नेवाळी ?

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
2 Feb 2011 - 12:06 am

ही वेल गेली अनेक वर्षे आहे. छाटणीमुळे विस्तार मर्यादीत असला तरी खोड बोटभर जाड झालेल. रोप आणल्यावरच काय जी फुले आली असतील ती. त्या नंतर मात्र जवळपास ५ वर्षांत फुले आली नाहीत; किंबहुना या वेलीली फुले येतात याचा विसर पडला. आणि अचानक गेल्या आठवड्यापासुन वेल बहरली. हा वेल कुंदाचा नक्कीच नाही. बहुधा नेवाळीचा असावा. कुठलाका असेना? त्यावर फुललेल्या फुलांनी खुश करुन टाकले. सकाळी जग आल्यावर प्रथम त्या फुलांवरच नजर जाते आणि मग दिवस सुरू होतो. आपल्याला आनंद देणार्‍या या छोट्या गोष्टी. बहर संपायच्या आत फुले चित्रबद्ध केली. आता चित्ररुपाने कायम डोळ्यासमोर राह्तील.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मला तर मोगर्‍या सारखी दिसतायत फुलं. (कळ्या थोड्या लांबट आहेत, पण एखदी पोटजात असु शकते मोगर्‍याची.)
नेवाळी बद्दल पुर्वी कधी ऐकलं नाही. काही दुसरं नाव आहे का याच?

आवांतर : फुल हुंगायची सोय असती तर कित्ती बर झाल असत. :)

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2011 - 2:45 am | पिवळा डांबिस

मला असलेली तुटपुंजी माहिती...
ही फुलं नेवाळीची असू शकतील. नेवाळी जाईच्या फुलासारखीच दिसते. पण जाईला जो सुगंध असतो तो नेवाळीला नसतो.
वसईकडे नेवाळीची खूप लागवड होते. तेंव्हा तिथल्या एखाद्या माहितगाराला (किंवा खरं तर मुंबईतल्या एखाद्या फुलवाल्याला) जर फुलं दाखवलीत तर तो नक्की सांगू शकेल.
नेवाळी जाईपेक्षा स्वस्त असते तेंव्हा कधीकधी जाईच्या फुलांमध्ये त्यांची भेसळही केली जाते. :(
चूभूद्याघ्या

गजरे करण्यासाठी याचा वापर केला जायचा. जायचा असे म्हणण्याचे कारण असे की आता ही लागवड फारशी केली जात नाही. या वेली बरीच वर्षे फुले देतात.खत पाण्यावर फारसा खर्च करावा लागत नाही .गजर्‍याच्या धंद्यावर धारावीचे आक्रमण झाल्यावर तगरीच्या कळ्याही भेसळ करायला वापरल्या जातात.
बाकी पिडांकाकांसारख्या जाणकारांना नेवाळी आणि जाईतला फरक एका 'निगाहेत' ओळखता येतो.

मला कुंदाचेच फूल वाटते आहे. मी नेवाळी पाहिली नाहिये कधी.

फोटो खूप सुंदर आले आहेत.

स्मिता.'s picture

2 Feb 2011 - 9:35 pm | स्मिता.

मला नेवाळी माहिती नाही. पण ही फुले आणि कळ्या कुंदाच्याच वाटत आहेत.

सहज's picture

2 Feb 2011 - 5:34 am | सहज

ताजेतवाने, टवटवीत दिसणारे व बघणार्‍याला करणारे प्रसन्न फोटो!

क्लासीक!!!

सन्जोप राव's picture

2 Feb 2011 - 5:38 am | सन्जोप राव

सुरेख फुले. चित्रे बघताना सुगंध आल्याचाही भास झाला.

दिपाली पाटिल's picture

2 Feb 2011 - 6:15 am | दिपाली पाटिल

मला ही काकड्याची फुले वाटतायत...गजर्‍यांत हीच फुले असतात बहूतेक.

कवितानागेश's picture

2 Feb 2011 - 9:26 am | कवितानागेश

काकडा म्हणजेच नेवाळी.

यशोधरा's picture

2 Feb 2011 - 9:31 am | यशोधरा

ही नेवाळीच आहे बहुधा. आमच्याकडे होती ही वेल.
शेवटून तिसरा फोटो आवडला.

हि नेवाळीच आहे.....
कोकणात जागोजागी हि वाढलेली दिसते

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 10:20 am | मुलूखावेगळी

वा छान आहेत
पन ही कोकनातच फक्त असतात का?
मला तर आमच्यकडे पन दिसली होती बहुतेक

कच्ची कैरी's picture

2 Feb 2011 - 11:03 am | कच्ची कैरी

मला तर ही कुंदाची फुले वाटताय .फोटो एकदम जबराट आले आहेत .

५० फक्त's picture

2 Feb 2011 - 2:53 pm | ५० फक्त

नेवाळी आणि काकडा एकच, आमच्याकडे काकड्याचे गजरे वेगळे मिळतात - लग्नाच्या पहिल्या वर्षात बायकोला द्यायचे मोग-याचे आणि वर्षानंतर काकड्याचे असे माझे काका नेहमी सांगायचे.

एकुंण फोटो फार छान आले आहेत.

धन्यवाद.

निवेदिता-ताई's picture

2 Feb 2011 - 3:20 pm | निवेदिता-ताई

फोटो फार छान आले आहेत...................मस्त....मस्त.....खुप आवडले.

सर्वासाक्षी ही नेवाळिच आहे.
माझ्याकडेही खुप बहर आला आहे हिचा.मी परवा संध्याकाळी घरी गेले आणि झाड निरखायला गेले माझी. आणि मला इतका आनंद झाला. माझे नेवाळीचे झाड फुलांनी पुर्ण बहरले आहे. जणू काय त्या झाडाने स्वत:ला गजरे घालुन सजवलय असच मला वाटत होत. एक मोह होत होता की ही सगळी फुल काढून घ्यावीत आणि त्याचे हार आणि गजरे बनवावेत पण ही वेल इतकी सुंदर दिसत होती की मला त्यावरुन फुल काढवली नाहीत. मी तशीच ठेवुन दिली झाडावर.

यशोधरा's picture

2 Feb 2011 - 4:57 pm | यशोधरा

मस्त दिसताहेत गं नेवाळी, जागू!

प्राजक्ता पवार's picture

2 Feb 2011 - 5:23 pm | प्राजक्ता पवार

सुरेख आले आहेत फोटो. मलादेखील आधी कुंदाचीच फुले वाटली होती पण आता नेवाळी ही नविनच माहिती मिळाली. जागुच्या अंगणातील वेलदेखील छान बहरली आहे.