजीच समजावुन सांगतील.
आमचा अॅनालिस्ट चिन्टु गुगलत बसेल आणि काहि सापडणार नाहि !
5 Feb 2011 - 4:16 am | Nile
दम धरा, जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)
5 Feb 2011 - 6:29 am | अर्धवटराव
प्रकाश अगोदरच भरपूर आहे. डोळे उघडुन बघितल्यास नक्की जाणवेल.
अर्धवटराव
5 Feb 2011 - 12:26 pm | प्रकाश घाटपांडे
याचिका फेटाळली मग आता या ज्योतिषाच काय करायचं?
5 Feb 2011 - 1:03 pm | वेताळ
ज्योतिष फक्त भारतातच बघितले जाते का?
इतर देशाना ह्याबद्दल काहीच माहिती नाही का?
कोणकोणत्या देशात ज्योतिष बघणे गुन्हा समजला जातो?
ज्योतिषशास्त्र जर थोतांड असते तर ते ४००० वर्षे कसे काय टिकले?
5 Feb 2011 - 9:50 pm | वडिल
तुमची प्रतिक्रिया वैयक्तिक प्रकारा ची वाटते.. तरी मी संपादका कडे तक्रार करणार नाहि.
अशा प्रकार चे शेरे ऐक्ण्याची आता सवय झाली आहे.. "बाप झाला तरी अजुन काहि अक्कल आली नाहि" ह्यावर मी फक्त इतकेच म्हणतो.. अक्कल असती तर बाप झालो असतो का ? असो.
ज्योतीष शास्त्र हे जरी बाकिच्या देशात थोड्या फार प्रमाणात असले तरी भारता सारखे परफेक्शन कुठे हि नाआआआअहि.
तुम्हि अजुन पंतांचा ब्लॉग वाचलेला दिसत नाहि. जाणकार तुम्हाला सांगु शकतील कि भारतीय ज्योतिषि किती परफेक्ट ज्योतीष सांगु शकतात ते.
वेताळ जी भारता बद्दल थोडा तरी अभिमान बाळगत चला. सारख सारख ...भ्रष्टाचार, गैरव्यवहार ई मुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहे. असो..
6 Feb 2011 - 9:59 am | विजुभाऊ
ज्योतिषशास्त्र जर थोतांड असते तर ते ४००० वर्षे कसे काय टिकले?
टिकले म्हणून नका डेव्हलप झाले. ४०००० वर्षांपूर्वी पत्रीकेत हर्शल नेपच्यून प्लुटो वगैरे ग्रह येत नसत. ( प्लुटो हा ग्रह आहे किम्वा कसे तो वाद नन्तर)
ज्योतिष हे मानवी मनाचा आरसा आहे. जे ऐकावेसे वाटते तेच ऐकले जाते. सांगितले जाते. ज्योतिष हे खरोखरच अचूक पूर्णत्वाला पोहोचलेले तथाकथीत शास्त्र असते तर प्रत्येक ज्योतिषाला स्वतःचे भवीष्य अचूक कळले असते लग्न,मृत्यू वगैरे समजले असते. आणि त्यांच्या स्वतःच्याच आयुष्यातील अस्थीरता संपली असती. ज्योतिष हे पुढे घडऊ शकतील अशा एखाद्या शक्यतेबद्दल सांगते. एका गोष्टीबद्दल होऊ शकणार्या अगणीत शक्यता असतात.
6 Feb 2011 - 10:40 am | वडिल
अचुक पुर्णत्वाला पोचलेले शास्त्र म्हणजे काय ?
न्याय संस्थे ने जर एखादा निर्णय दिला असेल तर त्यावर वाद कसला ?